Nikita raje Chitnis - 21 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग २१

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग २१

निकिता राजे  चिटणीस  भाग  २१

 

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

14.  रघुवीर                  अविनाशचा ड्रायव्हर

15.    पंडित                   नितीन चा ड्रायव्हर

16.    वाटवे मॅडम              चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

17.    अंजिकर सर              चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

18.    साखळकर सर            चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

19.    पांडे सर                 चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative officer

20.    बबन                   चपराशी

21.    साटोरे                  बबन चे वडील.

22.    चोरघडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

23.    वाघूळकर सर             चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

24.  चिंतामण चिटणीस         अविनाश चिटणीसांचा भाऊ

25.    विमल                  चिंतामण चिटणीसांची  बायको

26.    निखिल                 चिंतामण चिटणीसांचा मुलगा

27.    शशांक दामले             चंदन इंजीनीǐरंग चे जनरल मॅनेजर.

28.    पाटील                  पोलिस इंस्पेक्टर

29.    परब                   सब इंस्पेक्टर

30.    गवळी                  कॉन्स्टेबल

31.    मळेकर                 पोलिस इंस्पेक्टर (पाटील साहेबांच्या जागी )

32.    देसाई                   आर्किटेक्ट

33.    सारंग                   काँट्रॅक्टर

भाग  २१

भाग 20   वरून  पुढे  वाचा .........

पाटील साहेब आता थांबायला तयार नव्हते.  म्हणाले,

“निकिता बोल आता. खेळ संपला आहे तुझा. तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे.”

“काय ऐकायचं आहे. ?” – निकिता शांत स्वरात म्हणाली.

“स्वत:ला निर्दोष शाबीत करण्यासाठी तिकडे दूर नर्मदा परिक्रमेला जावून इकडे बबन च्या हस्ते कार्यभाग उरकलास. बबनने आम्हाला सगळं सांगितल आहे. आता तुझी पाळी.” पाटील साहेबांनी सरळ आरोपच केला.  निकिता आता पूर्ण सावरली होती. चेहऱ्यावर करारी पणाची झलक होती. शांत होती, संतापाचा मागमूस पण नव्हता. ती कोसळणार नाही हे पाहून मला हायसं  वाटलं. 

“बबन आलाय का तुमच्या बरोबर ? मला त्याच्याशी बोलायचं आहे.” – निकीता  

“नाही, ते आता शक्य नाही. तो आता कोणाशीही  बोलणार नाही. आता फक्त तूच बोलायचं.” – पाटील  

मी विचार करत होते की हा काय प्रकार आहे बबन अस काही बोलणं शक्यच नाही. त्याला धाकदपटशा दाखवून तर अस बोलायला भाग पाडलं नसेल, बाहेर जाऊन बबन शी बोलाव म्हणजे हे साहेब खरं बोलताहेत की खोट ते कळेल. दामल्यांना टाटा करून येते अस म्हणाव.

“साहेब बाहेर माणसं बसली आहेत त्यांना बाय बाय करून येते. हा तमाशा त्यांच्या समोर नको.”

“नाही कोण माणसं आहेत ती त्यांना आतच बोलवा. मला त्यांच्याशी पण बोलायचं आहे. राधाबाई बोलवा त्यांना.” – पाटील आता ऐकायला तयार नव्हते.  

दामले आत आले म्हणाले. “साहेब आम्ही जात नाही बाहेरच थांबतो. तुमचं यांच्याशी बोलणं होऊन जाऊ द्या. मग आम्ही आहोतच.” बबन शी बोलण्याचा मार्ग बंद झाला. आता नुसतं बघायचं काय होते ते. मला निकीताची काळजी वाटत होती. हा प्रसंग ती कसा निभावून नेते हे आता सर्वस्वी तिच्यावरच अवलंबून होतं.

“हं निकिता तुला आता बबनशी बोलता येणार नाही. आता तूच बोलायचं. आमचा वेळ वाया घालवू नकोस. बोल आता.” – पाटील.  

“तुमची खात्री आहे की हा सगळा प्लॅन माझाच आहे म्हणून ? की फक्त संशयच आहे.” – निकिता  

“तू आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत. ते काम आमच आहे. विचारलेल्या प्रश्नांची तू फक्त उत्तरं दे. उलट प्रश्न विचारू नकोस. परिणाम चांगला होणार नाही. तू कबुली जबाब दे. म्हणजे तुला पुढे त्रास होणार नाही.” – पाटील साहेब.

“ही सूचना आहे की धमकी ?” – निकिता

“पुन्हा प्रश्न. तू काय वाटेल ते समज.” – पाटील.

मी निकिता कडे बघितलं. तिला आता परिस्थितीची कल्पना आली असावी. ती सरसावून बसली. म्हणाली

“ठीक आहे. काय विचारायचं ते विचारा. मी चौकशीत संपूर्ण सहकार्य करीन कारण माझ्या पतीला मारणारा गुन्हेगार लवकरात लवकर मिळाला तर मला पण  हवाच आहे.” – निकिता

“हं बोल आता.” – पाटील.

“मी काय बोलणार. तुम्ही प्रश्न विचारा मी माझ्या माहिती नुसार उत्तर देते.”– निकीता.

“हे दोन्ही खून कसे प्लॅन केले  ते सांग.” – पाटील.

“मी काहीच केल नाही त्यामुळे प्लॅनिंग काय होत ते मला माहीत नाही.” – निकीता.

“आमची खात्री आहे की हे तूच केल आहे आणि कसं केल हेही आम्हाला माहीत आहे. पण तू सांग.” – पाटील.  

“एखाद्या गोष्टीची ज्याला माहिती आहे तोच सांगू शकेल तेंव्हा तुम्हीच सांगा, कारण तुम्हालाच डीटेल माहिती आहे.” – निकिता  

“आमच्याकडे तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्डस आहेत. त्यात तू तुझ्या काही खास मित्र मैत्रिणींबरोबर सतत संपर्कात असतेस अस दिसतंय.” – पाटील.

“हो बरोबर आहे. ती लोक माझ्या अतिशय जवळचे आहेत.” – निकिता  

“पण त्यांच्यातही एक जरा जास्त जवळचा आहे. मी कार्तिक बद्दल बोलतोय.”-पाटील.

“हो बरोबर आहे. कार्तिक माझा जवळचा मित्र आहे, गुरु आहे. मी सतत त्याचा सल्ला घेत असते.” – निकिता.

“परवा सकाळी सुद्धा तुमचं बोलणं झालं, जवळ जवळ अर्धा तास तुमचं बोलणं चालू होत. काय कारण आहे.” – पाटील.

“आत्ताच, तुम्हाला सांगितलं की तो माझा गुरु आहे आणि जेंव्हा माणूस अडचणीत असतो तेंव्हा जवळच्या माणसाचा सल्ला घेणं हे साहजिकच आहे न.” – निकिता.

“किती जवळचा आहे कार्तिक ?” – पाटील.

“मी काय बोलू ? तो माझा मित्र  आहे. close friend.” – निकिता.

“फ्रेंड आहे की बॉयफ्रेंड  ?” – पाटील.

“तुम्हाला जे अपेक्षित आहे तसं काहीही नाहीये. साधी पण जवळची मैत्री आहे.”

“तो अमेरिकेत आणि तू इथे तुमच्यात नेहमी फोन वर बोलणं होत. पण नेहमी तूच का फोन करते  ? तो का नाही ?” – पाटील.

“साहेब सल्ले मला हवे असतात, त्याला नव्हे. आणि त्याला फोन करायला परवडत नाही. त्याची नोकरी आहे.” – निकिता.

“आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. आणि तो पूर्णपणे तुमच्या हातात यावा म्हणून सगळं प्लॅनिंग चालू आहे. बरोबर ना ?” – पाटील.

“माझ्यावर इथे कसलीच बंधन नाहीयेत. त्यामुळे अस काही करण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही.” – निकिता.  

इंस्पेक्टर साहेबांचं काही समाधान होत नव्हतं. ते मला म्हणाले

“शशिकलाबाई तुम्हाला हिच्या या बॉयफ्रेंड बद्दल माहिती आहे?” – पाटील.

“हो. आम्हाला सगळ माहीत आहे. आणि तो फक्त फ्रेंड आहे बॉयफ्रेंड नाही.” – मी.

“शशिकलाबाई, तुम्हाला कल्पना नसेल, पण आमच्या माहिती नुसार ही ज्या ज्या वेळेस औरंगाबादला गेली त्या त्या वेळेस कार्तिकशी बारीक सारिक गोष्टींवर चर्चा करून फूल प्रूफ प्लॅन बनवला. आणि शेवटाला नेला. पहिला बळी अविनाश राव आणि आता नितीन, सगळं कसं योजनाबद्ध रीतीने पार पाडलं आहे या दोघांनी. सगळी आंखणी झाल्यावर कार्तिक अमेरिकेना गेला. म्हणजे कुठूनही काहीही लीक व्हायला नको. काय निकिता बरोबर आहे ना. ? तो केमिस्ट्रि चा लेक्चरर होता. त्यामुळे लॅब मधून काही केमिकलस  काढून घेण त्याला सहज शक्य होत. या बद्दल आमची चौकशी चालूच आहे. खरं काय ते समोर येईलच. पण त्या अगोदर निकीता, तू जर कबूल केलस तर तुलाच त्रास कमी होईल.” – पाटील.

“मला काहीच माहिती नाहीये आणि कशाची कल्पना पण नाहीये त्यामुळे मी काय

कबूल करणार? सॉरी.” – निकिता.

“बरं. मला सांग हा कार्तिक अमेरिकेत आहे म्हणतेस तर तो तिथे नेमका करतो तरी काय ?” – पाटील.

“तो एक मोठ्या कंपनी मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरीला आहे.” – निकिता.

“ऑफिस जॉब आहे ?” – पाटील.

“नाही. साहेब तो रिसर्च असिस्टंट आहे. त्याचं काम लॅब मध्ये असतं.” – निकिता.

“फाइन. कसली लॅब आहे ?” – पाटील.

“माहीत नाही. कधी विचारलं नाही.” – निकिता.

“आश्चर्य आहे. इतका जवळचा मित्र आणि काय काम करतो, कोणची कंपनी आहे हे माहीत नाही ? आश्चर्यच आहे.” – पाटील.

“मी कधी विचारलं नाही आणि त्यानी सांगितलं नाही.” – निकिता.

“ओके कसली लॅब आहे? केमिकलची की फिज़िक्सची की धातू विषयक की फार्मा ? की आणखी वेगळच काही.” – पाटील.

“माहीत नाही. पण त्यानी केंव्हातरी एकदा त्यांच्या लॅब बद्दल BSL- 4 असा उल्लेख केला होता.” – निकिता.

“BSL- 4 असाच उल्लेख केला होता ?” – पाटील. आता त्यांचा चेहरा जरा उजळला होता.

“हो” – निकिता.

“या प्रकारच्या लॅब बद्दल तुला काय माहिती आहे ? म्हणजे नेमका कशावर रिसर्च चालतो तिथे ?” – पाटील.

“मला काहीच कल्पना नाही.” – निकिता.

“एवढी हुशार मुलगी, आणि रसायनशास्त्राची पदवीधर, आणि BSL- 4 लॅब माहीत नाही ?” – पाटील.

“नाही हा शब्दच त्या वेळेला मी प्रथम ऐकला.” – निकिता.

“तुला माहीत नसेल तर मी सांगतो. या प्रकारच्या लॅब मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या poisons किंवा अतिशय खतरनाक virus बद्दल संशोधन चालत. हे सगळं इतकं भयानक असतं की माणूस चुकून जरी संपर्कात आला तर एक मिनिटही पुरतं मृत्यू व्हायला. आता अमेरिकेच्या पोलिसांना कळवून त्याची चौकशी करावी लागणार आहे. निकिता आता तर तू पुरती अडकलीस. आता तरी तुझे प्लॅन्स सांगून टाक. कबुली दिलीस तर शिक्षा थोडी कमी होईल.” – पाटील.

“मी कसलाही प्लॅन केला नाही. कबुली कुठून देणार. तुम्ही मला यात उगाच अडकवण्याचा डाव रचता आहात तो मी सफल होऊ देणार नाही.” – निकिता.

“बरं. मी सांगतो. शशिकलाबाई, तुमच्या सुनेचा प्लॅन असा आहे की नितीन च्या मृत्यू नंतर कार्तिक ला बोलावून घ्यायचं आणि त्याच्या बरोबर लग्न करून सगळी कंपनी हातात घ्यायची. असा प्लॅन आहे. शशी मॅडम सांभाळा, कदाचित आता नितीन च्या नंतर तुमचा पण नंबर लागू शकतो.” – पाटील.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.