Nikita raje Chitnis - 23 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २३

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २३

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.    सारंग                   काँट्रॅक्टर

भाग २३

भाग २२ वरुन  पुढे वाचा .......

निकिता

त्या दिवशी दामले काकांनी आश्चर्याचे धक्केच दिले. पाटील साहेब सरळ खूनाचे आरोप माझ्यावर करत होते आणि मी पार खचून गेले होते. उसनं अवसान आणून बोलत होते पण ते किती काळ टिकलं असत माहीत नाही. मला काहीच कळत नव्हतं. मी कशातच नव्हते आणि काहीच केल नव्हत तरीही पाटील मला अपराधी ठरवून मोकळे झाले होते. वर बबन ने सगळं कबूल केलं आहे, असंही म्हणाले. माझ्या डोळ्या समोर अंधारी आली आणि मला फक्त फासाचा दोरच दिसायला लागला होता. आणि अश्या वेळेला दामले काकांनी एंट्री घेतली. काकांचा आवेशच असा होता की कृष्ण धावून आल्यावर द्रौपदीला जे वाटलं असेल तसंच मला वाटलं. काकांनी काय चाव्या भरल्या ते कळलं नाही, पण नंतर कधी त्रास झाला नाही हे खरं.

या सगळ्या घटनांमुळे मी फार भांबावून गेले होते. कार्तिक इथे असता तर खूप बरं  झालं असतं. तो हाक मारल्यावर लगेच धावून आला असता. पण तो आता अमेरिकेना असल्यामुळे फारच पंचाईत झाली, फक्त फोनवरच त्याच्याशी बोलता येत होतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कार्तिकशी बोलणं व्हायचं. बऱ्याच वेळेला माझं मन थाऱ्यावर नसायचे तेंव्हा कार्तिक शी बोलल्यावर जरा हलकं  वाटायचं. मी अखेर या वेळी त्याला म्हंटलं की  “कार्तिक परत ये, चंदन इंजिनियरिंग जॉइन कर, मला मदत कर. जे काही घडतंय ते फार भयंकर आहे. तू आलास तर मला धीर येईल.”

“निकिता, मी परत आलो तर माझं सगळंच करियर संपेल. हा धोका मी पत्करू शकत नाही. ज्या परिस्थितीतून तू जाते आहेस त्यावर तुलाच उपाय शोधावा लागेल. काही अडचण आली तर मी आहेच.” मला कार्तिक कडून ही अपेक्षा नव्हती. कार्तिक एवढा का घाबरतो आहे हेच मला समजत नव्हत. खरं तर तो एवढा हुशार, कुठेही आपलं विश्व बनवू शकतो. एवढी त्यांची क्षमता आहेच, पण आता सगळंच संपलं होतं. कार्तिकचा अध्याय संपला होता. आता मला एकटीनेच झुंज द्यायची आहे हे स्पष्ट झालं.

नितीन ला जावून वर्ष होत आल होत. मी फॅक्टरी मध्ये चांगलीच रमले होते. कामावर चांगलीच पकड बसवता आली होती. आधीचा अनुभव होताच त्या मुळे फारसा वेळ लागला नाही. आईच्याच सुचने वरुन मी आठवड्यातले दोन दिवस ऑफिस मध्ये पण जायला सुरवात केली होती. फॅक्टरीच्या कामकाजाची सवय झालीच होती आता व्यावसायिक खाचा खोंचा आईच्या मार्गदर्शनाखाली शिकणं  चालू होत. एक दिवस रात्री चर्चा आणि आढावा आटोपल्यावर मी आईंना म्हंटलं की

“आई मला अस वाटत की आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. अजून किती जमा करणार ? त्यापेक्षा अस करू की सर्व वजा जाता नेट प्रॉफिट मधला फक्त १० टक्के आपल्या कडे ठेवून बाकी आपल्या लोकांच्या वेलफेअर साठी वापरावा.”

“चांगली कल्पना आहे. मला पैशांची मुळीच हाव नाहीये. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी भरपूर ठेवलं आहे. पण तुझं आयुष्य समोर आहे तूच पुढचा विचार कर, आणि ठरव. काय असत न, की अश्या गोष्टीत अर्ध्या वाटेवरून मागे फिरता येत नाही. आणि त्याच्यासाठी डोंगरे आणि मेहता तयार होणार नाहीत. त्यांना पटलं तर ठीकच आहे पण नाही पटलं तर, त्यांना आधी बाहेर करावं लागेल. पण नेमकं काय करायची इच्छा आहे तुझ्या मनात ते तरी ऐकव.” आई म्हणाल्या.  

“मला वाटत की आपल्या लोकांसाठी चांगली ऐसपैस घर बांधावीत, आणि त्यांना नोकरीत असे पर्यन्त फ्री क्वार्टर म्हणून द्यावीत. अर्थात त्यांच्या पदा प्रमाणेच त्याचा एरिया ठरवू. दर वर्षी थोडी थोडी करून काही वर्षात सर्वांना घर मिळतील अस बघू. त्या प्रमाणे तपशील ठरवू.” मी माझी कल्पना सांगितली.

“खूपच छान कल्पना आहे. आपल्याला आधी घोडे पेडणेकरांचा सल्ला घ्यावा  लागेल. आणि मग एखादा चांगला कन्सलटंट बघवा लागेल. यांच्याही पुढे जावून मला असंही वाटत की आपल्याला १०० घर बांधायची असणार आहेत तर आपणच एक कन्स्ट्रक्शन कंपनी  काढली तर वेगळ्या फील्ड मध्ये कंपनीचं कार्य वाढवता येईल, आणि काम पण होईल. आपली घर बांधून होई पर्यन्त चांगला अनुभव गाठीशी येईल, आणि कॉँट्रॅक्टर म्हणून निरनिराळी कामे पण घेता येतील. घर मिळाल्यावर माणसं नक्कीच खुश होतील आणि आपल्या मालमत्ते मध्ये पण भरघोस वाढ होईल. अर्थात हे २० वर्षांच प्रोजेक्ट असणार आहे. चांगला विचार आहे. पूर्ण तपशील बघायला पाहिजे. चला बघूया कसं जमतंय ते.” अस म्हणून आई झोपायला गेल्या.

मला उगाचच असं  वाटलं,  की आईंना कल्पना अजिबात आवडलेली नाही. शेवटी स्वत:च्या फायद्या मध्ये कपात झालेली कोणाला आवडेल. योजना डब्यात गेली अस समजून मी पण झोपायला गेले.

पण मला वाटलं होत, तस नव्हत. त्यांनी बहुधा रात्री बराच विचार केला असणार. कारण आईंनी कल्पना एकदमच उचलून धरली. अर्थात हे मला नंतरच कळलं. त्या दिवशी माझा पण ऑफिस चा वार होता. मला म्हणाल्या दुपारी चार वाजता माझ्या केबिन मध्ये ये. मीटिंग आहे. दुपारी चार वाजता त्यांनी वाघूळकरांना पण बोलावलं होत. ते पण आले. थोड्याच वेळाने शशांक पण आला. मला हळूच विचारलं “अजेंडा काय आहे.?” मला अजेंडा माहीत नव्हता त्यामुळे मी मला माहीत नाही या अर्थाने मान हलवली.

 

 

शशिकला चिटणीस

निकीतानी क्वार्टरस् बांधण्याची इच्छा बोलून दाखवली आणि मी चकीतच झाले. साधारण पणे हातात आलेला पैसा, इतक्या प्रमाणात कोणीच असा लोकांच्या साठी  सोडत नसतो. आणि ही म्हणते की आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणखी जमवून काय करायचं. कमाल आहे. निकीताचं हे रूप बघून मला अचंबित व्हायला झाल. तीचं कौतुकच वाटलं. मग मी ठरवलं की उद्या वाघूळकरांशी मीटिंग करायची आणि कंपनी ची आर्थिक स्थिती नीट समजून घ्यायची. या बाबत त्यांच्याशी चर्चा करायची आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा. परत आमचे सेविंग्स काय काय आहेत ते पण बघणं आवश्यक होत. या आर्थिक बाबींकडे कडे मी आजपर्यंत कधीच लक्ष दिल नव्हत. निकीताला तर काहीच कल्पना नव्हती. सगळं वाघूळकरच सांभाळायचे. ते ही बघावं  लागेल.

सकाळची महत्त्वाची कामे आटोपल्यावर मी वाघूळकरांना बोलावलं.

“वाघूळकर आमची पर्सनल सेविंग्स ची काय पोजिशन आहे?”

वाघूळकर गोंधळले त्यांना हा प्रश्नच अपेक्षित नव्हता.

“आणि कंपनी मध्ये आमची, डोंगरे आणि मेहताची काय भागीदारी आहे यांचे संपूर्ण डिटेल्स हवे आहेत. आणि जी, जी संबंधित कागद पत्रे आहेत ती पण आणा. लगेच.”

“मॅडम आज असं काय घडलं की, ही सगळी माहिती हवी आहे? आज पर्यन्त तुम्ही कधी विचारलं नव्हत.” – वाघूळकर.  

“जे घडलं नाही ते आज घडणार आहे. म्हणून सांगते की ही माहिती ताबडतोब द्या. बाकी सगळी काम बाजूला सारा. किती वेळ लागेल?”

“ओके मॅडम. अर्धा तास. चालेल?” – वाघूळकर.

“ठीक आहे या तुम्ही.”

तासाभराने वाघूळकर आले. तो पर्यन्त मी बाकीची कामे हाता वेगळी केली.

“आधी सेविंग्स बद्दल सांगतो.” वाघूळकर सांगत होते. “अविनाश सरांची अकाऊंट सर्व तुमच्या नावे ट्रान्सफर केली आहेत. सर्व मिळून तुमच्या कडे ९८ म्हणजे जवळ जवळ १०० करोड आहेत. नितीन सरांची खाती तुमच्याच सांगण्यावरून निकीताच्या नावे केली आहेत. त्या खात्यांमध्ये एकूण ५५ कोटी आहेत. भागीदारी बद्दल बोलायचं म्हणजे अविनाश सरांचा हिस्सा अर्धा अर्धा तुमच्या आणि नितीन सरांच्या मध्ये विभागला गेला होता. त्यामुळे फायनल फिगर अशी आहे. तुम्ही ४५ टक्के, निकिता ४० टक्के, राधाबाई ५ टक्के आणि डोंगरे आणि मेहता प्रत्येकी ५ टक्के.”

“म्हणजे कंपनी बाबत आम्ही जो निर्णय करू त्यात डोंगरे आणि मेहताना हस्तक्षेप करता येणार नाही. आणि आमच्या जवळ आमचे असे १५० कोटी आहेत. ते आम्ही कसेही खर्च करू शकतो. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण असू शकत नाही. बरोबर?”

“बरोबर. पण मॅडम मला समजत नाही की हे आत्ताच अस काय झाल ? नेमकं  काय चाललं आहे तुमच्या मनात, कंपनी विकायचे ठरवता आहात?” – वाघूळकर.  

वाघूळकरांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ अजूनही लपत नव्हता. उलटा वाढलाच होता.

“बाकी सध्या कंपनीची स्थिती काय आहे, ते मला माहितीच आहे. ठीक आहे. तुम्ही ४ वाजता या. मी मीटिंग बोलावते आहे. तुम्ही, शशांक, निकिता आणि मी. जरा वेगळाच विषय सविस्तर चर्चेला घ्यायचा आहे. कदाचित हा कंपनीसाठी turning point असू पण शकतो. आणि चिंता करू नका तुम्हाला वाटत तसं काहीही माझ्या मनात नाही आहे. या मग ४ वाजता.” मी चर्चा संपवली.

 

क्रमश: ......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com