Preet tujhi majhi - 2 in Marathi Love Stories by अक्षय राजाराम खापेकर books and stories PDF | प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : २)

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : २)

प्रीत तुझी माझी.. 🐾♥
भाग - १ पासून पुढे..


सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी ही कथा पहिल्यांदाच वाचन करत असाल. तर या कथेचा आधीचा भाग नक्की वाचन करा. धन्यवाद 😊🙏🏻


======================================


तेव्हा अचानकच मला काय झाले काय माहित ? मला अचानक खुप त्रास होऊ लागला. उलटी आल्यासारखे होत होते, पण उलटी काही होत नव्हती. मला जरा जरा कोरडा खोकला येत होता. मी लगेचच पर्समधून रूमाल बाहेर काढून माझ्या तोंडावर धरला. तोंडातून थोडेसे रक्त निघत होते. रक्त आता रूमालावर पण लागले होते. हा प्रकार बघून बाबा खूपच घाबरले. नेमकी आज आईसुध्दा घरी नव्हती. माझ्या आजीला बरं वाटत नव्हते, म्हणून मामाकडे गेली होती.


माझी अवस्था बघून बाबांना काय करू नि काय नको असे झाले होते. बाबांनी मला लगेचच आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेले. चेकअप केल्यावर माझा रिपोर्ट आला. व त्यात मला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. हे सर्व ऐकून मला अजूनच टेंशन आले. आधीच आतून पुर्णत: तुटलेली मी आता आता पुर्णपणे खचून गेले होते. पण काहीही झालं तरी शेवटपर्यंत धीर सोडायचा नाही एवढेच मनाशी पक्के ठरवले. व जगत राहिले.


असंच अचानक एका दिवशी आई - बाबा मला येऊन म्हणाले. आपल्याला उद्या बाहेर जायचे आहे. जरा लवकर उठून आवरुन घे. मी कुठे जायचे आहे ? असे विचारताच, तुझ्या आवडत्या ठिकाणी एवढेच उत्तर बाबांकडून मला भेटले. मी सुद्धा दुसर्‍या दिवशी सकाळीच उत्सुकतेपोटी आवरून तयार झाले. पण आई - बाबा मला आज नक्की कुठे घेऊन जाणार होते 🤔 हे पाहण्यासाठी माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनातले विचार काही केलं तरी संपतच नव्हते. मनातून मी पुरती भांबावले होते.


पण राहून राहून एकच विचार मनात सतत घर करत होता. तो असा की, माझ्यासाठी एखादे चांगले स्थळ वगैरे तर बघितले नसेल ना या दोघांनी.. 🥺 मला दाखवायला तर नेत नसतील ना तिथे 🙄 आणि असे काही असेल तर मला वाचव रे देवा.. तुलाच माझी काळजी रे बाबा आता. असे मनात स्वतःशीच म्हणतच मी डोळे घट्टपणे बंद केले व दोन्ही हात जोडून विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे मनोमन स्मरण केले. 🙏🏻 आणि सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून निघाले आई - बाबांसोबत.


मी आवरुन खाली आले. आज मी खूप सुंदर दिसत होते. तसे माझ्याकडे बघून आई - बाबा हसत होते. मी काय झालं हसायला ? असं विचारताच, आई माझ्याजवळ आली. आणि डोळयातील काजळाचा छोटासा टिका तिने मला हळूच माझ्या मानेवर केसांपाशी लावला. व माझ्या पोरीला कुणाचीच दृष्ट लागू नये. असे म्हणत मला घट्ट मिठीत घेतले. आईचे असे अचानक बदललेले वागणे बघून माझे डोळेच भरून आले. आणि मीही काही क्षण आईच्या मिठित विसावले.


बाहेरुन गाडीचा हॉर्न ऐकू आला. बहुतेक बाबाच कार घेऊन आले होते. आम्ही दोघांनी सर्व आवरले. दरवाजा लॉक केला व थेट जाऊन कारमध्ये बसलो. थोड्या वेळात कार सुरू झाली. झुळझुळ वारा वाहत होता. मी कारच्या खिडकीतुन मागे पडणारी झाडे आणि निसर्गाचे अलौकिक सौंदर्य पाहण्यात मंत्रमुग्ध झाले होते. थोड्या वेळातच मला ग्लानी आली व मी निद्रेच्या आधीन झाले. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी पाहिले. आई मला हलवून उडवत होती. मी डोळे चोळतच आजूबाजूला पाहिले. जागा ओळखीची होती.


कसलीही पुर्वकल्पना न देताच, आई बाबांनी मुंबईला आमच्या जुन्या चाळीत मला आणले होते. बाबांना त्यांच्या जुन्या मित्रांना भेटायचे होते. तर आईलाही चाळीतील सर्व जुन्या मैत्रीणींची खूप आठवण येत होती. मला उठवून आई - बाबा निघून गेले. मी कारमधून खाली उतरले. दरवाजा लावताना माझे लक्ष सहजच साईड मिरर मध्ये गेले. मी पाहिले. माझ्या पाठीमागे तो असल्याचा भास झाला. मी पाठीमागे वळून पाहिले. व तो मला समोरच उभा दिसला. हो तोच.


तो तोच होता. माझा निखिल. अगदी तसाच, जसा तो माझी आधी वाट पाहत असायचा. आमची नजरानजर झाली. तो दिसताच माझ्या चेहर्‍यावर किंचितशी स्माईल आली. 🥲 माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. मी तर त्याला बघून स्वतःचे भान हरपून बसले होते. स्वतःची नजर त्याच्याचकडे रोखून मी पाहत होते. आजही मला त्याची तिच प्रेमळ नजर माझ्या डोळ्यांत डोळे घालून आपुलकीने पाहताना दिसत होती. तो आजही माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता. मनाला जाणवत होते, डोळ्यांत भाव दिसत होते पण बुध्दीला पटत नव्हते.


क्षणभर माझाही ऊर भरून आला होता. वाटलं पळत जावं अन, सरळ त्याच्या बाहूपाशात स्वतःला झोकून द्यावं. त्याचा मिठीतून स्वतःला कधी सोडवूच नये. आयुष्यभर तो असाच माझ्या समोर उभा असावा आणि मी त्याच्या समोर दररोज नवा श्रुंगार करून क्षणोक्षणी नव्याने त्याच्या प्रेमात पडावं. त्याने कधीतरी मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा एक गजरा आणावा आणि माझ्या केसात माळून द्यावा. आणि माझ्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत.


पण नाही. हे सारे सुख माझ्या नशिबात नाही. माझे हे स्वप्न स्वप्नच बनून राहणार होते. मी स्वतःला सावरत होते. मला आणि निखिलला एक तर नाही केलेस पण शेवटचा श्वास तरी मला त्याच्या कुशीत घेता येऊ दे. अशी मनोमन प्रार्थना मी देवाकडे करत होते. मी आजारी आहे. रोगीट आहे. मला ब्लड कॅन्सर आहे आणि माझा त्याच्याशी मैत्री पलिकडे अजून काडीमात्र संबंध नाहीये, हेच मी स्वतःच्या मनाला सतत समजावत होते.


माझ्या आजाराबद्दल मी जाणूनबुजून त्याला काहीच कळू दिले नव्हते. आई- बाबांनाही तसे मी आधीच बजावले होते. माझ्या आजाराबद्दल फक्त मला आणि माझ्या आई - बाबांनाच काय तेवढं ते माहित होतं. माझ्या मनात त्याच्या बद्दल प्रेम आणि ओढ तर नेहमीच होती, रिस्पेक्टही खूप होता. पण नशिबाला आमचं नातंच कदाचित मान्य नव्हतं. त्याचं लग्न किर्तीसोबत झालं होतं. पण दुर्दैवाने त्याची पत्नी किर्ती आज आमच्यात नव्हती. पण तिची शेवटची आठवण तिचा अंश मात्र त्याच्या जवळ होता.


अशातच तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या ऋदयाची स्पंदने तीव्र गतीने वाढू लागली. हे काय होत होतं मला ? हे माझं मलाच समजत नव्हतं. त्याने त्याचा हात माझ्या पुढे केला व मीपण नकळतपणे माझा हात त्याच्या हाती दिला. बहुतेक माझ्या मनातलं आज त्याने बरोबर ओळखलं होतं. आणि मी.. मी मात्र स्वतः हरवल्यासारखी त्याचा हात हातात धरून निमुटपणे चालले होते. तो नेईल तिकडे. तो मला त्याच्या घरी घेऊन आला.


बहुतेक लाईट गेली होती. मी मात्र बाहेरच उभी होते. समोरच बेडवर त्याचा मुलगा झोपला होता. घरात जास्तच अंधार होता. आतून कुणीतरी मेणबत्ती घेऊन दरवाजाच्या दिशेने येत होते. मी निरखून पाहिले. ते शामकाका होते. निखिलचे बाबा. लहानपणीपासूनच अंधाराची मला खुप भिती वाटत असे. म्हणून निखिलने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. माझ्या आवडीनिवडी, माझ्या सवयी त्याच्या अजूनही लक्षात आहेत, हे बघून मला त्याच्याबद्दल जरा जास्तच रिस्पेक्ट वाटू लागला.


बाबा दरवाज्यात मेणबत्ती घेऊन येताच, त्याने मला खुणावतच आत जायचा इशारा केला. मी माझे उजवे पाऊल उंबरठ्याच्या आत ठेवलेच होते, की त्याच क्षणी लाईट आली. तसे निखिलचे बाबा नकळतपणे म्हणाले. "अगदी लक्ष्मीच्या पावलांनी आलीस बेटा घरात. तु आत पाऊल टाकले आणि लगेच लाईट आली बघ." मी लाजेने थोडी लाल - गुलाबी झाले. व खाली मान करत गालातल्या गालात हसत होते. माझ्या पाठोपाठ तोही आत शिरला. त्याने आत जाऊन चहा बनवला व माझ्यासमोर आणून धरला.


मी थरथरत्या हातांनी तो कप घेतला व त्याच्या बाबांना देण्यासाठी हात पुढे केला. तसे बाबा म्हणाले. "नाही तु घे आधी चहा. तु आमच्या घरी अतिथी म्हणून आली आहेस. आणि अतिथी देवो भवः अशी आपली संस्कृती आहे. मग आधी तुझा मान. उद्या घेईनच की मी तुझ्या हातचा चहा." शामकाकांचे ते बोलणे ऐकून माझं मन भरून आलतं. मी चहा पिला. त्याच्या हातचा चहा होता म्हणल्यावर आवडीने संपवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मी सहजच शामकाकांना विचारलं, काकू.. अशा अचानक कशाकाय गेल्या ?


माझे बोलणे ऐकून निखिलच बोलू लागला. आईला खरं तर ब्लड कॅन्सरचा आजार होता. वेळीच रोगाचे निदान झाले नाही व उपचार नीटसे झाले नाहीत. अशातच तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ब्लड कॅन्सर तिसर्‍या स्टेजला पोहोचला. व तिने उपचारादरम्यानच जीव सोडला. त्याचे ते बोलने ऐकून माझी तर आता पाचावर धारण बसण्यास सुरुवात झाली. उद्या माझ्यासोबतही असेच होईल का ? असं मला वाटू लागलं. मी घामाने चिंब भिजले होते. मी तेथून धावतच माझ्या जुन्या घरी आले. समोर माझे आई - बाबा बसले होते. मी त्यांच्याशी काहीच बोलता सरळ आत निघून गेले.


मी दोन-तीन दिवस माझ्या जुन्या घरी होते. पण अजून माझ्या ब्लड कॅन्सरच्या आजाराबद्दल मी त्याला काहीच कळवले नव्हते. आम्ही भेटायचो, बोलायचो पण अजुनही मनातल्या भावना मनातच लपून ठेवल्या होत्या. त्याचा मुलगा निशांत, त्याच्याशीही माझी चांगलीच गट्टी जमली होती. तो दोन दिवस आमच्याच घरी होता. सर्वांची भेट घेऊन आम्ही निघालो होतो परत पुण्याला. आमच्या घरी जायला. निशांत माझ्यासोबत यायचा हट्ट धरुन बसला होता. सगळ्यांनी त्याची खूप समजूत काढली. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. खूप हट्टी होता तो. शेवटी मीच निखिल व त्याच्या बाबांच्या परवानगीने निशांतला माझ्या सोबत पुणे मध्ये आमच्या घरी घेऊन आले.


क्रमशः ..


======================================


काय मग वाचकहो, कशी वाटत आहे निखिल आणि आराध्या यांची लव्हस्टोरी. ☺ पुढे जाऊन अजून बरंच काही घडणार आहे आराध्याच्या आयुष्यात. आराध्याचे बोलणे ऐकून नयना कशी रिऍक्ट करेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करुन नक्की कळवा. पुढचा भाग हा या कथेचा कदाचित अंतिम भाग असेल.
धन्यवाद 😊🙏🏻



✍️ लेखक : अक्षय खापेकर.
©All Copyright Reserved