Maher's saree in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | माहेरची साडी

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

माहेरची साडी

माहेर ची साडी ..**************बँकेत काम करताना जसे काम जबाबदारीचे असते तसेच रुटीन मध्ये काही गमती जमती पण घडत असतात .कामे तर चालूच असतात पण आपण पण त्या गमतींचा आनंद घ्यायचा असतो असाच एक गर्दीचा वार “सोमवार “बँकेत पाय टाकताच क्षणी समजते आज अगदी धुवाधार काम आहे ते ..हळू हळू कामाला सुरवात झाली ..अचानक गर्दी आणखीन वाढू लागली आता बँकेत अगदी मुंगी पण शिरायला जागा नव्हती मी प्रत्येक पैसे काढणाऱ्या स्लीप वरचे नाव वाचून पुकारा करीत होते तीच व्यक्ती पैसे न्यायला आलीय ना...कित्येक वेळा सहीऐवजी जर अंगठा केला असेल तर मात्र ती व्यक्ती खरेच आली आहे की नाही याची खात्री त्या व्यक्तीला समोर बोलावून करावी लागत असे त्यात या लहान गावात बरेच से “अंगठे “वाले .. होते मग तर नक्कीच व्यक्ती तीच आहे का ..ती पैसे कीती काढते आहे फार मोठी रक्कम असेल तर कशासाठी काढते आहे वगैरे त्याच व्यक्ती कडून वदवून घ्यावे लागते 

आमच्या कामाचा तो एक भाग असतो आणी बिनचूक पणां पण सांभाळावा लागतो 

अशीच एक मोठ्या रकमेची स्लीप समोर आली मी नावाचा पुकारा केला ..मावशी कुठे आहेत ..अंगठा केलाय ना ...आल्या आहेत का त्या ..?

मावशींचा मुलगा समोर आला .मॅडम आई आली आहे ती पहा मागे....असे म्हणून त्याने मागे बोट दाखवले  मी त्या गर्दीतून समोर पाहिले तर माणसांच्या गर्दीतून काहीच दिसत नव्हते

रक्कम मोठी होती म्हणून सावधगिरी साठी मी त्यांना म्हणाले अहो पण मावशी .तर दिसतच नाहीयेत  जरा पुढे बोलवा ना त्यांना ...

मुलाचा नाईलाज झाला ..कारण मावशींना पाहिल्या शिवाय पैसे काढायच्या स्लिपवर माझी सही होणार नव्हती 

खचाखच भरलेल्या गर्दीतून तो मागे गेला त्याच्या आईला आणायला ..त्याच गर्दीतून वाट काढत मग मावशी पुढे आल्या

.इतक्या गर्दीतून समोर बोलावल्या मुळे त्या थोड्या वैतागल्या होत्या थोड्या रागातच त्या म्हणाल्या

मी आलोय की

मीच तर अंगठा केलाय न्हव . आत्ताच.? 

मी शांत पणे विचारले ठीक आहे पण पैसे कीती काढणार आहात ?

ते पण लिवलाय ना स्लीप वर .. मावशी बोलल्या एव्हढ्यात मुलगा आईला दटावत म्हणाला ..आई दोन लाख रुपये काढायचे म्हणुन सांग ना मॅडमना ..

अपुन लिहून दिलय ना ..आणखी कशाला सांगायला हव ..? मावशींना बिनतोड सवाल...

आता मात्र मावशी खरेच वैतागल्या होत्या !!मला पण थोडे वाईट वाटले त्यांना खरेच त्रास झाला होता पण बँक प्रोसिजर नुसार मला जावे लागत होते मग मीच हसून म्हणाले ..अहो मावशी मी काय फक्त तुम्हाला पैसे कीती काढले हे विचारायला नाही काही बोलावले ..आणखी एका कामा  साठी बोलावले ..माझे हास्य पाहून मावशी थोड्या नरमल्या ..मग कशासाठी बुलवत  होता मला ?अहो मला आज तुम्ही नेसालेलो साडी  पहायची होती लांबून पण छान दिसत होती मस्त रंग आहे हो साडीचा ..!आवडला मला माझे बोलणे ऐकून मात्र मावशी खरेच खुष झाल्या ..आवडली तुम्हाला ..?अहो ही साडी मला माझ्या भावाने पाठवली बगा मला भाऊबीज झाली न्हव परवा ..भाऊ पुण्यात असतो बगा ..इतकी मोठी मोठी दुकाने आहेत  तिथ ..मी गेलो होतो तवा पायली व्हती त्यातल्याच यका दुकानातून घेतली म्हण त्याने !नंतर फोन बी आला हुता इचारायला त्येचा आवडली का म्हणुन श्यान..मावशी भावाच्या प्रेमात हरवून गेल्या ..मी स्लीप सही करून पुढे पाठवून दिली थोड्याच वेळात त्यांचा नंबर आला आणी कॅशियर ने त्यांना पैसे घ्यायला त्याच्या खिडकीत बोलावले त्यानंतर बँकेतल्या गर्दीमुळे त्या पैसे घेउन कधी गेल्या हे समजले नाही . नंतर माझ्या मनात आले खरेच साडी म्हणजे अगदी बायकांचा जिव्हाळ्याचा विषय त्यात “माहेरची साडी “..मग काय विचारता ..कुणाचाही राग पळून जाईल असाच नाजूक विषय होता तो !!त्यांना शांत करण्या साठी मी केलेली ही साडीची आयडिया कामी आली होती