Badfaily - 4 in Marathi Short Stories by Nisha Gaikwad books and stories PDF | बदफैली - भाग 4

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

बदफैली - भाग 4

 

भाग -४

 तिने त्याला खुणेनेच वर घरी ये अस म्हणाली , पण तो मात्र नको तूच खाली ये अस तिला खुणेनेच म्हणाला.

अपर्णाने अशीही सुट्टी टाकलीच होती.. तिने त्याला एक छानस स्मित हास्य दिल आणि हातानेच थांब अस म्हणत ती  लगेच तयारी करायला गेली...

"सोहम ..तुम्ही आणि इथे "अपर्णा ने अक्षरशः त्याच्या कडे एकटक पाहत विचारल.

"काय करणार..तुमच्याकडून ट्रीट घायचीये ना " सोहम पण तिच्या डोळ्या पाहत म्हणाला.

"हो.. खरचं खूप आभारी आहे मी तुमची .. तुमच्या मुळेच आम्ही फार मोठ्या प्रसंगातून वाचलो... पण त्या दिवशी तुमचा नंबर देखील मी घेतला नाही.."  अपर्णाने तिची चुटपूट बोलून दाखवली.

हो ना...खरतर त्या दिवशी मी देखील विसरलो..अर्ध्या रस्त्यात आल्यावर मला आठवण झाली..तुमचं घर माहित होत..म्हणून इथे उभा राहत होतो" 

"राहत होतो.??.म्हणजे..तुम्ही रोज माझ्या घरासमोर उभे राहत होता.??."  अपर्णाने काहीश्या आश्चर्य मिश्रित चढ्या आवाजात सोहमला विचारल.

"नाही नाही...अहो..काहीतरीच काय ..माझ जेव्हा केव्हा तुमच्या घराच्या जवळपास काही काम असायचं तेव्हा फक्त उभा राहत होतो.."

"अस्स...बर तुमची गाडी कुठय आज नाही आणली." अपर्णाने इकडेतिकडे पाहत विचारल.

"सर्व प्रश्न तुम्ही इथे रस्त्यातच विचारणार आहात का ...चला कॉफी घेऊ .."

"एका अटीवर..हि माझी ट्रीट असेल"  अपर्णा अगदी त्याच्यावर हक्क असल्याप्रमाणे म्हणाली.

"नक्कीच"  

दोघे एका कॉफी शॉप मध्ये गेले...कॉफी पितपित त्याच्या पुन्हा  गप्पा सुरु झाल्या..

"काय मग..नाही केला ना त्या घरमालकाने पुन्हा फोन" सोहमने  विचारलं

"तेच तर ... ज्यादिवशी तुम्ही त्याला फोन केलात त्या दिवशी अशोकला त्याचा शेवटचा फोन आला."

"पाहिलत ना.. मी म्हणालो होतो.."

"पण नक्की, काय म्हणालात तुम्ही आमच्या घर मालकाला."

"ते एक सिक्रेट आहे.. जे मी तुम्हाला आताच नाही सांगणार"

अपर्णा फक्त हसली..पण हा मनुष्य थोडा विचित्र आहे ह्याची तिला खात्री झाली..

त्या दिवशी दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंग केले...

अपर्णा त्या दिवशी फार खुशीत होती , तिला नेमका कशाचा  कळत न्हवत पण खूप आनंद झाला होता, जणू हवेत तरंगल्याच फील येत होत, सोहमला भेटून आल्या नंतरचा  उरलेला संबंध दिवस तिचा चांगला गेला होता,  रात्रीचे आठ वाजले होते, अशोक रोज रात्री ओव्हरटाईम करून दहा वाजता घरी यायचा, अपर्णा  अशोक ची वाट पाहत टीव्हीवर काहीतरी रटाळ मालिका पाहत  बसली होती अचानक तिचा मेसेज टोन वाजला.

"जेवलात का ?" सोहमचा मेसेज  होता

"नाही अजून,  माझे मिस्टर दहा वाजता येतात ...त्या नंतर आम्ही एकत्र जेवतो" अपर्णा ने रिप्लाय केला.

"ओह्ह …..मग केलत काय दिवसभर" सोहमने  परत मेसेज केला

"विशेष काही नाही.....आराम केला , टीव्ही पहिला , जेवन बनवलं.." इति अपर्णा

"ओके......माझा दिवस मात्र आज सार्थकी लागला..."

" का बर... "

" तुम्ही माझ्यासोबत कॉफी घेतलीत...खूप बर वाटलं मला"

तेव्हढ्यात मोबाईलच्या स्क्रीनवर अशोकचा फोन….

तिने घड्याळात पाहिलं साडेनऊ वाजून गेले होते...

"हॅलो......अशोक तुझा ह्यावेळी फोन काय झालं..?"  अपर्णाने काळजी ने विचारल.

"अपर्णा .ऐक ना...सॉरी मला आज लेट होईल ,... तु जेवायची थांबू नकोस मी साडेअकरा पर्यंत येतो घरी.."

"पण अशोक........" अपर्णा काहीतरी बोलणार होती.

"अग येतो ना मी...तु जेवून घे हा ...चल बाय मला मॅनेजर हाक मारतोय"

इतकं बोलून त्याने फोन कट केला देखील , अपर्णा हताशपणे मोबाईल हातात धरून उभी राहिली

फोनवर सोहमचा मेसेज आला ....."What happend, are you ok? "

तिने रागातच आणि अनावधाने "No .." असा रिप्लाय केला ...

आणि फोन बेडवर फेकून दिला रागातच तिने स्वतःला वाढून घेतलं आणि रडत रडत जेवत बसली..
.
मेसेज नोटिफिकेशन ची टोन तीन चार वेळा वाजली, तिने दुर्लक्ष्य केलं.

थोड्याच वेळात मोबाईल वर फोन आला बघतेय तर सोहमचा फोन होता, आता ती थोडी भानावर आली डोळे पुसतच तिने फोन घेतला..

"हॅलो ...अपर्णा काय झालं ...तु काहीच का रिप्लाय देत नाहीयेस...म्हणून मी फोन केला."

"काही नाही..मी जेवत होते ..सॉरी ..मी तुमच्याशी नंतर बोलते"

"अपर्णा काय झालंय..तुझा आवाज असा येतोय ..रडल्यासारखा..आणि तु जेवतेयस तुझे मिस्टर आले वाटत.."

अपर्णाला रडू कन्ट्रोल झालं नाही ...आणि ती रडायला लागली...

"अपर्णा ..का रडतेयस अग शांत हो ....काय झालं ..मला सांग"

"काही नाही मला येत असं मधेच रडायला ..काहीही कारण नसताना"

"काहीही काय..प्लिज मला सांग..मी काही मदत करू शकतो का तुझी"

"तुम्ही काय माझी मदत करणार...माझी मदत कुणीही नाही करू शकत"

"पण झालंय काय ..ते तर सांगशील"

"मला खूप एकटं वाटत ..असं वाटत माझ्यासाठी कुणालाच काही वाटत नाही…..मी असले काय …..नसले काय ..कुणालाच काहीच फरक पडत नाही...ज्या माणसाच्या विश्वासावर मी माझ्या घरच्यांशी भांडले ... त्यांच्या पासून दूर येऊन पडले….इतकी दूर कि आता पुन्हा त्याच्याशी काहीही संबंध जोडू शकत नाही ....ज्या माणसांसाठी मी माझ्या हक्काच्या माणसांना दुरावले...मी इथे एकटी आहे....एकटीच जगतेय…..त्याला त्याच काहीच नाही...त्याला फक्त त्याच काम…..त्याचा ओव्हरटाईम… त्याचे पैसे…..बस्स त्याच एवढंच जग राहिलंय….त्याला त्याच्या पुढे स्वतःच्या तब्बेतीची हि किंमत राहिली नाहीये आणि माझी हि .. त्याच्या ह्या जगात मी कुठेच नाहीये..."अपर्णा सुचेल ते वाटेल तस सोहमला ऐकवत होती...

सोहम शांतपणे अपर्णानेच सगळं ऐकत होता..अगदी तिला जराही मध्ये न तोडता...

बोलून बोलून अपर्णा गप्प बसली

"हॅलो..अपर्णा शांत हो.. झालं सगळं बोलून ...झाली सगळी भडास काढून....अपर्णा मला एक सांग ..अशोकच खरच चुकतंय का ग...तो पैसे कमवतोय .. तुमच्या दोघांसाठीच ना ….हो त्याला नाही वेळ देता येत ..मान्य आहे मला ...पण तु नाहीका त्याला समजून घेऊ शकत...त्यांच्या रात्रंदिवस कष्ट करण्याला ...त्याच्या मरमर करण्याचा तुला अभिमान वाटायला हवा….कि राग यायला हवा..."

"पण...सोहम,,,"

"एक मिनिट...माझं पूर्ण बोलून होऊ दे…..तुला चिंता वाटते..साहजिक आहे...पण अपर्णा एक सांगू का ....ज्याची कष्ट करायची मनापासून तयारी असते ना ..त्याला शरीर देखील नेहमी साथ देत...so don’t worry ...काळजी नको करुस तु इतकी...तु तुझं मन गुंतव कुठेतरी..तु देखील स्वतःला बीजी ठेव.... खरच अशक्य आहे का हे "


अपर्णा काही वेळ नुसती गप्प बसली...

"अपर्णा तू ऐकतेस ना....तुलाच त्याला समजून घ्यायचं ..तू जस तुझ्या माणसांपासून लांब आहेस...तसाच तो देखील आहेच कि.....तुम्ही दोघेच आहेत एकमेकांचा आधार..नाही का वाटत तुला..."

"सोहम मला खरच पटतंय तुझं ...तु बरोबर बोलतोयस ...मी उगीच इतकी निगेटिव्ह विचार करत असते नेहमी.....समस्येवर मार्ग काढण्यापेक्षा फक्त रडत बसते.....पण तुझ मी नक्की ऐकेल....thank you so much .."

"अग thank you काय ..मला जे तुझ्यासाठी  योग्य वाटल ते मी तुला सांगितलं ...पण अपर्णा तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का.....आपण एकमेकांना अरे तुरे करायला लागलोय....."

"अहो खरंच कि...extreamly sorry for that "

"sorry ..कशासाठी आता अहो जाओ नाही...आपण एकमेकांचं चांगले मित्र नाही होऊ शकत का ,,,"

"नक्कीच ...Thanx Friend "

"Friend ला कुणी Thanx नाही म्हणत "

डोअरबेल वाजली..."अशोक आला वाटत…..

 

क्रमश: