Silence Please - 15 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | सायलेन्स प्लीज - प्रकरण 15

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

सायलेन्स प्लीज - प्रकरण 15

प्रकरण 15
पाणिनी पटवर्धन, पेंढारकर च्या हार्ड वेअर च्या दुकानाचे दार उघडून आत गेला.त्याला पाहून उदित पेंढारकर ला नवलच वाटले. “ अरे पटवर्धन तुम्ही? ” तो उद्गारला.
“ मस्त आहे दुकान तुझं ! ” पाणिनी म्हणाला.
“ आवडलं तुम्हाला? बरं वाटलं.” उदित म्हणाला.
“ कधी पासून आहे हे दुकान? ”
“ फार दिवस नाही झाले. भाडयाने घेतलंय एका कडून. मला आधी इथला जुना माल काढून टाकयचाय. मग नंतर आतली दुरुस्ती, नूतनीकरण करून घ्यायचं आहे.”
“ मला वाटलं स्वत:चं आहे दुकान.” पाणिनी म्हणाला.
“ भाड्याचे आहे परंतू माझ्या स्वतःच्या खर्चाने काहीही दुरुस्ती करायला परवानगी आहे.”
“ कधी करणार सुरुवात? ” पाणिनी म्हणाला..
“ लगेचच. सवलतीच्या किंमतीत जुना सगळा माल काढून टाकणार.” उदित म्हणाला.
“ तू ज्याच्या कडून घेतलस दुकान, ते त्याच्या दुकानातल्या मालासकट घेतलंस का? ”
“ हो. स्वस्तात मिळाला माल.” -उदित म्हणाला. नंतर थोडा वेळ थांबून म्हणाला, “ तो चाकू कसा काय होता ? ”
“ एकदम मस्त आहे.” पाणिनी म्हणाला. उदित अस्वस्थ पणे हसला.
“ उदित, ठीक आहेस नं तू ? ” पाणिनी म्हणाला.. उदित ने मानेने हो म्हंटले.
“ प्रांजल कधी भेटली एवढ्यात तुला? ” पाणिनी म्हणाला..
“ काल रात्री ” उदित म्हणाला.
“ आर्या कधी भेटली इतक्यात? ” पाणिनी म्हणाला..
“ नाही ”
“ आणि हर्षद? ” पाणिनी म्हणाला..
“ एवढं का विचारताय त्याच्या बद्दल? ” उदित ने विचारलं
“ जरा आश्चर्य वाटतंय.” पाणिनी म्हणाला.
“ नाही तो नाही भेटला.” -उदित
“ या तीन पैकी कोणाला भेटलास तू ? मला चाकू देऊन गेल्यावर? ”
“ काय म्हणायचं आहे तुम्हाला? ” -उदित
पाणिनी ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “ हे बघ उदित, काहीतरी चुकीचं घडलंय. काय आहे ते? ”
उदित थोडा घुटमळला. नंतर अस्पष्ट पणे म्हणाला, “ काहीच नाही.” पण पाणिनी च्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत झाली नाही.सहज गत्या काहीतरी उचलायला गेलो असे दाखवून तो खाली वाकला तेव्हा पाणिनी चा त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात आपोआपच दूर झाला.
“ मला वाटतंय मला कोणीतरी डबल क्रॉस केलंय.” पाणिनी म्हणाला. “ तुला काय वाटतंय? ”
“ तुम्ही कशाबद्दल बोलताय? आणि इथे नेमके का आलाय? ” –उदित
“ चाकू बद्दल कोणाशी बोलला होतास? ” पाणिनी म्हणाला..
“ तुम्ही का आणि कोणाच्या मागे लागलाय? ”
“ सहज विचारलं. बोललं होतास का? ”
“ मी सांगू शकत नाही.” –उदित
“ का नाही? ” पाणिनी म्हणाला..
“ कारण.... नाही.. सांगू शकत ”
“ प्रांजल ने सांगितलं का तुला सांगू नको म्हणून ? ” पाणिनी म्हणाला..
उदित काही बोलला नाही.
पाणिनी हसला. “ या गोष्टीचं एवढ भांडवल करू नको.इन्स्पे.होळकर ला सगळं समजलंय.त्यामुळे मला न सांगण्यात काहीच फायदा नाही. ”
“ मला तुम्ही चांगलंच लटकवलय पटवर्धन.” उदित म्हणाला.
“ मी काय ? ”पाणिनी म्हणाला..
“ अडकवलं मला.” उदित उद्गारला.
“ अस का वाटत तुला? तुझ्या दुकानातले हार्डवेअर तू कोणालाही विकू शकतोस.”पाणिनी म्हणाला.
“ इन्स्पे.होळकर या दृष्टीने विचार नाही करत.” -उदित
“ तो गेला उडत.त्याला म्हणावं तळ्यात जाऊन जीव दे.त्याची तुझ्या दुकानात काही गुंतवणुक नाहीये ना, त्याला कशाला किंमत देतोस? ” पाणिनी म्हणाला.
“ तो म्हणतोय प्रांजल या भानगडीत अडकेल.” -उदित
“ एक नंबरचा खोटारडा आहे तो.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुम्हाला जो चाकू दिला होता तो तुम्ही खून झालेल्या चाकूच्या जागी बदलून ठेवणार....” -उदित
“ बदलणार होतो मी? बिलकुल नाही.मला एक प्रयोग करायचा होता,अगदी तसाच चाकू घेऊन.”
“ काय प्रयोग होता? ”
त्याला उत्तर देण्यासाठी पाणिनी ने मोठा श्वास घेतला.पण नंतर विचार बदलून त्याला काहीच न सांगण्याचे ठरवले. “ इन्स्पे.होळकर वर माझा विश्वास नाही.मी तुला नाही सांगणार.कारण मी तुला सांगितलं आणि तुला इन्स्पे.होळकर ने विचारलं तर तुझी पंचाईत होईल.तू धादांत असं नाही म्हणू शकणार की मला माहिती आहे पण मी सांगणार नाही.त्यामुळे तुला मी काही नाही सांगितल तर तू इन्स्पे.होळकर ला बिनधास्त खरं सांगू शकशील की मला काही माहीत नाही म्हणून . माझ्यासाठी तू दुसरा चाकू आणलास हे त्याला कळलं किंवा संशय जरी आला, तरी तू त्याला सहकार्य करत नाहीस असं त्याला वाटत राहील. ” पाणिनी म्हणाला.
“ सॉरी, मी थोडा रागावलो होतो.आणि काळजीत पडलो होतो.” -उदित
“ काळजी? कशाबद्दल? ” पाणिनी म्हणाला..
“ इन्स्पे.होळकर ने मला, खोटा पुरावा निर्माण करणे, या प्रकारा बद्दल सांगितले.किती गंभीर प्रकरण आहे. ” –उदित
पाणिनी हसला. “ कायद्याच ज्ञान तू पोलिसांकडून घेण्याची गरज नाही.वकिलांकडून घ्यावं ते. मी तुला चाकू आणायला सांगीतलाच नसता. तुला धोका आहे असे वाटले असते तर ” पाणिनी म्हणाला.
“ आता जरा बर वाटलं ऐकून. मला फार काळजी वाटत होती....प्रांजल ची.”
“ आता करू नको काळजी. बर, मला अजून काही तसे चाकू हवे आहेत” पाणिनी म्हणाला.
“ अजून ! ” उदित उद्गारला.
“ अर्धा डझन ” पाणिनी म्हणाला.
“ का sss य ” उदित किंचाळला
“ तू ते उत्पादन करणाऱ्या कंपनी कडून थेट मागवून घेशील का?” पाणिनी ने त्याच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करून विचारलं.
“ मला वाटतंय जमू शकेल.मी होलसेलर कडून मिळवीन. ” –उदित
पाणिनी ने खिशातून पैसे बाहेर काढले आणि ते उदित ला देऊन तो म्हणाला, “ तुला नवीन खरेदी साठी आणि जो काही त्रास झाला, आणि पुढे होईल त्यासाठी हे ठेव.”
“ मी फक्त मूळ किंमत जी असेल ती घेईन. जास्त नकोत पैसे.फक्त मला इन्स्पे.होळकर ची परवानगी घ्यावी लागेल.”
“ का? पोलिसांनी जप्त केलंय दुकान? ” पाणिनी म्हणाला.
“ छे: छे: ” उदित म्हणाला.
“ मला समजत नाही,तुझ्या दुकानातल्या वस्तू तू पोलिसांच्या परवानगी शिवाय का विकू शकत नाहीस?” पाणिनी ने विचारलं
“ त्याने मला सांगितलंय की पटवर्धन जे जे बोलतील त्याची माहिती मी त्याला दिली पाहिजे,नाहीतर त्या चाकू च्या विषयावर मला त्रास होवू शकतो.” -उदित
पाणिनी पटवर्धन हसला.मनापासून हसला. “ खुशाल फोन कर त्याला आणि सांग की मी आलोय आणि मला आणखी सहा चाकू हवेत म्हणून. फक्त तेवढच सांग.त्याने तुला काय सांगितलं हे तू मला बोलला आहेस हे त्याला सांगू नको.”
“ पटलं मला मी अगदी तसाच करीन पटवर्धन.”
“ मला इन्स्पे.होळकर भेटला तर मी ही बोलणार नाही त्याला की तू मला इन्स्पे.होळकर आणि तुझ्यात झालेल्या चर्चे बद्दल सांगितलस म्हणून.” पाणिनी ने त्याला आश्वासन दिलं. “ चल, मी निघतो आता. .... फोन कर त्याला... आणि तू म्हणतोयस की सहा चाकू तू सहज देऊ शकशील मला? ”
“ सहज.”
“ तुला त्रास दिला यता बद्दल क्षमस्व” पाणिनी म्हणाला
बाहेर पडल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला.“ कुठे आहेस? ”
“ हॉटेल लीला पेंटा.” सौम्या म्हणाली.
“ सौम्या. इन्स्पे.होळकर आपल्या ऑफिसात येऊन गेला का ग ?” पाणिनी ने विचारलं
“ नाही.का हो ?”
“ चाकू च्या विषयावरून त्याने उदित पेंढारकर ला उभा आडवा घेतलाय.” पाणिनी म्हणाला
“अरे बापरे ! ” सौम्या उद्गारली. “ उदित ने काही सांगितलं तर नाही ना त्याला? ”
“ अग, तो सगळी गरळ ओकलाय त्याच्या समोर ! ” पाणिनी म्हणाला
“ ओह ! पण सर पण इन्स्पे.होळकर ला डुप्लिकेट चाकू बद्दल कळलंच कसं म्हणते मी !”
“ तेच मला शोधून काढायचय ” पाणिनी म्हणाला
“ आर्याने नक्कीच सांगितलं नसेल.” -सौम्या
“ तिने सांगितलं असेल असं कोणीच म्हणणार नाही.”
“ सर , तुम्ही अडचणीत याल त्यामुळे? ”
“ काही सांगता येत नाही. येऊ नये म्हणून जे करायला पाहिजे ,ते मी केलंय. मी सगळी केस एकमेकात तंगड्यात तंगडी अडकेल अशी करून ठेवल्ये.” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे? ”
“ अजून सहा तसेच डुप्लीकेट चाकू मागवलेत.” पाणिनी म्हणाला “ तिकडची काय खबर? त्या बाईला भेटलीस?”

“ भेटले त्या बाईला. गोड आहे, व्यवहारी आहे. पंजा मऊ पण टोकदार नखं असलेल्या मांजरी सारखी.” –
सौम्या
“ त्या माणसाला भेटलीस? ”
“ भेटले नाही , पण भेटणार आहे.” -सौम्या.
“ मोहीम चालू ठेव.मी तुला अद्ययावत माहिती देईनच ,काही घडले नवीन तर.”
(प्रकरण 15 समाप्त)