Mala Space havi parv 1 - 6 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६

मला स्पेस हवी पर्व १भाग ६

मागील भागात आपण बघीतलं की नेहा अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे.पुढे बघू काय होईल!

"नेहा पूर्ण विचार केलास का?"

"हो. तू सतत हा प्रश्न मला का विचारतो आहेस?"

" कारण त्या सो कॉल्ड स्पेस साठी तू पुढचा विचार करत नाहीस असं मला वाटतंय."

"तूच फक्त कोणताही निर्णय घेताना सर्वांगानी विचार करतोस असं वाटतं का?"

"असं मी कधी म्हटलय?"

"मग आजच का हा प्रश्न. हा प्रश्न मला तू या आठ दिवसांत तीनदा तरी विचारला असशील."

"हो विचारला असेन पण आता तुझ्या किंवा माझ्या निर्णयावर एक जीव अवलंबून आहे.हे आपण दोघांनी लक्षात ठेवायला हवं म्हणून मी विचारतोय."

"ऋषीची एवढी काळजी कशाला करू मी?"

'अगं तू त्याची आई आहेस नं मग तुला त्याची काळजी नाही?"

'आई आहे पण त्याच्या भोवती त्याची माणसं आहेत नं आजी आजोबा त्यांचे बाबा मग कशाला काळजी करू?"

"अगं आम्ही सगळे दहा टक्क्यांमध्ये येतो नव्वद टक्के आईचाच सहभाग असतो आत्ता मुलांच्या या वयात. म्हणून म्हणतोय करीयर करीयर हा जप करू नकोस. ऋषीला गृहीत धरू नकोस."

"सुधीर आता हे तू मला इमोशनल ब्लॅकमेल करतो आहेस."

नेहाचं हे वाक्य ऐकताच सुधीरने कपाळावर हात मारला.

"अगं काय बोलतेस इमोशनल ब्लॅकमेल कशाला करू तुला मी सत्य परिस्थिती सांगतोय."

"ऋषी जवळ तुम्ही सगळे आहात त्यांचं दुखलं खुपलं बघायला."

"आम्ही आहोतच पण ऋषी लहान आहे त्याला आईच्या मायेची तहान लागली तर आम्ही काय करायचं तू येणार बंगलोरहून"

"इतकी काही गरज लागणार नाही."

"कशावरून म्हणतेस?"

"हे बघ सुधीर एखादा आठवडा ऋषी देईल त्रास नंतर त्याला होईल सवय मी नसण्याची.कारण तुम्हा सगळ्यांची त्याला सवय आहे.जर अनोळखी असतं तर तो राहीला नसता. त्या परीस्थितीत मीही अशी प्रमोशन घेऊन दुस-या गावी गेले नसते."

"तू आता सगळ्यांची उत्तरं तयार ठेवली असशील तर मी तरी काय बोलणार?"

"म्हणूनच म्हणते आता या विषयावर फार चर्चा नको. मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जाणार आहे. माझं करीयर करणार आहे.आणि माझी स्पेस जपणार आहे. आता प्लीज यात खोडा घालू नकोस."

हे बोलताना नेहाने सुधीर समोर कोपरापासून हात जोडले.

"कसलं करीयर? त्या छोट्याश्या टूर ट्रॅव्हलरच्या कंपनी मधलं कसलं आलंय करीयर. मल्टी नॅशनल कंपनीमधलं करीयर थोडच आहे? "

"छोटी कंपनी असली म्हणून काय झाले ? तू जर छोट्या कंपनीत असतास आणि तुला प्रमोशनवर जाव लागलं असतं तर तू गेलाच असता नं?"

"नेहा अगं मी पुरूष आहे ऋषीचा बाबा आहे तू आई आहेस."

"मग? त्यानं काय फरक पडतो?"

"अगं दोघांच्या भूमिकेमध्ये फरक आहे."

"काय फरक आहे हाच नं की मी बाई आहे आणि तू पुरुष.हाच लिंगभेद आहे नं?"

सुधीरने तिच्या समोर जोडत म्हटलं

"बाई ग मी हा फरक म्हणत नाही . ऋषी एवढ्या मुलाला भूक लागली तर त्याला आईच आठवते.त्याला झोप आली तर आईचं आठवते. तो पडला त्याला लागलं तर त्याला आईच आठवते. बाबा आठवतं नाही. हा फरक म्हणतोय मी हा फरक असल्यामुळे मी प्रमोशन घेऊन कुठेही गेलो तरी ऋषीला फरक पडणार नाही पण तू गेलीस तर त्याला फरक पडेल. म्हणून म्हणतोय पूर्ण विचार कर."

"माझा विचार झालाय.मी कंपनीत सांगीतलं आहे. आता तू माझं मन बदलवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी उपयोग नाही. आता ऋषीची सगळी जबाबदारी तू आणि तुझ्या घरच्यांनी घ्यायची आहे.मला यात अडकवू नको.

"ठीक आहे जशी तुझी इच्छा. काही दिवसांनंतर जर ही स्पेस तुला टोचायला लागली आणि त्यामुळे तू कितीही कासावीस झालीस तरी तुला परत इथे येतात येणार नाही."

"घाबरवतो आहेस का मला?"

"नाही. मी तुला सांगतोय. काय ऐकायचं काय नाही हे तू ठरव.मी झोपतो आता."

एवढं बोलून सुधीर नेहाकडे पाठ करून झोपला. झोपला कसला नुसताच पडला होता. त्याच्या डोळ्यातून झोप कधीच हद्दपार झाली होती. नेहा इतकी कशी कोरडी झाली याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वहात होते. झोप मात्र डोळ्यात फिरकायला तयार नव्हती.

नेहापण झोपायचा प्रयत्न करत होती पण झोप तिच्या डोळ्यात यायला तयार नव्हती. एखाद्या हट्टी मुलासारखी अडून बसली होती.

नेहाच्या मनात आलं की सुधीर का मला अडवण्याचा प्रयत्न करतोय? माझं स्वातंत्र्य मी जपायचा प्रयत्न करतेय तर का करू देत नाही. ऋषी काय माझा एकटीचा मुलगा आहे का? सुधीरचा पण मुलगा आहे. मग माझ्या एवढीच त्याचीपण जबाबदारी आहे.

विचार करून नेहाचं डोकं दुखायला लागलं.
इकडे सुधीर अडवतोय तिकडे आई आणि रंजना दोघी अडवतात आहे. का ही लोकं माझा विचार करत नाही. मला नको का माझी स्पेस मिळायला? जेव्हा बघावं तेव्हा दुसऱ्याचाच विचार करायचा.स्त्रीने काय मक्ता घेतलाय दुसऱ्याचा विचार करण्याचा?

सासू सास-यांचा विचार कर, नवरा म्हणून सुधीरचा विचार कर ,ऋषी मुलगा म्हणून त्याचा विचार कर. अरे पण मी माझा विचार कधी करू?

नेहाला या चिडचिडण्यात कधी तरी झोप लागली.

***

संध्याकाळी नेहा घरी यायची होती. सुधीर ला तर हल्ली घरी यायला उशीर व्हायचा.ऋषी नुकताच दूध बिस्कीट खाऊन शेजारी गेला होता. सास-यांची खरंतर ही फिरायला जायची वेळ होती पण जेव्हा नेहाने बंगलोरला एकटं जाण्याचा निर्णय सांगीतला तेव्हा पासून त्यांचं मन काळजीने भरून गेलं. कशातच मन रमत नव्हतं. त्यांच्या प्रमाणे सुधीरच्या आईची पण मनस्थिती तशीच होती.

" अगं तुला कधी जाणवलं का की नेहा आणि सुधीर मध्ये बेबनाव झालाय?"

सुधीरच्या बाबांनी सुधीरच्या आईला विचारलं. ऊगीचच टीव्ही वरची चॅनल बदलत बसणाऱ्या आईने टीव्ही बंद करून बाबांकडे बघत म्हंटलं,

" मला असं कधी आढळलं नाही. पण नेहाचं वागणं मला कोड्यात टाकत होतं. ती आधी सारखी मोकळेपणाने वावरत नव्हती. आपल्याच तंद्रीत असायची.सुधीर बद्दल काही विचारलं तर उत्तर द्यायची नाही."

" का?"

" कळत नव्हतं म्हणून मी सुधीरला एक दिवस विचारलं तर तो म्हणाला सध्या नेहाला खूप काम आहे त्यामुळे सतत कम्प्युटर समोर बसून डोळे डोकं दुखतंय असं म्हणाली."

" मग डाॅक्टरकडे गेली होती का ती?"
बाबांनी विचारलं.

" माहिती नाही. विचारलं मी सुधीरला."

" अगं नेहाला विचारायचं नं सरळ."

" ऩतर विचारलं. तर म्हणाली ड्राॅप्स दिलेत ते घालतेय."

" तेवढंच कारण होतं की अजून काही लक्षात आलं का?"

" नाही पण आजकाल ती नाखुश असते हे लक्षात आलं माझ्या."

" का नाखुश असते? मला नं तिचा हा निर्णय म्हणजे वादळापूर्वीची शांता वाटतेय."

" अहो असं नका बोलू. असं काही घडलं तर सुधीर उन्मळून पडेल."

" अगं जे होणार आहे ते कोण टाळू शकतं! मला आता कोणताही धक्का पचवायची खरंतर ताकद नाही. चार वर्षांपूर्वींच्या प्रियांकाच्या धक्क्यातून अजून सावरलो नाही."

सुधीरच्या बाबांनी डोळे पुसले.

" हो खरय तुमचं. प्रियंकाचं असं अकाली जाणं हा खूप मोठा धक्का होता. ऋषी छोटा असल्याने जरा तरी आपण सावरलो. त्याच्या बाललीला बघत प्रियंकाच्या जाण्याचं दुःख कमी कमी होत गेलं. प्रियंकाचं असं होईल असं कुठे माहिती होतं."

"कान दुखतो म्हणून म्हणत होती. दु:ख अती झालं म्हणून डाॅक्टरकडे जाते काय आणि कानाचा एक्सरे काढल्यावर कॅंन्सर डिटेक्ट होतो काय आणि पंधरा दिवसात सगळा खेळ संपतो. सगळच अनाकलनीय घटना घडत गेल्या. "

" माझ्या डोळ्यासमोर किती तरी दिवस प्रियंकाचं चेहरा हलतच नव्हता."

सुधीरची आई डोळे टिपत म्हणाली. तिच्या खांद्यावर थोपटत सुधीरचे बाबा म्हणाले,

" अगं तू नऊ महिने पोटात ‌वाढवल होतं प्रियंकाला. तू कशी विसरणार तिला? मी बाप होतो तिचा . तिला या जगात आणण्यासाठी ज्या कळा तू सहन केल्या त्या मला सहन कराव्या लागल्या नाही तरीपण तिच्या नसण्याच्या दु:खातून बाहेर यायला मला वेळ लागला. तू तर जन्मदात्री होतीस. तू कशी विसरशील!"

" म्हणून आता वाटतय सुधीरच्या आयुष्यात काही वादळ येऊ नये. त्याच्या बरोबर आपण कोलमडून गेलो तर ! ऋषी कडे कोण बघेल?"

" नको रडूस देव इतका कठोर नाही. काही होणार नाही.नेहाने ठरवलंय तसं तिला करू दे. आपण ऋषीला सांभाळू.कधीतरी सुट्टी असेल तेव्हा त्याला त्याच्या मामाकडे पाठवू. काळजी करू नकोस.चल बरीच रात्र झाली आहे. झोपूया."

"अहो साडेअकरा वाजले सुधीर आला नाही अजून."

सुधीरची आई घड्याळाकडे बघत म्हणाली.

'ते येईल त्याच्या वेळेला रोज इतकं जाग्रण करणं आपल्या दोघांच्याही तब्येतीला झेपणार नाही.चल आपण झोपायला जाऊ."
दोघंही झोपायला आपल्या खोलीत गेले.

_________________________________

सुधीरच्या आईबाबांच्या मनात जी भिंती आहे ती खरी ठरेल का? बघू पुढील भागात.