ek diwali ashi hi... in Marathi Short Stories by Pranav bhosale books and stories PDF | एक दिवाळी अशी ही..!

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

एक दिवाळी अशी ही..!

गेल्या 27 वर्षात पहिल्यांदा  दिवाळीला  घरापासून लांब आहे, काल रात्री असाच अचानक घरून फोन येऊ लागले, दिवाळी आहे कधी येतोयस,  आणि यावर्षी पहिलीच वेळ दिवाळीला घरापासून लांब रहाव लागतय, अगदी कारण ही तसंच आहे, इलेक्शन समोर येऊन टेकलेत, माझ्यासारखच खूप साऱ्या पॉलिटिकल कॅम्पेन मध्ये काम करणाऱ्या लोकांच अगदी असच असेल. आई, भाऊ ,काकी,माई सर्वांचेच फोन येऊन गेलेले, यावर्षी दिवाळीला नाही येणार अस बोलायला पण मला खूप जड जात होत, पण तस बोलून मी फोन ठेवून दिला.

एव्हाना संध्याकाळ होत चालेली, मी टेरेस वर तसाच बसून राहिलो, आता मात्र आजूबाजूला लक्ष गेला, बाजारामध्ये खरेदीसाठी लोकांची  जमलेली गर्दी , फटाक्याचे स्टॉल, सर्वत्र लखलखाट असलेली lightning सर्व बगुण मन मात्र लहानपणीच्या आठवणीमध्ये हरवून गेल. 

लहानपण खरंच किती छान असत ना, अगदी निरागस, ना कोणत्याच अपेक्षा, ना कोणती जबाबदारी..! जस जस मोठ होत गेलो, जबाबदाऱ्या वाढत गेल्या. 

लहानपणीची दिवाळी खूप वेगळी असायची, अगदी सहामाही परीक्षा संपल्या की तेव्हापासूनच दिवाळीची ओढ लागायला  सुरुवात होयची,

दिवाळी जवळ आली की, एक नवं ऊर्जित वातावरण सगळीकडे जाणवायच. निसर्गही त्याच्या अनोख्या रंगात सजून नव्या उत्साहाने भरभरून यायचा. दसऱ्याचा सण संपला की हवेत एक प्रकारची थंडगार गारवा जाणवायला लागायचा, पानांवर ठेठ दवबिंदू चमकायला लागायचे, जणू हिवाळा हातात हात घेऊन येतोय असं वाटायचं.सूर्याचं उबदार पण साजुक ऊन, सकाळच्या गारव्यात घोंगावणारा वारा आणि मधूनच येणारा फुलांच्या सुवास यामध्ये एक खास आपलेपणा वाटायचा. या सगळ्या निसर्गाच्या बदलांनी दिवाळी जवळ आल्याची जाणीव होयाची.

लहानपणी कपड्यांपेक्षा फटाक्यांमध्ये  जास्त मजा वाटायची, लहानपण अगदी तसच असतय, सर्वात आधी फटाका कोण वाजवतय ते कोणता किल्ला बनवायचा इथपर्यंत अगदी सर्व आधीच ठरलेला असायच, मित्रांसोबत ठरवून सायकलवरून माती आणायला जायचं. सायकलचे पेडल मारत दूरवर मातीच्या ढिगार्‍यापर्यंत जायचो आणि तिथून हळूहळू माती गोळा करून ती सायकलवर लादून परतायचो. हे काम तसं कष्टाचं पण त्यातला आनंद काही वेगळाच असायचा. किल्ला तयार झाल्यावर त्यावर खूप मेहनत घालायचो. सलाईनची रिकामी बाटली कुठूनबुठून शोधायची, मग त्यात पाणी भरून ठेवायचं आणि ते किल्ल्याच्या बुरुजावरून हळूहळू सोडायचं. पाण्याचा प्रवाह किल्ल्याच्या खाचखळग्यांतून वाहताना बघायला फारच मजा यायची. उद्या दिवाळी आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. याच्या उत्सुकतेमुळे न लागणारी झोप आजही आठवली तरी भारी वाटते.

आईच्या हातचा फराळ, दारातली रांगोळी, आणि घराभोवतीचा दिव्यांचा उजेड हे सगळं मनाला अतिशय प्रिय वाटायचं. 

मात्र, यावर्षी तो दिवाळीचा आनंद, तो आनंदाचा उजेड अनुभवायला नाही मिळणार ह्या विचाराने बालपणात हरवलेल मन भानावर आलं, मी अजूनही टेरेस वर च होतो, एव्हाना सूर्य मावलतीस जाऊन पूर्ण अंधार पडला होता, बाजारामध्ये लोकांची ये जा मात्र कमी झाली नव्हती.

आता मात्र सर्व विचार बाजूला ठेवून मी ऑफिस मध्ये कामात गुंतून गेलो.. रात्री खुप उशिरा पर्यंत रिपोर्ट्स बनवायच काम चालू होत. ते पूर्ण करून घरच्या आठवणींमध्ये कधी झोपून गेलो समजलोच नाही. 

सकाळी लवकरच फोन वाजला पण रात्री खुप उशिरा  झोपलो असल्याने मला उचलायला जमलं नाही, थोड्या वेळाने पुन्हा आई चा फोन वाजला, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आला होता, एकत्र फॅमिली मध्ये राहत असल्याने दिवाळीच घराचं वातावरण खुप छान होत अगदी सर्व जण च मला दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. आई मला या दिवाळीला किती मिस करतेय हे बोलण्यावरून समजतं होत, आई ला अगदी फराळ करताना पण माझी आठवण येत होती, तिने तस बोलूनही दाखवलं, दिवाळीचा फराळ खायला ये.. एक दिवस तरी येऊन जा असं बोलत होती, आणि माझं मन अजून च जास्ती भरून येत होतं, माई नी शुभेच्छा देताना बोलल्या आम्ही तुला फराळाचा डबा घेऊन येऊ का?  तेव्हा मन तर खुप भरून आलं पण खुप भारी वाटल की यार मी किती लकी आहे की या फॅमिली चा भाग आहे. सर्वाना शुभेच्छा देऊन मी फोन ठेवून दिला आणि घरच्या आठवणीत माझ्या कामात गुंतून गेलो...