Mala Space havi parv 1 - 59 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५९

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५९

मला स्पेस हवी पर्व १ भाग 59
 
मागील भागात आपण बघितलं की रमण शहाला काहीतरी सुचतं ते काय सुचतं ते आता या भागात बघू
 
सकाळी नेहा आज जरा फ्रेश वाटत होती तरीही पाचसहा पावलं चालल्यावर तिला दमल्यासारखं व्हायचं. अपर्णाला काळजी वाटली म्हणून तिने डॉक्टरने फोन करून विचारलं.
 
“ डाॅक्टर नेहा मॅडमना अजूनही थकवा आहे.”
 
तेव्हा डॉक्टर म्हणाले,
 
“ व्हायरलचा विकनेस खूप दिवस टिकतो. त्यांची काळजी घ्या.”
 
 
नेहाला सकाळी समोरच्या खोलीत बसून टीव्ही बघावा असं आज वाटत होतं. तसं तिने अपर्णाला बोलून दाखवलं,
 
“ अपर्णा मला समोरच्या खोलीत जाऊन बसावसं वाटतय पण दमल्या सारखं होतय.”
 
अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम काही हरकत नाही. आता तुम्ही फ्रेश व्हा चहा आणि बिस्कीट घ्यायला समोरच्या खोलीत या. तिथे तुम्ही टीव्हीवर न्यूज बघा. त्यानंतर हवं असेल तर तिथेच झोपा.”
 
 
यावर नेहा म्हणाली,
 
“ नको नको. मी आधी चहा बिस्किट घेऊन इथेच थोडा आराम करते. कारण बसूनही दमल्यासारखं होतं.नंतर समोरच्या खोलीत जाईन. “
 
अपर्णा म्हणाली,
 
“ ठीक आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं करू.”
 
नेहाचं चहा बिस्कीट आटोपल्यावर नेहा खोलीतच पलंगावर बसली होती. नाश्त्यानंतर गोळ्या असल्याने अपर्णा नाश्ता तयार करायला स्वयंपाक घरात गेली. एक दहा मिनिटं बसल्यानंतर नेहाने हळूच पलंगावर झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला जमत नव्हतं म्हणून तिने अपर्णाला हाक मारली. अपर्णा घाईघाईने बेडरूम मध्ये आली.
 
“ काय झालं मॅडम?”
 
“ अगं मला थकल्यासारखं होतंय म्हणून झोपायचा मी प्रयत्न केला पण मला आडवं होतं येत नाही. माझा तोल जातोय.”
 
“ नको नको सध्या थकवा असताना स्वतःहून काही करू नका. उगीच धडपडाट व्हायचा.”
 
अपर्णाने हळूच नेहाच्या मानेखाली हात देऊन हळूहळू नेहाला पलंगावर झोपवलं. अपर्णाने तिच्या अंगावर नीट पांघरूण घातलं आणि ती पुन्हा स्वयंपाक घरात आली.
 
अपर्णांने आज विचार केला की नेहाला तिखट मिठाच्या पुऱ्या आवडतात असं मागे ती म्हणाली होती आज तिखट मिठाच्या पुऱ्या करूया. जरा मॅडमच्या तोंडाला चव येईल. अपर्णांनी तिखट मिठाच्या पुऱ्यांचं पीठ भिजवलं आणि पुऱ्या करायला घेतल्या.
 
पुऱ्या तळत असताना तिला सतत मनातून वाटत होतं की नेहा मॅडमसारखी आपल्याला मैत्रीण भेटली. किती छान वाटलं. आज पर्यंत इतकी चांगली मैत्रीण आपल्याला कधीच मिळाली नाही. आपल्याला ही खंत होती तीच परमेश्वराने पूर्ण केली.
 
नेहाची सेवा करताना आपल्याला सतत ते जाणवतं. पुऱ्या झाल्यानंतर सगळी झाग पाक करून ओटा आवरून अपर्णांनी गॅसवर चहा गरम करत ठेवला. तेवढ्यात बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल म्हणून गॅस बंद करून अपर्णा समोरच्या खोलीत आली.
 
व्ह्यू फाईंडर मधून बघितल्यावर ती चमकली. दारासमोर रमण शहा उभा होता. तिला आश्चर्य वाटलं. रमण शहा कसा आला ? आपण तर याला घरचा पत्ता दिला नाही मग याला कुठून कळला? रमण शहानी पुन्हा बेल वाजवली तेव्हा विचारातून बाहेर येऊन अपर्णांनी दार उघडलं.
 
दारात रमण शहाला बघून अपर्णा तीन ताड उडायचीच बाकी राहिली होती. रमण शहा अत्यंत थकलेला आणि अत्यंत घाबरलेला असा विचित्र चेहऱ्याने उभा होता. तिला कळेना काय झालं याला?
 
 
“नेहा मॅडम कुठे आहेत?”
 
 
दारातच रमण शहाने विचारलंं. अपर्णाने त्याला आत घेऊन दरवाजा लावला. समोरच्या खोलीत रमण शहाला बसायला सांगून अपर्णा म्हणाली,
 
“मी मॅडमला उठवते.”
 
अपर्णा आत मध्ये आली आणि हळूच नेहाला हलवून म्हणाली ,
 
“मॅडम उठता का?”
 
तेवढ्यात तिला मागून आवाज आला ,
 
“ नेहा मॅडम कसं वाटतंय? बरं नाही वाटत का तुम्हाला?”
 
त्या आवाजाने चमकून अपर्णांने मागे बघितलं तर रमण शहा सरळ नेहाच्या बेडरूम मध्ये आलेला होता. अपर्णाला राग आला ती रमण शहाला म्हणाली,
 
 
“सर तुम्ही जरा वेळ बाहेर बसा. मी मॅडमना घेऊन येते.”
 
त्यावेळेला रमण शहाच्या लक्षात आलं की आपण एकदमच आपल्या खोलीत शिरलो. हे बरं नाही केलं. तसं
 
“ सॉरी “
 
म्हणून रमण शहा समोरच्या खोलीत जाऊन बसला. नेहाला झोपेतून उठताना काहीतरी आवाज आला पण तिला कळलं नाही नेहाने अपर्णाला विचारलं ,
 
“ अग दुसरं कोण आलंय? मला पुरुषाचा आवाज वाटला?”
 
“ हो. मॅडम रमण शहा आले आहेत तुम्हाला भेटायला.”
 
अपर्णा म्हणाली. नेहा बसल्या जागी चमकली.
 
“रमण शहा ! कसे काय आले येथे भेटायला ?”
 
यावर अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम काल त्यांचा फोन आला होता तुम्हाला भेटायला यायचय म्हणून .पण मी त्यांना तुमचा पत्ता दिला नाही कारण मी तुम्हाला विचारलं नव्हतं. तरी कसे काय आले मलाही कल्पना नाही.”
 
“ठीक आहे आले आहेत तर मी भेटून घेते”
 
नेहा म्हणाली. नेहा हळूहळू चालत अपर्णा बरोबर घेऊन समोरच्या खोलीत आल्याबरोबर रमण शाह उठून उभा राहिला आणि विचारलं,
 
“ मॅडम काय झालंय? “
 
रमण शहांचा थकलेला चेहरा बघून नेहा चकीत झाली.
 
“ मला व्हायरल झालं आहे. पण रमण शहा तुम्ही इतके थकलेला का दिसताय? “
 
रमण शहा मधील तो रूबाबदारपणा नाहीसा झालेला दिसत होता. त्यांचे खांदे पार वाकले होते. डोळे निस्तेज आणि थकलेले दिसत होते.
 
नेहा आणि अपर्णा दोघीही रमण शहाचं बदललेलं रूप बघून चकीत झाल्या होत्या. अचानक रमण शहाच्या डोळ्यातूनं घळघळ पाणी यायला लागलं. अपर्णा आणि नेहा दोघींना आता कळेना रमण शहाला सावरायचं कसं?
 
“ सर तुम्ही खुर्चीवर बसा.”
 
नेहाने असं म्हणताच रमण शहा कसाबसा खुर्चीवर बसला. अपर्णाने पटकन स्वयंपाक घरात जाऊन पाणी आणून रमण शहाला दिलं. रमण शहाने पाण्याचा ग्लास हातात घेतलं पण तो टक लावून नेहकडेच बघत होता.
 
अपर्णाने शेवटी म्हटलं
 
“ सर पाणी प्या.बरं वाटेल.”
 
नेहाला शहाची नजर नकोशी वाटली. पण ती बोलू शकली नाही. पाणी पिऊन रमण शहा म्हणाला,
 
“ तुमच्यामुळे माझी ही अवस्था झालीआहे.”
 
आपर्णा आणि नेहा दोघीही रमणचं हे बोलणं ऐकून चमकल्या.
 
“ माझ्यामुळे? मी काय तुम्हाला केलं?”
 
नेहाने विचारलंं . तिच्या आवाजात खूप थकवा जाणवत होता. तेव्हा रमण म्हणाला,
 
“मी तुम्हाला किती फोन केले तरी तुम्ही फोन उचलला नाही. माझे मेसेजस वाचले नाहीत. मी घाबरून गेलो. मी जेव्हा अपर्णा मॅडमना फोन केला तेव्हा कळलं मला की तुम्हाला बरं नाही. तेव्हा मी आणखीनच घाबरलो. मी अपर्णा मॅडमना तुमच्या घरचा पत्ता विचारला तर त्यांनी नाही दिला. मी खूप अस्वस्थ झालो होतो.”
 
“ कुठे मिळाला तुम्हाला माझा पत्ता?”
 
“ हे घर स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या नावाने भाड्याने घेतले आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी ऑफिसमध्ये फोन करून तुमचा पत्ता विचारला आणि लगेच इथे आलो.”
 
रमणच्या या बोलण्याने नेहा आणि अपर्णा दोघीही चकीत झाल्या. अपर्णाने मनातल्या मनात रमण शहाच्या चतुरपपणाला दाद दिली.
 
“ तुम्ही एवढ्या तातडीने कशाला आलात? तुम्हाला बरं नाही असं दिसतंय तुमच्या कडे बघून.”
 
नेहा म्हणाली.
 
“ मॅडम मला चार दिवसांपासून ताप येतोय. तुमच्या बद्दल काहीच कळत नव्हतं. नंतर तुम्हाला बरं नाही कळल्यावर भेटायला यायची इच्छा असूनही येता येत नव्हतं कारण तुम्ही कुठे राहता मला माहित नव्हतं. आज पत्ता मिळाला तसा मी लगेच आलो.”
 
 
हे बोलताना रमणच्या आवाज कापत होता. त्याच्या या बोलण्यावर दोघींनाही कळेना काय बोलावं.तरी नेहा म्हणाली,
 
“ तुम्ही बरेच झाल्यावर आले असते. आत्ता उगीच त्रास करून घेतला.”
 
यावर रमण पोटतिडकीने म्हणाला,
 
“ तुम्हाला माहिती नाही मी तुम्हाला भेटायला किती धडपडत होतो. मॅडम मी तुमच्यात गुंतलो आहे. मी तुमच्यावर प्रेम करू लागलोय. तुम्हाला कशी कळेल माझ्या मनाची अवस्था?”
 
रमण रडायला लागला. नेहा स्तंभित होऊन रमणकडे बघत होती. अपर्णाही गोंधळली.
 
 
अपर्णाच्या मनात विचार आला की रमण शहा नेहा मॅडम मध्ये गुंतले आहेत पण जर नेहा मॅडम पण त्याच्यात गुंतून गेल्या तर मग मात्र काही खरं नाही. पण अपर्णा यावर काही करू शकत नव्हती. नेहा ने खूप शांतपणे म्हटलं
 
“सर सॉरी माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. पण हे तुम्ही चुकीचं केलं मला साधं व्हायरल झालाय त्याची तुम्ही स्वतःला एवढी शिक्षा का दिली ?”
 
त्यावर रामण शहा उठून उभा राहिला आणि नेहाच्या बाजूच्या खुर्चीवरून बसला आणि म्हणाला
 
 
“मॅडम मी खरंच तुमच्यात गुंतलो आहे.”
 
“सर तुम्ही काय बोलता आहात हे तुम्हाला कळतय का?”
 
नेहाच्या या बोलण्यावर रमणने परत आपलं बोलणं सांगितलं,
 
 
“ मी तुमच्यावर प्रेम करू लागलोय हे तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे खरय. तुमच्यात गुंतून गेलो आहे म्हणूनच मला खूप त्रास झाला. म्हणून माझी तब्येत खराब झाली. मला जेवण सुचत नाही. झोप येत नाही. इतका त्रास होतोय.”
 
आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा पाणी गळायला लागलं. अपर्णाला खूप आश्चर्य वाटल कारण इतक्या वर्षात अपर्णांनी रमणला अशा अवस्थेत कधीच बघितलं नव्हतं. रमण नेहमी रुबाबदात चालायचा. रुबाबदारपणे बोलायचा आणि त्याच्या डोळ्यात तर कधी पाणी बघितलं नव्हतं. त्यामुळे अपर्णालाही मनातून जरा कसंकसंच झालं .
 
 
नेहाला हे सगळं समजायला आणि तिच्या मेंदूपर्यंत पोचायला वेळ लागला. कारण ती मुळतच थकलेली असल्यामुळे तिचा मेंदूही फार काम करत नव्हता.
 
रमण शहासाठी अपर्णाने चहा करून आणला.
 
 
“सर तुम्ही चहा बिस्किट घ्या. तुम्ही खूप दमला आहात. तुमच्या अंगात ताप आहे. चहा घेतल्याने जरा बरं वाटेल.”
 
अपर्णा म्हणाली. रमणने थरथरत्या त हाताने चहाचा कप घेतला. चहा पिताना रमणचा हात चांगलाच थरथरत होता. या सगळ्या गोष्टींचं अपर्णाला खूप आश्चर्य वाटलं. हे असं काय झालं ? इतका कसा काय रमण नेहा मॅडम मध्ये गुंतला? इतकं त्याला बरं नाहीये तरी तो इतका धावत इकडे मॅडमना भेटायला आला.
 
 
हे सगळे जरा वेगळं वाटत होतं तरीही अपर्णाने लक्ष देऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिल. तेव्हा तिला पटलं की हा खरच मॅडम मध्ये गुंतलेला आहे.
 
“ चार दिवसांपासून अंगात ताप आहे. मी कोणाला सांगत नाही. मी तसाच ऑफिसला जातो, तसाच घरी येतो. नेहा मॅडमचा सतत विचार करत असतो. त्यामुळे मला जेवणही जात नाही.”
 
हे ऐकून नेहाने पटकन साॅरी म्हटलं तसं रमणने चटकन नेहाचा हात पकडून म्हटलं,
 
 
 
 
“ नेहा मॅडम तुम्ही सॉरी म्हणू नका. मी तुमच्यात गुंतल्या मुळे मला त्रास झाला. तुमच्यात गुंतण्यापूर्वी मी तुमची परवानगी नव्हती घेतली. तुम्ही साॅरी का म्हणता? मला तुमची हुशारी आवडली. मला तुमचं बोलणं आवडलं. मला तुमची काम करण्याची पद्धत आवडली. मला तुमच्या सगळ्याच गोष्टी आवडल्या. तुमचा स्वभाव पण आवडला. आयुष्यात माझ्या भोवती अनेक बायका माझ्यावर इम्प्रेशन मारत फिरतात पण मी इतर बायकांमध्ये असा गुंतलो नाही.मला तुम्ही जसं कधीच करताना आढळला नाहीत म्हणून तुम्ही मला आवडलात.”
 
फडफड बोलून रमण शहा गप्प झाला .
 
रमणने इतका वेळ नेहाचा हात आपल्या हातात धरून ठेवला होता तो कसा सोडवावा नेहाला कळलं नाही. तरी नेहाने हळूच आपला हात रमणच्या हातातून काढून घेतला.
 
त्याच्या हातांची अस्वस्थ हालचाल होत होती. अपर्णा आणि नेहा चकित झाल्या. यानंतर रमण शहा म्हणाला,
 
 
“मॅडम तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमची तब्येत चांगली राहायला पाहिजे.”
 
यावर नेहा म्हणाली,
 
“ तुम्ही स्वतः आजारी आहात. तुम्ही आता घरी जा आणि स्वतः काळजी घ्या. मी ऑफिस जॉईन केल्यावर आपण भेटू. तुम्ही पुन्हा येथे येऊ नका. स्वतः आधी पूर्णपणे बरे व्हा.”
 
रमण शहा नेहाकडे बघून हसला आणि हळूहळू खुर्चीवरून उठला. त्याचं हसणं केविलवाणं होतं. रमण शहाची रुबाबदार चाल नाहीशी झाली हे तिलाही जाणवलं. रमण शहाच्या तब्येतीला आपण जबाबदार आहोत याचं नेहाला वाईट वाटलं.
 
 
रमण शहा अत्यंत धिम्या गतीने लिफ्टकडे चालला होता. मध्येच त्याचा तोल जात होता. ते बघून अपर्णाला रमण शहाची किव आली आणि काळजीही वाटली. अपर्णाने दार लावलं.
 
 
“ अपर्णा रमण शहा आज ओळखायला आला नाही. माझ्यामुळे त्याची तब्येत खराब झाली बघून मला कसतरी वाटतंय.”
 
“ मॅडम तुम्ही उगीच मनाला लावून घेऊ नका. रमण शहांबाबतीत जे घडलं ते तुम्ही त्यांच्याशी वाईट वागला म्हणून नाही. तो त्याच्याच मुळे आजारी झाला. तुम्हाला बरं नाही तुम्ही स्वतःची काळजी घ्या.”
 
अपर्णाने नेहाला समजावलं. इतका वेळ यात गेला की अपर्णाचा स्वयंपाक राहिला.
 
“ मॅडम तुमचा अजून नाश्ता नाही झाला. मी तुम्हाला आवडतात म्हणून तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या आहेत. त्या खाऊन घ्या मग औषधं घेता येतील.”
 
“ हो. आपण बरोबरच खाऊ.”
 
नेहा म्हणाली. अपर्णा पु-या आणायला स्वयंपाकघरात गेली.
 
नेहाच्या डोक्यात मात्र रमणचेच विचार घोळत होते. स्वत:ची तब्येत बरी नसतानाही रमण माझी तब्येत बघायला आला याचं तिला कौतुक वाटलं. स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जाॅईन झाल्यापासून नेहा रमण शहाशी खूप बोलली नव्हती. तरी तो तिच्यात एवढा गुंतला आहे हे बघून नेहाच्या मनात रमण शहाबद्दल एक छोटासा अंकूर ऊमलला.
__________________________________