ajun hi brasat ahe bhag - 6 in Marathi Love Stories by Dhanashree Pisal books and stories PDF | अजून ही बरसात आहे ..... - भाग 6

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

अजून ही बरसात आहे ..... - भाग 6

अर्जुन ऑफीस वरून घरी आला होता .... खूप दमला होता ....अर्जुन घरी येताच त्याची कमवाली बाई ही कबीर ला त्याच्या कडे सोडून घरी जायला निघाली ......अर्जुन खूप दमला होता .....एक ग्लास पाणी तरी कोणीतरी द्यावे ....एवढीच त्याची इच्छा होती ...

         पण निशा कडून अशी अपेक्षा ठेवणे ही व्यर्थ होते ....निशा आत मध्ये बेडरूम मध्ये कोणाशी तरी बोलत होती ......अर्जुन ला वाटले तिच्या कोणत्यातरी मैत्रिणीशी गप्पा मारत बसली असेल म्हणून त्याने फार लक्ष नाही दिले ....पण बेडरूम मधला आणखी एक येणारा आवाज त्याच्या ओळखीचा वाटला....म्हणून किचन मधून जाता जाता त्याने बेडरूम मध्ये नजर वळवली .......ती दुसरी व्यक्ती पाहून त्याच्या चेहऱ्यावर ...कोण आनंद झ्हाला ....

              निशा बरोबर गप्पा मारत बसलेली ती व्यक्ती ...दुसरी तिसरी कोणी नसून .... राधा होती ..... अर्जुन ला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता .....त्याने स्वतःला चिमटा काढून बघितला .... चिमटा काढताच तो जोरात ओरडला .....समोर बघताच ...राधाच त्याला दिसली ....म्हणजे राधा खरोखर तिथे होती .....त्याच्या आनंदाला पारावर नव्हता ....त्याला कधीच वाटले नव्हते ....की राधा अशी अचानक त्याच्या घरी येईल .....खरतर ....राधाला हाताला पकडून विचारावे ....की ,कुठे होतीस तु ? गेली दोन दिवस .....तुझ्या विचाराने फक्त वेड लागायचं बाकी राहील होत ?...आणखी बरच काही बोलायचं होत .....पण ...राधाला आणी निशाला संशय येऊ नये ....म्हणून त्याने त्याचा उत्साह आवरता घेतला .....  आणी हॉल मध्ये जाऊन कबीर शी  खेळत बसला .....

              थोड्यावेळाने ....निशा च्या आणी राधाच्या गप्पा संपल्या ....आणी राधा  घरी जायला निघाली .....तिच्या मागोमाग  निशा ही राधाला दरवाजा पर्यंत सोडायला निघाली .....जाता जाता  अर्जुन कडे एक नजर टाकत राधा ने स्मित् हास्य केले ....    अर्जुन ची तर राधाला बगताच भालिमोठी स्माईल चेहऱ्यावर आली होती ....   

                  राधा निघून जाताच .....अर्जुन ने माहिती काढण्याच्या उद्देशाने  निशाला  .....ही बाई कोण आहे ? आणी ती का आली असे विचारले ? .......

                 निशा ने ही अगदी सहज उत्तर दिले .... अरे.....ती राधा ....आपल्याच बिल्डिंग मध्ये राहते ....तिच्या घरचे  कुठे  देवस्थानाला गेलते ....ते आता परत आले आहेत ....म्हणून त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे ....त्याचेच आमंत्रण दयाला ती आली होती .... 

                निशाच्या मनातील काढण्यासाठी .....अर्जुन ने हळूच विचारले .....मग तु जाणार आहेस का ? ....खरतर अर्जुन ला ही माहित होते ....की ....निशाला ह्या सगळ्यात अजिबात रस नाही .....खरतर तिला  ह्या धार्मिक विधीचा तिरस्कारच आहे .....त्यामुळे तिचे उत्तर नाहीच असणार ...पण तरीही पाण्यात एक खडा मारावा ...लागला तर लागला .....ह्या हेतूने शेवटी त्याने विचारले .   

            पण निशाचे उत्तर अगदीच अनपेक्षित होते .....अर्जुनचा अंदाज चुकला ......  निशा ने  राधा च्या घरी सत्यनारायणाला जाणार अस सांगितलं ....आणी  फक्त तिच नाही तर  अर्जुन आणी कबीर ला ही तिच्या सोबत यावं लागेल अस सांगितलं ..... 

               निशाच ते बोलण ऐकून .....अर्जुन ला हा एवढा चमत्कार कसा झ्हाला काही कळलेच नाही .....ही जादू ही राधाचीच असणार .....राधानेच ....निशाला सत्यनारायणाच्या पूजेला यायला आणी सोबत अर्जुन ला आणी कबीर ला घेऊन यायला तयार केले असणार ......नाहीतर ...ही निशा असल्या कार्यक्रमाला येणार .....     

               खरच राधा .....यु  र .....सिम्पली ग्रेट .....तुझ्याकडे नक्कीच  जादूची कांडी आहे ....जी फिरवतच सगळं जग बदलत .... अर्जुन च्या तोंडून नकळत  शब्द बाहेर पडले .......निशा ऐकताच ....काही बोललास का तु अर्जुन ? ....... पुन्हा भानावर येत ....नाही ग......मी फक्त एवढच बोलत होतो ...की त्या एवढ्या बोलवायला आल्यात ...तर आपण सगळे जाऊ सत्यनारायणाच्या पूजेला ......सोबत कबीर ला ही घेऊन जाऊ ....... आपण आपल्या घरात असे काही कितीतरी वर्षा पासून केले नाही ...आणी ह्या पुढे ही काही करू ह्याची शाश्वती नाही ..... अर्जुन हलकेच बोलून गेला ....

                    चिडवतोस मला ....अर्जुन च बोलण ऐकून ...निशा बोलली ....

                    नाही ग .....अस बोलतोय .....

             त्या राधाने एवढ्या आग्रहाणे बोलावलं ....की  नाही बोलूच शकले नाही ......तिच्या बोलण्यात न अनोखी जादू आहे .....त्या जादुणेच तीने माझं मन वळवल् ....नाहीतर माझं मन  वळवण ....फार अवघड आहे .... निशा बोलली ....

              हे माझ्याशिवाय कोणाला माहीत असणार .....अर्जुन बोलला ....आणी मग दोघे ही हसू लागले .....