रात्रीचे तीन वाजले होते. संपूर्ण वातावरण गूढ शांततेत बुडालेले होते. वेस्पर आज खूप थकली होती, त्यामुळे ती लवकर झोपली. अचानक, फोनचा आवाज त्या शांततेत घुमू लागला—
"रिंग... रिंग... रिंग..."
तरीही वेस्पर उठली नाही. तिची झोप एवढी गाढ होती की तिला बाहेरच्या जगाचे भानच नव्हते. काही क्षणांनी पुन्हा फोन वाजू लागला—
"रिंग... रिंग... रिंग..."
अनेक वेळा फोनच्या रिंगने तिला शेवटी जागे केले. वैतागून ती फोन उचलते.
"हॅलो? कोण आहे? झोप तरी लागू द्या!"
फोनच्या दुसऱ्या बाजूने एक अनोळखी आवाज ऐकू आला—
"हॅलो, मी लिओराशी बोलतोय का?"
हे ऐकून वेस्परच्या झोपेचे पार उडाले. तिचे हृदय जोरात धडधडू लागले, आणि अचानक तिचे हातपाय थरथरू लागले.
"हॅलो, मी अलारिक बोलतोय..."
हे नाव ऐकताच तिच्या हातातून फोन निसटला. ती भीतीने मागे सरकली. फोनच्या दुसऱ्या टोकावरून अचानक एक भीषण हशा उमटला—
"हॅं... हॅं... हॅं... हॅं..."
त्याच क्षणी वेस्परच्या पाठीमागे काहीतरी हालचाल झाली. ती घाबरून मागे वळू लागली, आणि त्याच वेळी कोणी तरी तिच्या गळ्यात जोरात दोरी अडकवली!
"काय... काय...!!!"
आधी तिला समजलेच नाही काय घडते आहे. तिच्या गळ्याभोवतीची पकड घट्ट होत गेली, आणि कोणीतरी तिला खिडकीबाहेर ओढू लागले. ती तडफडली, ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज बाहेर पडू शकला नाही. दोरी आणखी वर खेचली जात होती... तोपर्यंत, तोपर्यंत ती तडफडत मरत नाही, तोवर!
काही वेळाने शरीर निश्चल झाले. तिचा जीव गेला होता. अज्ञात हत्याऱ्यांनी दोरी छताला घट्ट बांधली आणि तिथून पळून गेले. हो, ते दोघे होते—एकाने दोरी तिच्या गळ्यात अडकवली आणि दुसऱ्याने ती क्रूरपणे वर खेचली.
सकाळी काही लोक नेहमीप्रमाणे व्यायाम करून परत येत होते. अचानक, त्यांनी ते भयावह दृश्य पाहिले—वेस्परचे शरीर छताला लटकलेले होते!
क्षणात भय आणि भीतीने शहर हादरला. कारण वेस्पर साधी-सोपी मुलगी नव्हती. ती मार्करस कुटुंबाची सदस्य होती... आणि आता ती मेली होती.
कुटुंबाने सुड घ्यायचा का? की या हत्येमागे काहीतरी मोठं गूढ होतं?
मार्करस कुटुंबा बद्दल थोडीशी माहिती
मार्करस कुटुंब हे १८८० च्या दशकात एक प्रतिष्ठित, पण गुप्तपणे धोकादायक कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मूळांचा शोध लावायचा झाला तर, ते शतकांपूर्वीच्या गुप्त संघटनांपर्यंत पोहोचतात.
हे कुटुंब मूळचे एका शक्तिशाली सरदाराच्या वंशजांपैकी होते, ज्याने राजाच्या गुप्त सेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली हळूहळू, ते केवळ सैनिक किंवा सरदार न राहता गुप्त हत्या करणारे बनले काळाच्या ओघात, त्यांनी "खुलेपणाने" प्रतिष्ठा मिळवली, पण गुप्तपणे रक्ताने इतिहास रंगवला.
मार्करस कुटुंब राजा आणि त्याच्या राजकीय योजनांसाठी गुप्तपणे लोकांना संपवत असे अनेक राजकीय नेत्यांचा आणि विद्रोह्यांचा खून हा त्यांच्या हत्यारांनी झाला आहे मात्र, जसजसा काळ गेला, तसतसे राजालाच हे कुटुंब धोकादायक वाटू लागले.
कुटुंबाच्या नियमांची आणि शिकवणीची तत्त्वे
मार्करस कुटुंबाच्या सदस्यांना जन्मत:च विशिष्ट नियम शिकवले जात असत.
“रक्त म्हणजे सन्मान.”
एकदा कुटुंबात प्रवेश झाला, की बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता—मृत्यू.
“राजासाठी विश्वास ठेव, पण त्यावर प्रश्नही विचार.”
राजाच्या आदेशांचे पालन करायचे, पण राजाला फसवण्याची ताकद असेल तर ती वापरायची.
कुटुंबात स्नेह, प्रेम, होते पण जेव्हा त्याच्या हत्याच्या कामात असतात तेव्हा ते गंभीरतेने काम करतात.
मार्करस कुटुंबात सात सदस्य आहेत आणि त्या सदस्यांचे त्यांचे त्यांचे वेगवेगळे कुटुंब आहेत.
पहिले कुटुंब स्टॉर्मफॅंग आहे जे वादळासारखे प्रचंड शक्तिशाली आणि विध्वंसक आहेत.
दुसरे कुटुंब शॅडोव्हेल आहे जे सावलीतून हालचाली करणारे, कुणालाही सहज न दिसणारे.
तीसरे कुटुंब आंबरटाइड आहे जे व्यापारी आहेत.
चौथे कुटुंब वेनॉमब्लूम आहे जे वैद्य/विषविशारद
विषारी फुलांसारखे सुंदर पण प्राणघातक.
पाचवे कुटुंब स्टोनहॉलो आहे जे Strategist म्हणून ओळखले जाते
सहावे कुटुंब थॉर्नक्रेस्ट आहे जे न्यायाधीश कुटुंब आहे
सातवे आणि शेवटचे कुटुंब डस्कग्लो आहे जे जादूगार/गूढशास्त्रज्ञ कुटुंब आहे ( Mystic )
संध्याकाळच्या प्रकाशासारखे गूढ आणि आकर्षक आहे हे कुटुंब.
वेस्पर शॅडोव्हेल कुटुंबाची होती
- पुढील भाग पुढच्या महिन्यात