Sir comes and goes - 7 in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 7

The Author
Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 7



 
प्रथमाचे मन तिच्या आईला तिच्या पेक्षा जास्त समजत होते आणि यावेळेस ही समजले होते असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. सहलीवरून आल्यापासूनच प्रथमा सर्व प्रवासाबद्दल, तेथील एकंदरीत ॲक्टिव्हिटीज बद्दल, तसेच समोर आलेल्या नाना प्रकारच्या आव्हानांबद्दल, आणि तिला समृध्द करण्याच्या प्रवासात मोलाचा हातभार लावण्याच्या कामी आलेल्या या स्वर्णीम अनुभवाबद्दल आईला भरभरून सांगत होती.
 
प्रथमा बोलताना आपली टीम आणि इतर सर्व जणांबद्दल कौतुकाने सर्व वर्णन करत होती. पण एका खास व्यक्तीचे नाव
वारंवार तिच्या तोंडातून, अगदी प्रत्येक दोन वाक्यांगणीक येत होते. आणि ते नाव घेत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तेज आणि डोळ्यांतील लकाकी काही वेगळीच जाणवत होती. या सर्व गोष्टींपासून प्रथमा अद्याप तरी पूर्णपणे अनभिज्ञ होती असे तिच्या वागण्यावरून वाटत होते.
 
मनाच्या कुठल्याश्या तरी कोपऱ्यात ती हळूहळू त्या व्यक्तीकडे, किंबहुना त्याच्या सर्वांकष व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होत होती. तिच्या आईने हे सारे तिने काही न सांगता, तिच्या बोलण्याच्या एकंदरीत लकबितून हेरले होते. पण प्रथमाला याचा मागमूसही नव्हता. कारण तसे काही तिच्या मनात आले असते आणि त्याचा जर तिला यत्किंचितही अंदाज आला असता तर तिने तिच्या आईला आपणहूनच नक्की सांगितले असते. त्यांचे नाते त्यांनी तसेच, अतिशय पारदर्शी आणि नितळ असे जपले होते.
 
आईलाही आपण प्रथमाला याबाबतीत स्वतःहून इतक्यात काही खोदून विचारावे याची गरज वाटली नाही. काही गोष्टी स्वतःच्या स्वतःला उमजायला हव्या असतात. आणि त्या योग्य वेळ आल्यावर बऱ्याचदा आपसूकच कळून आणि जुळून येतात. आपलेच मन तेव्हा आपल्याला योग्य तो कौल देत असते, आणि हा दिलेला कौल आपल्याला समाजला तर कदाचित कालांतराने, थोड्या दिवसांत आपले आपल्यालाच सर्व लक्षात येईल की आपल्याला नक्की काय हवे आहे. मग आपल्या जिवलग मैत्रिणीशी, आपल्या आईशी याबाबतीत कदाचित प्रथामाला जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवून सविस्तर बोलणे सोपे येईल. कदाचित आईचे चार-दोन अनुभवाचे बोल तिला मार्गदर्शन करण्यास आणि पुढे जाऊन काही सबळ निर्णय घेण्यास मदत करू शकतील.
 
प्रथमा आवरून नेहमीप्रमाणे ऑफीसला पोहोचली. पण आज तिचे मन काही केल्या कामात लागत नव्हते. ती अतिशय जबाबदार आणि आपले काम चोख पार पाडण्यात सर्वस्व झोकून देणारी मुलगी असल्यामुळे तिला हे अजिबात आवडत नव्हते. ती परत परत लक्ष केंद्रीत करून काम करण्याचा प्रयत्न करत होती. पण आज ते काही घडत नव्हते. आणि तिला आपल्याला असे काय होत आहे हे देखील कळत नव्हते. शेवटी ती हतबल होऊन डेस्क वरून उठली. थोडे फ्रेश होऊन, चहा पिऊन परत नव्याने कामाला सुरुवात करू या असा विचार करून ती कॅफेटेरिया मध्ये आली. तिने धराला डेस्क वरून उठतानाच मेसेज केला होता. ती पण कॅफेटेरिया मध्ये पोहोचली.
 
चहा घेत घेत दोघीजणी गप्पा मारू लागल्या. तिने धराला ही सहलीबद्दल सर्व काही सांगितले. धराला ही तिचा आनंद, उत्साह आणि ते जगलेले स्वर्णीम क्षण तिच्या डोळ्यांत तरळत असलेले जाणवत होते.
 
हे सर्व खरे असले तरी आपले आज कामात लक्ष का लागत नाहीय हे कोडे मात्र प्रथमाला अद्याप उलगडले नव्हते. धरा सोबत होती म्हणून सध्या तिला काही वाटत नव्हते. पण डेस्कवर गेल्यानंतर खरंच आपल्याला काय होत आहे, किंवा सहलीवरून आल्यापासून काय झाले आहे हे आणि अजूनही असेच असंख्य प्रश्न आपल्याभोवती थैमान घालत असल्यासारखे जाणवत होते. एवढे लोक असूनही एकटे असल्यासारखे, जागेचा विसर पडल्यासारखे का वाटत होते...!!
 
तिने तिच्या स्वभावा विरूद्ध जाऊन आजचा पूर्ण दिवस असाच काढला. संध्याकाळ तर अजूनच उदास आणि एकटी भासत होती. त्यामुळे आज तिला घरी देखील परतावे वाटत नव्हते. ती थेट समुद्रावर जाऊन क्षितिजावर उमटलेल्या सूर्यास्ताच्या रंगांशी एकरूप होऊन गेली...