भाग४
आज सकाळी डोळयांनी पाहिलेला तो खरा प्रसंग आणी हा प्रसंग जामिन आसमानाचा फरक होता...
आकाशात जऊळ आल्यासारखे काळ्याशार ढ्ग पसरले होते ,
त्या ढगांचा काळसर प्रकाश सर्व दिशेना , दुख, असुख, अशुभतेच मळभ पसरुन गेल होत ,
अवतीभवतीचे आवाज सर्वकाही थांबले होते , सर्वीकडे एक शांत निस्तब्ध विळक्षण वातावरण पसरल होत .
मोहिनीबाईंच्या नजरेला आपल्या पासून तीस मीटर अंतरावर पाठमोरी रिया दिसत होती..
तिच्या अगदी दहा पावळांपुढेच तेच ते दुपारी पाहिलेल काटेरी बोरीच झाड होत..
पण किती विचीत्र , झाडांची पाने पिकली होती, अशक्त झाली होती..
त्या बोरीखालीच,
अजुन कोणीतरी उभ होत..
रियाशी बोलत होत..
मोहिनीबाईंना एवढ लांबून सुद्धा तिचा चेहरा, वेष दिसला , जो त्या कधीच विसरणार नव्हत्या.
बोरीजवळ एक साडे पाच फुट उंचीची अंगकाठी
शरीरयष्टीची , काळ्या साडीतली म्हातारी उभी होती!
जिवंत होती की मृत ? हे पाहणारा लागलीच ठरवू शकला नसता ,
कारण तिचा तो सुरकूतलेला पिठासारखा चूना पोतलेला चेहरा- दोन्ही डोळ्यांखाली उमटलेली गडद काळसर वर्तुळे , त्यांत घारे चिंचोळे निर्जीव डोळे आणी विस्कटळेले पांढरे केस ..
हाता -पायांची वाढलेली धारधार नख, हे सर्व वर्णन पाहता , कोण म्हंणेल हा माणुस जिवंत आहे..!
ते भुत ,प्रेत ,पिशाच्छ, डाकिण, हडळ- जखीण श्रेणीतल्या ध्यानांमधलच हे एक ध्यान होत..
मोहिनीबाईंनी त्या म्हातारीला पाहता लागलीच ओळखल हे काहीतरी वेगळंच आहे -
पण तो पर्यंत फार वेळ झाला होता..
त्या म्हातारीने आपला एक हात हळकेच पुढे केला, त्या पांढ-या फट्ट हाताच्या , काळ्याशार धारधार नखांच्या पंज्यात ती हिरव्या रंगाची बोर होती..
" घे खा..घे खा...!"
त्या ध्यानाच्या तोंडून तोच तो खसखसता खर्जातला आवाज बाहेर पडला..!
ते ध्यान प्रेमाने बोलत असाव , पन त्या विधात्याने बनवलेल्या मानवी आवाजाची त्या ध्यानाला नक्कल करता येत नव्हती..
रिया चालत त्या म्हातारीपाशी चालत जवळ जाऊ लागली, मोहिनीबाई जागेवर उभ राहून सर्व काही पाहत होत्या..
रियाची झालेली हालचाल पाहता त्यांच्या मनात चर्र झाल, त्या तोंडातून ओरडू पाहत होत्या..रियाला नको घेऊस ती बोर अस ओरडून ओरडून सांगू पाहत होत्या...
पन घशातून आवाज काहीकेल्या बाहेर पडत नव्हता, घसा जणु बसला होता - मुक्यासारखी अवस्था झाली होती....
त्या बोरीजवल जाण्यासाठी जागेवरुन पाय ऊचलावे तर अंतरकाही केल्या कापत नव्हत..
कितीही चाळल तरी , त्या बोरीच अंतर तेवढच राहत होत..
रिया बकाबका ती हिरवी बोरे खात होती..पाहता पाहता तिच पोट फुगल गेल, आणी ती म्हातारी जागेवरच उड्या मारत नाचू लागली-
तीचा हसण्याचा चिरकस,किन्नरी ताळमिश्रित स्वरातला आवाज मोहिनीबाई कधीच विसरणार नव्हत्या..
आजही त्यांच्या कानांवर तो आवाज ऐकू येतो..
खाडकन मोहिनीबाईंनी आपले दोन्ही डोळे उघड़ले, बेडवर उठून बसल्या..-
पुर्णत चेहरा घामेजला होता, गळ्याला कोरड पडली होती-
छातीतले ठोके धडधड करत वाजत होते..
मनात भीतिची एक छोठीशी ठिंणगी पेटली होती,
खोलीत पसरलेला तो लाल रंग त्या भीतीत अजुनच भर घालत होता..
शेवटी मोहिनीबाई बैडवरुन उठल्या,
त्यांनी स्वीचबोर्ड मधल बटन दाबून ट्यूब पेटवली..खोलीत लक्ख असा प्रकाश पसरला..
प्रकाशामुळे भीतीचा उच्चांक हळुहळू कमी झाला ,
मोहिनीबाईंची नजर वेळ पाहण्यासाठी घड्याळावर पडली -पहाटेचे साडे सहा वाजले होते..
तेवढ्यात त्यांच्या मनात तो विचार आला पहाटे पडणारे स्वप्न म्हंणे खरे होतात..
मोहिनीबाईंनी कसतरी स्वत:ला समजावल आणी बैडवरुन उठल्या त्यांची रोज उठण्याची हिच वेळ होती ना..
मोहिनीबाई बैडवरुन उठल्यावर बाथरुम मध्ये गेल्या , अंघोळ वगेरे नित्यकर्म उरकता उरकता सव्वा सात झाले , मग साडे सात वाजता त्या किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवू लागल्या.., रिया - विशाल दोघेही साडे- आठ पर्य्ंत उठले ...
मग फ्रेश वगेरे होऊन -मुलांनी शाळेचे कपडे घातले..
मोहिनीबाईंनी तो पर्यंत त्या तिघांचेही डब्बे भरुन ठेवले होते साडे नऊ वाजेपर्यंत सर्वकाही झाल गेल..
आणि मग ,रिया, विशाल आपल्या आईसमवेत मारुती 800 गाडीत बसून शाळेत जाण्यासाठी निघुन गेले...
आजदिवसभर मोहिनीबाईंच्या नजरेसमोर पहाटे पाहिलेला तो स्वप्नच फिरत होता..
त्या स्वप्नाचा नक्की अर्थ तरी काय घ्यायचं , हेच मोहिनीबाईंना समजून येत नव्हत..!
अस म्हंणतात कधी कधी काही वाईट घड़ण्याच्या मार्गावर असेल तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो विधाता सतर्क करतो,धोक्याची चाहुल लावुन देतो - तसंच मोहिनाबाईंना त्यांच्या परिवारावर येणा-या संकटाची स्वप्नावाटे चाहुल तर मिळाली नव्हती..ना?
पन फक्त काहीच जण ती ओळखतात , व वेळीच त्या संकटावर.काहीतरी मार्ग काढतात..!
पन अचानक मोहिनाबाईंच्या विज्ञानावादी विचारांची भिंत मध्ये येत होती.. ही भुत,खेत सर्वकाही मनाची एक फसवी कल्पना आहे , आणी आपण पाहिलेला तो स्वप्न- कधीच खर होणार नाही!
जे कधीच सत्यात उतरणार नाही, हे असे विचार मोहिनीबाईंच्या मनात यायचे ..आले..
अस म्हंणतात की काही काही रोग असे आहेत की ज्यांवर वेळीच उपचार व्हायला हवा, नाहीतर एकदा का वेळ निघुन गेली , की मग त्या उपचाराच काहीच फायदा होत नाही - मग शेवट भयंकर मृत्युने होतो..
आणी मोहिनीबाईंच्या हातून जे व्हायला नको तेच झाल..!
पाहता - पाहता दिवस सरु लागले,दिवसाचे आठवडे झाले , आठवड्याचा महिना झाला..
रियाच्या मागे लागलेली ती म्हाता-या जखीणीची आनिष्ट शक्ति , त्या शक्तिने रियावर हळू हळू पुर्णत कब्जा मिळवला होता.
ह्या अश्या आनीष्ट ,मृत, तामसी, अघोरी, शक्तिंना घरात शिरण्यासाठी, घरातल्या सदस्यांची परवानगी हवी असते ,
जी रियामार्फत त्या म्हाता-या जखिणीला मिळाली होती.
बाळमनाच्या रियाने केव्हातरी असंच बोलता बोलता तिला आमच्या घरी ये अस म्हंटल होत..
आणी ती आली ही होती.
रियाच्या वागण्यात बदल होत होता..!
प्रथम बद्दल तिच्या त्या दोन मैत्रिणींना नव्या- पल्लवी दोघिंना जाणवला , जेव्हा रिया एकटीच त्या बोरीच्या झाडाजवळ उभ राहून रोज दिवसातून एकदा तरी हातवारे करत एकटीच बडबडत असायची..
नव्या -पल्लवी दोघींनिही जर कधी तिला विचारल की रिया तू कोनाशी बोलतेस ग ..तर तेव्हा रिया म्हंणायची बोरीजवळच्या आज्जीशी बोलते..
त्या मला बोर सुद्ध खायला देतात..
नव्या-पल्लवी दोघिनाही रियाच वागण फारच विचीत्र वाटायचं, तर कधी कधी विळक्षण मन हादरवून टाकणारी भीति वाटायची..शेवटी नव्या - पल्लवी दोघिनीही रियाशी बोलण कमी केल..
नव्या- पल्लवी दोघींनी एकवेळ रियाच्या आईला म्हंणजेच मोहिनीबाईंना रियाच्या ह्या विळक्षण बदलाव बद्दल सांगितल सुद्धा होत..
पण त्या लहान मुलींच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार होता..
आणी एकेदिवशी रात्री तर हद्दच झाली विशाल रात्री दिड वाजता बाथरुमला जाण्यासाठी उठला तर त्याला त्याच्या आईच्या कुशीत रिया दिसली..
खोलिचा दरवाजा तसाच सताड उघडा होता..
हॉलमध्ये दिवा पेटला नसल्याने,हॉलमध्ये गड़द अंधार होत..
त्या अंधारात पाहता काहीतरी डाविकडून उजवीकडे चालत फिरत्ं अशी जाणिव होत होती..
विशालने घाबरतच आपल्या आईला उठवला
रियाला पलंगावर नाही, खोलीचा दरवाजा सताड़ उघडा आहे हे पाहून मोहिनीबाई लागलीच हॉलमध्ये आल्या..
क्रमशः