.’सखीला प्रेमपत्र पहिले ..गोड गुलाबी गालावरती ओठांनी लिहिले ..
प्रेमपत्र अगदी रोमांचक शब्द ..!!!याचा अनुभव ज्याला नाही मिळाला ..खरेच ..व्यर्थ..गेले म्हणावे लागेल आमच्या तरुण पणी प्रेमपत्र लिहिणे म्हणजे खरे खरे प्रेम आहे हे व्यक्त करणे शिवाय हे प्रेम पूर्णत्वास घेऊन जाणे म्हणजे अर्थात या प्रेमाचे रुपांतर लग्नात करणे या प्रेम पत्रात प्रथम ..प्रेयसीची भरपूर स्तुती असे..!!ती नाकी डोळी..अथवा रंगाने कशीही असली तरी ..त्या पत्रात ती हेमा मालिनी अथवा माधुरी दीक्षित पेक्षा कमी नसे ..त्यामध्ये गुलाबी रंगाने “दिल “ काढलेले असे ..आणी त्यात बाण “..पण घुसलेला असे ..प्रेमाची स्वीकृती दिल्यावर ..गुपचूप भेटायला बोलावले..असे त्या काळी आजच्या सारखे मुला मुलींचे भेटणे सहज नसे ..पालकांना या गोष्टी समजल्या तर ..प्रियकर “...आणी प्रेयसी “दोघांचे ही काही “खरे नसे ..त्यामुळे भेट ही “गुपचूप” च..असे ..सेफ साईड म्हणून सोबत ..एखादी लांबची बहिण अथवा शेजारची लहान मुलगी न्यावी लागत असे ....या प्रेम पत्राचा शेवट ..हा बरेचदा लग्नात होत असे ..काहीच वेळा याला अपवाद घडत असे ..मात्र ही प्रेम पत्रे काही वेळा..”छोट्या छोट्या चिठ्ठ्या च असत ज्या लपवून ठेवणे एक महा कर्म कठीण गोष्ट असे कारण घरच्या लोकांचे मुलींच्या वागण्या वर बारीक लक्ष असे आपली मुलगी काय करते ..कुठे जाते कोणत्या “मैत्रिणी बरोबर जाते ( कारण त्या वेळी मुलीना मित्र असतात अशी कल्पना पण कोणी करू शकत नसे )आपल्या मुलीच्या येण्या जाण्याच्या वेळा .तिचा पोशाख वगैरे बारकाईने पहिले जात असे चुकून जरी एखाद्या मुलाशी रस्त्यात जरी बोलले तरी “आफत येत असे शिवाय आजूबाजूचे शेजारी असतच ..त्यात तेल ओतायला .!!काही वेळा तर अगदी अभ्यासाच्या बाबतीत रस्त्यात एखाद्या मुलाशी बोलले तरी आम्ही घरी पोचायच्या आत ही बातमी पोचत असे आणि मग घरचे आमची मस्त चंपी करीत 😀त्यामुळे अशा चिठ्ठ्या वाचून लगेच फाडून टाकल्या जात असत .. आता त्या वेळेची कल्पना केली तरी खूप हसू येते माझ्या बाबतीत बोलायचे तर माझा स्वभाव पूर्वी पासून खूप धीट ..त्यामुळे माझ्या मैत्रिणी वर प्रेम करणारे काही मजनू तीला देण्या साठी माझ्या कडे चिठी देत असत ..समजा चुकून मैत्रीण गाठ नाही पडली तर चिठी माझ्या कडे राहत असे मी ती नंतर देण्यासाठी वहीत जपून ठेवत असे (तेव्हा पर्स वगैरे मामला नसे ना )माझी आई शिक्षिका होती ..तिचा स्वभाव खूप कडक होता त्यात मी अशी धीट आणी दंगेखोर असल्याने माझ्यावर डोळ्यात तेल घालून तीला लक्ष ठेवावे लागत असे ..!!यातच चुकून तीला अशा चिठ्या माझ्या वहीत जर सापडल्या तर तीला वाटत असे की ..या साऱ्या मलाच बाहेरचा मुलांनी दिल्यात 😀कारण त्यावर मायना ..कुणाला लिहिले आहे वगैरे काहीच नसे ना मग काय ...माझी जी “पिटाई होत असे ..ज्याचे नाव ते .!!असे प्रसंग महिन्या दोन महिन्यातून येतच असत .😀.त्या चिठ्या समजा योग्य मैत्रिणी कडे पोचल्या आणी त्यांना ही ते मंजूर असले तर मग चीठ्ठीचे ऊत्तर पोचवणे ही ड्यूटी परत माझ्या कडेच येत असे ..एक पोस्टमन ड्युटीच म्हणा ना ..तेव्हा मिडिया नसल्याने आम्हाला अक्कल..ही गोष्ट कमीच असे त्यामुळे कोणीतरी आपल्याला चिठ्ठी लिहिली की मुली आधीच एक्साईट होत असत !! शाळा तर आमची फक्त मुलींची होती त्या वेळी मुलीना शकयतो मुलींच्या शाळेत च घातले जात असे आमच्या शेजारी जी मुलांची शाळा होती त्यामध्ये एक मोठी भिंत होती त्या भिंतीवरून चढून येवून शिक्षकांचे लक्ष चुकवून आमच्यातल्या सिनीयर मुलीना चिठ्ठ्या दिल्या जाततो प्रकार चुकून जरी आम्ही पाहिला तरी आम्हाला ती चिठ्ठी घेणारी मुलगी अगदी “झाशीची .राणी “वाटत असे .!!आणी जर यदाकदाचित हा प्रकार चुकून बाईंच्या नजरेला पडला तर मग त्या मुलीची जी धुलाई होत असे बाईकडून की बोलता सोय नाही शिवाय परत तिच्या पालकांना मुख्याध्यापिका बाई शाळेत बोलावून घेत आणी मग त्यांच्या समक्ष तिच्या या कर्मचा पाढा ऑफिस मध्ये वाचला जात असे परत तिच्या कडून मी अशी वागणार नाही असा कबुलीजबाब पण घेतला जात असे शिवाय ती घरी गेल्यावर जे घडत असे ते ..तर विचारूच नका !असे असले तरी अनेक धाडसी प्रेम प्रकरणे त्या काळात चालत असत .जरी या गोष्टीत बरीच रिस्क असली तरी अशी अनेक प्रेमपत्रे पोचवली जात आणि त्यानंतर कितीतरी प्रेमप्रकरणे यशस्वी होत असत