Amti of vegetables in Marathi Cooking Recipe by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | भज्यांची आमटी

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

भज्यांची आमटी

भज्याची आमटीहा एक अत्यंत चविष्ट आणि खमंग प्रकार जो भात भाकरी किंवा पोळी कशा सोबतही चांगला लागतो भज्याची आमटी म्हंटले की कॉलेज चे दिवस आठवतातया आमटीची ही चवीष्ट आठवण सांगितल्या खेरीज ही कृती पुरी होत नाहीं 🙂माझ्या मैत्रिणीची आई ही आमटी अतिशय चवदार करीत असेज्या दिवशी मैत्रीणीकडे या आमटीचा बेत असेत्या दिवशी सकाळी ती आमच्या खास ग्रूप मधील आम्हा दोघी  मैत्रीणीना सांगत असे ..आज दुपारी आपण तिघी एकत्र माझ्याकडे जेवायचे आहे बर का..आज आई भज्याची आमटी करणार आहे🙂🙂साधारण महिन्यातून दोन वेळ तरी तिच्याकडे हा बेत असेच..कारण तिच्या घरच्या सर्वानाच ही आमटी अवडत असे..मैत्रिणीने असे सांगितल्या क्षणा पासून कॉलेजमधले आमच चित्त उडून जात असे 😀😀पोटात एकदम भुकेने खड्डा पडत असे😀कधी एकदा हे कॉलेज चे पिरियड संपतील असे होत असे..😀यथावकाश कॉलेज सुटल्यावर लगबगीने आम्ही तिच्या घरी जायचो तिच्या घराच्या गल्लीत शिरले की आमच्या नाकात कांदा भज्यांचा आणि खमंग आमटीचा वास शिरत असे 😋एव्हाना साडे अकरा बारा वाजलेले असतआमची जेवायची वेळ झालेली असे.,. त्यात हा खमंग भज्याची आमटी चा बेत😋😋ताबडतोब आम्ही हात पाय घुवून तिच्या स्वयंपाक घरात शिरत असुचुलीपाशी (तसा घरी गॅस होता पण भाकरी नेहेमीच चुलीवर होत) तीची आई भाकरी थापत बसलेली असेआम्हाला बघताच सुहास्य मुद्रेने, प्रेमाने ती म्हणायची ,"या ग पोरीनो भुकेजला असाल ना..(आम्ही तर कायम भुकेले असायचो च 😀)चला पटपट पाट पाणी घेउन बसा बर जेवायला "लगेच आम्ही पाट, पाणी ताटे ,वाट्या ,लोणच्याची बरणी ,तूप वगैरे सरंजाम गोळा करून चुलीच्या समोर गोलाकार बसायचोत्यांच्या स्वयंपाकघरात थोडा अंधार असायचादुपारच्या वेळी खिडकीतुन येणाऱ्या मंद प्रकाशात आणि चुलीच्या उजेडातदोन्ही हातानी परातीत भाकरी थापत असलेल्या तिच्या आईचा सावळा सोज्वळ चेहरा चमकत असायचा❤️जोरात भाकरी थापत असताना त्या आवाजाच्या तालावर त्यांच्या केसांचा भरगच्च अंबाडा हलका झोके घेत असायचा ....जवळच एका वेताच्या टोपलीत चार पाच तयार भाकरीची चळत असेशेजारच्या चुलीवर मोठया पातेल्यात आकर्षक रंगाची चाविष्ट आमटी उकळत असायची ..वासाने भूक आणखी खवळायची 😋एका मोठ्या परातीत कांद्याची छोटी छोटी भजी तयार असतशेजारीच मोठे गरम भाताचे तपेले असे (तिच्या घरात बरीच माणसे होती त्यामुळे   तिच्या आईला  नेहेमीच भरपुर स्वयंपाक करायला लागे)आमच्या वाटीत गरम आमटी वाढून ती चार चार भजी आमच्या ताटात वाढत असे "ही घ्या गरम भाकरी ...असे म्हणत ती आम्हाला भाकरी वाढत असे गरम टमटमीत फुगलेली भाकरी तव्यावरून काढताच ती उलथन्याने त्याचे चार चतकोर करीत असेआणि पानात वाढत असे( भाकरीचे कोर हाताने न करता उलथन्याने करायची  तिची ही सवय बघून बघून मला पण लागलीय 🙂)सोबत एक एक पापड पण भाजुन देत असे भाकरीचा कोर उघडुन आम्ही त्यात तूप घालून घेत असूवाढलेल्या आमटीत दोन भजी टाकून जेवणावर तुटून पडत असू..ती भाकरी पातळ पण आकाराने खुप मोठी असेआम्ही तशा अठरा एकोणीस वयाच्या मुली ....आमच्यासाठी एक भाकरी, चार भजी पापड ,लोणचे इतके भरपुर होत असे..पोट गच्च भरत असे.  तिची आई भाकरी करता करता... "अजुन वाढू का ग अर्धी.."असे हसून म्हणत असे..तेंव्हा आम्ही "नको नको काकू पोट गच्च भरले आहे" असे म्हणत असूतरीही ती आम्हाला भात वाढत असे"पोरीनो थोडा थोडा भात खाऊनच उठायचे बर का.."असा आग्रह करीत असे..🙂🙂"काकू आमटी नेहेमी प्रमाणेच फर्मास झाली होती बर का..."फार आवडली...असे आम्ही म्हणताच "काय ग तुम्ही पोरी एवढ एवढस जेवता... आमटी आवडली ना..पुन्हा केली की यायचं बर का.."असे ती आमच्याकडे बघत कौतुकाने म्हणत असे❤️अशा वेळीं तिच्या हसऱ्या समाधानी चेहऱ्याकडे बघताना आम्हाला साक्षात अन्नपुर्णा देवीच आमच्याशी बोलत असल्याचा भास होत असे🙏चवदार स्वयंपाकामुळे मन आणि पोट तृप्त असे 😋आता पोट भरल्याने डोळ्यावर एक झापड यायला लागलेली असे ...पटापट ताटे,भांडी,खरकटे उचलून आम्ही वरच्या खोलीचा रस्ता धरत असू  एकमेकींशी बोलता बोलता वरच्या खोलीत सतरंजीवर लोळताना आमचा कधी डोळा लागला कळत नसेतीन चार वाजल्या नंतर आमचे डोळे उघडल्यावर..आमची मैत्रीण आमच्यासाठी चहा टाकत असेया वेळी घरच्या सगळ्यांचा जेवणाचा राम रगाडा आवरून चार घास खाऊन नुकताच तिच्या आईचा डोळा लागलेला असे त्या माऊलीचा बाहेरून निरोप घेऊनचहा घेउन मग आमचे आमच्या घराकडे प्रस्थान होत असे   अशी ही भज्याची आमटी किती वेळा केली तरी तिच्या आईची आठवण होतेच❤️अत्यंत साध्या पद्धतीने केलेली ती आमटी किती चवदार लागत असे..आणि आपण किती निगुतीने केली तरी ती अवीट चव मात्र आणू शकत नाहीहे सुध्दा जाणवते ..🙂नेहेमी मैत्रीणीकडे खाऊन आणि बघुन ही आमटी मी अगदी तीची आई जशी करीत असे त्याच साध्या सोप्या पद्धतीने करते साहित्यभज्या साठीचार कांदे डाळीचे पीठतिखट हळद मीठभरड कुटलेले धनेकोथिंबीरआमटी साठीएक वाटी शिजवलेली तुर डाळतिखटमिठकाळा मसालाकढीलिंब गुळचींचओले खोबरे कोथिंबीर प्रथम मध्यम आकाराचा कांदा (फोटोत दाखवला आहे) चिरुन घेणेकांद्याला मीठ हळद तिखट चोळून दहा मिनिटे ठेवणेकांद्याला पाणी सुटतेमग त्यात धने पुड कोथिंबीर घालूनडाळीचे पीठ घालावे फार घट्ट अथवा फार पातळ पीठ नकोयाची छोटी भजी तळून घ्यावीआता नेहेमीप्रमाणे शिजवलेली तूर डाळ घोटूनमोहरी हिंग कढीलिंब फोडणी करून त्यात घालावीकाळा मसाला,तिखट, मीठ, गुळ चींच घालूनआमटी करावीउकळू लागली की थोडे खोबरे कोथींबीर घालावीखाताना वाटीत ही दोन भजी घालूनवर गरम आमटी घालावी व खावीभजी आमटीत सोडायची असली तर आमटी थोडी पातळ असावी ..आमटी गॅस वरून खाली उतरवून मग त्यात भजी सोडावी व लगेच खायला घ्यावीही आमटी आपापल्या आवडीप्रमाणे वाटण लावून किंवा आपल्या आवडीच्या प्रकाराने सुध्दा करता येतेपण जेवढी आमटी साधी तेवढी त्यात या कांदा भजीची चव उतरेल🙂