Koun - 24 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 24

Featured Books
Categories
Share

कोण? - 24

भाग-२६
    सावलीने मग एक युक्ती लावली आणि तिने आईला सांगितली, ती म्हणाली, "आई कोमल माझी गोष्ट कसल्याही प्रकारे ऐकणार नाही तर तू एक काम कर तू कोमलला सांगुन थेट त्याला घरी बोलावून घे आणि मग त्याचा पालकांशी बोलण्याचा बहाण्याने त्यांचा घराचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर मागून घे. मग मी
आपल्यापरीने त्याची संपूर्ण माहिती काढण्याचा प्रयत्न करते.” आईला सावलीची युक्ती एकदम पटली आणि ती
कोमलचा रुममध्ये गेली आणि म्हणाली, "बेटा कोमल, तुझी अशीच इच्छा असेल तर ठीक आहे, माझा तुला संपूर्ण पाठींबा आहे. परंतु त्या आधी मला त्या शशांक बरोबर काही बोलायचे आहे. तर त्याला तू घरी बोलाव मात्र यावेळेस खिडकीतून नाही तर दारातून आत ये असे म्हण असे म्हणून आई हसली त्याच बरोबर कोमल हि हसली, अशाप्रकारे सावलीची युक्ती आता कार्य करू लागली होती. मग सावलीने पियुषला फोन करून सगळा प्रकार सविस्तर सांगितला आणि लवकरात लवकर येऊन ते सेटिंग तिचा मोबाईल मध्ये करून देण्यास सांगितले. जेणेकरून ती कुठेही असली तरीही घरात काय होते कसे होते ते सगळे तिला २४ तास तिचा मोबाईल वर दिसायला पाहिजे, तर पियुषने सांगितले तो उदयाला येऊन ते सगळ कार्य करून देतो. आईने सांगितल्याप्रमाणे कोमलने शशांकला फोन करून घरी येण्यास सांगितले. शशांकने हि कोमलला तिचा घरी येण्याची हमी दिली. आता फक्त सावलीला प्रतीक्षा होती ती शशांकचा घरी येण्याची.

   सावली तिचा ऑफिसचा कामात व्यस्त असतांना तिचा फोन वाजला आणि सावलीने तो उचलला समोरून तिचा ऑफिसचे बॉस बोलत होते, ते म्हणाले, "सावली उद्याला माझी एक महत्वाची मिटिंग आहे त्याकरिता तुला सुद्धा माझ्याबरोबर त्या मिटिंगला चलावे लागेल" मग सावली मग सावली म्हणाली, परंतु सर माझ्याकडे गेस्ट येणार आहेत.' तेव्हा बॉस म्हणाले, " सावली हि फारच महत्वाची मिटिंग आहे. शिवाय तुझा घरी तुझी आई आणि कोमल सुद्धा आहेत, त्या दोघीही म्यानेज करून घेतील गेस्टला. मात्र तुला माझ्या बरोबर मिटींगला यावे लागेल." असे म्हणून बॉसने फोन कट केला, तेवढ्यात सावलीची आई तिचाकडे आली आणि म्हणाली, "बेटा सावली तो शशांक
उद्याला आपल्या घरी येत आहे. तर तू हि त्याला भेटून घे आणि बघून घे तेव्हा सावली उत्तरली, "नाही आई हे शक्य नाही आहे, आताच बॉसचा फोन आला होता आणि त्यांनी मला उदयाला महत्वाचा मिटींगला उपस्थित राहण्यास सांगितले आहे, तर माझे नाही जमणार तूच त्याला भेटून घे आणि बघून घे. मात्र मी सांगितल्याप्रमाणे त्याचा फोटो, घरचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर विसरू नकोस. मी घरी आल्यानंतर मला दाखवशील मी ते बघून घेईल, असे बोलून सावली आपल्या ऑफिसचा मीटिंग बद्दल आवश्यक माहिती गोळा करू लागली होती. ते करता करता सावलीला रात्री फार उशीर झाला मात्र ती ते कार्य पूर्ण करून ती जेवली आणि झोपी गेली. सकाळी उठून ती लगबगीने ऑफिसला निघून गेली मात्र जाता जाता आईला पुन्हा आठवण करवून गेली. तर सावली आता तिचा
ऑफिसला येऊन पोहोचली होती. तर बॉस ने सावलीला जी माहिती आणण्यास सांगितली होती ती तिने बॉसला दाखवली आणि ते दोघेही ऑफिसचा गाडीने मिटींगला जाण्यास निघाले. इकडे सकाळची वेळ होती आणि शशांक
आपल्या एका मित्रासोबत कोमलचा घरी आलेला होता. तर त्याने दाराची बेल वाजवली तेच आईने दार उघडला. आईने त्याला याचा आधी बघितले नव्हते म्हणून आईने त्याला विचारले, तुम्ही कोण आणि कोण पाहिजे तुम्हाला." तेव्हा शशांक म्हणाला मी शशांक कोमलचा कॉलेजमधील मित्र आणि हा माझा मित्र, शशांक नाव ऐकल्यावर आईने त्याला ओळखले आणि आत येण्यास सांगितले. तिने त्यांना बसायला सांगितले आणि मग
आई कोमलला व्हील चेअर वर बसवून बाहेर घेऊन आली. शशांक आणि त्याचा मित्राने कोमल सोबत हाय हेलो मग कोमल म्हणाली, आई हाच तो शशांक ज्याचा बद्दल मी बोलत होते. तुला त्याचा बरोबर बोलायचे होते ना म्हणून मी त्याला घरी बोलावले आहे. तेव्हा आई म्हणाली, "हो ग मीच बोलले होते कि मला याचासोबत बोलायचे आहे. तर मग आईने शशांकला विचारले, "तुम्हा दोघांना भेटून किती काळ झाला आणि तुमची भेट कशी झाली.

   शशांकने सांगितले कि,आमची भेट मागील दोन वर्षांचा आधी झाली होती. जेव्हा कोमलचा आमचा कॉलेज मध्ये नवीन दाखला झालेला होता. तेव्हा आमची पहिली भेट झालेली होती आणि तेव्हापासूनच आम्ही आधी चांगले मित्र आणि मग त्यापेक्षा हि अधिक जवळचे.. . तुम्ही समजू शकता.' आई म्हणाली मग सावलीला भेटले असाल कारण कि या दोघीही एकाच कॉलेजमध्ये होत्या. 'कोण सावली, मी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकत आहे. मग आई म्हणाली अरे सावली म्हणजे कोमलची मोठी बहिण, तो बघा तिचा फोटो. " आता मात्र शशांक त्याचा मित्राचा चेहऱ्याकडे बघू लागला. त्याचे तसे वागणे आईचा संशयाला आणखी बळ देत होते. सावलीने व्यक्त केलेला संशय आईला आता खरा होत असल्याचे भासू लागले होते. आई एकसारखी त्याचा चेहऱ्याचे हावभाव अचूक टिपू लागली होती.

     शेष पुढील भागात..