Josephine - 4 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | जोसेफाईन - 4

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

जोसेफाईन - 4

आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार कर करत उघडले.
ठसका लागत खोकलत खोकलत काहीजण फ्लॅटची एकेक खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅट मध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते.

बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेले पण टिकले एकही नाही. कारण एकच जोसेफाईन!!

जोसेफाईन चे अस्तित्व कोणालाही तिथे टिकू देत नव्हते.
अनेकांना जोसेफाईन चे पिशाच्च त्या फ्लॅट मध्ये भटकताना दिसले होते.

आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहित?

एका शुभ मुहूर्तावर घरी पूजा वगैरे करून सुमित आणि सुपर्णा त्या 1002 फ्लॅटमध्ये राहायला आले. एक दिवस तर पूर्ण सामान लावण्यातच गेला. पाहता पाहता संध्याकाळ झाली. सुपर्णा ने संध्याकाळ चा देवाजवळ दिवा लावला आणि ती प्रत्येक खोलीतील लाईट्स लावायला गेली. सुमित खाली काही सामान आणायला गेला होता. सगळ्या खोलीतील दिवे लावल्यावर ती बैठकीत येऊन बसली. खोलीतील दिवे लावताना तिचे लक्ष नव्हते नाहीतर तिला तिथल्या आरश्यात जोसेफाईन
चे पिशाच्च नक्कीच दिसलें असते, उलटे लटकलेले, केस पारंब्यांसारखे लोम्बलेले. असो.

सुपर्णा ने तिचे नेहमीचे काही स्तोत्र म्हंटले. अचानक आतल्या बेडरूम मध्ये काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला म्हणून ती आत जायला वळली तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर दारात सुमित सामानाच्या पिशव्या घेऊन उभा होता. तिने लगेच त्याच्या हातातील काही पिशव्या घेतल्या आणि आत किचन मध्ये ओट्यावर ठेवून दिल्या. तेवढ्यात त्यांना आतल्या बेडरूम मध्ये काहीतरी ठोकण्याचा आवाज आला.

"कशाचा आवाज येतोय काय माहित?मघाशी सुद्धा काहीतरी पडल्याचा आवाज आला होता. मी जाऊन बघून येते.", सुपर्णा म्हणाली.

सुपर्णा आतल्या बेडरूम मध्ये गेली पण तिला काहीच दिसलें नाही आणि दिसणार तरी कसे? कारण तिचा देवगण होता. जर तिचा मनुष्यगण असता तर ती आरश्यात पाहू शकली असती कि जोसेफाईन उलटं लटकून भिंतीला खिळे ठोकतेय. ह्यावेळेस मात्र जोसेफाईन च्या डोक्यावर एक सुद्धा केस नव्हता. ती संपूर्ण टकली दिसत होती. तसेच तिने मोठे झुमके घातले असून चेष्म्यातून तिचे काजळने रंगावलेले पांढरे डोळे अत्यंत भयानक दिसत होते. ओठांना भरपूर लिपस्टिक लावलेलं होतं जोसेफाईन च्या भुताने. जिवंत असताना जोसेफाइन ला मेकअप ची भारी आवड होती अगदी खाली दुकानात जाण्यासाठी सुद्धा ती खूप मेकअप करायची. असो.

"काही नाही रे! दुसरीकडचा कुठला तरी आवाज असेल", सुपर्णा

"बरं ते जाऊ दे, आता आपल्याला बाहेर डिनर साठी जायचंय कि आपण घरी काहीतरी बनवायचं.", सुमित

"उद्या पासून बनवू आपण, आज आपण बाहेरच जाऊ. मी लगेच तयार होते.",सुपर्णा

लगेच सुपर्णा तयार होण्यासाठी शयन कक्षात गेली. तिथे आधीच एका भिंतीशी जोसेफाईन खट्ट अगदी सावधान पवित्र्यात उभी होती. ती तिच्या बटबटीत काजळ लावलेल्या पांढऱ्या शुभ्र डोळ्यांनी सुपर्णा कडे एकटक पाहत होती.

सुपर्णा ने साडी बदलली. आणि आरश्यात बघून तिने केस विंचरले, केसांची वेणी घालत असता तिला अगदी नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवला. तिने लगेच सुमित ला ओरडून विचारले,"सुमित हा कुठला पर्फ्यूम लावलायस तू! किती उग्र वास आहे."

"काहीतरीच काय सुपर्णा! मी केव्हाचा सोफ्यावरच बसेलेलो आहे. मी कुठलाही पर्फ्यूम लावलेला नाही.

अरे मग वास कुठून येतोय एवढा? असा विचार करून सुपर्णा वेणी घालू लागली. सुपर्णा जरी पाहू शकत नसली तरी मनुष्य गणाची एखादी व्यक्ती नक्कीच पाहू शकली असती कि जोसेफाईन चा विद्रुप चेहरा सुपरणाच्या सुंदर चेहऱ्याच्या अगदी म्हणजे फारच अगदी जवळ आला होता आणि म्हणून तिला उग्र दर्प जाणवला. जोसेफईन सुपर्णाकडे एकटक बघत होती. टकली, बटबटीत काजळ लावलेली, ओठांना भरपूर लिपस्टिक लावलेली, मोठ्ठा काळा चष्मा घातलेली पांढऱ्या शुभ्र डोळ्यांची ज्यो अत्यंत भीषण दिसत होती.

क्रमश: