Mala Spes Habi Parv 2 - 15 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग १५

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग १५

मला स्पेस हवी पर्व २ भाग १५

मागील भागात सुधीर आणि नेहा यांचा हळुवार प्रसंग बघीतला आता पुढे बघू.

त्यादिवशी नेहाला भेटल्यावर छकुच्या मनात बरेच विचार यायला लागले. नेहा पहिल्या भेटीत छकुला आवडली. नेहा शांत आणि समजूतदार वाटली. ती ज्या पद्धतीने तिच्या असिस्टंटशी बोलत होती त्यावरून आणि नंतर ती छकुशी जशी बोलली त्यावरून छकुला ती खूप मॅच्युअर मुलगी वाटली.

इतकी छान शांत मुलगी तिच्या प्रेमात रमणच काय कोणीही पडू शकतो असं छकूला वाटलं. रमणला हिने दाद दिली नाही याचंही छकुला कौतुक वाटलं कारण ज्या माणसाच्या रुबाबदार देखण्या व्यक्तीमत्वाकडे बघून मुली त्याच्या प्रेमात पडतात आणि त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार होतात त्याच रुबाबदार आणि देखण्या माणसाला या मुलीने दाद न दिल्याने रमणची फारच विचित्र आणि अवस्था वाईट अवस्था झालीय. हे बघून छकुला आश्चर्य वाटलं.

रमण बोलण्यात खूप तरबेज आहे. गोड बोलून स्त्रियांना कसं पटवायचं याचं रमणला चांगलंच ज्ञान आहे याची खात्री छकुला आहे. ते सगळं कौशल्य वापरून सुद्धा नेहा त्याच्या प्रेमात पडली नाही याचं छकूला आश्चर्य वाटलं. तिच्या मनात असे बरेच विचार यायचे त्यामुळे तिला रमणची किव यायला लागली. जो स्वतःच्या मस्तीत राहत असे त्याला अतिशय वाईट अवस्था प्राप्त झाली होती.


आत्ताही तिने बघितलं रमण कुठेतरी नजर लावून बसला होता. सतत बाल्कनी मध्येच बसलेला असायचा. कुठेतरी त्याची तंद्री लागलेली असायची.आत्ताही अशीच तंद्री लागलेली होती.


“ रमण जेवायचं नाही का ?”


छकुने रमणला विचारलं. यावर रवण उत्तरला,

“ मला जेवावसं वाटत नाही.”

यावर छकु रमणला म्हणाली,

“तू उपाशी राहून काय होणार आहे? नेहा तुला भेटायला येईल असं वाटतं?”


रमणने कळवळून हात जोडून म्हणाला,

“प्लीज तिला सांग नं मला भेटायला. कधी भेटेल ती? मला भेटायचं आहे.”

छकुला राग आला त्याहीपेक्षा हसावं की रडावं ते कळेना. इतका कसा हा माणूस त्या मुलीसाठी वेडा झाला आहे? की याला स्वतःच्या वयाबद्दल, स्वतःच्या वैवाहिक जीवनाबद्दल, समाजातल्या त्याच्या प्रतिष्ठेबद्दल काहीच विचार याच्या डोक्यात येत नाही?

छकु काही न बोलता आत जायला निघाली त्याबरोबर रमण बालकणीतूनं उठून तिच्या मागे मागे आला आणि तिचा हात पकडून म्हणाला,

“ छकु मला एकदा भेटायचं आहे. मी आजच ऑफिसमध्ये जातो आणि तिला भेटतो.”


यावर आपला हात झटकून छकू त्याला म्हणाली,

“ रमण तू असा वेडेपणा करणार नाहीस. स्वतःला जरा वेळेवर सावर रे. तू किती वर्षाचा आहेस? तू दोन मुलांचा बाप आहेस. हे सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही.ती मुलगी लहान आहे.”

“ तुला कसं माहिती? रमणने तिला विचारलं.

छकू काही बोलली नाही.

“ तू तिला पाहिलंस ?तिला भेटलीस का?”

यावर त्याच्या डोळ्यात छकुने निरखून बघितलं तर रमणच्या डोळ्यात नेहाबद्दल प्रचंड कासाविसी दिसली. रमणच्या हातातील आपला हात झटकून छकु म्हणाली,

“हो मी तिला भेटले. खूप चांगली मुलगी आहे.”

“चांगली आहे ना माझी नेहा ?”

असं म्हणून रमण हसत तिला म्हणाला .

“ मला म्हणूनच ती आवडते. मला म्हणूनच तिला भेटायचं आहे .”


छकुला काही कळेना या माणसाचं काय करावं?

“ अरे ती मुलगी लग्न झालेली आहे.”

“ मला माहिती आहे .” रमण म्हणाला.

“ माहिती असून तू कसा काय तिच्या प्रेमात पडलास? थोडा तर विचार करायचा की नाही?”

छकूच्या आवाजात चीड होती.


“नाही विचार केला. प्रेमाला कुठे विचार करता येतो? प्रेमाला कुठे कळतं कोणाचं लग्न झालंय कोणाचं नाही?”

रमणची बडबड ऐकून छकुच्या मनात आलं एक कानशिलात द्यावी याच्या तरी छकु आवाजावर संयम ठेवत म्हणाली,


“रमण तू काय कॉलेजमधला मुलगा आहेस का ?काय वेडेपणा चाललंय? ती मुलगी जर तुला प्रतिसाद देत नाहीये तर का तिचं घर उजाडायला बघतोयस? का तिच्या मागे जातोयस ?वेळेत स्वतःचं वागणं बदल. तुला जर हे पटत नसेल आणि तू जर हे करणार नसशील तर मला माझं वागणं बदलावं लागेल.”

यावर रमण तिला म्हणाला,

“ मला एकदाच भेटू दे नेहाला नंतर मी तुझं सगळं ऐकुन. तिला त्रास देणार नाही. तिला भेटणार पण नाही.”

“एकदा भेटून तरी काय करणार आहेस? ती बोलणारे नाही तुझ्याशी मला माहिती आहे. ती स्पष्ट म्हणाली आहे मला.”


यावर रमण म्हणाला,

“ मला तेच तिला विचारायचं आहे ती का नाही बोलत माझ्याशी? मी तिला काही त्रास देणार नाही पण ती मैत्रीण तर होऊ शकते नं?”

“ रमण तिला तुझ्याशी मैत्री पण करायची नाही एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? तुझ्या आजूबाजूला रूंजी घालणा-या इतर बायकांसारखी ती मुलगी नाही हे स्वतःच्या डोक्यात फिट्ट बसव.”

“ मला माहित आहे नेहा इतर बायकांसारखी नाही म्हणून तर तिच्यामध्ये जीव गुंतला आहे.”

“ वा! हे बरंय ज्या बायका तुझ्या आजूबाजूला रूंजी घालतात त्यांच्याशी टेचाने वागतोस आणि ही मुलगी तुला भीक घालत नाही म्हणून तिच्या मागे पडलास? एवढा अगतिक झालास? लाज नाही वाटत तुला? हे प्रेम नाही रमण. तुझा अहंकार दुखावला गेल्यामुळे तुझी ही नवीन खेळी आहे.”

“ नाही छकू. मी कोणतीही खेळी नाही खेळत आहे. मी खरंच तिच्या प्रेमात अडकलो आहे.”

“ नेहा जेव्हा तुझ्या प्रेमाला होकार देईल त्यानंतर तू मूळचा रमण होशील यांची मला खात्री आहे.”

“ नाही असं होणार नाही.”

रमण काकुळतीला येऊन बोलत होता.


“ रमण तुझा हा बावळटपणा बंद कर. इतर बायकांसारखी मी कमकुवत नाही. तू वेळेवर सरळ मार्गाने जायला तयार झाला नाहीस तर काय करायचं ते मी करीनच. नंतर कितीही ओरड उपयोग होणार नाही.”


“ काय करणार आहेस तू?”

“ वेळ आली की कळेल. “

छकू त्रस्त चेहे-याने आत जाताना म्हणाली

“ रमण तुला शेवटचं सांगते. आजपासून आपल्या घरात तुझा मजनूचा अवतार बंद झाला पाहिजे. हर्षद आणि दिशा आता नकळत्या वयात आहेत. त्यांच्यासमोर मला तुझे हे चाळे नको. आलं लक्षात?”

छकूच्या आवाजात निर्णायक सूर होता.

“ मी वेडेचाळे नाही करतय. माझं नेहावर खर्च खूप प्रेम आहे.”

रमण हे वाक्य बोलायला आणि दिशाने दार उघडून घरात यायला एकच गाठ पडली. रमणच्या वाक्यावर चिडून रमणच्या अंगावर धावून जाणारी छकू मध्येच पायाला खीळ बसल्यासारखी थांबली. दिशाला छकूचं आणि रमणच्या चेहऱ्यावरचे भाव बघून काही कळलं नाही.

“ आई काय झालं? बाबांचा चेहरा असा का दिसतोय? बाबा तुम्हाला अजूनही बरं वाटत नाही का? डाॅक्टरकडे जायचं का?”

घाईने रमण जवळ येत दिशा म्हणाली. मानेनेच नकार देत रमण मान खाली घालून डोकं धरून बसला.

“ आई काय झालं बाबांना?”

“ काही झालं नाही. येतील थोड्यावेळाने ताळ्यावर.”

थंडपणे छकू म्हणाली पण तिच्या डोळ्यात मात्र रागाचा वणवा पेटलेला होता. या निर्बुद्ध माणसाचं काय करावं तिला कळेना.

“ आई अगं असं काय बोलतेस? महिना झाला बाबांना बरं वाटतं नाही. काय झालंय नेमकं?”

“ तुझ्या बाबांना प्रेमज्वर झालाय.”

तोंडातल्या तोंडात छकू पुटपुटली.

“ आई काही बोललीस का?”

“नाही. त्यांनाच कळत नाही त्यांना काय झालं आहे?”

दिशा पण संभ्रमात पडली की इतके दिवस बरा न होणारा कोणता आजार आहे हा? तिला जर छकू काय बोलली हे कळलं असतं तर तिची काय प्रतिक्रिया झाली असती?

तेवढ्यात रमण तिरीमीरीत उठला आणि आतल्या खोलीत गेला. दिशा काही न समजून आपल्या खोलीत निघून गेली. छकू तर बुचकळ्यात पडली होती कारण आता दिशाला काय सांगायचं आणि पाठोपाठ हर्षदने विचारलं तर काय सांगायचं?

छकू विचारात असतानाच रमण तयार होऊन खोलीबाहेर आला. त्याला बाहेरच्या कपड्यात बघून छकू सतर्क झाली.रमण बाहेर जाऊ लागताच तिने विचारलं,

“ कुठे चाललास?”

रमण छकूकडे बघून म्हणाला,

“ नेहाला भेटायला.”

हे ऐकताच छकू ताडकन खुर्चीवरून उठली आणि छकूने रमणचा हात पकडून त्याला दरवाज्यातून मागे खेचलं. रमणला तोल सावरता आला नाही त्यामुळे तो पडला.

“ ऐ काय करतेय पडलो नं”

“ तुझी लायकीच आहे पडण्याची.”

दिशाने रमणचं ओरडणं ऐकलं आणि ती धावत बाहेरच्या खोलीत आली. तिने रमणला पडलेलं बघीतलं.

“ बाबा काय झालं? तुम्ही पडले कसे?”

दिशाने त्याला ऊठवत विचारलं.

“या तुझ्या आईने मला हाताला धरून पाडलं”

“काय? “

दिशाने आश्चर्याने छकूकडे बघीतलं.

“ आई काय झालं तुला? असं का पाडलस बाबांना?”

“ रमण नाटकं नको. चुपचाप कपडे बदल आणि घरात बस.”

“ नाही बदलणार कपडे आणि नाही बसणार घरी. काय करशील?”

रमण रागाने छकूकडे बघत म्हणाला.

“ बाबा तुम्हाला कुठे जायचंय? मी येऊ का बरोबर?”

“ तू येशील माझ्या बरोबर?”

“ हो. येईन.कुठे जायचंय?”

“ मला…”

रमणचं वाक्य अर्धवट तोडत छकू तारसप्तकात ओरडली.

“ रमण खबरदार घराबाहेर पाऊल टाकले तर .”

“ आई अशी का ओरडतेस? बाबांबरोबर जाईन मी.”

“ दिशा तू अजून लहान आहेस. तुला समजणार नाही. तू प्लीज आत जा.”

“ पण आई…”

“ तू आत जा. माझ्याशी हुज्जत घालू नकोस.”

छकूचा रुद्रावतार बघून दिशा काही न बोलता आपल्या खोलीत गेली.

छकूने थंडपणे म्हणाली,

“ रमण खोलीत जा. मला तुझी ही नौटंकी अजीबात नकोय.”

“ तू मला अडवतेय हे चांगलं करत नाहीस.”

“ तू मुकाट्याने आत जा.”

“ माझ्या प्रेमाला तू भेटू देत नाहीस हे चुकीचं आहे.”

रमण चिडून म्हणाला.

“ रमण आत जा”

बोटाने इशारा करत ताठर नजरेने छकू म्हणाली आणि एक पाऊल पुढे सरसावली. तिला बघून घाबरत रमण एकेक पाऊल मागे सरकत होता.

“ मी जाईन तिला भेटायला.तुझी नजर चुकवून जाईन.”

मागे सरकत रमण म्हणाला. रमण जसा खोलीत गेला तशी छकू झटकन खोलीत शिरली आणि तिने खोलीचं दार लावलं. आता छकूचा संयम संपला.

“रमण तू मूर्ख आहेस का? तुला कळत नाही सांगितलेलं? कसल्या प्रेमाच्या गोष्टी करतोस? एका विवाहित स्त्री ला तिच्या आयुष्यातून उठवायचा विचार करतोय का? मूर्ख माणसा वेळेत जागा हो. तुझी मुलं प्रेमात पडण्याच्या वयातील आहेत. तू कसला प्रेमात वेडा होतोय? माझं डोकं फिरलय तुझे हे वेडे चाळे बघून. वेळेवर जागेवर ये नाहीतर मला कडक व्हावं लागेल.”

तेवढ्यात खोलीच्या बाहेर आलेल्या दिशाच्या कानावर बंद दाराआडून छकूचं बोलणं कानावर पडलं आणि तिला प्रचंड मोठा धक्का बसला.

मुलांच्या कानावर रमणचा उद्योग पडू नये म्हणून छकू जिवाचा आटापिटा करत होती पण तिला कळलं नाही की आपले प्रयत्न फुकट गेले.

दिशा कशीबशी आपल्या खोलीत गेली आणि धप्पकन पलंगावर बसली. तिचं डोकं काम करेनासं झालं.

“ या वयात बाबा प्रेमात पडले. आश्चर्य आहे.”

दिशा स्वतःशीच पुटपुटली. तिने घाईने हर्षदला मेसेज केला.

‘क्लास संपला की लगेच घरी ये. महत्वाचं काम आहे. आईला फोन करून काय काम आहे विचारू नको. माझं काम आहे.’

मेसेज टाईप करून दिशाने फोन अक्षरशः पलंगावर भिरकावला. तिला आत्ता छकूचं वागणं कळलं. तिला मघापर्यंत आईचा राग येत होता आता तिला आईबद्दल सहानुभूती वाटायला लागली.

दिशा हर्षदच्या मेसेजची वाट बघायला लागली.
_____________________________
क्रमशः हर्षदचा काय मेसेज येईल बघुया.