कृतांत ५ दुसर्या दिवशी भल्या पहाटे शर्मा,मौर्ये , गौरी व राज उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी गेले. मुख्य राजवाड्याच्या जागेपासून सुमारे कोसभर अंतरावर मारुतीच देऊळ असलेली जागा होती.राज त्याच्या जवळच्या नकाशावरून मार्ग दाखवत होता.राजने मिळालेल्या माहितीनुसार एक नकाशा तयार केला होता.एका भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राज थांबला." या इथेच कदाचित ते मारूती मंदिर असावे.कारण तो मारुती अश्वस्थ मारुती असल्याचा उल्लेख त्या लेखनातं आहे. आपल्याला इथेच शोध घ्यावा लागेल."" नक्की ना?" गौरीने विचारले." हो शंका घेवू नका. आपल्या जवळ वेळ कमी आहे.काहितरी अघटीत घडणार असं मला वाटतंय."शर्मा व मौर्ये जागेच निरिक्षण करत होते. गौरीने तिथे आपली जमीनीखालील रचनेचा वेध घेणारी उपकरणे बसवली व लॅपटॉप वर त्याच विश्लेषण करुन लागली.अचानक ती ओरडली" सर, इथे...या ठिकाणी खाली छोटंसं पक्क बांधकाम असल्याची चिन्हे दिसताहेत. कदाचित एखाद मंदिर असावे"शर्मानी लॅपटॉपचा स्क्रीन न्याहाळत मान डोलावली." मोर्ये, आपल्या सगळ्या सिमला फोन करून बोलवा.त्वरीत काम सुरु करूया. आज संध्याकाळपर्यंत काहितरी ठोस असं हाती लागेल."" मग मी सांगितलेलं बरोबर आहे ना?" राजने हसत गौरीला विचारले." कधी कधी अंदाज चुकून बरोबर येतात म्हणलं." गौरीने पुन्हा त्याला डिवचले." ते रक्षा कवच असणारे ताईत सापडणे महत्वाचे आहे." राज म्हणाला.---------****------*******,---*******------***------****--- ताईत शोधण्याचे काम चालू असताना नागपूर जवळ एका मोठ्या धार्मिक सोहळ्याचं आयोजन चालले होते. एका भल्या मोठ्या मंडपात विश्व शांती साठी शतचंडी यज्ञ चालू होता.अनेक यज्ञकुंडे रांगेत मांडली होती.अनेक ब्राह्मण तिथे मंत्रपठण करत होते.मंद संगीत तिथे चालू होते.हजारावर स्री पुरूष तिथे भक्ती भावाने बसली.भगवी वस्त्रे परिधान केलेले शेकडो साधू परीसरात वावरत होते.सगळ्यांची लगबग चालली होती. यज्ञकुंडात समिधा टाकल्या जात होत्या.उठणार्या धुरासोबत एक सुगंध वातावरण दरवळत होता.त्याचवेळी भगवी वस्त्रे परीधान केलेले दहा साधू त्या मंडपात आले.इतर साधू प्रमाणे हे आलेले साधू असतील असं समजून कोणीही त्यांच्याकडे फारसं लक्ष दिले नाही.त्यातला एक साधू लक्षात येण्याइतपत गलेलठ्ठ होता.त्या दहा साधूंच्या चेहर्यावर कोणतेही भाव नव्हते.त्यातला एक साधू मंडपाच्या मध्यभागी आला.हात वर करून तो ओरडला " बंद करा ...हे मंत्र...आणि जयघोष."त्यांच्या त्या कर्कश आवाजामुळे क्षणभर सगळं शांत झालं. तोपर्यंत त्यांच्या सोबतचे साधू यज्ञकुंडाची नासधूस करायला लागले. अचानक तिथे धावपळ सुरू झाली.काही लोक व तिथे उपस्थित असलेले वीस ते पंचवीस पोलीस त्या साधूंना अडविण्यासाठी धावले.हातातल्या लाठ्या उगारत पोलीस तिथे पोहचले." कृतांता, बघतोस काय? पळव यांना."त्यांचा म्होरक्या म्हणजे अघोरी अग्नीधर ओरडला.होय ते दहा साधू म्हणजे अग्नीधर,त्यांचे शिष्य व कृतांत होते.अचानक कृतांताच्या डोळ्यात अंगार पेटला. अभद्र शिव्या घालत त्याने भली मोठी गर्जना केली.त्या आवाजाने सारे चरकले.एकाच वेळी चार पोलीसांनी त्यांच्यावर लाठ्या लगावल्या.पण चारही लाठ्या त्याच्या अंगावर बसताक्षणी तुटल्या.कृतांताने दोन पोलीसांना पकडले व गरागरा फिरवून फेकून दिले. तिथे असलेल भल मोठ टेबल कृतांताने उचलले त्यांच्या दिशेने धावत येणार्या दहा ते पंधरा लोकांवर भिरकावले. कृतांत मोठमोठ्याने ओरडत होता .... गर्जना करत होता. सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला.एकाचवेळी शंभर एक लोकांनी त्याला वेढल. कृतांतने प्रचंड गर्जना करत तंबूच्या मध्यभागी बसवलेला लोखंडी खांब उखडला.वीस एक फूट उंचीचा तो खांब दोन्ही स्वतः भोवती गरागरा फिरवून लागला.त्याची ती अतर्क्य ताकद पाहून धावत येणारे सारे थबकले.उलट दिशेने सैरावैरा पळू लागले. तेवढ्यात उरलेल्या पोलीसांनी बंदुकीच्या फैरी झाडायला सुरूवात केली.त्यावेळी चक्रधराने हवेत वर्तुळाकार हात फिरवला.त्याचे पाहून उरलेले अघोरी तसेच करु लागले व मंत्र पुटपुटू लागेले. पोलीसांनी झालेल्या गोळ्या विशिष्ट अंतरावर हवेतच आपटून खाली पडू लागल्या.सगळीकडे हलकल्लोळ उडाला.चेंगरा चेंगरी सुरू झाली.जीवच आकांत लोक पळत होते. कृतांताच्या खांबाच्या तडाख्याने काही लोक मृत्युमुखी पडले तर काही जखमी होऊन पडले. अचानक चक्रधर ओरडला..." आपापले देह सोडा व नाव देह धारण करा."बघता बघता ते दहा संन्यासी बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळले. प्रत्येक अघोरी पळणाऱ्या एका नव्या इसमाच्या शरीरात घुसले.या गडबडीत कृतांत एका प्रौढ स्त्रीच्या शरीरात प्रवेश करता झाला.हे अधोरी शरीर बदलली तरी एकमेकांना ओळखू शकत होते.यज्ञ मंडप उध्वस्त झाला होता.तिथे जखमी व मृत माणसांचा माणसांचा खच पडला होता. संन्यासी पडलेलं पाहून पळणारे पोलीस माघारी फिरले.-----****-----***------****-------******------****** संध्याकाळ पर्यंत पुरातत्व विभागाने पिंपळाच्या खाली असणारे हनुमान मंदिर शोधून काढले.ते एक सुंदर सुबक मंदिर होते.तिथे दगडात कोरलेली द्रोणागीरी पर्वत तळहातावर उचलून नेणारा हनुमंताची मूर्ती होती. या मूर्तीच्या जवळच ते ताईत एका कोपर्यात धातूच्या पेटीत ठेवलेले आढळले. ते ताईत पाहून राज खूष झाला." यावरची लिपी व तलवारी वर लिहिलेली लिपी एकच आहे.हे मंत्रबहुधा गुरू रघुवीर यांनी सिद्ध करून यावर कोरून घेतले असावेत."" आता हे सातवे वर्षांपूर्वींचे ताईत घालून तू मिरव."गौरी गमतीने म्हणाली." हे मिरवण्यासाठी नाहित तर अघोर्यांच्या तांत्रिक शक्ती पासून वाचण्यासाठी आहेत."" मला वाटतं राज सांगत असलेल्या गैष्टीत काहितरी तथ्य आहे." " सर, तुम्ही हे कशावरून म्हणू शकता." गौरीने विचारले." आत्ताच मला दोन मेसेज आलेत .त्यात एकात अपहरण झालेला आमदार एका झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडला असून तो गंभीर जखमी आहे.दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आपण कोण तेच आठवत नाही. तर दुसरी बातमी आहे नागपूर जवळील एका धार्मिक कार्यक्रमात शिरलेल्या दहा संन्याश्यांची त्यात एक अमानवी ताकदीच्या संन्यासी असल्याचा उल्लेख आहे.पण बातमी पूर्ण कळलेली नाही."सारेच क्षणभर गप्प झाले." नक्कीच तो कृतांत असणार व उरलेले नऊ अघोरी. आपल्याला लवकरच पोलीसांना भेटाव लागणार त्यांना ही माहिती द्यावी लागेल." राज म्हणाला." तूला ते वेडा ठरवतील. त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल ते पाहूया." गौरी म्हणाली." पहिल्याने ते ताईत गळ्यात घाला. आपण शांतपणे विचार करून ठेवूया काय करायचे ते." शर्मांनी सांगितले." मला वाटतं ते वेग- वेगळ्या वेषात संचार करत असतील त्यांना ओळखत कठीण आहे.दुसरी गोष्ट म्हणजे ते गर्दीची ठिकाणे त्यांतही धार्मिक ठिकाणावर हल्ला करतील." राज म्हणाला.-----****--------******------***--------*********-----भाग ५ समाप्त