Apradhbodh - 10 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 10

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

अपराधबोध - 10

तीतक्यात श्वेताचा फोनची घंटी वाजली तीने बघीतले तर तो फोन तीचा घरून आलेला होता. तीने फोन उचलला आणि ती बोलली, "हेलो, आई काय झाले कशाला फोन केलास," मग समोरून आवाज आला, "अग मी श्यामल बोलते आहे, अग मी घरी आली आहे तर तू कूठे आहसे. मी आणि तुझे जावई तुझी भेट घेण्यासाठी थांबलेले आहोत, तर तु घरी कधी येतेस हे वीचारण्यासाठी फोन केलेला होता," मग श्वेता म्हणाली, "वाह ग फारच हुशार झालेली आहेस तू इतक्या दिवसांनी जावई बापुंना घेऊन घरी आलेली आहेस आणि लगेच परत जातेस अशी म्हणत आहेस. ते काही नाही आज तुला घरीच मुक्काम करावा लागेल आणि मी येत आहे अवघ्या अर्ध्या तासात तर मी आल्या शिवाय तेथून कुठेच हलायचे नाहीस तू" मग श्यामल म्हणाली, " परन्तु ताई," श्वेता मध्येच बोलली, "परन्तु बीरंतू काही नाही चालणार मी येते आहे घरी आपण मग घरी आल्यावर बोलू" असे बोलून तीने फोन ठेवला आणि ती सारांशला म्हणाली, " सारांश चल घरी जावे लागेल श्यामल तीचा पतीसोबत घरी आलेली आहे. तीचे लग्न झाल्यानंतर ती आज पुष्कळ महिन्यांनी घरी आलेली आहे. तर मला लवकर घरी जावे लागेल" मग सारांश काही तरी बोलू लागला, "अग मला जे बोलायचे होते ते अजून अपूर्ण राहिले आहे." मग श्वेता बोलली, " हो रे आपण मग गच्चीवर भेटून नीवांत बोलू कधीही आता घरी जाणे आवश्यक आहे माझ." असे बोलून ती
लगबगीने घरी जाण्यासाठी नीघाली.
तेवढयात सारांशने तीला माघुन हाक मारली, "अग श्वेता" तेवढ्यात श्वेता त्याला बोलली, " अरे मी तुला सांगीतले ना की आता कसलीच गोष्ट होणार नाहीं आहे." तर मग सारांश मधेच म्हणाला, " अग मी म्हणतो आहे की त अशी लगबगीने कुठे चालली आहेस." मग श्वेता थांबली आणि फक्त त्याच्याकडे बघू लागली आणि नंतर ती म्हणाली," कुठे म्हणजे आपल्या घरी, तुला काय कमी ऐकू येते काय रे." असे म्हणून ती हसली. मग सारांश हा हसून बोलला, " मी बहरा नाही झालो मला सगळ नीट ऐकायला येते, मात्र तु वीसरभोळी झालेली आहेस, अग तुला स्मरण आहे काय आपण एकाच ठिकाणी शेजारी शेजारी राहतो आणि आपल्याला एकाच ठिकाणी जायचे आहे. शिवाय माझ्याकड़े एवढी मोठी गाड़ी आहे आणि त्यात आपण दोघेही घरी जाऊ शकतो. त्याच मोठ्या गाडीत मघाशी तू बसून आलेली होतीस ना." आता मात्र श्वेताला तीची चुक तीचा लक्षात आली आणि ती म्हणाली," सॉरी मला क्षमा कर मी वेंधळी माझीच चुक असून सुद्धा तुलाच भलतेच काही बोलले, मला हल्ली काही आठवणच राहत नाहीं म्हणून मी हे विसरले रे." असे बोलतांना तीचा डोळ्यांत आणि चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव उत्पन्न झालेले होते. तेव्हा सारांश सुद्धा अधिक गंभीर आणि व्याकुळ होऊन बोलला, "हो खरच तुला आठवण राहत नाही, वीशेष म्हणून जवळची माणस " असे बोलून सारांश अधिकच नीराश झालेला होता. श्वेताने त्याचाकड़े बघीतले
होते तेव्हा त्याचे लक्ष श्वेताकड़े नव्हते आणि श्वेताने ती नीराशा त्याचा चेहऱ्यावरची स्पष्टपणे ओळखली होती.

वातावरण अधिकच गंभीर होत आहे हे बघून श्वेताने घाई केल्यागत वेळ मारून नेली आणि ती म्हणाली, " मग इथेच गप्पा गोष्टी करत राहशील का मला घरी सुद्धा नेवून सोडशील" मग मात्र सारांश हसला आणि म्हणाला, " हो नक्कीच मी तुला तू जेथे म्हणशील तेथे पोहोचवू शकतो मी त्यासाठीच तर आहे ना." मग श्वेता गंमत केल्यागत बोलली, "मला कुठेही नेऊन सोड फ़क्त आताच वर नको नेऊ " असे म्हणून ती जोरात हसली. श्वेताचे ते हसू
खोटे होते की खरे होते परन्तु सारांशने तीला आज पुष्कळ वर्षांनी इतके खिळखीळून हसतांना पाहिले होते. तो तीला बघत राहिला तेव्हा श्वेता म्हणाली,
हे देवा आता तरी तू येऊन गाड़ी चालव हा ड्राईवर तर वीचारांत गुंग झालेला आहे तेव्हा सारांशने गाड़ी सुरू केली आणि ते दोघेही घरी जाण्यासाठी नीघाले, ते दोघेही काही वेळात घरी पोहोचले होते आणि आता श्वेता गाडीतून बाहेर नीघून घरी जाण्यासाठी नीघाली, तेवढयात ती थांबली आणि म्हणाली, "सारांश अरे तू घरी एकटाच आहेस ना तर चल ना घरी श्यामल आणि तीचा पती बरोबर भेटून घे त्याचबरोबर आज आमचा बरोबर जेवण करशील तर आम्हाला फार बर वाटेल." श्वेताचा त्या निमंत्रणाला सारांश नकार देऊ शकला नव्हता, म्हणून तो म्हणाला, " मी थोड्या वेळाने फ्रेश होऊन घरी येतो." असे म्हणून तो त्याचा घरी नीघून गेला. आता श्वेता सुद्धा तीचा घरी नीघून गेली.

घरी गेल्यावर श्यामल श्वेताला बघून ताई म्हणाली आणि तीने येऊन श्वेताला आलिंगन दिले. श्वेताने सुद्धा तीला बाहुपाशात कवटाळून आलिंगन
दिले. मग श्वेताने जावयांना वीचारले, " काय म्हणता जावई बापू कसे काय येणे केलेत आज तुम्ही. शिवाय आल्या आल्या म्हणत आहात की परत जायचे आहे". तेव्हा जावई म्हणाले, "काही तरी कामाने आपल्या घराचा जवळ आलेलो होतो तर म्हटले की तुमची भेट घेऊन जाऊ म्हणून." मग श्वेता म्हणाली, "आज रात्र भर विश्राम करा आणि मग उद्याला सकाळी नीघुन जा त्याच बहाण्याने आम्हा बहिणींना रात्र भर नीवांत बोलायला वेळ तर मीळेल की
नाही त्यांचे बोलने सुरु असतांना सारांश हा फ्रेश होऊन श्वेताचा घराचा दारात येऊन ठेपला. त्याला बघून श्वेता ही तत्काळ उठली आणि दारात येऊन बोलली, "ये सारांश घराचा आत ये, अग श्यामल ओळखले काय तू कोण आल आहे आपल्या घरी" श्यामल सारांशकड़े बघत राहिली तेव्हा श्वेता म्हणाली, " अग हा सारांश आहे आपल्या शेजारचा काकांचा मुलगा आणि तुझा आणि शेखरचा मीत्र." तेव्हा मात्र श्यामल म्हणाली, " सारांश अरे तू किती मोठा झालेला आहेस आणि आता तर तू ओळखु येतच नाहीस. हो कारण की आपल्याला भेटून फारच काळ उलटून गेलेला आहे. बाकी सगळ सोड तू कसा आहेस." मग सारांश म्हणाला, ' हो तू स्वतःकड़े बघ ना किती मोठी झालीस शिवाय लग्न सुद्धा केलेल आहेस. तूच सांग कशी आहेस आणि वैवाहिक जीवन कसे सुरु आहे. मग श्यामल म्हणाली, "फारच छान आणि मजेत सुरु आहे, हे माझे मीस्टर नवीन आहेत" असे म्हणून तीने
त्याची भेट तीचा पतीसोबत करून दिली.
इकडे सारांश त्यांचा सोबत गप्पा गोष्टी करत बसला होता मात्र तीकडे पडद्याचा मागे शर्वरी सारांशला बघून आनंदित आणि उत्तेजित होत होती. तीने छानशी साड़ी घातलेली होती आणि कुणाही पुरुषाला उत्तेजित करण्या इतकी तीने साडीला अशाप्रकारे पीन अप केलेली होती की तीचा शरीराचा उभार हा लवकर त्या पुरुषाचा नजरेत येईल. तर आता वेळ होती जेवण करण्याची त्यामुळे सगळे पुरुष म्हणजे सारांश, नवीन आणि शेखर
हे जेवणाचा टेबलवर जेवायला बसले होते, त्याच बरोबर श्वेता आणि तीची आई सद्धा बसली होती, श्यामल आणि शर्वरी वाढत होती तेव्हा शर्वरी म्हणाली, " ताई तुम्ही सुद्धा जेवायला बसा मी वाढते." म्हणून श्यामल सद्धा जेवायला बसली. तर शर्वरीने जेवण टेबलवर आणून ठेवले होते सगळे
गप्पागोष्टी करत जेवण करण्यात गुंग होते. मात्र शर्वरी सारखी सारांशकडे बघत होती आणि त्याचाच वीचारांत गुंग होवून गेलेली होती.

शेष पुढील भागात..........