kshana sonyacha jhala,, krushna yashodecha jhala. bhag 5 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ५

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ५

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला. भाग पाचवा.मागील भागावरून पुढे…

निखील आणि अपर्णा यांचं लग्न होऊन आता दोन महिने होत आले होते. सगळं घर आलेल्या नवीन सदस्यामुळे आनंदी होतं. अपर्णा होतीच तशी लाघवी. सगळ्यांना धरून चालायचं हे आई वडिलांनी तिन्ही मुलींच्या मनावर छान बिंबविलं होतं.

अपर्णा आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागत होती.

त्यादिवशी दुपारी सगळे जेवायला बसले पण अपर्णा चं ताट न दिसल्याने निखीलच्या आईने विचारलं,

" अपर्णा तुझा उपवास आहे?" निखील च्या आईनी विचारलं.

" नाही.का?" अपर्णा नी उत्तर दिलं.

" अगं मग तुझं ताट नाही इथे."

" आई तुमचं सगळ्यांचं होऊ द्या मग मी जेवीनं." अपर्णा म्हणाली.

" तू का शेवटी जेवणार?" निखीलच्या बाबांनी विचारलं.

" मी थांबते नं."

" कोणासाठी? निखील तर जेवायला बसला आहे.निखील अपर्णाला जर नंतर जेवायचं असेल तर तू ही थांब. तिच्याबरोबर जेव. आम्हाला दोघं वाढा. आम्हाला आज लक्ष्मी नारायणाच्या हातून जेवायला मिळणार."

बाबांनी असं म्हणताच निखील पानावरून उठला.अपर्णा या प्रकारामुळे अवघडून गेली.

" बाबा निखील ना जेवायला बसू द्या.मी थांबते."

"तू कोणासाठी थांबतेय तेच विचारतोय." बाबांनी

विचारलं. अपर्णाला काय उत्तर द्यावं कळलं नाही.

"अपर्णा आमच्याकडे आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो.शांतपणे एकमेकांशी बोलायला आणि एकमेकांची विचार पूस करायला ही योग्य वेळ असते.माझी आई आजकाल आमच्या बरोबर नाही जेवत. वय झाल्यामुळे ती अगोदर जेवते. आम्ही एकत्र जेवतो. तू सून आहेस. नवीन आहेस म्हणून मागून एकट्यानीच कशाला जेवायचं? चल तूही बस. सगळे खोळंबलेत."

मग अपर्णाही जेवायला बसली. जेवताना हास्यविनोद चालू होते. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालू होत्या.काय गप्पा चालू होत्या हे अपर्णाच्या कानी पडतच नव्हतं.ती तिच्याच तंद्रीत होती.

'किती मोकळ्या विचारांचं सासर आपल्याला मिळालं हे आपलं ठेवणं मोठं भाग्य आहे. इतरांकडे नको ती शिस्त असते.त्या शिस्तीचे बंध इतके काचतात की एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही. आपल्या सासरी आनंदाची कारंजी सतत उडत असतात. सुखाचं तोरण दाराला लागलंय.

हास्यविनोदात जेवणाचा अंक कसा सरकला हे अपर्णाला कळलही नाही.

आज निखील आणि त्याचा लहान भाऊ नयन दोघांना रवीवारी सुट्टी असल्याने दुपारच्या जेवणासाठी दोघं घरी होते.***जेवणानंतर आईबाबा दुपारची वामकुक्षी साठी आपल्या खोलीत गेले. आजी त्यांच्या खोलीत जप करत बसल्या होत्या. त्या दुपारी झोपल्या तरी मोजून दहा मिनिटे झोपायच्या.

"अपर्णा बाहेर कुठे जाऊया?" निखील नी आज सुट्टी असल्यामुळे  विचारलं

" कुठे?" अपर्णानी विचारलं.

" सिनेमाला जाऊ."निखील म्हणाला.

" नको." अपर्णा नी नकार दिला तर निखीलला आश्चर्य वाटलं.

" काग तुला सिनेमा बघायला आवडत नाही?"

" आवडतो पण सध्या आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतोय नं.मग त्यात सिनेमाला गेलो तर बोलता कसं येईल."

"अपर्णा किती समजूतदार आहेस.मला अशीच सहचरीण हवी होती.चल आपण गप्पा करु.कोणता विषय मिळतो बघू." असं म्हणत निखील नी अपर्णाच्या गालावर हलकेच थोपटले. तेव्हाच नयन जोरात खोकला.ते ऐकून अपर्णा लाजून खोलीकडे धावली. निखीलनी डोळे वटारून नयनकडे बघीतले आणि मग तोही आपल्या खोलीत गेला.

***"अपर्णा आमच्या घरी खूप मोकळं वातावरण आहे.मला आणि नयनला प्रत्येक गोष्टीत आईबाबा सहभागी  करून घ्यायचे.

त्यामुळे एक पारदर्शक नातं आमच्यात तयार झालं. आम्ही दोघांनीही लहानपणापासून कोणतीच गोष्ट आईबाबा आणि आजी पासून लपवली नाही. आपल्याला रागावले जाऊ शकतं हे माहिती असलं तरी खरं बोलायचो. आईबाबांनी कधी मारलं नाही. आमची चूक दाखवून त्याचे परिणाम समजावून सांगितले.

आईबाबांबद्दल खूप विश्वास असल्याने त्यांच्यापुढे कधी खोटं बोलायची इच्छा झाली नाही. तुला सुद्धा ते आपली मुलगीच मानतात. दोघांनाही मुलींची आवड आहे ती आता तुझ्यामुळे पूर्ण होईल." निखीलचा प्रत्येक शब्द ऐकताना अपर्णाला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटू लागला.

" मला तुमच्या आईबाबांची मुलगी व्हायला आवडेल.मी तसा प्रयत्न करीन. मी किती भाग्यवान आहे मला दोन आईवडील आहेत. एक जन्मदाते दुसरे ते ज्यांच्याशी रक्तानी मुलीचं  नातं नसलं तरी सुनेचं नातं आहे पण सुनेऐवजी मुलींची नातं निर्माण होईल." एवढं बोलून अपर्णा इकडे तिकडे बघू लागली. तिच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकतोय असं निखीलच्या लक्षात आलं.

निखील नी हळूच अपर्णाचा हात हातात घेऊन त्याचं चुंबन घेतलं.त्या चुंबनामुळे अपर्णाच्या शरीरात वेगानी निखील बद्दल असलेली ओढ दौडत गेली. तिनेही तिच्याही नकळत निखील चे हात हाती घेऊन त्याचं चुंबन घेतलं.

निखीलच्या लक्षात आलं अपर्णा आता थोडी मोकळी होते आहे. हळुवार पणे तिला आणखी मोकळं करायला हवं हे निखीलच्या लक्षात आलं. दोघही एकममेकांच्या हातात हात गुंफून एकमेकांशी शब्दांशिवाय बोलत होते.

बाहेर टिव्ही वर  " शुक्रतारा मंदवारा ….हे गाणं लागलं होतं.ते गाणं ऐकता ऐकता कधी अपर्णा निखीलच्या मिठीत शिरली हे तिलाही कळलं नाही तसंच निखील लाही कळलं नाही.

—-----------------------------------------------------क्रमशःनिखील अपर्णाच्या संसाराची वेधक आणि वेगळी वळणं कशी आली हे पुढे वाचू या.' प्यासी नदी भाग पाचवा.