Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 29 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 29

The Author
Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 29

भाग३

        त्याच वाहणा-या पांढरट धुक्यात , की धुरात ?  त्या म्हातारीची आकृती अचानक धुक वाढ़ुन अचानक अंधुक अंधूक व्हायची, मग पुन्हा जस धुक कमी व्हायचं ती म्हातारी डोळ्यांना नजरेस पडायची .

    त्या म्हातारीला अस अचानक अवतरलेल पाहून रियाला थोडस आश्चर्य वाटलं ..! 

    " अहो आज्जी , तुम्ही कधी आलात..!  "
रियाने विचारल.
       रियाच्या बाळमनाला हे प्रश्ण पडणे साहजिकच होत.

        कारण काहीवेळा अगोदर बोरीजवळचा सर्वभाग रिकामा होता ना? तिथे तर कोणीच नव्हत ..ना? नक्की नव्हत ना ? ती म्हातारी कोठून आली ? कशी आली ? की अवतरली? कोणिही काहीच पाहिल नव्हत.!   

      " मी ईथंच ह्या बोरीच्या झाडाजवळ असते!"
             रियाच्या प्रश्नावर ती म्हातारी म्हंटली, पन तीचा आवाज - फारच विलक्षण होता , खोकला झाल्यावर  खोकतांना घशातून कशी  खरखर बाहेर पडते तसा तो खवखवता खर्जातला आवाज होता.. 

     त्या म्हातारीच उत्तर रियाच्या बाळमनाला काही 
   पटल नाही , तस तीने पुन्हा विचारल..

        " मग आम्हाला मगाशी का नाही दिसल्या तुम्ही , माझ्या दोन मैत्रिणी ईथेच उभ्या होत्या ना , तेव्हा कुठे होतात तुम्ही..?"  रियाच्या वाक्यावर ती म्हातारी पुन्हा खवखवत्या आवाजात म्हंटली.

        " मी ईथे बोरीच्या झाडामागे लपले होते ,म्हंणून तुम्हाला दिसले नाही - पन मी  तुमच बोलण ऐकल  - तुला बोर खायचीत ना?"  त्या म्हातारीच्या वाक्यावर लहानग्या रियाने हळकेच ओठांवरुन जिभ फिरवली..

       तसे म्हातारीने  हळकेच आपला एक हात पुढे केला ,  

        तिच हात  प्रेतासारख पांढरट होत ,त्याच हातावरुन काळ्याशार रक्त सुकलेल्या नसा ठळकपणे दिसत होत्या , 

        हाताच्या पाचही बोटांची नख कालिशार   होती
आणी त्याच  हाताच्या तळव्यावर हिरवी- हिरवी न पिकलेली बोर  होती..  

        पाच - सहा सेकंद रिया फक्त त्या  बोरांकडेच पाहत होती.. 

        तिच्या बाळमनाला ती बोर खायची खुप इच्छा झाली होती.. 

        " अंग घे ना , तुझ्यासाठीच खुडली आहेत .!" 
  त्या म्हातारीचा खवखवता आवाज आला.. 

        रिया चालत त्या म्हातारीपाशी पोहचली,  
पन तिच्या पुढे पडणा-या प्रत्येक पावळासरशी  जस की मांस कुजत आहे असा घाणेरडा दर्प नाकांत शिरत होता..  
            रिया बोरीच्या सावलीत आली, तसे अंगाला एक विळक्षण असा गारवा झोंबला , ही थंडी जणु निसर्गाने बनवलीच नव्हती , हे परिसरच काहीसे वेगळी  अनुभुती करुन देत होत ..

        रियाच्या बाळमनाला हे समजण, किंवा मनात हा प्रश्ण येण कठीण होत , की दूपारच्या उन्हात सुद्धा ईथे ईतका गारवा कसा ?   

        रिया त्या  म्हातारीच्या जवळ आली, तीन फुट उंचीची रिया आणी साडे पाच फुट उंचीची ती म्हातारी.. होती..

        रियाने एकवेळ त्या म्हातारीच्या चेह-याकडे  वर  पाहिल, तिच्या डोक्यावर घेतलेल्या पदरामुळे खालची हनूवटी, आणी काळेशार ओठ सोडले तर सर्व चेहरा  अंधारात होता.. 

        काळेशार ओठांवर एक  मंद हसू होत.. पन त्या हास्यात चांगूलपणा मुळीच नव्हता .. 

       एक कप्टी हेतू साध्य होत असतांना जस एका नराधमाच्या चेह-यावर हसू याव तस ते हसू होत..

        रियाच्या मम्माने सांगितल होत , की अनोळखी
मांणसांकडून काहिही घ्यायचं नाही, पन रिया त्या बोरांना पाहता ते सर्वकाही विसरलीच होती.. 

        त्या बोरांना पाहता तिच्या तोंडाला पाणि सुटल होत.. 

         रियाने हळुच आपला हात वाढवला ,  त्या म्हातारीच्या हातावर असलेल्या बोरांतून काही बोर उचल्ली...

       " खा ..... खाऊन  बघ , खाऊन बघ..!" 
त्या म्हातारीच बोलतांना तोंड उघड़ल , तोंड़ उघड़ताच आतले तोंडातले ते काळेशार किडलेले  दात दिसले ..
     जिभेचा रंग सुद्धा विषारी , निळसर होता..

      रियाने दोन बोटांच्या चिमटीत एक हिरव बोर पकडल, व तोंडात टाकल, लहानसर दातांनी चावल, खाऊन टाकल.. 

        बोराची चव जराशी कडवट, आंबट लागली..
एकक्षण डोळ्यांभोवती अंधारुण आल, पन ही संवेदना काहीसेकंदच जाणवल... 

        नक्कीच त्या बोरात काहितरी होत..! 

        
        रियाने बोर खाल्ल हे पाहताच त्या म्हातारीच्या तोंडावर एक कुत्सिक हसू उमटल  हेतू श्राद्ध झाल्यासारख ती काळेशार दात काढुन हसत लागली.
       
      ....

        " रियू.....!"  अचानक रियाच्या कानांवर  दुरुनच 
   एक ओळखीची हाक आली.. 

        तीने मागे वळून पाहिल, जरा दुरुन मोहिनीबाई चालत तिच्याच दिशेने येत होत्या.. 

        मोहिनीबाईंना पाहून त्या म्हातारीच्या काळसर ओठांवर घृणास्पद भाव उमटले..! 

        हिंस्त्र श्वापदाच्या शिकारी आणी सावजाच्या मृत्युच्या खेळात  जेव्हा सावज सुटत , तेव्हा जो हिंस्त्र श्वापद चवताळतो,  तसेच काहीसे भाव त्या म्हातारीच्या चेह-यावर होते.. 

        रियाने एकवेळ आपल्या मम्माकडे पाहिल.. .मग 

        "मम्मा..! 

         आज्जी..!" 
रियाने त्या म्हातारीला आपल्या मम्माशी भेट घडवूण आणावी , ह्या हेतूने समोर वळून पाहिल , पन आता तिथे कोणिही नव्हत , बोरीच ते स्तब्ध उभ  झाड़ एकटच तिथे उपस्थीत होत..

       "रिया? बाळा शाळेची सुट्टी संपून शाळा  भरलीये ना ? मग तू ईथे काय करतेस बर ? आणी एकटीच कोणाशी बोलत होतीस..!"  मोहिनीबाईंनी विचारल.

        "मम्मा मी एकटी कुठे होते , ईथे एक आज्जी होत्या..- हे बघ..त्यांनी मला बोर खायला दिली..!" 
रियाने हातातली हिरव्या रंगाची बोर दाखवली..

        मोहिनीबाईंनी एकवेळ  त्या बोरीच्या
झाडाकडे पाहिल,काळ्याशार पातळसर खोडाच ते साडे आठ फुट उंचीच  झाड होत,  

            बोरीच्या काटेरी फांद्या , त्यांना हिरवी हिरवी नुकतीच उगवलेली बोर लागली होती.. 

       आणी एका फांदीला एक दोरी बांधलेली होती..
    जस की कोणितरी फासच घेतल असाव..

     त्या बोरीच्या झाडाकडे जास्त लक्ष न देता मोहिनीबाईंनी रियाला अनोळखी मांणसांकडून काही घ्यायचं नाही , आणी खायचं तर नाहीच नाही, अस पुन्हा दरडाऊन सांगितल , म्हातारीने दिलेली बोर 
मोहिनीबाईंनी रियाला तिथेच टाकायला सांगितली..

   मोहिनीबाई जरा रागात बोलल्या होत्या, रियाला आपल्या मम्माच राग माहिती होत, तिने गपचुप ती बोर तिथे जमिनीवर टाकुन दिली... 

व  मोहिनीबाई,रिया दोघही पुन्हा शाळेत आल्या..
पण मोहिनीबाईंना हे ठावूक कुठे होत , की रियाने त्या बोरांमधल एक बोर खाल्ल आहे ते.. 

         रियाला  आपण ती बोर खाऊन स्वत:वरच नाही तर तिच्या परिवारावरही एक अनाहूत, संकटाला ओढ़ावून घेतले आहे ह्याची कल्पना नव्हती

        पाहता - पाहता शाळेची वेळ संपून गेली ,   
पाच वाजता   " टंग,टंग " असा टोळ  पडला शाळा सुटली गेली.. 
       प्रत्येक वर्गातून पक्ष्यांच्या थव्यासारखे विद्यार्थी बाहेर पडले..

        कॉलेजच्या गेटबाहेर  चार , पिवळ्या रंगाच्या
बस उभ्या होत्या ! 

        काही काही मुलांचे पालक टू-व्हीलर ,फ़ौर व्हीलर, रिक्षा असे काही काही वाहन घेऊन आपल्या मुलांना घरी नेहायला आले होते.. 

        रियाने आपल्या दोन मैत्रिणींना नव्या-पल्लवी 
दोघिनाही बसमध्ये जातांना बाय - बाय केल.. 

        आणी ती आपल्या मम्मीच्या मारुती 800 
मध्ये येऊन बसली.. !   

        मोहिनीबाई शिक्षिका असल्याने अजुन आल्या नव्हत्या- 
       त्यांना अजुनतरी अर्धातास यायला लागणार  होणार होता..!  
    रिया नेहमीप्रमाणे मागच्या सीटवर खिडकीशेजारी बसली होती.. !   

   तीने खिडकीतून बाहेर पाहिला
   तीचा विशाल दादा आपल्या मित्रांशी गप्पागोष्टी करत गाडीच्याच दिशेने येत होता.. 

     तेवढ्यात रियाची नजर जरा दुर शाळेच्या मागे मोकळ्या मैदानात गेली,  जिथे तीच ती काळ्या लुगड्यातली , त्याच लुगड्याचा डोक्यावर पदर घेऊन 
उभी ती म्हातारी उभी दिसली ,  

        रियाने त्या म्हातारीला पाहून लागलीच आपला हात वर केला - आणी तोच हात जोरात हळवत टाटा केला... 

        गाडीचा दरवाजा उघड़ल्याचा आवाज 
   झाला , त्या आवाजाने रियाने वळून समोर पाहिल..  तीचा  विशाल  दादा आत येऊन पुढच्या सीटवर बसला.. होता.. 

            " रियू ..कोणाला टाटा करतेस..!" 
विशालने विचारल.  त्यावर तिने पुन्हा वळून समोर  पाहिल,  ग्राऊंडवर ती काळ्या साडयातली म्हातारी तशीच उभी होती... 

  हळकेच एक वा-याची  झुळुक आली,  त्या म्हातारीच्या भोवतून पूढे निघुन गेली- 
      पण ती झुळुक जाताच तिथे आता कोणिही नव्हत..! 

        दूर दूर पर्यंत पसरलेला मैदान आणी ते दुर उभ बोरीच झाड फक्त नजरेस पडत होत.. 

मग काहीवेळाने  मोहिनीबाई आल्या, आणी रिया विशाल  घरी निघून गेले.. ! 

       घरी येऊन मोहिनीबाई ,रिया,विशाल तिघेही फ्रेश झाले ! मग मोहिनीबाईंनी जेवण बनवल , साडे आठ पर्यंत जेवण झाल, आणी  भांडी वगेरे घासून  साडे नऊच्या सुमारास सर्वजन झोपी गेले.. 

        हॉलमध्येच किचनच्या पूढे डाव्या बाजूला एक खोली होती.. 

        खोलीत एक मोठा बैडशीट होता , त्यावर
     मोहिनीबाई आपल्या दोन्ही मुलांसोबत झोपल्या होत्या .. 

        खोलीत एक लाल रंगाचा झिरोचा बल्ब पेटला होता ..

       त्याच बल्बचा लालसर रक्तातळेलेला प्रकाश खोलीत भेसूरपणे पडला होता.. 
   
  लाल रंगाच्या प्रकाशात , खोलीतल्या भींती जणू रक्ताने रंगवल्या सारख्या भासत होत्या.. 

   भिंतीवर एका कोप-यात गोल घड्याळ अडकवल होत..

        रात्रीच्या  चिडीचूप शांत वातावरणात  घड्याळाच्या सेकंद काट्याचा एका लयीत टक,टक, असा भयंकर आवाज होत होता..

      दिवसभर काम करुन मोहिनीबाई शांत सुस्तपणे झोपल्या होत्या , 

        त्यांच्या बंद डोळ्यांच्या पापण्यांआड, मेंदूमार्फत एक फुटेज प्ले होत होती.. 

        ज्यालाच आपण स्वप्न म्हंणतो , मोहिनीबाईंच्या बंद डोळ्यांआड  काळ्या पडद्यांवर आज दुपारी घडलेला बारा वाजेचा तोच प्रसंग दिसत होता..

पन किती वेगळा, 







क्रमशः