Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 35 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 35

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 35

इंजिनची वाट लागली होती , इंजिनचा गेम झाला होता - बंद पडलेल्या इंजिनमुळे बसध्ये पेटलेली लाईटज , ऑफ झाली होती -  

        अंधकाराने बसला आता विळखा घालून, आपल्या विशाल गर्भात सामावून घेतल होत -

      बसमध्ये ड्राईव्हिंग सीटवर बसलेला निनांद  
- त्याच डोक बस झाडावर आदळल्याने - स्टेरिंगवर आपटल होत , कपाळावरची कवटी फुटून त्यातून ताज्या लालसर रक्ताची - धार बाहेर पडली होती , 

      लाल रक्ताच्या मैकअपने चेहरा अभद्रपणे रंगून ऊठला होता - शर्ट- पेंट सर्वकाही लाल गडदसर रक्ताने भिजल होत ! 

        मागे सीटवर बसलेल्या सेनरीटा मैडम - त्यांच्या नाकाला मार बसला होता - नाकाच फुटून रक्त बाहेर आल होत , वीणाच्या पोटातून पुढच्या सीटची लोखंडी पातळसर सलई तुटून , आत घुसली होती - मागून पाठणातून तीच , टोकदार लाल रक्ताने भिजलेल टोक बाहेर आल होत -     

        पाहणा-याला वाटले असते ही बया मेली , खल्लास झाली- परंतू देवाची कृपा तीचे श्वास सुरु होते -   

        बाकीची उर्वरित मुल- मुली सर्वजन अशीच बसमध्ये विचित्र अपघाती अवस्थेत , 
 पडली होती..- 

        कोणाच्या डोळ्यांत काच घुसून कोणी आंधळ झाल होत , कोणाच - हात, पाय, फ्रेक्चर झाल होत . 

        सेनरीटा मैडमना जाग आली! 

         " ससस ह्ह्ह्ह!" कण्हतच त्या जागेवरुण उठल्या - चेहरा अवतीभवतीच दृश्य पाहून रडवेला झाला होता - त्यावर एक भीतीची किनार झळकत होती..       

        सहलीवरुन घरी जायला निघालेली ही मुल- मुली, काहीवेळा अगोदर ईतक्या आनंदात गाण्याच्या भेंड्या खेलत होते - वातावरण कस प्रसन्न करणार होत . 

        नियतीच्या मनात काय कपट आहे ? कोणी सांगू शकत का ? अर्ध्यातासाअगोदर ही बस , ही मुल- मुली, सर्व सुखरुप होते - आनंदीत होते .. 

        आणी मग आता ? वेळ बदलायला कितीसा वेळ लागतो ! हे ह्यावरुन कळून येत ! नाही का ? असो पुढे ! 

        रडत - रडतच सेनरीटा मैडम उभ्या राहिल्या , अवतीभवतीच दृश्य पाहून त्यांच्या अंगाचा भीतीने थरथराट होत होता.. 

        अक्ख्या - संपुर्णत आयुष्यात ईतक भयावह दृष्य कधी पाहिल्याच त्यांना बिल्कुल आठवत नव्हत , मुळीचंच नव्हत .. 

        " वीणा! " सेनरीटा मैडम वीणापाशी आल्या , तिच्या कपड्यातून - पोट फाडून आत घुसलेली सलाई पाहताच - मैडमचे दोन्ही हात तोंडावर गेले - हात थरथर करत काफत होते , डोळे भितीने विस्फारले होते. 

         " निनांद , निनांद ,!" मैडम चालत चालत ड्राईव्हसीटपाशी आल्या - त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या निनांदला ऊठवल -   

        कण्हत - विव्हलत , डोक्याला हात लावत तो जागा झाला.-  

         " निनांद यू ओके !" सेनरीटा मैडमनी काळजीपूर्वक स्वरात विचारलं.. 

        " हो, मी ठिक आहे मैम- बाकी सर्व !" सीटवर बसूनच डोक दोन्ही हातांनी दाबत निनांद म्हंटला..  

        " नो , वाटत नाही , सर्वजण जखमी आहेत , वीणाच्या पोटात तर सलई घुसलीये , जर वेळीच सर्व अपघत ग्रस्तांना मदत मिळाली नाही , तर !" सेनरीटा मैडमचा आवाजच घश्यात बसला - डोळे पाणावले.. 

        निनांदने मैमकडे पाहिलं ! 

        " आपल्याला काहीतरी कराव लागेल , आधीच मी माझा मित्र गमावला आहे !" निनांद हताशपणे म्हंणाला . 

        सीटवरुन उठला - त्याच पाय एक लंगडा झाला होता - गुढघ्याला मार बसलेला होता.. -आतील गुढघ्याची वाटी दूखत होती.

        " मैम मी बाहेर जाऊन पाहतो , काही मदत मिळते का पाहाव लागेल, तो पर्यंत -तुम्ही जे जे थोडक्यात आपल्यासारखे सुखरुप आहेत त्यांना ऊठवा , कारण ज्याने यशला मारलं - तो ,किंवा त्याची माणस ईथेच असतील, आपल्याला सोबती लागतील !" निनांद म्हंटला. 

मैडमने फक्त होकारार्थी मान हळवली, मागे निघून गेल्या.. 

        निनांद सावध पवित्रा घेत बसच्या दरवाज्यातून बाहेर पडला - बाहेर रस्त्यावर दूर दूर पर्यंत कोणिही नव्हत - चारही दिशेना शुकशुकाट पसरला होता - 

        दूर पर्यंत एका रेषेत पुढे गेलेला हाईवे , मेलेल्या मृत सापासारखा भासत होता - अवतीभवती उभी झाडे निनांदला रोखून पाहत आहेत अस भासत होते.. 

        निनांद चालत- चालत बसच्या मागे जाऊ लागला- चालताना त्याचा एक पाय लंगडत होता - चेहरा , कपडे रक्ताने माखले होते. 

       तोच त्याची नजर शेवटच्या टायरवर पडली- काळा टायर फ़ाटला होता - आणी त्या टायरच्या जाड्या ट्यूब मध्ये - एक धारधार लोखंडी - पातीची भिंगरी अटकली होती - 

       निनांदने ती खाली बसून, टायरमधून उपसून काढली, डोळ्यासमोर आणून तीला पाहू लागला.

         " काय आहे हे ?" निनांद स्वत:शीच म्हंटला.

        निनांद पासून तीस पावळांवर , झुडपांमधून- दोन निळसर कचकड्याचे डोळे, निळ्या रंगाच्या उजेडात - टायरबाजुला, त्या भिंगरीला नेहाळत उभ्या निनांदला पाहत होते. 

     तोच निनांदला कसलीतरी चाहूल लागली, त्याने पटकन त्या दिशेला पाहिल- तसा तो निळसर डोळ्यांनी पाहणारा हैवान - हळूच झुडपात खाली लपला , झुडपांतून निनांदला पाहू लागला.. 

        निनांदने खिशातून आपला स्मार्टफोन काढला , स्मार्टफोन मध्ये नेटवर्क नव्हत..

        " शट!" निनांद निराशजनक स्वरात उच्चारला. 

        तोच समोरच्या झाडात सळसल झाली..- 
निनांदने कान टवकारले , वळून समोर त्या झाडीत पाहिल- 

        " खिखिखिखिखी!" मस्करी, मज्जाव - केलेल हसू घुमल, त्यासहितच झाडांची सळसल झाली- अस वाटत होत , जणु किरखीट्या, मूद्दामून ती झुडप हळवत आहे.. 

       की सावज स्वत:हून आपल्या जवल चालत याव .?

        निनांदची भेदरलेली , घाबरीगुबरी नजर त्या झुडपावर खिळली होती.- छातीच्या भात्यात श्वास अडकला होता , 

        ती झुडपे कोणालातरी स्वत:च्या गर्भात दडवून होती , जे काही त्या झुडपांकडे लपल होत ते भयंकर , रक्तपिपासू, हिंस्त्र,कप्टी- धुर्त, अघोरी , ह्या सर्व श्रेणींत बसणा-या वाईट गुणांतल होत..

        निनांदची उत्सुकता म्हंणा, की त्याला मरण्याची घाई होती ? परंतू निनांदची पावळे त्या झुडपाच्या दिशेने निघाली..

      सैनरीटा मैमनी पाच - सहा मुल मुलींना उठवल , ज्यांना जास्तकाही लागल नव्हत , 
 मैडमची नजर हळूच लास्ट विंडशील्ड मधून बाहेर पडली- तस त्यांना दिसल , की निनांद रस्त्यावरुन पाठमोरा चालत पुढे पुढे जात आहे - आणि त्याच्या पासून दूर तीस पावळांवर झुडपांत एक अनाकलनीय - भीतीची- धोक्याची घंटा वाजवणारी सळसल होत आहे.

     xxxxxxxx 
(तर मित्रहो सादर आहे - तृप्तेश द घोस्ट किलर ! ) 

  हाईवेवरुन - तो त्याची तुटलेली खटारा , सेकन्ड़ हेंड सायकल वेगान दमटावत रस्ता कापत निघाला होता..- 

        अंगात एक फुल बाह्यांची सफेद रंगाची हुडी घातली होती- डोक्यावर हुडीची काळी टोपी होती- खाली एक फिट निळ्सर रंगाची ट्रैक पैंट घातली होती.. 

        पायांत पैरागॉनची निळसर रंगाची झिजलेली चप्पल घातलेली होती- पाठिवर एक बैग होती, तीही अध्ये, मध्ये फाटली होती, जिला त्याने शिवून टाकलेली. 

        त्याच्या तोंडून काहीशी बडबड अस समजा पुटपुटण्याचा आवाज बाहेर पडत होता.

        " च्यायला कोण म्हंणेल मी घोस्ट बस्टर आहे , फाटलेली बैग, झिजलेली चप्पल- उधारीवरची हुडी- महिनाभर न धूतलेली ट्रैक पेंट - जी म्हंणूनच नवी दिसतीये तुम्हाला ( त्याने आपल्या सर्वाँकडे - डोळे बारीक करुन, रडवेळ्या चेह-याने पाहिल) साला घोस्टबस्टर कमी , गल्लीतला भिकारी पण वाटत नाही मी, 
तो पण माझ्या पेक्षा जास्त कमवत असेल!" अचानक त्याच्या सायकलची चैन पडली- खट खट आवाज झाला.

         " झाली पनौती लागली मागे , आज जर 
 ऊशीरा भुताला पकडल - तर म्हातारा त्याच्या कवळीच्या जागी माझे दात बसवेल-!" त्याने सायकल थांबवली, उचलून तीला रस्त्याबाजुला फेकली-  

        रस्त्याने वेगाने धावायला सुरुवात केली, धावता - धावताच तृप्तेशने हळुच डोळे मिटले.!


        बंद डोळ्यांआड- काळ्या पडद्यांवर लाल रंगाचा धुसर प्रकाश पसरला , ज्या धुसर प्रकाशात त्याला .. ती अपघातग्रस्त बस दिसली, व ती सळसलणारी झुडपे , आणि त्या झुडपांपाशी चालत जाणारा , रक्तबंबाळ चेह-याचा निनांद .... 

    खाडकन तृप्तेशने डोळे उघड़ले! 

        " अजुन दोन सेक्ंद जास्त दाखवायचं की, पंधरा सेकंदच दिव्य दृष्टी दिसते - असो, लवकर पोहचाव लागेल बाना..!" तो अस म्हंणतच वेगाने पाय उचलूत धावू लागला...

        धुक्याने बुडालेल्या हाईवेवरुन त्याची पाठमोरी धावत धावत पुढे पुढे जाणारी आकृती दिसत होती...  





xxxxxx 
समाप्त: