प्रेम (जगण्याची एक नवी उमेद) in Marathi Short Stories by Neha Kadam books and stories PDF | प्रेम (जगण्याची एक नवी उमेद)

Featured Books
  • Do you Love Me - 1

    Episode 1: The First QuestionThe college campus was full of...

  • Beyond His Memory

    Once upon a time, in a small village, lived a young woman na...

  • Parents

    The Two LampsIn a small village near an ancient temple, ther...

  • Lakshmi Amma - 2

    Sumit had gradually accepted the strange comfort of being ca...

  • Specialz - 3

    S- Such a b- big amount!W- Why would master g- give me?This...

Categories
Share

प्रेम (जगण्याची एक नवी उमेद)


                      ती ऑफिस मधून बाहेर पडली... पण घरी जायचं तिच्या जीवावरच आलेलं.... कारण घरी तिच्या लग्नाचा विषय चालेला.. पण ती अजूनही त्याच्यातच रमलेली.. तीच मन लाईफ पार्टनर म्हणून कोणालाही दुसऱ्याला बघूच शकत नव्हत.. ती खूपच उदास दिसत होती.. तिला घरी जायची अजिबातच इच्छा नव्हती... म्हणून थोडास शांतता आणि मन हलकं करण्यासाठी ती निघाली... आणि काहीच तासावर असलेल्या चौपाटी वर आली... 
         समुद्राच्या वाटेला डोळे लावून एक टक बघत ती एकटीच बसलेली.... तिला खूप छान वाटत होतं.. हवेच्या येणाऱ्या झुळुकिनी मन प्रसन्न होत होत... खूप वेळ झाला ती शांत बसून होती... आजुबाजूला फिरायला आलेल्या माणसाचा गोंधळ, लहान मुलांचा गोंगाट होता.. पण समुद्राच्या पाण्याच्या आवाजाने ती जणू सगळाच विसरलेली... 
          अंधार पडत चालला सूर्य मावळतीला आलेला..त्यामुळे सूर्याच्या लाला तांबूस किरणांनी समुद्राच पाणी एकदम छान दिसत होतं.. 

काही वेळाने तीच लक्ष बाजूला गेल.... तिकडे अनेक कपल फिरत होते मस्ती करत होते.... ते बघून ती क्षणातच भूतकाळात हरवली..

दोन वर्षांपूर्वी अशीच ती आणि समीर ही एकमेकांना भेटायचे... खूप स्वप्न पाहिलेली दोघांनी एक मेकांसोबत...त्यांची पहिली ओळख कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला असताना झालेली.. दोघ काही ना काही कारणामुळे भेटायचे... म्हणजे ठरवून नाही योगायोगाने... 

आणि नंतर असच करता करता त्यांना कधी प्रेम झालं समजलच नाही... मग अनेकदा ते ठरवून भेटायला लागले... आपली सुख दुख सगळ एकमेकांना सांगायला लागले... जवळ जवळ चार वर्ष झाले ते सोबत होते... आता समीरही चांगला नोकरीला होता.. प्रमोशन ही झालेलं आजच.. दोघंही खूप खुश होते..म्हणून त्यांनी त्याच्या प्रेमा विषयी उद्याच घरी सांगायचं ही ठरवलेलं... 

उद्याच ते दोघंही त्यांच्या घरी सांगणार होते.. म्हणून आज दोघं पण अगदी खुश होते.. जेवढी स्वप्न त्यांनी त्या चार वर्षात पाहिली नाहीत ती आज एका दिवसात बघत होते.. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो अस झालेलं.. दोघांचीही रात्र संपत नव्हती आणि झोप ही येत नव्हती.... 

म्हणून त्याने तिला मेसेज केला आणि काहीच वेळात ते घराजवळ येत असल्याचं सांगितलं... रात्रीचे २ वाजून गेलेले... तिने पहिलं सर्वजण झोपलेले.. तिने हळूच आपला फोन घेतला आणि दबक्या पावलांनी बाहेर गेली...

खूप वेळ झाला अजून तो कसा आला नाही? म्हणून तिने त्याला फोन ट्राय केले... पण एकही फोन लागत नव्हता... ती फेऱ्या मारत मारत तिथेच थांबलेली... ३ वाजतं आलेले.. तिने पुन्हा फोन लावला आणि समोरून तो जे बोलला ते ऐकून तिचा चेहराच रडवेला झालेला... तिला घाम फुटलेला....

चार वर्षांपासून त्यांच्यात असलेल सगळ एकच क्षणात एकाच रात्रीत संपलं होत.. तिला तर काहीच समजत नव्हतं.. काय करावं कोणाला सांगावं... तिने लगेच मीरा ला फोन लावला ... आणि तिला सगळ सांगितलं...

मीरा ही काहीच वेळात तिकडे आली आणि दोघीही निघाल्या ... हॉस्पिटल मधे आल्या... मीरा आणि ती धावतच रिसेप्शन जवळ आल्या... आणि समीर त्रिवेदी.. त्यांना कुठे ठेवला आहे? 

त्या पळतच icu जवळ गेल्या... डॉक्टर बाहेर आले.. त्यांनी त्याच्या वाचण्याचे चांसेस खूपच कमी असल्याचं सांगितलं... तास रिया जवळ जवळ कोसळलीच... मीरा ने तिला सावरलं... आणि डॉक्टरांकडे त्याला भेटण्याची परमिशन मागितली..  

डॉक्टरांनी ही त्याची अवस्था बघून थोड्या वेळा साठी आतमध्ये जायला परमिशन दिली... 

तशा दोघी आतमध्ये आल्या.. रिया चे डोळे रडून रडून लाल झालेले... ती त्याच्या जवळ गेली.. तो निपचित पडलेला.. त्याच्या सगळ्या अंगावर नळ्या होत्या.. नाकाला ऑक्सिजन लावलेलं.. होत.. तिने हळूच आपला हात त्याच्या हातावर ठेवला... तास त्या स्पर्शाने त्याने हार्टबीट थोड फास्ट झाले... त्यामुळे तो हायपर झाला... तिने हळू हळू त्याला शांत केलं..  
त्याने डोळे थोडेसे उघडले… हात हलकासा तिच्या हातात घट्ट पकडला… आणि क्षीण आवाजात म्हणाला:

"रिया… माफ कर ग... ह्या जन्मात आपली स्वप्नं अपूर्णच राहिली गं... पण माझ्या मनात शेवटपर्यंत फक्त तूच राहिली… मी खूप प्रेम केलंय तुझ्यावर… खरंच खूप… पण आता माझ्याकडे वेळ नाही गं...

तू रडू नकोस… आणि माझ्या साठी तुझं आयुष्य थांबवू नकोस… स्वतः साठी नाही तर माझ्यासाठी जग… आणि हो, तू एकटी नाही राहायचं… मला माहितेय तू खूप घाबरतेस एकटी रहायला... तो हळूच तिचे डोळे पुसत म्हणाला...म्हणून Promise me रिया… तू पुन्हा प्रेम करशील… आयुष्याला पुन्हा एक संधी देशील… मी गेलो तरी कायम तुझ्या सोबतच असेन... फक्त दिसणार नाही.. 

तुझं हसू… तुझ्या डोळ्यांतलं तेज… ते कुणासाठीतरी राख… माझं स्वप्न होतं तुला आयुष्यभर हसताना बघायचं… ते पूर्ण कर… माझ्यासाठी." 

त्याचे हार्टबीट खूपच फास्ट होत होते.... त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता.. तरीही तो तिच्या कडे एक टक बघत होता.. ती ने ही नाईलाजाने आपला हात त्याच्या हातावर घट्ट करत मान हलवली... आणि त्याने समाधानाने आपले डोळे मिटले...

एका रात्रीत रिया च तर अख आयुष्यच बदलून गेलेलं.. ज्याच्या सोबत आयुष्य जगावं वाटत होत तो आयुष्याच्या नव्या सुरवातीलाच सोडून गेलेला..

उद्याचा दिवसाची वाट पाहणारी ती आता तो आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून रात्र कधीच संपू नये.. वेळ ही जाऊ नये असच तिला वाटत होत.. ती त्याला उठवण्याचा हलवण्याचा प्रयत करत होती त्यांनी घालवलेले प्रत्येक क्षणाची आठवण करून देत होती..  

पण काहीच नाही सगळ संपलं होत..  

रिया ने डोळे उघडले... आणि समुद्रा कडे बघत म्हणाली... तुझ्या साठी जगतेय मी फक्त.. समीर आज दोन वर्षे झाली तुला जाऊन तरी एक दिवस ही गेला नाही तुझी आठवण आली नाही असा.. मला वाटल नव्हतं.. तुझ्या बद्दल मला घरी अशाप्रकारे सांगायला पडेल...ती खूप रडत होती.. मला तुझ्या जवळ यायचं आहे रे समीर... मला नाही करायचं आहे हे लग्न... प्लीज समीर.. मला नाही जगायचं रे... मला तुझ्या कडे यायचं.. 

ती रडत रडत एकटीच समुद्राच्या दिशेने जात होती.... तिला जगण्याची इच्छा नव्हती.. ती पाण्याच्या जवळ आलेली.. की इतक्यात समीर तिच्या जवळ आला....

त्याने ती शॉक झाली... आणि त्याच्या कडे भरल्या डोळ्यांनी बघत राहिलेली... 

तो म्हणाला अगं हे काय करतेस तू? मला दिलेल प्रॉमिस विसरलीस का? 

ती रडतच म्हणाली.. नाही समीर मला माफ कर माझ्या कडून नाही होणार हे.. मला तुझ्या सोबत घेऊन चल... मला नाही राहायचं आहे इथे.. मला नाही करायचं आहे लग्न.. प्लीज... मी हात जोडते.. मला तुझ्या सोबत घेऊन चल.. ती अगदी काकुळतीला येऊन सांगत होती.. तर तो फक्त शांत पाने तीच ऐकत होता.. तीच बोलून झालं तरी ती रडत होती... 

त्याने हळुच तिचे डोळे पुसले... आणि शांत करत म्हणाला.. असं नको बोलूस अगं.. मला माहिती आहे तुझं माझ्या वर खूप प्रेम आहे.. अगं पण जस तुझं माझ्या वर प्रेम आहे तसं... तुझ्या वर ही कोणाच तरी प्रेम आहे ना? 

रियू अगं आपण एकमेकांना भेटलो प्रेम झालं त्याला फक्त ७ वर्ष झाली... पण त्याचं काय जे तुझ्या वर गेल्या ३० वर्षा पासून प्रेम करतायत? त्याचं प्रेम प्रेम नाही का? अगं रियू तूच बोलायची ना की तुझ्या आई बाबांनी किती कष्ट आणि दुःख सहन करत तुला लहानच मोठ केलंय... आणि तुला त्यांच्या साठी काही तरी करायचं आहे... मग ... 

तू जर आता अस स्वतःच काही बर वाईट करून घेतलंस तर मग त्याचं काय होईल? त्यांनी ह्या वयात कोणा कडे बघायचं? आणि हे सगळ त्यांनी कष्ट आणि त्रास सहन केला त्याच काय? त्यांचा विचार कोण करणार? तू ह्या वयात त्यांना एवढ दुःख देणार आहेस का ? 

त्याच्या प्रश्नांनी ती स्तब्ध झाली... आणि दोन पावल मागे सरकली.. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.. आणि ती जोर जोरात रडायला लागली.. समोर समुद्र बघून ती तंद्री सुटावी तशी मागे मागे आली.. आणि इतक्यातच तिचा फोन वाजला... 

आई चा च फोन होता... तिने पटकन उचलला...आणि म्हणाली सॉरी आई माफ कर... मला चुकलं माझं.. मी लगेच येते घरी ती दोन तीन वेळा हे वाक्य बोलून फोन ठेवला... 

आणि आजुबाजूला पाहिलं तर तिला समीर कुठेच दिसत नव्हता.. तरीही ती आकाशात बघत म्हणाली.. सॉरी समीर... मी खरच सगळच विसरलेली.. पण तू मला आठवण करून दिलीस... मी प्रॉमिस करते तुला मी पुन्हा नवीन सुरवात करीन... माझ्या आई बाबा साठी... मी पुन्हा जगेन... थँक्यू.. आज कदाचित तू आला नसतास तर ... थँक्यू समीर... ती बोलून आपल्या घराच्या वाटेला लागली...

इथे घरी ११ वाजून गेलेले आजुन रिया आली नाही म्हणून तिचे बाबा बाहेरच फेऱ्या मारत होते... तर आई पण जागीच होती.. इतक्यात रिया आली तिला बघून दोघांचा ही जीव भांड्यात पडला...

मग रिया ने ही सॉरी बोलून दोघांना घट्ट मिठी मारली... 

आणि मनातच समीरचे आभार मानले...

#प्रेम #भावना #स्पर्श #जगण्याच्याआशा #इच्छा #उमेद