Mala Space havi parv 1 - 35 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३५

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३५

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३५

मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रियंकाला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला जाणार असते.बघू काय होईल.


नेहा प्रियंकाच्या घरी पोचली .तिने दारावरची बेल वाजवली. लगेच कोणीतरी धावत दाराशी आल्याचं नेहाला जाणवलं. प्रियंकाने दार उघडलं . तिला बघून नेहा चकीत झाली. इतक्या जोरात प्रियंका धावत दार उघडायला आली त्यामुळे तिला चांगली धाप लागली होती. तिचा श्वासोच्छ्वास जोरात चालत होता. एवढं असूनही प्रियंकाच्या चेहे-यावर खूप आनंद दिसत होता.

"अगं एवढ्या जोराने का पळत आलीस दार उघडायला?"

"हं. मग आई किंवा बाबांनी दार उघडलं असतं. "

नेहाचं प्रियंकाच्या मागे लक्ष गेलं. प्रियंकाचे सासू सासरे ऊभे होते. नेहाला बघून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

"तुम्ही दोघी प्रियंकाच्या खोलीत बसा. नेहा ऑफीस मधून सरळ इकडे आलीस नं?"

"हो काकू."

"बस चहा मी करते."

नेहा आणि प्रियंका दोघी प्रियंकाच्या खोलीत गेल्या. प्रियंकाने नेहाला हात धरून पलंगावर बसवलं.

"नेहा तू आलीस नं की मला खूप आनंद होतो."

प्रियंकाचं हे मनापासून बोललेलं ऐकून नेहाला गलबलून आलं.

"प्रियंका मला पण तुला भेटायला खूप आवडतं. किती छान बाॅंडींग आहे ग आपल्या दोघींमध्ये. "

"हो. पण आता आपल्यातलं हे बाॅंडींग काहीदिवसच राहील."

"असं नको बोलूस ग प्रियंका."

"अगं मला खूप त्रास होतो. सहन होतं नाही. आता केमोथेरपी पण चालू होईल. कसं सहन करेन मी?"

"प्रियंका तुझी सहनशक्ती आणि इच्छा शक्ती वाढवण्यासाठी आपण एक वेगळी उपचार पद्धती घ्यायला हवी असं मला वाटतं."

"कोणती उपचार पद्धती? केमोथेरपी सारखीच त्रासदेऊ असते का?"

"नाही ग.ती उपचार पद्धती खूप सौम्य असते."

"काय नाव आहे त्या उपचार पद्धतीचं?"

"काही काऊन्सलर कॅंन्सर पेशंटचं काऊन्सलिंग करतात. त्यामुळे पेशंटचं मनोबल वाढतं. पेशंटचं मनोबल वाढलं की त्याला कसल्या वेदना जाणवत नाही.
नंतर वेदनेमुळे आलेलं नैराश्य दूर गेलं की त्यांची जगण्याची इच्छा प्रबळ होते.त्यामुळे कॅंन्सर पेशंट जास्त दिवस जगतात. म्हणून आपण तुला हे करून घेऊ असं मला वाटतं. करून घेशील नं प्रियंका"

"तू म्हणतेस म्हणजे ही उपचार पद्धती माझ्या साठी चांगलीच असेल. मी तुझं ऐकेन. मी ही उपचार पद्धती माझ्यावर करुन घेईन."

"थॅंक्यू प्रियंका तू माझ्या मनावरचा ताण हलका केलास"

"अगं नेहा मीच तुला थॅंक्यू म्हणायला हवं किती विचार करतेस माझा !"

"तू माझी बेस्टी आहेस नं?"

"हो."

"मग बेस्टीसाठी मी हे करायलाच हवं. तुझी तयारी आहे नं मग मी सुधीर आणि आईबाबांशी बोलेन. सुधीर नंतर निरंजनशीपण बोलेल. तूही सांग निरंजनला तुझी तयारी आहे हे कळलं की मग तोही पटकन तयार होईल."

"हो."

प्रियंका खूप हळवी झाली. तिचा चेहरा बघून नेहाला कळलं. प्रियंका रडत होती ते बघून नेहाने पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं.

"प्रियंका आता रडायचं नाही. या कॅंन्सरला चांगली अद्दल घडवायची. तू तयार आहेस नं"

"हो .नेहा जेव्हा मला आयुष्यातील गोड गुपीत कळलं, जेव्हा निरंजनच्या प्रेमाची ऊब कळली, त्यात बुडून मदहोश होण्याचा आनंद कळला तेव्हाच या कॅंन्सरने घाव घातला. निरंजन साठी खूप वाईट वाटतं ग. तो खूप दुखावला गेला आहे. त्याला माझ्या शिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही. कसं होईल ग त्यांचं?"

"प्रियंका तू जेव्हा खंबीर होशील तेव्हा निरंजनलाही आपोआप धीर येईल. म्हणून समुदेशन करून घेऊन तू आधी धीट हो."

"मग तूच निरंजनला इतकी छान समजून घेशील कारण तू आयुष्यातील इतर आवडीच्या गोष्टी करू लागशील. त्यामुळे तुझ्यातील नैराश्य दूर होईल. एक आत्मविश्वास तुझ्यात निर्माण होईल.त्या आत्मविश्वासामुळे तुझ्यातील जगण्याची जिद्द वाढेल. ही जिद्द वाढली की तू काही वर्ष जगू शकशील."

"खरच असं होईल.?"

"हो. मी समुपदेशन करणा-या एक मॅडम माझी मैत्रीण रंजनाच्या घराशेजारी राहतात.त्यांना भेटणार आहे. त्यांना आपण सांगीतलं, त्यांना वेळ दिली की त्या येतील. बोलू नं मग त्या मॅडमशी? तुझी काही हरकत नाही नं?"

"बोल. नेहा मी एवढं समजले की समुपदेशनामुळे मी काही वर्ष जगेन. कारण आत्ता जेवढी मी खचले आहे ते कमी होईल. पण मला हेही माहीत आहे की मी कधीतरी जाणार. समुपदेशनामुळे ऊद्याचं माझं मरण काही वर्ष पुढे ढकलल्या गेलं तर मी तेवढी वर्ष फक्त निरंजनला देऊ शकेन.तोही सावरेल. मी कधीतरी जाणार हे सत्य तो इतक्या वर्षात मान्य करेल. मी हळुहळू त्याचं मन तयार करीन. प्रत्यक्षात मी जेव्हा जाईन तेव्हा तो एवढा खचणार नाही. कारण इतक्या वर्षात मी खूप समाधानाचे आणि प्रेमाचे क्षण त्याच्या ओंजळीत घातले असतील. नेहा तुला कळलं का मी काय म्हणतेय ते?"

नेहा प्रियंकाने आश्चर्याने बघू लागली.मघापर्यत खचलेली प्रियंका केवढा दूरचा विचार करतेय.त्या विचारात निरंजनला खूश ठेवण्याकडे तिचा जास्त कल आहे. स्वतःच्या मृत्यूची भिंती तिला नाही. हे समुपदेशनामुळे तिला करता येणार आहे याची तिला खात्री पटली आहे.

नेहाने मनाशी ठरवलं की आता लवकरात लवकर प्रियंकाला समुपदेशन सुरु करायचं. तिचा आत्ता जो आत्मविश्वास दिसतोय तो आणखी वाढवायचा.

नेहा काहीच बोलत नाही आणि फक्त आपल्या कडे बघत बसली आहे हे बघून प्रियंकाने नेहाला हाताने हलवून म्हटलं,

"अगं नेहा तुझं लक्ष कुठे आहे? मी काय बोलले ते तुला कळलं का? माझ्याकडे नुसती बघत काय बसलीस?"

नेहा प्रियंकाने तिला हलवल्यावर भानावर आली.

"मला सगळं कळलं तू जे काही बोललीस ते. मला आश्चर्य वाटलं की तू स्वतःच्या आजारपणातही फक्त निरंजनच्या विचार करतेय.
माझ्या आजारपणावर औषध चालू असतील. मला कशाचा त्रास होऊ नये म्हणून निरंजन स्वतःकडे दुर्लक्ष करून फक्त माझाच विचार करेल याची मला खात्री आहे. मग मला जर आणखी काही दिवस किंवा तू म्हणतेस तसं काही वर्ष मला जगता आलं तर आम्ही दोघं एकमेकांना खूप छान वेळ देत शकू. म्हणून मला समुपदेशन करवून घेऊन माझ्यातील एनर्जी, आत्मविश्वास, सहनशक्ती,वाढवायची आहे."

"गुड प्रियंका. खूप छान विचार केलास. मी ऊद्याच त्यांच्याशी बोलेन."


काहीवेळ प्रियंकाशी गप्पा मारून नेहा तिच्या घरी निघाली. घरी जाताना तिच्या मनात एकच विचार सुरु होता तो म्हणजे सुधीर आणि त्याच्या आईबाबांना ओर समुपदेशनाबद्दल कसं बोलायचं. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली की देवा मला समुपदेशना बद्दलचा विषय घरच्यांसमोर मांडण्याचा धीर दे आणि ते तिचं या गोष्टीला तयार होऊ दे.


रात्री जेवताना नेहाने समुपदेशनाचा विषय मांडला.

"आई बाबा तुम्हाला समुदेशनाबद्दल काही माहिती आहे का?"

"हो मला माहिती आहे का ग?"
सुधीरचे बाबा म्हणाले.

"कॅंन्सर पेशंटचं पण समुपदेशन करतात. ज्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक भावना नाहिशी होते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आणखी काही वर्ष जगतात."

"हे तुला कोणी सांगितलं?"
आईने विचारलंं.

"माझ्या ऑफिसमधल्या रंजनाने.तिच्या शेजारी एक काऊन्सलर विद्ध्वंस म्हणून राहतात. त्यांनी तिला सांगितलं. मीपण मागे एका मासिकात या बद्दल वाचलं होतं."

"मला या बद्दल माहिती आहे.'

सुधीर म्हणाला.

"मी प्रियंकाशी मघाशी या विषयावर बोलले आहे."

"काय तू बोललीस तिच्याशी?"
तिघांनी विचारलंं.

"हो सुरवातीला मला जरा भीती वाटत होती. पण तिला मी समुपदेशन म्हणजे काय असतं हे सांगीतलं तेव्हा ती तयार झाली हे करून घ्यायला. समुपदेशन करून घेऊन ती मिळाले म्हणजे ती ते आयुष्य फक्त निरंजनसाठीच जगणणयंच जगणार आहे. मला यातुन कळलं की तीचं निरंजनला किती प्रेम आहे म्हणून मी ऊद्याच त्या विद्ध्वंस मॅडमशी बोलेन. तुम्हा तिघांची या गोष्टीला परवानगी आहे नं?"

"हो. प्रियंका आनंदाने या समुपदेशनाला तयार झाली आहे तर आम्ही तयार आहोत. तू बोल त्या मॅडमनी."
बाबा म्हणाले.

"सुधीर तू निरंजनशी बोल. म्हणजे त्या विद्ध्वंस मॅडमना फायनल सांगता येईल."
नेहा म्हणाली.

"ठीक आहे.ऊद्या बोलेन."
सुधीर म्हणाला.

समुपदेशनासाठी या तिघांची परवानगी मिळाली हे बघून नेहाला आनंद झाला. त्या आनंदात तिने जेवण भराभर आटोपलं आणि मागचं सगळं भरभर आवरून ती तिच्या रूममध गेली. आधी आजच्या सगळ्या घडामोडी रंजनाला कळवळल्या आणि मॅडमना सांगण्याबद्दल सांगितलं.

नेहा खूप समाधानाने झोपली.
__________________________________
.