Ninth Floor in Marathi Horror Stories by प्रियांका कुटे books and stories PDF | नववा मजला

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

नववा मजला

मुंबई सारख्या ठिकाणी सुंदर झाडी असलेले एक लोकेशन, छान हवा सुरु होती, सगळे काही नेहमीप्रमाणे सुरू होते, जो तो आपल्या कामात व्यस्त होता, समोरच एक कर्मशियल टॉवर दिमाखात उभे होते. ज्यातून नोकरदार मंडळी घराच्या दिशेने निघाले होते, काही जण अगदी समोरच्याच रेसिंडेन्शयल टॉवर मध्ये वास्तव्यास होते. आपल्या इच्छित मजल्याचे बटण दाबून सगळेच लिफ्ट ने जात होते. त्यात रितेश हा नवव्या मजल्यावर राहत होता. तो त्याच्या घरी आला दार उघडून काही वेळ पंख्याखाली बसल्यावर तो हात पाय धुण्यासाठी न्हाणीघरात गेला, पाण्याचा खूप मोठा आवाज त्याला आला, तसे त्याने खिडकीचे तावदान उघडून पाहिले, त्याच्या न्हाणीघराच्या खिडकीबाहेर मोठा पाईप फुटून वाहत होता, आणि त्यामुळेच न्हाणीघरात पाणी येत नव्हते. रितेश पुरता थकला होता, तरीही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्याने सेक्रेटरी ऑफिसमध्ये धाव घेतली, " सबनीस साहेब, माझ्या न्हाणीघराच्या मागचा पाईप फुटला आहे, पाणी खूप वाहतय, जरा एखाद्या पाईप दुरुस्तीवाल्या ला बोलावून घ्या." रितेशने त्याची कथा सबनीस समोर इंत्भूत मांडली.

" ठिक आहे, मी पाठवतो एखाद्याला तुम्ही निश्चिंत राहा ढेरंगे साहेब." सबनीस ने रितेश ला तेवढ्याच शांततेत उत्तर देऊन पुन्हा पाठवले.

एक जबाबदार सेक्रेटरी म्हणून सबनीस फार उत्तमरित्या सोसायटीचे काम करत होता. त्याच्या याच गुणांमुळे दरवेळी तोच सेक्रेटरी चे पद भूषवत होता.

रितेशने किचन च्या बेसिनमध्ये घामाजलेला चेहरा स्वच्छ केला, तो काही वेळ बसून होताच की दाराची बेल वाजली, समोर एक लाल जॅकेट घालून एक तरुण उभा होता, ज्याच्या हातात प्लबिंगचे साहित्य होते, " आप ही ढेरंगे साहब हझ क्या!" त्याने रितेश कडे बघत विचारले.

" हा , मै ही हू रितेश ढेरंगे, आप वो रिपेअर के लिए आये हो न के पाईप के?" रितेशने खातरजमा करण्यासाठी त्याला विचारले.

" हा जी, मेरको सबनीस साहब ने भेजा है, किधर है आपका पाईप!" तो दुरूस्ती ला आलेला मुलगा खिडकीतून बाहेर बघत बोलू लागला, तसे रितेशने त्याला न्हाणीघर उघडून बाहेरचा नजारा दाखवला.

" अरे साहब, ये तो बहुत पाणी है, मै अकेला नही कर पायेगा, इमर्जन्सी हेल्प लगेगी मेरेको." तो इसम आता रितेश कडे वळून बोलला, " इसमे जान का खतरा है साहब."

रितेश त्याला बोलला, " तू कर देना, कहा से लाएगे इमर्जन्सी सर्विस, उनका अलग चार्ज रहेगा, कौन करते बैठेगा सब, और तुझे कुछ नही होगा, इतना हट्टाकट्टा है तू, चढजा, तुझे डबल दाम देता हू मै." रितेशच्या अशा बोलण्यावर त्याला काही पर्याय उरला नाही, पैसा सगळ्यांना प्रिय असतो.

त्या इसमाने आधी आतूनच काही करता येते का ते पाहिले, त्याने कॉक बंद करून आधी पाणी थांबवले आणि तो खिडकीवर बसूनच पाईप चेंज करण्याचे काम करू लागला, पाईपचा वरपासूनचा भाग खराब झाला होता, त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार अख्खा पाईप एका झटक्यात काढला आणि त्याआधी सिक्युरिटी आणि सेक्रेटरी ला सांगून पाण्याचे मेन स्विच बंद केले होते. आता गच्चीवरून खालपर्यंत तो पाईप बदलण्याची गरज होती, कारण सगळाच पाईप खराब होता, सेक्रेटरी सबनीस सुध्दा त्या कामासाठी तयार झाला, आता सरजूला सोसायटी आणि रितेश दोघांकडून पैसे मिळणार होते, बारा मजल्याची इमारत होती , ज्यात रितेशचा नववा माळा होता, सरजू आता गच्चीवर जाऊन गच्चीवरून खाली पाईप सोडत व्यवस्थित स्वतःला बांधून घेत बाराव्या मजल्यापासून पाईप फिक्स करत खाली येऊ लागला, दहाव्या माळ्यापर्यंत सगळे नीट पार पडले, नवव्या माळाच्या खिडकीत रितेश उभाच होता, तावदान अर्धवट उघडे होते, पाणी जास्त वाया गेल्याने खिडकीबाहेरची ग्रील सैल झाली होती, साधारण एका मजल्यावर पंधरा मिनटांच्या जवळपास वेळ जात होता, व्यवस्थित पाईप फिक्स करेपर्यंत. नवव्या मजल्याच्या ग्रीलवर पाय ठेकवत असताना सरजूला जाणीव झाली, ग्रील सैल झाल्याची, स्वतः जवळ असलेल्या सामानाने ती त्याने त्याच्या साईड ने ठिक केली आणि पुन्हा पाईप लावू लागला. दोन्ही साईटने खिळे आणि पट्टी लावून झाले, पण त्याचा भार त्या सैल झालेल्या ग्रीलवर पडल्याने एक जोरात धक्का त्या ग्रील ला बसला आणि ती खाली येऊन कोसळली, ग्रीलच्या धक्क्याने हातातील मोजून पाईप कापण्यासाठी सुरीने त्याचे संरक्षण दोर कापली गेली आणि ग्रील सोबत तो ही खाली पडला, रितेश तावदानामधून ते पाहत होता, तावदान अर्धच उघडे असल्याने ऐनवेळी त्याला सरजू ला हात देता आला नाही.

सरजू रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला, संध्याकाळच्या थंडाव्याचा आनंद घेणारे, शाळेतून सुटलेल्या मुलांचा कल्ला, क्रिकेट खेळणारे सोसायटीचे मुले सारे काही त्या आवाजाने स्तब्ध झाले, जो तो धावत त्या ठिकाणी आला, त्यातील एकाने त्वरित रूग्णवाहिका बोलवली. सरजूची काही हालचाल होत नव्हती, रूग्णवाहिका काही वेळात हजर झाली, आणि सरजूला तिथून घेऊन गेली. रूग्णवाहिका गेल्यावर रितेश खाली आला, त्याने पाहिले की खूप रक्तस्राव झाला होता, त्याला आता खरच काही क्षणात त्याच्याशी चांगला वागणाऱ्या त्या सरजूची चिंता होऊ लागली.

जवळच्या रूग्णालयात सरजूला नेले असले तरी अति रक्तस्रावामुळे सरजू इमारतीच्या अंगणातच मरण पावला होता, रितेशला ही गोष्ट कळल्यावर तो मात्र बैचेन झाला, त्याला आता त्याच्याच घरात सरजूचे आवाज येऊ लागले, त्याला वेड लागायचे बाकी होते, " हे बघ, माझी चूक नाही यात, तूच सुरी नीट हाताळली नाही." रितेश एका कोपऱ्यात बघून जोरजोरात ओरडत होता.

" आपका ग्रील खराब था साहब, इसलिए सब हुआ." एक घोगरा खर्जातला आवाज त्याच कोपऱ्यातून बाहेर आला. रितेश ने त्या कोपऱ्यात जाऊन आता आणखीन आवाज वाढवला, तसे तो घोगरा आवाज म्हणाला, " आपको जाणणा है कितनी तकलीप होती है, नीचे गिरकर, आप सह पाओगे."
असे ऐकताच एक उडी रितेशने नवव्या मजल्यावरून खाली मारली.

सकाळी जेव्हा सिक्युरिटीने रितेशने रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पाहिले, तो खूप घाबरला आणि सगळ्यांना जमा करू लागला. रितेशचे मागे , पुढे कोणीही नव्हते, सोसायटीने त्याचे सोपास्कार केले आणि रितेशची खोली कुलूपबंद केली.

पण आजही दरवर्षी त्याच वेळेला ती घटना पुन: घडत असते. रितेश आणि सरजू दरवर्षी त्या नवव्या मजल्यावर च्या खोलीत भेटत असतात आणि पुन्हा पुन्हा त्यांचे संपलेले जीवन संपवत असतात.

समाप्त

पिकू
😘