Kshama - 5 - Last part in Marathi Crime Stories by Harshad Molishree books and stories PDF | क्षमा - 5 (अंतिम भाग)

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

क्षमा - 5 (अंतिम भाग)

विजय.... नमन कडे आला, नमन एका कोपऱ्यात बसला होता, विजय ने नमनला सहज पणे विचारलं.....

"हत्या करून तू घरातून किती वाजता पडालास".......???

नमन हे ऐकून उठला.... तो विजय पासून नजर चोरायला लागला, त्याचा कपाळाला घाम फुटला

"मला लक्षात नाही"..... नमन थोडं घाबरत बोलला

"लक्षात नाही.... बर लॉजला किती वाजता पोचलास हे तरी लक्षात आहे की विसरलास"..... विजय खंबीरपणे बोलला

नमनचा चेहरा पूर्ण घामाघूम झाला होता..... त्याला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं

"नसेल तुला लक्षात"..... म्हणत विजय ने लांब स्वाश घेतलं, "तू लॉजला दुपारी साडे अकराला पोचलास..... जे तुझा घरा पासून दिढ तास लांब म्हणजेच घरातून तू जवळ पास दहा वाजता निघाला अशील..... काय बरोबर ना, आठवलं काय".....

नमन खाली मान टाकून उभा होता त्याला काहीच सुचत नव्हतं.... तो मनातल्या मनात विचार करत होता की काय करू काय काय बोलू......

"ज्या सूरी ने तू म्हणतोय की हत्या केली त्या सूरी वर कोणाचे बोटांचे ठसे भेटलेच नाही..... जर का तू हडबडीत तिथून पळून गेलास इतकी ती हडबड की तुला तुझी मुलगी घरात आहे हे सुद्धा लक्षात नाही राहील पण मग सूरी वरचे बोटांचे ठसे बर तुला साफ करायचा लक्षात रहायलं".....

विजय ने एक मोठा स्वाश घेतला आणि नमनला मान वर करायला सांगितलं..... नमनला आता प्रश्न पडला होताकी विजयला खरं काय ते कळलं तर नाही ना........????

विजय..... परत बोलला "दुसरं हे की, तू कथा तर उत्तम तयार केलीस नायका, पण तुझा या कथे मध्ये ना भरपूर ना अशे छोटे मोठे gaps आहेत..... जे तू नीट भरले नाहीस. नमन तुझ्या रिपोर्ट च्या हिशोबाने तुझ्या बायकोची हत्या सकाळी साडे दहा वाजता झाली आहे तेच विहान ची हत्या दुपारी ३ वाजता दोघांन मध्ये भला मोठा अंतर आहे".

"इतकं वेळ तुझी मुलगी झोपूनच होती आणि जर तू साडे अकराला लॉजला होता तर मग विहानला कोणी मारलं..... हे बघ नमन मला येवढ कळलं आहे की हत्या तू नाही केलीस मी तुला वाचवू शकतो, अजूनही वेळ आहे तुझाकडे खरं काय ते सांगून टाक तुला आणि तुझा मुलीला काही नाही होणार"......

"नमन पटकन बोलला मीच हे हत्या केली आहे साहेब हेच खरं आहे आणि असच असुद्या, तुम्हाला हवी ती शिक्षा देया मला, फासी देया चालेल मला म्हणत नमन जोर जोरात रडायला लागला".....

विजयला आता खात्री पडली की त्यांनी चुकीचा माणसाला धरून ठेवलं आहे.... या हत्याकांड च्या मागे नेमकं दुसरच कोण तरी आहे..... विजय परत एकदा क्षमाला भेटायला सुलेखाच्या घरी आला..... सुलेखा सोबत युक्तिवाद केल्यानंतर शेवटी सुलेखा ने क्षमा सोबत बोलायला विजयला परवानगी दिली.....

********

नमन नेमकं त्या दिवशी जेव्हा घरातून सामान घेऊन निघाला..... विना नेमकं त्याच वेळीस शामला घेऊन घर सोडून जाणार होती..... नमनला हे माहित होतं म्हणून नमन कामाला ना जाता जाऊन त्या लॉजला थांबला, नमन गहन विचारात पडला होता, विनाला तर गमावलं आहे, पण क्षमाला त्याला गमवायचा नव्हतं.... त्याने मनातल मनात ठरवलं की आज विना क्षमाला घेऊन निघून जाणार मग उदया घरी जाऊन त्याने या आयुष्याला संपवायचं ठरवलं, या आधी त्याला विना आणि क्षमाला खूप काय सांगायचं होत की त्याचं मनात त्यांचसाठी किती प्रेम आहे, पण आता वेळ निघून गेली होती.

विना ने खूप समजवून सांगितल्यावर सुद्धा क्षमाला नमन कडेच रहायचं होत.... जेव्हा विना ने क्षमा सोबत जबरदस्ती केली..... तेव्हा क्षमा विनाला बोलली....

"आई मला हे स्वप्न अजिबात नाही बघायचं, मला बाबा कडे जायचं आहे".....

"बाळा हे स्वप्न नाहीये आपण खरंच बाबा कडेच चाललोय"...... विना थोडं चिडक्या आवाजात बोलली

"नाही तूच बोलली होतीस हे स्वप्न सगळं जे घडतंय स्वप्न आहे..... मला हा स्वप्न नाही आवडलं मला हा स्वप्न मोडायची आहे".... म्हणत क्षमा धावत स्वयंपाक घरात पडून गेली....

विना ने जोरात क्षमाला हाक मारली पण क्षमा थांबली नाही, विना तिकडंच बसून रडायला लागली...... तेव्हाच क्षमा मागून धावत आली आणि विनाच्या पाटीवर क्षमा ने जोरात सूरी ने वार केला.... विना काय बोलेल या आधीच क्षमा ने पुन्हा तिच्या पाटीवर वार केला.... "मला बाबा कडे जायचं आहे, हे स्वप्न मोड.... नाही आवडलं मला हे स्वप्न जा तू"..... म्हणत क्षमा ने परत वार केला.

विना ने फिरून तिचा स्वतःला वाचायचा प्रयत्न केला पण, शेवटी विना ने हार मानली.... तिच्या पूर्ण आयुष्ययाची एक उभी झलक तिच्या डोळ्यासमोर आली, नेमकं क्षमाच्या मनात ज्या खोट्या स्वप्नांची गोस्ट ती टाकत होती आज तेच दुस्वप्न विनाचा काळ बनून तिच्या समोर उभी होती.....

विना हळू हळू सरकत भिंतीला जाऊन टेकून बसली.... क्षमा तिथंच थाबली होती, विना ने तिला जवळ येण्याचा इशारा केला पण क्षमा ती सूरी घेऊन तिथून वर तिच्या बेडरूम मध्ये पडून आली.... ती खूप रडायला लागली आणि इथं शेवटी विना ने जीव सोडला

क्षमा रडता रडता झोपी गेली.....

खिईईईईक च्या आवाजाने हळूच gate उघडून विहान, आत शिरला, घराच्या दारा जवळ येऊन त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि मग, कोटच्या आतल्या खिशातून एक चावी काढली आणि दार उघडला....

घरात अगदी घाण वास पसरला होता.... घरातला सामान असत व्यस्त पडला होता, हळू हळू तो विनाच्या बेडरूम जवळ गेला.....

बेडरूमचा दार उघडाच होता आणि नेमकं वसाचा प्रमाण खूप वाढला. त्याने पॅंटीच्या खिश्यातून रुमाल काढला आणि नाकाला झाकला....

हळूच तो बेडरूम मध्ये शिरला.... त्याने समोर पहिला कि विना भिंतीला टेकून बसली आहे खाली मान टाकून, अगदीच भयावय द्रिष्य होता.... विहानच्या कपाळाला घाम फुटला. तो वास नेमकं विना च्या मृत देहाचा होता.....

एक क्षण तो तसाच तिकडं थांबला पण दुसऱ्याच क्षणी त्याला क्षमा आठवली.... आणि तो रूम मधून लगेच बाहेर धडपडत आला..... क्षमाम्म्म्म्म्म्मआआआआआ

विहान धावत शमाच्या बेडरूम मध्ये गेला, क्षमा बेडवर झोपली होती.... विहान ने क्षमाला उठवलं, क्षमा ने डोळे उघडले आणि समोर विहानला पाहताच ती जोरात किंचाडली नाही..... "हे वाला स्वप्न पण नाही..... मला माझे बाबा हवे बाबा बाबा".....

विहान ने तिला उचलून घेतलं तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी..... तो तिला समजवत होत बाळा शांत हो मी आहे शांत हो पण तेवड्यात क्षमाने विहानच्या चेहऱ्यावर सूरी ने वार केला.....

विहान ने शामला खाली सोडून दिला आणि त्याने एक हाथ चेहऱ्यावर ठेवलं जो पूर्ण रकता ने भरल..... रकता असं थेंब थेंब करून खाली पडत होत, विहान समजून गेला की विनाला पण क्षमा ने मारलं आहे म्हणून तो पटकन खाली जायला लागला पण क्षमा त्याचा मागे आली आणि तिने त्याचा पाटीवर सूरी ने वार केला.... विहान एक्दम खाली बसला......

क्षमा जोरात ओरडली "मला बाबा पाहिजे...... बाबा"....... म्हणत तिने परत एक वार केला आणि मग लागोपाठ वार केले, क्षमा काय तरी वेगळीच वागत होती जाणू ही ती नाही तिच्या वेष मध्ये कोणी सायको आहे, अगदी शांत आणि नेहमी घाबरून घाबरून रहाणारी क्षमाचा आज वेगळाच रूप बाहेर पडला होता.

विहान शेवटी जिन्यानवरून खाली पडला..... पण तो जिवंत होता.... तब्बल २ तास संघर्ष नंतर त्याने जीव sodla

क्षमा परत बेडरूम मध्ये जाऊन बसली ती थोडी शांत झाली मग थोड्या वेळे नंतर ती खाली गेली.... आणि विनाला उठवायला लागली

"आई उठ..... उठ ना आई, बाबा कडे जायचं आहे आई".....

पण विना आता गेली होती...... जेव्हा विना नाही उठली क्षमा बाहेर हॉल..... मध्ये जाऊन बसली ती बराच वेळ टीव्ही बघत बसली आणि मग नंतर.... फ्रिज मधून तिने चॉकलेट आणि फ्रुटस खाल्ले.....

बघता बघता दिवस सरला आणि रात्र झाली क्षमा बेडरूम मध्ये जाऊन झोपली..... सकाळ पर्यंत घरात दोन्ही मृत देहाचा अगदी घाण वास पसरला.....

सकाळी क्षमा जशी उठली ती खाली आली..... परत तिने विनाला उठवायचं प्रयत्न केलं पण आता पर्यंत देहाचा खूप वास सुटला होता .... आता फ्रिज मध्ये खायला पण काही नव्हतं आणि वासा मुले नेमकं क्षमाचा जीव घुसमळत होता ..... रडून रडून तिचा जीव आर्धा झाला होता आणि रडता रडता ती बेशुद्ध पडली तिथंच स्वयंपाक घरात......

नशिबाने त्या वेळी नमन परत घरी आला..... घरात शिरताच, त्याला खात्री झाली की काय तरी गडबड आहे..... तो धावत विनाच्या बेडरूम मध्ये गेला.... येऊन बघतोय तर काय इथं विनाचा मृतदेह पडला होता आणि अगदी घाण वास घरात पसरला होता..... विनाला असं बघून तो खाली बसून जोर जोरात रडायला लागला, इथं तो स्वतः आत्महत्ये साठी आला होता, पण इथं विनाला असं पाहून त्याच्या जीवाला मोठा धक्का बसला.....

रडता रडता त्याला क्षमा आठवली..... "क्षमा माझी पोरगी..... क्षमा.... क्षमा" करत नमन जेव्हा बाहेर आला, बाहेर वरती जाण्याच्या मार्गा वर जिथं क्षमाचा बेडरूम होता तिथं... सिडिंवर अजून एक मृत देह होता, ते बघून नमनला उलटी आली, नमन तिथंच ओकला आणि जसं तसं स्वतःला सांभाळत तो एकाबाजूने वर गेला..... तो अजूनही क्षमाला हाका मारत होता....... क्षमा....

क्षमा वर बेडरूम मध्ये नव्हती, नमनला काहीच कळत नव्हतं की काय करावं, हे सगळं काय झाला, कसं झाला..... विनाला कोणी मारलं.... क्षमा कुठे आहे, नमन इथं तिथं घरात सगळी कडे क्षमाला शोधत होता, तेव्हा शेवटी त्याला क्षमा स्वयंपाक घरात सापडली.....

ती बेभान पडली होती खाली जमिनीवर.... नमन ने पटकन तिला उचलून जवळ घेतलं तीच डोकं मांडीवर ठेवलं आणि तिला गालावर हळू हळू थापा मारत तिला उठवायला लागला.... नमन परत उठला आणि वर कट्यावरुन पाण्याची बॉटल उचली आणि क्षमाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपळलं....

शेवटी नशिबाने ती शुद्धीवर आली.... नमनला बघताच क्षमा हळूच एकदम तुटक्या आवाजत रडत रडत बोलली.....

"बाबा तुम्ही आले, बाबा मला इथून घेऊन जावा हे खूप विचित्र स्वप्न आहे, मी स्वप्न्यात पाहिलं की आईला आणि त्या खोट्या माणसाला मारून टाकलं.... आई नेहमी म्हणायची मला बाबा येतील... बाबा तुम्ही मला घ्याला आले आहात ना"...... नमनला खूप मोठा धक्का बसला, सगळं काही त्याचं डोळ्यासमोर स्पष्ट आता त्याला दिसत होतं.......

********

विजय क्षमासोबत भेट करून परत नमन कडे आला.....

नमन..... "जे मी विचार करतोय ते खरं आहे का"......???? विजय

नमन काहीच बोलला नाही......

"मी क्षमाला भेटलो आणि अगदी लाडाने तिच्या सोबत खेळलो बोललो जस मी माझ्या मुलीसोबत बोलतो खेळतो..... मला तिचा विश्वास मिळवायचं होता हे जाणून घेण्यासाठी नेमकं घरात तिथं काय घडलं ती एक पूर्ण दिवस.... पूर्ण एक रात्र त्या घरात कशी रहायली हे जाणून घेण्यासाठी पण तिच्या शब्दांनी मला निशब्द केलं".

"मी तिला बोलता बोलता बोलो की.... तुला मोठं होऊन काय बनायचं आहे बाळा, माझ्या चिहुला मोठं होऊन माझ्या सारखं इन्स्पेक्टर व्ह्याच आहे तीच स्वप्न आहे ते".....

"यावर पण क्षमा जे बोलली ते ऐकून माझ्या अंगाला शहारे फुटले".....

"काय बोलली ती सर"..... नमन अचानक बोलला

"ती बोलली मितर माझ्या स्वप्न्यात खूप वेळा माझ्या आईला आणि माझ्या खोट्या बाबाला मारून टाकलं... मला फक्त माझ्या बाबासोबत रहायचं आहे".....

"हे एैकताच एका क्षणा साठी माझ्या पाया खालची जमीन सरकली.... मला सगळं स्पष्ट दिसायला लागलं की नेमकं काय आणि कसं...... पण मला तुझा तोंडाने एैकायचं आहे की खरं काय आहे".

"जाऊ द्या सर..... ना खरं तुम्ही एैकू शकणार आणि ना मी बोलू शकणार आणि तसं पण यावर कोणी विश्वास करणं असंभव आहे".....

"आज माझ्या मुलीची जी अवस्था आहे...... त्याच्या मागे मी पण कुठे ना कुठे जीमेदार आहे, एक बाप म्हणून मी नाकाम झालो पण मला आता माझी चूक कळली आहे..... जर वेळ रहाता मी माझ्या बायकोला आणि पोरीला संभाडला असतं तर हे दिवस आज माझ्या पोरीने नस्ता बघितला..... नमन रडायला लागला, लहानपणा पासून आईबाबाचं हवंसं प्रेम हवी ती माया तिला कधी भेटलीच नाही, त्याने आम्हाला नेहमी भांडताना ओरडताना रडताना पाहिलं, ही माझी चूक होती की.... नमन बोलता बोलता रडायला लागला, शेवटी याच सगळ्या गोष्टीचं तिच्या मनाला मोठा आघात झाला".... नमन पुढे काहीच बोलला nahi

विजयला त्याचं सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले..... त्याने पुढे नमनला काहीच विचारलं नाही.......

*********

६ महिना नंतर......

दोन हत्याचा दोषी मानून नमनला कोर्टाने आजीवन करावसची सजा दिली.......

नमन च्या म्हण्या अनुसार विजय ने क्षमाला चांगल्या psychiatrist ला दाखवलं हळू हळू आता क्षमा बरी व्हायला लागली होती......

विजय मधी मधी तिला नमन कडे भेटायला घेऊन यायचं...... सुलेखा ने पण क्षमाची चांगली काळजी घेतली....

नमन ने जे घडलं ते सगळं सदा साठी त्याच्या मनाचा एका कोपऱ्यात लपवून घेतलं......

***********

क्षमा डॉक्टर समोर डोळे बंद करून बसली होती...... डॉक्टर ने तिला सांगितलं "आता तू स्वप्न्यात नाही आहेस..... खऱ्या जगात आहे"

क्षमा बोलली...... "हो"

"आता तुला काय दिसतंय"..... डॉक्टर ने विचारलं

क्षमा बोलली...... "बाबा "

................ The End .............

"आघातग्रस्त मुले म्हणून, आम्ही नेहमी स्वप्न पाहिले की कोणीतरी येऊन आम्हाला वाचवेल. आम्ही कधीही स्वप्नातही विचार केला नाही की, खरं तर, ते स्वत: प्रौढ असतील," ॲलिस लिटल.

बालमन खूप चंचल असतं.... बालपणी ते जे बघतील तसेच संस्कार त्यांचं मनावर पडतील, बालपणी त्यांच्या मनाला झालेला आघात पुढे जाऊन त्यांच्या आयुषच्या सगळ्यात मोठी अडचण बनू शकते..... पुढे जाऊन मानसिक विकार निर्माण करतो.......

_हर्षद मोलिश्री