Premache he Bandh Anokhe - 1 in Marathi Love Stories by siddhi books and stories PDF | प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1

The Author
Featured Books
  • સોસિયલ મીડિયા

    સોસિયલ મીડિયા આપણને કઈ દિશામાં લઇ જાય છે એ જોઈએ.  (A)     એક...

  • નિતુ - પ્રકરણ 79

    નિતુ : ૭૯(વાસ્તવ) નિતુ એ આજ નવો માર્ગ પકડવાનો હતો. વિદ્યાની...

  • ભાગવત રહસ્ય - 190

    ભાગવત રહસ્ય-૧૯૦   નૃસિંહ અવતારની કથાએ –ક્રોધનો નાશ કેવી રીતે...

  • તલાશ 3 - ભાગ 27

    ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તેમ...

  • એલીયન ની મિત્રતા

                    સવારનો સમય પારેવા પોતાના માળા તરફથી ખોરાક શો...

Categories
Share

प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1

मेंआरती तेरी गाऊं ओ केशव कुंज बिहारीमें नित नित शीश नवाऊ ओ मोहन कृष्ण मुरारीहै तेरी छवि अनोखी, ऐसी ना दूजी देखीतुझसा ना सुन्दर कोई, ओ मोर मुकुट धारीमें आरती तेरी गाऊं ओ केशव कुंज बिहारी...

संगमरवरी देव्हाऱ्यात वसलेली राधाकृष्णाची मनभावक सुंदर मूर्ती. त्या मूर्ती समोर बसून त्यांची मनोभावे पुजा करणारी ती, त्या राधाकृष्णाच्या मूर्ती प्रमाणेच तेजस्वी भासली त्याला. धुपाच्या सुगंधाने वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. त्यांचा सगळा स्टाफ आरतीसाठी तिथे हात जोडून Zझ्झZझZZZझZZझ्झझ्झझ्झ,कर्क,,Jवक्सडउपस्थित होता. नित्य क्रमच होता त्यांचा त्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नव्हती.

तो ही येऊन हात जोडून उभा राहिला तिथे.

आरती झाली तसं त्यांनी त्याच्याकडे बघितलं. तसं गोड हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं त्याला बघून माईंनी हातातल्या आरतीवरून हात फिरवून त्याच्या डोक्यावर हात फिरवला.

आरती देऊन झाली तशी सर्वन्ट ने लगेच त्यांच्या हातातून आरतीची थाळी घेतली.

तो लगेच वाकून त्यांच्या पाया पडला.

"आज उशिर का झाला तुला?" माईंनी विचारलं

"सॉरी माई आजी काल ऑफिसमधून निघाल्यावर एका पार्टीसाठी जावं लागलं तुला माहिती आहे ना बिझनेस रिलेशन टिकवायचे असतील तर अश्या पार्टीज अटेंड कराव्या लागतात."

"हम्म.."

माई त्याच्या हातावर प्रसाद ठेवतात. आणि बाकीचा स्टाफ मध्ये द्यायला सांगतात.

"माई आजी तू रागवली का माझ्यावर?" तो ती काहीच बोलत नाही बघून. शेवटी न राहून विचारलं त्याने.

"नाही रे बाळा, मी का रागवू? चल ब्रेकफास्ट करून घे आपल्याला ऑफिससाठी निघायचंय."

"हो चल"

"माई आजी आज आपली बोर्डऑफ डायरेक्टर सोबत ऍन्यूअल मिटिंग आहे. आज आपल्या कंपनीचा एकूण  प्रॉफिट मार्जिन समजेल, त्यावरून मग आपल्याला फ्युचर प्लॅन्स ठरवता येतील. खूप महत्त्वाचा दिवस आहे आज."

"सगळं नीट होईल आणि मला खात्री आहे, मागच्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी जास्तच प्रॉफिट मार्जिन असेल आपलं." माईंना विराजस वर पूर्ण विश्वास होता. एकवर्षात त्याने नवीन नवीन आयडियाज लढवून खूप छान प्रगती केली होती.

त्या डायनिंग टेबलजवळ येऊन चेयर ओढून बसतात. तसा स्टाफ लगेच त्यांना ब्रेकफास्ट सर्व्ह करायला घेतो.

"होप सो.. तो ब्रेकफास्ट करत म्हणाला."

"हाय विराजस..ss लुक हँडसम मॅन"

"हाय ब्यूटीफुल तू आता इथे?" विराजस शालिनींना (माईंची  बेस्ट फ्रेंड ) उठून हग करत विचारल.

"हो पॅडीसाठी आले मी. काय ग आता कशी आहे तब्येत?" शालिनींनी काळजीने विचारलं. त्या खास माईंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या.

"काय झालं माई आजी तुला?" विराजसने माईंवर नजर रोखत विचारलं.

"अरे ही बोलली नाही तुला?" शालिनी माईंकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत म्हणाल्या.

माई शालिनी ला काही बोलू नको म्हणून डोळ्यांनीच खुणावत होत्या पण त्यांना ते समजत नव्हतं.

"अरे, काल बीपी लो झाला होता हिचा. मोहन ने कॉल केला मला, तसं मी डॉक्टरांना लगेच पाठवून दिलं. मी पण बाहेर होते रे काल, म्हणून म्हंटल आज तब्येत कशी आहे बघून यावी. " शालिनी एकदा माई कडे तर एकदा विराजसकडे बघत बोलल्या.

माईंनी तर मनातच डोक्याला हात लावला त्यांना विराजस ची काळजी करण्याची पद्धत माहिती होती. म्हणूनच काल त्यांनी मोहन ला बजावलं होत विराजस ला सांगू नको म्हणून  आता तो हे कळल्यावर काय करेल ह्या धास्तीने त्यांनी डोक्याला हात लावला.

"माई आजी तू मला बोलली का नाही? आणि तरी तू आज सकाळी उठून सगळं करत बसली ना" विराजस आजीला थोडं रागावून बघत बोलला.

"मी ठीक आहे आता आणि मी असताना माझ्या कान्हाला असच पूजेशिवाय ठेवायचं का?" माई आजी लटक्या रागात म्हणाल्या.

"अग स्टाफ मधल्या कोणीही  तू सांगितलं असतस तर केली असती ना पूजा " विराजस म्हणतो

"अजिबात नाही हा घरात मी असून बाहेरच्याकडून माझ्या कान्हा चीपूजा करून घेऊ? तुला एकवेळ सांगितलं असत पण तुलाच उशिर झाला उठायला." माई म्हणतात

"विराजस मनावर घे आता तरी तू. सून आन तिच्यासाठी मग तरी स्वतःची दगदग थांबवेल ही." शालिनी माईंकडे एक नजर बघून बोलली.

"मी तर आधीच बोलले आहे ह्याला पण ऐकेल तर खरं माझं"

"बरं स्टॉप स्टॉप लेडीज आपण हा टॉपिक नंतर कंन्टीन्यूकरू आता ऑफिससाठी निघुया लेट होईल." उगाच विषय भलतीकडेच चाललेला पाहून तो त्यांना थांबवत बोलला.

"हो हो चल" माई घड्याळ बघून त्या लगेच उठल्या.

विराजस पुढे येऊन ड्रायव्हरला गाडी काढायला लावतो.

"हॅलो डॉक अंकल तुम्ही आहात ना हॉस्पिटलला आम्ही २ तासांनी येतोय आजीच्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. "

"ओके या तुम्ही मग बघतो मी. माईंना एकदा चेक करावं लागेल."

"बघितलंस शालू म्हणून मी तुला बोलत होते नको सांगू ह्याला काही" माई मागूनच येत असल्याने त्याचं बोलणं ऐकून शालिनीला म्हणतात.

"तुझ्या काळजी पोटीच करतोय अग तो. एकदा टेस्ट करून घे ना, म्हणजे काळजी नाही. तो तरी एकटा कुठे कुठे लक्ष देणार? तुझ्याशिवाय त्याला आहेच कोण त्याला." शालिनी विराजस ची बाजू मांडतात. त्यांना माहीत होतं दोघांचा ही एकमेकांत जीव बसतो ते.

"एव्हढीच जर काळजी वाटतेय, तर मी सांगतेय ते ऐकावं ना ह्याने. असेल कोणती मुलगी आवडत तर सांगायचं ना काळजी वाटते ना मला पण. कोणी समजूनच घेत नाही मला. मी काय पिकलेल पान आज आहे उद्या नाही. "माई आजी थोडं भावुक झालेल्या.

"हो ग समजतंय मला पण.. बरं तू जा आता त्याच्या सोबत, आपण नंतर बोलू ह्या विषयावर. मला पण एक दोन काम आहेत आश्रमाची आजच करुन टाकते." शालिनी विषय बदलत म्हणतात.

"हो ठीक आहे बाय"

शालिनी गाडी चालवता चालवता माईंच्या बोलण्याचा विचार करत होत्या. त्यांना पण कुठे तरी माईंचं म्हणणं पटत होतं. आता विराजसने त्याच्या जोडीदाराचा विचार करायला  हरकत नव्हती. कशाचीच कमी नव्हती घरात बिझनेसचा एवढा मोठा पसारा वाढवून ठेवला होता त्या दोघांनी एकमेकांच्या साथीने. खरंच सोप्पा नव्हता हा प्रवास. त्यांनी स्वतः त्यांच्या मैत्रिणी ला बघितलं होतं त्या बिकट परिस्थितीतुन जाताना. विराजस चे आजोबा गेले तेव्हा  त्यांनी कसबस सावरलं स्वतःला, कुटुंबाकडे विराजसकडे बघून. पण दोन वर्षांनी विराजस चे आई वडील ही कार एक्सीडेंटमध्ये गेले. खूप मोठा धक्का होता त्यांच्यासाठी तो. इन्व्हेस्टर आपले पैसे मागत होते. पण माईं कंबरेला पदर खोचून उभी राहिली न डगमगता तिने तो बिझनेसचा डोलारा सांभाळला. फक्त संभाळलाच नाही तर तो १० पटीने वाढवला. फक्त विराजसकडे बघून त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून खरच सोप्पा नव्हता तो प्रवास. आता विराजस ने तिचं ऐकलं पाहिजे त्याचं चांगलं व्हावं हिचं तर छोटीशी इच्छा आहे तिची. बघितलं पाहिजे काहीतरी आयडिया शोधून काढली पाहिजे त्याला लग्नाला तयार करण्यासाठी. शालिनी विचारत करत स्वतःशीच बोलते.

तर इथे विराजस माईंना घेऊन ऑफिसमध्ये पोहचतो.

माईंना बघून सगळा स्टाफ त्यांना उठून ग्रीट करत होता माई ही हसून त्यांना ग्रीट करून केबिनमध्ये निघून आल्या.

विराजस त्यांना केबिनमध्ये बसायला सांगून मिटिंग च्या अपडेट घेण्यासाठी कॉन्फरन्स रूमकडे वळतो.

तिथलं एकून वातावरण बघून तो समजून जातो, काहीतरी नक्किच गडबड आहे.  सगळ्यांनी तो आल्यावर माना खाली घातल्या

"काय झालं?" राहुल ला विचारत विराजसने एक नजर सगळ्यांवर फिरवली.

"राज ते मुंबई प्रोडक्शनचे काही पेपर मिस प्लेस झालेत." राहुल घाबरून हळूच बोलला. तो त्यांच्या टीमचा लीडर होता त्यामुळे सगळं बघायची जवाबदारी त्याची होती. त्याच्या टीम मेंबर्स कडून चुकी झाल्याने त्या चुकीची जबाबदारी सुद्धा त्यालाच घ्यावी लागणार होती . आणि ती त्याला मान्य होती त्याने लगेच मोहित ला इन्फॉर्म सुद्धा केलेलं.

"काय..? असे कसे मिसप्लेस झाले पण? तुम्ही काय झोपा काढत होता का ?" विराजसने आवाज चढवत रागात विचारलं.

"माहीत नाही कसे, पण आज सगळे पेपर्स कुठली चूक नको म्हणून मी एकदा चेक करत होतो, तर ते पेपर्स दिसलेच नाही" राहुल मान खाली घालून बोलला.

"आता बॅकअप प्लॅन काय आहे?" विराजस विचारतो. तो नेहमीच प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशनवर जास्त फोकस करायचा.

"विराजस डोन्टवरी फॅक्टरीमध्ये ते पेपर्स मी मेल करायला सांगितले आहेत. सॉफ्ट कॉपी आपल्याला मिळून जाईल."  मोहीत राहुलची बाजू सावरत बोलतो.

"ओह्ह गॉड एवढी मोठी मिस्टेक?"  हे आता समजलं म्हणून ठिक आहे. राहुल पण जर मिटिंगच्या वेळी समजलं असतं तर कितीला पडलं असतं.  विराजसने चिडून विचारलं.

"सॉरी सर"

"ही मिटिंग झाल्यावर तुम्ही मला येऊन भेटा मग बोलू आपण. तो त्या सगळ्यांवर  जळजळीत नजर फिरवतो. आताच परत एकदा सगळं चेक करून घ्या आयत्यावेळी गोंधळ नको आहे मला." त्याने आपल्या रागावर कंट्रोल करत कडक शब्दात सांगितलं.

"हो सर"

विराजसला कॉल येतो तसं तो कॉल पीक करून बाहेर निघून गेला.

तर हा आपला हिरो विराजस विक्रांत मराठे. कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट. तसा सहसा त्याला राग यायचा नाही, पण कामात काही चूक झाली किंवा काही चुकीचं घडताना दिसलं की त्याचा राग सातव्या आसमानावर पोहचायचा. त्याने IIM Banglor मधून बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर केलं होतं. दोन वर्षां आधी त्याने त्यांचा फॅमेली बिजनेस जॉइण्ड केला. आधी आजीच्या हाताखाली सगळा बिझनेस त्याने समजून घेतला. हळूहळू जसं तो सांभाळायला लागला तसं त्याच्या आजीने थोडं लक्ष देणं कमी केलं त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर दुपटीने बिजनेस  वाढवला.

आजीने जमवलेली माणसं आणि त्याचा मित्र परिवार हेच त्याच कुटुंब होतं आणि त्याची माई आजी त्याचा जीव. माई आजींचा शब्द तो बिलकुल डावलायचा नाही, पण लग्नाच्या बाबतीत तो एक त्याचं ऐकत नव्हता. त्याला लग्न इतक्यात करायचं नव्हत. बिझनेसवर कॉन्सट्रेट करून त्याची लाईफ एन्जॉय करायची होती. ह्या लग्नामध्ये नी अडकून जायचं नव्हतं. शिवाय आजीची जवाबदारी ही होती.

माईंचे मात्र वेगळे विचार होते. माई म्हणजे पद्मजा रमाकांत मराठे. R.M. Food infotech च्या सर्वेसर्वा. सगळे त्यांना आदराने माई म्हणायचे. त्यांचे मिस्टर हार्ट अटॅकने गेले. ह्या बिझनेस चा पाया त्यांनीच घातला होता. त्यांच्या नंतर त्याच्या मुलाने आणि सुनेने हा व्यावसाय वाढवून छोटी कंपनी चालू केली. पण त्यांच्या मिस्टरांनंतर दोन वर्षाने त्यांची सून आणि मुलगा एका कार एक्सिडेंट मध्ये वारले. त्यानंतर माईंवर खूप बिकट परिस्थिती आली होती. कंपनी डबघाईला आलेली इन्व्हेस्टर त्यांचे पैसे परत मागायला लागले होते. तेव्हा माईंनी बिजनेस बघायचा निर्णय घेतला. ऑफिसच काम समजून घेतलं, आणि ते करत असतानाच त्या छोट्या विराजसला ही सांभाळायच्या. तारेवरची कसरत होती, पण त्यांनी ती जवाबदारी ही समर्थपणे निभावून नेली. आणि आता विराजस ला सगळं नीट सांभाळताना बघून त्याचा उर भरून यायचा. ऑफिस प्रमाणेच त्यांना आता विराजसचा सुखाचा संसार बघायचा होता.

त्याला समजून घेणारी, त्याच्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्याला साथ देणारी, त्याच्यावर भरभरून प्रेम करणारी मुलगी त्यांना विराजससाठी हवी होती. म्हणूनच त्या विराजसच्या मागे लागल्या होत्या लग्नासाठी. शिवाय, आता त्यांच्या वयोमानानुसार तब्येतीच्या कुरबुरी चालू होत्या.

🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺

क्रमशः

©®सिद्धी शेट्ये.