Maryada EK Premkatha - 1 in Marathi Love Stories by Pradnya Chavan books and stories PDF | मर्यादा एक प्रेमकथा - 1

Featured Books
Categories
Share

मर्यादा एक प्रेमकथा - 1

भास्कर आबासाहेब पाटील कोल्हापूरचे आमदार आबासाहेब पाटील यांचा मुलगा.... 
नावातच सूर्य आहे त्यामुळे सूर्यासम तेजस्वी, देखणा कोल्हापूरचा गडी , ब्राऊन कलरचे सुंदर डोळे, नाकाच टोक सरळ, ओठ गुलाबी गुलाबी कोणालाही मोहवतील असे , काळेभोर केस.
जिम मध्ये तयार केलेली भारदस्त बॉडी, त्याचे मसल्स,  सहजच पाहता क्षणी गारद होईल अशी....

आबासाहेब पाटील आणि त्याचे फारसे पटायचे नाही कायम घरात वादावादी सुरू असायची , त्याची आई सुवासिनी मध्ये पडल्या शिवाय काही भांडण संपायचे नाही .

राजकारण्याचे कुटुंब म्हटल्यावर घरात ही तेच वातावरण असायचे, कोणाचा कुणाशी ताळमेळ बसत नव्हता .
भास्करच्या आजीसाहेब मालतीदेवी यांचाच शब्द घरात चालायचा , त्या म्हणतील तस आणि तेच त्यांच्या घरी चालत असे.....

थोडक्यात काय तर राजकारणात जसे सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकाचे पाय खेचतात त्याचं प्रकारे यांच्या घरी ही रस्सीखेच सुरु असायची , मी नाही ना पुढे जाऊ शकत तर तुला ही मी पुढे जाऊ देणार नाही अशी परिस्थिती.... Very complicated 

चला आता कथेला सुरुवात करुया नंतर बाकीच्या घरच्यांची ओळख होईलच आपोआप ....
चला वाचूया मर्यादा एक प्रेमकथा....


स्थळ :- पाटील वाडा, कोल्हापूर.




आबासाहेब : जायचं आहे ना घर सोडून चालते व्हा , त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला.... घर काय असत ते हे घर म्हणजे कुस्ती च मैदान वाटत ना तुम्हाला, ठीक आहे जा हे घर सोडून....

सुवासिनी : अहो ! काय करताय हे ? त्याला काही कळत नाही, तुम्ही माफ करा ना त्याला जाऊ द्या ना ...


आबासाहेब : नाही, सुवासिनी आता नाही .खूप वेळा माफ केलय मी त्याला पण आता नाही आता माझ्या सहन शक्तीचा अंत झालाय ... तुमच्याच चिरंजीवांना येथे राहायचं नाही , मग तुम्ही का उगाच त्यांना जाण्यापासून रोखताय ??? जाऊ दे त्यांना, त्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही...... 



भास्कर :  आई तू मध्ये पडू नकोस आता ... मला या घरात क्षणभर ही रहायच नाहीये, तू किती काळ अशी आम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेस कारण मलाच इच्छा नाही या सगळ्यात मी तुझ्यामुळे  बांधला गेलोय ती दोर  कधी ना कधी तुटणार होती .... मी फक्त तुझ्यासाठी या घरात राहत होतो पण आता सगळ माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलय सर्व ....


आजीसाहेब : हे काय बोलताय भास्कर, तुम्ही असं घर सोडून गेलात तर या घराची इज्जत धुळीत मिळेल ..
पाटील घराण्याच  नाव कोल्हापूरमध्ये एक आदर्श कुटुंब म्हणून घेतलं जातं ते बेचिराख होईल .....



भास्कर : आजीसाहेब, बस करा तुमचं आदर्श पुराण ....हे केलं तर अस होईल तस होईल घराण्याची आब्रू जाईल this and that बसं हा आता मला नाही राहायचं इथे that's final ....😡😡😡 तुमच्या अश्या स्वभावामुळे च मला ईथे रहायच नाहीये....



( रागातच तिथून  आपल्या रूम मध्ये निघून जातो, कपडे आणि इतर सामान भरत असतो तितक्यात तिथे त्याचा भाऊ  सर्वज्ञ तेथे येतो )


दादा : तू खरचं हे घर सोडून जाणार  आहेस का ???

भास्कर : आता सामान भरतोय म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो ???

सर्वज्ञ : हमं , अरे पण राहणार कुठे खाणार काय याचा विचार केला आहेस का तु ???

भास्कर : nice question ❗पण याचा मी काही विचार केला नाहीये बघू वाट मिळेल तिथे जाईन जे मिळेल ते खाऊन पण इथ येणार नाही.... 


असं म्हणत तो त्याचं सामान घेऊन भरभर चालत खाली निघून ही जातो ....


हॉलमध्ये सर्वजण डोळे फाडून त्यालाच बॅग घेऊन येताना पाहून विचार करू लागतात ... घरातले सर्व लोक नोकर चाकर मंडळी सर्वच हे दृश्य पाहतात ...

आजीसहेब हे पाहून देवालाच म्हणतात , काय पाप आमच्या लेकाने केलं म्हणून त्याच्या पदरी असा मुलगा जन्माला घातलास देवा !!! हेच दिवस बघायचे राहिले होते आता ....


भास्कर : आजीसाहेब अहो, तुमची च इच्छा पूर्ण करतोय तुम्ही म्हणायचात आम्हाला ना की स्वतः च्या मनाची मनमानी करायची असेल तर या घरात त्याला थारा नाही.... तेच तर करतोय आता मला माझ्या मनाची मनमानी करायची आहे म्हणून मी हे घर सोडून चाललोय .... पाया पडतो आशीर्वाद द्या, आम्ही जे करायचं ठरवलं आहे त्यात मला यश मिळू दे .... 

( आजीसाहेब काही न बोलता तेथून निघून जातात, त्यांच्या मागोमाग त्याचे वडील आबासाहेब सुद्धा निघून जातात...
भास्कर त्याच्या आईच्या पाया पडतो त्याची आई सुद्धा काही न बोलता रडतच तेथून निघून जाते .... )


(आता हॉलमध्ये त्याच्या काकी शर्मिला , त्याच्या मोठ्या  चुलत भावाची बायको शनाया आणि त्याचा छोटा  भाऊ सर्वज्ञ तेथे असतात .... त्याचे काका राजेंद्र आणि त्यांचा मुलगा अनिकेत हे आबासाहेबांच्या सांगण्यावरून काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते....)

भास्कर : खूप छान वाटतं असेल ना काकी आणि वहिनी तुम्हाला आता मी या घरातून जातोय म्हटल्यावर, मनाला शांती मिळाली असेल ना तुमच्या... आता या घरात काय राडे, एकमेकावरच कुरगुडीच  राजकारण करा ....

( असं म्हणून तो घराबाहेर पडतो ... त्याच्या बाईक वर स्वार होऊन तो घरापासून दूर त्याच्या best friend ऋग्वेदच्या घरी जात असतो , गाडी सुसाट वेगात असते .... तोच त्याची गाडी एका मुलीच्या अंगावर जाता जाता राहिली.... त्याने पटकन गाडी थांबवली आणि तिच्या कडे गेला .... नशीब रस्त्यावर कोणी नव्हत नाही तर कोल्हापूरकरांनी त्याला चांगलंच धूऊन काढलं असतं.... विषय हार्ड ओ ....)

पुढे : -  


भास्कर :  सॉरी सॉरी.... मला माफ करा , तुम्हाला कुठे लागलं नाही ना .... 


ती मुलगी : नाही ,काही झालं नाही मला पण गाडी नीट चालवता येत नाही का ???? काही झालं असत तर ????

भास्कर : प्लिज मला माफ करा, I am really sorry ....

ती मुलगी : it's okay... पण आत्ता जरा नीट आणि हळू गाडी चालवा.... नाहीतर कोणालातरी वर पोहचवाल....

असं म्हणत ती मुलगी तिचा खाली पडलेला फोन आणि तिचं सामान उचलते....तो ही तिला मदत करतो...
त्याचं लक्ष तिच्या फोन कडे जात, फोनला खूप स्क्रॅच पडलेले असतात....

भास्कर : आहो तुमच्या फोनला खूप सारे स्क्रॅच पडले आहेत... हे पैसे द्या आणि तुमचा फोन दुरुस्त करा ....

ती मुलगी : नकोत मला पैसे , तुम्ही फक्त इथून पुढे गाडी नीट लक्षपूर्वक चालवा .... म्हणजे झालं....

( ती मुलगी जायला निघते , तर तो तिला म्हणतो  अहो असं काय करता माझ्या मुळे तुमचा फोन फुटला.... याची भरपाई तर मीच करायला हवी ना .... प्लिज हे पैसे घ्या ....🙏🙏🙏🙏)

ती मुलगी : मला नको आहेत तुमचे पैसे .... मला नको काही भरपाई.... 

भास्कर : अहो घ्या ना माझ्याकडून चूक झाली आहे मग त्याची भरपाई म्हणून मी तुम्हाला काय देऊ.... 

ती मुलगी : मला काही नकोय ओ आधीच मला 
कॉलेजला जायला उशीर झालाय ... प्लिज कृपा करा मला जाऊ द्या ....



तोच तिचा फोन वाजतो .... ती फोन उचलते तिकडची व्यक्ती बोलते.... 


"हॅलो  श्रीजा कुठे आहेस 12:15 वाजले ????

ती मुलगी : येत आहे ग वाटेतच आहे, ते वाटेत माझा छोटासा accident झाला ... 


" तिकडची व्यक्ती काय कसा झाला??? तुला काही झालं नाही ना.... तू आत्ता कुठे आहेस सांग मी येते तिथे....


श्रिजा: मला काही झालं नाही... मी  येतेय कॉलेजला  तू काळजी करू नकोस....

(अस म्हणत ती मुलगी एका रिक्षाला हात करून जाते...)

(तो ही त्याच्या मित्राकडे जायला निघतो .... वाटेत तो हाच विचार करतो की माझ्याकडून असं कसं झालं इतकी वर्ष मी गाडी चालवतो आहे पण अस कधी काही झालं नाही.... )




भास्कर आणि आबासाहेब यांच्या मध्ये असं काय झालं असेल की तो घर सोडून जातो ❓ असा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल...

त्यासाठी वाचत रहा... मर्यादा एक प्रेमकथा 🔥🔥🔥

कथा आवडत असेल तर लाईक्स कमेंट्स अँड रेटिंग द्यायला विसरू नका....❣️❣️❣️
.

.

.


.

Bye bye stay tuned ❤️ ❤️ ❤️