Nikita raje Chitnis - 16 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग १६

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग १६

निकिता राजे  चिटणीस

 

भाग  १६

भाग १५ वरून  पुढे  वाचा .........

इंस्पेक्टर पाटील

चिटणीसांच्या घरी जातांना मी म्हंटल “परब तुम्हाला काय वाटत? काय असू शकेल?”

“साहेब, सांगण अवघड आहे. बाहेरच्या कोणाची कामगिरी असेल अस वाटत नाही. घरातलाच कोणी असेल असंही वाटत नाही. पण तपास केल्यावर कदाचित काही धागे सापडतील.” – परब म्हणाले.  

“बरोबर आहे. बघूया. फॉरेन्सिक टीम ला बोलावलं का?”

“हो साहेब. ते पण पोचतच असतील.” – परब.  

घरी पोचलो तेंव्हा फॉरेन्सिक टीम ची गाडी उभीच होती आणि सर्व आमची वाट पाहत होते. आम्ही सगळेच आत गेलो. राधाबाई होत्या. मी चौकशीला सुरवात केली “हं राधाबाई काय घडल ते नीट सांगा. एखादी छोटी गोष्ट आहे म्हणून ती वगळु नका. काय वगळायच आणि काय ठेवायच ते आम्ही बघू. बोला.”

“साहेब, नितीन सकाळीच मुंबईला निघून गेला. साहेब साडे आठच्या सुमारास खाली चहा नाश्ता करायला आले. आज गुरवार त्यांचा साखर चेक करायचा दिवस असतो. टेबल वर बसून साखर चेक केली निकिता ताईंनी त्यांना पट्टी लावली. मग त्या चहा आणि नाश्ता घेऊन आल्या. आणि टेबलावर ठेवला. साहेबांना सांगितलं, आणि शशिताई आणि त्या चहा घ्यायला सोफ्यावर बसल्या. पण थोड्या वेळाने शशिताईंना काही संशय आला म्हणून त्या आणि निकिता ताई, साहेबांच्या जवळ गेल्या. निकिता ताई किंचाळल्या म्हणून मी धावत आले. पाहते तो साहेब बेशुद्ध पडले होते. रघुवीर ने अॅम्ब्युलेन्स बोलावली आणि हॉस्पिटल ला नेल. बस मला एवढच माहीत आहे. मग रघुवीरचा  फोन आला की साहेब या जगात नाही म्हणून.” राधाबाईंनी, त्यांना जेवढं माहीत होतं, ते सर्व सांगितलं.

“तुम्ही नितीन साहेबांना अरे तुरे करता ?” – पाटील

“साहेब नितीनला तो लहान असल्यापासून पाहते आहे.” – राधाबाई. 

“निकिता ताई ओरडल्या तेंव्हा तुम्ही कुठे होता.” – पाटील.

“किचन मधे” – राधाबाई.

“काय करत होतात” – पाटील.

“काही विशेष नाही आवारा सावर” – राधाबाई.

“नाश्ता काय केला होता, आज.” – पाटील

“उपमा.” – राधाबाई.

“तुम्ही नाश्ता बनवत होता तेंव्हा साहेबांची तब्येत कशी होती.” – पाटील.

“छानच होती. पण साहेब उपमा आणि चहा पण निकिता ताईंनीच केला.” राधाबाई.

“हे काम तर तुमचं आहे, मग त्यांनी का केला.” – पाटील.

“साहेबांना त्यांच्याच हातचा, सकळचा चहा आणि नाश्ता लागतो. रोजच त्या करतात.” – राधाबाई.  

“म्हणजे त्या उपमा करत असतांना साहेब टेबल वर आले होते. आणि तब्येत उत्तम होती.” – पाटील.

“हो साहेब.” – राधाबाई.  

“त्या वेळेला तुम्ही कुठे होता” – पाटील.

“इथेच किचन मध्येच ताईंच्या शेजारी.” – राधाबाई.  

“काय करत होतात” – पाटील. 

“ताईंशी बोलता बोलता आवरा सावर.” – राधाबाई.

“ताई मध्येच साहेबांच्याकडे गेल्या होत्या ?” – पाटील.

“हो साहेबांच्या  बोटाला पट्टी बांधायला.” – राधाबाई.

“ठीक आहे.”

आत्ता साठी एवढ पुरे असं  वाटून मी थांबलो.

टेबलावर चहा नाश्ता तसाच होता. फॉरेन्सिक टीम ने ते सगळ ताब्यात घेतलं ग्लुको मिटर पण घेतलं. चिकट पट्टीची डबी पण घेतली. त्यांची रूम पण चेक केली. फारस काही संशय घेण्या सारखं नव्हत. खरं म्हणजे कुठल्याही घरात रोज जस असत त्या पेक्षा काहीच वेगळ दिसत नव्हत. राधाबाई बोलत होत्या तेंव्हा त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो पण त्या पढवल्या सारखं बोलत नव्हत्या. आणखी या सगळ्या गोंधळात त्यांच कोणाशी बोलणं पण झाल नव्हत. त्याच्यामुळे त्या जे काही म्हणाल्या ते ग्राह्य धरायला हरकत नव्हती. पोलिस स्टेशन वर वापस गेलो. इतरही बरीच काम होती ती निपटण्यात वेळ गेला. संध्याकाळी ज्याने पोस्ट माऱ्टेम केलं त्या मेडिकल ऑफिसर चा फोन आला. “पाटील साहेब येता का आत्ता ? बॉडी समोरच आहे थोड बोलायचं  आणि दाखवायचं  पण होत.”

“लगेच निघतो.”

“लंग्स मधल्या रक्त वाहिन्या आक्रसून गेल्या त्यामुळे हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा झाला नाही म्हणून मृत्यू झाला. पोटा मध्ये अन्न कालच्या रात्रीच होत. ते तपासणी साठी पाठवल आहे. विषाचा परिणाम दिसतो आहे पण विषाचा लवलेशही सापडला नाही. लॅब चा काय रीपोर्ट येतो त्या वरूनच कळेल. रीपोर्ट येई पर्यन्त थांबाव लागेल.” डॉक्टर म्हणाले.

“म्हणजे एकदम जालीम विष होत. आणि अतिशय कमी प्रमाणात दिल्या गेलंय.”

“हो पण माझ्या अनुमानाप्रमाणे ते खाण्यातून  दिल नसेल.” – डॉक्टर.

“मग ?”

“तेच सांगायला बोलावलं. अर्थात हा सगळा अंदाजच आहे. खात्रीशीर पणे सांगता येणार नाही. पण माझा अनुभव सांगतो आहे की हे असच असेल.” – डॉक्टर.

“काय ?”

“चला बॉडी जवळ जाऊ. आता हे बोट बघा याला चिकट पट्टी लावली आहे.” – डॉक्टर.

“हो ग्लुको मिटर ने चेक केल्यावर रक्त थांबण्यासाठी चिकट पट्टी लावली अस म्हणताहेत.”

“बरोबर आहे. पण इथे बघा अजून एक मार्क आहे जो चिकट पट्टी काढल्यावर उमटतो. म्हणजे एक चिकट पट्टी लावली, मृत्यू झाला, पट्टी काढली आणि दुसरी लावली. ती दुसरी पट्टी आत्ता पण आहे. ह्या पट्टीत विषाचा मग मूस पण नाही. मग आधीची पट्टी कुठे गेली ? त्या पट्टीवर विष शिंपडून ती लावली आणि मृत्यू झाल्या नंतर काढून  फेकून दिली. पाटील लक्षात येतय का ?” – डॉक्टर.

“माय गॉड कचऱ्याची बादली चेक नाही केली. डॉक्टर अजून काही नसेल तर मी पळतो.”

“ओके” – डॉक्टर.  

मला माझाच राग आला मी एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो. आता कचऱ्यांची कोणी विल्हेवाट लाऊ नये म्हणजे मिळवली. फोन करून टीम ला ताबडतोब चीटणीसांच्या घरी पोचायला सांगितल. आम्ही पण पोचलोच. राधाबाईच होत्या बाकी मंडळी अजून आली नव्हती. आम्हाला पाहून त्या म्हणाल्या हे काय साहेब पुन्हा आलात ? त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना म्हणालो की जिथे जिथे कचरा ठेवला असेल त्या जागा दाखवा. घरात तीन ठिकाणी कचरा होता कशातही काहीच आक्षेपार्ह सापडल नाही. सर्व बाथरूम्स पण चेक केल्या. नथिंग. घराच्या चारी बाजूने अगदी भिंग लावून चेक केल. काहीही नाही. हिन्दी मध्ये एक शब्द आहे जो अगदी चपखल बसतो. “ शातीर दिमाग ” गुन्हा करणारा अतिशय हुशार असला पाहिजे.

बॅक टू पोलिस स्टेशन. चिटणीसांना फोन केरून सांगितल की प्रोसीजर करून बॉडी ताब्यात घेऊ शकता. तर म्हणाले की “आम्ही इथेच आहोत आणि formalities पूर्ण करतो आहोत.”

“परब पट्टी तर निकितानेच लावली पण ती अस का करेल ? सासऱ्याला मारण्यासाठी काही सबळ कारण असेल तर ते शोधायला लागेल. तुम्हाला काय वाटत ?”

“साहेब कौटुंबिक छळाची केस असेल अस निदान राधाबाईंच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही. कारण थोड जरी असत तर बोलण्यामध्ये ती फट आपल्या नजरेतून सुटली नसती. त्यांच बोलणं अगदी स्वच्छ होत. कुठेही  अडखळल्याच्या खुणा दिसल्या नव्हत्या. किंवा ठरवून बोलताहेत अस पण वाटत नव्हत. पण नितीन आणि निकिता दोघांनी मिळून काही प्लॅन केला असेल तर हे होऊ शकत अस मला वाटत.” परब म्हणाले.  

“हो पण हेतु काय असेल ? कंपनी मध्ये नितीन चा शब्द चालतच असेल. किंवा कदाचित नसेल आणि सर्व सूत्र आपल्या हातात घेण्याचा हा प्रयत्न असेल. अस असेल तर आपल्याला कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी विस्तृत पणे बोलायला पाहिजे. नितीन आणि त्याच्या वडिलांच्या आपसातल्या संबंधा बद्दल चौकशी करावी लागणार, अस दिसतंय. अस करू आपण उद्या ऑफिस आणि फॅक्टरी मध्ये जाऊ, बघू लोकांच काय म्हणण आहे ते.”

“मलाही तसंच वाटत आहे साहेब. असच करू. उद्या लगेचच जाऊ.”

दोन दिवस तसेच गेलेत. ऑफिस आणि फॅक्टरी बंदच होती. अंत्यदर्शन, अंत्ययात्रा हे सगळ होऊन स्थिर स्थावर व्हायला अजून एक दिवस गेला. 

ऑफिस मध्ये गेल्यावर विचारल की मुख्य व्यक्ति कोण आहे तिच्याशी बोलायच आहे. ती मुलगी आम्हाला वाटवे मॅडम कडे घेऊन गेली. वाटवे मॅडम अॅडमिनिस्ट्रेटिव मॅनेजर होत्या.

“नमस्कार मॅडम मी इंस्पेक्टर पाटील. परवा ज्या काही घटना घडल्या त्या बद्दल थोड बोलायच आहे. वेळ आहे ना ?”

“हो हो बसा न, बबन साहेबांसाठी चहा घेऊन ये. बोला साहेब.” – वाटवे मॅडम.

“साहेबां चा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला नाही हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल.”

“हो साहेब. फार वाईट झाल. आम्ही कोणीच याची कल्पना पण केली नव्हती.” – वाटवे मॅडम म्हणाल्या.  

“तुम्हाला काय वाटत कोण असाव. तुमचा कोणावर संशय आहे का ? कर्मचार्यायांपैकी कोणावर संशय जातो का ? बाहेरचा कोणी असू शकतो का, मॅडम अगदी मनातलं बोला काहीही राखून ठेऊ नका. हत्यारा शोधून काढण सर्वांसाठीच आवश्यक आहे. तेंव्हा प्लीज cooperate.”

“साहेब, अविनाश सर फार मोठ्या मनाचा माणूस होता. कंपनी च्या लोकांवर आपण म्हणतो ना, तसं पुत्रवत प्रेम करायचे. मदत करायला कधीही मागे पुढे पाहिल नाही. मग तो फॅक्टरी वर्कर असो वा स्टाफ चा, नेहमी आनंदी स्वभाव, आदळ आपट नाही की चीड चीड नाही. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या ते शांत पणे  सॉर्ट आउट करायचे. कोणी त्यांच्या वाइटावर असण्याची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे, आता मला सांगा कोणावर संशय घ्यायला जागा आहे का ?” वाटवे मॅडम म्हणाल्या

“बाहेरचा कोणी असू शकतो का म्हणजे supplier, client, किंवा प्रतिस्पर्धी वगैरे.”

“नाही साहेब मला तरी अस कोणी दिसत नाहीये. सर्वांशी चांगले संबंध होते. प्रतिस्पर्धी लोक सुद्धा यायचे पण सल्ला घ्यायला. आणि,...” वाटवे मॅडम बोलता बोलता थांबल्या.

“आणि काय”

“काही नाही.” – वाटवे मॅडम.

“मॅडम बोला मनात काही ठेऊ नका विषय फार महत्वाचा आणि संवेदनशील आहे.”

“मी म्हणत होते की घटना घरात घडली आणि ती ही सकाळच्या वेळेस, सगळेच घरात हजर असतांना, बाहेरून कोणी येऊन हल्ला कसा करेल ? तस झाल असत तर हाणा मारी झाली असती की. रघुवीर पण होता त्या वेळेस तिथे.” शेवटी वाटवे मॅडमनी आपला मुद्दा स्पष्ट केला.

“हा एक खूपच valid point सांगितला तुम्ही मॅडम. बरय आता आम्ही निघतो जरूर वाटली तर पुन्हा येऊ. धन्यवाद.”

“साहेब आपण बाकी कोणांशीच बोललो नाही.” – परबनी विचारलं

“मॅडम नी एका गोष्टीवर मोहोर उठवली ते तुमच्या लक्षात आल का ?”

“हो साहेब वळसा घालून का होईना पण कारस्थान घरातच शिजल असण्याची शक्यता त्यानी पण वर्तवली.” – परब.  

“करेक्ट परब आता हाच धागा पकडून आपल्याला, समोर जायच आहे. आपण आता फॅक्टरीत जाऊ तिथे दोघांच्या आपसातल्या संबंधांबद्दल चौकशी करू.”

“साहेब आपण उद्या जाऊ. तसंही अजून पोस्ट माऱ्टेम चा रीपोर्ट आला नाही. तो आल्यावर जरा आपल्या चौकशीला दिशा मिळेल. आणि कामे बरीच pending पडली आहेत. ती जरा निपटवून टाकू.” – परब.

“ओके चला ठाण्यावर.”

ठाण्यावर आल्या आल्या गावळींना बोलावल त्यांना सांगितल की “उद्या औरंगाबाद ला जा. तिथे निकीता च्या कॉलेज मधे जाऊन चौकशी करा. आणि तिच्या खास मित्र मैत्रीणींची माहिती मिळवा, जमलं तर त्यांना भेटून निकीता ची जितकी मिळेल तितकी माहिती मिळवा. तिच्या सरांच काय मत आहे ते ही बघा.”

“परब, सध्या १० दिवस तर चिटणीसांच्या घरी बरीच गर्दी असेल त्यामुळे जाण्यात काही मुद्दा नाही. सगळ शांत झाल्यावरच जाऊ. मधल्या काळात फॅक्टरी मध्ये दोघांच्या आपसातल्या संबंधांबद्दल चौकशी करू. तसंच निकिता बद्दल पण  काय माहिती मिळते ते बघू.”

फॅक्टरी मध्ये आमचा अर्धा दिवस गेला. प्रगती शून्य. तिघाही जणांबद्दल सर्वांच्या मनात खूपच आदर होता. त्यांच्या आपसातल्या संबंधा विषयीही सगळेच चांगल बोलले. सर्वांनाच साहेबांच्या आकस्मिक मृत्यू बद्दल फार हलहळ वाटलेली दिसली. पण कोणीही नितीन आणि निकिता चा संशय घेतला नाही. आता काय, गवळींची वाट पहायची अजून काय. तिसऱ्या दिवशी सकाळी गवळी आला.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.