, कथेचे नाव : ड्रॅक्युलाची होळी सन १९४१ आज राहाजगडच्या होळीसाठी लाकड आणण्यासाठी नाग्या, रुश्या- भुश्या, चिंत्या, अशी ही चार पोर जंगलात गेली होती . होळीसाठी लाकड घेऊन येण्यामागच कारण एकच होत , ते म्हंजे राजाकडून मिळणारे नाणे, पैसे होय! नाहीतरी हे चारजण काही कामाचे नसून बेरोजगारच होते. चौघांनाही सुकलेली फाटी शोधता शोधता वेळेचा थांगपत्ताच राहिला नव्हता..आज वेळ अशी काही वेगाने पळत होती..की पाहता-पाहता सूर्य जाऊन संध्याकाळ होऊन जात , आकाशात गोल चंद्र उगवुन आला होता. दिवसा उजेडात छान भासणा-या झाडाच्या मोठ-मोठ्या आकृत्या आता कालपट निळसर दिसत होत्या. जंगलातल्या झाडांझुडपांमधुन निघालेल्या वाकड्या तिकड्या पायवाटेला तुडवत हे चौघेही गावच्या दिशेने निघाले होते. सर्वात पुढे भुश्या , त्याच्या मागे रुश्या , मग चिंत्या , आणी चौथा सर्वात शेवटी चालत होता लंगडा नाग्या. चौघांच्याही खांद्यावर सुकलेल्या फाट्यांचा भाडा होता. इतकाही जड नव्हता की खांदे दुखु लागतील. " ए माद×××नो.....! चालवा की पाय बिगि-बिगिन .! आई×××नो बोल्लु व्हतु का नाय मी? त्या मसनातली लाकड घेऊ आण देऊ Lव्हळी पेटवाला ..? पर मांझ मेल्याच कोण ऐक ना..आता घ्या ..मरा.!भुगता..आता भुगता.!" सर्वात शेवटी एका पायाने अपंग असलेला नाग्या लंगडत-लंगडत चालत होता तोच आपल्या घोग-या आवाजात म्हणाला. एक पाय अपंग असल्याने बिचा-याला चालता तर निट येत नव्हत त्यातच खांद्यावर हे वझ , आणी त्याच्या मसनातल्या फाट्यांच्या आइडियाला कोणीही भाव दिल नसल्याने आता त्या गोष्टीचा डोक्यात राग शिरला होता. मागुन त्याची काहीमिनीटांपासुन अखंड बडबड सुरु होती. पुढचे तिघे मात्र गप्प ते ऐकत होते जसे की त्या तिघांचही नाग्याच्या बोलण्यावर लक्षच नसाव.सर्वात पुढे असलेला पैलवान भुश्या , मागे असलेला रुश्या , आणी तिसरा चिंत्या..तिघांच्याही चेह-यावर एकच भाव पसरले होते. तिघांच्याही चेह-यावरचे भयरसाने न्हाऊन निघालेल्या त्या छटांचभाव दर्शन त्या निळसर चंद्राच्या उजेडात ऊठून दिसत होत. परंतु अस काय झाल होत? म्हंणजेच ते तिघेही इतके घाबरले का होते? जसे की अवतीभवती काहीतरी अक्ल्प्निय,अकल्पित घडत होतं, किंवा घडल असाव! ज्याची जाणिव ह्या तिघांनाही झाली होती ? भुश्याने आपल्या खांद्यावर असलेल्या फाट्यांतुन एक मोठा फाटा बाहेर काढला, त्या फाट्याला जंगलातल्या एका झाडाची चार-पाच पान तोडुन त्या फाट्यात घुसवली , आणी तो फाटा पायवाटेबाजुलाच एका जागेवर अलगद जमिनीत रोवला.ही सर्व क्रिया त्याने चालता-चालताच केली. भुश्याच्या ह्या कृतीच निदर्शन फक्त रुश्या आणि चिंत्या दोघांनीच केल होत.कारण मागे लंगडा नाग्या चालता चालता ह्या तिघांनाही जीव खावुन शिव्या देत होता-आणि हे तिघे जणु नेहमीचंच असल्याप्रमाणे दुर्लक्ष करुन पुढे पुढे चालत होते...! आणि -राहुन राहुन एकाच जागेवर येत होते! जणु त्यांना चकवा तर लागला नव्हता.?जंगलातल्या मोठ-मोठ्या झाडांतुन वाट काढत नाग्या, रुश्या- भुश्या, चिंत्या ही चार मुल घरी परतीच्या वाटेला निघालेली. चारही जणांच्या खांद्यावर फाटी आणि डोईवर चंद्र दिसुन येत होता.नाग्याच्या ह्या चारही जणांना मगाचपासन आई-माईवरुन शिव्या द्यायच सत्र जरा काहीकाळ थांबल होतं म्हणुनच आजूबाजूला वाजणा-या रातकीड़यांची गुण-गुण ऐकु येत तर कधी कधी झाडा-झुडपांत होणारी सळ-सळ.जसा तो सळ-सळ आवाज यायचा तसे हे चारही जण भेदरलेल्या अवस्थेत त्या झुडपांत पाहत- तसे त्या झुडपांतुन कधी साप, तर उंदीर बाहेर येत.सापाला पाहुनतर प्रत्येकाची वीतभर फाटायची..आण उंदीर पाहिल तर नाग्या दगड हाती घेऊन त्याला शिव्या देत हुडकायचा.सर्वांच्या पुढे भुश्या चाललेलाआणि त्याच्या मागे रुश्या, तीसरा चिंत्या आणि शेवटला लंगडा नाग्या चालत होता.भुश्याची भयभीत नजर एकटक पुढे स्थिरावलेली -म्हंणण्यापेक्षा विस्फारलेली त्यात भीतीची छ्टा ओथंबुन वाहताना दिसत होती.मागे असलेल्या रुश्या आणि चिंत्या ह्या दोघांचही तेच हाल होत. " भुश्या..!" मागुन रुश्याचा आवाज..." लेका तु मगांशी रोवलेला त्यो फाटा प...प..परत आला तर कय समजायचंन.?" रुश्याच्या वाक्यावर भुश्याची दातखिळी बसली , तो जागेवरच थांबला विस्फारलेल्या नजरेनेच खालचे दात दाखवत जबडा वासवत एकटक पुढेच पाहत राहिला." अय काय झाल !" रुश्या म्हणाला." अरे ए भुश्या चल ना लेका , ह्यो लंगडा हुड़कायले मला!" " अय साल्यांनो, तुमच्या आईच्या वरातीत नाचु राहिलेका तुम्ही लोक चलाना पटापट?" नाग्याचा घोगरा आवाज आला. भुश्याच्या खांद्यावरुन हलकेच फाटी गोल-गोल भिंगत , पाळ्या पाचोळ्याचा स्पर्श होऊन फाट्यांचा आवाज होत खाली पडली-यंत्रवतपने शरीराची अगदी शांतपणे हालचाल होत डावा हात वर-वर जात हाताच्या पंज्याचा एक बोट पुढे झाला.तसे सर्वांनी त्या दिशेला पाहिल .आणि पुढच दृश्य पाहुन चिंत्या-रुश्या दोघेही जागीच गार झाल्यागत त्यांच्याही खांद्यावरुन फाट्यांची मुळी गोल गोल फिरत खाली पडली...! कारण समोर काही मीटर अंतरावर तोच फाटा खाली जमिनित रोवलेला ज्यात भुश्याने काहीवेळा अगोदर ती झाडाची पाने अडकवली होती- ही खात्री करण्यासाठी की आपल्याला चकवा तर लागला नाही ना! आपण एकाच जागेवर पुन्हा-पुन्हा फिरुन येत तर नाहीना? .भुषण, ऋषीकेश, चिंतामणी, , नागराज चौघेही राहाजगडच्या जंगलात हरवले गेलेले , हे त्याना त्या फाट्याच्या निशाणीवरुन समजल होतं." आता समदी मरणार ! समदी मरणार आता.! त्यो सैतान कोणाला सोडणार नाय!" नाग्या येड लागल्यागत एकटाच खाली पाहत बरळत चाळलेला." पहीले त्या किश्या-शिरप्यादाला.. खाल्ल ..! नंतर त्यो वयगुदा गायब झालाय ...त्याचा अजून पत्ता नाय..! गावातली म्हंणत होती! का त्या सैतानाने त्याच मांसासकट हाड बी चावून खाल्ल असल..!" नाग्या एकटक खाली पाहत बरळत होता आणि हे बाकीचे सर्व त्याच्या बोलण्याकडे कान टवकारुन डोळे फ़ाडून पाहत होते." आण आज आपण मरणार! मरणार समदी..समदी मरणार , हह्ह्ह्ह्ह...खीखी..खीखीखी..! कुणाला न्हाई सोडणार त्यो..सैतान..समदी मरणार..मरणार...समदी..हिहिही..खीखी..!" नाग्या एकटाच खुळ्याचा अटेक आल्यासारखा ..डोक्यावरचे केस येड्यागत खांजळत दात विचकत हसु लागला." अय चिंत्या...ह्यो लंगडा सर्कीट झाला का काय..! " " काय माहीत भौ..! पन तो बोलतो ते खर हाई..!" " ए मला मरायच न्हाई रे..! माझ अजुन लगीन बी न्हाई झालं.!आणी म्या ह्या नाग्या सारखा लंगडा पांगळा बी न्हाई..!मला कोण पन .पोर देइल..!" रुश्या तोंड वाकड तिकड हळवत थोड रडत म्हणाला आणि त्याने एक कटाक्ष थेट नाग्यावर टाकला...पन नाग्याच्या जागेवर आता कोणीही नव्हत..ती जागा अंधाराने गिळली होती." अर ह्यो पांगळा कुठ हाई..!" भुश्या म्हणाला." आर देवा कुठ गेला ह्यो..!" चिंत्याने सुद्धा भुषणच्या वाक्याला दुजोरा देत म्हंटल." ए नाग्याऽऽऽऽऽऽऽऽ" रात्रीच्या अंधारात .. मोठ-मोठ्या झाडांच्यावर दिसणा-या च्ंद्राच्या आकृतीत..त्याच्या उजेडात खाली उभे राहत..! रुश्या , चिंत्या, भुश्या आपल्या मित्राला वेग-वेगळे होत हाका मारत शोधत होते.त्यांच्या पुढे पडणा-या पावलासरशी खालचा पालापाचोळा चर-चरत वाजत होता.बाजुलाच एका झाडाच्या बुंध्याखाली एक नाग फणाकाढुन ह्या तिघांनाही पाहत बसलेला...जणु त्यांची मजा पाहत असावा." ए नाग्यावऽऽऽऽऽऽऽऽऽ" चिंत्या आजुबाजुला झाडाझुडपांच्यात पाहत नाग्याचा शोध घेत होता. की तेवढ्यातच मागे सळसळ झाली.त्याने लागलीच एक गिरकी घेत मागे वळून पाहिल , परंतु मागे.....मागे कोणीही नव्हतं.भुश्या, रुश्या कोणीही नाही. " माग तर कोणच न्हाई..? म आवाज कसला झाला?" चिंत्या स्व्त:शीच अस म्हंणतच त्याने गर्रकन गिरकी घेतली नी थेट पुढे पाहिल....की तेवढ्यातच त्या क्षणाला त्याचा श्वास गळ्यात अडकला...डोळे विस्फारले.कारण समोर नाग्या दात विचकत त्यालाच पाहत उभा होता..त्याचा चेहरा एका मृत मानवासारखा रंगला होता..डोळ्यांतला बुभळ पांढरफट्ट त्यात एक चीर ! नाग्याला पाहुन चिंत्या काही बोलणार की तोच एका जंगली श्वापदासारखी नाग्याने त्याच्या उरावर झडप घातली." आआऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" एक भयान आर्तकिंकाळी त्या जंगलात उमटली. भुश्या , रुश्या दोघांनीही तो आवाज ऐकला , शरीरावर रोंगटे उठले..हातावरचे केस ताठरले गेले..छातीतली धड, धड विस्तव टाकल्यावर जशी ट्रेन पलते तशी धड-धडत पळू लागली.मृत्युचा खेळ सुरु झालेला तो आला होता..रक्ताची चटक भागवायला तो आपल्या निद्रेतुन उठलेला ..कोरडा गला ओला करायला आला होता." भुश्या..! भुश्या...!" अस म्हंणतच रुश्याने त्याच्या दिशेने कुच केली त्याला गाठल." भुश्या..!काहीतरी वंगाल हाई ह्या जंगलात ..आता इथ थांबून काय फायदा न्हाई..बघ !न्हाई तर आपल भी म्हढ पडणार म्हंजी पडणार.. " रुश्या धाप लागलेल्या अवस्थेतच म्हणाला. " व्हई..व्हई .चल ..लवकर निघुयात..इथन.!" भुश्या ने रुश्याच्या वाक्याला होकार दर्शवला , व स्वत:च्या जिवाची पर्वा करता काट्या कूट्यातुन वाट मिळेल तिकडे धाऊ लागले.काट्या कुट्यातुन जीव तोडून पळता-पळता एका झाडाच्या खोड्यात रुश्याचा पाय अडकला जात त्याची जमिनीशी एक जोरदार मीठीभेट झाली, आणी नेमक त्याच वेळेस खाली एक टोस्कुल दगड असल्याने डोळा थेट त्या टोस्कूलाशी एकत्रित झाला , तसे डोळ्याचा पातळ पांढरा बुभळ कानाचा पडदा फाटावा तस अलगद फाटला नी थेट आरपार घुसला जात मेंदूतून बाहेर आला...त्या चंद्राच्या उजेडात शरीरातुन बाहेर येणार ते लाल रक्त कालपट दिसु लागल. धावता-धावताच भुश्याला जमिनीवर काही धप्पकन पडल्याचा आवाज आला तसा तो थांबला होता.त्याने मागे वळून पाहिल , खाली रक्ताच्या थारोळ्यात रुश्या जमिनिवर उबडा पडला होता .ना कसली हालचाल ..ना ..आवाज... जणु एक प्रेतच रस्त्यावर लावारसपणे पडल होत...! हात पाय बलदंड असलेला शरीराने पैलवानासारखा दिसणारा भुषण आता कोलमडला होता. आपल्या मित्राला अस निपचित खाली पडलेल पाहुन -ते भल भल रक्त बाहेर येताना पाहुन बिपी फुल ऑन लो झाला होता..हात पाय काफरत पोटात ढ्वलु लागल होत की पुढ्च्याक्षणाला त्याला (व्या व्या व्या )वांती झाली .येताना पिलेला पाणी जे काही थोडफार खाल्ल होत सर्व घळा-घळा बाहेर पडलं! एका कुत्र्यासारखा हात पाय दोन्ही गुढगे जमिनीला टेकवुन भुश्याने वांती केली.तोंडाला जे काही लागलेल ते एका हाताने पुसल आणि तोंड पुसतानाच त्याची नजर समोर गेली. दहा मीटर अंतरावर एक जाडजुड लाकडाच उंच झाड आहे . झाडाच्या आजूबाजुंनी ..पांढरट धुक वाहत आहे . भुश्या एकटक त्या झाडाकडेच पाहत बसलेला , की तेवढ्यात एक राखाडी रंगाचा, त्यावर काळ्या निळ्या नखांचा मजबुत पंजा ..त्या झाडामागुन पुढे आला. आणी जसा तो हात आला तसे मागुन एक डोक सुद्धा आल ..चुना पोतलेल्या चेह-याच ..वटारलेल्या खूनशी डोळ्यांच..नीताणलेल्या जबड्यासहित धार धार टोस्कुल्या दातांच एकटक भुश्याकडेच पाहुन हसणार." अंय..भुंश्या...! येऊ का मी.." त्या झाडापलिकडे जे काही विकृत आल होत.त्याने आपल्या किन्नरी आवाजात भुश्याला हाक दिली." ए..न्हाई..न्हाई..! माझ्या जवल..येऊ..नग ....ए आये..ए आये..! वाचीव..!" अस म्हंणतच भुश्या जमिनिवर हात-पाय घासत मागे मागे सरकु लागला. नी मागे जाऊन कशालातरी धडकला गेला ज्याचा स्पर्श म्हंणजेच मृत्युची मीठी होती . भुश्याने मागे वळुन पाहिल.राखाडी रंगाचा v आकाराचा चेहरा,डोक्यावरचे काळे केस मागे चोपुन बसवलेले, लाल ओठ रक्तांनी माखले गेलेले. अंगावर एक काला कोट त्याला जोडून मागे एक कधीही न झुकणारी ताठ कोळर..व कोट आत एक पांढरा शर्ट. खाली काळी पेंट व पायांत काळे शूज असा एक माणूस उभा होता..भुश्याने त्या माणसाला पाहताच त्याला वाटल कोणी इंग्रज साहेब असावा .तसा तो जागेवरच उभा राहीला. " अव साहेब ..अव साहेब..! मला वाचवा हो ...ते तिथ झाडामाग दात बाहेर काढुन सैतान माझ्याकड पाहून हसत होता.साहेब..मला वाचवा साहेब..!" " कोण तिथेतर कोणीच नाहीये!" तों माणूस भुश्याकडे पाहून म्हणाला..त्याच्या लाल ओठांवर एक छद्मी हास्य उमटल होत." आव साहेब खरच तिथ झाडमाग व्हत साहेब..तुम्हाला पाहुन पळाल असल." तों माणूस हळूच त्या झाडाजवळ चालत गेला ..पाठमोरा उभा राहिला." अव साहेब अस तोंडातुन दोन सुळ्यासारख दात बाहेर काढून हसत व्हत माझ्याकड " भुश्या म्हणाला .तसे त्याच्या ह्या वाक्यावर माणसाने हळूच एक गिरकी घेतली." कसे..! असे का?" त्या ड्रेक्युलाने अस म्हंणतच प्रथम त्याचे दोन डोळे पिवळ्या रंगाने लुकलूकत चमकले, जबडा वासला आणि त्यातुन खालुन वरुन असे एकुन मिळुन चार धार धार पोलादासारखे तीक्ष्ण दात बाहेर आले...आणी पुढच्याचक्षणाला भुश्याला एक थंडगार मीठी बसली.. गेली-.......मृत्युची मीठी ..!" राहजगड सीमेवर सैनिक पहारादेत होते तेव्हाc त्यांना दुरून एक मुलाची आकृती चालत येताना दिसली तसा एक. सैनिक म्हंटला. " आर ह्यो तर गज्याच पोर नाग्या हाई नव्ह! आर आत घ्या ह्याला आत घ्या.!" तो सैनिक म्हणला तसे सर्वांनी नाग्याला राहजगड गावाt आत घेतल. " आर ए नाग्या ! आर कुठ गेला होतास .?" त्याच सैनिकाने नाग्याला विचारलं!पण नाग्या होश मध्ये होता कुठे, तों तर एकटाच बरळू लागला." मसनातली लाकड व्हळीला न्हेऊ म्हंटल व्हत म्या..पन ऐकल न्हाई माझ गेल..ते जंगलात रांxxचे ! आता त्यो सैता समद्यांना खाणार ..समदे मरणार मरुन जिते व्हणार परत येणार...हिहिहिही..खीखी...खीखी! " दात विचकत , डोक खांजवत नाग्या खुल्यागत हसू लागला..! आणी जंगल हे वाक्य ऐकुन सर्वांचे डोळे खोंबणीतुन बाहेर यावे इतके मोठे झाले होते- कारण सर्व सैनिकांना ठाऊक होत-जंगलात पिशच्छ भटकतात ते.□□□□□□□□□□□□□□□□रात्री होळीदहन होळीसमोर उभ राहुन राहजगडचे महाराज दारासिंह यांनी हातात एक जळती मशाल घेतली. डोळे बंद केले." हे होळी आई ! आमच्या प्रजेला, परिवारला सुखी ठेव, बाकी तुझ्याकडून आम्हाला काहीही नको" महाराज मनात म्हंटले. तोच उंहू,उंहु,उंहु..महाराजांना हलकेच एक ठसका बसला ." पाणी .. पाणि आणा कोणीतरी " महाराणी महाराजांच्या पाठीवरुन हत फिरवt म्हणाल्या. " नाही आम्ही ठिक आहोत..!" महाराज जरासे.. सावरले ..हातात पुन्हा मशाल घेतली एक कटाक्ष होळीवर टाकला , वर आकाशात काळे ढग जमा झाले होते , चंद्राचा प्रकाश अपशकुनी अमावास्या असल्यासारखा नाहीसा झाला होता..ती होळी आता काळी भेसुर भासत होती...त्यात देवासारख तेजस्वीपणा नव्हती जळती मशाल पुढे करत महाराजांनी थर-थरत्या हातांनी होळी पेटवली ( फांद्यांच्या)चट,चट आवाजासहित होळी पेटू लागली , वर आकाशात निखारे उडू लागले. आजुबाजुचे लोक तोंडावर हात मारत अबअब अबबबा..करत बोंबळु लागले..की तेवढ्यातच अचानक पेटलेल्या होळीतुन एकापाठोपाठ तीन आर्त किंकाळ्या बाहेर पडल्या जात तीन जळते शरीर हात पाय हळवत असहनीय वेदनेने आरोळी ठोकत .होळीतुन .. -बाहेर पडले ...काहिक्षण लोकांसमोर हात पाय हळवत ते पेटते शरीर जस कोणी हातातल्या कळसुत्र्या बाहूल्या थयथय करत नाचवाव्यात तस नाचले आणि काम होताच त्यांना बिनआधार करुन जमिनीवर आपटल. " रुश्या ..! चिंत्या ...भुश्या ...!" आजुबाजुला जमलेल्या मांणसांमधुन एकाचवेळेस ओरड़त एकुन तीन स्त्रीया समोर जळत असलेल्या प्रेतांजवळ धावुन आल्या..! आपल्या नंग्या हातांनी ती आग विझवू लागल्या..! स्वत:च्या पोरांचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज ऐकुन त्या मायेंचा काय हाल झाल असेल हे शब्दांत वर्णन असंभव आहेशेवटी सैतानाचाच विजय झाला होता.समाप्त: