ll श्री गणेशाय नमः ll ll श्री हरी ll
ह.भ.प. संतकवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय नामें ग्रंथस्य
अध्याय पहिला.
श्री गणेशाय नमः ll
जयजयाजी श्री गणेशा l गौरीपुत्रा, मयुरेश्वरा l उदारकिर्ती प्रतापज्योती l जयजयाजी गणपती ll१ll मोठ मोठें विद्वान l साधुसंत आणि सत्पुरुष सर्वच जण l कोणत्याही कार्यारंभी तुझें स्मरण करीत असतात ll२ll तुझ्या कृपेने आणि तुझ्या आगाध शक्ती मुळें l कार्यांत येणारी सर्व विघ्ने जळुन भस्म होतात l दयाघना अग्नी समोर कापसाचा l तो काय निभाव लागणार आहे ll३ll श्री गणेशाच्या मंगल चरणीं l मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो l देवा, दासगणू च्या मुखातून सरस l अशी काव्यमय पद्य रचना व्हावी ll४ll मी अज्ञानी आणि मंदगती आहे l मला काव्यमय रचना करण्याचे ज्ञान नाही ll५ll पण देवा तु माझ्या चित्तात वास केल्यास l माझे कार्य सिध्दिस जाईल l
प्रतापज्योती, जयजयाजी गणपती ll६ll मोठ मोठें विद्वान l साधुसंत आणि सत्पुरुष सर्वचजण l कोणत्याही कार्यारंभी तुझें स्मरण करीत असतात ll७ll तुझ्या कृपेने l आणि तुझ्या आगाध शक्ती मुळें l कार्यांत येणारी सर्व विघ्ने l जळुन भस्म होतात ll८ll दयाघना अग्नी समोर कापसाचा तो l काय निभाव लागणार आहे ll९ll श्री गणेशाच्या मंगल चरणीं l मी नतमस्तक होऊन l प्रार्थना करतो देवा, दासगणू च्या मुखातून सरस l अशी काव्यमय पद्य रचना व्हावी ll१०ll मी अज्ञानी आणि मंदगती आहे l मला काव्यमय रचना l करण्याचे ज्ञान नाही ll११ll पण देवा तु माझ्या चित्तात l वास केल्यास l माझे कार्य सिध्दिस जाईल ll१२ll ब्रम्हाची प्रकृती जी आदी माया सरस्वती आहे l कवीवरांची ध्येय मुर्ती l ब्रम्हकुमारी शारदा आहे ll१३ll त्या जगदंबा मातेच्या चरणी l माझे साष्टांग नमन आहे l मी अजाण लेकरू आहे ll१४ll आपण माझा अभिमान धरावास l तुझ्या कृपेची अगाध थोरवी आहे l पांगळा पहाडावर चढतो l तर मुका भर सभेत l अस्खलित व्याख्यान देतो ll१५ll या तुझ्या कीर्तीला l कमीपणा आणुन देऊ नकोस l दासगणूला ग्रंथ रचनेत तु साह्य करावेस ll१६ll हे पुराण पुरुषा l पंढरीच्या पांडुरंगा l सच्चिदानंदा, रमेशा l आपण माझ्या कडे लक्ष द्यावे ll१७ll सर्वसाक्षी जगदाधारा l तु व्यापक चराचरा l सर्वेश्वरा, तुच कर्ता करविता आहेस l तुच तु आहेस या जगतात ll१८ll जग, जन आणि जनार्दन l सगुण निर्गुण l तुच एक परिपूर्ण l माय बाप आहेस ll१९ll पुरुषोत्तमा, ऐसा तुझा आगाध महिमा आहे l जो मोठं मोठ्यांस न कळे l तेथे या गणूचा l काय पाड लागणार आहे ll२०ll असा तुझा अगाध महिमा आहे l जो सर्व सामान्यांना कळतं नाही l पुरूषोत्तमा अरे तेथे या गणूचा काय पाड लागणार आहे ll२१ll श्रीराम कृपा झाली तेंव्हा l माकडांना सुध्दा शक्ती मिळाली होती l यमुना तीरी गोकुळात बालगोपाल l बलशाली झाले होते ll२२ll तुझी कृपा होण्यासाठी l धनदौलत नको आहे l मनापासून तुझ्या चरणी नतमस्तक होतांच l तुच सर्वांना साह्य करतोस ll२३ll संतांनी डांगोरा पिटला l म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे l मला आता विन्मुख परत पाठवु नकोस ll२४ll पांडुरंगा आपण माझ्या चित्तात l बसून हे संत चरित्र लिहिण्यास मला साह्य करावे l आणि ग्रंथ कळसास न्यावा ll२५ll हे भवभयांतक भवानीवरा l निळकंठा गंगाधरा l ओंकार रुप त्र्यंबकेश्वरला l माझी विनंती आहे ll२६ll आपण माझ्या डोक्यावर l आपला वरदहस्त ठेवावा l तुझे साह्य असल्यावर l मला काळाचा ही डर नाही ll२७ll भंगार लोखंड परीसाच्या l नुसत्या स्पर्शाने
सोनं होते ll२८ll तुझी कृपा हाच माझा परीस आहे l मी दासगणू म्हणजे लोखंड आहे l आपण मला साह्य करावे ll२९ll अजिबात दुर लोटु नये l सर्व काही तुमच्याच हातात आहे l तुम्हाला काहीच अशक्य असे नाही ll३०ll ग्रंथ सुगम होण्यासाठी l माझे भले होण्यासाठी l आपण या लेकरास मदत करावी ll३१ll श्री जगन्माता कोल्हापूरवासीनी l माझ्या कुळाची कुलदेवता l मी तुमच्या पायावर माझा माथा ठेवतो ll३२ll हे दुर्गे तुळजाभवानी l अपर्णे अंबे मृडानी l दासगणू च्या शिरावर नेहमी l तुझें वरद पाणी असु द्यावे ll३३ll आता मी भगवान दत्तात्रयास वंदन करीत आहे l आपण मला सदैव पावा l आणि श्री गजानन चरीत्र गाण्यास l मला सदैव प्रसादा सहीत स्फुर्ती द्यावी ll३४ll शांडिल्य ऋषी, वसिष्ठ ऋषी l गौतम ऋषीं, पराषर ऋषी l तसेच ज्ञानाच्या आकाशात l जो दिनकर आहे l त्या शंकराचार्यांना माझें नमन असो ll३५ll सर्व संत महंत l यांना माझें नमन असो l आपण सर्वांनी या l दासगणूच्या हाताने l ग्रंथाचे लेखन पुर्णत्वास न्यावे ll३६ll गहिनीनाथ, निवृत्ती l ज्ञानेश्वर, देहुकर तुकाराम l तसेच भवसागरातुन तारणहार करणारे l थोर रामदास स्वामी l या सर्वांना माझे नमन असो ll३७ll हे शिर्डीचे साई समर्था l वामन शास्त्री पुण्यवंता l तुमचा दासगणूस अभय असावा ll३८ll दासगणू हे तुमचे l तान्हे बाळ आहे l तुम्ही कठोर होउ नका l असे बोलणे मी तुमच्याच l कृपेने करीत आहे ll३९ll आपलं नातं l माय लेकराचे आहे l मायच लेकरास l बोलणे शिकविते ll४०ll लेखणीतून अक्षरे निघतात l पण खरेतर तिच्यात l आजिबात जोर नाही l लेखन करण्यासाठी l ती मात्र निमीत्ताने आहे ll४१ll दासगणूची आपणास l प्रार्थना आहे की l मी आपलीं लेखणी आहे l माझ्या कडून आपण सर्व संतांनी l माझ्या रसभरीत ग्रंथाचे l लेखन पुर्णत्वास न्यावे ll४२ll आता आपण सर्वांनी एक चित्ताने l संतकथेचे श्रवण करावे l स्वतः चे कल्याण l करुन घेण्यासाठी l श्रोतेहो आपण सावध व्हावे ll४३ll संत म्हणजे सुनिती ची मुर्ती आहे l संत भव्य कल्याणकारी पेठ आहे l कोणाही संतांनी आजवर l कोणालाही धोका दिलेला नाही ll४४ll तरी ध्यान देऊन आपण l संत चरित्राचे श्रवण करावे lअमोघ ज्ञानाचे गाडे l तेचं असतील जे ईश्वरी l तत्त्वांचे वाटाडे आहेत ll४५ll श्री गजानन महाराजांचे चरीत्र ऐकण्यासाठी l आपण मन स्वच्छ करून लक्ष द्यावे l रुक्मिणी कांत पांडुरंग l त्याला आशिर्वाद देतील ll४६ll आजवर भरतखंडात l बहुत संत झाले आहेत l पण आजकाल देशासाठी l ही एक पर्वणीच आली आहे ll४७ll हे जंबुद्वीप धन्य धन्य झाले आहे l येथे कोणत्याही सुखाची वाण नाही l संत चरण येथे अनादी l काळापासून चालत आलेले आहेत ll४८ll नारदमुनी, ध्रुव बाळ l कयाधू कुमार, उद्धव l सुदामा, सुभद्रा वर l महाबली अंजनी कुमार ll४९ll अजातशत्रू धर्मराज l जगद्गुरू शंकराचार्य l हे जे पतितांचे कल्पतरू l जे आध्यात्मिक विद्येचे l महामेरू आहेत l ते सर्व याचं देशात झाले आहेत ll५०ll मध्व - वल्लभ - रामानुज यांचा l जो ऋणी अधोक्षज l ज्याने आपले सामर्थ्य दाखवुन l धर्मांची लाज राखली होती ll५१ll नरसी मेहता, तुलसीदास l कबीर, कमाल, सुरदास l गौरंग प्रभु यांच्या लीलांचे l वर्णन करावे तरी किती ll५२ll राजकन्या मीराबाई l तिच्या तर भक्तीला पार नाही l तिच्या साठी भगवान l श्रीकृष्णांनी विष सुध्दा l प्राशन केले होते ll५३ll गोरखनाथ, जालंदरनाथ l जे योग योगेक्षवर आहेत l ज्यांचा श्री नवनाथ भक्ती सारं l नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ll५४ll नुसती हरी भक्ती करून l ज्यांना देव पावला ते l नामा, नरहरी, सन्मती, जनी, कान्होबा ll५५ll संत सखुबाई, चोखामेळा, सावतामाळी l कुर्मदास, दामाजी पंत हे l सर्व पुण्य पुरुष आहेत ll५६ll ज्यांच्या मुळे स्वतः श्री हरी l महार बनुन बेदरास गेला होता ll५७ll मागें महिपती यानी l ज्यांची चरीत्रे गायन केली होती l ते मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ll५८ll ज्यांची चरीत्रे मागे महिपती नी l गायन केली होती, मी सविस्तर इथे देत नाही ll५९ll पण मी नम्रपणे सांगतो l आपण श्री भक्ती विजय l भक्तमाला जरूर वाचा ll६०ll त्यानंतर त्या संतांनी l जे जे केले ते l मी तीन ग्रंथां मध्ये गायले आहे l ते आपण पहा म्हणजे आपणास कळेल ll६१ll श्री संत गजानन महाराज l हे खरोखरच त्याचं तोडीचे l महान् संत आहेत ll६२ll या अवतारी पुरुषाचा प्रभाव l तर लोकोत्तर खचितच आहे l मी जी श्री संत चरित्रे मागे गायली आहेत l ती मी सारांश रुपाने आपणास सांगितली आहेत ll६३ll माझं सुदैव आहे की मला l हे चरित्र रचण्याचा योग आला l तेच चरीत्र मी आपणास l कथित करीत आहे l तरी आपण सर्वांनी लक्ष देउन ऐका ll६४ll अकोटा जवळ मी l भला हां संत पाहिला होता l आधी माळा ओवतात l नंतर त्यात मेरूम़णी जोडतात ll६५ll हे चरित्र रचण्याच्या वेळेस l अगदी तसेच झाले होते l वर्हाडात खामगाव तालुक्यात l शेगाव हे एक प्रख्यात गावं आहे ll६६ll
जेथे मोठ्या प्रमाणात l व्यापार चालत होता l गाव तसे लहान l पण वैभव मात्र मोठें होतें ll६७ll श्री स्वामी गजानन महाराज l यांच्या मुळे शेगांव जगात l अजरामर झाले आहे ll६८ll सरोवरात जसे कमल उमलते l तसेच शेगांवात श्री गजानन महाराज हे l अखिल ब्रम्हांडात l सौरभें वेधिते झाले होते ll६९ll श्री गजानन महाराज l नावाचा हिरा शेगांवात आला l या अवलियाचा प्रभाव l मी मतीमंद सांगत आहे ll७०ll तरी जरा धीर धरा l आपण श्री गजानन महाराजांच्या l चरणी निस्सीम प्रेम धरावे ll७१ll त्यामुळे तुमचा नक्की l उध्दार होईल हे l आपण विसरता कामा नये l श्री गजानन महाराज नावाचा संत आला ll७२ll शेगांव निवासी थोर भाग्याचे l म्हणून संत रत्न श्री गजानन महाराज त्यांना लाभले ll७३ll संत चरण लाभते l जेथे पुण्यवंत राहती l संत हे देवा हुन श्रेष्ठ आहेत l यांत शंका नाहीं ll७४ll पाउस पडताच l पाण्याचा वर्षाव होतो l श्रोते हो अवघें मोर l जसे आनंदाने नाचू लागतात ll७५ll रामचंद्र पाटील यांनी l मला विनंती केली l कार्तिकी च्या वारीला पंढरपुरी यावं ll७६ll माझ्या मनात होते l श्री गजानन महाराज यांच्या l चरित्राचे तेथे गायन करावे ll७७ll पण ते काही l जुळून आले नाही l पुरतता माझ्या इच्छेची करण्यासाठी ll७८ll समर्थांनी रामचंद्र पाटील l यांची योजना केली होती l संतांचे धोरण कोणालाही कळत नाही ll७९ll महापुरुषांच्या आधुनिक जगातात l श्री गजानन महाराज हे l सर्व संतांचे चुडामणी आहेत ll८०ll महापुरुषांच्या जातीची l कोणाला काही माहिती नाही l ऐतिहासिक द्रष्ट्या l ते महत्वाचे सुद्धा नाही l जसे ब्रम्हाचा ठिकाणा कोणालाही माहीत नाही l ते ब्रम्हास पाहून l निश्चय करणे असते ll८१ll हिर्याचे तेज पाहून l सर्व मंत्रमुग्ध होतात l हिरा हां हिरा असतो l तो कोठुन आला, कसा मिळाला l हे कोणी विचारत नाहीत ll८२ll श्री गजानन महाराज हे l ऐन तारुण्यात पदार्पण झालेले असताना l शेगांवात शके अठराशे च्या l माघ वद्य सप्तमीला प्रकट झाले ll८३ll तर कोणी म्हणतात l श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या l सज्जन गडा वरून l श्री गजानन महाराज माऊलीं येथे आले असावेत ll८४ll याला पुरावा असा कांहीच नाही l पण त्यांच्या म्हणण्यात l काही अर्थ असावा ll८५ll नाना यातनांनी गांजलेल्या l भ्रष्ट झालेल्या लोकांना l आधार म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज यांनी ll८६ll श्री गजानन महाराज यांना l येथे पाठविण्याची योजना केली असावी ll८७ll जगाचा उद्धार करण्यासाठी l श्री गजानन महाराज यांच्या l रूपाने देवानेच अवतार घेतला असावा ll८८ll जगद्गुरू नी नेहमी भुतलावावर l असा अनुभव दिलेला आहे l मानवी रूप घेऊन l योगीराज स्वतः पृथ्वी वर जन्म घेतात ll८९ll गोरखनाथानी उकिरड्यावर l जन्म घेतला होता l कानिफनाथानी हत्ती च्या कानात l जन्म घेतला होता ll९०ll तर चांगदेव नारायण हे तर l पाण्याच्या डोहात l आई विना प्रकटले होते ll९१ll निश्चितच येथे सुध्दा असेच l काही घडले असावे l श्री गजानन महाराज यांना l योगाची सर्व अंगे अवगत होती ll९२ll हे त्यांनी वेळोवेळी केलेल्या l अनेक लीलांवरून l पुढे कळेलच आहे ll९३ll योगिराज श्री गजानन महाराज l यांचा महिमा अपरंपार आहे l त्याचीं सर कोणालाही l येणार नाही ll९४ll श्री गजानन महाराज शेगांव निवासी l माघ महिन्यात वद्य सप्तमीला l पतीताना तारण्या साठी l प्रकटले होते ll९५ll ती कथा मी सांगतो आहे ती ऐका l
देवीदास नावाचा एक भाविक l शेगांवात रहात होता ll९६ll पातुरकरांचा हा एक सज्जन l वंशज होता l माध्यंदिन शाखेचा हां l मठाधिपती महंत होता ll९७ll त्या दिवशी त्यांच्या मुलाची l ऋतू शांती होती l त्यांच्या घरी भोजनाचा l कार्यक्रम आयोजित केला होता ll९८ll घराच्या अंगणात दारापाशी l उष्ट्या पत्रावळ्या टाकलेल्या होत्या ll९९ll त्याच वेळी श्री सिध्द योगी l तेथे येऊन बसले होते l अंगावर फक्त l जुन्या पुराण्या कापडाची बंडी l आणि पाण्यासाठी एक भोपळा l बस एवढेच होते ll१००ll बाकी काहीही नव्हते l एक कच्ची चिलीम l त्यांच्या हातात होती l जी कुंभाराच्या भट्टीत l शेकवलेली सुध्दा नव्हती ll१ll प्राचीच्या बाल रवि प्रमाणे l नाका समोर सरळ द्रष्टी l एकदम शांत मुद्रा होती l त्यांच्या अंगातील l तपोबल झळाळत होते ll२ll मजबूत बांधा आणि गौर वर्णाचे l शरीर एकदम नजरेत भरत होतें l श्री गजानन महाराज माऊलींचे l वर्णन करावे तरी किती ll३ll मुर्ती अवघी दिगंबर होती l त्यांच्या चेहर्या वरील भाव l मात्र मावळलेला होता ll४ll तेथे बसून त्या टाकलेल्या पत्रावळीं मध्ये l उष्टी शीते शोधत होते l भाताचे एखादे शीतं मिळाले l तर ते तोंडांत टाकतं होते ll५ll अन्न हे परब्रह्म आहे l हा संदेश ते देत होते l उपनिषदे सांगतात lअन्न हेच ब्रम्ह निगुती l अन्नम ब्रम्हेती आहे ll६ll हे पटवून देण्यासाठी दयाघन l तिथे शीते वेचीत होते l पण हे सर्व सामान्य माणसाच्या l कल्पने पलीकडे आहे ll७ll बंकटलाल आगरवाल आपल्या स्नेह्यांच्या l बरोबर चालत असताना l त्यांनी हा प्रकार पाहिला ll८ll त्यांच्या स्नेह्यांचे नांव l दामोदर पंत कुलकर्णी होते l तो प्रकार पाहून दोघेही चकित झाले होते ll९ll हा जो कोणी आहे l तो वेड्या सारखा दिसतो आहे l पण यांची कृती l मात्र विचीत्र दिसतें आहे ll११०ll दोघे एकमेकां बरोबर बोलु लागले l खरेच यांस भुक लागली असती l तर यांनी अन्न मागीतले असते ll११ll देवीदासाने आनंदाने दिलें असते l कारण तो एक सज्जन l आणि दयाळू सद् गृहस्थ आहे ll१२ll तो दारीं आलेल्या कोणत्याही l याचकाला रिक्त हाताने l कधीच परत पाठवत नाही ll१३ll पण या साधुच्या कृतीचा l काही तर्कच करता येत नाही l आपण येथुन यांच्या l कृतीचा अंदाज घेऊया l असे बंकटलाल पंतांसी म्हणाले ll१४ll खरे साधू या जगात l वरवर पिशा सारखे वागतात l ऐसे व्यासांनी भागवतात लिहिलेले आहे ll१५ll कृतीतून जरी हे वेडे l दिसत असले तरी l हे कोणी ज्ञानवंत असावेत ll१६ll प्रत्यक्ष हा कोणीतरी ज्ञानाचा पंडित असावा l असे वाटते आहे l असा विचार करत l ते दोघे तेथे च् उभे होते ll१७ll या रस्त्यावर कित्येक लोक येत जात होते l पण कोणालाही माऊली दिसले नाहीत l मात्र या दोघांनी माऊलींना l बरोबर ओळखले हे लक्षात घ्या. ll१८ll रत्नपारखी च् फक्त l रत्नांची पारख करूं शकतात l हिरे आणि गारा एकत्र असतील l तर रत्न पारखी गार टाकून बरोबर रत्ने निवडुन घेतात ll१९ll प्रथम बंकटलाल आगरवाल पुढे झाला l त्याने माउलींना विनयाने l विचारले, "आपण पत्रावळीं मध्ये l काय शोधत आहात ll१२०ll मला काही कळले नाही l आपणास भुक लागली आहे का l मी आपणास काही l खाण्यासाठी आणून देऊ का ll२१ll काही उत्तर मिळाले नाही l माउलींनी फक्त l दोघांच्या तोंडाकडे वर पाहिले ll२२ll त्यांच्याकडे पाहिले तर भव्य छाती l पिळदार दंड आणि मान l सतेज कांती, द्रष्टी एकदम स्थीर ll२३ll भृकटी ठायी लागली होती l त्या दोघांनी निजानंदी रंगलेला l असा श्री योगीराज पाहिला ll२४ll आणि त्यांनी मनोमन माउलींना वंदन केले l तर त्यांच्या चित्तांत एकदम संतोष वाटला ll२५ll देवीदास बुवांना विनंती केली l ताट वाढून पटकन बाहेर आणा ll२६ll पक्वान्नाने भरलेले ताट बाहेर l दारापाशी महाराजांच्या l समोर आणून ठेवले ll२७ll महाराज समर्थांची स्वारी l भोजनास बसली l ज्यांनी अनुपम ब्रम्ह रस l पिऊन तृप्ती चे ढेकर दिलें आहेत ll२८ll ते गुळवणी मिटक्या मारत l खाणार आहेत काय l सार्वभौम राजाला जहागिरीची ती काय l लालसा असणार आहे ll२९ll आवड निवड अशी काहीच नाही l सर्व पदार्थ एकत्र करून l दोन प्रहरी आपलीं भुक भागवली इतकेच ll१३०ll बंकटलाल पंतांसी l म्हणाले, आपण यांस वेडा समजलो l ही आपली निःसंशय मोठी चूक झाली होती ll३१ll द्वारकेला सुभद्रे साठी l अर्जुन सुध्दा असाच वेडा झाला होता l त्याला सुद्धा व्यवहारांचा l विसर पडला होता ll३२ll आणि भलभलते l चाळे करू लागला होता l हे ज्ञानवंत माउली l मुक्ती रुपें सुभद्रे साठी l वेडे झालेले दिसतात ll३३ll यांची कसोटी l आताचं घेणें नको l शेगांव निवासी l खरोखरच धन्य आहेत ll३४ll श्री समर्थ गजानन महाराज l येथे द्रष्टीस पडले l हे त्यांचे परम भाग्य आहे ll३५ll श्री गजानन महाराज माउलींना l शेगाव हे देवाने l जहागिरी म्हणून दिले आहे ll३६ll त्यावेळी दुपारी l मध्यान्ही लागलें होतें l भुमी उन्हात एकदम l तप्त झालीं होती ll३७ll पक्षी झाडांवर जाऊन l सावलीत आश्रयाला बसले होते l अशा कडक उन्हात l महाराज आनंदात बसलेले होते ll३८ll जे स्वतः साक्षात l परब्रह्म आहेत त्यांना l कसली कडक उन्हाची l परवा असणार आहे ll३९ll श्री स्वामी यथेच्छ जेवले l दोघांच्या लक्षात आले l माउलींना पाणी आणून दिले पाहिजे l "आपणास पाणी आणून देवु काय" ll१४०ll दामोदर पंतानी विचारले l हां चाकर आपणास पाणी l आणून देण्यास तयार आहे ll४१ll असे ऐकल्यावर समर्थ l हसुन म्हणाले l "मी सांगतो ते ऐका, l तुम्हाला जर गरज वाटत असेल l तर मला पाणी आणून द्या ll४२ll या जगात ब्रम्ह l ओतप्रोत भरलेले आहे l तुम्ही आम्ही असा l काहीच फरक नाही l अगदी किंचितहि नाही ll४३ll पण जग व्यवहार l तर सत्य आहे l तो तर पाळलाच पाहिजे ll४४ll अन्न भक्षण केले देहाने I त्याला पाण्याची l आवश्यकता तर आहे ll४५ll हुशार लोकांनी l हा व्यवहार समजला पाहिजे l तुम्ही तर हुशार आहात l तुम्हाला वाटत असेल तर l माझ्या साठी पाण्याची व्यवस्था करावी l म्हणजे हे सर्व संपूर्ण च् झाले ll४६ll असे बोलणे ऐकताच l दोघांना खूप आनंद झाला l बंकटलाल पंतांसी म्हणाले l आपले भाग्य किती थोर आहे ll४७ll दामोदर पंत पाणी आणायला आंत गेले तेंव्हा l येथे काय झाले ते सांगतो, ऐका ll४८ll त्यांच्या जवळपास l एक पाण्याचा ओढा होता l तेथे पाणी पिण्यासाठी l फक्त जनावरे जात असतं ll४९ll माउली पटकन तेथे l जाऊन ते गढूळ पाणी प्यायले l आणि त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला ll१५०ll पंत एका भांड्यात l पाणी घेऊन आले l तर माउलींना गढूळ पाणी l पिऊन आलेले पाहून म्हणाले ll५१ll अहो ते गढूळ पाणी l पिण्यासाठी नाही l तुम्ही ते पाणी पिऊ नका l ते पाणी जनावरांन l साठी ठिक आहे ll५२ll मी आपणास गोड, निर्मळ आणि थंडगार पाणी l पिण्यासाठी आणले आहे l त्यात वाळ घालून l एकदम स्वच्छ केलेले आहे ll५३ll ते ऐकून समर्थ माउली म्हणतात l या सर्व व्यवहारिक कथा l आम्हाला सांगु नका l हे अवघं चराचर ब्रम्ह व्यापक आहे ll५४ll येथे गढूळ आणि निर्मळ l किंवा शुध्द आणि दुषीत l पाणी असे भेदभाव नाहीत l पाणी तर पाणीच असते ll५५ll गढूळ पाणी किंवा निर्मळ पाणी l सुवासिक आणि दुर्गंधीयुक्त l ही तर निःसंशय त्यांची रुपें आहेत ll५६ll मनुष्या मध्ये सुद्धा l काही फरक नसतो l ईश्वराच्या लीला आगाध आहेत ll५७ll हे मनुष्याला समजण्यास l कठीण आहे l त्याचं मन व्यवहारांत गुंतलेले आहे l त्यानं थोडं मनन करावे ll५८ll जग कशाला उत्पन्न झाले l कशा पासून उत्पन्न झाले l हे समजून घेतले पाहिजे ll५९ll ऐसे ऐकल्यावर l दोघेही गहिवरून गेले l मनात अनन्य भावाने l समर्थांच्या पाया वर ll१६०ll लोळण घेण्यासाठी l तयार झाले तर l त्यांच्या मनांतील विचार जाणून ll६१ll माउली वायुच्या वेगाने पळत सुटले l या जगात त्यांना कोण l अडवणार आहे l कोणाच्यात हिंमत आहे l बघता बघता माउली नाहीसे झाले ll६२ll
या पुढील कथा l द्वितीय अध्यायांत आहे l ती ऐकण्यासाठी l आपण इथे लक्ष द्यावे l श्री गजानन विजय ग्रंथ l भाविकांना आनंद देवो l हीच हात जोडून l ईश्वराच्या चरणी दासगणूची विनंती आहे ll६३ll
श्री हरीहरार्पणमसतु l शुभंभवतु l
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य
प्रथमोsध्याय समाप्त ll१६४ll
चंद्रशेखर परशुराम सावंत
अहमदाबाद, गुजरात.
१२/०७/२०२५