Mala jhalelan pahil prem - 3 in Marathi Short Stories by Ashu books and stories PDF | मला झालेलं पहिल प्रेम - भाग 3

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

मला झालेलं पहिल प्रेम - भाग 3

खूप सुंदर दिसत होती, ती सुंदर आहे हे मला त्या दिवशीच कळलं कारण इतर वेळी मी तिच्या कडे कधी लक्षच दिल नव्हत. सरांच प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊन झाल्यावर आम्ही सगळे क्लासच्या" बाहेर पडलो, आता मला तिला बोलायची खूप इच्छा होती पण मनात भीती पण होती त्यात माझ्या सोबत माझा मित्र महेश पण होता परत त्याला मला चिडवण्याची संधी भेटेल ह्या पण भीतीने मला तिला बोलायची हिम्मत नाही झाली. मग बाकीचे मूल परीक्षा द्यायला कस जायचं ह्याच नियोजन लावत होते. कारण आमच परीक्षा सेंटर हे तालूक्याच्या शाळेत आल होत. मी शाळेत होतो तिथून 18 किलोमिटर दूर, असल्या मुळे नियोजन लावत होते सगळे मुलं मी पण त्यांच्या सोबत थांबलो होतो पण माझ पूर्ण लक्ष तिच्या कडे होत, आज तिने मोरपंखी कलरचा ड्रेस घातला होता त्यात तिचे केस खूप छोटे होते त्यात तिने त्याला मॅचिंग हेअर क्लिप लावली होती तिचे सोनेरी केस तिच्या रूपाला भर घालत होते,ती तिच्या मैत्रिणी सोबत बोलत असते वेळेस मध्येच केसांना हात लावुन कानामागे करत होती. तर आणखीच छान वाटत होती अचानक तिच लक्ष माझ्या कडे गेल मी तिच्या कडेच पाहत होतो मी एवढा घाबरून गेलो तिला माझ्या कडे पाहताना पाहून तिच मैत्रिणी सोबत बोलून झाल्यावर ती माझ्या कडेच येत होती, आता तर माझ्या पूर्ण पाया खालची जमीन सरकली होती, छातीत धडधड होत होत" अस वाटत होत कुठे येऊन कानाखाली देते की, मला काय बोलायचं देखील समजत नव्हतं" ती माझ्या जवळ येऊन बोली सॉरी" मी आश्चर्यचकित....झालो" हि मला माफी का मागते म्हणून, तर ती बोली काल मी तुला गाईड मागितले पण घ्यायला आले नाही, कारण मला खूप उशीर झाला होता म्हणून घरी गेले होते माझ्या आज्जीची तब्बेत बरी नाही म्हणून आई आजोळी गेली आहे, घरी स्वयंपाक करायला कोणी नव्हत म्हणून मला लवकर जावं लागलं अस सांगितलं तिने मला, मी म्हणलो काही नाही होत, तर ती बोली आज दे मला गाईड तर मी तिला हो' बोलो आणि तिला सांगितलं थांब इथेच मी घेऊन येतो, तिने पण हो बोली... मी लगेच तिथून गाईड आणायला हॉस्टेल कडे निघालो. मला अस वाटत होतं ती माझ्या कडे पाहत असेल मला तिथून तिच्या कडे वळून पाहू वाटत होत पण हिम्मत होत नव्हती. मी लगेच हॉस्टेल वर येऊन ते गाईड घेऊन लगेच....तिच्या कडे गेलो. तिच्या हातात दिल्यावर तिने मला थँक्स बोली, मी काही न बोलता फक्त एक स्माईल दिली आणि तिथून निघत होतो तर ती बोली तुला जर ह्याच काम असेल तर दोन दिवसात परत देईल आणि नसेल तर 4 दिवस ठेऊन घेऊ का तर मी "बोलो" सध्या तरी मला काही काम नाही आणून दे चार दिवसांनी....ति हा बोलून तिथून घरा कडे जाण्यासाठी निघाली सोबत तिच्या मैत्रिणी पण होत्या, माझ मन म्हणत होत तिला आणखी पाच मिनिटं थांब म्हणावं, पण मनात राहून गेल. आणि ती तशीच जात गेली मी तिच्या पाठमोर्या आक्रतीकडे बघत होतो.तेवढ्यात तिथे महेश आला आणि हळूच माझ्या डोक्यावर चापट मारत बोला काय रे काय चालू केलं तुम्ही कालपासून असं बोलून परत माझी मजाक उड‌वत होता,मी त्याला बोलो काल गाईड घ्यायला येणार होती आली नाही, म्हणून आज येऊन घेऊन गेली बसं एवढच, तर हो का बोलून हसत होता. शेवटी मीच त्याला बोलो चल कुठे तरी फिरायला जाऊ संध्याकाळी......तर तो बोलला हा जायचं तर मला होत फिरायला कारण तो एका मुलीवर प्रेम करत होता आणि तिला पाहण्यासाठी तिच्या घरा समोरून चक्कर मारायचा...हे आम्हा सगळ्या मुलांना माहिती होत. तर तो ह्या गोष्टी मुळे तो तयार झाला...to be continue😍