1857 cha uthav in Marathi Motivational Stories by Amol Pandit books and stories PDF | 1857 चा राष्ट्रीय उठाव

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

1857 चा राष्ट्रीय उठाव

 

 
पार्श्वभूमी :

·        सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.

·        सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला.

·        हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.

·        ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला.

·        इसवी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते.

·        1760-70 च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष झाले.

·        1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.

1857 पूर्वीचे उठाव :

·        कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उठाव केले.

·        असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले.

·        छोटा नागपुर परिसरातील कोलाम, ओरिसातील गोंड, महाराष्ट्ररातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केले.

·        बिहारमध्ये संथाळांनी तर फार मोठ्या प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या.

·        महाराष्ट्ररात उमाजी नाईक यांनी केलेल्या उठावही असाच तीव्र होता. उमाजींनी रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुध्द बंड केले.

·        उमाजी नाईक यांनी एक जाहिरनामा काढून इंग्रजांविरुध्द लढा देण्याचे व इंग्रज सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले.

·        1832 साली उमाजींना पकडून फाशी देण्यात आली.

·        कोल्हापुर लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकाऱ्यांविरुध्द वेळोवेळी उठाव केले होते. त्यांपैकी 1806 सालच्या वेल्लोर येथील तसेच 1824 सालचा बराकपुर येथील उठाव हे विशेष उग्र स्वरूपाचे होते.

·        इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले

 

1857 च्या उठावाची कारणे

राजकीय

साम्राज्यवादी धोरण :-

·        सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली.

·        र्लोड वेलस्ली, लॉड हेस्टिंग्ज लॊड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

·        कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.

तैनाती फौज :-

·        इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला, त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.

·        तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली.

·        याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे. त्याचबरोबर या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे.

·        कंपनीच्या परवानगीशिवाय इतरांशी युध्द किंवा करार करता येणार नाहीत, तसेच इंग्रजांचा वकिल दरबारी राहिल. त्याच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करावा, इ. तैनाती फौजेच्या अटी होत्या.

·        वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आवळला व अनेक संस्थाने बरखास्त केली.

·        ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या

संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती :-

·        इ.स. 1848 मध्ये लौड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता.

·        डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाठी, खालसा पध्दतीचा अवलंब केला.

·        याबाबत त्याचे दोन मार्ग होते. एक तर ते राज्य जिंकून घेणे किंवा विविध कारणे दाखवून ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे

·        डलहौसीने आपल्या अंकित असणाऱ्या संस्थानिकांवर त्यांनी आपल्या उत्तरधिकाऱ्यास कंपनी सरकारची मान्यता घेणे आवश्यक केले

·        जी संस्थाने निःसंतान असतील अशा संस्थानिकाला डलहौसीने दत्तक घेण्यास परवानगी दिली नाही.

·        दत्तक वारस नामंजूर या धोरणानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कंपनीच्या राज्यात सामाविष्ट केली,

·        गैरकारभार व अव्यवस्था या तत्वाखाली अयोध्येचे संस्थान खालसा केले.

·        डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.

पदव्या आणि पेन्शन समाप्ती :-

·        लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला.

·        मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.

·        पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली

·        वऱ्हाड (विदर्भ) प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

·        इंग्रजांनी अशा प्रकारे अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.

·        वेतने, इनाम व जहागिरीची जप्ती :-

·        ईस्ट इंडिया कंपनीच्या भरभराटीसाठी लॉड विल्यम बेंटिकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकांना  इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते. त्यांच्या जमीनी काढून घेतल्या.

·        अनेक जहागिरींची जप्ती केली. लॉड डलहौसीने पुरावे नव्हते अशा, जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले. या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.

आर्थिक

स्थानिक उद्योगधंद्याचा ऱ्हास :-

·        ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता. 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.

·        येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल भारतातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला

·        कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता. परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही.

·        इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.

·        शेतीसंबंधी उदासीन धोरण -

·        शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती.

·        शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

·        दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात.

·        त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

·        ब्रिटिशांनी सर्व देशभर एकच अशी शेतसाऱ्याची पध्दत ठेवलेली नव्हती प्रत्येक प्रांतामध्ये यात वेगळेपणा होता.

·        ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला.

 

हिंदी जनतेची आर्थिक पिळवणूक -

·        भारतात अत्यंत कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणे व तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हणून भारतात विकणे,

·        भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदार्थ, खनिजे, लाकूड, इत्यादी माध्यमातून ब्रिटीशांनी आपले साम्राज्य निर्माण केले होते.

·        या साम्राज्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांना आपले लष्कर सतत सज्ज ठेवावे लागे हा खर्च भारतीय तिजोरीतून दिला जाई.

·        ब्रिटिशांनी भारतीयांची यंत्रवत लुट केली.

·        यामुळे ब्रिटनची भरभराट झाली. तर भारत दारिद्रयाकडे वाटचाल करु लागला

·        याबाबत डॉ ईश्वरीप्रसाद म्हणतात, भारतमातेच्या दुधावर इंग्रज लठ्ठ झाले. परंतु भारतीयांवर यात उपासमारीची वेळ आली.

·        शेतसाऱ्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार -

·        सरकारी अधिकाऱ्यांनी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोखा रकमेच्या स्वरुपात घेण्याचा आग्रह धरला

·        शेतकऱ्यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करण्यात आले.

·        मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार ठरावीक शेतसरा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या.

 

सामाजिक

हिंदूना तुच्छ वागणूक -

·        काळया लोकांपेक्षा गौरवणीर्य लोक जन्मत श्रेष्ठ आहेत. अशी भावना 19 व्या शतकात युरोपभर पसरली होती.

·        इंग्लंडही त्यास अपवाद कसा असेल हिंदी लोक मागास आहेत. त्यांची संस्कृती रानटी आहे हे भारतीयांच्या मनावर बिंबविण्याचा ब्रिटिश प्रयत्न करु लागले.

·        एखादया साधा इंग्रज रस्त्याने जात असेल तर घोडागाडीमधून जाणाऱ्या भारतीयालाही खाली उतरून त्या इंग्रजास सलाम ठोकावा लागे.

·        रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश करण्यास मज्जाव होता.

·        युरोपियनांच्या हॉटेलमध्ये व क्लबमध्ये भारतीयांना प्रवेश नसे,

·        हिंदी माणसाप्रती असणारी ब्रिटिशांची तुच्छतेची भावना भारतीयांचा असंतोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.

·        हिंदू संस्कृती व समाज जीवनावर आघात -

·        भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्यासाठी लॉड विल्यम बेंटिकने अनेक कायदे पास केले. सन 1829 मध्ये सती बंदीचा कायदा केला. त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह संमती कायदा, वाबविवाह प्रतिबंधक कायदा असे कायदे पास केले. भारतीय समाज प्रबोधनापासून अद्याप दूर होता. ब्रिटिशांनी हे सर्व कायदे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काही रुढीप्रिय भारतीयांना वाटू लागले.

 

जाति मध्ये हस्तक्षेप -

·        इ.स. 1850 मध्ये ब्रिटिशांनी जातिभेद रद्द करण्याचा कायदा केला व या कायद्यानुसार वारसाहक्क व मालमत्ता हक्कामध्ये काही बदल केले.

·        तत्कालीन हिंदु मुस्लिमांना या कायद्याचा धोका वाटू लागला

·        हिंदू वा मुस्लीम धर्मातर करुन ख्रिश्चन धर्मात गेला, तरी त्याचा वाससाहक्क व मालमत्ता प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता.

 

नवीन शिक्षणव्यवस्था

·        भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणव्यवस्था सुरु केली.

·        देशभर ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळा सुरु झाल्या

·        ब्रिटिशांच्या या धोरणामुळे 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजरचना कोलमडते की काय, असे लोकांना वाटू लागले

·        यामधून भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला.

 

धार्मिक

·        धार्मिक संकट- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक साम्राज्यावादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.

·        इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.

·        अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

·        कंपनीने धर्म प्रसारासाठी खालील मार्गाचा अवलंब केला

1)      ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना वडिलोपार्जित संपत्ती त त्यांचा हक्क मिळे.

2)      अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई.

3)      ख्रिश्चन धर्म स्वीकाराणाऱ्यांना नोकरीत सामावून घेतले जाई व जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई.

4)      ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्त्वज्ञान दिले जाई.

5)      तुरुंगवास भोगणाऱ्या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलयास त्याची मुक्तता होईकंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.

 

धर्म व सामाजिक सुधारणा -

·        कंपनी सरकारच्या कालखंडामध्ये धर्म व समाज सुधारणेबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

·        इ.स. 1929 मध्ये सती बंदीचा कायदा केला बेंटिकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या खऱ्या परंतु तत्कालीन रुढीप्रिय समाजाला या सुधारणा आवडल्या नाहीत.

·        देवालयांची व मशिदींची वतने जप्त -

·        कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

·        यामुळे धर्मगुरु मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.

 

लष्करी

·        राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला, तरी जोपर्यत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते.

·        शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

 

हिंदी शिपायावरील निबंध -

·        ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.

·        इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध न लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

·        भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती. लॉड कॅनिंगने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला.

·        या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.

·        ज्यांनी परदेशात जाण्यास विरोध केला, त्यांना नोकरीस मुकावे लागले, तर अनेकांना शिक्षा झाल्या,

·        लष्करातील उच्च अधिकार पदे भारतीय सैनिकांनी दिली जात नसत.

·        एकाच पदावर काम करणाऱ्या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्यांत फार मोठी तफावत केली जात होती.

·        हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राऊंडवर त्यांचा अपमान कला जाई. वेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात.

·        लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत.

·        धुमश्चक्री होऊन अनेक हिंदी शिपाई मारले जात मग गोरी फौज पुढे पाठविली जाई.

·        म्हणजे मृत्यूला सामोरे जाताना भारतीय शिपाई व विजयाची माळ यात गोऱ्या सैन्याकडे, या प्रकारामुळे हिंदी शिपायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

 

तात्कालिक कारण

·        इनफिल्ड बंदुका व चरबीयुक्त काडतूसे प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला.

·        इ. स. 1857 मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या.

·        या बंदुकांना लागणाऱ्या काडतुसांचे सील गाई व डुकराच्या चरबीने बंद केले.

·        या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे गाय ही हिंदूना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द होते

·        काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

·        या प्रकरणाची माहिती वाऱ्यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला.

·        नकार देणाऱ्या शिपायांवर खटले भरण्यात आले. 10 वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या.

·        या सैनिकाना नोकरीतून काढून टाकणयत आले. त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि यामधून 1857 च्या उठावाचा भडका उडाला.

 

महाराष्ट्रातील उठाव

कोल्हापुरातील उठाव : 

·        31 जुलै 1857 रोजी सैन्याच्या 27 व्या रेजिमेन्टमधील भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी लुटली.

·        21 व्या व 28 व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत केली. जेकब' या ब्रिटिश अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. 

·        6 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला.

·        15 डिसेंबर 1857 रोजी चिमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला. 

 

साताऱ्यातील उठाव : 

·        साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे खालसा झालेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजींनी इंग्लंडला जाऊन प्रयत्न केले. त्यास यश न आल्याने रंगो बापूजींनी 1857 च्या उठावात भाग घेतला. 

·        रंगो बापूजी यांनी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, कराड, कळंबी, बेळगाव, आरळे, देऊरे इत्यादी ठिकाणे उठावासाठी निश्चित केली.

·        भोरपासून बेळगावपर्यंत रामोशी, कोळी, मांग या समाजातील लोकांना एकत्रित केले. ब्रिटिशांनी हा उठाव तात्काळ मोडीत काढला.

·        भोर येथील पतसचिवाचे नोकर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बापुना फितोरीने ब्रिटिशांच्या हवाली केले.

·        या बदल्यात ब्रिटिशांनी कृष्णाजींना ‘विश्वासराव' हा किताब दिला. 

 

नाशिकच्या पेठमधील उठाव : 

·        नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील राजा भगवतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी उठाव केला.

·        6 डिसेंबर 1857 रोजी हटूलच्या बाजारात भिल्लांच्या मदतीने उठाव झाला .

·        ग्लासपल' या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे बंड मोडून काढताना पेठच्या राजास फाशी दिली.

·        जानेवारी 1857 मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेला उठवाचा प्रयत्न मोडून काढला गेला. 

 

नागपूरमधील उठाव : 

·        नागपूरच्या उठाववाल्यांना लखनौ, कानपूर येथील बंडखोरांची साथ होती.

·        13 जून 1857 रोजी सीताबर्डी, कामठी याठिकाणी उठावाचा आखलेला बेत इंग्रजांनी आधीच मोडून काढला. 

·        यावेळी नागपूरची राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. 

 

औरंगाबादमधील उठाव : 

·        येथील घोडदळातील मुस्लीम समाजातील शिपायांच्या उठावाचा प्रयत्न ब्रिटिशांनी मोडून काढला

·        जमखिंडी संस्थानचे राजे आप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील असल्यामुळे तेथील उठाव फसला.

 

मुधोळमधील बेरडांचा उठाव :

·        1857 ला लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.

·        या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.

·        बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उठाव : 

·        एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात रयतवारी पद्धत लागू केल्यामुळे जमीन महसूलाची जबाबदारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे गेली.

·        शेतसारा भरण्यासाठी अनेकांना जमिनी विकाव्या लागल्या.

·        परिणामी, पुणे, सातारा, सोलापूर भागात शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. 

·        1874 साली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 'कर्धे' या गावाच्या शेतकऱ्यांनी सारा भरण्याचे नाकारले. 

·        12 मे 1875 रोजी 'सुपे' येथे शेतकऱ्यांनी पहिला मोठा उठाव करून मारवाडी, गुजर, सावकार यांच्यावर हल्ले केले. 

·        अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकारांची मालमत्ता लुटली. पुणे, सातारा, रायगड, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यात हे लोण पसरले. इंदापूर, भिमडी, कर्जत, शिरूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा ही शेतकरी उठावाची केंद्रे होती. 

·        शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी सरकारने चार सदस्यांचे 'डेक्कन रॉयटस् कमिशन' नेमले.

·        या कमिशनच्या शिफारशींनुसार 1879 मध्ये सरकारने 'दि डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलिफ अॅक्ट' संमत केला. 

कायद्यातील तरतुदी :

·        शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 'तगाई कर्जे' पुरविण्यात यावीत.  

·        शेतकरी बँका सुरू करण्यात याव्यात. 

·        कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे हस्तांतरीत होऊ देऊ नयेत. 

·        या तरतुदींमुळे शेतकऱ्यांमधील असंतोष कमी होण्यास मदत झाली.

 

1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे 

·        उठावादरम्यान क्रांतिकारकांमधील एकसुत्रतेचा व एककेंद्री नेतृत्त्वाचा अभाव. 

·        उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती.

·        सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजेरजवाडे उठावापासून अलिप्त राहिले. केवळ

·        उत्तर भारतातच उठावाचे लोण पसरले.

·        दक्षिण भारत उठावाच्या प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. 

·        इंग्रजांकडील एककेंद्री नेतृत्त्व, अद्ययावत शस्त्रास्त्रे, कुशल सेनानी, दळणवळणाचा ताबा या बाबींमुळे त्यांना उठाव मोडून काढणे शक्य झाले. 

·        31 मे 1857 या पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठावास सुरूवात झाली.

 

1857 च्या उठावाचे परिणाम 

·        1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनी राजवटीची भारतातील अखेर झाली

·        1 नोव्हेंबर 1858 : अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंग याने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पाहिला जाईल असे घोषित केले.

 

राणीचा जाहिरनामा  : 

·        वंश, धर्म, जात, जन्मस्थान यांवरून भारतीयांत भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना 'गुणवत्ता' हाच निकष राहिल असे राणीने जाहिर केले. 

·        पूर्वीची ‘बोर्ड ऑफ कंट्रोल' आणि 'बोर्ड ऑफ डायरेक्टर्स' ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी 'भारतमंत्री आणि त्याचे मंत्रीमंडळ' यांची निर्मिती करण्यात आली. 

·        लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारतमंत्री बनला. 4. भारतातील कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही अशी हमी देण्यात आली.

 

ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना :

·        भारतातील ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करताना युरोपियनांची संख्या वाढवण्यात येऊन मोक्याच्या ठिकाणी इंग्रज सेनानींच्या नेमणूका करण्यात आल्या.

 

सामाजिक सुधारणांच्या धोरणात बदल :

·        विविध सामाजिक सुधारणांमुळे पारंपरिक भारतीय समाजात असंतोष निर्माण झाल्याने इंग्रजांनी सामाजिक सुधारणांचे आपले धोरण बदलले.

 

इंग्रजांची भेदनिती :

·        सत्ता बळकटीसाठी इंग्रजांनी भारतात भेदनीतिचा अवलंब केला, पर्यायाने इंग्रजी राजवटीबद्दल भारतीयांत दहशत व तिरस्कार वाढीस लागला.

 

'फोडा व राज्य करा' ' धोरण

·        फोडा व राज्य करा' या इंग्रजांच्या नीतिमुळे हिंदू-मुस्लीमांतील दरी वाढू लागली.

 

सनदशीर राजकारणास प्रारंभ

·        उठावातील अपयशानंतर संस्थानिक, जमीनदार हे पारंपरिक नेतृत्त्व मागे पडून पाश्चात्य शिक्षणाचा पगडा पडलेल्या विचारवंतांच्या नव्या सनदशीर राजकारणास प्रारंभ झाला. 

 

राष्ट्रवादाला उत्तेजन

·        उठावाचा बीमोड करताना इंग्रजांनी दाखविलेल्या सूडबुध्दिमुळे इंग्रजांविरूध्द असंतोष वाढून भारतीय राष्ट्रवादाला उत्तेजन मिळाले.

 

1857 च्या उठवा बाबत विविध विचावंतांचे मत 

·        स्वातंत्र्यवीर सावरकर : “हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले 'क्रांतियुध्द." 

·        अशोक मेहता : “1857 चे बंडे हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते...." 

·        संतोषकमार रे : "1857 चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता." 

·        कर्नल मालसन : “हिंदी समाजातील इंग्रजांविरोधी द्वेषभावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती'

·        डॉ. सुरेंद्रनाथ सेन : “धर्मयुध्द म्हणून सुरू झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुध्दाचे स्वरूप धारण केले 

·        पंडीत नेहरूं : 1857 चा उठाव हे राष्ट्रीय आंदोलन होते. 

·        प्रा. न. र. फाटक : “1857 चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी." 

·        सर जॉन लॉरेन्स : “बंडाचे मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरे काही नाही." 

·        सर जॉन सीले : “1857 चे बंड संपूर्णत: देशाभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते." 

·        पी. ई. रॉबर्टस् : “1857 च्या बंडात स्वार्थी उद्दिष्टाची परिपूर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक सामील झाले होते." 

·        किशोरचंद्र मित्रा : “लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागाचा अजिबात संबंध नाही." 

·        डॉ. आर. सी. मुजुमदार : "1857 चे बंड राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडाचे नेते हे राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते."

·        फ्रान्समध्ये 1857 च्या उठावाचे "God's Judgement upon English rule in India" असे वर्णन केले गेले