Nivadnuk - 1 - 2 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | निवडणूक - भाग 1 - 2

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

निवडणूक - भाग 1 - 2

मनोगत निवडणूक पुस्तकाविषयी

निवडणूक नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक संपुर्णतः निवडणुकीवर आधारीत असून निवडणुकीबाबतची माहिती मी या पुस्तकात कथानकाबाबत टाकलेली आहे.
निवडणूक....... आजची निवडणुकीची परिस्थिती पाहता जनता बेहाल, नेते मालामाल, म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ज्यावेळेस ही पुस्तक लिहिली. त्यावेळेस निवडणुकीचा पहिला चरण संपला होता. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली होती व सर्वांना चिंता पडली होती. कारण मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती.
मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं होती. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण होतं. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळत होतं की जनतेला सत्ताधारी व विरोधी पक्ष आवडलेले नसावेत नव्हे तर त्यांचं कार्य आवडलेलं नसावं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे की जी लोकांचा आत्मा आहे. ती जर नसेल तर लोकांना मोकळा श्वासच घेता येणार नाही. निवडणुकीचा प्रसंग असा असतो की त्याद्वारे लोकं जनप्रतिनीधी जर अत्याचारी निघाला तर त्याला त्याची जागा दाखवू शकतात आपल्या एका मतानं. ते एक मत राजाला रंक व रंकाला राजा अगदी सहजच बनवू शकते. याची प्रचिती मतदान केल्यावर समजते.
मतदान हे आपल्या भागाच्या नव्हे तर देशाच्या विकासासाठी केलं जातं. परंतु हे जरी खरं असलं तरी आज लोकं ज्याला मतदान करतात. तो व्यक्ती निवडून येताच विकास त्याचा होतो. लोकांचा होत नाही. देशाचा तर नाहीच नाही. म्हणूनच लोकं कधीकधी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असतात. त्यांना वाटते की ह्या नेत्यांपैकी सर्वच नेते हे भ्रष्टाचार करणारे असून त्या नेत्यांना निवडून दिल्यास ते देशाची वाट लावतील. शिवाय आपण मतदार म्हणून मतदान केल्यास फायदा त्यांचा होईल, आपला नाही. असा विचार करुन मतदार हे मतदान करायला अजिबात केंद्रावर जात नाहीत.
सध्याच्या काळात मतदारात उत्साह राहिलेला दिसत नाही. मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते. त्याचं कारण म्हणजे जो ही नेता निवडून येतो. तो नेता आपलाच स्वार्थ पाहात असतो.
मतदानाबाबत विचार केल्यास आलेली उदासीनता ही झाकोळली जात नाही. कारण आजपर्यतचा नेत्यांचा इतिहास पाहिल्यास असं आढळून येतं की आजपर्यंत जेही कोणते नेते होवून गेले. त्यांनी आपला स्वार्थ पाहात गडगंज संपत्ती गोळा केली. ज्या संपत्तीच्या आधारावर त्या नेत्याच्या सात पिढ्या बसून खावू शकतील. काहींनी मोठमोठे महाविद्यालय उघडले. ज्यात प्रवेश घेतांना पंचवीस पंचवीस लाख रुपये केवळ शिक्षणासाठी भरावे लागतात. ही महाविद्यालये रोजगार निर्मीतीची केंद्रे जरी असली तरी प्रत्यक्षात ती त्या नेत्यांनी स्वतःच्या पैशातून उभारलेली नसतात तर तो पैसा हा जनतेचा पैसा असतो. शिवाय हे नेते जोही घोटाळा करतात. त्या घोटाळ्यातूनही त्यांना मिळालेला पैसा हा जनतेचाच असतो. जनतेचा हा पैसा कररुपात जातो, तो नेत्यांच्या खिशात. यात केवळ जनतेचा पैसाच नेत्यांच्या खिशात जात नाही तर नेत्यांच्या खिशात लोकांच्या जमीनीही जातात. कारण नेत्यांजवळ भ्रष्टाचारातून जास्त कमविलेला पैसा असतो. त्या पैशाच्या भरवशावर ही नेतेमंडळी कर्जात सापडलेल्या लोकांच्या जमिनी विकत घेतात व त्यांना भुमीहीनच नाही तर कर्जबाजारीही करतात. जनता बेहाल व नेते मालामाल. म्हणूनच देश बुडतो व देशाचा विकास खुंटतो. शिवाय ही नेतेमंडळी जे महाविद्यालय उभारतात. त्यातून खरंच गरीबांच्या मुलांना रोजगार मिळतो काय? असा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचंही उत्तर नाही असंच येतं.
मतदान करतांना दोन घटक दृष्टीक्षेपात असतात. पहिला घटक म्हणजे सत्ताधारी पक्ष व दुसरा घटक म्हणजे विरोधी पक्ष. विरोधी पक्ष अर्थात आपण ज्याला निवडणुकीत निवडून देवू ते. शिवाय आताचे निवडणुकीत उभे राहणारे असे एकही उमेदवार नाहीत की आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. प्रत्येकजणच आजच्या काळात निवडणुकीला उभा राहतो तो भ्रष्टाचाराचा विचार करुनच. जो तो विचार करतो की मी निवडून आल्यानंतर भरपूर पैसा कमविणार. ज्यानं माझ्या सात पिढ्या बसून खाऊ शकतील. हाच विचार करुन जो तो निवडणुकीला उभा राहतो. त्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करतो. प्रसंगी मतदारांना लुभावण्यासाठी दारु वा पैशाचे वाटप करतो. कारण त्याला माहीत असतं की आपण का एकदा निवडून आलो की बस मालामालाच होणे आहे. जनता तर काहीच बोलू शकत नाही. ती बोलेल पाच वर्षानं. तेव्हापर्यंत तर मला मालामालच होता येईल. मग निवडणुकीत मी निवडून नाही आलो तरी चालेल. शिवाय मलाच तिकीट मिळेल कशावरुन? म्हणूनच जनता काळाही श्वान तोच व गोराही श्वान तोच या म्हणीप्रमाणे विचार करुन अलिकडे मतदानाला जावू पाहात नाही व मतदानाचा टक्का घसरतो. मग ही चिंतेची बाब ठरते. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र येतं की जनतेनं मतदान कमी केलं. खुलासा द्या आणि जिल्हाधिकारी तरी कुठून देणार खुलासे? कारण हे जनतेचं राज्य आहे. जनता म्हणेल तेच होईल. काय जनतेला मतदान करायला ओढत नेणार का कोणी? हा प्रश्न आहे.
महत्वपुर्ण बाब ही की ही जनता आहे. या जनतेनं पुर्वीच्याही शासनकर्त्याच्या काळातील काळ पाहिलेला असतो. जो घटक आज विरोधी पक्ष म्हणून प्रचलीत असतो आणि गतकाळातील सत्ताधारी पक्षांचाही काळ पाहिलेला असतो. या दोघांचाही काळ जनतेला आवडत नाही. म्हणूनच हा निवडणुकीवर बहिष्कार. तशी इतर बरीच कारणं असतात. परंतु तुर्तास हे कारण सत्य असेल असं वाटते. तेव्हा विनंती हीच की निवडणुकीत जरी कमी टक्केवारी पडली असली तरी उद्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चीतच वाढू शकते. परंतु त्यासाठी जो पक्ष निवडून येईल. त्या पक्षानं चांगलं काम करावं. जनतेचं काम करावं. निव्वळ आपल्याला सत्ता मिळाली म्हणून जनतेचा पैसा आपल्या घरात भरु नये म्हणजे झालं. चांगलं काम केल्यास निश्चीतच मतदानाची टक्केवारी वाढू शकते. नाहीतर आज तेवढी तरी टक्केवारी असते. उद्या तिही नसतेच यात तिळमात्रही शंका नाही.
याच उद्देशावर आधारीत माझी ही पुस्तक. याचं कथानक सांगत नाही. ते कथानक आपण वाचावं व कथानक चांगलं वाटल्यास मला एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०

निवडणूक (भाग एक)
अंकुश शिंगाडे

बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव पडला होता त्याचेवर. तसा तो काही बाबासाहेबांच्या परीवाराचा नव्हता तरीही. त्यानं धनिकांची संपत्ती पुर्णतः जप्त केली होती आणि त्यातून त्यानं देशाचं कर्ज फेडलं होतं. तसेच देशातील नेत्यांच्या बेताल वागण्यानं बेहाल आणि बेजार झालेल्या जनतेला राहत दिली होती. त्यामुळं धनीक त्याला हुकूमशहा मानत होते तर गरीब जनता त्याला मसीहा. तसा तो नेहमी सांगत असे लोकांना की त्यांनी सुधरावं. वेगवेगळ्या तुकड्यात उभे राहू नये निवडणुकीत. ज्यानं आपल्याच बिरादरीतील लोकांच्या मताचं विभाजन होतं व जे सक्षम नेते निवडून यायला नको असतात. ते निवडणुकीत निवडून येतात. जे नेते देशाचा विकास करीत नाहीत, तर अधोगती करतात. शिवाय ते नेते मालामाल होतात आपल्याच भरवशावर आणि आपले हाल, बेहाल करीत असतात.
त्याचं बोलणं वास्तविक खरं होतं. कारण तो निवडणूक जिंकण्याच्या पुर्वी जनतेचे हाल बेहाल होते. नेते मालामालच होते आणि मतदानात गोलमालपणाही तेवढाच होता.
तो राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आला होता निवडणूकीत. तसं पाहिल्यास त्याचं पद हे लोकांच्या निवडणूकीवर अवलंबून होतं. परंतु त्याला वाटत होतं की ही निवडणूकच मुळात बंद करावी. त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार तो करीत होता. कारण समाज आजही सुधरु शकत नव्हता. तो आजही निवडणुकीत तुकड्यांमध्येच उभा राहात होता.
निवडणूक मुळात बंद करावी याचा विचार करीत असतांना तो जे ही काही विचार करीत होता. त्याच अनुषंगानं त्यानं पहिलं पाऊल टाकलं. ते पाऊल होतं प्रसारमाध्यमावर बंदी घालणं. कारण प्रसारमाध्यमं ही लोकशाहीचा आधारस्तंभ होती व लोकशाहीचा आरसाही होती. ती प्रसारमाध्यमं कोण चांगलं व कोण वाईट हे ठरवत असे. त्यातच त्याची कारकीर्द येताच प्रसारमाध्यमावर त्यानं आपले शिकंजे कसले. परंतु तो काहीही करीत असला तरी निवडणूक बंद झाली नव्हती. कारण ती निवडणूक घेणं वा बंद करण्याचा मुद्दा गाजत असतांनाच एका आनंद नावाच्या व्यक्तीनं त्याला पदावरच असतांनाच मारुन टाकलं होतं व त्याची निवडणूक बंद करायची स्वप्न धुळीस मिळवली होती. मात्र त्याच्या मृत्यूनं सामान्य लोकं हरहळत होते. कारण देशात लोकशाही होती. संविधानही होतं देशात. तसेच लोकं संविधानानुसार चालत असले तरी सामान्य माणसांना त्यातील काहीच कळत नव्हतं. ते फक्त आपलं दोनवेळचं जेवण कसं करायचं याचीच प्रतिक्षा करायचे. त्यातच त्यानं गरीब व सर्वसामान्य जनतेसाठीच कार्य केलं होतं. त्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू स्वस्त करुन सुखमय दर्जा दिला होता त्यानं. शिवाय देशात सुधारणाही केल्या होत्या त्यानं. त्यामुळंच तो लोकांना हवाहवासा वाटायचा व तो सतत निवडणुकीत निवडूनही यायचा. परंतु निवडणूका बंद करायचं स्वप्न व तसा प्रयत्न म्हणजे देशाला हुकूमशाहीकडे नेणं होतं. त्याचं कारण होतं, समाजातील सर्वच लोकांचे वेगवेगळे पक्ष स्थापन करणे व मतदाराची दिशाभूल करुन मत मागणे व मतांचं विभाजन करणे. जे आनंदला खपलं नव्हतं आणि त्यानंतर त्याचा त्याच्याच समाजातील आनंदनं खुन केला होता व शिवाय त्याचा हुकूमशाहीकडे नेणारा अध्याय संपवला होता.
त्याला वाटत असे की जर निवडणुका सुरु राहिल्या तर अशीच स्वतःला मालामाल करणारीच नेते मंडळी निवडणुकीत निवडून येतील. जे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाहीत. दुर्लक्ष करतील. ज्यातून परत देशाची अधोगती होईल. पुन्हा जनता बेहाल होईल व नेते मालामाल होतील.
त्याचा तो विचार बरोबरच होता. कारण त्याच्या मृत्यूनंतर देशात तीच परिस्थिती आली होती. जी परिस्थिती तो पदावर बसण्या पुर्वीची होती.

************************************************

जार्ज नाव होतं त्याचं. जार्ज जेव्हा लहान होता, तेव्हा त्याला अतिशय आवड होती राजकारण करण्याची. ते बाळकडू त्याला अगदी त्याच्या बालवयापासूनच मिळालं होतं. त्याचं झालं असं की त्या राष्ट्रात एका निवडणुकीदरम्यानच्या जाहीर सभेत जार्ज आपल्या मात्यापित्यासोबत गेला असतांना त्यानं पाहिलं होतं की एका नेत्याच्या गळ्यात भल्लामोठा हार घातला आहे. ज्यात त्याचा चेहराही दिसत नाही. शिवाय त्या नेत्याच्या आजुबाजूला सैन्यदळ उभं आहे. ते सैन्यदळ त्याची रक्षा करीत आहे. शिवाय सारीच मंडळी त्याचा सन्मान करीत आहेत. हाच तो प्रसंग. दुसरा प्रसंग होता मरणाचा. त्यानं एका नेत्याच्या मरणाच्या वेळेस टिव्हीवर पाहिलं होतं की एक नेता मरण पावलेला आहे व त्याचं शव लोकांना अंतिम दर्शन मिळावं म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या मृत शरीराच्या सन्मानाप्रित्यर्थही कित्येक लोकं त्याच्या मृत शरीरासमोर नतमस्तक होत आहेत. तिरंग्यानंही आपलं अर्ध्यावर येवून मानच टाकली आहे. सैनिक शिस्तबद्ध रितीनं उभे आहेत.
हे दोन प्रसंग त्यानं अगदी लहानपणीच पाहिले होते. मग काय, त्यानं ठरवलं की आपण पुढं जावून नेताच बनावं. ती इच्छा. त्या इच्छेच्या ध्येयधोरणानुसार तो जिथंही नेत्यांची सभा असायची. तिथं जावू ते ऐकू लागला. लोकं टाळ्या वाजवत असत. तेव्हा त्यालाही मजा यायची व तोही टाळ्या वाजवायचा. त्यावेळेस ते नेते भाषण करायचे. ते त्याला आवडायचं व ते भाषण तो लक्षपूर्वक ऐकायचा. तशीच कृती तो घरीही आपल्या आईवडीलांसमोर करायचा. त्यानंतर त्याचे आईवडील खुश व्हायचे. तशीच कलाकृती तो आपल्या काही सवंगड्यासमोरही करायचा. तेही खुश व्हायचे. तेही टाळ्या वाजवायचे आणि त्याला चांगलं म्हणायचे. तसा त्याला फार आनंद व्हायचा व तो विचार करायचा. विचार करायचा की काश! मी नेताच बनलो तर....... असेच लोकं माझ्यासमोर बसलेले असतील. मी बोलणार व लोकं टाळ्या वाजवतील. सैनिक माझ्यासमोर उभे राहतील. सैनिकवर्ग माझ्यासमोर माझ्या आजुबाजूला मला सेवा देण्यासाठी उभा असेल.
जार्ज स्वप्नच पाहायचा आणि त्या स्वप्नात जगायचा शेखचिल्लीसारखा. परंतु तो काही शेखचिल्ली नव्हता. त्याला नेत्याचं पद मिळवायचं होतं आणि देशातील सर्वोच्च पद मिळवायचं होतं. तेही शाश्वत.
जार्ज हळूहळू मोठा होत गेला. तसं त्याचं नाव शाळेत टाकलं गेलं व तो शाळेतही भाषणादरम्यान आपलं नाव हिरीरीनं द्यायचा शाळेच्या कार्यक्रमात. असाच तो शिक्षण शिकता शिकता मोठा होत गेला. मोठे होता होता वक्तृत्व स्पर्धेतही तो भाग घ्यायला लागला होता.
जार्जचं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं. हवं तर तो त्यात आवडीनं भाग घेता घेता त्यात तो प्राविण्यही प्राप्त करु लागला होता. आता त्यानं ठरवलं होतं की आपण निव्वळ असे विचारपीठावर भाषण देण्याऐवजी याचा वापर राजकारणात केला तर......... तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. तसा विचार करताच त्यानं एका पार्टीच प्रवेश करायचे ठरवले. तसा विचार करताच त्यानं त्याचा अभ्यास केला. त्यावेळेस त्याच्या समोर लक्ष होतं. सत्ताधारी पार्टी आणि दुय्यम क्रमांकावरील पार्टी. जिला विरोधी पार्टी म्हणत असत. मग काय, प्रवेश कोणत्या पार्टीत मिळवायचा. सत्ताधारी पार्टीत की जी सत्तेत नाही त्या पार्टीत. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की आपण जी पार्टी सत्तेवर नाही. त्या पार्टीत सहभागी व्हायचं. म्हणजे ती सत्तेवर येताच आपल्याला मान मरातब मिळेल.
जार्जचा तो विचार. परंतु तो निव्वळ एक विचारच होता. महत्वपुर्ण बाब होती की पार्टीत सहभागी कसं व्हायचं. कोणीही सरसकट कोणालाही पार्टीत सहभागी करुन घेणार नाहीतच. तसा तो आज तेरा वर्षाचा झाला होता.
जार्जनं शिवाजी महाराजांवर आधारीत एक पुस्तक वाचली होती त्याच्या बालपणात. त्यात लिहिलं होतं की शिवरायांनी आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी राज्यकारभार सुरु केला. ज्यातून चौदाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. तसा इतिहास बऱ्याच थोर मंडळींचा त्यानं वाचला होता की ज्या मंडळींनी त्यांच्या वयाच्या अवघ्या नऊ दहा वर्षाचे असतांना त्यांनी पराक्रम केला होता. तो विचार करु लागला होता की हे कसं काय शक्य आहे. आजच्या काळात मुलं पंचवीस तीस वर्षाचे होतात, तरी ते मायबापाच्या उरावर बसून खातात आणि ते नऊ, दहा वर्षाचे असतांना रणमैदानावर पराक्रम करीत असत. ही बाब खरोखरच विचार करण्यालायक होती. तसाच विचार करता करता तो तेरा वर्षाचा असतांना त्यानं एखाद्या सत्तेत नसलेल्या पार्टीत प्रवेश करायचा विचार केला. तशी निवडणूक आलीच व त्या निवडणुकीदरम्यान तो एका विरुद्ध पार्टीच्या नेत्याच्या घरी जावू लागला आपल्या दोनचार मित्रांना घेवून.
जार्ज एका नेत्याच्या घरी जावू लागला निवडणुकीदरम्यान. त्यातच त्यावेळेस एका कायदा अस्तित्वात होता की लहान मुलांना राजकारणात प्रवेश देवू नये किंवा त्यांचा वापर राजकारणासाठी करुन घेवू नये.
तो कायदा......... त्या कायद्याचा धाक. परंतु तो कायदा परिपुर्ण पद्धतीनं टाळला जात नव्हता आणि पाळलाही जात नव्हता. अशातच नेत्यांच्या घरी निवडणूक असली की पंधरा दिवसापुर्वीपासून जेवणं सुरु व्हायची. त्या जेवनात ही लहान मुलंही हजेरी लावायची. त्यातच त्या नेत्यांची कामंही करायची. ती कामं म्हणजे पत्रकं वाटणे, बिल्ले वाटणे व निवडणुकीचे साहित्य वितरण करणे. त्या प्रचारसभेत लहान मुलांना बंदी असली तरी ती दिसायचीच आपल्या आईवडीलांसोबत. आईवडीलांना कारणं विचारताच ते म्हणायचे की आमची मुलं लहान असतांना त्यांना कुठं टाकायचं? शेवटी ते खपवून घेतलं जायचं. त्यानंतर निवडणूक पार पडायची.
जार्ज आज सुविचारी बनला होता. कारण त्यानं बालपणात बाबासाहेब अभ्यासला होता. तो बाबासाहेबांना मानत होता. नव्हे तर त्यानं वाचलेल्या पुस्तकात लिहिलं होतं बाबासाहेबांबद्दल बरंच काही. तसं पाहिल्यास त्या पुस्तकात माणूस कसं बनायचं? याचे क्रमशः चिंतन आणि मनन केलं होतं.
जार्जला त्याचे वडील नेहमी सांगायचे की बाबासाहेबांच्या बालपणी कुणीतरी त्यांना अछूत म्हणताच त्यांना ते आवडले नाही व भीमरावचे ते बाबासाहेब बनले. जणू क्रांती केल्यागत. बाबासाहेबांच्या जीवनात अछूत या शब्दानंच क्रांती केली होती.
जार्जनं वाचली होती चौदा एप्रिलची पुस्तक. ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. ही जयंती दरवर्षीच असते. तो त्यांची जयंती मानण्याचा दिवस नसतो तर त्यांचे विचार आठविण्याचा दिवस असतो. याच दिवशी महू इथं भीमाबाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेब हे लहानपणापासूनच क्रांतीकारी विचारांचे होते. म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाबासाहेबांच्याही बाबतीत तसंच झालं. बाबासाहेब जेव्हा लहान होते, तेव्हा ते निरीक्षण करायचे. निरीक्षण करायचे की त्यांच्या समाजाला समाजात निश्चीतच चांगलं वागवलं जात नाही. भेदभाव व विटाळ आहे समाजात. आपलाच समाज, ज्यांचं रक्त, मांस व हाड एकच आहे. तो आपला समाज एकमेकांबद्दल आपसात विटाळ बाळगतो. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. याचं कारण काय असावं? ते त्यांना लहानपणी कळत नव्हतं. त्यातच ते जेव्हा सवर्णांच्या मुलांना खेळतांना पाहात, तेव्हा त्यांचीही इच्छा त्यांच्यासोबत खेळायची असायची. परंतु ते तसं खेळतो म्हणताच सवर्णांची मुलं त्याला म्हणत की तू अछूत आहे.
'अछूत' अछूत शब्द बाबासाहेबांना त्यावेळेस कळत नसे. परंतु ती चीडच वाटायची बाबासाहेबांना. साधारणतः अछूत शब्द ऐकला की बस बाबासाहेबांचं मस्तकच गरम व्हायचं. पायातील आग मस्तकात जायची. असं पदोपदी घडायचं.
जार्जला आठवत होते त्यांचे वडील. त्याच्या वडीलांनी बाबासाहेबांना पाहिलं होतं. त्यांनी सांगीतलेली एक गोष्ट अजुनही आठवत होती त्याला. त्याच्या वडीलांनाही ती गोष्ट कोणीतरी सांगीतली असेलच. एकदा जार्जच्या वडीलांनी सांगीतलं होतं की एकदा बाबासाहेबांना एका मुलानं अछूत म्हटलं. तसं अछूत म्हणताच अछूत म्हणणाऱ्याला बाबासाहेबांनी एक दगडच भिरकावला होता व तो दगड त्याला मस्तकाला लागला होता. बरं झालं की तो वाचला. यावरुन समाजात सवर्ण व अस्पृश्य असा वाद झाला होता. फारच वाद झाला होता बाबासाहेबांच्या लहानपणी. बाबासाहेबांच्या घरी बऱ्याच लोकांची भीड गोळा झाली होती. ते काही बाही बोलत होते. दगडांचाही वर्षाव करीत होते. मात्र त्यावर एका इंग्रज अधिकाऱ्यानं सामंजस्याची भुमिका घेतली व त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या सामंजस्यानं तो वाद संपला होता. त्यावेळेस रामजीनंही सवर्णांची माफीही मागीतली होती. परंतु त्यावेळेस तो दगड त्या मुलाच्या मस्तकाला चांगला लागला असला तरी चूक त्या सवर्ण मुलाची असल्यानं आणि त्यातही माफी प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच वडीलांना मागावी लागल्यानं झालेला अपमान हा बाबासाहेबांना सहन झाला नाही. त्यांना तशीही त्या आधी चीडच यायची अछूत म्हणताच. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या वडीलांचा त्या घटनेनं झालेला अपमान तो सहन न झाल्यानं ती जी चीड बाबासाहेबात निर्माण झाली. त्या चिडीचं रुपांतरण बाबासाहेबांच्या आयुष्याचं परीवर्तन करण्यात झालं. तेच पहिलं पाऊल ठरलं बाबासाहेबांच्या जीवनातील. त्या घटनेच्या वेळेस रामजींनी पहिल्यांदाच बाबासाहेबांना मारलं होतं.
ती घटना...... ती घटना घडलीच असेल, नसेल. परंतु त्या घटनेचा उल्लेख तसा बाबासाहेबांच्या पुस्तकात नाही. परंतु त्या घटनेनं बाबासाहेब घडले. त्यांचं जीवनही फुललं. तसंच जीवन जार्जचंही फुलत गेलं बाबासाहेबांची पुस्तक वाचून.
घटना घडली व रामजींनी बाबासाहेबांना मारलं. परंतु त्यानंतर रामजींना बाबासाहेबांनी प्रश्न केले असतील की चूक बाबासाहेबांची नव्हती. चूक होती ती सवर्ण असलेल्या मुलांची. मग रामजीनं बाबासाहेबांना का मारलं? अन् हा असा विटाळ समाजात का असावा? हा विटाळ कसा दूर करता येईल? असं नक्कीच बाबासाहेबांनी म्हटलं असेल. त्यावर रामजीनं त्यांनाही म्हटलं असेल की, हा विटाळ आहे आणि राहणारच. जेव्हापर्यंत कोणी एखादा हा विटाळ दूर करणारा मसीहा तयार होणार नाही. जर तुला वाटत असेल की हा विटाळ दूर व्हावा तर तो तुलाही दूर करता येईलच. परंतु त्यासाठी तुला शिकावं लागेल. खुप खुप शिकावं लागेल. काहीतरी बनावं लागेल. तेव्हाच समाज तुझं ऐकेल आणि ज्यावेळेस तुझं ऐकेल. तेव्हाच समाजाचं एकत्रीकरण होईल आणि जेव्हा समाजाचं एकत्रीकरण होईल तेव्हाच समाजातील भेदभाव, विटाळ दूर करता येईल.
रामजी तेवढे शिकलेले नव्हतेच त्याही काळात. परंतु शिक्षणाचं महत्व त्यांना समजत असेल आणि नसेलही माहीत, तरीही प्रत्येक मायबाप आपल्या लेकरांकडून तशीच अपेक्षा करतो. तशी अपेक्षा रामजीनंही केली होती. परंतु ते ऐकणाऱ्या बाबासाहेबांनी अगदी लहानपणीच तो प्रसंग व ते रामजीचे बोल मनाला लावून घेतले नव्हे तर मनात घट्ट बसवून घेतले. संकटं होतीच. पैसा नव्हता, प्रवासाची साधनं नव्हती. आईचं प्रेम नव्हतं. बापानं दुसरी पत्नी केली होती. सावत्र आई चांगली जरी असली तरी खंत ती होतीच मनात. तरीही बाबासाहेब डगमगले नाहीत. ते शिकत गेलेत. उच्च उच्च उच्च शिकत गेलेत आणि जेव्हा शिकले. तेव्हा त्यांनी समाजाचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यानंतर त्यांचं काहीजणांनी ऐकलं. काहीजण ऐकत नव्हते. परंतु बाबासाहेबांसमोर ध्यास होता. एक नवा क्रांतीकारी विचार होता. रामजीचा प्रश्न होता. त्यातच रामजीची अपेक्षाही होती. ती अपेक्षा पुर्ण करण्यासाठी ते येथील परिस्थितीशी लढ लढ लढले आणि तो विटाळ दूर झाला. तो तेव्हा दूर झाला, जेव्हा परीवर्तन झालेला हा समाज पाहायला रामजी या जगात नव्हते. जर बाबासाहेब झाले नसते तर....... तर कोणी दुसरा झालाच असता. परंतु त्यानं बाबासाहेबांएवढं महान कार्य केलं नसतं वा करता आलं नसतं.
बाबासाहेब घडले. बाबासाहेब घडले हे केवळ त्या प्रसंगानं नाही, तर त्या प्रसंगानंतर रामजीनं जे प्रश्न केले. त्या प्रश्नानं. तसे प्रश्न उपस्थित करुन रामजीनं बाबासाहेबांच्या मनात समाजातील रुढी, परंपरा, चालीरीती, विटाळ, भेदभाव व अंधश्रद्धेशी लढायला प्रेरणा दिली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी जरी म्हटलं असेल तरी त्याची खरी ओळख बाबासाहेबांना रामजींनीच करुन दिली. रामजींनीच त्यांच्या पुस्तकांची गरज भागवली. त्यानंतर जे बाबासाहेब तयार झाले. ते काही औरच होते. यात एका बापाचा त्याग आणि मेहनत दिसून येते. रामजींनी कोणाकडून काय काय आणून बाबासाहेबांच्या पुस्तकाची हौस भागवली ते वाखाणण्याजोगंच आहे. तसं पाहिल्यास बाबासाहेबांच्या काळातही आणि त्यापुर्वीही रामजीसारखे असे बरेच मायबाप होते आणि बाबासाहेबांसोबत जे प्रसंग घडले. तसे प्रसंग रोजच घडत होते त्यांच्याहीसोबत. परंतु त्यांनी बाबासाहेबांसारखं आपल्या मुलांना घडवलं नाही वा रामजीसारखी कोणी मेहनत घेतली नाही. त्यांनी तसाच होत असलेला अत्याचार अगदी निमुटपणानं सहन केला वर्षानुवर्ष. त्यामुळंच भेदभाव व विटाळ टिकून राहिला बरेच वर्ष. त्यांना तर बाबासाहेबांसारखी मुलंही होती बाबासाहेब घडण्यापुर्वी. परंतु त्यांनी स्वतःला घडवलं नाही वा मेहनत घेतली नाही. म्हणूनच वर्षानुवर्ष समाज भेदभाव व विटाळच मानत राहिला.
आजही तसंच आहे. आजच्या मुलातही काहीसे बाबासाहेबांसारखे गुण आहेत. तसेच आजच्याही काळातील मायबाप हे रामजीसारखेच आहेत. परंतु ते आपला स्वार्थ पाहणारे आहेत. म्हणूनच आजही समाजात जो काही थोडासा भेदभाव व विटाळ उरला आहे. तो तेवत आहे. दूर व्हायचं नावच घेत नाही. शिवाय असं वाटायला लागलं आहे की त्यात वाढ तर होणार नाही ना. आजची मुलं शिकत नाहीत असं नाही. ते आजही शिकतात. परंतु आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी करीत नाहीत. तर आपला स्वार्थ पुर्ण करण्यासाठी करतात. ते मोठमोठ्या पदावर जातात. मोठमोठ्या नोकऱ्या पकडतात. परंतु मायबापाला ओळखत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्यांचे अनन्वीत हाल हाल करतात. ही आजची पिढी. ती कसा समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार, भेदभाव, विटाळ वा अंधश्रद्धा दूर करेल? शिवाय आजचा बापही रामजीसारखा शिकवतो आपल्या लेकरांना. परंतु त्याची अपेक्षाच नसते की त्याच्या लेकरानं बाबासाहेबांसारखं कार्य करावं. त्या मायबापाला वाटतं की त्याच्या मुलानं एक चांगली सरकारी नोकरी तिही जास्त पैशाची मिळवावी. शिवाय त्या लेकरानं मायबापाला विचारलं नाही तरी चालेल, त्यांनी विदेशात जायला हवं. त्यांना वृद्धाश्रमात टाकलं तरी चालेल. परंतु तो आपल्या परिवारासह सुखी असावा जीवनात. हा आजचा आमचा रामजी. आजच्या आमच्या रामजीला व बाबासाहेबांना शिक्षण वाघिणीचं दूध आहे एवढंच माहीत आहे. परंतु ते दूध क्रांती करतं हे माहीत नाही. म्हणूनच आजच्या आमच्या रामजीला व बाबासाहेबांना शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करणं व आपला स्वार्थ साधणं एवढाच माहीत आहे. तशीच सरकारी नोकरी करुन गुलाम राहाणं पसंत आहे. परंतु बाबासाहेबांनी असे गुलाम राहण्याऐवजी सरकारी नोकरीच करणं टाळलं.
बाबासाहेबांनी समाजातील अन्याय, अत्याचार दूर केला नव्हे तर त्यांना करता आला. कारण त्यांना कोणता स्वार्थ नव्हता. रामजींनी बाबासाहेबांना घडवलं समाजबांधणीसाठी. कारण त्यांचा त्यात कोणताच स्वार्थ नव्हता. त्यांनी पुढंही गरीबीत दिवसं काढणे पसंत केले. परंतु सरकारी नोकरी येवूनही ती स्विकारली नाही. कारण त्यांचं मानणं होतं की सरकारी नोकरी करणं म्हणजेच गुलामी करणं. शिक्षण शिकणं याचा अर्थ सरकारी नोकरी मिळवणं नाही तर त्या ज्ञानाचा वापर आपण समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करावा. असे ते नेहमी म्हणत असत.
आज प्रत्येकजण शिक्षण शिकतो. उच्च प्रतीचं शिक्षण शिकतो. त्या भरवशावर सरकारी नोकरी मिळवतो व त्या ज्ञानाचा वापर समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करण्याऐवजी आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतो. याला शिक्षण म्हणता येत नाही.
महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग सरकारी नोकरी मिळविण्यासाठी करु नये तर समाजातील दांभीकता, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी करावा. यालाच खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणता येईल. कोणीही त्या ज्ञानाचा वापर स्वार्थासाठी करु नये. प्रत्येक मुलाने बाबासाहेबांसारखे तंतोतंत कार्य केले नाही तरी चालेल. परंतु थोडेसे तरी कार्य करावे. तसेच प्रत्येक मायबापांनीही आपल्या पाल्यांकडूनही स्वार्थीपणाची अभिलाषा ठेवू नये. जेणेकरुन स्वार्थीपणाच्या अभिलाषेनं आपली मुलं बाबासाहेबांसारखी नाहीत की ती आपलीच मुलं असूनही आपल्यालाच वृद्धाश्रमात टाकतात ही वास्तविक सत्यता आहे. यात शंका नाही.
विशेष सांगायचं झाल्यास आपण काही बाबासाहेब आणि रामजी बनू शकत नाही. परंतु थोडासा प्रयत्न नक्कीच आपण करु शकतो. तेवढा प्रयत्न निश्चितच करावा. शिवाय आपल्यातील ज्ञानाचा उपयोग सरकारी नोकरी मिळविण्यासाठी केला तरी चालेल, परंतु आपल्या मायबापांना विसरु नये. त्यांची सेवा करावी. तशीच थोडीशी का होईना, समाजाचीही सेवा करावी. कारण आपण समाजाचेही काही देणे लागतोच. यासाठीच शिक्षण आहे. जो असा समाजाचा विचार करीत नाही व त्यादृष्टीनं तसा प्रयत्न करीत नाही. तो कितीही शिकला तरी त्याच्या त्या शिकण्याला अजिबात अर्थ नाही. हे तेवढंच खरं. याबाबत किंचीतही शंका नाहीच. शिवाय विशेष बाब ही की आज काही लोकं आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करु लागले आहेत. ते शिकतात आहेत. ते बाबासाहेब व रामजीचीच देण आहे. मात्र आजही काही लोकं शिकूनही अज्ञानागत वागत आहेत नव्हे तर वागतांना दिसत आहेत. ते समाजाचं एकत्रीकरण करणं सोडून आपसातच भांडत आहेत. याला काय म्हणावे ते कळत नाही. हाच बाबासाहेबांनी सांगीतलेला शिक्षणाचा उद्देश असावा काय? नाही. विशेष म्हणजे हा शिक्षणाचा उद्देश होवूच शकत नाही व विचार येतो की बाबासाहेबांनी याच गोष्टीसाठी संकटं झेलली काय? अवकळा शोषल्या काय? अन् रामजींनी यासाठीच त्याग केला काय? हे समाजाला जेव्हा माहीत होईल. तेव्हाच समाजातील प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थानं माणूस बनल्यासारखा वाटेल. तो माणसात आल्यासारखा वाटेल. त्याचबरोबर शिक्षणाचा बाबासाहेबांनी सांगीतलेला अर्थ व उद्देश यशस्वी झाल्यासारखा वाटेल यात शंका नाही.
जार्जला मात्र एक खंत होती. ती खंत होती समाजातील लोकांचीच. कारण त्यानं जरी विटाळ अनुभवला नसला तरी वाचला होताच तो विटाळ. त्याला वाटत होतं की सर्व समुदायानं सुधरावं. एकत्रीत यावं. असं वेगवेगळं निवडणुकीत उभं राहू नये. खासकरुन आंबेडकरी समुदायानं. वेगवेगळं निवडणुकीत उभे राहण्यानंच आपल्याच समाजातील लोकांच्या मताचं विभाजन होतं व आपण निवडून येत नाही. बाकीच्या जातीबिरादरीतील लोकात निवडणुकीत उभे राहण्यासाठी एकीचे बळ आहे. परंतु तो कितीही सांगत असला तरी आंबेडकरी समाज ऐकत नव्हता. तो सारखा तुकड्यातच उभा राहात होता. ज्यानं त्यांच्याच समाजातील मतांचं विभाजन होत होतं आणि कोणीच निवडणुकीत निवडून येत नव्हता. तसं पाहिल्यास जार्जला त्याच गोष्टीचा राग येत असे व वाटत असे की आपण या समाजाचं एकत्रीकरण घडवून आणू. जेव्हा राजनेते बनू. तसं पाहिल्यास ते स्वप्न तो राजच पाहात होता आणि राजनेता बनण्याच्या दिशेनं आपली पावलेही टाकायला लागला होता.
जार्ज आज चौदा वर्षाचा झाला होता. त्यावेळेसही निवडणूक आली होती व निवडणूकीदरम्यान जार्जनं आपल्याच गावातील एका नेत्याच्या घरी त्याचे छापून आलेले प्रचारसाहित्य वितरीत केले होते. शिवाय त्या निवडणूकीदरम्यान त्याला त्याच नेत्याच्या गाडीत फिरायलाही मिळाले होते आणि खायला प्यायलाही. या निवडणुकीदरम्यान त्याची मजाच मजा झाली होती.
त्या नेत्याची ती निवडणूक. ती निवडणूक पार पडताच तो नेता ती निवडणूक हारला होता. परंतु जार्जनं त्याची संगत सोडली नव्हती. अशातच तो अठरा वर्षाचा झाला व आता तो खुल्ल्या मनानं प्रचार करु लागला होता.
आज जार्जला एकोणविसावं वर्ष लागलं होतं. त्यावेळेसही निवडणूक आली व निवडणूकीदरम्यानचा तसा एकदाचा प्रसंग. त्यानं विचारपीठावर भाषणही दिलं होतं. ते भाषण त्या नेत्याला नाही तर लोकांना पसंतही पडलं होतं. त्या नेत्याची जार्जच्या भाषणानंतर वाहवाही झाली होती. तसंच या निवडणूकीदरम्यान तो गावातील नेता निवडूनही आला होता.
नेता निवडणूकीदरम्यान निवडणूक लढवून निवडून आला होता. परंतु देशात त्याची पार्टी पडली होती. तो निवडून आला होता निवडणुकीत. मग काय, साहजीकच त्याचं महत्वही वाढलं. त्याचबरोबर जार्जचंही महत्व वाढले होतं.
तो गावातील नेता. तो नेता विरुद्ध पार्टीचा नेता होता. परंतु त्या नेत्याच्या निवडून येण्यानं त्याचं वाढलेलं महत्व पुढं जार्जचं महत्व वाढवून गेलं. जेव्हा गावात निवडणूक झाली.
गावात निवडणूक होवू घातली होती. तिकीटाचे दावेदार भरपूर होते. परंतु जार्ज हा सतत संपर्कात असलेला व्यक्ती. सर्कलमध्ये जार्जचाच नेता निवडून आला होता गतवर्षी. परंतु यावर्षी गावात निवडणूक होणार होती. तिकीट कोणाला द्यायची? प्रश्न होता. तसं पाहिल्यास त्या गावात पुर्वी त्या नेत्याची सत्ता नव्हतीच की जो सर्कलमध्ये निवडणूकीदरम्यान निवडणूकीत निवडून आला होता. तसं पाहता जार्ज त्या नेत्याच्या संपर्कात असल्यानं त्याला तिकीट देणं भाग असल्याचं नेत्याच्या लक्षात आलं व त्यालाच तिकीट मिळाली व तो निवडणूकीत निवडूनही आला. त्यासाठी त्यानं आपल्यात असलेल्या वक्तृत्व कौशल्याचा वापर केला होता.
जार्ज निवडणुकीत निवडून येताच त्यानं गावातील विकासाची भरपूर कामं केली. कारण त्याला माहीत होतं की गावातील कामं केली गेली नाहीत, तर पुढं आपल्याला संधी नाही अन् वाढायचं असेल तर गावची कामं करणं भाग आहे. तसा तो गावातील कामांना जास्त प्राधान्य देवू लागला.
जार्ज पुर्वी गरीब होता. त्याचं तणाचंच झोपडं होतं. पुर्वी त्या जागेवर महाल होता. परंतु भाऊ मरण पावताच कुटूंबावर अवकळा आली व घर विकून लहानशी झोपडी बांधावी लागली. आता पैसे येत होते व तो आपलं घरही बांधू शकत होता. परंतु त्यानं आपलं घर बांधले नाही तर गावचाच विकास करीत राहिला. त्याचा परिणाम हा झाला की आता गावातील लोकं विचार करु लागले, जार्ज एकही रुपया खात नसावा व जोही पैसा येत असेल, त्या पैशाचा वापर तो विकासासाठीच वापरत असावा. तसं पाहता त्याची किर्ती वाढायला लागली होती व तो हळूहळू करीत आता आमदारकीपर्यंत मजल मारू शकला होता.
जार्जच्या मनात ध्येय होतं. ते ध्येय होतं राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जायचं. त्याचा तो विचारही करीत होता. अशातच तो आज उच्चतम नेत्यांच्या रांगेत बसायला लागला होता. तसं एक दिवस हिटलरचे पुस्तक त्याच्या हातात पडलं. लिहिलं होतं की हिटलरला सर्व सुख भोगता आलं, ते त्याच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळं. परंतु ते त्यानं साध्य कसं केलं. जार्ज विचार करीत होता. तशी त्याच पुस्तकातील एक कथनी त्याच्या वाचण्यात आली होती. ती म्हणजे हिटलरची एक कोंबडी. हिटलरजवळ एक कोंबडी होती. तिचे त्यानं पंख उपटून टाकले होते. त्यानंतर तो तिला दाणे टाकत होता व बोध देत होता की मी जनतेचंही तसंच करील. आधी त्यांच्या अधिकारावर बंदी घालणार. मग त्यांना लाचार बनवणार. परंतु ते काही लोकांच्या लक्षात आलं नाही व लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवला.
जार्जनं जशी हिटलरची पुस्तक वाचली. तसा हिटलर त्याचा आदर्श बनला. त्याला वाटायला लागलं की आपणही हिटलरसारखंच बनावं. जसा हिटलर एका राज्यकर्त्यापर्यंत मजल मारतांना जनतेचा विश्वास जिंकत जिंकत गेला. तसंच आपणही जायचं. मग आपल्यातील वृत्ती दाखवली तरी चालेल.
जार्ज हा सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनाप्रमाणे वागत होता. ज्यात धनीकही होतेच. ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होत्या. तरीही तो करीतच होता. त्याला देशातील संपुर्ण निवडणूकाच बंद करायच्या होत्या. परंतु त्या काळापर्यंत व स्थितीपर्यंत जायला त्याला वेळ होता.
जार्ज गावात नेहमी निवडणूक लढायचा. त्यानंतर त्याला माहीत झालं की आपण नेहमी गावात निवडून येवू शकतो. त्यानंतर त्यानं विचार केला की आपण गावातील निवडणूक लढवायच्या. त्यातही त्याला यश येत गेलं व आता तो तालुक्याच्या निवडणूका लढवून आपले उमेदवार निवडून आणू लागला होता. याच दरम्यान त्याचा विवाह पार पडला.
जार्ज निवडणुकीत वा राजकारणात यशस्वी होत होता. परंतु तो संसारात काही यशस्वी ठरला नाही. तस पाहिल्यास त्याच्या संसारात नेहमीच खटके उडत. कारण तो सतत राजकारणाच्या निमित्यानं बाहेर बाहेरच असायचा. पत्नीलाही पुरेसा वेळ द्यायचा नाही. त्यामुळंच खटके.
**********************************************************

आज आपण पाहतो की पती पत्नीची फारच भांडणं वाढलेली आहेत. नवऱ्याला त्याच्या पत्नीचं पटत नाही व पत्नीला तिच्या पतीचं पटत नाही. मग वाद उत्पन्न होतात. त्यानंतर वाद एवढा मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो की ते वाद चव्हाट्यावर येतात. पुढं न्यायालयात जातात. त्यानंतर ते वाद न्यायालयात गेल्यावर त्यात आरोपाच्या फैरी झडत असतात. भांडणारी मंडळी एकमेकांवर असे गंभीर आरोप लावत असतात की त्यानंतर तसे आरोप न्यायालयात ऐकणंही होत नाही.
पती पत्नीतील वाद उत्पन्न होण्यामागील महत्वपुर्ण कारण म्हणजे स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याची भावना. पत्नीला वाटत असते की तिच्या सासरची सर्व मंडळी माझ्याच इशाऱ्यावर चालायला हवी. त्यात तिचा पतीच नाही तर तिच्या सासरकडील सासू सासरे, ननंद, दीर या सर्व मंडळींचा समावेश होतो. ते जर तिच्या मतानुसार वागत असतील तर तिच्यासाठी सासरकडील मंडळी चांगले असतात, अन्यथा नाही. त्यापैकी एखादं जर वाकड्यात चालत असेल तर तिला ते खपत नाही. मग ती आपल्या पतीकडे त्याबाबत तकादा लावते. यात जर तिचा पती तिचं ऐकत नसेल तर तिच्यात साऱ्या देव्या संचारतात. त्यातच पतीसह इतरांवर खोट्या स्वरुपाच्या आरोपाच्या फैरी झडत असतात. ज्यातून अंशी वर्षाच्या पलिकडील म्हणजेच ज्यांचे वय नव्वदच्याही वर आहे. ज्याला नीट बसताही येत नाही. अशीही मंडळी तिच्या कहरातून सुटत नाहीत. एवढा तिचा प्रकोप होतो. सर्वांवर आरोप लागतात व ती सर्व मंडळी न्यायालयात कटघऱ्यात उभी ठाकतात. खटला बनतो व हा खटला दिर्घकाळ चालत असतो. तो एवढे दिवस चालत असतो की उभी हयात निघून जाते. ती गंधर्व विवाह करुन मोकळीही होते. कारण तिचं विवाहानंतर आडनाव चालत नाही. फक्त पतीचंच नाव चालतं. त्यामुळंच ती सुरक्षीत असते. शिवाय दिर्घकालीन खटला जरी चालला, तरी न्याय ती महिला असल्यानं शंभर प्रतिशत तिच्याच बाजूनं लागतो आणि ती कमावत जरी असली तरी तिचा खाजगी जाब असल्यानं ती कमवत नाही. असा ठपका ठेवून तिच्या पतीकडून जबरन एक निश्चित रक्कम वसूल केली जाते. जिला खावटी म्हणतात. ही झाली एक बाजू. या बाजूनुसार पुरुष असलेल्या पतीकडील सर्वच मंडळी न्यायालयात जात असतात. जरी त्यांचा गुन्हा नसला तरीही.
दुसरी बाजू अशी आहे की पतीपत्नी म्हणून विवाहीत झालेली मंडळी ते विवाहीत झाले की पतीला वाटते, तिनं माझंच शंभर प्रतिशत ऐकायचं. परंतु आज मात्र तसं शक्य नाही. आज मात्र पतीच्या बरोबरीनं मुलगीही शिकत असते ती मानाच्या जागा पटकावीत असते. असं असतांना ती त्या पतीच्या म्हणण्यानुसार कसं वागेल? मग भांडणं होतात. ज्यातून त्यानं जे म्हटलं नाही. तेही त्याची पत्नी म्हणते. तिनं जेही म्हटलं नाही. ते सगळं तिचा पती म्हणतो. मग वादाला तोंड फुटतं व ज्यातून एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतात. त्याची परियंती ताटातूट, घटस्फोट आणि इतर बर्‍याच गोष्टीत.
विशेष सांगायचं झाल्यास पती पत्नीचा वाद. त्या वादाची इतर कोणतीही कारणं असली तरी स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना हेही एक महत्वपूर्ण कारण आहे. ज्या कारणावरून थोरांनाही त्रासच होत असतो. चूक कोणाची असते ही शेवटपर्यंत कळत नाही. परंतु एखाद्या शुल्लक कारणावरून वाद वाढत जातो. त्याची परियंती म्हणजे संसार तुटतो. तिचा आणि त्याचाही.
मुख्य म्हणजे पती पत्नींनी एकमेकांवर आगपाखड न करण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे व तीच जमेची बाजूही आहे. परंतु आजच्या काळात कोणीही तसा प्रयत्न करीत नाहीत व कोणीही एकमेकांना समजून घेत नाही. घटस्फोटाचे जर प्रमाण टक्केवारीत काढले तर असे दिसून येईल की यात सुशिक्षित वर्गाचेच प्रमाण जास्त आहे. ज्यातून तशा स्वरुपाचा घटस्फोट सहन न झाल्यानं वा पत्नीला पतीचा व पतीला पत्नीचा वाद सहन न झाल्यानं आत्महत्याच घडत असतात. यात नुकसान पतीचं वा पत्नीचं होत नाही. नुकसान होतं ते त्यांच्या पोटी जन्मास आलेल्या अपत्याचं. त्यांच्यापैकी कोणाला कधी बाप मिळतो तर कधी कोणाला त्यापैकी आई. एकाच्या निधनानंतर वाचलेला व्यक्ती आपला दुसरा विवाह उरकवून टाकते. मग मुलांना आई बापाचं प्रेम मिळत नाही व ती मुलं गुन्हेगारी जगताकडेही वळत असतात. शिवाय याच घटनांतून ज्या वयोवृद्धांचा दोष नसतो. त्यांनाही यातना भोगाव्या लागतात. हेही तेवढंच खरं आहे.
जार्जच्या पत्नीचं नाव सुप्रिया होतं. सुप्रिया ही काही चांगल्या स्वभावाची नव्हतीच. तिला वाटत होतं की तिला त्यानं सर्वश्रेष्ठ मानावं. तिच्या मतामतानं ऐकावं त्यानं. हवं तर तिचं गुलामच राहावं त्यानं. ती नेहमीच मनाई करायची त्याला की त्यानं घरीच राहावं. राजकारण थोतांड असून ते आपलं काम नाही. ते सोडावं. परंतु तो ऐकायचा नाही. कारण त्याचेवर राजकारणाचं भूतच स्वार झालेलं होतं. मग तो तरी कसा ऐकणार? शेवटी तो ऐकत नव्हता व तिला वाटत होतं की तो काही आपला गुलाम बनू शकत नाही. इथं सारं आपल्यालाच करावं लागेल.
सुप्रिया तसं पाहिल्यास बरीच सुखी होती. सुख तिच्या पायाशी लोळण घालत होतं. तसं पाहिल्यास तिच्या सेवेला आज नोकर चाकर होते. घर जरी लहान असलं तरी नोकर मंडळी कामं करायला होतीच. परंतु जिथं अतीव प्रमाणात सुख असते ना. तिथं दुःखच असल्यासारखं वाटतं. तसंच तिच्या घरी घडत होतं. तिचा पती जार्ज तिच्या जवळ नसल्यानं तिला फार दुःख वाटत होतं. तसं तिनं ठरवलं. आपला पती आपलं न ऐकता आपल्याजवळ राहात नाही ना. मग घटस्फोट घ्यायचा.
सुप्रियानं घटस्फोट घ्यायचा ठरवताच ती त्याला सोडून गेली. त्यातच तिनं त्याला त्रास देणं सुरु केलं. परंतु तोही काही कच्च्या गुरुचा शिष्य नव्हता की तिच्यासमोर हार मानेल. तो तर पक्का राजकारणीच होता. राजकारणातही आणि घरातही. तो लढत होता तिच्याशी कायद्यानुसारच. शेवटी तो जिंकला व तो खटला कायमचा मिटला. त्यानंतर सुप्रिया त्याच्या जीवनात कधीच आली नाही. तिनं दुसरा विवाह केला व त्यालाही सुप्रियाची आठवण येत नसे. कारण त्याच्याकडे तो राजकारणात असल्यानं तेवढा विचार करायला वेळच नव्हता.
राजकारणात वापरले जाणारे डावपेच. त्याच डावपेचाच्या जोरावर तो राजकारणात यशस्वी झाला व राष्ट्राध्यक्ष बनला. राष्ट्राध्यक्ष बनत असतांना जरी देश जातविरहीत व धर्मनिरपेक्ष असला तरी त्यानं राजकारणात जात आणि धर्म आणला व त्याच जातीवरुन व धर्मावरुन राजकारण खेळून तो राजकारणात पुढं आला. त्यानं राष्ट्राध्यक्ष बनण्यापुर्वी लोकांना मोठमोठी आश्वासनंच दिली. अशातीलच एक आश्वासन होतं बेरोजगारी दूर करणे. परंतु जसा तो सत्तेवर आला. तसं त्यानं सांगीतलं की तो बेरोजगारी दूर करु शकत नाही वा कुणालाच सरकारी रोजगार देवू शकत नाही. कारण त्याला कोणत्याही शिकलेल्या तरुणांना गुलाम बनवायचे नाही व शिकलेल्या तरुणांना मान हालवत हो म्हणायची सवय लावायची नाही. हवं तर त्या शिकलेल्या तरुणांनी आपल्या आपल्या अंगातील कुवतीनुसार उच्च शिक्षण शिकावं व आपल्या अंगातील उच्च शिक्षणानुसार त्यांनी उद्योग लावावे. त्यासाठी त्यांनी भांडवल म्हणून सरकारकडून कर्ज घेतलं तरी चालेल. त्या कर्जात पन्नास प्रतिशत अनुदानही देण्यात येईल. त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करुन उद्योग तर उभारावाच. व्यतिरीक्त लोकांना रोजगारही द्यावा. परंतु लोकं म्हणत होते त्याच्या सरकारला की त्यानं निवडून येण्यापुर्वी बेरोजगारी दूर करण्याचं आश्वासनंच का दिलं? जर बेरोजगारी दूर करता येत नव्हती तर........ उद्योगधंदे तर कोणीही करु शकते. जो शिकत नाही, तोही चांगल्या प्रकारे उद्योग करु शकतो. मग उच्चशिक्षणाचा काय उपयोग? परंतु लोकांचं म्हणणं जरी खरं असलं तरी त्याचं म्हणणं हे काही लोकांना निश्चितच पटत होतं. कारण सरकार कर्जही देत होते आणि सरकारी अनुदानही देत होते आणि त्यातच सांगत होते की देशातील शिकलेल्या तरुणांनी आपल्या शिक्षणाच्या भरवशावर सरकारचाच पैसा वापरुन मोठमोठे उद्योग उभारावेत. जेणेकरुन त्या उद्योगातून देशाचा विकास होईल. त्या होतकरु शिकलेल्या तरुणांनी देशात उद्योग निर्माण करावा, यासाठी सरकार तरुण शिकलेल्या लोकांना सरकारी नोकरीत समाविष्ट करीत नव्हतं. सरकारचा उद्देश होता की सरकार तरी कुठं कुठं लक्ष देणार. शिवाय देश चालवत असतांना देशासमोर अनेक अडचणी आहेत. शिवाय देशात काही कमी शिकलेले लोकंही आहेत की ज्यांच्या पोटाचे हालहाल होत आहेत. अशाच लोकांसाठी उच्च शिकलेल्या तरुणांनी रोजगार निर्माण करण्याचा दृष्टिकोन वापरावा असं सरकारचं म्हणणं होतं व ते म्हणणं सत्य होतं.
लोकं बेरोजगार बेरोजगार म्हणून चिडवत होते देशातील शिकलेल्या तरुणांना. कारण ते उच्च शिक्षण शिकलेले तरुण काहीच करीत नव्हते. आपल्यातील गुणांचा विपर्यास करीत होते. तसंच आम्ही बेरोजगार नाही व आम्हाला बेरोजगार म्हणून चिडवू नका. आम्ही रोजगार देवू शकतो. असंही म्हणत नव्हते.
बेरोजगार म्हणून आम्हाला कोणीही चिडवू नये. कारण आम्ही उच्चशिक्षित असलो तरी बेरोजगार नाही. आमच्यात कौशल्य आहे. त्या कौशल्यानुसार आम्ही जगही पादाक्रांत करु शकतो, नव्हे तर इतरांना रोजगारही देवू शकतो. असं उच्चशिक्षित असलेल्या तरुणांनी म्हणावं असं जार्जला वाटत होतं. प्रसंगी त्यासाठी कर्जावू पैसा वापरावा असंही जार्जला वाटत होतं. जार्ज तसा विचार करीत होता. तो विचार होता दरवर्षीच सण उत्सव येणं व ते साजरे होणं आणि त्याअनुषंगाने लोकांचे अभ्यास करणे सोडून अंधश्रद्धेला बळी जाणं.
दरवर्षीच सण उत्सव येत असतात. जात असतात. आपण ते उत्तमपद्धतीनं साजरे करीत असतो. त्या सण उत्सवात सगळेच सहभागी होत असतात. कारण त्यात धार्मिकता आहे आणि तसं सहभागी होणंही तेवढंच गरजेचं आहे.
आज धार्मिकता आहे व लोकं धार्मिकतेवर जास्त विश्वास करतात. कारण तो श्रद्धेचा प्रश्न आहे. याच श्रद्धेच्या अनुषंगानं लोकं धार्मीकतेवर विश्वास करीत असतात. मग जो व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय धार्मीकतेवर कोणत्याही स्वरुपाचं मार्गदर्शन करतो. ते लोकांना पटतं आणि त्यावर राजही करता येतं. उदाहरण द्यायचं झाल्यास औरंगजेब बादशाहाचं उदाहरण देवू. तो कट्टरपंथी होता व त्याला इस्लाम धर्म प्रिय होता. तो दररोज न चुकता नमाज पठण करायला जायचा. हेच हेरलं होतं त्याच्या धर्मातील लोकांनी. त्यामुळंच त्यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले व त्यांना मदत केली आणि सढळमनानं त्यांच्या क्लुप्त्यांना माफही केलं.
धार्मिकता? धार्मिकता आमच्या मनामनात भरलेली आहे आणि ती भरलेलीच असावी. ओसंडून वाहात जावू देवू नये म्हणजे झाले. याबाबतीत सांगायचं झाल्यास धार्मिकतेच्या नावावरुन अंधश्रद्धा पसरवू नये वा अंधश्रद्धेचे बळी जावू नये. आता लोकं म्हणतील की धार्मिकता आणि अंधश्रद्धेचा दूरदूरचा संबंध नाही. मग विचारप्रवर्तक असे का बोलत असावेत? विचारप्रवर्तक यासाठी बोलतात की ते सखोल निरीक्षण करतात परीसरातील घटनांचं. मग त्यात धार्मिक बाबी का असेना. परिसरातील या विचारप्रवर्तकांच्या नजरेतून देवाला नवश म्हणून कोंबडं बकरं कापणं पापच आहे. परंतु ते कापलं जातं. विचारप्रवर्तकाच्या मते नवजात बाळ देवाला गुप्त धनासाठी नवश बळी देण्यानं गुप्तधन मिळत नसतं. ही अंधश्रद्धाच आहे आणि तीच अंधश्रद्धा धार्मिक बाबीतून पसरवली जाते. कोणी तर अशी धार्मिकता पसरवतात की ज्यातून मुलं शिक्षण शिकत नाहीत. ते धार्मिक बाबीच करीत असतात. जसं परीक्षेच्या काळात अभ्यासासाठी वेळ अमुल्य असतांना मुलं देवधर्म पुजत बसतात. शिक्षण शिकून मोठं तंत्रज्ञानी बनण्याऐवजी शिक्षण सोडून धार्मिक स्थळी हार फुलं विकत असतांना दिसतात काही मुलं तेही शिकण्याच्या वयात. तेव्हा प्रश्न पडतो की उद्याची उज्ज्वल भविष्य असलेली हीच मुलं आज आपलं शिक्षण सोडून हार फुलं का विकत असावीत? कारण त्यात उद्याचा थॉमस एडीसन लपलेला असतो. गॅलिलिओ लपलेला असतो आणि इतर बरेच थोर पुरुष दडलेले असतात. ज्या उद्याच्या थोर पुरुषांच्या विचारांची आजच धार्मिकतेच्या नावावर कत्तल होत असते.
धार्मिकता जोपासावी. परंतु त्यातही प्रतिशतपणा असावा. शिवाय त्यातही वेळ काळ असावा. शिक्षण सोडून उठून सुटून धार्मिकतेचा बडवा आणू नये. मग तो कोणताच धर्म का असेना. शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे. परंतु त्या शिक्षणाचा अर्थ गुलाम म्हणून घेवू नये.
काही लोकं धार्मिकतेवर लक्ष देत नाहीत. ते उच्च शिक्षण शिकतात. त्यानंतर उच्च शिक्षण शिकले की सरकारला रोजगार मागत फिरतात. त्यासाठी आंदोलन करतात. काही लोकं म्हणतात की रोजगार सरकारनं द्यावा आणि त्यातच काही लोकांचं म्हणणं असं की सरकार रोजगार देवू शकत नाही. ते म्हणतं की आम्ही लोकांना रोजगार देवू शकत नाही. शिक्षण शिकले ना, मग लोकांनी आत्मनिर्भर व्हावं. त्या आत्मनिर्भरतेसाठी सरकार कर्जही देत असतं. यात सरकारचं चुकतं. असंच लोकांचं प्रतिपादन. परंतु यात सरकारचं काय चूकत असेल. तरीही आपण सरकारला दोष देतो व सरकारनं रोजगार नाही दिला म्हणून ओरड करीत बसतो. कारण आपणाला बुगड्याच वापरायची सवय लागलेली आहे. लहानपणापासून तर युवा होईपर्यंत मायबापाच्या बुगड्या वापरतो आपण आणि पुढं तरुण झाल्यावर सरकारी कारकून होवून सरकारच्या बुगड्या वापरतो आपण सरकारी नोकऱ्यांची मागणी करुन. मग सरकारी नोकर बनलं की सरकारचे गुलाम म्हणून वागणे पसंत करतो. त्यानंतर सरकार म्हणतं हे करा, ते करा, अमूक करा, ढमूक करा. तेव्हा ते काहीही म्हणो, आपल्याला पटत नसेल, तरीही ते करावंच लागतं निमुटपणानं. यातही काही ओरडतात. त्यांच्यावर सरकारी कामात ढवळाढवळ केली म्हणून निलंबनाची कारवाई होते. मग ज्याचं निलंबन होतं, तोही ओरडतो की आपल्यावर अन्याय झाला. परंतु हा अन्याय नसतो. कारण सरकारच्या कायद्यात जी कृती बसत नाही. मग ती कृती सरकारचं गुलामागत वेतन खाणाऱ्या व्यक्तीमत्वानं का करावी? म्हणूनच सरकार म्हणतं आत्मनिर्भर व्हा. म्हणजे सरकारही सरकारी कायद्यानुसार कर्मचारी काहीही चुकला असेल तरी त्यांचेवर कारवाई करणार नाही. असंच सरकारचं मत.
आत्मनिर्भर? आत्मनिर्भर याचा अर्थ लोकांनी काढला तो म्हणजे एखादा उद्योग लावणे. त्यातही उद्योगाचे प्रकार पाडले आणि लोकांनी विचार केला की उद्योग तर कोणीही लावू शकतो. जो शिकलेला राहात नाही, तोही उद्योग लावू शकतो आणि आत्मनिर्भर होवू शकतो. मग एवढं शिकायची काय गरज आहे? यावर सरकार म्हणतं की शिकणाऱ्यांनी आपलं शिक्षण ओळखा. शिक्षणाची प्रत ओळखा. तुम्ही जर इंजीनिअर झाले आणि रस्त्यावर गोलगप्प्याचा ठेला घेवून गोलगप्पे विकत असाल तर तुमच्या इंजीनिअरच्या शिक्षणाचा अर्थ काय? एखाद्यानं डॉक्टरकीचं शिक्षण केलं आणि त्यानं जर रिक्षा चालवला तर त्याच्या डॉक्टरकीच्या शिक्षणाचा अर्थच काय? मग कशाला त्यानं डॉक्टरकीचं शिक्षण शिकावं? असं सरकारचं म्हणणं. सरकारचं यात बरोबरच आहे. एखाद्या इंजीनिअर वा डॉक्टरनं रिक्षा चालविणं हे त्याच्या शिक्षणाच्या पेशाला शोभत नाही. मग त्यानं काय करावं? पोट भरण्यासाठी दवाखाना चालणं गरजेचं आहे ना. शिवाय दवाखाने भरपूर आहेत. प्रत्येकच जण दवाखाने रांगेने टाकतो. कारण चालत नाहीत तर काय करावे? असं लोकांचं म्हणणं. तसाच प्रत्येकजणच डॉक्टरकीचा अभ्यासक्रम शिकलेला असतो. याच गोष्टीसाठी हवे असते ते कौशल्य. त्यालाच चांगलं शिक्षण वा उपयोगी शिक्षण असं म्हणता येईल. आपण आपल्यात असलेल्या गुणांचा वापर कसा करु शकतो किंवा आपण, आपण घेत असलेल्या शिक्षणाचा वापर कसा करुन घेतो यावर अवलंबून असते, आपल्या शिक्षणाचा दर्जा. तो दर्जा दाखविण्यासाठी आपल्याला हवा असतो आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आपल्याजवळ नसल्यानं आपल्याला शिक्षणाचं महत्व वाटत नाही. शिक्षण उच्चकोटीचं शिक्षण शिकूनही त्याचा उपयोग वाटत नाही. स्वतःला बेरोजगार असल्यासारखं वाटतं. शिक्षणाची व बेरोजगारीची मग चीड येते. यावर कोणी काही एखादा शब्द जरी बोलला तरी त्याची भयंकर चीड येते. मग संयम तुटतो व त्याची परियंती ही आत्महत्या वा एखाद्या आत्मघातात होते. कधीकधी त्यातून खुनही होतो व त्यानंतर गुन्हेगारी पाश्वभुमीकडे आपला तोल जावून संपुर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ होतो.
सरकार आपल्याला नेहमी सांगत असतं की आत्मनिर्भर व्हा. परंतु आपल्याला त्या गोष्टीचा अर्थ कळतच नाही. सरकार हे सांगत नाही की अमूक अमूक व्यवसाय करा. सरकार सांगत असतं की आपण उच्चशिक्षण घेतल्यावर त्या त्या शिक्षणानुसार व्यवसाय करा व स्वतः तर आत्मनिर्भर व्हा. शिवाय आपल्यासह लोकांनाही रोजगार द्या. जेणेकरुन देशातील तरुणांना रोजगार देता येईल.
महत्वपुर्ण बाब ही की शिक्षण घेतल्यावर रोजगाराभिमुख जर काम केलं जात नसेल, कोणी करीत नसेल वा करायला धजत नसेलच वा हिंमत करीत नसेल तर तसं शिक्षण शिकून काय फायदा? अशांनी शिक्षण शिकूच नये व आपल्या आईवडीलांचा पैसाही खर्च करु नये म्हणजे झालं. जेणेकरुन त्यातून कोणीही होतकरु तरुण शिकल्यानंतर बेरोजगार ठरणार नाही आणि बेरोजगार ठरुन सरकारला दोष देणार नाही. शिवाय प्रत्येकांनी प्रतिज्ञा घ्यावी की बेरोजगार म्हणून आता आम्हाला कोणीही चिडवू नये. कारण आम्ही उच्चशिक्षित असलो तरी बेरोजगार नाही. आमच्यात कौशल्य आहे. त्या कौशल्यानुसार आम्ही जगही पादाक्रांत करु शकतो, नव्हे तर इतरांना रोजगारही देवू शकतो यात शंका नाहीच.
जार्जचं म्हणणं रास्त होतं. परंतु ते म्हणणं जरी रास्त असलं तरी लोकं शिकत होते. परंतु कोणताच रोजगार लावत नव्हते. म्हणूनच की काय, जार्जच्या सरकारला शेवटी स्वतःच उद्योगाची निर्मीती करावी लागली व बेरोजगारांचे प्रश्नही सोडवावेच लागले.

जार्ज विचार करायचा की देशात एक किंवा दोनच पक्ष असावेत. कारण देशात निवडणुकी दरम्यान एवढे लोकं उभे राहात होते की जे निवडूनही येत नव्हते. त्यांची निवडून यायची क्षमताच नसायची. परंतु आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणूनच लोकं विनाकारण निवडणुकीला उभे राहायचे व देशातील जनतेचा कर रुपातील गोळा होणारा पैसा खर्च करायचे. हेच आवडत नव्हतं जार्जला देशात. त्याला वाटत होतं की देशात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार देशात अनेक पक्ष आहेत व ते निवडणुकीला उभे राहतात. त्यांनी तसं उभं राहण्यापेक्षा मुख्य राजकीय पक्षांना समर्थन द्यावं. उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नेत्यानं आपल्या लेकरासाठी गडगंज संपत्ती गोळा करु नये. ती मुक्तहस्ते लोकांसाठी खर्च करावी. कारण मरणानंतर कोणीही ती वर नेत नाही. जनतेनंही मुक्तपणानं मतदान करावं. कारण मतदान हे सर्व दानापेक्षा अनमोल अशीच वस्तू आहे ते जनतेनं लक्षात घ्यायला हवं म्हणजे झालं.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. ह्या देशात अनेक धर्म व पंथ आहेत. तशाच जाती आहेत. त्याचबरोबर विविध विचारांचे लोकंही आहेत. ते वेगवेगळा विचार करतात आणि वेगवेगळा विचार करायला भाग पडतात. त्याचं कारण आहे भारतात असलेलं स्वातंत्र्य. इथं कलम एकोणवीस ते बावीस अंतर्गत वेगवेगळ्या स्वरुपाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथं बोलता येतं. मुक्त विहार करता येतं आणि त्यातच कोणालाही निवडणुकीत उभंही राहता येत असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास देशात कुणीही उभा राहतो. जो निवडूनच येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं ही प्रवृत्ती. तसं पाहिल्यास त्या व्यक्तीनं निवडणुकीत उभे राहण्याऐवजी देशातील निवडणुकीत उभे असलेल्या दोन किंवा तीन राजकीय पक्षास समर्थन जाहीर केल्यास काय हरकत होईल? यातून देशातीलच जनतेचा पैसा वाचेल व तो देशातीलच विकासाच्या कामात येवू शकेल. याबाबतीतील विचार कोणीच करीत नाहीत. उलट निवडणुकीत बहुसंख्य प्रमाणात उभं राहून लोकांचाच कररुपात गोळा झालेला पैसा खर्च करीत असतात आणि जनता जनार्दनावर निवडणूक संदर्भात कामाचा ताण निर्माण करीत असतात.
देशाबाबत सांगायचं झाल्यास देशात जाती जशा जास्त आहेत. तसेच धर्म व पंथ. तसेच वेगवेगळ्या विचारांचे राजकीय पक्षही आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या विचारानुसार अनेक स्वरुपाचे राजकीय पक्षही आहेत. काही पक्षांच्या विचारात तर तारतम्यच जुळत नाहीत. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार कितीतरी लोकं आज निवडणुकीत उभे राहात असतात. काही लोकं असेही उभे राहात असतात की त्यांना पक्कं माहीत असतं की ते निवडणुकीत निवडूनच येत नाहीत. तरीही ते निवडणुकीत उभे राहतात. त्याचं कारणही त्यांनाच माहीत असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास निवडणुकीत कुणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणसानंच निवडणुकीत उभे राहावे की जे पक्ष यापुर्वीही निवडून आले नाही वा येणार नाही. तरीही आपापलं नशीब प्रत्येकजण आजमावत असतात. कारण असतं, एकदा का निवडून आलं की पेन्शन सुरु होणं वा भ्रष्टाचार करुन आपल्या भावीपिढीसाठी अतोनात पैसा कमवता येणं. या निवडणुकीत जेही उभे राहतात, त्या प्रत्येक माणसाचं ध्येयधोरण वेगवेगळं असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास भारतातील या निवडणुकीत वरच्या स्तरावर तीनच पक्ष असावेत. दोन पक्ष दोन विचाराचे व तिसरा पक्ष त्या दोन पक्षाचा विचार न पटणारा. याचा फायदाही होवू शकतो देशाला. तो म्हणजे देशातील निवडणुकीला खर्च होणारा पैसा वाचवता येवू शकतो. जो जनतेचा पैसा असतो. जो जनतेच्या करातून मिळत असतो. ज्या पैशातून देशाचा विकास करता येतो. ज्या पैशातून देशातील तरुणांना रोजगार देता येवू शकतो. ज्या पैशातून देशातील भुक्या माणसांची भूक भागवता येवू शकते. शिवाय कामाचा ताणही कमी करता येवू शकतो.
कामाचा ताण? कामाचा ताण असं म्हटल्यास कुणालाही आतिशयोक्ती वाटेल. परंतु कामाचा ताण असतोच. तो ताण असतो सरकारी कर्मचाऱ्यांवर. बिचाऱ्या कर्मचारी वर्गांना तेवढ्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या लोकांच्या प्रचारावर लक्ष द्यावं लागतं. शिवाय त्यांना निवडणूक निरपेक्ष पार पडावी म्हणून अतिशय दक्ष राहावं लागतं. काहीबाही बोलताच येत नाही. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देता येत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रचारात जाता येत नाही. तसं पाहिल्यास मतदानाची इच्छा असूनही काहींना मतदान करता येत नाही. शिवाय मशीन यंत्रात जास्त उमेदवार असल्यास जास्त एकापेक्षा जास्त कन्ट्रोल युनीट वापरावे लागतात. ती मतं मोजतांनाही अडचण येतेच. प्रत्येकाची मतं मोजावी लागतात. त्यातच जर दोनच पक्ष असले वा तीन पक्ष असले तर त्याच्या मतमोजणीची प्रक्रियाही व्यवस्थीत पार पाडता येवू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याच घरातील देता येईल. आपल्या घरात जास्त मुलं असली तर एकाला शर्ट मिळतं तर दुसऱ्याला निकर. शिवाय खाण्यापिण्यातही वांदेच असतात. शिक्षणाच्या बाबतीतही सांगायचं झाल्यास नीट शिक्षणही शिकवता येत नाही. त्याच स्तरावर दुसरी बाजू अशी असते की त्याच घरात एक किंवा दोनच अपत्ये असल्यास त्यांना व्यवस्थीत शिक्षण देता येतं. व्यवस्थीत कपडेही वापरता येतात. व्यवस्थीत जेवणाखाण्याची सोय पुरवता येवू शकते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे अनेक पक्षापेक्षा दोन किंवा तीन पक्षातील उमेदवारांच्या निवडीतून लोकांच्या विचाराला न्याय मिळवून देता येवू शकतो. मग हा विचार येतो की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला वा व्यक्तीसमुदायाला राजकीय पक्ष वा संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. मग त्याचा उपयोग काय? याबाबतीत सांगायचं झाल्यास व्यक्ती तेवढ्या प्रवृत्तीनुसार लोकांनी राजकीय संघटना स्थापन कराव्यात. व्यक्तीगणिक संघटना असाव्यात. परंतु त्या संघटनांनी आवडीनं अस्तित्वात असलेल्या दोन किंवा तीन राजकीय पक्षांना समर्थन द्यावं. उगाच आपण निवडून येवू शकत नसल्याची खात्री असल्यानं विनाकारण देशाच्या राजकारणात उभं राहून देशातील लोकांचा पैसा खर्च करु नये. जो लोकांच्या मालमत्तेतून वा खिशातूनच कराच्या रुपात गोळा होतो. जो वाचला की देशाच्या कामात येवू शकतो. हे तेवढंच खरं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून निवडणुकीत प्रत्येक व्यक्तीनं उभं राहून अनागोंदीपणा वा स्वैराचार माजवू नये. कारण स्वातंत्र्याचा अर्थ एकदम मुक्त वा स्वैराचारी स्वातंत्र्य होत नाही. जसं स्वातंत्र्य आहे, म्हणून आपण कुणाचाही खुन करीत नाही. तसंच स्वातंत्र्य निवडणुकीतही पाळावं. स्वातंत्र्य आहे म्हणून प्रत्येकांनी उभं राहू नये वा जनतेचा पैसा विनाकारण खर्च करु नये तर समर्थन द्यावं. तसंच एक दोन वा तीनच पक्षाच्या लोकांनी उभं राहावं. तसं पाहिल्यास समर्थन हे कुणालाही देता येतं व आपलं मत व्यक्त करता येतं यात शंका नाही.
निवडणुकीचं महत्व लक्षात घेता निवडणूक ही निरपेक्ष व्हावी. लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बळी न बनता फक्त नि फक्त आपल्या मनात विचार करावा. जो आपल्या नाही तर देशाच्या कामात येवू शकत असेल, त्यालाच मतदान करावं. स्वार्थ नसावाच मनात. कारण स्वार्थानं निवडणूक तर जिंकता येईल. परंतु त्यानं देशाचा विकास करता येणार नाही. देशाची प्रगती खुंटेल. जी प्रगती देशविकासाला हानीकारक ठरेल. उमेदवारांनीही निवडून आल्यानंतर आपलाच स्वार्थ पाहू नये. निवडून आल्यानंतर देशातील जनतेचा व देशाच्या विकासाचा विचार करावा. कारण कोणताच व्यक्ती हा मरण पावताच काहीही नेत नाही. ते सगळं जागच्या जाग्यावरच राहातं. आपल्याला लागते साडे पाच फुट जागा. तिही तीन महिन्यानं दुसऱ्याचीच होते. नाहीतर एक प्रेत जाळण्यासाठी ओटा. तोही दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचाच होतो. राखही अस्तित्वात राहात नाही. तिही दुसऱ्याच दिवशी नदीच्या पाण्यात मिसळून जाते. त्यानंतर कोणताही आपल्यामागे उरणारा आपला वंशज आपल्या जमविलेल्या मालमत्तेनुसार आपलं नाव घेत नाही. मग कुणासाठी जमवायच ही मालमत्ता ? त्या आपल्या स्वार्थप्रेरीत लेकरांसाठी की आपल्यासाठी? याचा विचार नेत्यांनीही निवडून आल्यानंतर करावा. शिवाय नेत्यांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर याच गोरगरीब जनतेसाठी वा त्यांच्या हितासाठी मुक्त हस्तानं खर्च करावा. वेळ, योजना, सेवा आणि पैसाही. जेणेकरुन जनता नेते मरण पावल्यानंतरही त्यांचं नाव घेईल वा त्यांची ऋणी राहील नव्हे तर ऋणी असल्याबाबत पदोपदी ऋण व्यक्त करेल. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी तुर्तास सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. सर्वांनी मतदान करावं म्हणजे झालं. हेही तेवढंच खरं आहे.
जार्जचं महत्वाकांक्षी धोरण. त्यातच त्याची ती हळूहळू तो असलेली प्रगती. त्यातच त्याचं लोकांना भूलविण्यासाठी प्रतिपादीत होत असलेलं आश्वासन, त्याची परियंती ही त्याला राष्ट्राध्यक्ष बनविण्यात झाली व आज तो पाच वर्षासाठी राष्ट्राध्यक्ष बनला होता.
जार्ज राष्ट्राध्यक्ष बनताच त्यानं मनात ठरवलं होतं की आता यापुढं निवडणूकच होवू नये. ती थांबवावी. त्यासाठीच तो राष्ट्राध्यक्ष बनताच विचार करु लागला. विचारांती त्याला कळलं की आपण ज्या निवडणूक यंत्रानं मतदान घेतो. त्या निवडणूकीच्या यंत्रालाच विकत घेवून टाकावं. म्हणजे निवडणूक यंत्र आपल्या मालकीचं होईल. लोकांना मतदान झालेलं तर दिसेल. परंतु ते मतदान कोणाला केलं. ते कळणार नाही. परंतु ते कसं शक्य होतं?
जार्जचा देश तसं पाहता लोकशाही देश होता. त्या देशात धर्मनिरपेक्षता होती. शिवाय सर्वांना स्वातंत्र्य होतं व सर्वांना निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकारही होता. त्यातच सर्वांना आपआपल्या पद्धतीनं बोलून प्रचार करण्याचा अधिकारही होता. शिवाय काहीबाही बोलून विरोधकांवरही ताशेरे ओढता येत होते. त्यामुळंच विरोधकांनी काय काय केलं. ते प्रत्यक्ष दाखवता येत होतं.
जार्ज निवडणुकीत निवडून येताच त्यानं ठरवलं की विरोधकांनी त्याचेवर कधीच ताशेरे ओढू नयेत. त्यासाठी त्यानं बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. कोणताही व्यक्ती मग तो पत्रकार का असेना, तो जर सरकारच्या विरोधात बोलला तर त्याला अटक करण्याचा कायदा पारीत करण्यात आला. कारण निवडणुकीत तो राष्ट्राध्यक्ष बनला होता व त्याचा पक्ष संसदेत भरघोस मतानंही निवडून आला होता. शिवाय कोणताही कायदा करायचा झाल्यास त्या कायद्यावर वा मसुद्यावर निवडणूक जरी घेतली तरी तो संमत होत असे.
जार्जच्या अध्यक्षीय पदावर असतांना त्याच्या सरकारनं एखादा कायदा संमत केल्यास त्या कायद्याला संमती देण्याइतपत बहुमत सरकारजवळ होतं. त्यामुळंच विरोधक कितीही ओरडत असले तरी त्या विरोधकांजवळ एवढी ताकद नव्हती की ते सत्ताधारी असलेल्या जार्जच्या विरोधात जावू शकतील. त्यामुळंही कोणतेही कायदे संमत होत असत.
जार्जचं सरकार जेव्हा सत्तेवर बसलं. ते तसं पाहिल्यास सत्तेवर बसताच पहिला कायदा बनला की कोणीही सरकारच्या विरोधात बोलणार नाही. ते बोलणं जनतेसाठीच होतं. त्या बोलण्यातून त्यांनी विरोधक असलेल्या विरोधी पक्षातील निवडून आलेल्या तसेच निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांसाठी नव्हतं की जे जनतेचे प्रतिनीधी होते. या अध्यादेशावर, तो अध्यादेश ज्याला ज्याला माहीत झाला होता. त्याला त्याला ओरडता येत होतं व तो ओरडतही होता. मात्र तो जरी ओरडत असला तरी त्यानं निवडून आणलेले प्रतिनिधी ओरडत नव्हते. कारण कायदा त्यांच्यासाठी तयार केला नव्हता.
या कायद्याविरुद्ध पत्रकार मंडळी सढळ मतानं आपलं मत मांडत होते आपल्या वर्तमानपत्रातून. परंतु त्या वर्तमानपत्रातील काही संपादकांवर कायद्याचा भंग केला व जनमत भडकवलं असा आरोप करुन जार्जच्या सरकारनं शिकंजे कसले होते. म्हणून की काय, पत्रकार मंडळीही सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत होती. कारण त्यांनाही बायकापोरं होते. संसार होता. मग ते का बरे सरकारच्या विरोधात जातील? त्यांना वाटत होतं की आपण का बोलावं सरकारच्या विरोधात आणि आपलं नुकसान करुन घ्यावं. आपल्यालाही संसार आहे. अन् आपणच काय सरकारच्या विरोधात ओरडण्याचा ठेका घेतला काय?
वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ होता. त्या पत्रानंच जनतेची बाजू मांडणं आवश्यक होतं आणि तशी बाजू मांडण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रातून काही पत्रकार करीत होते. परंतु त्यांच्याविरुद्ध सरकारनं शिकंजे कसल्यानं आता पत्रकार मंडळी चूपच बसली होती. त्याचबरोबर सगळे वर्तमानपत्र. जनता ओरडत होती. काही लोकं निश्चीतच आंदोलन करीत होते. परंतु त्यांचाही आवाज दाबला जात होता.
जनतेचा आवाज दबत होता व सरकारद्वारे जनतेचा आवाज दाबला जात होता. तरीही जनतेचे निवडून आलेले विरोधातील प्रतिनिधी ओरडत नव्हते. कारण त्यापुर्वी जार्जच्या सरकारनं जनतेच्या याच निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचे वेतन व भत्ते वाढवले होते. जे वेतन वाढण्याच्या लालसेने चूप होते. शिवाय त्यांच्यात स्वार्थही होता. तो म्हणजे आपली वेतनवाढ करुन घेणं. यात काही अपवादही होते की जे जनतेचे प्रतिनीधी ओरडत होते लोकांच्या आवाज दबण्यावर व सरकारद्वारे लोकांचा आवाज दाबला जाण्यावर.
जनतेचे काही निवडून आलेले प्रतिनीधी सरकारच्या आवाज दाबण्यावर ओरडत होते. अशांची सरकारनं यादी केली. त्या यादीनुसार आता सरकारनं ठरवलं की ज्या नेत्यांनी आवाज दाबण्याविरोधात आवाज उठवला होता. त्यांचेवर शिंकजे कसणे. तसा विचार करताच जार्जच्या सरकारनं ठरवलं की त्यांना कात्रीत पकडायचं.
जार्जनं त्या नेत्यांना कात्रीत पकडण्याचे ठरवताच तो त्यांचे बारकावे शोधू लागला. त्यातच त्यांच्यातील कमीत्व. त्या आधारावर तो विरोधीपक्षांना चूप बसवणार होता. अशातच त्याला आठवलं की त्या नेत्यांनी भ्रष्टाचार करुन गडगंज संपत्ती गोळा केली. ज्यातून ते सुटू शकत नाहीत व सुटलेही तरी त्यांची एकंदर संपुर्ण संपत्ती जप्त करता येवू शकते. ही कृती हिटलरच्या कोंबडीची पिसं उपटून त्यांना दाणे टाकण्यासारखी होती. असं जर केलं तर आपोआपच विरोधी पक्ष हा आपली नांगी टाकेल व तो आपल्याही विरोधात जाणार नाही. तसंच आपण जे आपल्या बाजूला येण्याचं मंजूर करतील, त्यांचं स्वागतच करावं व त्यांच्यावर कारवाई करु नये.
विचारांचा अवकाश....... जार्जनं तसं ठरवताच त्यानं संबंधीत विरोधी पक्षातील जेष्ठ नेत्यांवर शिकंजे कसण्यासाठी त्यांच्या संपत्तीची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधीत तपासणी विभाग, त्या जेष्ठ नेत्यांच्या संपत्तीची तपासणी करु लागला. ती संपत्ती कुठून आणली, कुठून नाही? याची चौकशी करु लागला. चौकशीअंती कळलं की साऱ्याच नेत्यांकडे गडगंज संपत्ती असून ती संपत्ती त्यांनी कुठून कुठून आणली, याचे साधे लेखे जोखेही नाहीत. म्हणूनच तसं चौकशी करणाऱ्या विभागाला आढळून येताच त्यांनी अशा बर्‍याचशा नेत्यांना, त्यांनी त्या संपत्ती विवरणाबद्दल सविस्तर खुलासे न दिल्यानं अटक केली. तशी ती संपत्ती जप्त करुन देशाचे कर्ज फेडले.
अटक करण्याचं ते धाडसत्र सुरु झालं होतं. ज्यांचं नाव ते इमानदार नेते आहेत, या यादीत येत होतं. त्याही नेत्यांचा पर्दाफाश चौकशी विभागानं केला होता. या कृतीनं बर्‍याचशा नेत्यात दहशत बसली होती.
नेते घाबरले होते व ते जार्जच्या पक्षात समाविष्ट होत होते. काही आताही विरोधात होते. जे अटक व तुरुंगवास पसंत करीत होते. परंतु जार्जच्या पक्षात गेले नव्हते. जे पक्षात आले होते. त्यांचं स्वागत करीत पक्षानं त्यांच्यावर होत असलेली कार्यवाही व त्यांची चौकशी थांबवली होती.
जार्ज आज हुकूमशहा नव्हता. परंतु विरोधक त्याला हुकूमशहाच मानू लागले होते. कारण त्यांची संपत्ती जप्त झाली होती. त्याला विरोध करणारे सर्व नेते आज तुरुंगात होते. काही पत्रकार शहाणी माणसं बोलायची. परंतु त्यांच्या बोलण्यावरही शिकंजे कसले जात होते व त्यांनाही काही बोलता येत नव्हतं. काही लोकं न्यायालयात गेले होते. त्यांच्या बाजूनेही न्यायालयातून लवकर निकाल लागत नव्हता. न्यायालयात समजा एखाद्यानं तक्रार केलीच तर त्याला व्यवस्थीत न्याय मिळत नसे. शिवाय न्यायालयीन प्रक्रिया ही वेळखाऊ प्रक्रिया होती. त्यामुळंच सामान्य माणसे न्यायालयाच्या वाट्याला जात नसत.
जार्जचा तो हुकूमशाहीपणा. त्यातच पुढं निवडणूक होती. लोकांनी ठरवलं होतं की जार्जची हुकूमशाही निवडणुकीपुरतीच. त्याला निवडणूकीतून दाखवून देता येईल. परंतु ते लोकांचं स्वप्न होतं. तशी निवडणूक आली.
निवडणूक आली व निवडणूकीत जार्जच्या पक्षानं जाहीर केलं होतं की त्याला अमूक अमूक एवढ्या जागा मिळतील. तसं पाहिल्यास त्या निवडणुकीत जार्जचा पक्ष नावासाठी प्रचार करु लागला. त्याला माहीतच नाही तर हमखास विश्वास होता की तोच निवडून येणार. कारण सगळं ठरलं होतं. तशी निवडणूक पार पडली व जार्जचा पक्षच त्यांनं गरीबांसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी काम केल्यानं हमखास मतानं निवडणुकीत निवडून आला.
जार्जचा पक्ष जास्त मतानं जास्त सीटा घेवून निवडून आला खरा. परंतु ती निवडणूक इलेक्ट्रॉनिक्स मशीननं झालेली असल्यानं विरोधकांनी जार्जच्या निवडून येण्यावर प्रश्नचिन्हं उभं केलं. म्हटलं की ज्याप्रमाणे स्मार्टफोन आपल्या चोवीस तास हातात असूनही त्या फोनला हॅक करता येतं व त्या स्मार्टफोनद्वारे बँकमधील पैसे चोरता येतात. तसंच मशीनचंही असेल. मशीनही निवडणूकीदरम्यान हॅक करता येत असेल व त्यातून मत चोरता येत असेल. स्मार्टफोनमधून पैसे चोरण्याची तरकीब वापरुन इलेक्ट्रॉनिक्स मशीनमधून जार्जच्या पक्षानं मतं चोरली असेल व जार्जचा पक्ष भरघोष मतानं निवडून आला असेल. मग काय तसं प्रश्नचिन्हं निर्माण झाल्यानं लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स मतदान करणाऱ्या मशीनीवर शंका घेवून ते हद्दपार करण्याचं षडयंत्र सुरु केलं. त्यासाठी आंदोलन करणंही सुरु केलं होतं. त्यावर काही लोकं म्हणत होते की मशीन सेट होती. आता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. अशातच आणखी एका निवडणुकीला सरकारला सामोरं जावं लागलं.

निवडणूक व्हायचीच होती. परंतु लोकं तर्कवितर्क लावत होते व जनमत भडकवीत होते की सावधान आवाज दबणार आहे असे जे ते लोकं म्हणत होते. यावरुन सरकारचं यश अपयश उघडउघड दिसत असलं तरी सरकार भारतीय संविधानानुसार निवडणुकीला सामोरे गेलेले होते व न घाबरता आव्हान करीत होते की सर्वांनी मतदान करावं. कारण ही आमची परिक्षा असून परिक्षेत पास नापास करणं आपल्याच हातात आहे. आता निवडणुकीनंतर ठरवता येईल की आवाज दबणार आहे की नाही ते. परंतु तुर्तास निवडणुकीत मतदान करणं गरजेचं आहे. ते जनतेनं करावं म्हणजे झालं. उगाच कुठलीही बोंबाबोंब करु नये वा अफवांना बळी पडू नये. स्वतःच्या डोक्यानं विचार करावा आणि न घाबरता, कोणाच्याही दबावात न येता अतिशय निर्भीडपणे मतदान करावं म्हणजे झालं.
निवडणूक येते व निवडणूक आली की जनप्रतिनिधी मोठ्या संख्येनं निवडणुकीत उभे राहतात व नेहमीप्रमाणेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावून आगपाखड करीत असतात. याहीवर्षी निवडणूक आली होती व याही निवडणुकीत एकाच जातीचे अनेक उमेदवार उभे राहिले होते व आपल्याच जातीबिरादरीतील सर्वसामान्य लोकांच्या मताची विभागणी केली होती. आता दरवर्षीप्रमाणेच याही निवडणुकीत आगपाखड होणारच होती. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची करण्याची सुरुवात झाली होती. कोणी पुन्हा म्हणत होते की सावधान, आवाज दबणार आहे.
सावधान, आवाज दबणार आहे. असं लोकांचं म्हणणं. त्याला जबाबदार कोण? असा जर प्रश्न केल्यास नक्कीच त्याला सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचं निदर्शनास येत होतं. कारण सत्ताधारी पक्षानं गतकाळात लोकांचा आवाज दाबण्याचेच प्रयत्न केले होते. हे लोकांनी प्रत्यक्ष स्वरुपात पाहिलंच होतं. जेव्हा शेतकरी रस्त्यावर आंदोलन करायला पुढं येत होते. तेव्हा याच सत्ताधारी पक्षांनी रस्त्यावर खिळे ठोकून ठेवले होते हे देशातील शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. शिवाय असे बरेच वाद झाले होते की ज्यात होत असलेले आंदोलन चिरडण्यासाठी सरकारनं टोकाची भुमिका घेतली होती. मग त्यात कोणतेही वाद का असेना. शिवाय ज्यानं आवाज उचलला, त्यावर सक्त प्रमाणात अटकेची कारवाई केली होती. जो बोलला, त्यावरही शिकंजे कसले होते. त्याचा अर्थ लोकांनी आवाज दाबणे असा लावला होता. याचाच अर्थ असा होता की सावधान, कोणी काही बोलायचे नाही. आवाज दबणार आहे नव्हे तर आवाज दाबला जाणार आहे.
वरील बाबतीत सांगायचं झाल्यास वरील बाबी घडल्या नव्हे तर घडवल्या गेल्या. खिळे ठोकले गेले ही बाब, सत्य बाब होती हे सर्वांनी पाहिलं होतं. परंतु त्यामागचं होणार असलेलं पडद्यामागील राजकारण लोकांच्या लक्षात आलं नाही. ते राजकारण होतं, आपल्या देशातील लोकांना शांत करणं. ते जर शांत झाले नसते तर परकीय देश आपल्या देशावर हावी झाले असते व ते चढाई करुन आले असते. कारण एक निसर्गदत्त नियम असा होता की आपल्या देशात बंडाळी माजली तर त्याचा फायदा हा शत्रूराष्ट्रांना होवू शकतो व ते त्याचा गैरफायदा घेवू शकतात. ही शक्यता नाकारता येत नव्हती. तसं पाहिल्यास देशाच्या सीमेलगत काही शत्रू होते. ते त्या अंतर्गत बंडाळीचा गैरफायदा घेणार नव्हते कशावरुन? ते तसा गैरफायदा घेणारच होते. म्हणूनच शेतकऱ्यांबद्दलचं आंदोलन चिरडण्याचा व त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा डाव. डाव नव्हे तर प्रयत्न होता. त्यात त्यांनी केलेली कृती योग्य वाटत नसली तरी ती योग्य वाटत होती त्यांच्या दृष्टीकोनातून आणि एक सत्ताधीश काय करु शकतो? त्याला जे योग्य वाटेल, ते निर्णय तो घेवू शकतो. ती कृती तो करु शकतो. मग काही लोकं त्या कृतीला हुकूमशाही कृती असं संबोधू शकतात तर काही लोकं त्याला लोकशाही कृती. परंतु लोकशाही कृतीत हिंसा नसते. विचाराची स्वतंत्र्यता असते. जार्जनं तेच केलं होतं. त्यानं शत्रुराष्ट्रांना चूप बसवलं होतं. त्यासाठी त्यानं देशात कोणाचंच आंदोलन होवू दिलं नव्हतं. ते आंदोलन नेस्तनाबूत केलं होतं, नव्हे तर उधळवून लावलं होतं. यावरुन सरकार तुघलकी आहे असे विरोधक म्हणत होते.
जार्जचं म्हणणं होतं की सरकार तुघलकी आहे की नाही? हे आता लोकं ठरवणार. आता हे न कळण्यापलिकडचे आहे, ते मतदान यंत्रणा राबवीत असलेल्या कारणावरुन कळतंच. मतदान यंत्रणेची अंमलबजावणी करीत असतांना प्रत्येकांनी मतदान टाकलंच पाहिजे असं गरजेचं असतांना काहीजण मतदान टाकत नाहीत. म्हणूनच सरकार त्यासाठी जनजागृती करीत आहे.
सरकार तुघलकी आहे यावर बोलतांना विरोधक म्हणत की मग सरकार जर तुघलकी नाही तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही ऐन परिक्षेच्या काळात ते त्यांना का वेठीस धरीत आहे? त्यावर उत्तर देतांना जार्ज म्हणत असे की त्याची वेगवेगळी वैयक्तीक कारणंही असू शकतात. शिवाय दरवेळेस प्रमाणे मनुष्यबळ कमी पडत असल्यानं शिक्षक मंडळींचा मतदान यंत्रणेत उपयोग करुन घेतल्या जातो हे सर्वश्रुत आहे. तसं पाहिल्यास शिक्षक सर्वात जास्त मतदान यंत्रणा सांभाळून घेत असतांना शिक्षकांनी राजकारणात सहभाग घेवू नये असा आदेश काढला जातो व त्याचा पदोपदी अपमान केला जातो. असं कोणीही चुकीचं बोलू नये.
विरोधकांचं म्हणणं एका अर्थानं बरोबरच होतं. कारण काही तुघलकी निर्णय आणि आदेशही काढले जात होते. सध्या पॅटच्या परीक्षा होवू घातलेल्या होत्या व त्याच दिवशी पेपर घ्यायचा असून त्याच दिवशी तपासायचा होता व त्याच दिवशी निकालही लावायचा असतांना व प्रत्येक शाळेत शिक्षक जेमतेम असतांना त्याच दिवशी मतदार जागृती म्हणून त्याच वेळेला सरकारी अधिकाऱ्यांनी एक मतदार जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तेही त्याच परीक्षेच्या दरम्यान. मतदान जनजागृती म्हणून प्रशासनानं एक उपक्रम हाती घेतलेला होता. मतदान जनजागृती उपक्रम. शपथ घ्यायची होती शिक्षकांना की ते लोकांना मतदान करायला बाध्य करतील! मग अधिकारी वर्ग तरी काय करणार? त्यांनाही जसे आदेश मिळतात, ते राबवावे लागणारच. आता यात प्रश्न हा होता की पॅटच्या परिक्षेचा पॅटर्न राबवायचा की मतदार जागृती म्हणून मैदानावर जायचं तेही त्याच तारखेला आणि तेही त्याच वेळेस उपस्थित राहायचे? शिवाय यापुर्वीही प्रशासनानं शाळेचे पेपर सुरु असतांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा करीत त्यांची वस्तीवस्तीत मतदार जनजागृती म्हणून रॅली काढायला लावली होती. यावरुन विरोधक म्हणत होते की सरकारला शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू द्यायचे नाही तर शिक्षणाचा खेळखंडोबाच करायचा आहे. आजपर्यंत असा खेळखंडोबा कधी शाळाबाह्य सर्वेक्षण करायला लावून केल्या गेला. कधी बी एल ओ ची कामं करुन केल्या गेला, कधी हागणदारीमुक्त घराचा सर्व्हे करुन केल्या गेला, कधी नवसाक्षरता अभियान राबवून केल्या गेला आणि कधी कधी रोगाच्या साथीच्या काळातही नाक्यानाक्यावर दिवट्या लावून केल्या गेला. आता ऐन परिक्षेच्या काळात शाळेत शिक्षक नसतांना शिक्षकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरुन मतदार जनजागृतीच्या नावावर हाच खेळखंडोबा सुरु असल्याचे चिन्हं दिसत आहेत. शिवाय यावर कोणी काही बोलल्यास त्याला त्या शेतकऱ्यांच्या रस्त्यावर जसे मोठमोठे खिळे ठोकले होते. तसेच खिळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या रस्त्यावर ठोकले जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. हे शिक्षकांना माहीत असल्यानं कोणताच शिक्षक बोलू शकत नाही. आवाज उचलू शकत नाही, तर ती सर्वच कामं अगदी मुकाट्यानं सहन करतात. कारण आहे अंतर्गत वाद नको. तो वाद जर केला तर शत्रुराष्ट्र त्याचा गैरफायदा घेवू शकतं. आवाज काढण्याचं स्वातंत्र्य सर्वांना संविधानानं कलम एकोणवीस अंतर्गत मिळवून दिलंय. परंतु अलिकडील काळात साधं बोलणंही वात्रट समजलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्या साध्या बोलण्यावरुन वातावरण चिघळलं जातं. म्हणूनच ही काळजी. तसं कोणी बोलू नये. कारण शत्रुराष्ट्र त्याचा गैरफायदा घेईल. सरकार तसं बोलणं बोललं तरी चालेल. सामान्य जनता तशा स्वरुपाचं बोलायला नको. कारण ते सरकार आहे. त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि ही सामान्य जनता आहे. सर्वसामान्य जनता. जिला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही निवडणुकीत आम्हालाच निवडून दिलं ना. मग आम्ही आज राजे. आता तुमचा बोलायचा अधिकार नाही. आमचाच बोलायचा अधिकार. कारण आम्ही तुमचे निवडणुकीत निवडून आणलेले प्रतिनिधी आहोत. आम्हीच राजकारणी आहोत. आम्हीच राजेही आहोत. आम्ही आता राजे बनल्यावर हवेत उडो की अजून काही करो. तुम्ही बोलणारे कोण? आम्ही उटपटांग निर्णय घेवो, तुम्ही बोलणारे कोण? तुम्ही काहीच बोलायचं नाही. अन् बोललेच तर तुमचा आम्ही म. गांधी करुन टाकू. असं मानणारं सरकार.
विरोधकांचं म्हणणं बरोबरच होतं. परंतु जार्ज म्हणत होता की सरकारचं सर्व बाबतीत चुकतंच असं नाही. कारण नाण्याला दोन बाजू असतात. एक चीत व पट. एक बाजू लोकांचं एकत्रीकरण करण्याची आहे. ती म्हणजे कोणीही काहीही बोलू नये. आंदोलन करु नये. कारण तसं बोलल्यानं वा आंदोलन केल्यानं आवाज वाढतो व देशातील अंतर्गत परिस्थिती चिघळते. याचा शत्रुराष्ट्र फायदा घेतो. म्हणूनच बोलू नका, आंदोलन करु नका. एकत्र राहा, एकत्रीकरण ठेवा असं आमचं मत. मात्र त्या उत्तरानं विरोधक संतुष्ट नव्हते. ते म्हणत असत की त्या मताचं स्वागत. परंतु ज्याला भूक लागली आहे, त्याला जर म्हटलं की चूप बस. ओरडायचं नाही, तर तो चूप बसू शकेल काय? त्याचं कारण नाही असं येईल.
विरोधक व जार्ज यांच्यातील शाब्दिक खडाजंगी. ती काही संपणारी नव्हतीच. दुसऱ्या बाजूच्या अनुषंगानं सरकारनं कित्येक दिवसांपासून अस्तित्वात असलेला व राजकारणाचा मुद्दा असलेला एका मंदीराचा वाद मुळातच समाप्त केला होता. तशीच तिसरी आणि भक्कम बाजू म्हणजे एका राज्याचा असलेला वाद. तोही वाद एका झटक्यात संपवला होता. तसाच बुरखा पद्धतीवरुन तलाक वादही संपवला होता. सारी जनता खुश झाली होती. त्यामुळं जार्जचं म्हणणं होतं की हे सगळं कोणासाठी केलं? जनतेसाठीच ना.
ती जार्जची भुमिका. अशी उत्तरे देत देत व असं धोरण ठेवत जार्जच्या सरकारनं सर्वसाधारण लोकांची मनं जिंकली. जार्ज प्रत्येक भाषणातून म्हणत असे की त्यात काहीसे निर्णय असेही ठरले की त्यात सरकारचे चुकलेच. ते घ्यायला नको होते. परंतु जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणेच ते निर्णय घेण्यात आले. ज्याला तुघलकी निर्णय संबोधता येतील. तसं पाहिल्यास कोणताही राजकीय पक्ष जरी त्या राजसत्तेवर बसला असता तरी त्यानं तेच केलं असतं. हो, सरकारनं सर्व गोष्टींवर कर आकारला. परंतु त्या करातून जो ही पैसा आला. त्यानं रस्ते सुशोभित झाले. सरकारनं काही वस्तूंचे दर वाढवले. टिव्ही व मोबाईल माध्यमातून पैसा घेतला. परंतु लोकांना विनामुल्य धान्यही दिलं. नेत्यांवर शिकंजे कसले. त्यांना धाक दिला आणि म्हटलं की जर तुम्ही आपली संपत्ती वाढवाल, भ्रष्टाचार कराल तर याद राखा, तुमच्यावरही चौकशी लावू. आज आम्ही लावू. उद्या तुम्हीही लावू शकता. कारण आम्ही एक छदामही खात नाही आणि तुम्हालाही खावू देणार नाही. हवं तर आमच्याही संपत्तीची चौकशी करा. तुम्हाला काहीच सापडणार नाही. सरकारचं हेच म्हणणं. सरकार निष्कलंक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. ते कोणालाच भ्रष्टाचार करु देत नाही. स्वतःही करीत नाही. म्हणूनच कोणत्याही चौकशीला सामोरे जातात. फक्त ती ताकद विपक्षाकडे असावी. ती ताकद विपक्षाकडे नसल्यामुळेच विपक्षी फक्त बोलू शकतात. कर्तव्य मात्र शुन्य असतं. म्हणूनच आवाज दबणार आहे नव्हे तर दाबला जाणार आहे. असं ते भाषवत आहेत. आवाज दबणार आहे व दाबला जाणार आहे. आवाज सर्वसामान्य जनतेचा दाबला जाणार नाहीच. मग कोणाचा आवाज दाबला जाणार आहे? जे भ्रष्टाचारी आहेत, जे इमानदार नाहीत आणि जे कामचुकार आहेत. जे काहीबाही बोलतात. ज्या बोलण्यावरुन देशात अस्थिरता माजू शकते. ज्या बोलण्यावरुन देशात अशांतता पसरु शकते. असेच बोलणे दाबले जाणार आहे. मग कोणी हिटलर म्हटलं तरी चालेल, कोणी हुकूमशहा म्हटलं तरी चालेल. त्यासाठी संविधानात बदल करावा लागला तरी चालेल. कारण सरकार जेही काही निर्णय घेत आहे. ते राष्ट्रहितासाठी आहे. देशात शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी आहे नव्हे तर देशाचा विकास करण्यासाठीच आहे असं सरकारचं म्हणणं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होवू नये. आम्ही निवडणूक लढवून जे ही कोणी निवडून येवू. ते सर्वजणं देशहितासाठीच कार्य करतो. देशविघातक कार्य करीत नाही आणि देशविघातक कार्य केले तर आम्हाला हटविण्याची जबाबदारीही संविधानात आहे. असंही आमच्या सरकारचं म्हणणं. जर आमचं चुकत असेल तर आम्हाला जनता नाकारेल व नसेल चुकत तर जनताच आम्हाला स्विकारेल असं सरकारचं उघड आव्हान आज होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांसमोर आहे. आता लोकांना विचार करुन मतदान करायचे आहे की सरकारचे चुकले की बरोबर होते. तोच निर्णय घेण्याची ही वेळ आहे. सरकारची कृती राष्ट्रहिताची की राष्ट्रविरोधी ते आगामी निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच. परंतु तुर्तास सर्वांनी मतदान करणं गरजेचं. सर्वांनी मतदान करावं. कारण आपलं एक मत सरकारला क्लीनचीट देवू शकतं. ही आपली परीक्षा नाही तर सरकारची परीक्षा आहे आणि सरकार ती परीक्षा देत आहे. आता सरकारला पास करायचे की नापास ते आपल्यावर अवलंबून आहे. तेव्हा मतदान करणं अगत्याचं आहे. त्यासाठीच शाळेतील विद्यार्थी, शिक्षकही ऐन परिक्षेच्या काळात निवडणूकीत मतदान व्हावं म्हणून जनतेनं भाग घ्यावा यासाठी निवडणूक प्रचाराला लागलेली आहे. याचं एकमेव कारण आहे की निवडून आल्यानंतर उद्या कोणीही म्हणायला नकोत की आम्हाला विचारलं नव्हतं म्हणून ही जनजागृती आहे. महत्वपुर्ण बाब ही की सर्वांनी निवडणुकीत भाग घ्यावा. मतदान करावं. मतदान कोणालाही करु शकता. सरकारचं ते म्हणणं नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे की फक्त मतदान करा. आम्ही निवडणुकीत पराभूत होवो की निवडून येवो ही अपेक्षा नाही. कारण ही तर आमची परिक्षा आहे. फक्त तुम्ही मतदान करण्यासाठी मतदान कृतीची अंमलबजावणी करा म्हणजे झालं.
मतदान करण्याची मशीन ही शंकायुक्त नव्हतीच. लोकांनी जार्जला पहिल्या वेळेस मतदान केलं. ते त्यानं मतदाराला दिलेल्या आश्वासनानं. त्यानं मतदाराला मोठमोठे आश्वासन दिले होते. तसं पाहिल्यास लोकंही त्याच्या मोठमोठ्या आश्वासनानं भाळून गेले होते. दुसर्‍या वेळेस मतदान करतांना जार्जनं केलेला विकास पाहिला होता लोकांनी. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्याला निवडून दिलं होतं. दुसर्‍या वेळेस मात्र त्यानं खऱ्या अर्थानं लोकांना ताल दाखवणं सुरु केलं. तो एकीकडे लोकांची सहानुभूती जिंकण्यासाठी देशाचा विकास करीत होता तर दुसरीकडे तोच नवनवीन कायदे आणत होता. एकीकडे लोकांना अन्नधान्य मोफत देत होता तर दुसरीकडे सर्व धनीकांच्या वस्तूंवरील कर वाढवून त्या वस्तू महाग करीत होता. एकीकडे तो आपण धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणत होता. तर दुसरीकडे तो धार्मीक स्थळाचं बांधकाम करण्यास मंजूरी देत होता. एकीकडे संविधान हा आपला आत्मा आहे असं निक्षून सांगत होता तर दुसरीकडे तो संविधानातील काही कलमे बदलविण्याच्या गोष्टी करीत होता.
जार्जचा तोच विचार. परंतु त्याला संविधान बदलविता येत नव्हतं आणि तो ते बदलवूही शकत नव्हता. त्याचं कारण होतं जनता. जनता ही काही चूप बसणारी नव्हती. मात्र जार्जचं सरकार संविधान बदलविणार आहे अशा अफवा विरोधकांनी केल्या होत्या. त्या जार्जला पदावरुन दूर करण्यासाठीच.

निवडणूक भाग दोन

मतदान ही काही जाहीरातही नव्हती. कारण जो चांगले काम करीत असे. त्यालाच लोकं निवडून देत असत आणि जो चांगले काम करीत नसे. तो जरी पदावर असला तरी जनता त्याच्यासाठी काम करीत नसे. तर दुसऱ्याच उमेदवाराला निवडून देत असे.
जार्जनं विचार केला होता की आगामी निवडणुकीत आपण असे उमेदवार ठेवू की जे हमखास निवडून येतील व ते निवडून आले की बस, आपल्याला संविधान बदलवता येईल. तसा विचार करीत असतांना तो विचार करु लागला व उमेदवार शोधू लागला.
जार्ज उमेदवार शोधू लागताच व तिकीट देतांना त्याच्या समोर विचार आला की निवडणूक लढवितांना उमेदवाराला पैसे मोजावे लागतात. ते पैसे कोणता उमेदवार देवू शकेल ते पाहावे लागेल. शिवाय पार्टी फंड जो देईल, त्यालाच तिकीट द्यावे लागेल.
जार्जनं तसा विचार करताच त्याला पैसा देणारे
भरपूर लोकं दिसत होते पार्टीत. परंतु ते निवडून येतील याची शाश्वती नव्हती. तसं पाहिल्यास पहिला उपाय तोच केला त्यानं की जो जास्त पैसा देईल, त्याला तिकीटा देण्याचा विचार केला होता. तसं त्याला लागलीच आठवलं की लोकांना पैसा देवून चालणार नाही. तो उमेदवार लोकांच्या पसंतीचा असावा.
दोन चार उपाय आजमावत जार्जनं तिकीट दिलं होतं सर्वांना. तसे ते निवडूनही आले होते बहुमतानं. कारण त्यानं केलेला प्रचार. मोबाईल यंत्राचा वापर करुन सोशल मिडीया त्यानं जिंकून टाकला होता.
जार्ज जसा निवडून आला. त्याचा पक्षही बहुमतानं निवडून आला होता. परंतु तो समाधानी नव्हता. त्याचं कारण होतं निवडणूक लढवितांना झालेलं मतदान. मतदान हे अतिशय कमी झालं होतं. नव्हे तर, लोकांनी मतदान कमी केलं होतं. त्याची बरीच कारणं होती .परंतु त्यात तेही एक कारण होतं, लोकांचा आळशीपणा. लोकांना मतदान केंद्रावर जायला सवडच नव्हती वा त्यांनी तशी सवड काढली नव्हती.
जार्जनं विचार केला. विचार केला की आता यापुढील निवडणूकात मोबाईल माध्यमातून मतदान घ्यावं. कारण मोबाईल माध्यमातून मतदान जर घेतल्या गेलं तर लोकांचा मतदान करण्याचा कल जास्त असेल. परंतु सरकार त्यावर विचार करीत होतं.
मोबाईल माध्यमातून मतदान. कारण मशीनमध्ये सेटींग होते व मतांचं परीवर्तन होते अशी भलतीच अफवा गाजत असतांना जर मोबाईल द्वारे मतदान प्रक्रिया राबवली गेली, तर मोबाईलद्वारे मतदानालाही काही लोकांची मनाई असेल व ते म्हणतील की मोबाईल माध्यमातून मतदान नको. मतदान हे केंद्रावर जावूनच व्हावं. परंतु अलिकडील डीडीटल काळात जर मोबाईल माध्यमातून मतदान घेतले तर मतदानाची टक्केवारी निश्चीतच वाढवता येईल यात शंका नाही. कारण आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे व प्रत्येकच कुटूंब मोबाईलचा वापर यथायोग्य करीत आहे यात शंका नाही. विशेष सांगायचं झाल्यास मोबाईल द्वारे मतदान केल्यास तीच निवडणूक पारदर्शक होईल यात शंका नाही. कारण मत चोरताच येणार नाही व चोरणारे तरी किती लोकांचे मतं चोरु शकतील. त्यावरही पाळत ठेवणारे राहतीलच यात शंका नाही. म्हणूनच मोबाईलमाध्यमातून मतदान जरी झालं तरी वेड लागलं म्हणायचे कारण नाही हे तेवढंच खरं आहे.
आज मतदान हे महादान झालं आहे. कारण ते केल्यानं देशाचा विकास यथायोग्य होईल की नाही याचा निर्णय होतो. देश चालविण्यासाठी चांगली यंत्रणा बसते. देशाचा विकास तर होतोच. परंतु स्थैर्यही लाभत असते देशाला. जसं एखाद्याला त्याचं शरीर योग्य बनविण्यासाठी रक्तदानाची गरज असते. तसंच सरकार बनविण्यासाठी मतदानाची तेवढीच गरज असते. त्यादृष्टीनेच लोकं कळकळीनं मतदान करीत असतात.
मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तसं पाहिल्यास मत हे कुणालाही टाकता यावं. यादृष्टीनं यु ट्यूबवर काही व्हिडीओ आहेत. त्यात काही लोकं सांगतात की लिस्टमध्ये नाव नसेल तरी तोही व्यक्ती मतदान करु शकतो आणि वास्तविक सांगीतलं जातं की जर यादीमध्ये नाव असेल तरच मतदान. मग एखाद्याचं यादीत नाव नसेल आणि त्याची मतदान टाकण्याची इच्छा असेल, तर त्यानं काय करावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. त्यावर मतदान राबविणाऱ्या यंत्रणेजवळ काहीच उत्तर नाही. याचं कारण आहे की मतदान करायला अशानं कुठलेही लोकं येवू शकतील व मतदान अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढेल. म्हणूनच अधिकारी तसे करीत नाहीत. यावरुन मतदारानं मतदानापासून वंचीत राहावं काय? याचं उत्तर आजच्या डिजीटल काळात देणं योग्य नाही. तो नागरीक जर त्या देशाचा नागरीक असेल आणि त्याचेजवळ नागरीकतेचे प्रमाणपत्र असेल आणि तो मतदार त्या कक्षात मोडत असेल तर त्यानं मतदान करावं. यासाठीच मतदार यादी असते. आता यावर काही लोकं म्हणतात की आम्ही इथेच राहतो. कितीतरी वर्षापासून राहतो. आम्हाला मतदान का करता येवू नये? त्याचं उत्तर आहे की आतापर्यंत तिथं राहात होते तर यादीत नाव का टाकलं नाही? त्यावरही काही लोकं म्हणतात की यादीत नाव होतं. दिसलं नाही.
यादीत नाव आणि ते दिसलं नाही? हा काय घोळ आहे? होय, हा घोळच आहे. कारण पुर्वी जो सर्व्हे व्हायचा. त्या सर्व्हेनुसार निवडणूक जाहीर होण्यापुर्वी एक सर्व्हे व्हायचा. सर्वेक्षक रांगेनुसार घरी यायचा. तो रांगेतील असणाऱ्या पुर्णच लोकांची नावं लिहायचा आणि याद्या बनायच्या. मग एक नाव दिसलं की बस सर्व वस्तीचं नाव दिसायचं त्या यादीत. आता तसं नाही. आता मतदार यादी बनवितांना असा सर्व्हे होतच नाही. सर्वेक्षक एका ठिकाणी बसतो व मतदार त्याच्याकडे जातात. जे मतदार वेगवेगळ्या वस्तीत राहतात. त्यात ज्यांनी ज्यांनी आवेदन भरलं. त्यांच्या आवेदनाचं वर्गीकरण त्याच्या पत्त्यानुसार होत नाही. त्या आवेदन भरणाऱ्या आवेदकाच्या अर्जक्रमांकानुसार याद्या बनतात. अशा याद्या बनल्या की ना तो पत्ता सर्वेक्षकाला माहीत असतो, ना ती माहिती मतदाराला. मग कुठं मतदान आहे? ते केंद्र कुठं आहे? याची पुरेशी माहिती नसते. मग मतदानाची टक्केवारी जास्त प्रमाणात कसं होईल? म्हणूनच मतदान कमी झालं व याला जबाबदार ऊन नाही. तशीच प्रशासनाची दिरंगाईही नाही.
सध्याच्या परिस्थितीत ज्याही कुठे मतदान प्रक्रिया राबवली गेली व प्रत्येकांनी मतदान केंद्रावर जावून मतदान केलं. परंतु यावेळेस मतदान टक्केवारी कमी झाली व सरकारनं मतदान टक्केवारी वाढावी व ती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जावी, यासाठी केलेले सर्व उपाय फोल ठरले. यावर कारण सांगतांना काही लोकांनी निष्कर्ष काढतांना कडक ऊन व प्रशासनाची दिरंगाई असं उत्तर दिलं. परंतु ते उत्तर मतदान करतांना होवूच शकत नाही. कडक ऊन जरी असलं तरीही लोकं मतदान करायला जातातच. जर उमेदवार त्यांच्या आवडीचा असेल आणि त्यानं जनतेसाठी कामं केली असतील वा करणार असतील तर...... आजच्या डिजीटल काळात कोणताच मतदार कुणाचा बांधील नाही की तो कुणाच्या इशाऱ्यावर चालत नाही. तो कुणाकडून दारुची बाटली घेईल व कुणाकडून पैसे घेईल. असा तो वागत नाही. तो समजदार झाला आहे व पहिलंसारखा अनपढ वा अडाणी राहिलेला नाही. तसाच तो मतदान करतांना विचार करतो की कोणाला मतदान केल्यास कोण विकास करेल? आपला विकास करेल की देशाचा विकास करेल?
पुर्वी लोकांची रांग राहायची. परंतु टक्केवारी जास्त असायची. याचं एकमेव कारण होतं, बॅलेट पेपर. बॅलेट पेपरवर भर्रकन ठप्पा मारला की मतदार बाहेर जात असे. त्यात त्यांचा वेळ वाचत असे. आता तसं नाही. इव्हिएम मशीनला थोडा वेळ लागतो मत स्विकारायला. तसेच आजचे लोकं सुशिक्षीत आहेत व ते विचार करतात की कोणता कोणता उमेदवार काम करु शकतो. जे उमेदवार आवडीचे नसतात. त्यांना मतदान करायला उगाच वेळ घालवून का बरं जायचं? त्यापेक्षा कामाला गेलेलं बरं. दोन पैसे येतील. नेते काही खायला देणार नाहीत. शिवाय कोणताही नेता निवडून आला की तो तेच करीत असतो. ही सर्वसाधारण लोकांची भावना. जे आजवर पाहात आलेले आहेत. नेत्यांनी आपला विकास केलेला आहे जनतेच्या भरवशावर. परंतु जनतेला अंधारात ठेवलेलं आहे. मग कोणतेही पक्ष सत्तेवर आले असले तरी. शिवाय सत्तेसाठी लोकांना मुर्ख समजत पार्ट्याही बदललेल्या आहेत. मग असे नेते आवडतील काय लोकांना? याचं उत्तर नाही असंच येईल. कारण जोही व्यक्ती आजपर्यंत सत्तेवर आला. त्यानं तेच केलेलं आहे, हे जनतेला चांगल्याप्रकारे माहीत असेल. म्हणूनच मतदानाची टक्केवारी कमी झाली असावी. त्यातच काही लोकं असेही असतात की जे सुशिक्षीत असूनही मतदान कक्षात अडाणी असल्यासारखेच वागत असतात. विनाकारण वेळ वाया घालवत असतात. त्यामुळंही दिरंगाई झाली असेल व मतदान कमी झालं असावं आणि मतदानाची टक्केवारी वाढली नसावी. ही शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. एक महिला एका मतदान कक्षात प्रवेशली. मतदान अधिकाऱ्यानं तिचं नाव विचारलं. संपुर्ण प्रक्रिया केली. त्यानुसार बोटाला स्याही लागली. नंतर ती मतदान कक्षात गेली. तिनं पाहिलं की तिथं दोन बटना आहेत. एक लाल व दुसरी निळी. मग तिचा गोंधळ उडाला व ती विचारायला लागली की काय करु. त्यावर अधिकाऱ्यानं उत्तर दिलं की तिनं चिन्हांसमोरील नीळी बटन दाबावी. परंतु तिला ते अधिकाऱ्यांचं म्हणणं पटलं नाही व शंका घेत ती म्हणाली, "आपण मला खोटं सांगता. मी यु ट्यूबवर बघते." त्यानंतर तिनं ते बघण्यासाठी यु ट्यूबवर पाहिलं. तिथंही काही तिचं समाधान झालं नाही. वेळ होत होता. तसा अधिकारी म्हणाला,
"मैडम, आपण एकतर मतदान करा, नाहीतर निघून जा." त्यावर ती म्हणाली, "मला मतदानाचा पुर्ण अधिकार आहे. मी पुर्ण विचार करुन मतदान करेल आणि आपणाला थांबावंच लागेल."
तिचा तो हट्टं. तसं कोणालाही मतदानापासून वंचीत करता येत नाही. तिला अधिकाऱ्यानं अंतिमतः म्हटलं की आपण थोडे बाजूला व्हा. विचार करा. जेवढा विचार करायचा असेल तेवढा. त्यानंतर सावकाश मतदान करा. तरीही ती बाजूला झाली नाही. विचार करीत बसली. जवळपास पंधरा ते वीस मिनीट. त्या काळात मतदान अधिकाऱ्यानं कमीतकमी दहा मतदार निपटवले असते. त्यानंतर ती म्हणाली की आता मी मतदान करते. त्यानंतर तिनं मतदान केलं. परंतु या घटनेत तिच्यामुळेच गेलेला फालतूचा पंधरा मिनीटांचा वेळ हा उगाचंच व्यर्थ गेला.
असेही काही लोकं असतात की ज्या लोकांच्या हट्टानं मतदानात उगाचंच वेळ वाया जातो. तसं पाहिल्यास मतदान अधिकारी अशा लोकांचा विरोध करु शकत नाही. कारण त्या दिवशी मतदार हा राजा असतो. तो मन मानेल तसाच वागत असतो. थोडीशी जरी अधिकाऱ्यानं चूक केली तरी अख्खा जमाव तयार होत असतो. तो मतदार त्याच एका दिवशी आपल्या पाच वर्षाचा राग काढत असतो. असाच दुसरा एक प्रसंग. या प्रसंगात एका केंद्रावर सुशिक्षीत व्यक्ती. वय वर्ष बहात्तर होतं. तो आला. त्यानं आपला आयकार्ड दाखवला. नाव जुळलं. तसं अधिकाऱ्यानं त्याचा फोटो जुळवला. फोटोत त्याच्या जाग्यावर एका महिलेचा फोटो लागला होता. मग तो मतदार भडकला व इंग्रजी भाषेत वक्तव्य करीत होता. त्याचं म्हणणं होतं की त्याचं नाव गाव बरोबर असतांना त्याच्या फोटोच्या जाग्यावर एका महिलेचा फोटो लागलाच कसा? त्यात अधिकाऱ्यांची चूक आहे. त्याचं म्हणणं बरोबर होतं. परंतु तो त्या केंद्रातील अधिकाऱ्यांनाच दोषी मानत होता. परंतु त्यांची ती चूक नव्हती. शिवाय त्याला तो फोटो नंतर सुधारुन घ्याल अशी सूचना करताच तो पुन्हा भडकला. त्यावर त्याचं म्हणणं होतं की मी जेष्ठ नागरीक असल्यानं व माझ्या पायाने चालणं होत नसल्यानं प्रशासनानं घरी यावं व माझं नाव, गाव व फोटो सुधारुन द्यावा. तसं पाहिल्यास त्याचंही बरोबरच होतं. परंतु त्याची तेवढी सेवा करेल तरी कोण?
मतदान दिरंगाई झालीच नाही. परंतु तरीही मतदानाची टक्केवारी वाढली नाही. याचं एकमेव कारण आहे नावे इकडे तिकडे असणे. ती नावे न मिळणे. तशीच इतरही बरीच कारणं आहेत. त्यात पुर्वीसारखा सर्व्हे न होणे, नेत्यांबद्दलची असुया वाटणे, महागाई असणे व महागाई असल्यानं त्याही दिवशी कामाला जाणे. नोटा दाबण्याऐवजी मतदान न केलेलं बरं अशी लोकांची भावना असणे. तो विरोधच. त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी यावर झाला. याशिवाय आणखी दोन कारणं होती, पहिलं कारण म्हणजे आळशीपणा व दुसरं कारण मोबाईल फिव्हर. यावेळेस मतदारात आळशीपणाही असेल. त्यामुळंच ते केंद्रापर्यंत गेले नसतीलच. तशीच काही मंडळी मोबाईलमध्ये खिळली असतील.
मतदानाची टक्केवारी वाढवता येईल. तसं पाहिल्यास डिजीटल काळ आला आहे. कोणतीही कामं ऑनलाईन होतात. मग मतदानही ऑनलाईन होवू शकतं मोबाईल द्वारे. सरकारनं यावरही उपाय काढावा व पुढील निवडणुकीत मोबाईल मतदानाचा पर्याय द्यावा. जशी यावेळेस जेष्ठ नागरीक व अपंग माणसांना सेवा दिली तशी. यावेळेस तर अपंग व जेष्ठ नागरीकांना सेवा तरी द्यावी लागली. परंतु मोबाईल द्वारे सेवा दिल्या गेली तर...... तर मतदानाची टक्केवारीही वाढेल. तसंच प्रत्येकाला मतदान करता येईल. यात शंका नाही. परंतु त्यातही लोकं समाधानी नसतील. लोकं आज जशी मशीन हॅक होते म्हणतात ना. तसेच म्हणतील पुढेही. ते चक्कं मोबाईल हॅक होते म्हणायला विसरणार नाहीत. परंतु काळाच्या ओघानं पावले टाकणं गरजेचं आहे व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोबाईल द्वारे मतदान करण्याची प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. त्याचं कारण आहे प्रत्येकाला मतदान करता येणं. असंच जर झालं तर कोणीही मतदानापासून वंचीत राहणार नाही. कारण मोबाईल हा घराघरात पोहोचलेला आहे. तसं पाहिल्यास आज मोबाईल द्वारे मतदान करणं सहज शक्य आहे. मात्र याला अपवाद म्हणजे प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे ते असणारच. त्याचा विचार तुर्तास तरी होवू नये म्हणजे झालं.
जार्ज याचाच विचार करीत होता. विचार करीत होता की आपण अशा मोबाईल माध्यमातून मतदानावर एक ना एक दिवस निश्चीतच भर देवू व देशात मोबाईल माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया सुरु करु. जेणेकरुन वाचलेल्या पैशातून देशातील विविध गोष्टींचा विकास करता येईल.

जार्जला आठवत होतं त्याचं बालपण. ते चार भाऊ. त्यात त्याचे तीन भाऊ मोठे होते. त्यांच्यावर जबाबदारी होती संसाराची. शिवाय त्यांचं लग्न झालं होतं.
तीन भाऊ. त्यांनी आत्महत्या केली होती, घरावर कर्ज झालं होतं म्हणून. अन् तोच एक वाचला होता.
जार्जच्या वडीलाला चार मुलं होती. मात्र तीन मुलं तरुण होताच फार मेहनत करीत असत व मजेने घरी राहात असत.
ते तीन भाऊ. तिघंही एक पान वाटून खाणारे. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं आणि तिघांजवळही शेती होती. जार्ज लहान होता. बराच लहान. त्याला काही समजत नव्हतं. तसं पाहिल्यास काही लोकांना मुलांची हौस असते. मुली असल्यास मुलगा हवा म्हणून ती मंडळी मुलं जन्मास घालत असतात. परंतु जार्जच्या वडीलांनी मुलीसाठी एवढी मुलं जन्मास घातली होती. ज्यात जार्जचा चवथा क्रमांक होता.
जार्जच्या वडिलांकडे शेती भरपूर होती. शेती भरपूर असल्यानं पाहिजे त्या प्रमाणात संकट नव्हतंच. त्या शेतात भरपूर धनधान्य पीकत असे. तशी परीवाराला झड नव्हतीच. त्याचे तीन भाऊ शेतात राब राब राबायचे. परंतु परीवार हा शेतात राबत नव्हता. तो उधळपट्टीच करीत होता.
जार्जचे तिघंही भाऊ. शेती चांगली पीकत असल्यानं त्यांना फरक पडला नाही. शिवाय शेती जास्त असल्यानं शेतात नोकर चाकरही होते. शिवाय त्यांच्याजवळ मोठी इमारत होती. ती इमारत त्यांच्याच वडीलांनी बांधली होती. कुटूंब ऐनचैनीत जगत होतं. असं वाटत होतं त्यांच्याकडे पाहून की ते किती सुखी असतील. तसे ते सुखीच होते. जेव्हापर्यंत शेती पीकत होती. परंतु दुर्दैवं असं की वेळ पालटली. कोरडा दुष्काळ पडला शेतीत. मग बिचाऱ्यांना कर्ज घ्यावं लागलं.
तिघांवरही कर्ज होतं. परंतु ते कर्ज असलं तरी ते जगाच्या डोळ्यासमोर नव्हतं तर ते झाकोळलं गेलं होतं. शिवाय वाढलेली शान व दिखावूपणानं अंगात लाज भिनली होती. परंतु दुर्दैवच ते. दुर्दैवापुढं सत्य परिस्थिती कुठं लपवता येईल. त्यातच खोटी शान. त्या खोट्या शानसमोर परिस्थितीशी लढता लढता पैसा पुरत नव्हता. मग खायचेही वांदे होत होते. उपासमार होत होती.
जार्जच्या तिनही भावांना परिस्थितीची जाणीव होती. ते परिस्थिती पाहून वागत होते. परंतु त्यांचा परीवार....... तो परीवार परिस्थिती पाहून वागेल, तेव्हा ना. त्यांना त्यांनी कितीही वेळा समजावून सांगीतलं, परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यांना तशी सवयच पडली होती. शेवटी त्यांनी ठरवलं. आपण विष घेवून हे जीवन संपवावं. मग कळेल परीवाराला, किती त्रास होतोय ते. तेव्हाच सुधरतील ते. असा विचार करुन ते आत्महत्येचा विचार करु लागले होते. परंतु आत्महत्याही करणार कशी? त्याची त्यांना भीती वाटत होती.
त्यांचा एक मित्रही होता. आनंद नाव होतं त्याचं. त्यांच्या सर्व गोष्टी आनंदला माहीत असायच्या. सततची नापिकी व सततचा कोरडा दुष्काळ. आज तिघांनीही ठरवलं की जहर प्यायचं. परंतु जहर प्यायची हिंमत करायची कशी? विचार केला. मग ती कल्पना त्या तिघांनीही आपल्या मित्राला बोलून दाखवली. तसा मित्र म्हणाला,
"का बरं आत्महत्या करण्याचा विचार करता आहात?"
ते मित्राचं बोलणं. त्यावर उत्तर देत ते भाऊ म्हणाले,
"काय करावं? परिस्थितीच आमची. शिवाय आम्ही कितीही सांगीतलं तरी परीवारांचे डोळे उघडत नाहीत. म्हणूनच हा उपाय."
ते उत्तर भावांनी दिलं. परंतु मित्र तयार होईना. तेव्हा त्या तिघांनी त्याला वचनात गुंफलं व म्हटलं की आम्ही स्वखुशीनं तयार आहोत ना मरायला. तू एक माध्यम आहेस. तू तर आम्हाला दुःखातून मुक्ती देत आहेस. तुला पुण्यच मिळेल. पाप नाही.
मित्रानं त्यावर बराच विचार केला. त्यानंतर मित्राला ती गोष्ट मान्य झाली व तो मित्र त्यांना विष कसं द्यावं? त्यासाठी कोणते उपाय करावे यावर विचार करु लागला. विचारांती त्याला कळलं की जर जेवनात विष मिसळून दिल्या गेलं तर आपल्यावर नावंही येणार नाही व त्यांना दुःखातून मुक्तीही देता येईल. शिवाय त्यांना मारणं ही पुण्याचीच गोष्ट असून त्यातून त्यांची चिंताही दूर होईल. शेवटी त्यानं इच्छा नसुनही निर्णय घेतला, त्यांना विष देण्याचा.
तो विचार करु लागला त्यांना विष देण्याचा. त्यातच त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. मित्र सांगत होते त्यांच्या पारीवारीक गोष्टी. ज्यात त्यांच्यावर संकट असूनही त्यांच्या परीवारांना काहीच समस्या नव्हत्या. शेवटी मित्रानं पोळ्या बनवल्या. त्यात विष मिसळून त्या पोळ्या घेवून तो शेतावर गेला. तसं त्या मित्रानंच त्या पोळ्या त्यांना खायला दिल्या. त्यानंतर तो तेथून निघून गेला.
त्या तिनही भावांनी त्या पोळ्या खाल्ल्या. तशी पोळी खाल्यानंतर त्यांचा जीव मळमळायला लागला. ते ओकाऱ्या करु लागले. त्यातच काही वेळाने त्यांचा जीवही गेला.
ते गतप्राण झाले होते. शेतातच मरुन पडले होते. त्यांच्या मृत्यूनं त्यांची कर्जातून मुक्ती झाली होती. तशी सायंकाळ झाली.
सायंकाळ झाली होती. बराच वेळ झाला होता. परंतु तीन भावांपैकी कोणीही घरी आलं नव्हतं. तसा बराच वेळ झाल्यामुळं घरची मंडळी शेतावर गेली. टार्चच्या उजेडात पाहू लागली. त्यातच त्यांना शेतातच एका कडेला तीनही प्रेतं दिसली. शिवाय त्या प्रत्येक प्रेताजवळ एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी प्रत्येकानं आपल्याच हस्ताक्षरात लिहिली होती. त्यात लिहिलं होतं.
'घरावर दुष्काळानं फार मोठं संकट कोसळलं होतं. घरात उपासमार होत होती आणि घरची मंडळी सुधारायला तयार नव्हती. ती अजुनही शान शौकत मध्ये जगत होती. आम्ही ते उघड्या डोळ्यानं पाहात होतो. ते आम्हाला सहन होत नव्हतं. आम्ही तरी कुठून पैसा आणणार? आणलेल्या पैशानं किती लाड पुरविणार परीवारांचे. शिवाय त्या पैशानं शेतात पीक पिकविणार की घरातील व्यक्तींचे लाड पुरवणार.'
ती चिठ्ठी. ती चिठ्ठी त्या परीवारानं वाचली. प्रेताची केस त्यांच्यावरच उलटणारी वाटली. तशी ती घटना त्यांनी दाबून टाकली तर त्याला वलय दिलं. शेतकरी आत्महत्या. कर्जापायी शेतात तिघांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. शहानिशा झालीच नाही. या घटनेत ना परीवार फसला, ना तो जीवलग मित्र.
जार्जचे तिघंही भाऊ मरण पावले होते. तो लहान असल्यानं त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. परंतु परीवाराला विचार आला व विचारांती पश्चाताप झाला व विचार आला की जर आपण सुधारलो असतो तर...... तर आज आपल्या परीवारातील जबाबदार व्यक्ती मरण पावले नसते. आतातरी आपण सुधारायला हवं.
परीवारानं तसा विचार करताच त्या घटनेनंतर सर्व परीवार सुधरला. आता ना कोणी परीवारातील व्यक्ती शानशौकत करीत होतं. ना कोणी उधळपट्टी करीत होतं.
आज परिस्थिती सुधरली होती. परीवार सुखी झाला होता. तो परीवार सुधरला होता. आता तो परीवार शाननं नाही तर परिस्थितीनं वागू लागला होता. परंतु ते तीन भाऊ जगात नव्हते. याबाबत परीवाराच्या मनात अजुनही पश्चाताप होता.
जार्ज हा लहान होता. तसे आज तीनही भाऊ मरण पावल्यानं जार्ज लाडाचा बनला होता. त्यामुळंच त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. त्याचं शिक्षण वैगेरे चांगलं थाटामाटात पार पडलं होतं.

जार्जला त्याचा विवाहही आठवत होता. सुप्रियाची सारखी आठवण त्याला येत होती. दिवस अख्खा बेचैनीत जात होता. परंतु आज उपाय नव्हता. तसं पाहिल्यास त्याला जरी सुप्रियाची आठवण येत असली तरी तिच्याकडे फिरुन पाहायला त्याचेजवळ पुरेसा वेळ नव्हता. तसं पाहिल्यास तिचा विवाह झाला होता.
जार्ज थोडा वयानुसार वयस्क झाला होता. वाढत्या वयानुसार थोडी समजदारी आली होती. तसा त्याला आठवला त्याचा गतकाळात झालेला विवाह. ते तरुण वय व त्या तरुण वयात विवाह करण्याचा विचार त्याच्या मनात जोर पकडू लागला होता. तसा तो एका मुलीवर प्रेम करु लागला होता, जिचं नाव सुप्रिया होतं.
सुप्रिया तिचं नाव होतं. ती बारीकशी होती. ती बारीक असल्यानं त्याला फार आवडत होती. तिची कमर बिल्लसभर होती व ती कमर त्याच्या हाताच्या पंज्यात येत असे.
जार्ज तिच्यावर प्रेम करु लागला होता. तिही त्याचेवर प्रेम करु लागली होती. परंतु त्या सर्व गोष्टी लपून होत्या. त्यापैकी कोणत्याच गोष्टीची घरी किंचीतही चर्चा नव्हती. मात्र बोलता बोलता प्रेम एवढं वृद्धींगत होत गेलं की चक्कं त्या मुलीनं पळून जाण्याचा निर्धार केला. त्यालाही एक तात्कालिक कारण घडलं.
जार्जचं सुप्रियावर असलेलं निरतिशय प्रेम. जार्जला वाटत होतं की तिनं पळून जावून विवाह करु नये. कारण तो तिला पळवून नेवू पाहात नव्हता. पळवून नेणाऱ्यांच्या गोष्टी त्याला माहीत होत्या. ते सुखी नसतात हेही त्याला माहीत होतं. त्यामुळंच की जार्जला तसं पळवून नेणं पसंत नव्हतं. त्याला वाटत होतं की मुलगी पळून जरी गेली असेल तरी तिच्या वडीलानं घाबरु नये. तिला वाळीत टाकू नये तर मुलीच्या बाजूनं उभं राहायला हवं. कारण जमाना खराब असतो. तो आधी बोलतो. मग खोटी आश्वासन देवून मुलींना भाळवतो व त्यानंतर फुस लावून तिला पळवून लावतो आणि पळविल्यावर तिला एखाद्या कुंटणखान्यात विकून टाकतो. ज्या कुंटणखान्यातून ती कधीच निघून येत नाही नव्हे तर तिला येता येत नाही. वास्तविकता ही की तिची त्या कुंटणखान्यातून सुटका होत नाही.
जार्ज तसा तिला सांगायचा त्याबद्दल. ते तिला मार्गदर्शन असायचं. परंतु ते मार्गदर्शन असलं तरी तिला ते पटायचं नाही. कारण ती प्रेमात आंधळी झाली होती विवाहापुर्वी.
एकदाचा तो प्रसंग. जार्ज एका बागेत बसला होता. तशी त्याला सुप्रियाची आठवण आली. त्यातच आठवलं त्याला ते गतकाळात घडलेलं प्रेम. त्या गतकाळात सुप्रियाला तो मार्गदर्शन करीत असे. तसाच तो आठवला प्रसंग तिच्याशी मिलनाचा. तो बोलत होता तिच्याशी.
"अमुकाची मुलगी पळाली, तमूकांची मुलगी पळाली. समाजात नेहमी असे ताणे ऐकायला मिळत असतात. यात काही मुलींची तिच्या मायबापाची चक्कं हयात निघून जाते. परंतु जे गालबोट लागतं. ते गालबोट काही केल्या पुसलं जात नाही. लोकं दुषणे देवू शकतात. मोठमोठे नावबोटं ठेवू शकतात. परंतु त्या पळून जाण्यापुर्वी त्या का पळून गेल्या? याची साधी शहानिशा करीत नाहीत मायबाप आणि समाजही त्यावर विचार करीत नाही. हं, दुषणे द्यायला काय जातं? तोंड दिलं आहे विधात्यानं. म्हणूनच आपण कधीकधी विचार न करताही बोलत असतो काहीबाही. परंतु जी मुलगी पळून गेली. तिच्या पळून जाण्यामागे तिची काय मजबुरी होती. ते आपण कधीच समजून घेत नाही वा पळून जाण्यापुर्वी तिला वा तिच्या परीवाराला कोणतीच मदत करीत नाही. विचार असा की तिला वा तिच्या परीवाराला जर आपण तिच्या पळून जाण्यापुर्वी मदत केली तर ती मुलगी कदाचीत पळूनही गेली नसती. हेच वास्तविक सत्य आहे. अमूकांची मुलगी पळाली? असं लोकं बोलतात. मात्र ही मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. कारण आजच्या काळात विवाह संस्काराला भरपूर पैसा लागतो. शिवाय हुंडा पद्धती अमाप असल्यानं तेवढा पैसा मुलीच्या बापाजवळ नसतो. त्यातच दोनचार मुली असल्यास जे कर्ज होतं. त्या कर्जापायी बापाची आत्महत्या होते. असं चित्र प्रत्येक घरातील मुलगी अनुभवते. मग तिही विचार करते की माझा बाप आमच्या विवाहाच्या कर्जानं मरण पावू नये. वाटल्यास आम्ही पळून गेलो तरी चालेल. परंतु बाप जीवंत असावा. तद्नंतर त्या पळून जातात. मग त्या मुलींना बापही शिव्या घालतो आणि समाजही. परंतु हा फुटकळ समाज त्या विवाह सोहळ्यासाठी वाढलेल्या पैशाला वा हुंड्याच्या पद्धतीला शिव्या हासडत नाही.
अलिकडील काळात पाश्चात्य विचारसरणी आली. विदेशी लोकं आपल्या देशात यायला लागले आहेत. आपल्या देशातीलही लोकंही विदेशात जायला लागले आहेत. नवा काळ आला आहे व या नव्या काळात एकंदरीत हा बदलाव झाला आहे.
आपल्या देशात जसे विदेशी आले. तसेच विदेशी वारेही आपल्या देशात वाहू लागले. त्यातच विदेशी वारे हे विचारांचे वारे ठरले. ती पाश्चात्य विचारसरणी ठरली की त्या पाश्चात्य विचारसरणीनं सर्वच गोष्टी बदलल्या. त्या गोष्टी एवढ्या बदलल्या की त्या विचारसरणीनं बरेच प्रेमीयुगल प्रेम करायला लागले. मग विवाह, संस्कार आणि इतर साऱ्याच गोष्टी गौण ठरल्या व आश्वासनंच मोठी ठरु लागली. ते आश्वासन एवढं जबरदस्त व प्रभावशाली ठरलं गेलं की त्या आश्वासनाचे बळी ठरुन मुली भाळल्या. त्यानंतर त्या पळून गेल्या.
मुली पळून जातात. त्याचं कारण असतं त्यांच्या मायबापाचं रागावणं. मायबाप हे जुन्या पुरातन विचारांचे असतात व ते जुन्या पुरातन विचारांचे असल्याकारणाने मुलींचं एखाद्या मुलांवर प्रेम असलं तर ते आपल्या मायबापांना सांगू शकत नाहीत. त्या मुलींना आपल्या मायबापाची भीती वाटते. कदाचीत ते आपल्या विवाहाला मंजूरी देणार नाहीत असा त्यांचा विचार असतो. प्रेम हे भारी पडतं मायबापापेक्षाही. तो तरुण व्यक्ती आवडायला लागतो मायबापापेक्षाही. तोच हवाहवासा वाटतो मायबापापेक्षाही. त्याच विचारांच्या चक्रव्युहात फसून मुली पळून जायला लागतात. शिवाय दुसरं कारण असतं. ते म्हणजे अल्प वय. त्या अल्पवयात त्याची परियंती काय होते, हे त्यांनाही कळेनासं असतं.
मुली पळून जातात. त्याची कारणं बरीच आहेत. पाश्चात्य धोरण, अल्प वय, प्रेमाची आस, जोडीदारांचं आकर्षण, त्यातच त्याचं आश्वासन. मी चंद्र, तारे आणीन. मात्र पळून गेल्यावर साधारणतः तीन चार महिने झाले की ना चंद्र आणता येत त्यांना. ना तारे आणता येत. त्यांना जगातील वास्तविक परिस्थिती माहीत पडते. ज्याच्यावर विश्वास ठेवला, तो निकम्मा निघतो. पळून जाण्यापुर्वी व्यसनं नसतात त्याला आणि पळून गेल्यावर कित्येक व्यसनं. कधीकधी हा पळून नेणारा तरुण तिला मोलभावातही वेश्येच्या अंगणी विकून टाकतो. काय मिळतं प्रेमात? माणूसकीची हार. काही मुलींना तर संपुर्ण जीवनभर वेश्या म्हणून जगावं लागतं. काही मुलींना तर पळालेली मुलगी असे ताणे पडतात आणि त्यांच्या मायबापांना? अमूक अमूक व्यक्तींची मुलगी पळाली अमूक अमूकांच्या मुलासोबत. असे ताणे कित्येक पिढीपर्यंत पडत असतात.
काही काही मुली पळून जातात. ते मायबापांना न विचारुन. त्यात काही मुलींच्या मजबुऱ्या असतात. त्यातील एक कारण म्हणजे मुली ह्या मायबापांनी जन्माला घातलेल्या जास्त मुली व त्या मुलींवर खर्च करणारा बाप. कधी हा बाप विचार करीत असतो की मुलींचं लग्न करायचंय. मंडप, जेवन, ऐर, हळद. असा किती पैसा लागणार........मुली एवढ्या....... कसं करणार. पैसा कुठून आणणार. कर्ज काढावं लागणार.
त्या जास्त मुली. त्यांच्या विवाहाचा प्रश्न. त्यातच त्यांचं वाढणारं वय. मग घरातील वडीलधारी मुलीला चिंता वाटणार नाही तर काय? मग ती पळून जाणार नाही तर काय? काही मोठ्या मुली तर विवाहच करीत नाहीत. त्या विवाह न करता लहान बहिणीचे विवाह करतात. असे बरेच ठिकाणी चित्र दिसते.
मुली पळून जातात. यात त्यांचा गुन्हा नसतो. गुन्हा असतो त्यांच्या परिस्थितीचा. कधी एखाद्या मुलीला आई नसते तर कधी बाप नसतो. कधी त्यांच्या समाजात बराचसा हुंडा असतो तर कधी विवाहाचा पैसा जास्त असतो. तसं पाहिल्यास अलिकडे विवाह करतो जर म्हटलं तर एका साधारण विवाहात कितीही कमी प्रमाणात खर्च केला तरी, कमीतकमी एका लाखापेक्षा वर रुपये लागतात. हा पैसा काही काही मायबापाजवळ नसतो. मग मुली काय करणार? त्यांना मजबुरीनं पळून जावंच लागतं. त्यात त्या मुली आपल्या प्रारब्धाचा विचार करीत नाहीत आणि एखाद्या मुलांवर विश्वास ठेवून पळून जातात. त्यांना पळून गेल्यावर काय होवू शकतं? याचीही कल्पना असते. तरीही त्या पळून जात असतात.
आपला समाज फक्त नावबोटं ठेवू शकतो की अमुकांची मुलगी पळाली. जीवनभर त्याच गोष्टीचा तकादा लावत असतो. म्हणत असतो की अशाच मुलींच्या पळून जाण्यानं संस्कार तुटतो. परंतु विवाहात होत असलेल्या खर्चाबाबत कोणी बोलत नाही. बोलत नाही समाजातील उच्च शिकूनही घेत असलेल्या हुंड्याबाबत. आमच्या समाजात जो जेवढा शिकेल, त्याचा हुंडा मागतांना तेवढा दर. अशांनी उच्च शिक्षण घेवून काय उपयोग. मग मुली पळून जावून लग्न करणार नाही तर काय? त्याला मुळीच खर्च येत नाही. ना मायबापाची कटकट लागत. ना कोणाची? मुली पळून जातात. मायबापांचंच ओझं हलकं करतात. परंतु मायबाप काय करतात. मायबाप आपल्याच डोक्यावरील ओझे कमी करणाऱ्या त्या मुलींना शिव्या हासडत असतात. ज्या मुलींनी पळून जावून त्यांचे पैसे वाचवले व त्यांचाच फायदा केला.
मुली पळून जातात, त्यांना शौक होता पळण्याचा म्हणून नाही तर ते त्यांच्या मजबुरीनं. परंतु जेव्हा अशा मजबुऱ्या त्यांची वाट लावून जातात. तेव्हा मात्र मुलींना विचार येतो. तसाच तेव्हा विचार येतो की त्यांनी आपल्या मायबापांसाठी त्याग केला. आपल्या पळून गेल्यानं आपल्या मायबापांचा फायदाच केला. परंतु ते मायबाप बोलत नाहीत. खरं तर अशा मायबापानं आपला हेका सोडून आपल्या पळून गेलेल्या मुलीला जवळ केलं पाहिजे. परंतु समाजाचा विचार करुन ते आपल्याच अंगच्या तुकड्यांना दूर लोटवतात ना. खरंच याचाही विचार करायला हवा की तोच समाज त्यांच्या उताराच्या काळात त्यांना मदत करतो काय की ती मुलगी मदत करेल? कदाचीत एखाद्या वेळेस तशी समाजाची मदत घेवून परीक्षा घ्यायला हवी प्रत्येक मायबापानं. मगच पळून गेलेल्या आपल्या मुलींवर दुषणे उगाळायला हवीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज काळ बदलला आहे. पाश्चात्य विचारसरणीचे वारे देशात वाहू लागले आहेत. संस्कार बदलले आहेत. सुसंस्कार आहेत अजुनही. परंतु त्या सुसंस्कारावर काही ठिकाणी विवाह संस्काराचे वाढलेले पैसे गालबोट लावत आहेत. शिवाय हुंडापद्धतीचाही परिणाम त्यावर होत आहे. त्यामुळंच मुली जर पळून गेल्या तर त्याचा कोणत्याच आईवडीलानं बाऊ करु नये. त्या गोष्टीचं स्वागतच करावं. आपली मुलगी आपलं अंग आहे ना. मग आपल्या मुलीला जवळ करावं. मग समाजाचा कितीही रोष असला तरी आपल्या मुलीला टाकून देवू नये म्हणजे झालं. कारण समाज काहीही देत नाही. देते ते आपलीच मुलगी. तीच मुलगी आपली आपल्या उतारवयात आधारस्तंभ ठरत असते. परंतु समाज नाही. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. अन् समाजानंही त्यावर दुषणे देवू नये. अन् दुषणे द्यायचीच असतील तर समाजानं स्वतःच अशा मुलींना दत्तक घ्यावं. त्यांचे विवाहाचे प्रश्न सोडवावेत. त्यांच्या विवाहाला पैसा द्यावा. त्यांच्या हुंड्याचा प्रश्न सोडवावा. त्यांच्या मायबापावर विवाहासाठी होत असलेल्या कर्जाचे ओझे सांभाळावे. मग मुली पळूनच जाणार नाहीत. त्या मुली समाजाचंच ऐकतील व समाजाच्या मतानुसारच विवाह करतील. पळून जाण्याचाही अजिबात विचार करणार नाहीत. अन् समाज जर तसं करु शकत नसेल तर समाजाला त्या पळून गेलेल्या मुलींबद्दल बोलण्याचा काहीच अधिकार नाही. हे समाजानं लक्षात घ्यावे. जर समाजानं त्या मुलींना दत्तक घेतल्यावरही मुली पळून गेल्याच तर त्यात दोष मुलींचा असेल. परंतु समाज प्रत्येक मुलीला दत्तक घेईल तेव्हा ना. समाजाच्या अशा दत्तक घेण्यानं सामाजीक बदलावही होवू शकतो. शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकतात आणि मुलींचं उध्वस्त होणारं आयुष्य. परंतु तशी दत्तक घेण्याची मानसिकता समाजाची निर्माण होणे गरजेचे आहे. तशी मानसिकता जेव्हा प्रत्येकात निर्माण होईल. तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज सुधारला असं म्हणता येईल. असे जर झाले तर मग कोणाच्याच मुली पळून जाणार नाहीत व समाजही कोणाच्याच मुलीला पळून गेली असे कोणीही म्हणणार नाही हे तेवढंच खरं आहे.
समाज बदलाव होणे काळाची गरज आहे. तसंच मुलगी पळून गेली. ही मानसिकता बदलणे काळाची गरज आहे. जर समाजानं विवाह पद्धतीतील खर्च बंद केला आणि हुंडा पद्धती बंद केली तर कदाचीत मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. त्यातच बऱ्याचशा मुलींचे उध्वस्त होणारे आयुष्य वाचवता येईल यात शंका नाही. त्यादृष्टीनेच समाजानं पावले उचललेली बरी यातही शंका नाही.
त्याचा तो विचार. त्यानं तिचा मेंदू पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटत होतं की तिनं त्याचेसोबत पळून येवू नये. तिनं आपल्या वडीलाला तयार करावं विवाहासाठी. परंतु तो विवाह पारदर्शक जरी असला आणि त्याच्या मनात किंतू परंतु जरी नसला तरी ती म्हणत असे.
"माझे वडील माझं ऐकत नाहीत. मग मी तरी काय करु."
सुप्रियाचं असलेलं जार्जवरचं ते प्रेम. ते प्रेम तिला सोडून द्यावंसं वाटत नव्हतं. तिला तो फार आवडत असे आणि त्याला तिही आवडत असे. परंतु तो तरी काय करणार? तिचाही नाईलाज होता आणि त्याचाही. त्यानंतर ती पळून आली होती व त्याच्याशी विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर काही काळ बरं चाललं. मग वाद सुरु झाले दोघांत. ज्याची परियंती तिच्या सोडून जाण्यात झाली.
आज सुप्रिया त्याच्याजवळ नव्हती. ती कुठे होती हेही त्याला माहीत नव्हतं. मात्र जीवनाच्या अंतिम टप्प्यावर ती भेटेलच असं त्यालाही वाटत होतं. त्याच पुनर्मिलनाची तो जणू वाट पाहात होता.
जार्जला गरीबीची झळ माहीत होती. तसा तो लहानच होता. त्यावेळेस त्याला विचार यायचा. विचार यायचा की हा देश गरीबांचा की धनीकांचा. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण होतं विद्यमान अवस्थेत रेल्वेची असलेली व्यवस्था. विद्यमान अवस्थेत रेल्वेमध्ये सामान्य गरीब लोकांची संख्या जास्त असूनही त्यांचे डबे कमी होते. तसेच श्रीमंत लोकांचे डबे जास्त प्रमाणात होते. ज्याचा तिकीट दर सामान्यांना परवडणारा नव्हता. शिवाय त्यांची संख्या जास्त असल्यानं व डबे कमी असल्यानं रेल्वेच्या त्या सामान्यांच्या डब्यांत एवढी गर्दी राहायची की सामान्यांचा जीव घुटमळायचा. ते जार्जला आवडण्यासारखं नव्हतं. तसा तो त्याबद्दलही विचार करायचा. त्यावर तो भाषणं ठोकायचा. म्हणायचा,
"भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रतिज्ञा आपण रोजच घेतो शाळेत आणि अशीच प्रार्थना म्हणत म्हणत शिकत असतो. त्यावेळेस ती प्रार्थना म्हणतांना आपले बंधूप्रेम उफाळून येते. मग भारत हा धर्मनिरपेक्ष आहे असंही आपण म्हणतो. परंतु खऱ्या अर्थानं या देशाला आपण धर्मनिरपेक्ष समजतो का? याचं उत्तर नाही असंच येईल. त्यानंतर समता, बंधुता हे आपले मुल्य सर्वच बाबतीत वेशीच्या पलीकडे राहतात आणि भेदभाव वाढीस लागतो.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आणि संविधान आम्ही लहान राहतो, तेव्हापर्यंत ठीक आहे. परंतु पुढं मोठे झाल्यावर तीच प्रतिज्ञा आपणाला डोईजड जाते. मग ती प्रतिज्ञा डोईजड गेली की भेदभाव निर्माण होतो गरीब श्रीमंतीचा. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. उदा. द्यायचं झाल्यास रेल्वेचं देता येईल. रेल्वेमध्ये प्रवास करतांना धनिकांची रेल्वे व गरीबांची रेल्वे अशीच नावे रेल्वेला देता येतील. त्यातच गरीबांची आणि श्रीमंतांची जाण्याची संख्या सारखी असतांनाही रेल्वेच्या सोयीसुविधा या गरिबांसाठी वेगळ्या व श्रीमंतांसाठी वेगळ्या दिसतात. याचाच अर्थ असा की आम्ही आजही बदललेलो नाही.
रेल्वेचा जन्म मुळात इंग्रजांच्या काळातील. एप्रिल १८ इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर त्यावेळचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर २१ मैल धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली होती. त्यानंतर १८५४ मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. १८५४ साली ही गाडी मुंबई, ठाणे रेल्वे कल्याण पर्यंत वाढवली गेली. तेव्हाच देशाचा पहिला पूल, ठाणे व्हायाडक्ट आणि पहिला बोगदा, पारसिक बोगदा बांधण्यात आला. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केल्या गेला व मुंबई ते कोलकाता रेल्वेमार्ग पूर्ण झाला. १८७० मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. त्यात प्रसाधनगृहांची सुविधा होती, १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत ही सुविधा केली गेली व १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत ही सुविधा केली गेली. पहिली विद्युत रेल्वे, मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी धावली. इ.स. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१ मध्ये या सर्वसंस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. पहिली भूमिगत रेल्वे, कोलकाता मेट्रो, २४ ऑक्टोबर १९८४ रोजी धावली.
हा भारतातील रेल्वेचा इतिहास आहे. यात सांगीतलेल्या रेल्वेच्या सुविधेनुसार त्यावेळेस सर्वात आधी म्हणजेच १८९१ मध्ये ब्रिटीशांनी प्रथम दर्जाच्या डब्यात प्रसाधनगृहाची सुविधा केली. त्याचं कारण काय असावं? याबाबत थोडासा विचार केल्यास हे जाणवते की त्या काळात रेलेवेच्या या डब्यातून ब्रिटिश अधिकारी वा लोकंही प्रवास करीत असत. ते अंगाने गोरे होते व त्यांना ऊन्हं भावत नसे नव्हे तर उन्हाचा त्यांना भयंकर त्रास होत असे. म्हणून त्यांच्यासाठी प्रथम दर्जाचे असे वेगळे डबे रेल्वेगाडीला जोडण्यात आले होते. त्या डब्यातून काळ्या अर्थात भारतीयांना प्रवास करणे वर्ज्य समजण्यात येत असे. त्यांना खालच्या डब्यांत अर्थात आताच्या जनरल डब्यांत प्रवास करावा लागत असे. ज्यात आता गरीब लोकं प्रवास करतात आणि श्रीमंत लोकं आज वातानुकूलीत रेल्वेडब्यात प्रवास करतात. जणू त्यावेळचे ब्रिटिश म्हणजे हेच धनीक आहेत. अशा प्रकारची वागणूक आज रेल्वेडब्यातून प्रवास करतांना पाहायला मिळते. परंतु हे जे चित्र आज प्रत्येक भारतीयांना पाहायला मिळते. हे चित्र आजच्या भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानुसार विसंगत वाटते. कारण आज आपण स्वतंत्र झालो आहोत व एका स्वतंत्र देशात वास्तव्य करीत आहोत. शिवाय असं वास्तव्य करीत असतांना प्रत्येक नागरीकांना समानतेनं प्रवास करण्याचा अधिकार आहे. मग तो गरीब का असेना. असे असतांना कालच्या उन्हं न भावणाऱ्या ब्रिटीशांसारखे धनीक लोकं वातानुकूलीत डब्यांत आणि गरीब लोकं जनरल वा खालच्या डब्यात असा भेदभाव का केल्या जावा.
भारत हा सन १९४७ ला स्वतंत्र झाल्यानंतर व या भारतातील सर्वच नागरीकांना भारतीय संविधानानुसार समानता प्रदान केल्या गेल्यानंतर हा असा भेदभाव काय दर्शवतो? खरंच या भारतातील गरीब खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालाय का की या गरीबांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार?
विशेष सांगायचं म्हणजे आज देश स्वतंत्र जरी झाला असला तरी देशात कुठेही वावरतांना हाच देशातील श्रीमंत वर्ग गरीबांकडे पाहतांना अशा हीन दृष्टीकोनातून पाहात असतो. जणू त्या गरीबांनी फार मोठा गुन्हाच केलाय. त्यावेळेस असं वाटायला लागतं की काल काळे म्हणून गणले जाणारे व उकीरड्यावर राहणारे भारतीय असे नामोल्लेख ब्रिटीशांच्या तोंडून ऐकणारे भारतीय आज अचानक त्यांच्यात असं परीवर्तन का व्हावं की ते स्वतःला ब्रिटिश समजू लागावे व देशातीलच या गरीब बांधवांना तेच काळे भारतीय. खरंच आज जे श्रीमंत बनलेही असतील, ते कुणामुळं? याच गरीबांच्या श्रमामुळंच की नाही. हे गरीब राब राब राबतात. कोणी शेतात राबतो. कोणी कारखान्यात राबतो. कोणी दुकानात नोकर म्हणून राबतो. कोणी रिक्षा चालवून आपलीच कामं करतो. कोणी आपल्याच घरी मोलकरणीची कामं करतो. म्हणून हा मुठभर गणला जाणारा श्रीमंत वर्ग सुखी असतो. तो आपल्याला पैसा कमवून देतो आणि त्यातच ते सरकारी नोकर. ज्यांचे वेतन व भत्ते या गरीबांच्या रक्त आणि कष्ट या दोन्हीच्या मिश्रणातून मिळालेल्या पैशातून कररुपात भरणा केल्यावर मिळतात. खरं तर त्यांनी करच भरला नसता तर....... तर ना या सरकारी नोकरांना वेतन मिळालं असतं, ना भत्ते. तसेच जे राजकारणी स्वतःला मात्तबर राजकारणी समजतात. त्या राजकारण्यांचेही वेतन हीच गरीब मंडळी आपल्या भरणा केलेल्या करातून करतात.
महत्वपुर्ण बाब ही की आज उद्योगपती जरी मोठमोठ्या उद्योगातून जास्तीत जास्त पैसा जरी कमवीत असतील तरी त्यांना उद्योग उभारणीसाठी दिल्या जाणारा कर्ज रुपातील पैसा हा गरीबांच्या फुल नाही फुलाची पाकळी असलेल्या बँकेतील ठेवीतून. तेव्हाच हे उद्योजक अगदी श्रीमंत होतात. सरकारी नोकर श्रीमंत वाटतात आणि नेतेही स्वतःला श्रीमंत समजतात. परंतु ते समजण्याचं कारण नसावंच. कारण खऱ्या अर्थानं श्रीमंत शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे धंदेवाले असतात. परंतु ते स्वतःला श्रीमंत समजत नाहीत. कसेही राहतात. कसेही वावरतात. कारण त्यांना गर्व नसतोच. म्हणूनच आपल्याला त्यांची किळस येते. त्यांनी हात धुतले नसतील वा ते स्वच्छता पाळत नसतील तर आपल्याला किळस येते. परंतु ज्या मोठ्या हॉटेलात स्वच्छ वेटरच्या हातानं आपण जेवन जेवतो ना. तो आपल्या पाठीमागं काय करतो, याची कल्पनाही नसेल आपल्याला. ज्या ठिकाणी जेवन बनवलं जातं. त्या ठिकाणी माशा अन्नावर बसलेल्या असतात. कधी मच्छरं अन्नात पडून मरण पावलेले असतात. कधी एखादे किडेही. परंतु अन्न हे ग्रेव्हीचं असल्यानं आपल्याला लक्षात येत नाही. कधी दुधातून मेलेली उदरं वा एखादे जीव काढून टाकून ते दूध वापरलं जातं. मग आपल्याला विषबाधा होते. परंतु आपण त्या उच्चभ्रू हॉटेलाला दोष देत नाही. पटकन फुडपायझन झालं म्हणून दवाखान्यात जातो.
ते विषारी अन्न आपल्याला चालतं. कारण सुटबुटात वाढणारे असतात. त्या अन्नात विष जरी असलं तरी आपल्याला ते अन्न, वाढणारी मंडळी स्वच्छ व नीटनेटके आणि भारदस्त कपडे परिधान केलेले असल्यानं चालतं आणि जे तसे कपडे घालून अन्न वाढत नाहीत. त्यांच्याबाबत आपल्या मनात तेवढाच तिटकारा असतो.
खरंच भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आम्ही दररोज म्हणतो. सारे भारतीय आमचे बांधव आहेत. असेही रोजच म्हणतो. संविधान म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतो. परंतु त्यानुसार आपण एकमेकांशी वागतो का आणि वागत नसेल तर का वागत नाहीत तसे? हे दोन्ही प्रश्न विचार करायला भाग पाडणारे आहेत. खरंच आज जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला काय की पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढण्याची गरज आहे? गरीब हा देखील घटक श्रीमंतांसारखाच स्वतंत्र झाला असतांनाही रेल्वेगाडीत किंवा इतर ठिकाणी का त्याला तुच्छतेची वागणूक मिळते? अन् आईच्याच गर्भात नवही महिने प्रत्येक जण घाणीतच राहिलेला असतांना आज जन्मानंतर स्वतःला स्वच्छ तरी का समजतात? शिवाय जो कोणी श्रीमंत, गरीब असा भेदभाव करीत असेल, स्वतःला स्वच्छ समजत असेल, तो तरी आईच्या गर्भात नव महिन्याच्या ऐवजी बारा महिने राहिला असेल काय? त्याला रक्त, मांस वा हाडाऐवजी एखादा वेगळाच अवयव असतो का की त्याची एकंदर ठेवणच वेगळी असते? हे सर्व प्रश्न विचार करायला लावणारेच आहेत.
महत्वाचं म्हणजे प्रत्येकालाच रक्त, मांस व हाड असून ते सारखेच आहेत. प्रत्येकच जीव आईच्या गर्भात नवच महिने राहतो. कुणीच विशेष असा व्यक्तीही बारा महिने आईच्या गर्भात राहात नाही. मग हा गरीब, हा श्रीमंत असा भेदभाव का असावा? हं, नशीबानं प्रत्येक माणसांचा जन्म हा गरीब श्रीमंतीत होतो. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या जन्माची शिक्षा म्हणून त्यांची हेळसांड करावी? आपण अशी हेळसांड करु नये. प्रत्येकालाच आपला भाऊ समजावे. त्याला बांधवांसारखेच वागवावे. कारण आपण लेकरं आहोत. त्याही एका आईची. जी आपली आई आपल्याला पोषते. विसावा देते व आपल्या सर्व इच्छा पुर्ण करते. ती आई म्हणजे आपली भारतमाता होय आणि तिची सर्व लेकरं मग त्यात गरीब, श्रीमंत, हिंदू, मुसलमान, काळा, गोरा, उच्च, नीच, स्पृश्य अस्पृश्य. हे देखील आपले बांधवच आहेत. ज्यात सर्व धर्माची, सर्व जातीची, सर्व स्तराची, सर्व वर्णाची, सर्व रंगाची मंडळी येतात. तो गेला ब्रिटीशांचा काळ. कारण तेव्हा आपण गुलाम होतो व ती मंडळी आपल्याला रेल्वेच नाही तर इतर सर्व ठिकाणाहून आपली हेळसांड करीत आपल्याला गुलाम अशी वागणूक देत होती. आज स्वतंत्र आहोत. म्हणूनच आपल्याला रेल्वे असो की इतर कोणतेही विभाग असो, त्यात अतिशय सौहार्दपुर्ण वागणूक मिळावी. स्वतंत्रपणे वावरता यावं. भेदभाव नसावा. तशीच रेल्वेचीही उभारणी तशाच पद्धतीनं व्हावी. त्यात गरीबांसाठी जनरल व श्रीमंतांसाठी वातानुकूलीत अशी व्यवस्था असू नये हे तेवढंच खरं. कारण आपण सर्व स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरीक आहोत व प्रत्येकालाच स्वतंत्रपणे वागण्याचे व मुक्त विहार करण्याचे स्वातंत्र्य आहे यात शंका नाही."
जार्ज आज एक राष्ट्राध्यक्ष बनला असला तरी त्याला आजही गरीबांची आणि गरीबीची जाणीव होती. त्यानं आपले बरेचसे दिवस गरीबीत काढले होते. त्याला चीड होती गतकाळात होवून गेलेल्या राष्ट्राध्यक्षांची. गतकाळातील राज्यकर्त्यांनी केवळ पुंजीपती वर्गालाच मोठं केलं होतं, नव्हे तर त्यांचं बरंचसं ऋण माफ केलं होतं. शिवाय त्यांना कमवता यावं म्हणून त्यांनी देशातील व्यवहारांची अशी आखणी केली होती की ज्यातून त्यांचा लाभ होईल. शिवाय सर्वसामान्य गरीब लोकांच्या जगण्याचं साधन असलेला दुरध्वनी...... त्या दुरध्वनीयंत्राला गतकाळात झालेल्या राष्ट्राध्यक्षांनी तो सामान्य जरी झाला असला तरी त्याचे रिचार्ज महाग केले होते. मनोरंजनाचे साधन असलेल्या टिव्हीलाही त्यांनी अति प्रमाणात शुल्क लावले होते. त्यामुळंच सर्वसामान्य लोकं टिव्ही पाहू शकत नसत आणि मोबाईलचा रिचार्ज परवडत नसल्यानं ते भरु शकत नसत. त्यामुळंच त्यात बदलाव करता यावा यासाठीच आज जार्ज निवडणूक लढवत होता.

************************************************मनोगत निवडणूक पुस्तकाविषयी