Mystery Of Kalasgiri - 2 in Marathi Horror Stories by Sanket Gawande books and stories PDF | कालासगिरीची रहस्यकथा - 2

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

कालासगिरीची रहस्यकथा - 2

अध्याय ९: भयावह सत्य

 

सकाळ झाली आणि कालासगिरी गावात चैतन्य होतं. सरपंच महेश, श्याम, आणि डॉक्टरांची टीम गावात शिबिर उभारण्यासाठी व्यस्त होती. गावकरी शाळेत शिबिर उभारण्याच्या तयारीत होते, जे सरपंचांच्या वाड्याच्या समोर होतं. सरपंचांचा वाडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळचा पहिला वाडा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानशा शेतं होती, ज्यामुळे गावाचं दृश्य सुंदर आणि शांत होतं.

 

गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्यावर चहा आणि नाश्ता झाला. मीरा, सुप्रिया, अपूर्वा, आणि अन्वी सरपंचाच्या पत्नी नीलिमा आणि त्यांची दहावीत शिकणारी मुलगी सायलीसोबत स्वयंपाकात मदत करत होत्या. स्वयंपाकघरात गजबजाट होता, पण मीराच्या मनात सतत त्या जुन्या, भयावह घराचे विचार होते. तिला सरपंच महेश काकांकडे जाऊन विचारायचं होतं, पण ती थोडी घाबरलेली होती.

 

सायली सुप्रिया सोबत बोलत होती, तेव्हा मीरा त्यांच्या जवळ जाऊन बसली. तिने आपल्या मनातील विचार शेवटी विचारायचं ठरवलं.

 

"सायली, त्या जुन्या घराबद्दल काही माहिती आहे का?" मीराने थोड्या भीतीने विचारलं.

 

सायलीचे हात थांबले, आणि ती एक क्षण थांबली. "त्या घराबद्दल? मीरा, ते घर भुताटकीचं आहे असं म्हणतात. गावातल्या लोकांना तिथे जायला बंदी आहे. लोक तर दिवसाढवळ्या तिथे जायला घाबरतात."

 

"असं का?" मीराने उत्सुकतेने विचारलं.

 

सायली थोडा थरथरली आणि पुढे म्हणाली, "दोन वर्षांपूर्वी, आम्ही काही मित्रांसोबत खेळत होतो. आमच्या गटातला एक मुलगा, विवेक, त्या घराच्या जवळ गेला. त्याने फक्त दार ओलांडलं आणि काहीतरी भयानक पाहिलं. त्याची तब्येत एक महिना बिघडली होती. त्याला ताप आणि थंडी भरली होती. त्याची तब्येत इतकी वाईट झाली होती की..."

 

सायलीची आई, नीलिमा, मागून आली आणि म्हणाली, "सायली, भाज्यांचं टोपलं दे बरं. करी बनवायचीय."

 

सायलीने लगेचच विषय बदलला आणि भाज्यांचं टोपलं आईला दिलं. मीराच्या मनात आता अधिकच शंका आणि भय निर्माण झालं होतं. ती घराबद्दल अधिक जाणून घ्यायचं ठरवत होती.

 

अध्याय १०: सरपंचांचा वाडा

 

जेवणाच्या तयारीनंतर, मीरा शाळेच्या दिशेने निघाली जिथे सरपंच महेश आणि इतर जण शिबिर उभारण्यात व्यस्त होते. तिने सरपंच महेश काकांकडे जाऊन विचारायचं ठरवलं, पण तिने पाहिलं की ते आणि इतर लोक अजूनही शाळेत शिबिर उभारण्याच्या कामात व्यस्त होते.

 

तितक्यात, तिला सुप्रिया, जयेश आणि सायली येताना दिसले. सायलीने सांगितलं की त्यांनी जेवणाच्या तयारीचं काम पूर्ण केलं आहे आणि आता सगळ्यांना जेवणासाठी बोलवायला आले आहेत.

 सायलीने आपल्या वडिलांकडे जाऊन त्यांना जेवणासाठी सर्वांना बोलवण्याची विनंती केली.

 

सरपंच महेश यांनी सर्वांना जेवणासाठी बोलावलं. सगळेजण सरपंचांच्या वाड्यात जेवणासाठी एकत्र आले. मीरा आणि बाकीची मुलं मदत करत होती.

 

सरपंचाचा वाडा खूप सुंदर होता. तो दोन मजली होता आणि सागवानी लाकडाने बनवलेला होता. वाड्याच्या मध्यभागी तुळशीचं रोप होतं, ज्याच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांच्या रोपांची सजावट होती. वाड्याच्या छपरावर कवेलू होते आणि ते खूप आकर्षक दिसत होते. वाड्याच्या परिसरात असलेल्या फुलांच्या बागेमुळे वातावरण प्रसन्न आणि शांत होतं.

 

सर्वजण वाड्याच्या व्हरांड्यात रांगेत बसले होते. मुलं त्यांना डाळ, पोळी, वांग्याची भाजी, लोणचं, आणि पापड वाढत होती. सरपंच आणि डॉक्टर गावकऱ्यांच्या आरोग्याविषयी चर्चा करत होते. गावातील लोकांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबद्दल ते बोलत होते.

 

"गावातील लोकांना तपासणीसाठी कसं प्रवृत्त करावं, याबद्दल विचार करत आहोत," डॉक्टर यश म्हणाले.

 

"होय, त्यांना योग्य उपचार मिळावेत हे खूप महत्त्वाचं आहे," डॉक्टर संकेतने उत्तर दिलं.

 

श्यामही त्यांना मदत करत होता आणि योजनेच्या बाबतीत चर्चा करत होता. यश आणि संकेत गावातील निसर्गाचं आणि वातावरणाचं कौतुक करत होते.

 

"इथेचं वातावरण खूप छान आहे. डोंगर आणि जंगलामुळे इथे थंडावा आहे," डॉक्टर यश म्हणाले.

 

जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या कामाला लागले. आज मेडिकल कॅम्पचा पहिला दिवस होता, त्यामुळे लोकांची गर्दी थोडी कमी होती. डॉक्टर आणि सरपंच तिथेच व्यस्त होते, गावकऱ्यांशी बोलत होते.

 

 

 

इकडे मीरा, जयेश, सुप्रिया, आणि सायली गाव फिरायला निघाले. सायलीने गाव दाखवण्याची जबाबदारी घेतली होती. गाव तसं फार मोठं नव्हतं, १००-१५० घरं असतील, तीही जुन्या काळातील कौलारू घरं. सायली त्यांना गावातील छोटी दुकानं, जनावरांचे गोठे दाखवत होती.

 

सायली त्यांना तिच्या मैत्रिणी निलूच्या घरी घेऊन गेली. निलूच्या गायीने नुकताच एका बछड्याला जन्म दिला होता. निलू आणि तिचा मित्र निलेश, जो त्यांना रस्त्यात भेटला होता, त्यांच्या सोबत होते. ते सगळे निलूच्या घरी गप्पा मारून निघाले.

 

सायली त्यांना त्यांच्या शेतात घेऊन गेली. शेतात आंब्याची, लिंबूची झाडं आणि ऊसाची लागवड होती. शेताच्या मध्यभागी एक मचान होता, जिथे बसून ते आंब्याचा आस्वाद घेत होते.

तिथूनच मीराला ते जुने घर दिसले. शेताच्या आणि गावाच्या वेशीच्या मदतीने ते घर आता जवळच होतं.

 

मीरा पुन्हा सायलीला त्या घराबद्दल विचारू लागली.

 

"सायली, त्या घरात नक्की काय झालं?" मीराने विचारलं.

 

सायलीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, "मीरा, ते घर भुताटकीचं आहे. त्याबद्दल नको बोलायला."

 

पण मीरा ऐकायला तयार नव्हती. तिने निलेशला विचारलं. निलेश म्हणाला, "इथल्या जुन्या लोकांचं म्हणणं आहे की तिथे काहीतरी आहे. त्यामुळं तिथे कोणी जात नाही. दरवर्षी उन्हाळ्यात आमच्या कुलदेवता नरसिंह स्वामीची जत्रा भरते. ती जत्रा आता १० दिवसांनी आहे. गावातली पालखी त्या घराजवळ नेली जाते. ती पालखी ते घराच्या समोर पूजा करून तिला देवळात नेलं जातं. "जे ने करून त्यातील अमानवीय ताकत बाहेर पडू नये किव्हा कुनाला त्रास देऊ नये." असं म्हणतात की त्या घरात काहीतरी विचित्र घडलं होतं."

 

निलेशने सांगितलं, "त्याचं काय नेमकं झालं होतं, कोणीच स्पष्ट सांगू शकत नाही. पण जेव्हा कोणी तिथे जातं, त्यांची तब्येत बिघडते. काही लोक तर त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत."

 

सायली म्हणाली, "मीरा, तू तिथे जाऊ नकोस, हे घर भुताटकी आहे."

 

सुप्रिया म्हणाली, " मला माहित आहे, मीरा नेहमीच अशा गोष्टींबद्दल उत्सुक असते. मला वाटलं ती काहीतरी विचार करतेय."

 

जयेश म्हणाला, "तू तिथे जायला नकोस ना?"

 

मीरा म्हणाली, "आपण तिथे जाऊन बघूया काय आहे ते. फक्त बाहेरूनच पाहू. तुला यायचं असेल तर चल, नाहीतर मी एकटीच जाईन." आणि ती मचानवरून खाली उतरली आणि शेताच्या वाटेने चालू लागली. सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, "नको मीरा, थांब, हे घर भुताटकी आहे. बाबांना कळलं तर ते खूप रागावतील." पण मीरा तिला दुर्लक्षित करून घराच्या दिशेने चालत राहिली.

 

सगळे तिच्या मागे भितीने चालत होते. सुप्रिया जाणून होती की मीरा ऐकणार नाही, ती हट्टी आहे. म्हणून तिने जयेशला आणि सगळ्यांना सोबत घेतलं. जयेशला असे काहीतरी पटत नसल्यामुळे तो फक्त गोष्टी खर्‍या आहेत का हे तपासू इच्छित होता.

 

 

 

अध्याय ११: भयानक अनुभव

 

 

सर्वजण त्या घराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचले. घर तारे आणि लाकडांच्या कंपाउंडने झाकलेले होते. दरवाजा बंद होता. तिथे झोका हळूवारपणे हलत होता. परिसर खूप शांत होता. सायली सतत म्हणत होती, "आपल्याला जायला हवं, मीरा, कृपया ऐक." पण मीरा ऐकत नव्हती. तिने त्या खिडकीत पाहिलं जिथे तिला पूर्वी कोणीतरी दिसलं होतं, पण आज तिथे काहीच नव्हतं आणि काहीच भुताटकी वाटत नव्हतं. फक्त काही रानटी गवतं आणि झाडं होती ज्यामुळे परिसर भयानक आणि रहस्यमय दिसत होता.

 

मीरा त्या बाहेरील दरवाजाला ढकलत घराच्या बागेत पाऊल ठेवलं. जयेश तिच्या मागे आला. निलेश, ज्याने दोन वर्षांपूर्वी आपल्या मित्रासोबत ह्या गोष्टी अनुभवल्या होत्या, तो सावध आणि काळजीपूर्वक होता. सायली, सुप्रिया आणि निलू पण त्यांच्यामागे आले. सगळे घाबरलेले होते, फक्त मीरा आणि जयेश वगळता.

 

सायली आणि निलू सतत म्हणत होत्या, "आपल्याला घरी जायला हवं, मीरा  .

 

मीरा म्हणाली, "फक्त दोन मिनिटं."

 

जयेश वडाच्या झाडाकडे आणि त्या झोक्याकडे गेला. निलेश त्याच्या मागे गेला. इतर तीन सायली, निलू, आणि सुप्रिया तिथेच उभे राहिले आणि सगळीकडे बघू लागले.

 

 मीरा घराच्या बंद दरवाजाकडे गेली. तिथे तीन पायऱ्या होत्या, ज्या लाकडी बनलेल्या होत्या. हवेचा गारवा जाणवत होता, मीरा पहिल्या पायरीवर सावधपणे पाऊल ठेवत होती. आवाज आला, "कrrrr." आणि अचानक वारा वाहू लागला आणि बाहेरील कंपाउंडचा दरवाजा हळूवारपणे हलू लागला.

 

सायलीने अचानक दुसऱ्या मजल्यावरील खिडकीकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की तिथे कोणीतरी त्याना बघत आहे. सायलीने मोठ्याने हाक मारली, "मीरा, नाही!" मीरा आणि सगळ्यांनी तिच्याकडे घाबरून पाहिलं. सुप्रियाने विचारलं, "काय झालं?" त्या बाजूला निलू रडू लागली. सायलीही घाबरली होती कारण तिने काहीतरी पाहिलं होतं. वातावरण अचानक भयाण झालं.

 

मीरा पायऱ्या उतरून सायलीकडे जायला लागली. पण  ती तिथेच थांबली…….

मागून कोणीतरी तिला आवाज दिला "कृपया मदत करा" "कृपया मदत करा" …….

तिला दरवाजाच्या मागून कोणीतरी बघत होतं असं तिला वाटल. तिने मागे वळून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. मीराला भितीने कंप पावलांवर आला. तिने पायऱ्या उतरल्या आणि इतरांकडे धावली.

 

निलू खाली पडली आणि रडू लागली. सायली सतत त्या खिडकीकडे पाहत होती आणि तिला कोणीतरी पाहत असल्याचं जाणवत होतं. तिच्या पायाला आणि हाताला गारवा जाणवत होता.

 

मीरा सायलीकडे गेली आणि तिने पाहिलं की तीच ती खिडकी जिथे तिने पूर्वी सावली पाहिली होती. तिथे कोणीतरी मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होतं. हवा गार झाल होती. मीरा आणि सायली सतत त्या खिडकीकडे पाहत होत्या.

 

त्याच वेळी निलेश आणि जयेश पण तिथे आले. निलेशने निलूला उभं केलं आणि सुप्रियाने त्याला मदत केली. निलेशने जायेशला सांगितलं, "सगळ्यांना इथून बाहेर घेऊन चला ." त्याला माहित होतं की काय चाललं आहे. त्याच्यासोबत ह्याच गोष्टी पूर्वी घडल्या होत्या.

 

त्याने त्या खिडकीकडे पाहिलं आणि त्याला पण ती सावली दिसली. जयेशने मीराला आणि सायलीला सांगितलं, "बाहेर चला." पण ते दोघंही त्या खिडकीकडेच पाहत होते. जयेशने देखील खिडकीकडे पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. जयेशने त्यांच्यावर ओरडलं. निलेशने मीरा आणि सायली ते पाहत होत ते पाहिल. निलेशने सुप्रियाला सांगितलं, "निलूला इथून बाहेर घेऊन जा." आणि तो मीराला आणि सायलीला घेऊन बाहेर आला.

 

 हवा जोरात वाहू लागली, झोका वेगाने हलू लागला. ते लोखंडी दरवाजातून बाहेर आले

 

 निलेश आणि मीराने मागे पाहिलं तर ती डोळे अजूनही त्यांच्याकडे पाहत होती आणि मग घरात जाऊन गायब झाली.

 

सगळे घाबरले होते. सायली म्हणाली, "आपल्याला जायला हवं." सगळे धावत गावातल्या सरपंच वाड्यात पोहोचले. सगळे घाबरलेले होते आणि जोरात श्वास घेत होते. अन्वीने ते पाहिलं आणि बाहेर येऊन विचारलं, "काय झालं?" निलू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण सायलीने तिचं तोंड बंद केलं. मीराला संधी मिळाली आणि ती म्हणाली, "आम्ही फक्त पाहिलं की कोण घरी आधी पोहोचतो." अन्वीला ते विचित्र वाटलं आणि तिने हसून आत गेली.

 

ते सगळे सायलीच्या खोलीत गेले आणि तिथे बसले.

 

थोड्यावेळाने सायली बोलली, "तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तिथे कोणीतरी होतं जो आपल्याकडे पाहत होता त्या खिडकीतून. त्याचे डोळे मोठे होते, ती सावली."

 

निलू रडू लागली. सुप्रियाने तिला धरून म्हणाली, "ठीक आहे निलू, आपण आता सुरक्षित आहोत. आपण घरी आहोत."

 

निलेश शांत होता आणि त्याने ते डोळे पुन्हा आठवली. त्याला राग आला होता. निलेशला काहीतरी माहित होतं. मीराला ते जाणवलं की निलेशला काही माहित आहे.

 

सायलीने विचारलं, "मीरा, तू पण ते पाहिलंस ना?" मीरा म्हणाली, "हो, फक्त पाहिलं नाही तर मी काही ऐकलं पण. कोणीतरी आपली मदत मागत होतं. मी 'कृपया मदत करा' 'कृपया मदत करा' …..हे शब्द ऐकले."

 

निलेशने चिडून सांगितलं, "गप्प बस हे बकवास. मी तुला सांगितलं होतं की तिथे जाऊ नकोस, मीरा. हे तुझं शहर नाही, तुला कल्पनाही नाही की हे किती धोकादायक आहे. मी आधी ह्याचा सामना केला आहे आणि आज तुझ्यामुळे मला पुन्हा त्याचा सामना करावा लागला. तू सगळ्यांना मोठ्या संकटात टाकलं आहेस, मीरा. तुला काहीच कल्पना नाही."

 

 मीरा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण निलेशने तिला गप्प केलं आणि म्हणाला, "पुढच्या वेळी त्या घराच्या दिशेने जाऊ नकोस."

 

त्याने निलूचा हात धरला आणि म्हणाला, "मी तिला घरी सोडतो आणि लक्षात ठेवा, आजच्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाहीत."

 

मीरा निलेशच्या बदललेल्या वागण्याकडे पाहत होती. तो लहान मुलासारखा खेळणारा मुलगा आता प्रौढ आणि संरक्षक वाटत होता. सगळे शांत होते.

 

जयेशला काहीच कळलं नाही. त्याला फक्त वाटत होतं की सगळे घाबरले आहेत. त्याच्यावर परिसराचा काही परिणाम झाला नव्हता.

 

सुप्रियाने मीराचा आणि सायलीचा हात धरला आणि बिछान्यावर पडली.

 

जयेशही आपलं पुस्तक घेऊन वाचायला लागला. ……………"

 

 

 

 

======================पुढील भागात============================