ajun hi brasat aahe bhag -9 in Marathi Love Stories by Dhanashree Pisal books and stories PDF | अजून ही बरसात आहे ..... - भाग 9

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

अजून ही बरसात आहे ..... - भाग 9

               निशाच बोलण ऐकून ....अर्जुन थोडा विचारतच पडला ......  निशा तुला अस का वाटतंय ? ....की ,मी तुझ्याबरोबर नाही ......मी तर प्रत्येकवेळी तुझ्याबरोबर आहे ......आणी ह्या पुढे ही असणार आहे ...

              माहित नाही ..... आपल्या लग्नानंतर  मी तुला नेहमी त्रास च दिला ....तुला साडी घालणारी , जेवण बनवणारी ,गरम गरम जेवण असे ताटात वाढणारी हवी होती .....पण तशी तुला नाही मिळाली .....तुला भेटले मी ....जिला साधा वरण भात सुद्धा बनवता येत नाही ....तर तु पूर्ण जेवण काय बनवून खायला देणार ? 

            अस काही नाही .....निशा ....तु ह्या सगळ्याचा विचार करू नको .......तु माझ्यासाठी काय काय केल आहे .....हे मला चांगलंच माहित आहे ........... त्यामुळे तु प्लिज असा काही विचार करू नको .......तुला कधीच आई व्ह्याच नव्हतं .....पण  मला लहान मुलाची आवड आहे ..म्हणून,फक्त म्हणून .....तु  कबीर ला जन्म देण्याचा निर्णय घेतलास ...... नऊ

महिने ...किती त्रास  सहन केला ....


               हे सगळं खर असलं तरी .....मी फक्त कबीर ला जन्म दिला .....खऱ्या अर्थाने ....तर तूच त्याची आई झ्हालास .....तु तुझं काम सांभाळून त्याच्याकडे बघितलंस ....त्याच्यावर लक्ष दिलस ......त्यामुळे आज आपली फॅमिली हॅप्पी फॅमिली दिसते ......निशा बोलली ....

                 हे सगळं ठीक आहे .....पण ,तु हे सगळं आज का घेऊन बसलीस ........आज किती छान दिवस गेला ......आणी तु  हे सगळं घेऊन बसलीस ..... रात्र खूप झ्हाली आहे .....  झोप आली असेल ना ? झोप लवकर ..... निशा ही फार काही न बोलता ....झोपायला निघून गेली ......

                 पण अर्जुन मात्र ......हॉल मध्ये विचार करत बसला होता ......एकसारखी त्याला  राधाच आठवत होती ......." त्याला ठसका लागला ......आणी राधा पळत  पाणी घेऊन आली ...." ....खरच राधाच्या ही मनात माझ्याविषयीं आपुलकी असेल का ? ........त्यांनी मनाशी काहीतरी ठरवत .......राधा .....घाबरू नकोस ......तुझ्या मनात ....माझ्या विषयी काय आहे ? मला माहित नाही .....पण मी नेहमी तुझ्या सोबत असणार .....जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल .....तेव्हा तेव्हा ....मी तुझ्या सोबत असणार .....

              इकडे निशा .....ला मात्र काही केल्या .....झोप येत नव्हती ......आज आधी ...तिला एवढं अस्वस्थ कधीच वाटल नव्हतं ..... " तिला राधाचा तो चेहरा आठवत होता ....जो अर्जुन ला ठसका लागल्यावर ..... धावत पळत पाणी घेऊन आला होता ..... " .....किती आशेने ती अर्जुन कडे बघत होती........  किती काळजी वाटत होती ....त्यामध्ये ....... खरच अस असेल का ?का मीच असा विचार करते ........एक न अनेक विचार निशाच्या डोक्यात येत होते ......  त्यामुळे  तिला नीट झोप ही येत नव्हती ....फक्त ....ह्या कुशीवरून त्या कुशीवर बस ती करत होती .....


********

                दुसरा दिवस उजडला......अर्जुन ला जाग आली .........तो पटकन अंघोळ करण्यासाठी गेला ...... अंघोळ करून बाहेर येतो, तो  काय ? निशा ने त्याच्यासाठी नाश्ता बनवून ठेवला होता .......त्याच्या आवडीची कॉफी ही तयार होती ......कबीर च ही आवरून ......कबीर ही दूध पित बसला होता ......

              हे सगळं बघून अर्जुन ला थोड  आश्चर्यच वाटत होत ......लग्न  झ्हाल्यापासून .......निशा ने घरातील एकही कामाला कधीही हात लावला नव्हता .....न अर्जुन ने ही कधी त्या बद्दल तक्रार केली होती ......त्याने निशाला ....जस आहे तस स्वीकारलं होत ......

                तीने स्वतःहा मध्ये केलेला हा बद्दल .....त्याला खरतर ...खटकला .....पण तस त्याने काही बोलून नाही दाखवलं ......कारण निशाला वाईट वाटलं असत .......

               तो विचारात गुंठला अस पाहून,निशा ने त्याला आवाज दिला .......अर्जुन कॉफी पी ना .....थंड होते आहे ती .....आणी कांदा पोहे ही .......टेस्ट करून सांग ....कसे झ्हालेत .......

                निशाच्या सांगण्यावरून .....अर्जुन ने पोहे खाल्ले ......त्यात मीठ खूप जास्त होत .....म्हणून त्याने कॉफी चा एक घोट घेतला ....तर ती कडू झ्हाली होती ...... पण अर्जुन काहीच न बोलता त्याने तसेच खाल्ले आणी तो ऑफिस मध्ये निघून गेला .....