Bhagya Dile tu Mala.. in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | भाग्य दिले तू मला .... भाग 2

The Author
Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

भाग्य दिले तू मला .... भाग 2

पण तो ... त्यांनी एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही.... तो आला तास बाथरूम मध्ये गेला.... आणि मग काही वेळाने शॉवर चा आवाज तिच्या कानावर पडला... ती वेड्यासारखी फक्त पाहत होती.... आपल्यासोबत हे काय घडलं... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती .... आपल्यासोबत हे काय घडतय ... आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती.... पण काहीच कळत नव्हतं.... 



आता पुढे ..... 



ती वेड्या सारखी फक्त बेडवर बसून होती.... त्याने प्ल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं याचा राग हि आला.... 

"समजतो कोण हा स्वतःला....??? एक तर जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं... आता वरून रुबाब हि दाखवणार का....??? त्याला काय वाटत प्रत्येक वेळी त्याच्या त्या ब्राऊन डोळ्यांनी तो मला घाबरवले का....??नाही नंदू अजिबात नाही... आता घाबरायचं नाही.... तुझ्या इच्छेविरुद्ध तुपाशी लग्न तर केलं.... पण त्याचा त्याला पश्चाताप नक्कीच होईल..."ती मनातच म्हणाली .... 



ती तिच्याच विचारात होती तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.... तडे ती तिच्या विचारातून बाहेर अली तिने नजर वर करून त्या दिशेला पाहिलं आणि आता समोरच दृश्य पाहून तिचे डोळे बाहेर येन च बाकी होत..... ती तशीच स्तब्ध होऊन समोर पाहत होती.... श्वास घेणं देखील ती विसरली ... कारण समोरून तो ओले केस झाडत येत होता.... आणि त्याने खाली फक्त टॉवेल गुंडाळला होता... ती वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती.... 

सहा दोन हाईत ... त्याच ते जिम मध्ये कसलेले पिळदार शरीर..... त्याची फुगलेली छाती आणि भरलेले बायसेप.... केसातून अजूनही पाणी ओघळत होत.... त्यामुळे त्याच उघड शरीर चमकत होत.... उंच कपाळ , कोरीव दात भुवया ... आणि कोरलेली दाढी ... चेहऱ्यावर सूर्याला हि लाजवेल असं... तेज... तिच्या हि नकळत तिने एक आवंढा गिळला .... त्याच्या व्यक्तिमत्व प्रभाव त्याच्या आसपासच्या लोकांवर लगेच पडायचा ... मग ती तरी का अपवाद ठरेल.... तिला स्वतःला हि समजलं नाही.... ती एकटक त्यालाच पाहत होती... त्याच्या अस्तित्वात हरवत चालली होती.... 



पण अचानक त्याने तिच्याकडे पाहिलं.... आणि त्याचे ब्राऊन डोळे पाहताच ती गडबडून भानावर अली... आणि आपण एवढा वेळ वेड्यासारखं फक्त त्याला पाहत होतो.... ते हि तो फक्त टॉवेल वर असताना... हे जाणवताच तिने लगेच पाठ फिरवली.... आणि डोळे बंद करून घेतले.... हृदय आता ड्रेन परीक्षा हि फास्ट घावायलला लागला तोटा... तिला आता स्वतःचाच भयानक राग येऊ लागला होता.. ती मनातच स्वतःला शिव्या देऊ लागली... 

"नंदू मूर्ख, बावळट... अशी कशी तू त्याला एकटक पाहू शकतेस....???? विसरली का तो कोण आहे आणि तो काय वागला आहे तुझ्याशी....???? त्याने जरी लग्न केलं असलं तरी तू त्याला नवरा म्हणून कधीच स्वीकारायच नाही...."ती तिच्या मनाला जणू बजावत होती तेवढ्यात.... 


"बायको...." एक मॅग्नेटिक पण तेवढा च हळुवार आवाज आला.... तसे तिने डोळे खडलं उघडले पण पाठ मात्र फिरवलं नाही... तिच्या हि नकळत त्याचा आवाज एकटाच तीच शरीर थरथरला.... आपण तो समोर आला कि एवद्ध का घाबरलो. तिला समजत नव्हतं... तिचा काहीच प्रतिसाद नाही हे पाहून तो तिच्या मागे येऊन उभा राहिला... तो आपल्या मागेच उभा आहे हे समजताच तिच्या पोटात गोळा आला.... त्याच्या बॉडीवॊशचा सुगंध तिच्या नाकात शिरला तास तिने तिच्याही नकळत एक दीर्घ श्वास घेतला .... तिला एकदम फ्रेश वाटलं.... पण तेवढ्यात तिला तिच्या पोटावर थंड हाताचा स्पर्श जाणवला आणि उघड्या खांद्यावर त्याचा चेहरा जाणवला .... तसा तिचा श्वास घशात अडकला.... ती एखाद्या मूर्तीसारखी स्तब्ध झाली... त्याच्या भारदस्त छाती चा स्पर्श तिच्या पाठीला होताच.... पूर्ण शरीरात जणू एक विजेची लाट उसळली .... हात पाय थंड पडले.... तो तसाच तीला मागून मिठीत घेऊन उभा होता.... 


"लक्ष कुठे तुझं...? मी तुझ्याशी बोलतोय...."हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला... पण त्याच्या ओठाचा तिच्या कानाला होणारा ओझरता शीर्ष तिला रोमांचित करून गेला.. तिने त्याच्याच मिठीत अंग आकसून घेतलं.... आपण त्याच राग करतो हे ती पूर्णपणे विसरून गेली होती... कारण त्याचा स्पर्श तिला काहीच विचार करू देत न्हवता.... ती डोळे मिटून आणि दोन्ही हातात साडी घट्ट पडून उभी होती तेव्हढ्यात .... 


"आह ..."ती वेदनेने कळवळली आणि तिने खाड्कन डोळे उघडून आता त्याच्यापासून बाजूला झाली.... ती गळयावर हात ठेऊन खूप रंगात त्याच्याकडे पाहत होती.... कारण त्याने तिच्या ध्यानी मणी नसताना तिच्या गळ्यावर बाईट केलं होत... ती रंगात जोरजोरात श्वास घेत होती.... आणि तो ... तो गालात हसत अंगावर कपडे चढवत होता.... 



"सॉरी हा बायको .... जोरात चावलो का... पण काय आहे ना रात्री आपली पहिली रात्र होती.... मग लोकांना कळायला नको आपल्यात खूप काही झाली म्हणून...."तो तिला हलका डोळा मार्ट म्हणाला आणि तिला जास्तच राग आला....

"मिस्टर शौर्य सूर्यवनशी तुझी हिम्मत कशी झाली मला स्पर्श करण्याची....?" ती नाकपुड्या फुगून रागात म्हणाली/.... 


"ओ हो बायको ... कशी विसतेस ग तू... कालच तर लग्न झाली आपलं.... मग माझा हक्क आहे तो...." तो तिचा गाळ ओढत म्हणाला... पण तिने एखादा कीड झटकावा तसा त्याचा हात झटकला... 



"हे असं जबरदस्तीने ने केलेलं लग्न मी मानत नाही .... निदान या जन्मात तरी मी तुला माझा नवरा मानणार नाही समजलं.."ती त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली.... तो गालात हसला... 



"याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मी मी तुला नवरा म्हणून मिळावा हेच तू देवाकडे मागशील एक दिवस... बघाच तू...." तो तिच्या बोटात त्याच बोट अडकवत म्हणाला.... तिने लगेच हात झटकला.... 

"तू तर तिरस्कार करत होतास ना माझा... मग आता एवढं गॉड का बोल्ट आहेस,... आणि लग्न तरी का केलास माझ्याशी... एक मिनिट माझ्याकडून ती एक चूक झाली त्याचा बदल म्हणून तर तू लग्न केलं अंहिसा ना माझ्याशी.... मी सॉरी बोलले होते तुला... चुकून झालं होत सगळं... तू ते मनात धरून माझं आयुष्यच खराब केलंस..." ती आता डोळ्यात पाणी आणून म्हणाली... तिला त्याची पहिली भेट आठवली ... ज्यात तिच्याकडून एक चूक झाली होती... आणि आता त्याने त्याचा बदला म्हणून तिच्याशी लग्न केलं असं तिला वाटत होत.... 

"बायको आता भूतकाळ आठवून काही होणार आहे का... झालं गेलं सोड... आता आपण नवरा बायको आहोत हेच फक्त लक्षात ठेव...." तो हसत म्हणाला . 



"नवरा बायको... माय फूट.."ती रंगात म्हणाली आणि त्याला क्रॉस करून पाय आपटत बाथरूम मध्ये गेली.... 


ती गेली तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले .. आणि त्याचा चेहरा पूर्ण निर्विकार झाला... 

"मिस नंदिनी राणे ... भूतकाळ तर मी हि विसरलो नाही आहे.... पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन करतोय... नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच नुसकं आणि झालेला अपमान कधीच विसरत नाही...." तो स्वतःशीच न्हानला... आणि हातात वोच चढवून बाहेर निघून गेला... 






क्रमशः 



मग कसे वाटतायत नंदिनी आणि शौर्य तुम्हाला... 🙂🙂🙂🙂



खूप प्रश्न पडले असतील ना... शौर्य चा असं डब्बल रूप पाहून... तिच्यासमोरर प्रेम दाखवतो य आणि मागे राग ..... स्टोरी जशी पुढे जाईल तसे समजेल तुम्हला.... त्यामुळे वाचत राहा.....