Balatkaar - 2 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बलात्कार - भाग 2

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

बलात्कार - भाग 2

बलात्कार कादंबरी भाग दोन 
           सुनीता नोकरीवर नियुक्त झाली होती. तिला वेदना देणारा तो नराधम पदोपदी तिला आठवत होता व त्याला शिक्षा केव्हा केव्हा देतो आणि केव्हा केव्हा नाही. असं तिला होवून गेलं होतं. परंतु तसं तिला वाटत असलं तरी त्याची ताकद फार वाढून गेली होती. कारण त्याला आता मंत्रीपद मिळालं होतं. परंतु कायद्यासमोर सगळे अंतरी, मंत्री, संत्री समान असतात. परंतु प्रत्यक्ष पुरावा हवा हेही तिला माहीत होतं.
           गुणवंतनं तिच्यावर बलात्कार केला होता हे तिला माहीत होतं व तीच त्या खटल्यातील प्रत्यक्ष साक्षीपुरावा होती व त्या तिच्या खटल्यातील तिच्या झालेल्या तपासण्याही तिच्याजवळ होत्या. परंतु तो खटला केव्हाचाच बंद झाला होता व ती त्या खटल्याला पुन्हा उघडू पाहात नव्हती. मात्र ती तिही संधी दवडू शकत नव्हती की सध्या कोणावर बलात्कार झाल्यास व तसं आढळल्यास त्याचा सुत्रधार तो गुणवंत असेल.
          सुनीतावर बलात्कार झाला होता व तिनं आपल्यावर झालेल्या बलात्काराचा नाद सोडून दिला होता. परंतु तिनं जरी आपल्यावर झालेल्या बलात्काराचा नाद सोडला असला तरी तिनं तपास मात्र सोडला नव्हता. आज तिला आठवत होतं, तिच्यावर बलात्कार झालेलं ठिकाण. त्यातच वाटत होतं की कदाचीत त्याच ठिकाणी त्यानं आणखी एखादा अपराध केला असेल वा तिच्यावरील बलात्काराचा एखादा तिचाच पुख्ता पुरावा सोडला असेल, की ज्यातून गुणवंत पकडला जाईल. बस, तोच विचार येताच तिनं लागलीच एक दिवस आपली गाडी काढली. दोनचार शिपाई सोबत घेतले. ज्यात काही महिलाही होत्या व ती त्या ठिकाणी रवाना झाली. जिथं तिच्यावर त्यानं बलात्कार केला होता.
         ते ठिकाण. ते ठिकाण पार बदलून गेलं होतं. कारण आज तिच्यावरील बलात्काराच्या घटनेला तब्बल कितीतरी वर्ष ओलांडले होते. पार बदलून गेलं होतं. तसं आज ते ठिकाण तिला स्पष्टपणे आठवत नव्हतं. मात्र त्या ठिकाणाची पुसटशी आठवण होती. तसं तिला ते ठिकाण शोधायला जास्त वेळ लागला नाही. तसं पाहिल्यास तो त्याच परीसरात नित्यनेमानं निवडून येत असे. तसा त्यानं इतर भागातील विकासही केला होता. परंतु त्यानं या भागातील विकास केला नव्हता. ज्या भागात तो कारनामे करीत असे. 
         सुनीतानं आपली गाडी काढली व तिनं त्या भागात, त्या भागाची शहानिशा करण्यासाठी जशी त्या भागात आपली गाडी फिरवली. तशीच एक महिला कर्मचारी तिला म्हणाली,
          "मॅडम, आपण या भागात का जात आहात? हा भाग भुताचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणतात की या भागात नाल्याजवळ भुतं थयथय नाचतात व ते त्या भागात जोही जातो. त्याला मारुन टाकतात. आपण कृपा करुन त्या भागात जावू नये. नाहीतर आपलाही जीव जायचा. 
           सुनीत त्या भागात जात होती. तशी तिच्याच गाडीत असलेली ती एक महिला कर्मचारी बोलताच ती म्हणाली, 
           "हे बघा, भुतं गितं काहीही नसतातच. आपल्याच जातीची माणसं आपले वाईट कृत्य करण्यासाठी तसा देखावा करतात. तेच सांगतात भुतं असतात म्हणून. कारण भुतांची जर भीती दाखवली तर कोणीच त्या भागात जाणार नाही व त्यांना त्यांचं काम करणं सोयीस्कर जाईल."
         सुनीताचं ते बोलणं. त्यावर ती महिला कर्मचारी चूप बसली. अशातच तो नाला आला व ते ठिकाणही. त्यानंतर तिथं गाडी थांबली. सुनीतासह पुर्ण तिचा स्टॉप गाडीतून उतरला व ते शहानिशा करु लागले. ज्यात एक नुकतीच कोणीतरी टाकलेली व ताजीतवाणी असलेली लाश मिळाली. 
         सुनीतानं त्या प्रेताकडं पाहिलं. प्रेत एका लहान मुलीचं होतं. जी कोणत्यातरी शाळेतील असेल असं वाटत होतं. त्याचं कारण होतं तिच्या अंगावरील कपडे. जे कपडे म्हणजे त्या शाळेतील शाळेचा पोशाख होता. ज्यावर त्या शाळेचं नाव लिहिलं होतं. तसा त्या मुलीचा चेहरा ओळखू येत नव्हता. कारण त्या मुलीच्या चेहर्‍यावर ॲसिड टाकून आरोपीनं तिचा चेहरा विद्रूप केला होता. तसं माहीतच पडत होतं की तिच्यावरही गुन्हेगारानं बलात्कारच केलेला आहे व तिला मारुन टाकलेलं आहे. शिवाय चेहरा ओळखू येवू नये म्हणून तिच्या चेहर्‍यावर ॲसिड टाकून तिचा चेहरा विद्रूप केलेला आहे. मात्र गुन्हेगार तिचे कपडे नष्ट करायला विसरला होता. ज्यात त्या मुलीच्या शाळेचं नाव होतं. 
         त्या भागात त्या मुलीसह बरेचसे कंकाल होते. ते पाहून एक पोलीस म्हणाला, 
          "मॅडम, हे एखाद्या जंगलातील प्राण्याचं काम दिसतं. तोच गावात हल्ले करुन गावची माणसं इथं आणून खात असेल. ज्याचे हे कंकाल दिसत असतील. मला नाही वाटत की एवढी माणसं एखाद्या माणसानं केलेले असतील. आपण त्याचा नाद सोडावा व निघून जावं इथून."
         त्या पोलिसाचं ते म्हणणं. तशी सुनीता निरीक्षणच करीत होती त्या प्रेताचं. तसं तिला जाणवलं की जर एखाद्या हिंस्र प्राण्यानं या लोकांना इथं आणून खाल्लं असतं तर या प्रेताची हाडं छिन्नविछिन्न पद्धतीनं इकडंतिकडं पसरली असती तुकड्याच्या स्वरुपात. परंतु ही सलग आहेत. याचा अर्थ असा की हे काही एखाद्या प्राण्याचं काम नाही तर हे एखाद्या माणसाचंच काम आहे. तसं तिच्या लक्षात येताच ती म्हणाली, 
         "हे बघा, मित्रांनो, या लाशाकडे जरा बारकाईनं पाहा. या लाशा आपल्याला खुणावून सांगत आहेत की त्यांना एखाद्या प्राण्यानं मारलेलं नाही तर त्यांचा जीव माणसांनीच घेतलेला आहे. तेही साजीश करुन. कोणीतरी नक्कीच हे कृत्य करीत असला पाहिजे व या लाशा इथं आणून फेकत असला पाहिजे. ज्यात त्या लाशांना गाडायचीही गरज नाही आणि या लाशांची विल्हेवाटही लावायची गरज नाही. तशी भीती आहेच आपल्याला की इथं भूतं असतात शिवाय जंगली प्राणीही इथं वावरत असतातच स्वैरभैरपणानं." 
         "परंतु मॅडम, आपण असा तर्क कसा काय लावताय? हे प्राण्यांचंकाम नसेल कशावरून?" एका कर्मचाऱ्यांनं आपली शंका व्यक्त केली.
         "हे बघा या लाशांकडं बारकाईनं. या या प्रेतांचे तुकडे झाले आहेत का? ते तुकडे विखूरले आहेत का? नाही ना. अहो, जर हे प्राण्यांचं काम असतं तर हे तुकडे विखूरलेले असते. कुणाचे पाय तर कुणाचा हात दूरवर फेकला गेला असता. हो की नाही."
          सुनीताचं तसं बोलणं. त्यावर आश्चर्य व्यक्त करीत सर्वजणांनी तिच्यात हो ला हो मिळवलं. मात्र एक महिला पुन्हा शंका व्यक्त करीत म्हणाली, 
          "मॅडम हे भुताचंच काम आहे. मी मगाशी म्हटलं ना."
           "कसे बोलताय आपण. आपण एवढे शिकलेलो आणि त्याच शिक्षणाच्या आधारावर आपण नोकरी मिळविलेली. अहो, जर आपण प्रत्येक गोष्टीलाच वा खुनालाच तो खुन एखाद्या भुतानंच केलं असं म्हणत सोडून देत गेलो तर खुन करणारी मंडळी सक्रीय होतील. ते खुन करीत सुटतील व नाव भुताचं करतील. हे बघा, आपलं काम शहानिशा करणं आहे की नाही की बस हे काम भुतानंच केलं, असं समजून सोडून द्यायचं व आरोपीला मोकाट फिरायला संधी मोकळी करुन द्यायची."
          सुनीताचं बोलणं संपलं होतं. त्यानंतर ती चूप बसली होती. मात्र तिच्या त्या एकंदर सर्व बोलण्यानं सर्वांचं समाधान झालं होतं. त्यानंतर सुनीतानं त्यातील दोन चार प्रेते तपासणीकरिता पाठवली. कपडे ताब्यात घेतले व वृत्तपत्रात ती बातमी पहिल्याच पानावर छापून आणली आणि सांगीतलं की गुन्हेगार हा गुन्हा करायला तिथं पुन्हा जाईलच. तेव्हा आम्ही त्याला पकडूच. परंतु तेव्हापर्यंत सर्वांनी शांतता ठेवावी. 
         तो परीसर हा गुन्हेगाराचा खुन करण्याचा अड्डाच होता. तिथं असे बरेचसे कंकाल पडले होते की ज्यात पुरुषांचेही कंकाल होते. तशी सुनीता विचार करीत होती की महिलांचं ठीक आहे. परंतु पुरुषांचे कंकाल. परंतु ती विचार करीत असतांना तिला सत्य गवसत नव्हतं. मात्र सुनीतानं ते प्रेत ताब्यात घेतलं. त्यातच दोनचार जुनी प्रेतही ताब्यात घेतलीत. ज्यात काही पुरावे मिळणार असल्याची शंका होती. 
           प्रेतं तिथं भरपूर होती. ज्यात सुनीताला आता तपास करतांना कठीनाई जाणार नव्हती. तो तिथं प्रेते का टाकतो? यांचं कारण तिला माहीत झालं होतं. कारण तेच एक ठिकाण होतं की त्या ठिकाणावर भुतांचा अधिवास म्हणत वा जंगलातील प्राणी मारतात म्हणून कोणीही जात नव्हतं. ज्याचा फायदा गुन्हेगारानं घेतला होता. मात्र ती प्रेतं टाकणारा गुन्हेगार कोण? तसाच तो खुन का करतो आणि तो एवढे दिवस कसा लपला? हे प्रश्न अनाकलनीय होते.
           ती माहिती धक्कादायकच होती. ती सुनीताच्याच क्षेत्रातील माहिती होती व त्या ठिकाणची सध्याची खासदार तिचीच बहीण रिता होती. त्यातच त्या ठिकाणच्या जुन्या खासदाराला म्हणजेच गुणवंताला त्याचं कारण विचारल्या जात होतं. त्याचेही धाबे दणाणले होते. कारण त्यामध्ये त्याचाच हात होता. कारण त्यानच त्यातील लाशांमधील महिलांवर बलात्कार केले होते व त्याची विल्हेवाट तिथं लावली होती. त्याला वाटत होतं की तिथं कोणीच जाणार नाही व आपलं बिंगही फुटणार नाही. अन् गेलाच तर तो ते कार्य प्राण्यांचं आहे, अशी कल्पना करुन सोडून देईल. परंतु तो त्याचा विचार होता. झालं उलटंच होतं की जे त्याच्या मनाला पटत नव्हतं. शेवटी तो आज सरकारमध्ये होता आणि लोकांनी तो मुद्दा पकडून सरकारवर दबाव आणला होता. 
         गुणवंत गुन्हेगार होता. म्हणूनच त्याला वाटत होतं की जर त्या भागाची तपासणी झालीच तर तो स्वतः अख्खा त्यात अडकेल. त्यामुळं तो म्हणत होता की ते शोधकार्य करुन फालतूच पोलिसांनी वेळ वाया घालवू नये. बाकीचेही प्रश्न आहेत की त्या प्रश्नांकडं लक्ष द्यावं. आता त्या भागाचे शोधकार्य केले तरी ज्यांची मुलं मरण पावलीत. ती परत येईल काय? शिवाय ते जर शोधकार्य केलंही आणि आरोपी पकडलाही. तरीही ती ज्यांची मुलं आहेत, त्यांना न्याय मिळणार नाही. उलट त्यांना दुःखच होईल. त्यांच्या भावना जोपासायला हव्यात. जे सरकार करीत आहे. परंतु सुनीताचं म्हणणं होतं की जर त्या गोष्टीचा सुगावा लागला नाही व आपण त्या गोष्टीच्या जळापर्यंत पोहोचलो नाही तर गुन्हेगार पुन्हा गुन्हे करायला मोकळा होईल व त्याची हिंमत वाढून तो गुन्हे करतच सुटेल.
          ती घटना. ती काही साधारण घटना नव्हती. आता तिला राजकीय रंग चढला होता. कोणी म्हणत होते की सुनीताची बहीण राजकारणात असल्यानं ती तिला भडकवीत आहे. म्हणूनच ती भडकत असून त्या प्रकरणामागे लागली आहे तर कोणी म्हणत होते की तिनं तो नाद सोडून द्यावा. त्यातच विद्यमान सरकारमध्ये असलेला गुणवंत मुख्यमंत्र्याच्या कानाशी लागून तो तपास बंद करु पाहात होता. तसा तिच्यावर दबाव आणू पाहात होता. मात्र तिही आता टस ची मस होवू पाहात नव्हती. अशातच गुणवंतानं तिला धमकीच देवून टाकली की जर तिनं शहाणपण करुन जर तपास बंद केला नाही तर एकतर तिला निलंबीत केलं जाईल वा तिची बदली अशा ठिकाणी करण्यात येईल की ज्या ठिकाणाहून ती कधीच परत येणार नाही नव्हे तर तिला मारुनही टाकण्यात येईल.
          पोलीस असलेली सुनीता. तिनं अद्यापपर्यंत आपला विवाह केला नव्हता ना तिला मुलंबाळं होती. ती तर कोमातून तब्बल कितीतरी दिवसानं परत आली होती नव्हे तर तिला नवीन जीवन मिळालं होतं. तिला वाटत होतं की तिच्या हातून राहिलेलं कार्य पुर्ण करण्यासाठीच विधात्यानं तिला होशात आणलेलं असून तिला ते कार्य पुर्ण करायचंच आहे. त्याचाच विचार करुन ती त्या घटनेच्या मुळापर्यत जायचा प्रयत्न करीत होती. अशातच तिनं तिला सापडलेल्या मुलीच्या कपड्यावरील शाळेचं नाव जाहीर केलं वृत्तपत्रातून आणि त्या शाळेत जावून ती मुलगी कोण? याची शहानिशा केली. त्यानंतर तिला त्या मुलीच्या शाळेचं नाव सापडलं. तशी ती शाळेत जाताच त्या मुलीचा पत्ताही सापडला व ती मुलगी तिथं कशी गेली? याच्या जळापर्यंत जाण्यासाठी ती त्या मुलीच्या प्रत्यक्षात घरी गेली. तेव्हा तिला त्या मुलीच्या आईवडीलानं सांगीतलं की मुलगी शाळेत गेली होती. परंतु ती सायंकाळी घरी आलीच नाही व त्या घटनेला आज पुरते आठ दिवस झाले आहेत. तक्रार नोंदवली आहे. परंतु शाळेवाले तिच्या घरी आले होते व त्यांनी धमकी दिली की त्यांनी आपली तक्रार मागं घ्यावी. नाहीतर ते त्यांना सोडणार नाहीत. तसं पाहिल्यास ते फार गरीब असल्यानं ते तक्रार परत घेणार आहेत.
           सुनीतानं त्या परीवाराला सांत्वना दिली व धीर देत सांगीतलं की पोलीस आपलं कार्य इमानीइतबारे करणार आहे. आपण घाबरुन जावू नये. पोलिसांना मदत करावी. त्यांना काहीही होणार नाही. असं म्हणत सुनीता त्यांच्या घरुन निघाली. त्यानंतर तिनं तपास करण्यासाठी त्या मुलीची जिथं तक्रार दाखल होती. तेथून तिची फाईल मागितली व ती तपास करु लागली. तोच गुणवंताचा एक दूत त्या मुलीच्या घरी गेला. त्यानं सुरुवातीला त्यांना पैसे देवू केले. परंतु ते पैसे त्यांनी न स्विकारल्यानं त्यानं तिच्या परीवाराला जीवे मारण्याचीच धमकी दिली व तो परत गेला. त्यानंतर चित्र पालटलं. 
          सुनीतानं मुलीची तक्रार तपासली व त्यानुसार तपास सुरु केला. ती शाळेत जावून सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करु लागली. ज्यात असं आढळून येत होतं की त्या शाळेतील एका कर्मचाऱ्यानं ती घटना घडवून आणलेली असून तो सत्ताधारी पार्टीतील एक सदस्य आहे. ज्यात तो एकटाच गुन्हेगार नाही तर संबंधीत पार्टीतील बरेचसे नेतेमंडळीही गुन्हेगार आहेत. 
        ती घटना रोजच काही ना काही माहितीनुसार वृत्तपत्रातून छापून येत होती. काही काही धागे गवसत होते. त्यानुसारही बातम्या छापल्या जातात होत्या. मग काय, तिनं तिला प्राप्त झालेली माहिती पुन्हा वृत्तपत्रातून छापली. त्यानुसार सर्व सत्ताधारी पक्षातील बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहेत त्यांनी अतिशय वेगात हालचाली सुरु केल्या. जर हे प्रकरण वेळीच दाबलं नाही तर उद्या आपली पार्टी सत्तेत येणार नाही असं त्यांना वाटलं व त्यांनी गरिबीत जीवन काढत असलेल्या त्या मुलीच्या मायबापांवर दबाव टाकला आणि ठणकावून सांगीतलं की जर त्यांनी पोलिसांना माहिती दिली तर त्यांच्या पुर्ण परीवाराचाच खुन करण्यात येईल. अन् जर त्यांनी केस परत घेतलीच तर त्यांना मालामाल करण्यात येईल. 
        नेते हे राजकारणी होते. पैसे भरपूर होते नेत्यांजवळ. शिवाय त्यांनी त्या मुलीच्या गरीब परीवारातील लोकांना धमकी दिली होती व सांगीतलं होतं की जर ती केस परत घेतलीच तर मालामाल करण्यात येईल अन् जर ती परत घेतली नाही तर त्यांच्या संपुर्ण परीवाराचा खुनही करण्यात येईल. त्याच धास्तीनं हिंमत विखूललेला परीवार एक दिवस पोलीस स्टेशनला आला. म्हणाला की त्यांना संबंधीत खटला परत घ्यायचा आहे. 
          खटला परत घेण्याचा त्या मुलीच्या आईवडीलाचा निर्णय. त्यावर सुनीतानं बरंचसं समजावून सांगीतलं त्या मुलीच्या आईवडीलांना. परंतु त्या मुलीचे आईवडील काही ऐकत नव्हते. शेवटी सुनीता हताश होवून म्हणाली की तुम्ही जे काही करताय. त्यातून तुमच्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तरीही ते ऐकले नाहीत व त्यांनी आपल्या मुलीची परत घेतली. ज्यामुळं त्या मुलीचा जीव जावूनही तिला न्याय मिळाला नाही. तो प्रलंबीतच राहिला. पुर्ण पुरावे सापडूनही. 
         त्या मुलीचं नाव एकता होतं व एकता शाळेत जाणारी मुलगी होती. जी पाहायला देखणी असून अतिशय हुशारही होती. त्यातच अशी वर्गात असतांना शाळेचं कधीकधी नेतृत्वही करीत असे. ज्यातून ती शाळेच्या समारंभप्रसंगी भाषणंही देत असे. ती शाळा सुरक्षा व्यवस्थेची प्रतिनीधीही होती. मात्र ती गरीब होती व ती गरीब असल्यानं शाळेच्या एका कर्मचाऱ्यानं तिच्यावर डोळा ठेवला, जो कर्मचारी राजनैतिक पार्टीशी संबंध ठेवून होता. कधीकाळी जेव्हा त्या शहरात अधिवेशन व्हायचं. तेव्हा हा कर्मचारी त्या शहरात येणाऱ्या नेत्यांना मेजवाणी द्यायचा. मेजवाणीत मांसापासून तर महिलांपर्यंतचीही सोय असायची. ज्यात असे नेते मटनासह महिला कर्मचाऱ्यांवरही बलात्कार करायचे व काही बलात्कार अंगावर येवू लागताच त्यांना मारुनही टाकायचे. शिवाय त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी गुणवंतावर द्यायचे व गुणवंतही हयगय न करता त्या प्रेतांची विल्हेवाट लावायचा. ज्यातून त्याला लवकरच मंत्रीपद प्राप्त झालं होतं. 
         त्या कर्मचाऱ्यांनं त्या मुलीवर आपल्या वासनेची नजर तिच्यावर फिरवली व एक दिवस तिला गायब करुन तिला गुणवंताकडे सोपवलं. ज्यातून त्याला कोणतंतरी काम काढून घ्यायचं होतं. गुणवंतानंही त्या मुलीवर आपल्या वासनेची नजर टाकली. त्यानं त्याला असलेल्या सवयीनुसार त्या लहानशा मुलीवर वासनेची नजर टाकून तिच्यावर बलात्कार केला. एवढंच केलं नाही तर त्यानं तिला मारुनही टाकलं व तिचा चेहराही विद्रूप करुन टाकला होता. जो कोणाला ओळखू येवू नये म्हणून. परंतु तो हे विसरला होता की तिच्या कपड्यावर तिच्या शाळेचं नाव होतं.
           गुणवंत नशीबवान होता. कारण ते प्रकरण दाबण्याचा गुणवंताचा डाव. त्यातच त्यानं शाळेच्या माध्यमातून एकताच्या मुलीच्या वडीलांकडे पाठविलेला दूत, त्यातच तिच्या मायबापांनी परत घेतलेली तक्रार. त्यामुळंच की काय गुणवंत अख्खा एकताच्या तक्रारीतून व तिच्यावर केलेल्या बलात्कारातून सुटला. तसा सुनीतावरही दबाव टाकला गेला की तिनं तो तपास करु नये. नाही तर तिचाही जीव घेण्यात येईल. परंतु ती मरणावर विजय मिळवून परत आली होती. माणूसकीची हत्या होवू नये म्हणून. जरी एकताच्या वडीलानं आपल्या मुलीची तक्रार बंद केली असली तरी ती चूप बसली नव्हती. तिनं आपला तपास सुरुच ठेवला होता. तेच पाहिलं गुणवंतानं. तशा रोजच वर्तमानपत्रातून त्या ठिकाणच्या बातम्या येत होत्या. त्यातच गुणवंत आणि संबंधीत राजकीय सत्ताधारी पक्षाची मंडळी घाबरुनच होती सुनीताला. त्यामुळंच की काय सुनीताची बदली करण्याची शिफारस सत्ताधारी पक्षात असलेल्या गुणवंतानं केली व कारण दिलं की जर तिची बदली आपण केली नाही व तिनं प्रकरण उकलून काढलंच तर आपल्याच पक्षाची बदनामी होईल व आपण पुढील निवडणुकीत निवडूनच येणार नाही. मग काय, सत्ताधारी पक्षानं तीच बाजू उचलून धरत तिची बदली केली होती. ती बदली अशा ठिकाणी केली होती की जिथून ती कधीच परत येवू शकणार नव्हती.
            शिक्षकातील खडेच हे शिक्षकांच्या बदनामीला घातक असतात. असे म्हटल्यास आताशयोक्ती होणार नाही. कारण सध्या शिक्षण क्षेत्र याच विषयावर गाजत असून आज शिक्षणक्षेत्रातही दम राहिलेला दिसून येत नाही. महिला सुरक्षेवरुन महिला सुरक्षेच्या चिंधड्या उडतांना दिसत आहेत व त्याची झळ शिक्षणक्षेत्रातपर्यंतही पोहोचलेली आहे. आज त्याच अनुषंगानं विचार केल्यास शिक्षणक्षेत्रातही महिला सुरक्षीत नसल्याची चिन्हं दिसत आहेत. त्या इवल्या इवल्या मुली. ज्या शिक्षकांना आपलं समजतात. त्याचेवर विश्वास करतात नव्हे तर ठेवतात. तोच शिक्षक पुढं जावून त्या लहान लहान मुलींवर आपल्या वासनेची कुनजर टाकून त्यांची हत्या करतांना दिसत आहे. हे वास्तविक चित्र आहे. त्यामुळं नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? यावर प्रश्नचिन्हंच उभं झालेलं आहे. 
         शिक्षक.......अलिकडील काळात शिक्षकाला बदनाम केलं जात आहे. त्याचेवर ताशेरे ओढले जात आहेत. त्याचं कारण आहे, आजचा काळ. आजच्या काळात काही शिक्षक हे स्वतः वाईट विचारांचे असतातच. ज्याला तांदळातील खडे म्हणता येईल, तर काही शिक्षक हे वाईट विचारांचे जरी नसले तरी आजच्या खाजगी शाळेच्या चक्रव्यूहात देणगी म्हणून संस्थाचालक शिक्षकांकडून पैसे घेत असल्यानं व तशी रक्कम देणगीच्या स्वरुपात त्या शिक्षकानं संस्थाचालकाला देत नाही म्हटल्यावर असा संस्थाचालक त्या शिक्षकांवर वाईट स्वरुपाचे गंभीर आरोप लावून शिक्षकाला बदनाम करीत असतो. त्यासाठी इतरही शिक्षक अशा संस्थाचालकाला आपला स्वार्थ पाहात मदत करीत असतात व विनाकारण त्यात शिक्षक फसवून द्रोणाचार्यसारखा बदनाम होत असतो.
           शिक्षक म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो चेहरा. जो शीलवान आहे. क्षमाशील आहे व जो कर्तव्यनिष्ठ आहे. शीलवान याचा अर्थ सुविचाराचा. त्याच्या मनात केवळ विद्यार्थ्यांबद्दलच नाही तर समाजाबद्दल, परीवारातील सदस्यांबद्दल सुविचार असतील. जे सुविचार कधीच कुविचार बनणार नाहीत. असा शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले गुण शिकवू शकतो. दुसरा महत्वाचा गुण शिक्षकात असावा, तो म्हणजे तो क्षमाशील असावा. कारण विद्यार्थ्यांचं बरेचदा चूकत असते. अशावेळेस विद्यार्थ्यांचं काही चुकत असल्यास त्याचा राग न बाळगता त्याला माफ करुन टाकणं, याला शिक्षकांच्या जीवनात अधिक महत्व आहे. त्यानं केवळ वर्गातील विद्यार्थ्यांनाच नाही तर समाजातही वावरतांना बदल्याच्या भावनेनं वागू नये. कारण बदल्याच्या भावनेतून अशा शिक्षकानं वागल्यास त्या शिक्षकांकडून गुन्हेगारी स्वरुपाच्या हालचालींना वेग येत असतो. तसाच तिसरा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक हा कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष असावा. याचाच अर्थ असा की त्या शिक्षकानं आपल्या पेशाप्रती इमानदारी दाखवावी. आपलं जे कर्तव्य आहे, ते पार पाडावं. त्यातच आपण काय करतो काय नाही, दुसरा काय करतो, काय नाही. याबद्दलही कर्तव्यदक्ष राहावं.
          महत्वपुर्ण बाब ही की आजचा शिक्षक असाच असावा. परंतु कलीकाळ आहे व आजचा शिक्षक वरील स्वरुपानं वागत नाही, वागतांना दिसत नाही. 
           कालचा शिक्षक हा वरीलपद्धतीनं वागायचा. त्यामुळंच त्या शिक्षकांची समाजात इज्जतही व्हायची. असा शिक्षक रस्त्यावर कुठेही दिसलाच तर सर्व मुलं त्याची इज्जत करायचे. त्याला सन्मान द्यायचे. तसाच त्याचा सन्मान वाढवायचे. आजचा शिक्षक कुठेही दिसला तर त्याचा सन्मान कोणी वाढवत नाही. त्याच्यासमोर सन्मानानं दाखल होत नाहीत. कारण आजचा शिक्षक हा भावनावर खेळतो. म्हणतो की त्यालाही भावना आहेतच. तो फक्त शाळेत शिक्षक आहे. बाहेर मात्र तो शिक्षक नाही. त्यानंतर त्याला बाहेर कसंही वागतांना कोणी काही म्हटल्यास तो चिडतो. त्यावेळेस त्याच्यातील क्षमाशील हा गुण नष्ट होतो. शिवाय शिलवानताही जाते आणि कर्तव्यव्यनीष्ठताही. मग तो कर्तव्यदक्षच कसा राहील? तोही गुण त्याच्यातून निघून जातो. तो त्यानंतर कर्तव्यदक्ष राहात नाही तर हैवानासारखा वागतो नव्हे तर वागायला लागतो. इथूनच सुरु होतं त्याच्या वासनेचं सत्र. कधी मग एखादी वयात आलेली सुंदर मुलगी रस्त्यावरुन जात असेल, तर तो तिच्यात आपली विद्यार्थीनी पाहात नाही. तीच सवय त्यानंतर त्याच्यात जडते व तो शाळेतही तसाच वागायला लागतो.
         हेच शिक्षकांतील खडे. हे खडेच शिक्षकांच्या पेशाला बदनाम करीत असतात. जे शिक्षकांच्या पेशाला घातक असतात. या दोनचार कुविचारांच्या शिक्षकांच्या खड्यानं अख्खा शिक्षक वर्ग बदनाम होत असतो. हेच शिक्षकातील खडे शिक्षकांच्या बदनामीला घातक ठरत असतात. ज्याप्रमाणे तांदळात जर खडे असले तर ते खडे जसे दाताला, पोटाला हानीकारक असतात. तसेच हे खडे शिक्षकाच्या बदनामीलाही हानीकारक असतात. ज्यातून महत्वाचं सांगायचं झाल्यास असेच शिक्षक हे पुढं शाळेतही विद्यार्थीनीवर कुत्सीत नजर ठेवून त्यांना लक्ष करतात. ज्यातून लहान लहान विद्यार्थीनीवर शाळेत लैंगीक अत्याचार होतात नव्हे तर कधीकधी बलात्कारासारख्या गोष्टीही. शेवटी अशा शिक्षकांचा राजकारणाशी काही घेणंदेणं नसतांनाही राजकारणाशी संबंध जोडला जातो. ज्यात कधीकधी त्याला वाचवलं जातं.
         विशेष म्हणजे शिक्षकांनी हे विसरु नये की आपण एक शिक्षक आहोत. शिक्षक हा पेशा मुळातच रक्षण करणारा आहे व त्यानं रक्षणाचं काम करायला हवं. त्यानं कोणत्याही विद्यार्थ्यांना वा विद्यार्थीनीला शिकवितांना आपल्या मनात कुत्सीत भावना ठेवू नये. लैंगीक भावना तर अजीबातच ठेवू नये. त्यानं आपलं कर्तव्य विसरु नये. कर्तव्याशी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ आणि तेवढंच कर्तव्यदक्ष राहावं. त्यानं गुरु द्रोणाचार्यसारखं काम करु नये की ज्यानं गुरु परंपरेला फाटा फुटेल. त्यासाठी द्रोणाचार्यचा इतिहास माहीत असायला हवा. 
         द्रोणाचार्यनं पुर्वी बऱ्याच हालअपेष्टा भोगल्या. त्यांच्या पुर्वी झालेल्या हालअपेष्टा पाहून त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला व नोकरी करीत असतांना जेही बंधन येतील. ते पाळायचं ठरवलं. कारण महत्वपुर्ण बाब होती, ते म्हणजे त्यांचं पोट. त्या पोटासाठी त्यांना बंधन होतं. ते बंधन होतं, राजधर्माचं. त्या राजधर्मानुसार त्यांनी राजपरीवारातीलच मुलांना शिकवावं, इतरांना शिकवू नये. हे बंधन होतं. ज्यात त्यांनी राजधर्माचं पालन केलं, कर्ण वा एकलव्यासारख्या शिष्यांना न शिकवून. ज्यातून कर्ण व एकलव्याच्या द्रोणाचार्यनं शिकवलं नाही. ज्यातून एकलव्यासारखा त्यांनी न शिकविलेला मुलगाही त्यांचं नाव गुरु म्हणून सांगताच द्रोणाचार्य विचलीत झाले. ते विचलीत झाले, आपल्या पोटाच्या लाचारीनं. त्यांना आपली नोकरी जाईल ही भीती वाटली व त्यांनी राजपरीवारासाठी व राजपरीवारातीलच मुलं पुढं राहावीत. इतर मुलं पुढं जावू नयेत, यासाठी एकलव्याचा अंगठाच कापून घेतला. ज्यात गुरु द्रोणाचार्यसारखा विद्वान शिक्षक नाहकच बदनाम झाला पोटासाठी. इथं द्रोणाचार्यची लाचारी व गुलामी दिसून येते. त्यावेळेस द्रोणाचार्यचा तो स्वार्थ व ती वागणूक तेवढी वाईट नव्हती की जी आजच्या शिक्षकांची आहे. मात्र आजचा शिक्षक हा लैंगिकतेच्या भावनेनं ग्रासलेला असून तो इतर शिक्षकांचीही आपल्यासोबत अशी बदनामी करीत आहे की आजच्या काळात इतर शिक्षकांचीही त्यानं बदनामीच होत आहे. 
          महत्वाचं सांगायचं झाल्यास गुरु द्रोणाचार्यचं सोडा. शिक्षकांनी असं वागावं व आपली अशी वागणूक ठेवावी की युगानूयुगे त्याच्या चांगल्या चारित्र्याची चर्चा व्हावी. त्याचं चांगलं चारित्र्य वाखाणल्या जावं. त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा कलंक लागू नये. तसंच त्याला कोणीही तांदळातील खडे म्हणून त्याची बदनामी करु नये. तसंच हे शिक्षणातील खडेच, ते शिक्षकांच्या बदनामीला घातक असंही म्हणू नये. युगानुयुगे त्याला चांगलंच म्हणावं आणि त्याच्या चांगल्या चारित्र्याचं गुणगान व्हावं. मग कलीयुग का असेना. कारण फरक युगाचा नसतो तर फरक असतो गुणांचा आणि प्रत्येकच युगात चांगली वा वाईट माणसं असतातच. ज्याला एक शिक्षकच असतो की जो मार्ग दाखवू शकतो. असा मार्ग दाखवायचं काम शिक्षकानं करावं. मग तो वर्गात असला तरी आणि वर्गाच्या बाहेर, परीसरात, घरी तसाच जळी, स्थळी, पाताळी कुठेही असला तरी. त्यानं आपल्या मनात कधीही कोणतेही कुविचार आणू नये. तसाच कोणत्याही मुलींवर लैंगीकतेच्या भावनेची कुनजर टाकू नये म्हणजे झालं. तेव्हाच अशा शिक्षकांचा युगानुयूगे गाजावाजा होईल व शिक्षकांच्या पेशावर कोणीही शंका उचलणार नाही. असंच कार्य प्रत्येक शिक्षकांचं असावं.
          सुनीताची बदली झाली होती नव्हे तर केल्या गेली होती, अतिशय दुर्गम अशा भागात की ज्या भागातून ती कधीच परत येवू नये. परंतु तिचा जन्मच मुळात गुणवंतसारख्या नराधमाला धडा शिकविण्यासाठी झाला होता असंच म्हणावं लागेल. 
          वर्षामागून वर्ष जात होते व सुनीता त्या दुर्गम भागातील वातावरण पाहून पिचपिचून गेली होती. तिला अन्यायाविरुद्ध चीड येत होती. त्यातच कधी कुठे बलात्कार झालाच तर तिच्या मनात भयंकर वेदना होत असत. तिला त्या सहन होत नसत. अशातच एकदाची ती निवडणूक आली व त्या निवडणुकीत सत्तांतर झालं. लोकं ती केस विसरले नव्हते की ज्या केसनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. आज ती तक्रार दाबली गेली असली तरी लोकांना ती घटना माहीत होती. तशी त्या केसची सुत्रधार असलेली सुनीता, तिचीही बदली का केली? याचीही माहीती लोकांना होतीच. शिवाय याही निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं निवडणुकीत निवडून येण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. परंतु लोकांनी खरं तर यावेळेस सत्तांतर परीवर्तन केलं व यावेळेस विरोधी पार्टी भरघोस मतानं निवडून आली होती. शिवाय यावेळेस सुनीताची बहीण असलेल्या रितानं सर्वात जास्त मतदान मिळवलं होतं. तेच पाहून सत्ताधारी पक्षानं तिला मंत्री बनविण्याचा विचारही केला होता.
          सत्ताधारी पक्षात रिताचीच पार्टी बसली व तिला मंत्री बनविण्याचा विचार जो सत्ताधारी पार्टीनं केला होता. त्यानुसार तिला मंत्री बनवलं होतं व तिला गृहखात्याचा कारभार सोपवला होता. त्याच दृष्टीकोनातून रिताकडे पोलीस खातंही होतंच. शिवाय कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची बदली कुठं करायची हेही अगदी तिच्या हातात होतं. त्याच गोष्टीचा फायदा घेत तिनं आपल्या बहिणीची बदली त्याच पोलीसस्टेशनला केली. जिथं तिची बहीण आधी होती यात जिच्या हातून एकताचा खटला प्रलंबीत होता.
          एकताची ती तक्रार. ती तक्रार तिचे मायबाप गरीब असल्यानं व त्यांच्यावर दबाव आल्यानं तिच्या मायबापानं मागं घेतला होता. परंतु त्यांना तदनंतर बरेच वर्ष विचार येत होता की त्यांनी ती चूकच केली. ती चेक नव्हे तर घोडचूकच. शेवटी त्यांनी विचार केला होता की आपण ती तक्रार उघडून न्याय मिळवून घेवू. जर सुनीतासारखीच एखादी अधिकारी बदलून त्या गावाला पोष्टींगवर येईल तर. अशातच त्याच केसमधील सुनीताची त्या गावाला बदली झाली व एकताच्या मायबापाला ती गोष्ट माहीत होताच ते तिच्या पोलीस स्टेशनला आले व त्यांनी विनवणी केली. विनवणी केली की त्यांनी परत ती तक्रार उघडावी व तिच्या दिवंगत मुलीला न्याय मिळवून द्यावा. मग काय, सुनीताला आणखी जोश चढला व ती त्याच तक्रारीशी संबंधीत नाही तर संपुर्ण बलात्कारी लोकांना धडा शिकविण्याचा विचार करु लागली होती.
          
**********************************************

             आज सुनीतानं एकताच्या वडीलानं दिलेला अर्ज हातात घेतला. त्यानंतर तिनं त्या अर्जाशी संबंधीत जुनी आपल्या पोलीस स्टेशनची ती फाईल शोधली. जी धूळखात पडली होती बऱ्याच वर्षांपासून. सुरुवातीला तर ती फाईलच दिसेनासी झाली होती. परंतु नंतर ती सापडली. जी एकताची फाईल होती. त्यानंतर ती एकताच्या घरी गेली व तिनं तिच्या आईवडीलाचे बयाण घेतले. त्यानंतर तिनं त्याच बयाणावर आधारीत चौकशी सुरु केली. ज्यात ती त्याच शाळेमध्ये गेली. ज्या शाळेत एकता कितीतरी वर्षापुर्वी शिकत होती. 
        एकताची ती शाळा व त्या शाळेतील जुने काही शिक्षक निवृत्त झाले होते. तर काहींना त्या शाळेतील संस्थाचालकानं काढून टाकलं होतं की जे एकताच्या वेळेस शाळेत कार्यरत होते. तसं पाहिल्यास एकताची ती जुनी तक्रार उघडून तिला न्याय मिळवून देणं ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. तरीही तिनं प्रयत्न चालवला होता. शिवाय ज्यानं एकताला गुणवंताच्या स्वाधीन केलं होतं, तो कर्मचारी तो या शाळेत नव्हता. त्याची त्या शाळेतील संस्थाचालकानं कितीतरी दूर पाठवलं होतं. ते कार्य आपला सुगावा लागू नये व आपण सापडू नये यासाठी गुणवंतानं केलं होतं. 
         आज गुणवंत रस्त्यावर आला होता. कारण त्याची पार्टी निवडणुकीत निवडून आलीच नाही. शिवाय तोही निवडणुकीत निवडून आला नव्हता. नियतीनं आज जणू त्याच्याकडं पाठ फिरवली होती व तो नियतीचा शिकार बनला होता. शिवाय पार्टीनंही त्याच प्रकरणानं पार्टी हारल्यानं त्याची हकालपट्टी केल्यागत त्याची अवस्था केली होती.
           सुनीतानं उचललेली पावलं. तिनं उचललेली एकताची तक्रार. तिनं त्या केसशी संबंधीत असलेल्या त्या काळातील शिक्षकांचे पत्ते त्या शाळेतून घेतले. तसा दम तिनं शाळा संस्थाचालकाला दिला. त्यानंतर ती आळीपाळीनं त्या शिक्षकांच्या घरी गेली. परंतु कोणीही तिला त्या प्रकरणाची माहिती दिली नाही. ज्यात तिनं त्यांना गुन्हेगार ठरविण्यात येईल अशी धमकी दिली तरीही. शिवाय माफीचा साक्षीदार बनवू असे सांगीतले तरीही. परंतु त्यांना त्या संबंधीच्या गोष्टी माहीतच नसल्यानं त्यांनी माहीती दिली नाही आणि ते माहिती देणारही कुठून? प्रश्न होता त्यानंतर ती त्या व्यक्तीच्या घरी गेली. ज्याचा प्रत्यक्षात त्याच गोष्टीशी संबंध होता.
          त्या व्यक्तीच्या घरी सुनीता जाताच सुरुवातीला तो व्यक्ती घाबरला. त्यानंतर ती त्याला म्हणाली की मी काही तुम्हाला पकडण्यासाठी आलेली नाही तर मी फक्त माहिती घ्यायला आलेली आहे. जर तुम्ही गुन्हेगार नसाल तर तुम्हाला सोडून देण्यात येईल आणि गुन्हेगार जरी असाल तरी आम्हाला सहकार्य केल्यास तुम्हाला होणार असलेल्या शिक्षेला कमी करता येईल किंवा जर तुम्ही गुन्हेगार नाही असे आढळून आल्यास तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवता येईल. फक्त आमची विनंती आहे की आपण खरं काय, तेच बोलावं.
          सुनीतानं त्या व्यक्तीसमोर बोललेले शब्द. त्या शब्दानं त्या व्यक्तीला थोडा धीर आला. तसं त्यानं तिला आत बोलावलं व तो आपली कैफियत सांगू लागला.
           "मी एक गरीब व्यक्ती. मला नोकरीची गरज होती. त्यानंतर मी नोकरीला लागलो आणि त्या संस्थाचालकानं मला नोकरीवर लावलं. ते त्या संस्थाचालकाचे उपकारच. मग मी ठरवलं की आपण तो जसं म्हणेल तसं वागावं. कारण पोटाचा प्रश्न होता. जो त्यानं सोडवला होता. त्यावेळेस वागतांना मला काय माहीत होतं की त्या वागण्यानं मी फसेल. तो म्हणायचा अमूक अमूक ठिकाणी जा. मी जायचो. मला काय घडतंय ते माहीत नव्हतं. बरेचदा नेतेमंडळी जेव्हा शहरात यायची. तेव्हा माझा संस्थाचालक मला दोनचार महिला घेवून त्यांना सोडायला पाठवायचा. मी त्या महिलांना सोडून यायचो ते मंत्रीमंडळ थांबत असलेल्या बंगल्यावर. त्यानंतर ते मंत्रीमंडळ काय करायचं ते मला माहीत नाही. 
         अशीच ती मुलगी. त्या मुलीला माझ्याच संस्थाचालकानं सांगीतलं की तिला जबरदस्तीनं गाडीत घालून तिला त्याच बंगल्यावर नेवून सोडायचं. तिथं तुला फोन येईल. त्यानंतर ती मुलगी जो शख्श येईल. त्याच्या स्वाधीन करायची. त्यानंतर मागं फिरायचं व त्यानंतर मागं वळून परत पाहायचं नाही. त्यानंतर मी त्या मुलीला चॉकलेटचं आमीष दाखवलं. तशी ती मुलगी माझ्या अंगाखांद्यावरच खेळायची. ती माझं ऐकायची, मी जे सांगेल ते. मग मी तिला म्हटलं गाडीत बस. आपण फिरुन येवू. त्यानंतर ती माझ्या गाडीत स्वखुशीनं बसली. मग मी तिला घेवून गेला त्या ठिकाणी. तेथून मी माझ्या संस्थाचालकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी सांगीतलं की तुला थोड्या वेळानं फोन येईल. तू वाट पाहा. त्यानंतर मी त्या फोनची वाट पाहू लागलो. 
         थोड्या वेळाचा अवकाश. थोड्या वेळात मला फोन आला. विचारलं की तू कुठे उभा आहेस. मी त्याला मी उभे असण्याचा पत्ता सांगीतला. त्यानंतर तो शख्श माझ्याजवळ आला. त्यावेळेस त्यानं मुखवटा धारण केला होता.
          त्या शख्शनं मला माझं नाव विचारलं. मी त्याला नाव सांगीतलं. तसं त्यानं माझ्या संस्थाचालकाचं नाव सांगीतलं व म्हटलं की त्यानं ती मुलगी त्याच्या स्वाधीन करावी. मग त्यानं माझ्या संस्थाचालकाचं नाव सांगताच मी त्या मुलीला त्या शख्शच्या स्वाधीन केलं. त्यावेळेस ती मुलगी माझा बोट घट्टं पकडून होती. ती माझा बोट सोडायला तयार नव्हती. 
          मी तिला विकलं होतं नव्हे तर त्या संस्थाचालकानं तिला विकलं होतं. ती गोष्ट मला आवडत नसतांनाही मी केली. ती गयावया करीत होती. परंतु मी तिची दया घेतली नाही व तिला सोडून परत आलो. शिवाय फुकटच गुन्ह्यात अडकून काही न करता गुन्हेगार बनलो आणि ज्यानं गुन्हा केला. तो माझा संस्थाचालक खुलेआम फिरत आहे. आता असं वाटंतय की मी तो गुन्हा केला नसता तर बरं झालं असतं. परंतु आता ती वेळ निघून गेली आहे व मी फुकटच गुन्ह्यात अडकून गुन्हेगार बनलो आहे. परंतु आता असं वाटतंय की मला आज कारावास झाला तरी चालेल. परंतु तो संस्थाचालक अडकायला पाहिजेच. ज्यानं मला गुन्हा करायला लावला. पोलीस महोदया, बघा की पोट कोणाकोणाला काय काय करायला लावतो." 
           त्यानं आपली खंत व्यक्त केली होती व तो मनातलं बोलला होता. त्याला काय माहीत होतं की तो संस्थाचालक आपल्याच शाळेतील मुलगी अधिवेशनादरम्यान कोण्या नेत्याला विकत आहे आणि नेताही किती बदमाश की तो शाळेतील इवल्याशा मुलीला सुद्धा सोडत नाही. ते कृत्य शेवटी त्यानं पोटासाठी केलेलं होतं हे सिद्ध होत होतं. 
           सुनीताला त्यानं कबुलीजबाब दिला. परंतु सुनीतानं त्याला अटक केली नाही. त्याचं कारण होतं सत्य बोलणं. तो सत्य बोलताय होता आणि त्यानं शेवटी सांगीतलं की त्याचं तद्नंतर संस्थाचालक महोदयासोबत त्याच गोष्टीसाठी भांडण झालं. ज्यात ज्या संस्थाचालकासाठी त्यानं जीव धोक्यात घातला होता. त्यात त्या संस्थाचालकानं स्वतः अडकू नये म्हणून त्याला काढून फेकलं होतं. त्याला आता लहान लहान लेकरं होती व त्याला आता त्या गोष्टीचा नव्हे तर त्या कृत्याचा पश्चाताप येत होता. 
           सुनीतानं त्याची कहाणी ऐकली होती. त्याचा फक्त गुन्हा होता की त्यानं त्या मुलीला नोकरी जाईल या धाकानं संस्थाचालकाच्या मनानुसार त्या शख्शला नेवून दिली होती. ज्यानं त्याला फोन केला होता. त्या शख्शला त्यानं पाहिलं सुद्धा नव्हतं. मात्र ते कोणाच्या म्हणण्यानुसार केलं. हे तेवढं त्यानं सांगीतलं होतं. तसं सुनीतानं त्याला म्हटलं की जर आमोरासामोर संस्थाचालक व तू, तुम्हा दोघांना उभं केलं तर तू निर्भीडपणे बोलशील का? त्यावर त्यानं होकार देत हो म्हटलं. त्यानंतर तिनं त्याला तिथंच सोडून देवून ती संस्थाचालकाशी बोलणं करायला निघून गेली.      
          ते संस्थाचालकाचं घर. ते काही लहानसं नव्हतं. त्यातच दारातच एक श्वान बांधलेला होता. जो धिप्पाड दिसत होता व त्याला पाहून मोठमोठ्यांची भंबेरी उडू शकत होती. तो तेवढा मोठा विस्तीर्ण बंगला पाहून एवढा पैसा त्यानं कुठून आणला? याचा विचार येत होता आणि वाटत होतं की त्यानं जणू पैशात फरेब करुन तसा पैसा कमविलेला असेल. ज्याला काळे काम म्हणता येईल. 
          सुनीता त्याच्या घरी गेली होती. तसा गेट लावलेलाच होता. तो गेटही भव्यदिव्य अशाच स्वरुपाचा होता व तो लावलेलाच होता. तिनं गेटवर असलेली बेल वाजवली. तसं वाचमेननं गेट उघडला. म्हणाला, 
          "कोण?"
          "पोलीस. कशाला आलात? तसं साहेबांना सांगावं लागेल."
           "एका केसची शहानिशा करायला पोलीस आले आहेत असं सांग तुझ्या साहेबांना."
            "ठीक आहे."
            आश्चर्यचकीत झालेला तो वाचमेन. त्यानं आतापर्यंत कधीच पोलीस तिथंपर्यंत आले नव्हते हे पाहिलं. परंतु आता अचानक पोलीस दिसताच त्याला आश्चर्य वाटलं. शेवटी तो वाचमेन आपल्या साहेबाकडे गेला व त्यांना पोलीस महोदय गेटवर आल्याचं सांगीतलं. त्यानंतर ते चौकशी करायलाही आले असल्याचं सांगीतलं. तसं संस्थाचालक महोदयानं त्या पोलिसांना आतमध्ये बसवून ठेवण्यास सांगीतले. तसा वाचमेन खाली आला. त्यानं पुरता निरोप सुनीताला दिला. तशी सुनीता आपल्या लव्याजम्यासह आतमध्ये बसली. तसा थोड्यात वेळात शहानिशा सुरु झाली. सुनीत संस्थाचालकाला प्रश्न विचारु लागली.
          "आपण एकता नावाच्या मुलीला ओळखता काय?"
           "एकता कोण?"
            "एकता. जिचं आपल्या शाळेतून काही वर्षापुर्वी अपहरण केलं गेलं होतं. आठवतं का आपल्याला?"
            "नाही आठवत."
            "का? एकता नव्हती का आपल्या शाळेत?"
           "अहो, एकतासारख्या अशा कितीतरी मुली आल्याच असतील आमच्या शाळेत. ती एकताच नसेल एकटी शाळेत आलेली. शिवाय माझी काय,एकच शाळा आहे काय? तर मी पाहात असणार सदोदीत. माझ्या दहा शाळा आहेत महोदया. अन् प्रत्येक शाळेकडे मला लक्ष द्यावंच लागतं."
         "परंतु एकता एकच असेल ना अपहरण झालेली. जिचा मुद्दा फारच गाजला होता साधारणतः चार पाच वर्षापुर्वी. आपणाला अलिकडील चारपाच वर्षातीलही घटना आठवत नाही वाटते."
           "महोदया, आपण काल काय जेवलो, ते तरी माहीत असते का आपल्याला?"
            "हो मी मान्य करते की आपण काल काय जेवलो ते माहीत राहात नाही. परंतु ते जेवन आहे. अन् ही घटना. घटना शेवटी घटनाच असते आणि ती प्रत्येकाला माहीत असतेच. तशी तुम्हालाही माहीत असायलाच हवी."
            "नाही. मला ते काही माहीत नाही व मी त्याबद्दल काहीच तुम्हाला सांगू शकत नाही."
            सुनीताला संस्थाचालक म्हणून गेला की त्याला काहीच माहीत नाही. तशी त्यानं तिला कोणतीही माहीती देण्यास नकार दिला. तसा नकार देताच सुनीता थोडी निराश झाली व ती तेथून निघून गेली होती.
           सुनीता विचार करीत होती संस्थाचालकाबद्दल. तिला तोच गुन्हेगार वाटत होता की ज्यानं तिला माहीती देण्यास टाळाटाळ केली होती. परंतु त्याला अटकही करता येत नव्हती. कारण त्याचेबद्दल काही पुरावा तिच्याजवळ नव्हता. तसं तिला आठवलं. आठवलं की गतकाळात ते प्रकरण न्यायालयात गेलं होतं. ज्यात तिचं स्थानांतरण झाल्यानं ती केस प्रलंबित होती. तसं तिला माहीत होताच तिनं ठरवलं की आपण याच खटल्यावर न्यायालयाला शहानिशेसाठी योग्य परवानगी मागावी. ज्यातून संस्थाचालकाला ताब्यात घेता येईल. त्यासाठी तिनं त्याच संस्थाचालकाच्या शाळेतील त्या कर्मचाऱ्याची ग्वाही वापरण्याचं ठरवलं. 
          सुनीता तशी आधीपासूनच हुशार होती आणि आताही ती हुशारच होती. तिनं आताही हुशारीनंच काम घेतलं होतं. तो कर्मचारी....... ज्यावेळेस तो कर्मचारी सुनीताजवळ बोलला होता की त्यानं जे काही केलं, ते संस्थाचालकाच्या आदेशानं केलं. ते बयाण तिनं रेकॉर्ड केलं होतं व तेच बयाण तिनं न्यायालयात न्यायाधीशासमोर दाखवलं व एकताच्या खटल्याबाबत संस्थाचालकाच्या चौकशीचे आदेश आणले. त्यानंतर तिनं संस्थाचालकाला जबरन अटक केली व आपल्याच पोलीस स्टेशनमध्ये ती संस्थाचालकाला तिच्याच रितीनं विचारपूस करु लागली होती.
           "हं बोला आता मला एकताच्या केसबद्दल काय सांगताय ते? जर सांगत नसाल तर मला उकलवताही येते. मग म्हणाल नको की या पोलीस मॅडमनं माझ्यासोबत काय केलं ते. कारण मला माहीत आहे की गुन्हेगाराशी आपण कितीही चांगलं वागलो तरी गुन्हेगार गुन्हा मंजूर करीत नाहीत आणि आम्ही ते चांगलं ओळखतोय. आता बोला, मला पटापट सांगताय की आम्ही आमचे पवित्रे आजमावून पाहू. तशीही ही साधी सुधी केस नाही. एक खुनी केस आहे. बलात्काराची केस आहे अन् तिही लहान मुलीची. जी नाबालीग होती. शिवाय मी तुमचे दोन मदतनीस पकडले आहेत. एक तुमच्या शाळेतील आणि दुसरा तुमचा राजकारणातील. त्यांनीच तुमचं नाव सांगीतलं. म्हणूनच तुम्हाला इथंपर्यंत आणलंय. मला सगळं माहीत आहे की गुन्हा कोणं केला. जर तुम्ही खरं खरं सांगीतलं तर तुमची शिक्षाही कमी होवू शकते. मी शिफारस करुन कमी करु शकते आणि जर तुम्ही बऱ्या बोलानं सांगीतलं नाही तर मग कमी शिक्षेची तरतूदच आमच्या दैनंदिनीत नाही. आता सांगा, तुम्ही आपल्या तोंडानं गुन्हा कबूल करताय की आम्ही करवून घेवू."
          सुनीता त्याला म्हणाली. तसं त्यानं बोलावं व गुन्हा कबूल करावा. म्हणून त्याला तुमच्या मदतनीसानं तुमचे नाव सांगीतलं असंही म्हटलं. तसं त्याला माहीत होताच तो बोलता झाला. 
           "तर तुम्हाला माहीत झालं तर. त्यानं मलाच फसवलं तर. मला म्हणत होता तो की मी तुझं नाव अजीबात सांगणार नाही. मेलो तरीही. परंतु त्यानं सांगीतलं तर. परंतु त्यात माझा कोणताच गुन्हा नाही. सगळं त्या गुणवंताचं कारस्थान. मॅडम, मला माफ करा."
            "गुणवंत? कोण गुणवंत? अन् मला कोणीही काहीही सांगीतलं नाही. ती माझी चाल होती. तुमच्याकडून सत्य वदलून घ्यायची. परंतु आता तुम्ही गुणवंत हे नाव घेतलंच आहे, तर सगळं बिना बोलानं सांगा."
          "हे बघा, मला यातील काहीच माहीत नाही."
           "म्हणजे आतापर्यंत माहीत होतं. गुणवंत नाव घेतांनाही माहीत होतं आणि आताच विसरलात सांगता सांगता."
           "मॅडम मी खरं बोलतोय. मला काहीच माहीत नाही."
           "ठीक आहे. मी कुठं म्हटलं की तुम्हाला माहीत आहे. माहीत आहे या तिखटाला. हे तिखट जेव्हा तुमच्या पाश्वभागात जाईल ना तेव्हाच तुम्ही पटापट बोलाल. बरोबर ना." तिनं हातात तिखटाची पुरचूंडी घेत म्हटलं. 
            "नाही मॅडम, तसं नाही."
            "मग सांगताय ना. पाहा सांगाल सरळ सरळ तर शिक्षा कमी करु. नाही तर शिक्षेचं आम्हीच ठरवू. आता बोला."
            "परंतु मॅडम मला काहीच माहीत नाही."
            "ठीक आहे. आता उपाय नाही. तुम्हाला प्रेमानं समजवतेय तर तुम्ही ऐकत नाही. आता मला उपाय करावाच लागेल. त्याशिवाय सत्य तुम्ही वदणारच नाही असं वाटतेय."
          "परंतु मॅडम मला काहीच माहीत नाही."
            "ठीक आहे. आता सांगालच थोड्या वेळानंतर पटापट." ती म्हणाली व ती आपल्या शिपायाकडून वळून म्हणाली, 
            "बांधा रे याला. ही जरा बलात्काराची केस आहे. आता याला बलात्कार काय होते, ते दाखवतेच मी. हा बऱ्या बोलानं सांगत नाही आहे सगळं याला माहीत असूनही. हा गुणवंत ओळखतो आणि गुणवंतचे कारनामे ओळखत नाही. आता सांगेल बरोबर."
          तिनं आपल्या पोलीसांकरवी त्याला दोरानं बांधायला लावलं. त्यानंतर त्याच्या पाश्वभागात तिखट भरलं. त्या तिखटानं त्या संस्थाचालकाला भयंकर वेदना होत होत्या. तसा तो म्हणाला, 
            "होय, सांगतोय सगळं. मला सोडा."
             "सांग लवकर. नाही तर तू पाहातच राहा काय काय करतो तेच."
            ते तिचं बोलणं. त्यातच त्यानं पाहिलं की गुन्हा कबूल करुन घेता यावा म्हणून त्या पोलीस स्टेशननं काही आरोपींना बर्फाच्या लादीवर झोपवलं आहे. काहींच्या अंगावर साखरेचं पाणी टाकून त्याच्या अंगावर मुंग्या सोडल्या आहेत. काहींना उलट लटकावून मारणं सुरु आहे तर काहींच्या अंगावर तिखटाचं पाणी. 
         त्यानं ते सगळं पाहिलं व त्यालाही वाटलं की कदाचीत हे पोलीसवाले आपल्यासोबतही असाच खेळ खेळतील. त्यापेक्षा सत्य काय ते सांगीतलेलं बरं. तसा तो पोपटासारखा बोलू लागला. 
           ते पोलीस स्टेशन नव्हतं तर ते कसाईघरच होतं. ते कसाईघर बनलं होतं. कारण पोलिसांना आरोपी हे बऱ्या बोलानं कोणत्याच गोष्टी नीट सांगतच नव्हते. त्यामुळंच पोलिसांना तशा शिक्षा द्याव्याच लागत होत्या. त्या शिक्षा या गुन्ह्यानुसार व गुन्हेगाराच्या कबुलीजबाबानुसार वेगवेगळ्या होत्या. तसं त्या संस्थाचालकाला माहीत होताच तो बऱ्या बोलानं बोलू लागला. तो म्हणाला, 
            "तो गुणवंतच याचा खरा सुत्रधार. दरवेळेस जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं. तेव्हा तेव्हा तो येतो. तो मला भेटतो व सर्रासपणानं म्हणतो की मला मंत्र्यांना खुश करायचे आहे. तेव्हा काही महिला द्या. बदल्यात मी तुम्हाला अनुदान देईल. त्यानंतर आम्ही त्यांना काही धंदेवाईक महिला पुरवतो व ते त्या महिलांसोबत यथेच्छ मेजवाणी मारत निघून जातात. बदल्यात आम्हाला अनुदान मिळतं. आता मला सांगा, स्वार्थ कोणाला नसतो. तो मलाही आहे. मला अनुदान मिळवून घेण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. परंतु ते केवळ मी माझ्या एकट्यासाठी काही करीत नाही. या माझ्या कृतीनं सर्व कर्मचाऱ्यांचं पोट भरत. त्यांचा परीवारही पोषला जातो. मी कोणत्याच महिलेला तिच्या मर्जीविरुद्ध नेत्यांसाठी पाठवीत नाही. त्या महिला स्वखुशीनं नेत्यांची सेवा करायला जातात."
          "आणि परतच येत नाही."
          "तसं नाही मॅडम."
          "मग कसं?"
          "ते मलाही माहीत नाही मॅडम."
           "परंतु मला ते नाही पाहिजे. मला एकताबद्दल माहीती पाहिजे. सांगा, सांगा. एकताचं तुम्ही लोकांनी काय केलं? एकताला कसं फसवलं ते सांगा."
            "मॅडम, एकताचं मला काहीच माहीत नाही."
           "पुन्हा तेच की सांगताय की पुन्हा मी माझे उपाय करु. तसा मोठा मासा गळाला लागायचाच आहे. इथंच माझी उर्जा खर्च करु नका. नाहीतर मला जर राग आला ना. तर मी तुलाच गोळी घालून टाकीन अन् सांगेन की पोलीस स्टेशनमधून पळून जात होता. मारली गोळी. ती लागली अन् मेला. त्यात काय? तसं तुम्हाला माहीत असेलच की एन्काऊंटर मध्ये गुन्हा लागत नाही. आता बोला, माहीती सांगताय की करु एन्काऊंटर?"
          "नाही नाही. सांगतो मी सगळं."
            असं म्हणत संस्थाचालक ती माहीती सांगू लागला होता.
           सुनीतानं संस्थाचालकाच्या पाश्वभागात तिखट टाकून त्याला बोलकं केलं. त्यानंतर एन्काऊंटरचा धाक दाखवला व आता तो पुर्ण माहीती सांगत होता. जी माहीती सुनीता रेकॉर्ड करीत होती.
          "गुणवंत एक दिवस मला भेटायला शाळेत आला होता. त्यावेळेस मी एकताच्याच शाळेत होतो. त्याला एका समारंभानिमीत्य शाळेत बोलावलं होतं.
          ती मुलगी सुंदर होती व ती शाळेची विद्यार्थी प्रतिनीधी होती. तिला चांगलं बोलता येत असल्यानं तिला विद्यार्थी प्रतिनीधी बनविण्यात आलं होतं. ती त्याच समारंभादरम्यान स्टेजवर भाषण देत होती. त्याचवेळेस त्याची नजर त्याच मुलीवर पडली. तसा काही वेळानं समारंभ संपला व आम्ही दोघेही केबीनमध्ये बसलो. तेव्हा तो म्हणाला, 
          'मला हीच मुलगी हवी.'
          मी मात्र ते ऐकून नकार दिला. त्यानंतर तो म्हणाला की बऱ्या बोलानं ऐक. तशीही ती मुलगी काही तुझी नातेवाईक नाही की तुला तिच्याबद्दल कळवळा असावा. त्यावर मी नकारच दिला. त्यावर तो म्हणाला की जर मी त्याचं ऐकलं नाही तर तो मला बरबाद करेल. माझं बनवलेलं घरटं अर्थात उजळवेल. मला रस्त्यावर आणेल. त्यानंतर मला त्याची भीती वाटली आणि भीती कोणाला वाटत नाही. ज्याच्यावर बेतते मॅडम त्यालाच कळतं. एक म्हण आहे ना की टाकीचे घाव शोषल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. तेच माझं झालं. मिही लाचार होतो त्यावेळेस. ज्यावेळेस तो बोलला होता. 
           त्यानंतर मी त्याला म्हटलं की मी त्याच्या सुपूर्द मुलगी करणार. परंतु त्यात जबाबदारी आहे. तेवढी काळजी घ्यावीच लागेल तुम्हाला. तुम्ही कधी सापडलात आणि हे प्रकरण निघालंच तर माझं नाव नको सांगाल कोणाला. पोलिसांनाही नाही. ठीक आहे. त्यावर त्यानं मला वचन दिलं व म्हटलं की मी मरुन जाईल. परंतु तुमचं नाव कधीच घेणार नाही."
           "पुढं....... पुढं काय झालं. जरा सांगाल काय?"
           "होय सांगतोय. आता पुर्णच सांगतोय. त्यात काय लपवायचंय." असे म्हणत तो पुढं सांगू लागला. 
             "त्यानंतर मी विचारच करीत होतो तसा. तसा विचार करीत असतांना माझ्याच शाळेतील एक कर्मचारी माझ्याजवळ आला. त्याची पत्नी गरोदर होती व त्याची पत्नी बाळंत होणार होती. त्याला पैशाची गरज होती. तसं त्याला त्याचं पोटंही भागवायचं होतं. मग मी विचार केला. विचार केला की त्याच्या मजबुरीचा फायदा घ्यावा. तोच आपलं काम करु शकतो. शिवाय पोटासाठी त्याला ते काम करणं अगत्याचं आहे. तसा तो मला पैसे मागतच होता. शेवटी मी त्याच्या लाचारपणाचा फायदा घ्यावा असं ठरवताच मी त्याला म्हटलं की मी त्याला पैसे देणार. परंतु त्यानं माझं एक काम करावं. जर त्यानं माझं काम केलं नाही तर मी त्याला काढूनही फेकेल ही देखील धमकी मी त्याला दिली. तेव्हा सुरुवातीला त्यानं आढेवेढे घेतले. त्यानंतर तो तयार झाला होता. 
            त्यानंतर त्यानं त्या मुलीचं अपहरण केलं व माझ्या फोननुसार गुणवंतनं पाठवलेल्या गडी माणसाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर त्या मुलीचं गुणवंतनं काय केलं ते काही मला माहीत नाही. वाटलं होतं की प्रारब्ध फुटणार नाही. परंतु जेव्हा ती मेलेली आहे हे मला माहीत झालं. तेव्हाच कळलं होतं की एक ना एक दिवस आपण सापडूच व आपल्यालाही कारावास भोगावाच लागेल. कारण कोणताही गुन्हा कधीच लपत नाही."
            "म्हणजे तुम्ही स्वतः गुन्हा केला तर आणि त्या गुन्ह्यात बिचाऱ्या लाचार कर्मचाऱ्याचा बळी घेतला तर. तुम्हाला शरम नाही वाटली. त्या गुणवंतच्या म्हणण्यानुसार त्या लहानशा मुलीला त्याच्या स्वाधीन करायची. तो काय करेल त्या मुलीसोबत अन् काय नाही, हेही समजलं नाही तुम्हाला. मला सांगा, त्या एकताच्या जागी तुमचीच मुलगी असती तर? तर कसं वाटलं असतं तुम्हाला? परंतु तुम्हाला काय माहीत त्यातलं. तुमच्या तर भावनाच मेलेल्या आहेत ना. ते बिचारी गरिबाची पोर. तुम्ही कलंक आहात एका शाळेचे मालक म्हणून. अशानं कोणता पालक आपल्या शाळेत मुलींना टाकतील? त्यांच्या मनाला काय वाटेल? याचा विचार केला का कधी? अहो, तुम्हीच खरे भक्षक आहात, रक्षक नाही. एक शाळेचा संस्थाचालक म्हणजे त्या शाळेचा शिक्षकच नाही का? त्यानं कसं राहायला हवं. कसं वागायला हवं? ते त्याला कळायला नको का? खरं तर तुम्हीच अडवू शकत होते त्याच्या त्या कृत्याला. माहीत आहे त्यानं काय केलं त्या मुलीसोबत? त्या मुलीसोबत केलाय त्यानं बलात्कार. बलात्कार तरी कळतंय का की करुन दाखवू कसा राहते बलात्कार ते? तुम्हाला माहीत नसेल तो गुणवंत कसा आहे आणि किती भयानक आहे ते? निव्वळ लाशांचा सडा लागला होता त्या जंगलात. आम्ही चौकशी करायला गेलो, तेव्हा दिसला. तो पुरावाच सोडत नाही. चक्कं मारुनच टाकतो स्रियांना. त्याच्या हातून चार वर्षाच्या मुलीपासून तर म्हाताऱ्या बाईपर्यंत कोणीच सुटलेलं नाही. तुम्हाला तरी माहीत आहे का की तुम्ही त्याच्याकडे पाठवलेल्या महिला परत आल्या की नाही? कधी शहानिशा केलीत का त्यांची? त्या सर्वच स्रियांना त्यानं यमसदनीच पोहोचवलं असेल. उगाचच सडा नाही लागला होता त्या जंगलात."
          आज शाळेतही सतत अत्याचाराच्या घटना ऐकायला मिळतात. हे बदलापूरच्या घटनेवरुन दिसलं. ती बदलापूरची घटना उघडकीस आली म्हणून. परंतु त्यापुर्वीही शाळेशाळेत बऱ्याच घटना झाल्या असतीलच ही शक्यता नाकारता येत नाही. बदलापूरच्या घटनेवरुन प्रचीती येते की विद्यार्थी हे शाळेत सुरक्षीत नाहीत. परंतु शाळेत सुरक्षा करता येईल. तक्रारपेटी, सीसीटिव्ही लावून वा सखी सावित्री समीती स्थापन करुन. परंतु ज्यावेळेस विद्यार्थी घरुन शाळेत येतात व शाळेतून घरी जातात. त्यावेळेस त्यांची सुरक्षा कशी करायची? हा ऐरणीचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नावर सध्या तरी उत्तर नाही. याला कारण आहे आपल्या देशातील लोकांची मानसिकता. आजचे लोकं अशा विकृत मानसिकतेनं वागत असतात की ती मानसिकता विचार करायला लावते. विशेष म्हणजे लोकांनी आपली मानसिकता सुधरवावी. ती मानसिकता सुधरविणं आपल्या देशाच्या दृष्टीकोनातून हिताची कृती आहे. ही मानसिकता निदान विद्यार्थीनी दृष्टीकोनातून तरी सुधारण्याची गरज आहे हे तेवढंच खरं.
           देशात गढूळ राजकारण आहे. राजकारणात निवडणुकीत निवडून येणारेच लोकं हे चांगल्या सुविचारांचे नाहीत. प्रत्येकांवर खटले दाखल आहेत. तसेच गुन्हेही दाखल आहेत. गुन्हे कोणते तर खुन, बलात्कार, चोऱ्या, डकैती अशा विविध स्वरुपाचे. त्यामुळंच काहीही होतं, अगदी बदलापूरसारख्या घटनाही. जे देश चालवतात. खरं,तर त्यांनी रक्षकांची भुमिका स्विकारायला हवी. परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यानं व तेच भक्षक असल्यानं गुन्हे हे घडणारच. त्यात दुरुस्ती होणार नाही. तसं पाहिल्यास देशात असे गुन्हे करणारे राजकारणी. ते मोठेच मासे आहेत. परंतु राजकारणाच्या भरवशावर ते मोकाट फिरत असतात. देशातील वातावरण गढूळ करणारे हे मोठे मासेच गळाला लागत नाहीत. तसे मासे राजकारणात असल्यानं देशात, समाजात, गावात, शहरात आणि घरातही सारखे बलात्कार होतात. आता तर त्याची जागा शाळेनही घेतलेली आहे. आपण म्हणतो की कलीयुग आहे. परंतु ते फक्त कलियुगाचे नाव आहे. आपण त्या कलीला बदनाम करतो. परंतु कृत्य तर आपणच करतो ना. ती बदलापुरची घटना अशीच.
          बदलापुरला एका शाळेच्या कर्मचाऱ्यानं असाच लैंगिक अत्याचार केला एका लहानग्या मुलीवर. ही घटना शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. त्यातच तो एका पार्टीचा व्यक्ती असल्यानं प्रकरणाची हवा ही तेज नाही व त्या हवेने आपली दिशाही बदललेली दिसते. त्याचंवकारण म्हणजे लोकं विसराळू आहेत व ते लवकर विसरतात आपली प्रकरणं. कारण ती त्यांच्या घरची नसतात ना. परंतु जेव्हा अशी एखादी घटना त्यांच्या घरी होते, तेव्हा मात्र विचार येतो. वाटतं की अमूक अमूक व्यक्तींनी धावत यावं. आम्हाला आधार द्यावा. आंदोलन करावं. परंतु कधीच तसं घडत नाही. 
          शिक्षण क्षेत्र. त्या शिक्षण क्षेत्राला पवित्र,असं क्षेत्र समजलं जातं आणि ते राबविणारा घटक म्हणजे शिक्षक व कर्मचारी. ते तर रक्षकच असतात शिक्षण क्षेत्रातील. परंतु जेव्हा असेच शिक्षक वा कर्मचारी जेव्हा भक्षक बनत असतील तर त्याला काय समजावे? अन् ते भक्षक शिक्षण क्षेत्रात असतील तर तिथं मुलींनी सुरक्षितता कशी समजून घ्यावी? हा प्रश्न आहे.
           घटना या घडतच असतात तशीच ती बदलापूरची घटना घडली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली व त्यांनी शाळेशाळेत सखी सावित्री समीती स्थापन करायला लावली. एक तक्रारपेटीही लावायला लावली आणि या ज्या गोष्टी केल्या. त्या विद्यार्थीनी दृष्टीकोनातून केल्या. परंतु यापुर्वी शाळेतून विद्यार्थीनीच नाही तर विद्यार्थी सुरक्षा होत नव्हती काय? होतच होती. तरीही ही समीती? परंतु त्याचा अर्थ शासनानं असा लावला की सुरक्षा कवच जर असलं तर थोडीशी ती घटना टाळता येईल. 
           अनुचित घटना या कितीही सुरक्षा कवच असलं तरी घडणारच. त्याचं एक उदाहरण देतो. ते उदाहरण साधं सोपं सरळ आहे व कुणालाही सहज समजणारं आहे. ते फक्त उदाहरण आहे. समजून घेण्यासाठी. काल द्वापर युगात एक क्रिष्ण हुशार होता. हे सर्वपरीचीत आहे व सर्वांना माहीती आहे. तसंच गांधारीला एक वरदान होतं की तिनं पट्टी उघडताच ज्या शरीराकडे पाहिलं, ते शरीर लोखंडाचं बनेल. 
          ते महाभारताचं युद्ध. त्या युद्धात सर्व कौरव मरण पावले होते. फक्त एकच शेवटचा कौरव अर्थात दुर्योधन उरला होता व गांधारीला ते अपेक्षीत नव्हतं की तिचा हाही पुत्र युद्धात मरावा. तसं तिनं त्याला म्हटलं की शरणागती पत्कर. परंतु दुर्योधन शरणागती पत्करायला तयार नव्हता त्यावेळेस त्याचं संरक्षण व्हावं म्हणून गांधारीनं आपल्या डोळ्याची पट्टी उघडण्याचा विचार केला व त्याची कल्पना दुर्योधनाला दिली की त्याचं संपूर्ण शरीर लोखंडाचे बनेल. त्यानंतर त्याला कोणीच मारु शकणार नाही. दुर्योधनालाही त्याच्या आईची ती गोष्ट आवडली व संपुर्ण शरीर वज्राचं बनविण्यासाठी तो सकाळी सकाळी स्नान करुन नग्न अवस्थेत आपल्या आईच्या कक्षाकडे जावू लागला. ते क्रिष्णाला माहीत पडलं व क्रिष्णानं लागलीच त्याला गाठलं.
         ज्यावेळेस दुर्योधन नग्न अवस्थेत असलेला क्रिष्णानं पाहिला. त्यावेळेस त्यानं, त्याला तशा अवस्थेत कुठे जात आहे, याचं कारण विचारलं व कारण माहीत होताच तो म्हणाला की त्यानं तशा तरुणपणात आईच्या समोर जायचं. हे काही योग्य वाटत नाही. त्यानं आईच्या कक्षात जायचं हे ठीक आहे. परंतु आपला गुप्त भाग तरी झाकून जावं. जेणेकरुन त्याच्या आईलाही वाईट वाटणार नाही आणि त्यालाही. तेच केलं दुर्योधनानं. ज्याची परियंती त्याचाही जीव जाण्यात झाली.
          हे झालं द्वापर युगातील. आजही असे क्रिष्ण भरपूर आहेत की जे कालच्या द्वापरयुगासारखे सत्याच्या बाजूनं नाहीत, तर ते असत्याच्या बाजूनं आहेत. मग शाळेत वा देशात कितीही सुरक्षेसाठी तक्रार पेट्या लावल्या. कितीही सखी सावित्र्या समीत्या स्थापन केल्या. तरी त्यावर मार्ग कसा काढायचा? यावर उत्तर मिळवतात. कारण या देशात त्या सुरक्षा तक्रार पेटीची किल्ली ज्या घटकाजवळ असेल, तोच घटक त्या शाळेतील अध्यक्षाचा गुलाम असतो. त्यामुळं तो अध्यक्ष जसा म्हणेल तसा तो वागत असतो. शिवाय समजा अशी घटना शाळेत झालीच तर ती तक्रारपेटीच गायब केली जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जिथं मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे लागूनही मंदिरात चोरी होते व चोर सापडत नाही. तिथं हेही एक विद्येचं मंदिरच. त्या स्थळाची बदनामी होवू नये. म्हणून तक्रारपेटी गायब करण्याची कला शाळा प्रशासनाला बरोबर येते किंवा कोणाला कसं बदनाम करायचं तेही शाळा प्रशासनाला भरपूर येते.
           विद्यार्थी दृष्टीकोनातून शाळेशाळेत तक्रारपेटी समजा लावलीच तर ही शक्यता नाकारता येत नाही की जो शिक्षक देण म्हणून पैसे देत नाही. अशा शिक्षकाची बदनामी करणारे तक्रारपत्र ते संस्थाचालक त्या शाळेतील तक्रारपेटीत टाकणार नाही. महत्वाचं सांगायचं झाल्यास चोराला सांगावंच लागत नाही की आलमारी कशी फोडावी? तो आपआपल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून आलमारी फोडतोच. मग आपण आलमारीला कितीही कुलपं लावली वा ती कितीही सुरक्षीत जाड पत्र्याची बनवली, तरी ती फोडणारी मंडळी काही कमी नाहीत. आजचे चोर तर एटीएम मशीनही तिथं सीसीटिव्ही कॅमेरे असतांना फोडून टाकतात. मग ती तर तक्रारपेटी आहे. गुन्हेगार हा तक्रारपेटीत तक्रार जाण्याइतपत व सीसीटिव्हीत येण्याइतपत गुन्हा करेल काय? नाही ना. तो अतिशय सावधगिरीनं योजनाबद्ध रितीनं योजनापूर्वक गुन्हा करु शकतो. हे सत्य नाकारता येत नाही. मग कितीही शाळेत विद्यार्थी दृष्टीकोनातून दुर्योधनासारखं सुरक्षीत बलदंड वज्राचं शरीर बनवलं तरी. अर्थात सुरक्षीत वातावरण बनवलं तरी. आजचे अब्रू लुटणारे भीम हे शाळेतील दुर्योधनरुपी मुलींच्या कमकुवत बाजूवर वार करतीलच. याची शंका वाटते.
           विशेष म्हणजे आज शाळेशाळेत तक्रारपेटी, सीसीटिव्ही लावण्याऐवजी तसेच सखी सावित्री समीती स्थापन करण्याऐवजी शाळेतील शिक्षकांनी जर आपली मानसिकता बदलली तर कदाचीत बदलापूरसारखे संभाव्य धोके कधीच होणार नाहीत. तसंच शिक्षकांनी जर आपली भुमिका ही त्यांच्या पेशानुसार रक्षकांचीच ठेवली व भक्षकाची ठेवली नाही तरही असे संभाव्य धोके नक्कीच टाळता येतील. त्यातच विद्यार्थ्यांनीही आपण एकाच शाळेतील विद्यार्थी असून आपण एकमेकांचे भाऊबहीण आहोत हीच भुमिका घेवून चालल्यास शाळेत अपराधच घडणार नाहीत. हेच तत्व ती विद्यार्थीनी रस्त्यावर निघाल्यावर लोकांनीही ठेवावी. जेणेकरुन प्रत्येक विद्यार्थीनी सुरक्षीत राहील व ती आनंदानं शिक्षण शिकू शकेल व आपलं करीअर घडवू शकेल यात शंका नाही. तसंच लोकांनी वागावं. निदान विद्यार्थी दृष्टीकोनातून तरी.
            सुनीता बोलून गेली होती. तिला मुलींच्या भविष्याबाबत चिंता होती. तिला वाटत होतं की एकताला न्याय मिळायलाच हवा. त्यासाठी ती त्या संस्थाचालकाला विचारत होती. तशी आता, ती त्या संस्थाचालकाशी संवाद करीत होती व आपली आपबीती सांगू लागली होती.
         "तुम्हाला माहीत नाही की गुणवंतनं माझ्यावरही बलात्कार केला. त्याच्यामुळं तर मी कोमातच गेली होती. तब्बल दहा वर्ष मी कोमातून बाहेर आली नाही. यादरम्यान माझे आईवडील मरण पावले. परंतु तेही मला माहीत पडलं नाही. बिचारी एक आहे माझी बहीण. तिनंच काळजी घेतली माझी. तो वाचला माझ्या केसमधून. बा इज्जत बरीही झाला. अन् त्यानंतर मला होश आला. आज मी जी काही आहे. ती तिचीच कृपा. परंतु आतापर्यंत जे झालं ते झालं. आता त्याला सोडायचं नाही मला. तुम्ही सांगायचं खरं खरं न्यायालयात. तो मोठा मासा आहे यातील. तो गळाला लागायलाच हवा."
           सुनीता बोलून गेली. तसं तिनं त्याचं बयाण संपवलं. परंतु त्याला सोडलं नाही. त्याला त्या कोठडीतच ठेवलं व तिनं गाडी काढून ती थेट गुणवंतच्या घरी गेली. त्यापुर्वी तिनं आपल्या पोलीस सहकार्यांना सांगून योजना बनवली होती. 
          ती त्याच्या घरात प्रवेशली. तसे तिचे पोलीस शिपाईही. त्यांनी सर्वप्रथम त्या बंगल्यात असलेल्या चौकीदारांना पोलीस असल्याचं सांगून ताब्यात घेतलं होतं. काहींनी शरणागती पत्करली होती. त्यानंतर ती जेव्हा आत गेली. तेव्हा तिनं सोबत बंधूकही नेली होतीच. तसा तो होताच. परंतु आता तो बेसावध होता व त्याला तिच्या शौर्याची तेवढी माहीती नव्हती. मात्र ती इरादा करुनच गेली होती. त्यानंतर तिनं त्याला प्रश्न केले. 
            "ओळखलं का मला?"
            ती सुनीता होती व तो तिला ओळखू शकत नव्हता. कारण तिला त्यानं बऱ्याच दिवसांपासून पाहिलं नव्हतं. शिवाय तिचा चेहराही ॲसिडनं जळला होता. तो विद्रूप दिसत होता. तसं त्याला वाटलं की ती कोणीतरी असेल. तसा तो म्हणाला, 
          "ओळख सांगा, कोण आहात ते?"
          "मी सुनीता. रिताची बहीण. बलात्कार पीडीत. आता ओळखलं का?"
            "तर ते तू होय. बदला घ्यायला आलेली दिसतेय."
            "होय, बदलाच घ्यायला आलेय मी. बोल, आता तुझं तंगडी तोडू की हात तोडू. ज्या हातानं अपराध केलेत."
            "तू मला मारणार?" तो थोडासा हसला. तसा पुन्हा म्हणाला,
           "तू माझं काहीही करु शकणार नाहीस. तेवढी तुझी हिंमत नाही व तू एक स्री आहेस. स्रिया या अबला असतात. म्हणूनच मी आजपर्यंत तरी सापडलेलो नाही आणि एक विशेष. तू उर्मिलाला तर ओळखतच अशशील. ती तुझीच बहीण ना. माहीत आहे. मी तिच्यावरही बलात्कार केला आणि तिला मारुन टाकलं होतं. त्यानंतर हौसालाही. अशा बऱ्याच महिलांवर मी बलात्कार केलेत व मारुन त्यांची विल्हेवाट लावली. परंतु सापडलो नाही आणि सापडणारही नाही. मात्र तू सुटलीस माझ्या हातून. तू मरता मरता कोमातून बाहेर आलीच. नाहीतर तुझाही अंत होताच तर. परंतु ते मागचं जावू दे. आताही वेळ गेलेली नाही. जे काल माझ्याच्यानं नाही झालं, ते आज करणार आहे मी. मीच तुला शोधलं असतं. परंतु तू स्वतःच चालत आली माझ्याकडे. बरं झालं तेवढ्यानं. आता हे लक्षात घे की हा माझा इलाका आहे व इथं तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही."
            "व्वा व्वा मंत्रीमहोदय. चांगले बोललात. तुमच्यासारखेच मंत्री आहेत राजकारणात. म्हणून तर देश विकसीत नाही. जो देश स्रियांना कमजोर समजतो. तो देश कसा काय बलशाली ठरणार. बरोबर आहे तुमचं आणि या स्रिला कमजोर समजूनच नका. ही वाघीण आहे एकटी वार करणारी. इलाके असतात कुत्र्यांचे. लांडग्यांचे. जे संधी साधून असतात."
           "अन् हे बघ, तू माझं पितळही उघडं करु शकणार नाहीस. शिवाय मीच तुला नेस्तनाबूत करं शकतो इथं बसल्या बसल्या. जर मी एक आवाज दिला ना तर माझे पुर्ण प्याधेच इथं येवून तुझा अंत करु शकतात. देवू का आवाज?"
         "जरा देवून पाहा. मिही बघते की तुम्हाला कोण वाचवू शकतो ते?"
          ते त्यांचं संभाषण. त्याच संभाषणात त्यानं उर्मिलाला त्यानं बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परंतु तरीही थोडा संयम राखला होता तिनं. तशी तिनं त्याला आवाज दे म्हणताच तो आवाज देवू लागला. तशी त्यानं त्याच्या जवळ असलेली बेलही वाजवली. परंतु कोणीही तिथं आलं नाही. तसा तो थोडा घाबरला. परंतु तशीही त्याच्यात हिंमत होतीच. तो तिला स्री आहे म्हणून अबला समजत होता. तोच तो उठला आणि तिला स्पर्श करण्याच्या बेताने तिच्याजवळ येवू लागला. तोच अतिशय तत्परतेनं व फुर्ताइनं ती उठली आणि तिनं त्याला आपली लात जोरात मारली. त्यातच त्याच्या दोन्ही पायावर बंदूकीतील गोळ्याही. त्याच बंदूकीतील गोळ्यांनी घायाळ झालेला गुणवंत. आता त्याला स्री कमजोर की सबळ हे सारं दिसू लागलं होतं.
          सुनीतानं त्याच्या दोन्ही पायावर गोळी घातली होती. त्याचबरोबर तो लंगडा झाला होता. पायातून रक्त निघू लागलं होतं. तसा तो दयेची भीक मागू लागला होता व संधीही शोधू लागला होता. तो त्याला त्याच्या जवळ असलेली एक वजनदार वस्तू सापडली व ती वस्तू त्यानं तिच्या दिशेनं भिरकावली. ती वस्तू तिच्या मस्तकाला लागता लागता हुकली. त्यानंतर तिनं त्याचा विचारच केला नाही. तिनं आता त्याच्या दोन्ही हातावरही वार केला होता. आता तो पुरता दोन्ही हातानं व दोन्ही पायानं अपंग झाला होता. ही घटना एखाद्या चित्रपटासारखी घडत होती.
            थोड्याच वेळाचा अवकाश. सुनीता आपल्या कर्मचाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर त्याला पकडलं व त्याला दोन पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत बाहेर रस्त्यावर ओढत फरफटत आणलं. तेव्हा रस्त्यावर गर्दी गोळा झाली होती. तशी रस्त्यावरील गर्दी पाहून भररस्त्यावर ती जोरात म्हणाली, 
         "हाच तो नराधम ज्यानं माझ्या बहीणीवर बलात्कार केला व तिला मारलं. हाच तो नराधम की ज्यानं हौसावर बलात्कार केला व तिलाही मारलं. अन् हाच तो नराधम की ज्यानं एका शाळेतील एकता नावाच्या मुलीवरही बलात्कार केला व तिचीही हत्या केली. एवढंच नाही तर हाच तो नराधम की ज्यानं माझ्यावरही बलात्कार केला होता व मलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. असे कितीतरी बलात्कार केलेत व कितीतरी महिलांची हत्या केली यानं. जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर माझ्यासोबत त्या जंगलात चाला. त्यातच जंगलात लाशांचा सडाच पडलेला आहे. हे सगळे याचेच क्रियाकर्म आहेत. आता बोला याचं काय करायचं? जीवंत ठेवायचं की मारुन टाकायचं. परंतु एक विचार करा. जीवंत ठेवलं तर हा नराधम वकीलांकरवी न्यायालयातून जमानत करेल. बाहेर येईल व सर्वात प्रथम माझ्यावरच पुन्हा बलात्कार करुन माझीच हत्या करेल. त्यानंतर तुमच्यासारख्यांच्या मुली व तुम्हालाही लक्ष करेलच. हे विसरु नका. आता ठरवा काय करायचं ते. तसंही आपलं न्यायालय कुचकामीच भुमिकेचं आहे. याच्यासारखे अट्टल गुन्हेगार सोडतं आणि जे गुन्हेगार नाहीत, त्यांना पकडतं. याचंही तसंच होईल. हाही पैशाच्या जोरावर मोठ्यात मोठा वकील करेल. जो वकील केस लढेल व हा बाहेर येईल, बा इज्जत बरी होवून. याचाही डोक्यात विचार असू द्या. तसं पाहिल्यास आपलंच चुकतं. आपणच मुर्ख आहोत की आपल्याला यांच्यासारख्यांचे गुन्हे माहीत असतांनाही आपण यांना अभय देतो. अन् यांनाच मतदान करुन मोठ्या संख्येनं निवडणुकीत निवडूनही देतोच. म्हणूनच यांच्यासारखे नेते माजल्यासारखे करतात. हैवानासारखे बलात्कार करीत सुटतात अन् खुन करीतही. आता ठरवा याचं काय करायचं ते. मी याला आपल्या स्वाधीन करीत आहे. आता तुम्हीच ठरवा की एक तुमचा नेता म्हणून सोडून देवून याला न्यायालयातून लढून वकिलामार्फत बा इज्जत बरी होवून पुन्हा बलात्कार करण्याची व त्यानंतर हत्या करण्याची संधी द्यायची आहे की हा कित्ता इथंच संपवायचा आहे. ज्यातून तुमच्या लेकीबाळी सुरक्षीत राहू शकतील. माझं मी पाहून घेईल याच्यापासून कसं सुरक्षीत राहायचं ते. मात्र आपण आपल्या मुलीबाळींना याच्यापासून कसं सुरक्षीत ठेवता येईल ते ठरवा म्हणजे झालं."
          सुनीता बोलून गेली व तिनं हातातील बंधूक खाली सोडून ती तेथून चालती झाली. तोच लोकांचा एकच गोंधळ उडाला. लोकांनी त्याला तिथंच दगडा दगडांनी ठेचून काढला. ज्यात तो रक्तबंबाळ होवून गतप्राण झाला होता.
            मंत्री राहिलेला गुणवंत. त्याच्या अब्रूच्या पुर्णतः चिंध्या करुन सुनीतानं त्याला संपवलं होतं. त्यात काही लोक हरहळत होते तर काही त्याला शिव्याही हासडत होते. त्यातच सुनीतानं त्याचा नकार उतरविल्यानं काहीजण सुनीताची वाहवा करीत होते तर काहीजण तिला दोषही देत होते. 
         सत्ताधारी पक्षात असलेली रिता. तिलाही त्या गोष्टीचा आनंदच झाला होता. परंतु एक समस्या होती. ती म्हणजे तिनं त्याला जरी मारलं नसेल तरी तिनं त्याला मारायला मजबूर केलं. म्हणून विरोधी पक्षातील लोकं ओरडत होते. असाच पोलीस वर्ग कायदा हातात घेऊन लोकांना मारुन टाकेल. म्हणत ते आंदोलन करीत होते तर कुठं जाळपोळ करीत होते. तेच सुत्र लागू होत होतं आजही की काही लोकं आजही अशा बलात्कारी रेड्याला साथ देत होते व आंदोलन करीत होते की ज्यानं कितीतरी प्रमाणात बलात्कार केलेत.
          एका बलात्कारी माणसाला मारणं काही वाईट गोष्ट नव्हती. परंतु त्याला मारताच जी विरोधी पक्षाची आंदोलनं होवू लागली. त्यातून जनक्षोभ उसळला व त्या जनक्षोभातून सुनीताला निलंबीत केलं गेलं. त्यातच तिला अटकही करण्यात आली व तिला न्यायालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिची जी बहीण सत्ताधारी पार्टीत होती. तिनं तिची जमानत घेतली व तिनं आपल्या बहिणीचा खटला लढण्यासाठी एक मातब्बर वकील लावला. ज्यातून न्यायालयात फैरी झडत होत्या. 
           आज न्यायालयातून ज्या वकीलाच्या फैरी झडत होत्या. त्यात गुणवंत जरी दोषी असला तरी त्याचा दोष दिसत नव्हता. कारण गुणवंतच्या वारसानं आणि संस्थाचालकानं पैसा फेकून असा मातब्बर वकील उभा केला होता की ज्यात गुन्हा सुनीताचाच दिसत होता. प्रतिपक्ष वकील म्हणत होता की दोष हा तिचाच आहे व तिनंच लोकांना गुणवंत विरोधात लोकांना भडकवून त्याला मारायला मजकूर केलं.
          सुनीता ती केस हारत होती. ज्यात गुणवंत गुन्हेगार असला तरी तो ती केस जिंकत चालला होता. तो प्रत्येक आघाड्यावरच जिंकला होता. 
          सुनीताला भीती वाटू लागली होती. कारण सुनीताच्या नोकरीचा प्रश्न होता. शिवाय तिला वाटत होते की जर ते ती केस हारत असेल तर उद्या गुणवंतसारख्या लोकांची चांदी चांदी होईल व ते बलात्कार करीत सुटतील. बलात्कारात वाढ होईल. जर असं झालंच तर उद्या देशात राजरोषपणे बलात्काराचे सत्र सुरु होवून लोकं दिनदहाडे बलात्कार करतील. आपण ही केस जिंकायलाच हवी. केवळ वाढणाऱ्या बलात्कार केसेसवर रोकथाम करण्यासाठी. परंतु जिंकणार कशी?
          सुनीता विचार करीत होती. अशातच तिला आठवला तो शाळेत असणारा कर्मचारी. ज्यानं भराभर आपलं बयाण दिलं होतं. जो कधीच खोटा बोलू शकणार नव्हता. ज्याच्यावर बेतलं होतं. ज्यानं गुणवंताच्या वर्तणुकीचे चटके झेलले होते. ज्यानं गुणवंतालाही पाहिलं नव्हतं. तरीही ज्याला गुणवंतामुळं नोकरी सोडावी लागली होती.
          तो तिचा खटला. ती तारीखवर तारीख चालत होती. अशातच सुनीताला तो शिक्षक कर्मचारी आठवताच ती त्याच्या घरी गेली. त्याला रितसर माहिती दिली व म्हटलं की मी फसलो तरी चालेल. परंतु देश वाचायला हवा. जर माझ्या खटल्यामध्ये माझा पराभव झाला आणि गुणवंत जर जिंकला तर तो दिवस दूर नाही की देशात रस्त्यारस्त्यावर बलात्कार होतील. तुला या देशाला वाचवायचं आहे. अन् ते कार्य तूच करु शकतेस.
         ते सुनीताचं बोलणं. त्यावर भारावलेला तो शिक्षक कर्मचारी. तो न्यायालयात आला व त्यानं न्यायालयात बयाण दिलं की संबंधीत खटल्यातील संस्थाचालक व गुणवंत हे काही चांगले नाहीत. त्यानं आपल्या बयाणात सांगीतलं की संस्थाचालकानं त्याला एकता नावाची ती मुलगी कशी न्यायला लावली व ती मुलगी त्यानं कशी नेली. ती मुलगी कोणाच्या सुपुर्द केली. हेही सांगीतलं. इथंच जोर आला होता सुनीताला. मग तिनं कंबर कसली आणि स्वतः कंबर कसून तिनं एकताची मिळालेली लाश व त्या ठिकाणी किती लाशा पडल्या होत्या याचं दृश्य व पंचनामा न्यायालयात सादर केला. तसंच तिच्यावरही गुणवंतनं कसा बलात्कार केला हेही न्यायालयात समजावून सांगत आपण त्याच्याचमुळं कसे काय दहा वर्ष अंथरुणावरच कोमातील अवस्थेत होतो हेही सांगत त्याचे पुरावे दाखल केले. ज्यातून गुणवंत आणि संस्थाचालकाकडे झुकलेली केस व न्याय सुनीताकडं झुकला व न्यायालयानं तिला लागलीच क्लीनचीट दिली.
         न्यायाधीश त्यावेळेस म्हणालं की मी संबंधीत खटला तपासला. त्याची परियंती समजून घेतली. साक्षी पुरावेही तपासले व पुराव्याअंती हे समजलं की संबधीत आरोपी सुनीता ही अशाच गुणवंतसारख्या व्यक्तींकडून प्रताडीत असून तिच्यावर बलात्काराच्या स्वरुपात गुणवंतनं वेदना दिल्या आहेत. यात जे कृत्य सुनीतासोबत घडलेलं आहे. ते कृत्य माणुसकीला धरुन नाही. तसंच यामध्ये गुणवंतनं केवळ सुनीतावरच बलात्कार केलेला आढळून येत नाही तर त्यानं एकतासारख्या लहान मुलीलाही आपल्या हवसेचे शिकार केले. तसाच बलात्कार उर्मिला, हौसा व इतर बर्‍याच लोकांवर केलेला आढळून येत आहे. अशांना तर मरेपर्यंत मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यायला हवी होती. जी नियतीनंच दिलेली आहे. यामध्ये मुखबीर म्हणून गुणवंतासाठी काम करणाऱ्या संस्थाचालकाला दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा फर्मावण्यात येत आहे. कोणत्याही संस्थाचालकानं आपल्या शाळेत असा प्रकार करु नये यासाठी. तसंच प्रकाशचं कार्य हे लांच्छनास्पद जरी असलं तरी त्यानं ते कार्य स्वतःच्या मनानं केलेलं नसून ते त्याच्या हातून घडलेलं कार्य हे त्याच्या मजबुरीनं घडलेलं आहे. याची जाणीव न्यायालयाला आहे. तेव्हा त्याला सोडून देण्यात येत आहे. शिवाय अशी प्रकरणं घडू नये यासाठी न्यायालय हे देखील निक्षून व आवर्जून सांगत आहे की अशी प्रकरणं परीसरात वा कुठेही यापुढे घडल्यास जो अशी प्रकरणं घडवून आणेल वा बलात्कार करेल. अशा लोकांना लोकांच्या न्यायालयात सुपुर्द करण्यात येईल. ज्यात लोकंच न्याय करतील. ज्यांना शिक्षेचे पात्र समजण्यात येणार नाही. तसंच या प्रकरणी आणखी कायदे हवे असतील तर ते कायदे सरकारनं तयार करावेत. त्याला हे न्यायालय मंजूरी प्रदान करीत असून यात आरोपी सुनीताचा कोणताच दोष आढळून येत नाही. कारण तिनं जेही कोणतं कार्य केलं. ते कृत्य आरोपीनं पुन्हा करु नये वा बलात्कारासारखे कृत्य इतर कोणत्याही आरोपीनं करु नये व त्या कृत्याला रोकथाम मिळावी म्हणून केलेले आहे. हा एक तिनं लोकांनाच नाही तर देशालाही बोध दिला आहे असे यातून आढळून येत आहे व दिसत आहे. त्यामुळंच तिला बा इज्जत बरी करण्यात येत आहे.
         आज न्यायालयातून सुनीता बा इज्जत बरी झाली होती. माफीचा साक्षीदार असलेला तो शिक्षक कर्मचारी, ज्याचं नाव प्रकाश होतं. तो बाहेर निघाला होता. तशी संस्थाचालकालाही शिक्षा झाली होती व संस्थाचालकाला आणि संबंधीत शिक्षणक्षेत्राला ताकीद दिली होती की अशा घटना शाळेत वा परीसरात घडू नयेत. घडल्या तर शाळाच बंद करण्यात येईल. तसंच अशा घटना घडू नये म्हणून ज्यानं बलात्कार केला. अशांना सार्वजनीक ठिकाणी लोकांना सुपुर्द करुन त्यांचा न्याय लोकांनीच लावावा. त्यावर माफी देवू नये. त्यावर जे जे व्यक्ती अशा बलात्काऱ्याची हत्या करतील. त्यांचे सगळे गुन्हे माफ करण्याची शिफारस न्यायालयाने केली होती. तसंच त्यासंबंधी आणखी काही नवे कायदे बनविण्याची शिफारस न्यायालयानं सरकारला केलेली होती.
           न्यायालयानं दिलेला निकाल. तो निकाल रास्त होता व त्या निकालानुसार आज बदलाव झाला होता. त्यातच एखाद्या ठिकाणी बलात्कार झाल्यास लोकं पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी कायदा हातात घेवून त्याची केस बनत नसल्यानं आरोपीला स्वतःच शिक्षा देत असत. ज्यातून जनता सुधारली होती व आता बलात्कारही कमी झाले होते.
           सुनीताची बहीण रिताला मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. त्यातच तिला कायदेमंत्रीही बनविण्यात आले होते. त्यानंतर तिच्या हातात कायदे बनविण्याची तरतूद असल्यानं तिनं तोच न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देवून संसदेत बलात्कारासंबंधी कायद्याचा प्रस्ताव ठेवला. ज्यात नवीन कलमा बनविण्यात आल्या होत्या व त्याची नोंद संविधानात करण्यात आली होती. ज्यात कलमा होत्या. बलात्कार केल्यास त्याला भरचौकात एकेक अवयव कापत फाशी देण्याचं प्रावधान होतं. दुसरा नियम होता, ती फाशी लोकांनीच द्यायचा. तसाच तिसरा नियम होता, संपत्ती जप्त करण्याचा. बलात्कार करणाऱ्या आरोपीची संपुर्ण संपत्ती जप्त करण्याचं प्रावधान होतं. आज सुनीता खुश होती व रिताही खुश होती. कारण त्यांच्या बहिणीचा कातील बलात्कारी सापडला होता व त्यांना त्यांच्या बहीणीचं काय झालं होतं तेही माहीत झालं होतं.
         बलात्कार पुर्णतः बंद झाले नव्हते. जरी बलात्कार करणाऱ्यांना शिक्षेचं प्रावधान असलं तरी. मात्र त्यात घट नक्कीच झाली होती. तसंच रितानं उर्मिलेच्या स्मरणार्थ एक मोठं रुग्णालय उघडलं होतं, ज्यात अशा बलात्कार पीडीतेवर निःशुल्क उपचार केल्या जात असे. त्याचं नाव उर्मिला हॉस्पीटल ठेवलं होतं. 
          सुनीता जीवनभर कुवारीच राहिली होती तर रितानं विवाह केला होता. तिनं विवाह तिच्याच एका पार्टी अध्यक्षाशी केला होता. जो आतापर्यंत कुवाराच राहिला होता.
           रिता आणि सुनीतानं आयुष्याची सीडी चढतांना खुप संकटं झेलली होती. ज्या संकटांचा सामना करु करु आज त्यांना नाकीनऊ आलं होतं. परंतु ते जरी खरं असलं तरी आज त्यांच्याचमुळे समाजात थोडा तरी बदलाव झाला होता. समाज बराच सुखी झाला होता. कारण बलात्कार कमी झाले होते व बलात्कार पिडीतांना योग्य व मोफत कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळू लागले होते. तसंच आरोपींना यातना, जशास तशा स्वरुपाच्या. आज प्रत्येक घरची स्री, मग ती बालिका का असेना वा ती म्हातारी का असेना, सुरक्षीत झाली होती. कारण आता बलात्कारानंतर चेहऱ्यावर ॲसिड फवारणी व मृत्यू नव्हता. त्या आपलं आजचं जीवन अगदी आनंदात व मजेत जगत होत्या.
         महिलांच्या बलात्कारावर विशेष असे कायदे बनले होते. ज्यातून अजिबात पळवाट नव्हतीच. बलात्कार झालाच आणि ते लोकांना माहीत झालंच तर आता लोकंच न्यायालयीन प्रकरण व प्रक्रिया होण्यापुर्वी निकाल लावून टाकत असत. या गोष्टीला काल काही लोकं अंधाकानूनही म्हणत असत. सरकारला बहिरं सरकार म्हणत असत, तर जनतेला गुंगी जनता. परंतु जी गोष्ट झाली होती वा सुनीताच्या माध्यमातून न्यायालयानं वा सरकारनं कायदा बनवून केली होती. त्याच गोष्टीला आज तेच लोकं आंधदेशाला गरज होती.
          कायदे बनले होते बलात्कारावर की बलात्कार झाल्यास जनतेनंच जशास तशा स्वरुपानं निकाल लावावा. तशी जनता बलात्काराच्या प्रकरणाचा निकाल लावतच होती. तसेच जशास तशा स्वरुपाचे कायदे इतर बऱ्याच गुन्ह्यांवर बनले होते. ज्यात खुन करणे हाही एक प्रकार होता. ज्यानुसार प्राण्यांची शिकार करणे हाही एक खुनच समजल्या जायचा. आता शिकारीवरही बंदी आली होती व अशी कदाचीत शिकार झाल्यास लोकं शिकार करणाऱ्या व्यक्तीलाही धडा शिकवीत असत. मात्र कोंबडं बरं अजुनही कापलं जात असे व त्यांच्या कापण्यावर अद्यापही बंदी आली नव्हती. 
         रितानं विवाह केला होता व तिला एक मुलगी झाली होती. जिचं नाव तिनं उर्मिलाच ठेवलं होतं. 
          उर्मिला आज तिच्या मनात होती व तिला जेव्हा उर्मिला आठवत असे, तेव्हा ती आपल्या मुलीकडं पाहात असे. तेव्हा ती आपल्या मुलीला कवटाळत असे व त्यानंतर ती शांत होत असे. 
          नुकताच शिशिर संपला होता व वसंत आला होता. परप्रांतातून पक्षी येवू लागले होते. ते त्या जंगलात स्थिरावत होते. ज्या जंगलात आता उर्मिला हौशाच्या लाशा नसायच्या ना ही एकताची लाश दिसत असे आणि नसायचा तो लाशांचा सडा. जो सडा बलात्कार झाल्यानंतर तयार व्हायचा. आज महिला तर सुरक्षीत झाल्या होत्याच. शिवाय सुरक्षीत झाले होते पक्षीही. कारण काही काही प्रकरणात निकालाचं सुत्रच जनतेच्या हाती देण्यात आलं होतं. मग ती शिकार करणे वा खून करणे का असेना. आजही गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यावर कडक शिक्षा देशात निर्माण झाल्या होत्या. ज्याचा निकाल जनताच लावत असे तर काही किरकोळ स्वरुपाचे गुन्हे असायचे. ज्या प्रकरणात गुंतागुंत असायची. ज्याचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेनं लागायचा. अशी प्रकरणं असायची पती पत्नीची भांडणं. लोकांची किरकोळ भांडणं आणि मालमत्तेची भांडणं. ती भांडणं न्यायालयात चालायची वर्षानुवर्ष, अगदी थकतपर्यंत. जेणेकरुन कोणीही तशा स्वरुपाचे खटले न्यायालयात टाकू नये व भांडणं करु नयेत. मग कित्येक शिशिर संपून जायचे. कित्येक वसंत येवून जायचे. परंतु ना शिशिरात पानं पडायची. ना वसंतात पालवी फुटत असे.
          आज रिता व सुनीता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांनी आपल्या जीवनात बरंच भगवान भोगलं होतं. बराच संघर्ष केला होता. परंतु आज त्या सुखी झाल्या होत्या व आता म्हातारपणातील उर्वरीत आयुष्य त्या अगदी मजेनं व आनंदानं घालवत होत्या. कारण त्यांच्या म्हातारपणात आता कोणताच शिशिर नव्हता पानं गळवणारा तर वसंतच वसंत होता, नव्या पालव्या देणारा. जो वसंत त्यांच्याही जीवनात सदोदीत सुख व समृद्धी आणत होता.

       ********************************************

          लोकांना अक्कल नसते? असा जर कोणाला प्रश्न विचारला तर काही लोकांना नक्कीच राग येईल. त्यांना वाटेल की लेखक महोदय, आमची अक्कल काढतात व तशी अक्कल काढायची त्यांना काहीच गरज नाही.
         अक्कल......... होय अक्कलच नसते. अकलेच्या बाबतीत विचार केल्यास लोकांना अक्कल नसते असे नाही. परंतु ती कमी जास्त प्रमाणात असते. लोकांना आज माहीतही आहे की आपल्या घरासमोर कचऱ्याची दररोज गाडी येते व ती कचरा घेवून जाते. तरीही लोकं त्या गाड्यांची वाट पाहात नाहीत. तो कचरा स्वतंत्र बादल्यात भरुन ठेवत नाहीत तर कुणाच्या मोकळ्या भुखंडात कचरा टाकत असतात. ज्यातून आजाराचे जंतू वाढत असतात. मोकाट कुत्री, जनावरं तिथंच रेंगाळून आजार पसरवत असतात. 
          काही काही घटना अशाच विपरीत स्वरुपाच्या असतात. ज्यात लोकांना अक्कलच नसते. त्याबाबतीत एक उदाहरण देतो. एक महिला, जिचं वय साधारणतः पंचेचाळीस. तिला मुलं बाळं. दोघांचं किरकोळ कारणांवरून भांडण झालं. अशावेळेस तिचा पती त्या कारणास्तव कपडे भरुन रागानं निघून गेला. तो दोन चार दिवस घरी आलाच नाही. मग त्या महिलेला राग आला. तशी ती त्याला आणायला गेली. त्यानंतर त्यानं दोनचार तिला शिव्या दिल्या व घरी येण्यास नकार दिला. त्याचवेळेस तिला राग आला व तिनं आपल्या मुलांचा विचार न करता तो का घरी येत नाही. म्हणूनच हाताची नसच कापून टाकली. बरं झालं की प्रसंग थोड्यावर निभावला. नाहीतर नक्कीच मरायची पाळी होती. असंच दुसरं उदाहरण. एका महिलेचा पती दारु पीत होता. त्यालाही तीन लेकरं. तो दारु सोडत नव्हताच. त्यातच तो दारु का सोडत नाही म्हणून तिनं मानेवर ब्लेडचे चिरे मारले. इथंही बरं वागलं. नाहीतर प्रसंग जीवावर बेतला असता. तिसरं उदाहरण असंच आहे. एक महिला आयुष्यभर संसार केल्यावर पन्नास वर्षानंतर परपुरुषाच्या नादी लागून त्याच्यासोबत पळून गेली आपला संसार सोडून.
          लोकांचं असंच असते. ते आपली अक्कल पाजळवीतच नाहीत की आमच्या चुकीच्या वागण्यातून आमचंच नुकसान होईल. आमच्याच परीवाराचं नुकसान होईल. महत्वाचं सांगायचं झाल्यास काही शेतकऱ्यांचं उदाहरण देता येईल. शेतकरी आत्महत्या अशाच घडतांना दिसतात. कारण सतत नापीकी व दुष्काळ त्यातून होणारं दुष्परिणाम, त्यातून आत्महत्या. तेही विचार करीत नाहीत की आमच्या परीवाराचं आमच्यानंतर कसं होईल. 
         असे बरेच प्रसंग आहेत की त्या प्रसंगात लोकं विचारच करीत नाहीत की आपल्या अशा मुर्ख वागण्यानं आपल्याही परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळून पडेल. तसं काही अंशी कळतंही त्यांना. परंतु तरीही त्यांचं वागणं मुर्खपणाचंच असतं. असेच काही गुन्हेही घडत असतात. काही गुन्हे मजबुरीनं घडत असतात. जशी पोटात आग पडलीच तर आरोपीचं खाऊच्या दुकानात चोरी करणं. पैशाची गरज पडलीच तर पैशाची चोरी करणं. गरज पडल्यास गुन्हा? परंतु काही काही गुन्हे असेही असतात की जे गरज नसते तरीही गुन्हे घडतात. ज्याचा मुर्ख वागण्यानं गुन्हा घडतो. असे गुन्हे घडतांना लोकांना मुळात अक्कल नसतेच. जसं एखादा खुन केल्यावर आपल्याला फाशी होईल हे माहीत असतांनाही खुन केला जातो. हा गुन्हा म्हणजे मुर्खपणाचं लक्षणच. मग पश्चाताप होतो. तसंच परीवाराला सोडून पन्नासव्या वर्षी पळून जात असतांना त्या महिलेला माहीतही असतं की आपण करीत असलेलं कार्य हे आपल्याला शोभत नाही. तरीही ती पळून जाते. या घटनेतदेखील अक्कल कमी असल्याचं आढळून येतं. अशाच त्या घटना, हात कापणे आणि मान कापणे. त्यानंतर पश्चाताप झाला. ना हाताची नस कापून पती परत आला. कारण त्याला भीती होती की उद्या कदाचीत आपल्याकडून भांडण होवून त्या भांडणानंतर ती आपली मानच कापेल. दुसर्‍या घटनेत मान कापूनही तिच्या पतीनं दारु सोडली नाही. तर तिसऱ्या घटनेत ती पन्नास वर्षाची महिला, ती पळून तर गेली. परंतु ज्याच्यासोबत पळून गेली. त्यानं तिला एकच महिना ठेवलं व हाकलून दिलं. मग ती परत आपल्याच पतीकडे आली.
          विशेष बाब ही की अशा बर्‍याच घटना घडत असतात परीसरात. ज्या लोकांना अक्कल नसते याचं प्रतिनिधित्व करीत असतात. काही तरुण मुलीही अशाच की आपलं वय न पाहता आपल्या आईवडीलांचा विचार न करता आणि आपल्याला पोषणारा जोडीदार कितपत चांगला आहे. तो आपल्याला पोसू शकेल काय? याचा विचार न करता पळून जातात अगदी सैराट चित्रपटातील कथानकासारखं. मग जे व्हायचं ते होतं. कारण कधीकधी या मुलींवर आत्महत्येची वेळ येते तर कधी या मुलींना वेश्यालयात विकून वेश्याव्यवसायाला लावलं जातं.
          राजकारणातही असंच आहे. लोकं मतदान करतांना विचारच करीत नाहीत की कोणता नेता कसा आहे? तो बलात्कारी आहे की गुन्हेगारी स्वरुपाचा. त्याला निवडून दिल्यावर तो आपलं काम करेल की आपलाच पैसा आपल्या पाकीटमनी म्हणून वापरेल. असा विचार न करता मतदाता आपलं मत एका दारुच्या पव्व्यात व पाचशे रुपयात विकतो. जे मत बहुमोल असतं व ज्याला किंमतीत मोजताच येत नाही. मग देशाचं वाटोळं होत असते. यातही लोकांना अक्कल नसते असंच म्हणावं लागेल. 
          काही काही बलात्काराचेही असेच आहे. या बलात्काराच्या घटनेबाबत सांगायचं झाल्यास काही महिला आधी पुरुषांना फसवून पैसे उकळण्यासाठी त्याच्या वासनेला होकार देतात. त्यानंतर पलीकडील माणसाची वासना पुर्ण झाली वा त्यानं पैसे देण्यास नकार दिला तर त्याचेवर बलात्काराचा आरोप लावून त्याला बलात्काराच्या केसमध्ये अडकवतात. तशाच काही काही महिला अशाही असतात की त्या पुरुषांकडून स्वतःची वासना भागवून घेतात. बदल्यात त्या पैसे घेतात. अन् ज्यावेळेस समस्या निर्माण होतात. तेव्हा बलात्काराचे आरोप लावले जातात. यात गुन्हा महिलांचाच असतो. परंतु दोष पुरुषांवर लावले जातात व बिचारे पुरुष विनाकारण फसतात. या घटनेतही लोकांना अक्कल नसते हे दिसून येते. 
          महत्वाचं सांगायचं झाल्यास लोकांना अक्कल नसते व त्यांच्या मुर्खपणानं कधीकधी इतर लोकंही फसतात व त्यांना यातना भोगाव्या लागतात. हे तेवढंच खरं. त्यातच लोकं असे का वागतात? हाही एक विचार येतो. विशेष म्हणजे लोकांनी विसरु नये की आपण मानवप्राणी आहोत. त्यांनी आपलं वागलं सुधरावं. कारण आपल्या अक्कल हुशारी न वापरता मुर्खपणाच्या वागण्याचं आपलंच नुकसान होत असतं. त्याचबरोबर आपण आपल्या परीवाराचंही नुकसान करीत असतो नव्हे तर देशाचंही नुकसान करीत असतो यात शंका नाही. म्हणूनच प्रत्येकानं वागतांना वा प्रत्येक पाऊल टाकतांना मुर्खपणानं पाऊल न टाकता थोडा विचार करुन व विचारपूर्वक पाऊल टाकावं. जेणेकरुन त्याचे गंभीर परिणाम आपल्याला, आपल्या परीवाराला व आपल्या देशालाही भोगावे लागणार नाही.
            बलात्कारावर कायदे बनले होते व लोकअदालतीतून त्याचा निकालही लागत होता नव्हे तर लावले जात होते. तसं आज बलात्कार कमीही झाले होते. आज समाजात गुणवंत निर्माण होण्याला रोक लावता आली होती. त्यातच बलात्काराच्या गुन्ह्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी बलात्काराचे गुन्हे पुर्णतः बंद झाले नव्हते. आजही ते सर्रास सुरु होते. कारण कोणी कोणी बलात्काराच्या विपरीत परिणामांना न घाबरता गुन्हे करीत होते तर कोणी नकळत त्या गुन्ह्यात अडकत होते आणि बलात्काराच्या कायद्याचाच गैरवापर करीत काही काही महिला जाणूनबुजून पुरुषांना फसवत होते. ज्यात सामान्य माणसंही त्यांचा गुन्हा नसतांना फसत असे. त्याचं कारण असणे पुरुषांची व स्रियांची नार्को चाचणी वा बलात्कार चाचणी न होणे. संबंधीत कायद्यानुसार लोकं, एखाद्या स्रीनं एखाद्या पुरुषांवर बलात्काराचा आळ घेतल्यास त्याची व तिची बलात्कार चाचणी करुन न घेता फक्त त्या स्रीच्या म्हणण्यानुसार तिच्या बोलण्याला शंभर प्रतिशत खरं मानून बलात्काराची शिक्षा देत असत. ज्यात सामान्य माणसं पिसली जात होती.
           रिता व सुनीता पाहात होत्या बऱ्याचशा बलात्कारात लोकांचं वागणं. लोकं प्रत्येक बलात्काराची शहानिशा न करता कायद्याच्या पाठबळानुसार केवळ त्याची अंमलबजावणी करुन बलात्कार करणाऱ्याला ताबडतोब शिक्षा देत असत. त्याला बोलायची व त्याचं मत मांडायचीच संधी देत नसत. शिवाय अशात चांगले लोकं फस्त असत. कारण काही काही स्रिया ह्या केवळ पैसा उकळण्यासाठी प्रेम करीत व लोकांना फसवून त्यांचेकडून तसे अश्लील कृत्य करुन घेत. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून घेवून पैसे लुटत व असे करतांना धमक्याही देत. विशेष म्हणजे लोकअदालत हे माध्यम पैसे उकळण्याचं माध्यम झालं होतं. तो पैसा त्या व्यक्तीनं देण्यास नकार दिला की बस. त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवून त्याला लोकअदालतीत देत. ज्याची परियंती त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात होत असे. काही स्रिया स्वतःच्या वासनेची तृप्तता व्हावी म्हणून समागम करुन घेत. बदल्यात पैसाही घेत. त्यानंतर पुरुषांना फसवून त्यांच्याकडून पैसा घेत. 
         रिता व सुनीतानं बलात्कार बंद करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. ज्यातून बलात्कार कमी तर झाले होते. परंतु त्या निरपराध माणसं मरण पावत असत वा ते फासावर चढत असत. म्हणूनच त्या दोघींनाही विचार येत असे व वाटत असे की आपण त्या गोष्टीचाही विचार करायला हवा होता. आपण फक्त पुरुषांनाच दोषी समजत कायदा तर पास करुन घेतला. परंतु त्याचे काही दुष्परिणामही दिसत आहेत. 
          आज रिता व सुनीता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांना आज कायद्यात थोडा बदल करावासा वाटत असे. परंतु तो बदल करणं आता त्यांच्या वाढलेल्या आयुष्यानं शक्य होत नव्हता. परंतु तरीही रिता ही राजकारणात असल्यानं तिनं तीच बाजू लावून धरली व दिर्घ प्रयत्नातून एक कायदा पास करुन घेतला की कुणावरही बलात्कार झाल्यास ताबडतोब त्यावर लोकांनी कृती करु नये. आरोप सिद्ध व्हायची वाट पाहावी. त्यानुसार बलात्काराची परिस्थिती पुन्हा एकदा जैसे थे, अशीच झाली होती. 
           रिताच्या प्रयत्नातून कायदा बदलला होता. कायद्याचं पुनरुज्जीवन झालं होतं. मात्र जसा कायदा बदलला. त्यानंतर त्याचे परिणाम पाहायला रिता व सुनीता जास्त दिवस जीवंत राहिल्या नाहीत. त्या लवकरच मरण पावल्या. त्यानंतर त्या बदललेल्या कायद्यातून बलात्काराला पुर्वीचेच दिवस आले होते. ज्यातून केस भांडतांना वकील लावून बा इज्जत बरी होता येत होतं. त्याच प्रकारातून आता पुन्हा कित्येक गुणवंत तयार होवू लागले होते. त्यातच ते गुन्हेही करु लागले होते. शिवाय न्यायालयात केस लढत असतांना मातब्बर वकील लावून बा इज्जत बरी होवू लागले होते. आता जागोजागी, घरादारात, शाळेत, गावागावात, शहराशहरात बलात्कार होवू लागले होते. त्यातच बलात्काराचीही संख्येत वाढ झाली होती. त्यातच बलात्कार वाढले होते. आता लोकं पुर्वीसारखेच बलात्कार करीत व चेहरा ओळखू येवू नये यासाठी चेहर्‍यावर ॲसिडची फवारणीही करु लागले होते. वाटत होतं की पुन्हा एकदा सुनीता व रिताचा जन्म व्हावा व कायद्याला परत लोकअदालतीचं स्वरुप प्राप्त व्हावं. जेणेकरुन बलात्काराचे प्रमाण घटेल व बलात्कार बंद होतील. परंतु आता ते शक्य नव्हतं. कारण रिता व सुनीताचा पुनर्जन्म शक्य नव्हता ना रिता व सुनीता पुनर्जन्म घेवून परत येणार होत्या.

******************************************************************************समाप्त************