बँक डायरी
एक अनुभव
सुटी नंतरचा ..दिवस बँकेत तुफान गर्दी ..अगदी मान वर करायला सुध्धा वेळ नाही ..माझ्यापुढे चौकशी साठी ही भली मोठी लाईन ..न थांबता हसत मुखाने उत्तर देण्याचा माझा चाललेला प्रयत्न ,तेवढ्यात चहा वाल्याचे आगमन ...आता एक पाच मिनिटे तरी मिळेल उठायला ..माझे एक आश्वासन स्वताच्या च मनाला !!तरीपण परत मी पुढील कामात ‘गर्क..च .पाच दहा मिनिटात अचानक .एक गोड गोंडस चार पांच वर्षाची बाल मूर्ती सगळ्या लोकांना बाजूला सारून .माझ्या टेबलापाशी येते ..“..काकी काकी ,.तुम्ही चहा नाही घेतलात ??उठा ना तो चहावाला..तुम्हाला बोलावतोय पहा “त्याचे आग्रहाने मला ..सांगणे ..त्याचे “निरागस रूपडे “..आणी बोलण्यातले “आर्जव “..पाहून मी अगदी “थक्क होते ..“अरे हे पहा उठते रे ..चहा साठी “असे म्हणून मी मनोमन त्या गोंडस बाळाचे आभार मानते ..“ए ..ये ना इकडे ..नाव काय तुझे ..हे घे चॉकलेट‘”..असे ..म्हणून मी पर्स मधले चॉकलेट त्याच्या हातात ठेवते ..छोटू ..अगदी खुष होवून जातो ...“मला ना माझी ममी ..”पंकज “..म्हणते ..असे म्हणून स्वारी चॉकलेट हस्तगत करून ...पार पसार होते ..मनात विचार येतो ..खरेच मी चहा घेतला का नाही याची चौकशी तर ..माझ्या कुठल्या सहकाऱ्याने..पण नाही केली ..आणी ..याला पहा माझी कीती काळजी ..!!खरेच बालपण कीती निरागस आणी ..निर्मळ असते ना ..!!#बँक डायरीअनुभव 2बँकेत काम करीत असताना नेहेमीच वेगवेगळ्या प्रकारची माणसे आम्हाला भेटत असतात असेच कधी मधी दिसणारे एक व्यक्तिमत्व ..!धारदार नाक, चेहेरेपट्टी अगदी एखाद्या राजासारखी ..!चेहेऱ्यावर हलकासा मेकअप चा थर ..!डोळ्यात कडे पर्यंत ..ओढलेली काजळाची बारीक धार ..!कपाळावर दुबोटी गंध मध्ये ओम ..!केस मानेपर्यंत पोचलेले ..आणी पूर्ण मागे वळवलेले ..!कानावर पण बारीक रेखीव कल्ले..काढलेले ..!कानात मधोमध मोठा मोती असलेली भिकबाळी ..फक्त अंगात कपडे आताच्या “ आम आदमी “.सारखे ..असे वाटत होते आपण एखाद्या ..राजाला पाहत आहोत की काय ??आज अचानक माझ्यासमोर त्यांचे आगमन झाले ..पैसे भरण्यासाठी ..एक कटाक्ष टाकून....त्यांचे कडे पाहून ..मी हसले ..आणी म्हणाले ..एखाद्या जुन्या महाराजा सारखे दिसता तुम्ही ..मी नेहेमी ..पाहते तुम्हाला ..एक विचारू..ते हसले आणि म्हणालेविचारा की मॅडम..मी म्हणले असा गेट अप रोज करण्याचा कंटाळा येत नाही तुम्हाला ??हे ऐकून त्यांचा चेहरा आणखीन खुलला.आणी तेम्हणाले,” मी रोजच असा राहतो ...मला आवडते असेच राहणे मला अगदी कौतुक वाटले ..कित्येक वर्षे जुन्या पठडीतला ..एकच बेअरिंग चा मेकअप न कंटाळता करणे आणी त्याच भूमिकेत वावरणे ...सोपे नाही ..!मग त्याच उत्सुकतेने मी विचारले ..“काय करता तुम्ही व्यवसाय ??आपला दारूचा गुत्ता आहे जवळच मॅडम..उत्तर ऐकून ..मी मात्र “अवाक “....#बँक _डायरी अनुभव 3हरपाल ..एक बँकेत चहा पोचवणारा मुलगा ..रोज दोन तीनदा तरी भेट ..गप्पा चेष्टा मस्करी रोजच असते कीती तरी वर्षे या लहान गावात मध्य प्रदेशातून आलेल्या लोकांची पिढी वाढत आहे एक आला की बरोबर नातेवाईक पण असतातच त्यांच्या गावी काहीच पोट भरण्याचे साधन नसल्याने महाराष्ट्र त्यांचे साठी सर्वोत्तम राज्यआहे आता तो जिथे काम करतो ते हॉटेल बंद होणार आहे काही दिवसात अशी बातमी समजली कारण मालकाचा तिथला करार संपला आहे हरपाल चहा घेऊन आला तेव्हा मी विचारले अगर ते हॉटेल बंद हो गया तो फिर क्या करोगे हरपाल .,.कुछ नही गाव चाले जायंगे..वहाँ खेती है हमारी खेती करेंगे और क्या (त्या खेतीत काहीच उगवत नाही हे मला पण माहीत आहे आणी त्याला पण )जाते वक्त सारा पगार लेके जायेंगे ,म्हणजे ..आता पगार घेत नाहीस का तु ..नही पगार तो मालिक के पास रहती है मेरा रहन सहन खाना पिना कपडे र सब तो मालिक ही खर्च करता है फिर मुझे काहे चाहिये पगार वगार ..?अरे वा फिर तो अच्छा है ..हा और अगर छुट्टी के दिन धाबे पर भी खाना खाओ तो भी बिल मालिक ही भरता है ..ये बात है तो फिर क्यो छोड जाते हो ये गावमाझा ,..प्रश्न ..कही दुसरे होटल मे काम धुंडो ना हरपाल .अरे मॅडम काम तो कही भी मिल सकता है .,मगर ऐसा "मालिक "नही मिलेगा ना ,,मी मनोमन त्या "मालकाला "वंदन केले