The 89 days in Marathi Love Stories by Uday Khedkar books and stories PDF | ते ८९ दिवस

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

ते ८९ दिवस

पहील प्रेम, हे प्रत्येक व्यक्तीला होते, पण कोणी व्यक्त होत तर कोणी नाही, त्याच पहीलं कारण खर प्रेम success कोणाचेही होत नाही, हा मात्र जो खरं प्रेम करतो त्याला काही अपेक्षा नसतात, माझही थोड तसच. प्रत्येक खर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच एक स्वप्न असतं, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्या सोबत एक थोड आयुष्य संपाव, तिला आपल्याकडून शक्य होईल तेवढ जपण्याचा प्रयत्न करतो . हा मि म्हणतो प्रेम ही संकल्पना चुक नाही पण ह्या फसवणार्या जगात आपल खर प्रेम आहे, हे समजावून सांगणे फार आवघड झालय. हा मात्र काही लोकांची चांगली मैत्री असते, एक घट्ट नात असत म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत.. आणि मि एक तिला सांगण्यासाठी नेहमी उत्सुक असायचो..

चला तर मग पाहुयात नक्की ८९ दिवस कसे गेलेत.. आज वयाच्या २६ व्या वर्षी मला प्रश्न पडतोय कि त्या व्यक्तीसाठी थांबाव कि, करावी नवीन आयुष्याला सुरवात. आणि हा प्रश्न आता मला पडलाय, आदित्य च्या २५ व्या वाढदिवसाच्या वेळेस. माझा त्यावेळी झालेला एक विशवासु, प्रामाणिक, आणि आजुन काय सांगाव तर हक्काचा खांदा, माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान असणारा, सोबत त्याची प्रेयसी श्रृतिका आणि अक्षय व कृतिका असे आम्ही ५ जण त्याठिकाणी होतो, आता आम्ही सगळेच वाट पाहत होतो. आदित्यच कोणीतरी स्पेशल व्यक्ती येणार होती. आमच्या ति येईपर्यंत गप्पा सुरू होत्या, आमची एकमेकांशी चांगली ओळख होती. परंतु कार्तिकी आमच्यामध्ये थोडी नविन होती. तिचाच परिचय चाल्लेला.
तेवढ्यात happy birthday addu असा गोड आवाज आला. माझ्या ओळखीचा पण कितीतरी वर्षे न ऐकलेला.
सर्वांच्या नजरा काव्याकडे मात्र माझी नजर खाली टेबलावर
असणाऱ्या मेनुकार्डवर झाली. आणि डोळ्यातुन अलगद आश्रुचा थेंब त्यावर पडला. ज्या ठिकाणी प्रेम खर आणि प्रामाणिक असेल ना तिथ रडायला येतच. माझी वर पहायची ताकद होत नव्हती. आणि ति समोर असलेल्या मुळे तेथुन उठायची हिंमत... कसबस स्वतः च स्वतःला आधार देत होतो. माझ्याकडे काव्यान पाहिल्यानंतर मला कायतरी होत असाव असे तिच्या ते लक्षात आलं. आणि आदित्य कड तिन पाहुन तिन माझाकड इशारा केला.. त्याने सहज पण जोरात हात दाबुन मला धीर दिला. आणि पाणि माझ्याकडे सरकवले, आता हे फक्त आम्हा तिघांना माहीत होत, काय परिस्थिती आहे. तिही थोडी घाबरलीच, तेवढ्यात आदित्य म्हणटला तु उभी का आहेस, खली बस तिला लगेच समजल त्याला नक्की काय बोलायचय, ती बसली आणि एक बस मधिल गम्मत सांगू लागली, मी ट्युशु ने अलगद डोळे पुसले आणि वर पाहिले, माझे लक्ष्य तिच्याकडे गेले, तिचेही ती सांगत असलेल्या कथे पेक्षाही माझ्या कडे जास्त लक्ष होते.. आणि नकळत आमची नजरानजर झाली, तिच्या डोळ्यात मला आश्रु आणि जिव्हाळा दिसत होता, आमच्यामधी क्षणभर हे सुरुच होते, तेवढ्यात हे सर्व मोठ्या मोठ्याने हसु लागले.. ति सुद्धा हसु लागली, माझे लक्ष्य तिच्या त्या सांगण्यावर मुळीच नव्हते. त्यामुळे मला त्यांचा जोक कळालाच नाही, मि म्हणटल तुम्ही ऑर्डर द्या तो पर्यंत मि फ्रेश होऊन येतो., काव्यान रागाने addi कड पाहिल. तो उठला आणि माझ्या पाठोपाठ येऊ लागला.. मि रडता रडता तोंड धुवत होतो.. आदित्य मला विचारत बाळा हे काय चाललय सगळ, मी तोंडावर रुमाल फिरवुन त्याला जोरात मिठी मारली, तो मला पुर्ण पणे सावरायचा प्रयत्न करत होता.. तो मला सावकाश म्हणटला हा बर्थडेला ईथे येईचा पूर्णता प्लॅन तिचा आहे, आणि तु अस केल्यानंतर कस होईल, तुझ्यासाठी आलीया ती... आता तीही आमच्या जवळ आली होती, आम्ही तिघेही आता शांत उभे होतो.
तीने मला प्रश्न केला. बरं वाटतंय का? मि मानेनिच होकार कळवला.

माझे पुर्ण लक्ष खाली होते. सहज नजर तिच्या पायांवर गेली. मि तिच्या घेतलेल सेम पैजन तिच्या पायात मला दिसले.

ती " हो मिच केलेत सेम असे तुला आवडायच ना. कस असत ना यश माणुस आपल्या पासुन कितीही लांब गेला ना तरी आपण त्याच्या आवडी विसरायच्या नसतात.

मी : तु आजही हे सर्व

ती : हो मला आवडत आजही तुझ्या आठवणीत रमून जायला, ते दिवस आठवतात आजही मला, मला प्लिज माफ कर यश.

मी : तस नसत बाळा काही, आपण दोघेही एकमेकांच्या जागी योग्यच होतो. मात्र वेळेची थोडी फेरफार होती... मी : आणि हो खरंतर sorry मि म्हणायला पाहिजेन माझ्यामुळे आपल नात संपत गेले, तिलाही आता रडू येत होत..

आदित्य ही तिथुन कधीचा निघुन गेला होता,
मी : मग कशी आहेस ? सगळ ठिक आहे ना,

ती : हो रे ! सगळ ठिकच आहे. पण आहे ना, सतत
काहीतरी हरवल्या सारख वाटत असत.. कित्येक रात्री हे आठवत मन करत तुझ्याशी बोलाव पण आता पहील्यासारख आता काही राहील सुद्धा नाही...

मी: तस काही नाही ग, मी तुझ्यासाठी तोच आहे. कधीही वाटल ना बिनधास्त फोन करत जा, बोलल्याने मनावरचा बोज हलका होतो,

ती : हो, sorry हा सर्व प्लन माझा होता. तुला इथे बोलवण्याचा व यातल काही कळून न देण्याचा,, आपण त्यानंतर काहीसे एक दोन वेळेस दिसलेलो..

मी : पण हे आदित्यला कोणी (मि बोलत होतो तेच ती)

ती : त्यानंतर मला बाहेर पडायला खुप त्रास झाला.. त्यावेळी त्यानेच धीर दिला.

मी आता बोलताना तिला काहीसे टाळत होतो. कारण मि आजही त्याच जागी गुंतलेलो होतो.

ती : आता सगळ ठिक चाललय ना? मी फार चुकीच्या टाईमाला बोलायचे बंद झाले.. माझ्यामुळे खुप त्रास झाला ना..

मी : नाही फार नाही. थोडा पण आज सगळ एकदम ठिक चाललय..

ती : मि आदित्यला विचारायची काय चालायच तुझ पण तो
कायम त्याच सगळ संपत चालललाय सांगायच..मि : बर सोडा ते आपण बसुयात..

ती : हो. आणि एक ना आपण हे झाल्यानंतर बाहेर जातोय. मिटींग वैगरे नाही ना.

मि : आज काहीच नाही. ( ती लाजतच बोलली गप रे) आम्ही जाऊन बसलो. सगळ उरकल तेथुन आता आम्ही सोबत जाणार होतो. ठिकाण मला माहीत नव्हते..

पण आजही तेच घडल. आम्ही निघालो काय आणि तिला घरुन फोन आला.. कुठे आहेस, (ती काही न बोलताच) पटकन घरी ये असे ऐकल्यानंतर ती हो म्हणटली...

ती : sorry for everything मला पटकन घरी जाव लागणार आहे.. तुझा तोच नंबर आहे ना. मि तुला कळवेल आपण कधी भेटतोय..

तशी ती तेथुन निघाली.. आजही तीने मला तिचा नविन नंबर दिला नव्हता.. तासा नंबर नविन नव्हताच. माझा पाठ होऊन 6 वर्षे झाली होती. फक्त तीन सांगायची वाट पाहत होतो..

मि तिथुन निघताच साईटवर पोहचलो. गाडीमधुन खाली उतरताच सोहम चा आवाज आला. पेढे आणा साहेब पेढे सोहम म्हनजे माझा साईट कंट्रक्शन चा मॅनेजर आजही ती जातानी मला काहीतरी लक देऊन गेली असावी. असे माझ्या लक्षात आले.. सर तुम्हाला माहीती आहे का, आपण ज्या गोष्टींची वाट पाहत होतो ते झालय, गांधी कंट्रक्शन नी आपल्याला ५०%पार्टनर साठी हात पढे केला आहे.
मि तुम्हाला किती कॉल केलेत. एक पण उचल्ला नाही.

मी: अरे बॅटरी डाऊन झाली आहे..

पण तीच्या सोबत जायच असल्याने मिच स्विच ऑफ करुन ठेवला होता.तिच्या मधील जादु आज पुन्हा माझ्या समोर उभी होती. अणि मि विचारात पडलो, की तीला पटकन घरी बोलावले काय झाले असेल. मनात अनेक विचार भटकत होते. फोन स्विच ऑफ चा काढुन साईटवर चक्कर मारायला गेलो.. ती बहुतेक आजही मि whattsp वर आनलाईन येयची वाट पाहत असावी. कारण मि आनलाईन जाताच मला एका अननॉन नंबरनी एक फोटो आला..

तो तिचा फोटो होता आमच्यात ठरलेला पासवर्ड होता..

ती : कुठय (आजही पहिला तोच मेसेज होता)

मी : साईट वर.काय झालय अचानक पणे घरी बोलावले

ती : काही नाही दिदि आली होती, तिला पुन्हा जायच होत

मि : ओके !

ती : Tayping.....

मि विचारात पडलो, काय टाईप करत असावी

ती: आज एका भेटीत खुप सगळ मिळाल्यासारख वाटल दुरावताना काहीतरी हरवलेल्यासारख आठवतय....

मि :🥺❤🌎

ती : मला खुप आठवण येतीय तुझी, मला भेटायचय मि
पुन्हा उद्या चालली आहे राजस्थानला..

मला पुन्हा मनात भिती वाटु लागली, अंगावर ताप येत होता

ती : भेटतोय ना आपण

मी : हो मी येतोय तुला घेईला ! रेडी हो ३० मिनटात

ति : हो आवरते..

मला आवरण्यासाठी घरी जावे लागणार होते, पण माझ्याकडे एवढा टाईम नसल्याने मि ऑफिस वरतीच उरकुन निघालो, फोनमध्ये पाहता टाईम ५ मिनिटे झाला होता. माझ्याकडे २५ मिनटे उरली होती फक्त....

त्यामध्ये मला माझ्यासाठी शर्ट व तिच्यासाठी काहीसे गिफ्ट्स घ्यायचे होते.. पुढे जाऊन मि एका मॉल बाहेर थांबलो. मला शर्ट घेऊन चेंज करुन तिच्या गिफ्ट्स च्या शोधात निघालो.. मि पटकन झुमके चॉइस करून, चॉकलेट आणि केक घेतला, व निघालो..

मी : हॅलो, कुठे आहेस.

ती : sorry..! sorry..! निघलीय घरुन बाबा मि : गाडी आनतीस का कुठे पार्क करणार आहेस..

ती : जोशी काकांच्या शॉप समोर

मि : हो आणि गाडी सावकाश चालव

ति : हो रे...!

मि तो पर्यंत तिथपर्यंत पोहचलो होतो. सहज आरश्यात पाहता ति पाठिमागुन येताना दिसली.. लांब वाऱ्यावर उडत असणारे तिचे सडपातळ केस, चेहऱ्यावर मेकअप नकरताही चमकनारे तेज, भाळावरती कुंकू चा छोटासा टिका, कानामध्ये नक्षीदार झुमके, आणि रेड कलर चा टॉप ती गाडी लावत होती, तरीही माझ लक्ष तिच्यावर होते.. ति जवळ आली.. टक्, टक् ति दरवाजा उघड म्हणत होती.. मि दरवाजा उघडला, ती बसली

मि : मग कूठे जायच मॅडम,

ती : तुम्ही म्हणसाल तिकडे

गाडी काढली सुसाट वेगाने शहराबाहेर असणाऱ्या डोंगराकडे घेतली,

आम्ही तिथे जाईपर्यंत एकमेकांसोबत बोललो नव्हतो. मि तिला दोन मिनिटे म्हणटलो, आणि उतरलो, पाठिमागे ठेवलेला तिचा आवडता केक व चॉकलेट पुढे घेऊन गेलो..

मी : तुझा बर्थडे आहे, पुढच्या आठवड्यात आणि तु इथे नसणार म्हणुन आजच सेलिब्रिट करुयात..

ती : तुला आजही माझा वाढदिवस लक्षात आहे, मि विषय बदलत चला केक कट करूयात पचन आपल्याला उशीर होईल.

ती : thanks yashh

मि तिला छोटस हस्य दिल..

मि तिला चॉकलेट दिल्या

ती: किती करणार आहेस आजुन माझ्यासाठी बास ना आणि जोरात मिठी मारून रडू लागली.. बाळा आपण किती जरी एकमेकांपासून दूर झालो ना तरी भेटत राहु..
ती : आज म्हण कि मला बयको जस पहिलं म्हणायचा सेम तस.

मि तिच्यापासुन दुर होत गेलो एका मोठ्या दगडावर जाऊन बसलो.. आणि बायको.... बायको.... बायको....

ती तोंड वाकडं करीत पण आर्धी हक्काचीच ना, मी : (जोरात हसलो), नाक लाल झालेल दिसतय कोणाचतरी..

ती : मला काही गिफ्ट नाही आणलं..

मि : आजिबात नाही,

तु आजपर्यंत माझ्याकडून काही घेतलचं नाही.. मग कशाला मि तरी आणु

मि उठलो आणि गाडीतून ती गिफ्ट ची बॅग बाहेर काढली

मी : काय असेल बरर

ती : मला माहीत नाही, सांग की

मि : पहिल्या वेळी काय नाकरल होत

ती : आय्या झुमके...!

मि : मानेनिच होकार कळवत, हम् केल

मि : आजपण आठवण येती का माझी..

ती : आजिबात नाही. पण हो

जेव्हा जेवलीस का विचारायला कोणी नसत ना, तेव्हा आठवण येती. जेव्हा आनंदाची काही गोष्ट कळतेना, तेव्हा आठवण येते. जेव्हा रडावस वाटत पण जवळ कोणी नसत ना, तेव्हा आठवण येते. पण यार भारी होते ना ते ८९दिवस...
मी: म्हणजे तु पण ८९ दिवस मोजलेत..

ती : हमम

ती : आपले बर्थडे पण याच दिवसात येऊन घेले ना..

मि : हो ना आणि तुझा प्रत्येक बड्डे चा खर्च आजुन बाकी आहे..

ती : कशाला अंगावर काहि ना काहीतरी डाग पाडून घेईला.. मला तुझ आता हळू सगळे नाटक लक्षात येउ लागलेत..

मि : पण यार किती खुष होतो ना आपण त्यावेळी..

ती : हमम., थांब तुझ्यासाठी काहीतरी आणलय ति उठून गाडी कडे गेली, आणि तिची पर्स घेऊन आली.. मि विचारात पडलेलो काय आणल असेल एवढ्याश्या पर्स मधी.. तिन पर्सच चैन उघल

ती : तुझ्यासाठी तेव्हा घेतलेल मि हातात घेत माझ्या हताला लावले.. आणि दोघेही जोरजोराने हसु लागलो..

कारण ते आज ६वर्षाने मला देत होती.