Apradhbodh - 12 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 12

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

अपराधबोध - 12

श्वेताने मात्र त्याचा डोळ्यांत बघीतले तर तीला कही गंभीर बाब असल्याची जाणीव झाली. शिवाय तीने बघीतले की सारांशचे डोळे लाल झालेले होते, मग तीने त्याला वीचारले, " सारांश काही गंभीर गोष्ट आहे काय,अरे तू रात्रभर नीट झोपला सुद्धा नाहीस असे वाटत आहे. काय झाले मला सांगशील काय " मग सारांश थोडा असहज होऊन बोलला, " काय आणि कुणाला सांगायचे, ज्याला काही सांगायचे म्हटले तर तो ऐकून घेत नाही आणि ज्याचाशी काही बोलायचे नाही तो गळ्यात पडायला बघतो ." मग श्वेता सुद्धा अधिक गंभीर होऊन त्याला वीचारू लागली तेवढयात बस आली आणि ते दोघेही बस मध्ये बसून त्यांचा ऑफिसला नीघून गेले. आज इकडे सारांश काल रात्रीचा प्रकारामुळे रागात होता. त्याचबरोबर श्वेताचा अशा त्याला वारंवार टाळल्याने तो पुष्कळ आहत झालेला होता. त्याच बरोबर त्याची तरुणाई आणि एकटेपण आता त्याला अधिकच बेचैन करू लागले होते. त्याचा स्वतःवरचा आत्मवीश्वास आता काहीसा ढासाडू लागला होता. त्याला ही भीती वाटत होती की त्याचा हातून कधी आणि काही अनिष्ट घडायला नाही पाहिजे. आज तीकडे श्वेताला सुद्धा आता थोड़े थोड़े सारांश बद्दल वाईट वाटू लागले होते. ती ऑफिस मध्ये फावल्या वेळेत आज फ़क्त आणि
फ़क्त सारांशचा वीचार करत बसलेली होती. तीने मग नीर्णय घेतला की या प्रकरणाला लांबवण्यात कसलाच अर्थ नाही आहे. तीला आणि सारांशला आपसी सहमतीने आणि एकमेकांशी खर काय ते बोलून त्या दोघांना आता काहीतरी मार्ग काढावा लागेल.

    यासाठी श्वेताला सारांशचा बरोबर एका ठिकाणी बसून चर्चा करावी लागेल, त्यासाठी तीला सारांशला भेटन्यास बोलवावे लागेल. म्हणून तीने सारांशला फोन केला आणि म्हणाली, " सारांश आज ऑफिस संपल्यावर आपण त्या दिवशी भेटलो होतो तेथे आज भेटू मला तुझ्याशी कामाचे बोलायचे." मग दिवस संपत आला आणि ती ऑफिस मधून नीघुन थेट तय ठिकाणी जाऊन पोहोचली सारांश थोड्या वेळाने तेथे पोहोचला आणि ते दोघे भेटले. आज श्वेताचा बेत काही और होता म्हणून तीने त्या हॉटेलचा आत न जाता त्याचा बाहेर एका नीर्जन ठिकाणी सारांशला चालण्यास सांगीतले, सारांश मात्र तीचा मागे काही न बोलता नीमूटपणे त्या ठिकाणी गेला. ते दोघेही एका ठिकाणी बसले आणि आता श्वेता तीचा बोलण्याला
सुरुवात करणार होती. तोच तीने सारांशला बघीतले तर तो तसाच गंभीर होता जसा सकाळी होता. म्हणून श्वेताने आपली गोष्ट न काढता त्याचा समस्येचे समाधान करण्याचे ठरवले. ती त्याला म्हणाली, " सारांश, अरे काय झाले सकाळ पासून बघते आहे तुला अरे सांग ना मला. माझा हातून काही चुक झाली काय, मी तुला आणि तुझा मनाला दुखावले काय, जे काही असेल ते खरे खरे सांग तुला माझी शप्पथ आहे." आता मात्र सारांशला बोलावेच लागले कारण श्वेताने त्याला तीची शप्पथ दिलेली होती.

   तर सारांश म्हणाला, " श्वेता मी तुला तुझ्या घरचा व्यक्ती बद्दल कही सांगेल तर तू माझे बोलने ऐकून घेशील, शिवाय माझ्यावर अविश्वास दाखवणार तर नाही. " श्वेताला आता काहीच समजू लागले नव्हते, तीला वाटत होते की सारांश तीला म्हणजे श्वेताला घेऊन बेचैन आहे .परन्तु ही तर
गोष्ट वेगळीच होती. म्हणून तीने त्याला म्हटले, "तुला काय काय सांगायचे आणि म्हणायचे आहे ते तू नीसंकोच होऊन बोल मी ते ऐकन्यास सर्वथा तयार आहे." मग सारांश बोलला, " मला सांग शर्वरी शेखरला कधी आणि कुठे भेटली होती. त्याचा प्रश्न ऐकून श्वेता मध्येच बोलली, " आता मध्येच शर्वरी कुठून आली आणि तू तीचा बद्दल का बर वीचारतो आहेस " सारांश पुढे बोलला, " मी जे वीचारतो आहे आता फ़क्त मला त्याचा बदल सांग काय
आणि कसे ते मी नंतर तुला सवीस्तर सांगेन, तर शर्वरी आणि शेखरची भेट कुठे झाली आणि ती तुमचा घरची सुन कशी आणि केव्हा झाली." मग श्वेता बोलली, " शर्वरी आणि शेखर हे एकमेकांना कधीच ओळखत नव्हते की त्यांनी कधी एकमकांना बघीतले सुद्धा नव्हते शर्वरीला मी सुद्धा पाहिले नव्हते पूर्वी कधी. ती माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रीणीची बहिण आहे. आमची मैत्री छान जमली होती म्हणून तीने मला शर्वरीसाठी मुलगा बघण्यास सांगीतले होते. शेखर त्याच वेळेस माझ्याकडे त्याचा शिक्षणाकरीता रहात असल्याने तो तीचा नजरेत आलेला होता. तीने मला शेखर आणि शर्वरीचा लग्नाचा बद्दल वीचारणी केली होती. मी माझ्या मैत्रीणीला आणि तीचा स्वभावाला चांगल्या रीतीने ओळखत होती म्हणून मी तीला होकार दिला आणि एके दिवशी शेखरला घेऊन शर्वरी आणि तीचे घर बघण्यास घेऊन गेले. तेथेच मी शेखरचे आणि शर्वरीचे लग्न जूळवून आलो." मग सारांश बोलला, " शर्वरी आणि तीचा घरचा मंडळी यांचा बाबत कुठे चौकशी केली होती काय?"

     सारांशचा या प्रश्नाने मात्र श्वेता आता वीचलीत झालेली होती आणि ती त्याला म्हणाली, " काय रे तुझी सुई शर्वरी वर जाऊन अडकली आहे. काय झाले आहे आणि काय नाही हे तू आधी मला स्पष्ट सांग. मग सारांश बोलला, "आधी माझ्या या प्रश्नाचे उत्तर दे मग मी तुला सवीस्तर सांगतो" मग श्वेता बोलली, "नाही रे बाबा मी कुणाचीच चौकशी केलेली नाही. आधीच मी माझ्या आयुष्यातील प्रश्नांनी ग्रसीत होते आणि मला माझी सगळ्यात चांगली मैत्रीण मीळालेली होती. मी फ़क्त तीचावर विश्वास ठेवून हे सम्बन्ध जोडले होते." मग सारांश बोलला, "अशी गोष्ट होती, तर मला सांग मी जे काही सांगेल त्याचा वर विश्वास ठेवशील, काय तुझ्या माझ्यावर विश्वास आहे" असे बोलू सारांशने श्षेताचे दोन्ही हात आपत्या हातात घेतले आणि तो तिचा डोळ्यांत बघू लागला. आता मात्र श्वेताला जाणवू लागले होते की सारांश जे सांगणार आहे ती फारच गंभीर अशी बाब आहे. म्हणून श्वेता अधिक
गंभीर होऊन बोलली, "माझ्या तुझ्यावर आणि तुझ्या बोलण्यावर सम्पूर्ण विश्वास आहे. तू बोल तुला काय सांगायचे आहे ,तू तुझे मनमोकळ करुन बोल' मग सारांश बोलू लागला तो म्हणाला, "मी जे सांगणार आहे ही फारच गंभीर अशी गोष्ट घटना आहे. जी काही दिवसांपासून माझ्या सोबत घडत आहे. माझी आणि शर्वरीची पहिली भेट." असे म्हणून त्याने त्याचा शर्वरीचा सोबत घडलेला पहिला प्रसंग सांगीतला. त्यानंतर तो पुढे बोलला, "श्वेता हा प्रसंग त्या दिवशीच्या आहे ज्या दिवशी श्यामल तीचा पतीसोबत आलेली होती. त्यादिवशी जेवण वाढताना पासून तर वॉशबेसीन जवळ हात धुण्यासाठी गेल्या पर्यत शर्वरीने माझ्याशी खुपच अश्लील असे वर्तन केले." त्यानंतर सारांश गप्प झाला होता म्हणून श्वेता मग बोलली, " संपले काय रे तुझे बोलणे " मग सारांश उत्तरला, " आणखी एक प्रसंग राहिलेला आहे ज्यामुळे मला हे सगळ तुला सांगण्याची वेळ आलेली आहे." .

      शेष पुढील भागात.......