Two experiences in Marathi Classic Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | दोन अनुभव

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

दोन अनुभव

आपण आयुष्यात अनेक माणसांना भेटत असतो वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळी माणसे संपर्कात येत असतात तुमच्या चार गोड शब्दांनी किंवा तुमच्या आनंददायी सहवासाने सुद्धा माणसे तुमच्याकडे आकृष्ट होत असतात 😊मात्र अशी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडून त्यांना पोचली पाहिजे . 😊💕मध्यंतरी नागपूरला टुर साठी गेलो होतो . एक बुद्ध मंदिर पाहायला वर्ध्याला गेलो दुपारी बारा एकची वेळ ऊन नुसते तळपत होते त्यात ते नागपूरचे ऊन एसी गाडीत सुद्धा ते आम्हाला दमवत होते !!😃देवळात शिरताना सहज बाजूला लक्ष गेले आणि मन प्रफुल्लित झाले 💕आत एक बाग होती आणि मधोमध एक मोठे तळे अबोली रंगांच्या कमळांनी भरलेले होते🙂🙂आदल्याच दिवशी अशा कमळांचा पॉट एके ठिकाणी पाहिला होता मी ..  तेव्हाच हा रंग खुप भावला होता !!माझ्या घरी कमळ तळे असल्याने मला कमळा विषयी फारचआकर्षण आहे . असे वाटले निदान इथे एखादा मस्त फोटो तरी काढावा पण जागा तारे च्या कंपौंड मध्ये बंदिस्त होती तिथे बाहेरची व्यक्ती  जाऊ शकत नव्हती मन थोडे खट्टू झाले .. पण ठीक आहे अहो ना मी म्हटले सुद्धा .."इथे मस्त फोटो काढत आला असता नाही का .. किती सुंदर रंग आहे कमळाचा "अहो म्हणले .."बरोबर आहे पण त्यांच्या नियमात बसत नाही ना .."असो  .आम्ही चप्पल काढून आत गेलो देऊळ पाहून बाहेर पडलो तेव्हा बाहेर व्हरांड्यात एक मावशी जेवायला बसल्या होत्या बहुधा तिथल्या केअर टेकर असाव्यात . त्यांनी माझ्याकडे पाहिले .. मी आपली नेहेमीच्या सवयीने तोंड भरून हसले 😊😊कोणाशीही पटकन आपुलकीने बोलणारा माझा स्वभाव असल्याने मी त्यांना म्हणाले .. "काय मावशी जेवण चालले वाटते होउद्या सावकाश . "मावशी खुश झाल्या .." या की तुमी पण वाईच भाकरी खा आमच्या सोबत" असे बोलल्या . मी हसून नकार दिला मग थोड्या त्यांच्या सोबत सांसारिक गप्पा विचारपूस वगैरे केली  मावशीना थोडे अप्रूप वाटले असावे शहर गावातील एक फ्याशनेबल ,मोठ्या गाडीतून आलेली बाई आपल्यासोबत इतक्या सलगी ने बोलते . मग आम्ही तेथून बाहेर पडलो आम्ही चप्पल घालत होतो तोवर परत मावशी नी हाक मारली आम्ही वर पाहिले त्या जवळ आली आणि मला म्हणाल्या ताई तुमासनी या कमळा सोबत फोटू काडायचा होता न्हव या हकड,,असे म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला बागेचे कुलूप काढायला लावले आणि आम्हाला आत जायला दिले काडा तूमाला हवे तितके फोटू असे म्हणून त्या तिथून बाहेर पडल्या दोन मिनिटे आम्हाला काय झाले समजले नाही मग मात्र आनंदाने आम्ही तिथे मनसोक्त फोटोग्राफी केली ,,,🙂💕जाताना त्यांचे आभार मानून त्याना बागेचे कुलूप लावून घ्यायला सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला . चार गोष्टी आपण होऊन बोलल्याने इतका फायदा झाला होता बाहेर पडलो तरी मन थोडे लगेच समाधान पावणार होते 😃मनात आले यांचे कंद कुठून तरी मिळवायला हवेत नाही कुठून कसे वगैरे सध्या तरी माहीत नव्हते . यानंतर काही महिन्यानंतर कुर्ग टुर ला गेलो होतो एका मिलिटरी रिटायर्ड माणसाची तिथे मोठी मसाल्याची बाग होती ती पाहायला गेलो होतो गेल्या गेल्या खास कॉफी ने स्वागत झाले 🙂कॉफी पिता पिता सहज नजर टाकली इकडे तिकडे तर काय तिथे तसलीच अबोली कमळे एका पॉट मध्ये पाहायला मिळाली ओळख ना पाळख त्यांच्याकडे कसे कंद मागणार होते . फक्त त्यांना मी इतकेच म्हणले मला ही कमळे खूप आवडली माझ्याकडे तर मोठे #कमळ #तळे आहे गुलाबी रंगाच्या कमळाचे बोलता बोलता सहज मोबाइल मधील आमच्या कमळांचे फोटो पण दाखवले त्याना पण मस्त वाटले फोटो बघताना मग मसाल्याची बाग पाहता पाहता आमच्या खूप गप्पा पण झाल्या बाहेर परत पूर्वीच्या जागी आलो त्यांचे पैसे दिले आणि आम्ही निघणार इतक्यात त्यांनी आम्हाला थांबवले आणि घरातून त्यांच्या पत्नीला हाक मारली व कमळाचे कंद काढून द्यायला सांगितले मला तर नवलच वाटले .. मी तर मागीतलेही नव्हते मग तेच म्हणाले .. तुमची कमळाची आवड मला समजली आणि तुमच्या दोघांचे मनमोकळे स्वभाव पण आवडले . म्हणून हे कंद मीच आपणहून तुम्हाला देतोय तुमच्या तळ्यात लावायला . खूप आनंद वाटला मला त्यांचे खूप आभार पण मानले मी ,🙏आम्हाला कोल्हापूरला परतायला अजून दोन दिवस होते प्रवास पण बराच होता . म्हणून त्यांनी अगदी निगुतीने प्लॅस्टिक च्या पिशवीत थोडे पाणी थोडी माती घालून ते कंद दिले . सर्व प्रवासात ती पिशवी अगदी जिवापाड सांभाळली आल्या आल्या ते कंद आमच्या तळ्यात सोडले आता बघू कधी त्याला ती अबोली कमळे लागतात ते . 😊😊थोडक्यात काय माझ्या मनातल्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या😊