Koun? 29 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 29

Featured Books
Categories
Share

कोण? - 29

सावलीने फोन हातात घेतला आणि तो मेसेज रीसीव केला. त्यानंतर तीने तो मेसेज वाचला, त्यात एका ठिकाणचा पत्ता लिहिला होता आणि सायंकाळी सात वाजता तीला भेटण्यास बोलावले होते त्या पत्त्यावर. सावलीने तो मेसेज फोनमध्ये सेव केला आणि ती घराचा दिशेने निघाली होती. घराकडे जात असतांना तीला अचानक कालचा प्रसंग आठवला कशी कोमल आणि तीची आई तीचा बरोबर वागली बोलली. त्यामुळे तीचे मन फार दुखी झाले होते. त्याच बरोबर तीचे घराकडे जाणारे पाऊल आता मागे मागे खेचू लागले होते. तेवढ्यात तीने घडी बघीतली तर घडीत दुपारचे १ वाजले होते. मग सावलीने विचार केला आणि ती स्वतःशी बोलली, “ माझे मन तर बिलकुलच घरी जाण्यास होत नाही आहे. शिवाय मला त्या व्यक्तीला आज भेटायला सुद्धा जायचे आहे. तर मी असे करते इथेच कुठेतरी उरलेली वेळ घालवते. शिवाय मला भूख लागलेली आहे तर सर्वप्रथम मी एखाद्या खानावडीत जाऊन पोटभर जेवते आणि पुढे काय आणि कसे करायचे याबद्दल विचार करते.” असे म्हणून सावली तेथील नजीकचा एका खानावडीत जाऊन शिरली.

    सावली तेथून जवळ जवळ १५ मिनिटांनी बाहेर निघाली आणि तेथून नीघून तेथील एका नजीकचा बागेत जाऊन बसून विचार करू लागली होती. ती आता त्या व्यक्तीबद्दल विचार करू लागली होती. तीचा डोक्यात सुरु होते कि तो व्यक्ती कोण असेल. तो जुनाच शत्रू आहे कि नवीन आहे. मुख्य म्हणजे त्याचा हेतू काय आहे आणि तो हे सगळ स्वतः करतो आहे कि कुणाचा बोलण्यावरून करतो आहे. असे विविध प्रकारचे प्रश्न सावलीचा छोट्याशा मेंदूत आता येऊ लागले होते. तेवढ्यात सावलीचा फोन आपोआप व्हायब्रेट होऊ लागला. म्हणून सावलीने तो बघीतला तर तीला तीचा घरी लावलेल्या कॅमेराचे व्हिडीओ तात्काळ जसेचा तसे दिसू लागले होते. याचा अर्थ असा होता कि पियुषने जी सेटिंग केली होती, ती संपूर्णपणे आता काम करू लागली होती. तेवढ्यात सावलीला दिसले कि कोमलचा रूमची खिडकी उघडी आहे आणि तेथे कुणीतरी उभे आहे. सावलीला वाटत होते कि ती कोमल आहे आणि ती स्वतःचा पायावर उभी आहे. म्हणून सावलीला फार बरे वाटले, परंतु दुसऱ्याच क्षणी तीला विचार आला कि कोमल जेव्हा उभी राहू शकते तर मग माझ्या आणि आईचा समोर ती का बर व्हील चेअरवर बसून वावरते. सावलीने मग स्वतःलाच म्हटले, “ आता मला स्वतः या गोष्टीचा छळा लावावा लागेल. मी तर याआधी असे काही विचार केले नव्हते परंतु मी त्या दोघींचा नजरेत आरोपी झालेली आहेच तर मी निरपराध सिद्ध करण्यासाठी मला जे करावे लागेल ते मी करणार. ते तीकडे नैतीक असोत कि अनैतीक असोत.”   

    आता मात्र हळू हळू ती वेळ त्या व्यक्तीला भेटण्याची जवळ जवळ येऊ लागली होती. जवळ जवळ सहा वाजले होते सायंकाळचे तेव्हा सावलीने विचार केला कि यावेळेस ती फारच काळजीने तेथे जाईल. मागचा प्रमाणे आता मला कसल्याही पचड्यात पडायचे नाही आहे. त्यासाठी तीने पियुषला फोन केला आणि म्हणाली, “ पियुष मी तुला जो नंबर दिलेला होता तो आता कुठल्या पत्त्यावर आहे हे मला सांगू शकशील काय.” तेव्हा पियुष म्हणाला, “ कुठला नंबर शशांकचा कि तो अनोळख्या व्यक्तीचा.” तेव्हा सावली म्हणाली, “ मला दोघांचाही नंबरची आताची लोकेशन माहित करायची आहे.” मग पियुषने ते दोन्ही नंबर ट्रेस केले, तर त्याला आढळले कि त्या दोन नंबर मधील शशांकचा नंबर हा बंद आहे आणि दुसरा नंबर सावलीचा लोकेशनचा आसपास म्हणजे तीचा जवळून १ किलोमीटरचा अंतरावर आहे, हि माहिती त्याने सावलीला सांगीतली. मग सावलीने पियुषला त्या नंबरचा पाठलाग करून क्षणा क्षणाची माहिती सांगण्यास सांगीतली आणि ती तात्काळ पियुषने सांगीतलेल्या दिशेने जाण्यासाठी नीघाली होती. ती समोर समोर जाऊ लागली आणि शेवटी १ किलोमीटर वर जाऊन पोहोचली. मग पियुषने तीला सांगीतले, “ तू जेथे उभी आहेस तेथेच एक दोन पाउलांचा अंतरावर त्या नंबरची लोकेशन दाखवत आहे.”

    सावली उभी होती ते एक निर्जन असे स्थान होते आणि अवतीभवती तेथे कुणीच नव्हते. पियुषचा सांगण्याप्रमाणे काही पाऊल गेल्यावर सावलीला एका दगडाचा मागे तो फोन सापडला. त्या अनोळख्या शत्रूने तो फोन मुद्दाम करून फेकला होता. आता सावलीला एका आंधळ्या प्रमाणे त्या पत्त्यावर जावे लागणार होते. त्यासाठी ती त्या पत्त्याचा दिशेने जाण्यास निघाली होती. ती तेथून जवळ जवळ १ ते २ किलोमीटर गेली असेल तोच पियुषचा तीला फोन आला. तर सावली एका ठिकाणी थांबली आणि तीने तो फोन उचलला. त्यानंतर ती म्हणाली, “ बोल पियुष काय झाले, काही विशेष आहे काय.” तेव्हा पियुष म्हणाला, “ सावली  शशांकचा फोन सुरु झाला आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि त्याचा फोनचे लोकेशन तुझा अवतीभवती  आहे. म्हणजे तो तुझा पाठलाग करत आहे  आणि थांब त्याने कॉल केला आहे कुणाला तरी ते ऐकतो आणि सांगतो.” असे म्हणून त्याने फोन ठेवला.                                                                             शेष पुढील भागात........