अजिंक्यचे हे बोलणे
ऐकून दीपक म्हणाला
छे रे आज कुठले जमतय
संध्याकाळी अंध शाळेच्या मुलांचा एक कार्यक्रम आहे त्याची व्यवस्था आहे माझ्याकडे ...असे कर तुच चल माझ्यासोबत कार्यक्रमाला” दीपक म्हणाला .
“बरे राहु दे पुन्हा कधी तरी करू आपण प्लान ,पण मला नको बाबा त्या कार्यक्रमाचा आग्रह करू ..उगाचच बोअर होईन मी" अजिंक्य म्हणाला
त्यावर दीपक म्हणाला ,”अरे येऊन तरी बघ खुप छान कार्यक्रम बसला आहे .कलाकार तर “एकसे एक” आहेत मजा येईल तुला “
“खरे सांगु दीपक मला ती अंध मुले वगैरे पाहिली न अगदी कसेतरी होते .
त्याचे ते खोबणीच्या आतले डोळे ,ती काठी हातात धरून जगायची धडपड ..
नको वाटते रे तसे पाहायला “
“वेडा आहेस की काय अजिंक्य ?
अरे अंध मुले सगळीच काही खाचा झालेल्या डोळ्याची नसतात .
ते फक्त अपघाताच्या केसमध्ये डोळे गेले असतील तरच असते .
इतर वेळा अंध व्यक्ती आपल्या सारख्याच डोळ्याची असते .
फक्त त्यांच्या डोळ्यात “ज्योती” नसल्याने ते पाहु शकत नसतात .
आणि तु बघ तरी ही मुले आणि मुली इतकी स्मार्ट असतात की, तुझ्याजवळून एखादी अंध व्यक्ती जात असेल तर तुला समजणार पण नाही .
नवीन युगात ती सर्व पण स्मार्ट आणि टापटीप राहतात.
आपल्या अंधपणाचे ‘भांडवल “केलेले त्यांना अजिबात आवडत नाही .
खुप “हुरहुन्नरी” आणि “कलाकार” असतात ही मुले !
देवाने जेव्हा त्यांची दृष्टी काढुन घेतलेली असते तेव्हाच त्यांना एक सिक्स्थ सेन्स दिलेला असतो .
ती त्यांच्या कडे एक खुप मोठी “देणगी “असते .
आपल्या सारख्या कोणत्याही इतर माणसा पेक्षाही मुले खुपच “उजवी असतात “
आणि त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे असे वैगुण्य असुन सुद्धा हि सगळी मुले कायम “आनंदी” आणि “आशावादी”असतात .
त्यांच्याकडे पाहिले की अरे स्वतःची लाज वाटते .
आपल्याकडे सर्व असुन सुद्धा आपण बारीक सारीक गोष्टीत तक्रारी करीत असतो .”
त्याचे इतके सगळे विस्तृत बोलणे ऐकल्यावर अजिंक्यला पण त्यात खरेच
तथ्य वाटले ..व त्याने त्या कार्यक्रमाला जायचं ठरवले
“ बर बाबा तु म्हणतोस तर मी नक्की येईन
कोणते नाट्यगृह म्हणालास ?
अजिंक्य ने विचारले
“कलादालन नाव आहे त्याचे इथेच पुढे गांधी रोड वर आहे.
तिथे आहे हा कार्यक्रम बरोबर पाच वाजता मी वाट पाहतो तुझी
आलास की मला कॉल कर
मी तुझी बसायची व्यवस्था करतो “
असे बोलुन दीपक तिथून निघुन गेला .
अजिंक्य दुपारी जेवण झाल्यावर रूमवर परतला आणि त्याला गाढ झोप लागली .
अचानक जाग आली आणि त्याने घड्याळ पाहिले तर चक्क साडेपाच वाजले होते .
ओह शीट !!...मी पण काय इतका वेळ झोपलो असेन
असे म्हणत त्याने चटकन तोंड धुऊन कपडे बदललेआणि मोटरसायकलला
किक मारून तो बाहेर पडला .
कलादालन पाशी पोचायला त्याला साडेसहा वाजले .
मोटरसायकल पार्क करून तो दरवाज्यापाशी आला तोच दीपक आतुन बाहेर आला .”काय यार अजिंक्य खुप उशीर केलास ..
अजिंक्य थोडा ओशाळला आणि दिलगिरीचे हसला
ठीक आहे कार्यक्रम थोड्या वेळा पुर्वी सुरु झालाय .
त्याने तेथील एका मुलाला हाक मारली आणि म्हणाला
निनाद याला चार नंबर लाईनीत बसव रे
आणि त्याच्या बरोबर अजिंक्य आत गेला .
कार्यक्रम खरोखर छान होता .जसे दीपकने सांगितले होते तशी मुले मुली एकदम स्मार्ट होती .एक दोन गाणी नाच झाल्यावर एक छोटी एकांकिका झाली आणि मध्यंतर झाले .
मुलांचा उत्साह आणि आनंद पाहण्या सारखा होता.
शिवाय मुलांचे पालक पण त्यांच्या पाल्यांचे कौतुक पाहायला आले होते
त्यामुळे भरपूर गर्दी होती .
इंटरवल मध्ये
अजिंक्य हॉल बाहेर निघाला तेव्हा त्याला एक बाई दिसली .
उंची साडी नेसलेल्या त्या बाई सोबत आणखीन पण बायका होत्या
तिला पाहताच त्याला आठवले ..अरे ही तर “सुनयना “ची आई दिसतेय
म्हणजे सुनयना पण नक्की असणार तिच्या सोबत .
सर्व महिला वर्ग चहाच्या स्टालकडे निघाला होता .
अजिंक्य पण त्या दिशेने जाऊ लागला तोपर्यंत दीपक ने त्याला अडवले
“ये रे अजिंक्य मस्त चहा घेऊया ,आता मी आहे थोडा रिकामा उरलेला कार्यक्रम सोबतच पाहुया “.
चहा पिता पिता गप्पा करण्याच्या गडबडीत त्या बायका पण आत कार्यक्रमाच्या इंटरवलच्या नंतरच्या भागा करिता निघुन गेल्या.
अजिंक्यने विचार केला ठीक आहे कार्यक्रम संपल्यावर सर्व परत दिसतीलच मग शोधुया आपल्या “सुनयना “ला .
दुसरा भाग सुरु झाल्यावर दीपक अजिंक्यला म्हणाला “आता एक छोटे नाटुकले आहे त्यानंतर पाहुणे चार शब्द बोलतील मग एक सर्वांगसुंदर भरतनाट्यम चा “अविष्कार” आहे ..तु पाहशील तर चकित होशील .
त्या चारपाच जणी इतक्या सुंदर परफॉर्मन्स देतात ना की शंका पण येत नाही या अंध असतील अशी ..”
दीपकला त्या शाळेतल्या मुलामुलींची खडानखडा माहिती होती .
त्याच्या या बोलण्यावर अजिंक्यने स्मित केले .
ठरल्या प्रमाणे सर्व झाल्यावर “भरतनाट्यम” ची घोषणा झाली
आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
या कार्यक्रमाची “लोकप्रियता” खुपच दिसत होती .
पडदा उघडला आणि नृत्य सुरु झाले .
चार सुरेख मुली आणि मध्यात एक खुप देखणी मुलगी नृत्य करीत होत्या .
सर्वजणी अगदी “पारंगत” होत्या नृत्यात
तालबद्ध आणिकौशल्यपूर्ण नृत्य होते त्यांचे .
त्यातल्या त्यात मोरपंखी पेहेराव केलेली मधली मुलगी खुपच देखणी होती आणि तिच्या हालचाली खुप मोहक होत्या .
काजळाचा भरपूर “मेकअप” केलेले तिचे मोठे मोठे डोळे नजर खिळवुन ठेवत होते .
आणि अचानक अजिंक्यला जाणवले की अरे आपण हीला कुठेतरी पाहिले आहे .
त्याने दीपकला विचारले त्या मुलीविषयी ..
“अरे ती मधली मुलगी न ..
ती रेवती साने आहे .
अंधशाळेतील सर्वात हुशार ,सुंदर आणि गुणी मुलगी “
आता मात्र चकित व्हायची पाळी अजिंक्यची होती
कारण ती अंध मुलगी म्हणजे त्याची “सुनयना “होती ....
आता समजायला लागला त्याला त्याच्या सुनयनाच्या सगळ्या वागण्याचा अर्थ .
आणि त्याने तिच्याविषयी करून घेतलेला गैरसमज
आणि मग तो एकदम “सुन्न “होऊन गेला !!