Karnapishachini in Marathi Horror Stories by Sanjeev books and stories PDF | कर्णपिशाचीनी

The Author
Featured Books
Categories
Share

कर्णपिशाचीनी

कर्णपिशाचिनी
स्वामी महाराजांचे ध्यान संपवून मी नुकताच उठलो होतो एवढ्यात फोन वाजला, अबू होते फोन वर
"अविनाश एकधारी लिंबू, थोड्या लाल मिरच्या व मोहरी एका पोटलीत बांधून गेट ला टांगून ठेव एक विचित्र वल्ली तुला भेटावयास येत आहे".
फोन बंद झाला. त्यांनी सांगितलं तस करून मी स्वामी महाराजांचे नामसमरण करत सोफया वर बसलो. काय प्रकार होता देव जाणे , इतक्यात गेट वाजलं काळा कुडता, काळा पायजमा , गळ्यात कवड्यांची व हाडांची माळ, असा एक ३० ३५ शी चा तरुण आत येत होता , त्याचा बरोबर असलेली स्त्री मात्र बाहेरच उभी होती, तिच्या चेहेऱ्यावर संताप उद्विग्नता स्पष्ट दिसत होती. मोठ्या कष्टाने तो चालत आला, "पाणी. . .S".
मी त्याला फ्रीज मधली बिसलरी दिली, स्वामींच्या समोरील हवन कुंडातील विभूती मी द्राम् बीज उच्चरत त्याच्या कपाळी लावली व त्याला बसायला खुर्ची दिली.
तो गोंधळ ला होता त्याने एकदा स्वतः चे अंगावरून हात फिरवून पहिला इकडे तिकडे बघितलं, उभं राहून पाहिलं वाकून पाहिलं
"कस शक्य आहे. . . .", म्हणत तो मला नमस्कार करावयाचे आधीच मी त्याला धरून परत खुर्चीत बसवलं. "हे . हे शक्य नाही . . . मी ok आहे. . . ती माझा जीव घेऊ शकली नाही gr8 . . .".
"काय शक्य नाही. . .?".
"कोण तुमचा जीव घेऊ शकली नाही....?".
"निलेश... निलेश S..S". शेवटी निलेश भानावर आला अतीच excite झाला होता.
"अविनाशजी मला वाचवा म्हणत ओक्साबोक्शी रडायला लागला. निलेश ला शांत करून नक्की काय झालं हे मी त्याला सांगण्याची विनंती केली ती त्याच्याच भाषेत इथे दिली आहे.
खरतर मी जरी इंजिनिर असलो तरी मला एक उत्तम ज्योतिषी व्हायच होत अगदी किरो सारख, ज्योतिष शास्त्र हस्तरेखा, मुद्रा सामुद्रिक वास्तुशास्त्र, मेदिनीय ज्योतिष विविध प्रकारच्या शास्त्रांचा मी अतिशय सखोल अभ्यास केला होता पण एवढा करून सुद्धा त्या विद्येच्या सहाय्याने मला पैसे व नाव कमवता आले नव्हते. ब्लॉग लिहून बघितला होता, पाम्प्लेट, advertising , सगळे प्रकार करून ही मनासारखा ब्रेक मिळत नव्हता.
आपण एक उत्तम ज्योतिषी का नाही याची खंत होती.
आठवड्यात न एखाद-दोन व्यक्ती मला प्रश्न विचारायला यायचे पण माझ्या समोर च्या बिल्डिंग मध्ये जे ज्योतिषी होते त्यांच्याकडे मात्र माणसांचे रीघ लागलेली असायची.
माझे एक स्वप्न होतं किरो सारखे एक महान ज्योतिषी व्हायचं नाव कमवायचं मोठे मोठया व्यक्ती, राजकारणातील व्यक्ती या माझ्याकडे येतील, घरांच्या बाहेर गाड्यांची रांग असेल, माणसांची रांग असेल, पण यातली कुठलीच गोष्ट झालेली नव्हती त्यामुळे मी अत्यंत व्यथित झालेलो होतो अश्या विमनस्क अवस्थेत मी काशीला निघून आलो.
घरी कोणाला काहीच बोललो नव्हतो, दशाश्वमेध घाटावरती मी सुन्न अवस्थेत बसलेलो होतो. आजूबाजूस बरेच बाबा बुवा, साधू संन्यासी होते बैरागी होते कोणी नशेत होते कोणी असेच बसलेले होते कोणी आशीर्वाद देत होते त्या वेळेला एक बैरागी माझ्या दिशेने आला आणि म्हणाला "बेटा परेशान हो. . .?".
मी त्याला म्हटलं की, "हा हु परेशानी मे, आपको क्या तकलीफ है. . .?".
बैरागी हसला आणि म्हणाला की "बेटा ज्योतिष शास्त्र से काम नही चलेगा उसके साथ कुछ ना कुछ, विद्या हस्तगत रहनी चाहिये तो ही नाम कमा पाओगे".
साधू कसला तो अघोरी होता मी एकदम उठून उभा राहिलो, आधी मला जरा त्याचा संताप आलेला होता पण जेव्हा त्याने माझी व्यथा ओळखली तेव्हा निश्चितच कोणीतरी सत्पुरुष किंवा महात्मा सर्व अशी माझी समजूत झाली मी त्याला म्हणालो, "बाबाजी, अशी काही विद्या असेल तर तुम्ही मला शिकू शकता ?".
तेव्हा तो म्हणाला की "मी तुला विद्या शिकवू शकतो पण तू मनाने कमकुवत असलास तर नको शिकू कारण विद्या शिकता शिकता मृत्यू येऊ शकतो हे आधीच तुला सांगून ठेवतो".
मी इरेला पेटलेलो होतो, कसेबही करून मला जगातला एक उत्तम ज्योतिषी जाणकार ज्योतिषी व्हायच होतो त्याच्या मुळे प्राण गेला तरी चालेल पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो, बाबाजी ने संध्याकाळी आठ ला त्याच्या कुटीत बोलवलं होत येताना दारू मटण गांजा आदि सगळ्या वस्तू घेऊन यायला सांगितलं, पैशाची मला कमी नव्हती त्याच्यामुळे बरोबर आठ वाजता मी त्याच्या करता ब्लेंडर्सप्राईड चा खंबा, बोनलेस चिकन, गांजा (थोडासा शोधावा लागला होता) असं सगळं सामान घेऊन त्याच्याशी जाऊन पोहोचलो दहा बाय दहाच्या झोपडीत बाबाजी खाली बसलेला होता चिलीम चालू त्याने चिलीम माझ्या पुढे केली पण अर्थात मी मानेनेच त्याला नाही म्हणालो.
मी त्याला पहिलाच प्रश्न विचारला की "माझी अडचण तुम्हाला कशी कळाली व तुम्ही मला कशाकरता मदत करताय??". तो म्हणाला
"मी विविध प्रकारच्या साधना केलेल्या आहेत त्या साधनांपैकी मला असं वाटलं आज की माझ्या जवळ एखादी शक्ती एखाद्या गरजू माणसाला देऊन टाकावी, तू मला योग्य वाटलं व आतून प्रेरणा झाल्यामुळे ती मी तुला देणार आहे पण त्याकरता तुला बारा ते पंधरा दिवस इथे राहावे लागेल तुझी तयारी आहे का ठरवून सांग कारण कृष्ण त्रयोदशीच्या तीन 5 दिवस आधी व अमावस्येच्या 5 दिवस पुढे तुला इथे रहावं लागेल". मी तयारच होतो बाबाजीचा झोपडी च्या बाजूला एक रिकामी झोपडीत अशीच पडलेली होते बाबाजी ने मला सांगितलं,
"उद्यापासून लॉज ची खोली सोडूनच झोपडीत राहायला ये, उद्या मी तुला सगळे समजावून सांगेन कारण तुला संध्याकाळ पासून साथ साधना सुरु करावी लागेल. मी खोली सोडून दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या बाजूला असलेल्या झोपडी त आलो , कुठल्यातरी साधूची ती असावी, मी नीट स्वच्छ केली झाडून जाळी जळमटे काढून स्वच्छ केली.
बरोबर मिनिट सतरंजी आणलेली असते बाबाजी ने मला एक फोटो दिला होता तो फोटो कुठल्यातरी देवतेचा होता गळ्यामध्ये हाडांची माळ नग्न निळसर हिरवट अंगकांती असलेल्या देवतेचा तो फोटो होता डोळ्यात लालसर पणा होता फोटो हाताने काढलेला होता तरीपण अतिशय भीती वाटणारा होता तो फोटो बाबाजिने मला त्या खोलीत उत्तरेजडे तोंड करून ठेवायला सांगितला आणि मग सांगितलं
"एक गोष्ट लक्षात ठेव आजपासून कुठल्याही देवतेचे नाव द्यायचं नाही", "गायत्री जप करायचा नाही", "पूजा पाठ बंद, मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं नाही, इतकंच काय ज्या गल्लीमध्ये मारुतीच्या मारुतीचे मंदिर असेल त्या गल्लीत पाय सुद्धा ठेवायचं नाही"
"जवळ कुठल्याही देवतेचा फोटो ठेवायचा नाही, जानवं असेल तर फेकून दे", जेव्हा किंवा तुझ्या गावी परत जाशील तेव्हा तेव्हा घरात असलेले सगळे देव नदीत विसर्जित करून टाकायचे", "ह्या साधनेचे हे नियम तुला मंजूर असेल तरच तु साधना कर अन्यथा हा नाद सोडून दे", इतकं बोलून बाबाजी थांबला. मी ठरवलेलं होतं काय व्हायचं पुढच्या पुढे. बाबाजी ने मला सांगितलं आज पासून आज पासून दारू मटण खायला शिक, दात घासायचे नाहीत आंघोळ करायची नाही कपडे बदलायचे नाही, केस विंचरायचे नाही, दाढी करायची नाही बाकी तू जनरल इकडे तिकडे फिरू शकतोस इथे कुठलाही मंदिरामध्ये जायचं नाही कुठलाही बाबा-बुवा च्या पाया पडायचं नाही रोज मटन खायला शिक ,दारू प्यायची सवय लावून घ्यावी लागेल कारण ही समोर ठेवलेली देवता आहे त्या देवतेला धारण करता येईल असे शरीर तुला तयार करावं लागेल. बघता बघता पाच दिवस निघून गेले, माझ्या अंगाला कॊद्याना दुर्गंधी येत होती, दारू चा एक वास खोलीत भरून होता, बरोबर कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी माझी वाममार्गी साधना सुरू झाली त्याने मला एक मंत्र दिलेला होता त्या मंत्राच्या 151 माळा रोज मला करायचा होता त्याच्या करता त्याने स्वतःच्या गळ्यातली ५१ मणक्या पासून तयार केलेली माळ मला दिलेली होती.
आता तीन दिवस झोपडी बाहेर पडायचे नव्हते , बाहेरच काही खायच नव्हतं, अघोरी साधना असल्यामुळे भूक तहान लागल्यास स्वतःच मल मूत्र सेवन करायचं होतं. बाबाजी एक टोपलीत खूप विष्ठा घेऊन आला होता ती त्याने काही मंत्र म्हंटले व सगळ्या अंगाला लावली होती, कपडे काढून टाकायला लावले होते , थोडा मळ गंधासारख्खा कपाळावर मंत्र म्हणत लावून तो निघून गेला. भूक लागल्यावर विष्ठा सेवन आणि तहान लागल्यावर मुत्र प्राशन ऐकूनच माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता पोटात ढवळून आलं होतं, ओकारी होते की काय असं वाटत होतं, पण म्हटलं तीन दिवसांचा प्रश्न आहे तीन दिवस करून पाहू माझ्या आसनाच्या चारी बाजूला डुकराच्या चरबीचे दिवे त्याने पेटवून दिले रोज संध्याकाळी सूर्यास्त ते सुर्योदय या कालावधीमध्ये मला 151 माळा जपायच्या होते मंत्र जपायला मी सुरुवात केली होती तीस-पस्तीस माळा झाल्या नंतर वारंवार एक नंबरला जायच्या भावना इतक्या तीव्र झाल्या पण त्याने सगळे विधी आसनावर च करायचे आसन सोडलं तर मरशील असं सांगितलेल असल्यामुळे आसनावर सर्व क्रिया, सगळीकडे दुर्गंधी पसरलेली होती सकाळी सहा वाजेपर्यंत १५१ वी का माळ संपली होती कुठल्याही परिस्थिती झोपडीतून बाहेर पडायचं नाही सूर्यप्रकाश अंगावर येता कामा नये भूक लागेल तसं मी त्या घाणेरड्या विष्टेचे सेवन करत होतो माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले, कधी हे 3 दिवस संपतात अस झालं होतं एक दिवस तर संपला होता आता अवघे दोनच दिवस राहिले होते त्यामुळे मी ठरवलं की हे दोन्ही दिवशी संपवून टाकू रात्रभर केलेला जपामुळे थकवा आलेला होता दुपारी झोपडीमध्ये मी नग्नावस्थेत पडून राहिलेले होतो खूप भूक लागलेली होती पण घाणि व्यतिरिक्त मी काही खाऊ पण शकत नव्हतो त्याच वेळेला फोटोमध्ये दिसणारी ती स्त्री देवता बाहेर आली ती सर्वथा नग्न होते तीस-पस्तीस वय असाव ती दिसायला सुंदर मादक होती. तिच्या मध्ये विलक्षण आकर्षण होत.
येऊन ती सरळ माझ्या जवळ झोपली आणि तिने मला घट्ट मीठी मारली मी कसंतरी स्वतःची सोडवणूक करून घेतले मी फार घाबरलेलो होतो जबरदस्तीने तीन मला परत झोपायला भाग पाडले माझी चुंबन घेत ती माझ्या अंगाशी चाळा करून मला उत्तेजित करवून संभोग साठी प्रेरित करत होती. संभोग करून ती फोटोत नाहीशी झाली भास होत की भ्रम देव जाणे.
परत प्रकट होऊन संबंध करण्याचा प्रयत्न सुरू केला पण मी इतका थकलेला होतो, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. परत मी जपाला बसलो आज दुसरा दिवस होता आपला जप करताना ती पिशचिनी मांडीवर येऊन बसलेली होती तिच्या दात बाहेर आले होते दुपारी माझं लक्ष गेलं नव्हतं पण डोक्यामध्ये थोडासा शेंदूर दिसत होता तिच्या गळ्यामध्ये हाडांची माळ होती कधी ती माझे चुंबन घेत होती तरी माझ्या कमरे मध्ये हात घालत मला बिलगून बसत होती तर कधी माझ्या गुप्तठिकाणा वरून हात फिरवत मला चाळवत उत्तेजित करत होती. पण मी जप सोडला नव्हता माझ्याच मांडीवर बसून तीन केलेल्या विधी न ची घाण ती माझ्या अंगावर फासत खळखळून हसत होती, सगळ्या खोलीत कमालीची दुर्गंधी पसरलेली होती. सूर्योदयाच्या वेळेस जसा जप संपत आला तशी ती एकदम नाहीशी झाली आजची शेवटची रात्र होती मी अतिशय अगतिक झालो झालेलो होतो, मला अतिशय भीती वाटत होती. मृत्यू ची शंका येत होती. पत्नी, मुलांचा काय होईल या चिंतेने वेड लागायची पाळी आलेली होती नेहमीप्रमाणे दुपारी ती आली आणि तिने मला झोपायला सांगितलं जमिनीवरती मी सरळ नकार दिला तिने सरळ माझ्या कमरेमध्ये लाथ मारली होती सगळ्या पाठीतून वेदनांची चमक उमटली होती मी गपचुप जमिनीवर पडलो होतो असंख्य वेळेला तिने माझ्याशी संxभो$ग केले आणि सूर्यास्ताच्या वेळेला ती नाहीशी झाली विशेष मला या गोष्टीचं वाटत होतं की अन्नात पोटाला अन्नाचा कणही नव्हता एवढं वीर्य एवढी सं#भो$ग करण्याची ताकद कुठून आली होती, कदाचित त्या अघोरी विद्येचा हा भाग असावा आजचा शेवटचा दिवस होता मला जप संपला हाडांची माळ मी माझ्या गळ्यामध्ये घातली होती आज ती माझ्या मांडीवर न बसता समोर येऊन बसलेली होती. बाबाजी आत मध्ये आला होता आणि मला म्हणाला घाबरू नको ही कायाम आता तुझी सेवा करेल असे म्हणून त्याने कुठले मंत्र उच्चारले कोण जाणे, माझा संस्कृत बेताच होता त्यावरून मला एक गोष्ट समजली होती की इतके दिवस बाबाजी तिला आपल्या बंधनांमध्ये अडकवून ठेवलेल्या होतं त्यांतन ती मुक्त झालेली होती थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट संपलेलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या जवळच्या बाबाजींनी यशस्वीरित्या दिला होता मी काही विचारायच्या आत बाबाजी झोपडीतन नाहीसा झालेला होता
पिशचिनी नी माझा हात हातात धरून म्हटलं यापुढे मी सदैव तुझ्याबरोबर असेन तुझ्या कानाच्या मागच्या बाजूला मे राहिन आणि तुला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगत जाईन जेव्हा मला गरज असेल त्यावेळेला तुला माझ्याशी सहवास करावा लागेल. माझ्या गुप्तांxxचे चुम्बन घेऊन स्वतःच्या गळ्यातली हाडांची माळ तिने माझ्या गळ्यात घातली आणि माझ्या गळ्यात गळ्यातली माळ स्वतःच्या गळ्यात!!!
आज पासून आपण पती पत्नी झालो एवढं बोलून सूर्योदयाच्या आत ती नाहीशी झाली
सूर्य उगवला होता आधी मी जर काही केला असेल तर नदीकडे धाव घेतली स्वच्छ आंघोळ केली दार उघडले कितीतरी वेळ मी आंघोळ करत होतो कितीतरी वेळ मी अंगाला साबण लावत होतो तिने एक सूचना दिली होती गळ्यातली हाडांची माळ काढायची नाही आणि कुठल्याही दैवते जप केला तुला जागेवरच ठार मारेन. नदीतून बाहेर आलो आणि आजू बाजूला बघितलं बाबाजीची झोपडी कुठे दिसत नव्हते सगळा दशाश्वमेध घाट, जवळ चे इतर घाट नदी चा सगळा किनारा आणि सगळे घाट मे पालथे घातले होते पण बाबाजी कुठे दिसला नव्हता मी अनेकांना त्याच्याविषयी विचारलं होतं पण कोणी काही सांगू पण शकलं नव्हतं सगळ्यात आणि मलाच माझ्या मुर्खपणाची लाज वाटत होती कारण मी त्याला त्याचं साधं नाव विचारलं नव्हतं घरी परत आलो घरच्यांचा जीव भांड्यात पडला रेल्वेमध्ये एक शेठ भेटले,मुंबईचे होते त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि विचारलं की तुम्ही कोठे असता काय असतात वगैरे सगळं बोलणं झालं जेव्हा त्यांना कळलं की मी ज्योतिषी तेव्हा ते म्हणाले की मला कधी मुलं होतील त्यावेळेला त्या वेळेस पिशाचिनी ने माझ्या कानात सांगितला हा खोटं बोलतोय त्याला तीन मुलं एक १० वी मध्ये आणि दोन्ही मिठाई च्या दुकानांचे मालक आहे.
मी जेव्हा शेठ ला सांगितलं, डायरेक्ट माझे पायच धरले आणि मुंबईला जेव्हा मी उतरलो तेव्हा माझ्या घरी जाण्या ऐवजी शेठ डायरेक्ट मला त्याच्या घरी घेऊन गेले होते मला घरी फोन करून सांगायचं होतं की मी परत आलेलो आहे. मी शेटजी ना म्हटले की "मला जरा मला जरा घरी जायचंय" ,त्याने ताबडतोब मला एक गाडी एक नोकर अशा सगळ्या गोष्टी देऊन घरी पाठवून दिल. बघता बघता माझा स्वप्न पूर्ण झाली घराखाली लोकांची मोठी रांग उभी असे सिनेतारकांचे फोन घेऊन ते स्वतः येऊन जात. बिल्डर जमीनदार शेटजी वेगवेगळ्या शहरात न गावात न लोक काहीना काही विचारायला येत. पिशचिनी भूतकाळ अचूक सांगे पण पिशाचिनी ला भविष्यकाळ सांगता येत नसे तेव्हा लोकांना पत्रिका वगैरे बघून उपचार कालावधी वगैरे लिहून देत असे आणि बाकीच्या मार्गदर्शना करता माझ्या मित्राकडे पाठवत असेल कारण आता कुठलेही धार्मिक पुस्तक माझ्या घरात नव्हती.
आर्थिक परिस्थिती सुधारली होती पैसाच पैसा आलेला होता पूर्वीसारखे व्रतवैकल्य वगैरे करण्याची आवश्यकता उरलेले नव्हते आयुष्याचे एक बाजू पूर्ण सोनेरी झाली होती तर दुसरी बाजू उद्ध्वस्त. अल्प आजाराने पत्नीच निधन झालं होतं, पिशचिनी म्हणाली की मी तुझी पत्नी आहे निलेश त्या मुळे तिला जाण गरजेचे होत.
मुलगी घर सोडून एका मुसलमानां बरोबर पळून गेली होती मुलगाही किरकोळ कारणावरून भांडण काढून घर सोडून गेला होता. घरामध्ये मी एकटाच राहिलो होतो मी आणि पिशाचीनी ती हवं तेव्हा माझ्याशी सहवास करत असेल पण हा सहवास मला सहन होत नसे यातून बाहेर पडण्या करता ज्या वेळेस मी एखाद्या अधिकारी व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस छातीतून कळा येणे, पाठीत असह्य वेदना होणे गळाल्या सारख वाटणे अचानक समोरच दिसेनासा होणे असे विविध प्रकार होता कर्ण पिशाचिनी आवाज कानात घुमत असे "लक्षात ठेव
तू मला सोडून राहू शकत नाही सोडून जायचा प्रयत्न केला तर तुला मी ठार मारिन"
मला नवल फक्त या गोष्टीचं वाटतं की इथे आल्यावर मात्र कसाकाय मला कुठलाच त्रास झाला नाही त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलेलं होतं त्याला म्हटलं
"निलेश ही अघोरी साधना करून तू काय साध्य केले प्रसिद्धी पैसा मान मरातब, पण पत्नी नाहक मेली, पोर सोडून गेली, अरे ह्या अमानवी शक्तींना दया माया नसते रे!".
याच्या लालसेने असंख्य माणसे अशा तरी साधना करतात आणि मग कायमचे वर्षानुवर्षे प्रेत योनीमध्ये भटकत राहतात तुझी वाटचालीतील त्या दिशेने सुरू आहे स्वामी महाराजांनी वाचवल तरच तुझी यातून सुटका होऊ शकेल फारच मोठी चूक केलीस तू".
"इथे येताना तुला हा त्रास का झाला नाही याविषयी मी तुला कुठलीही माहिती देणार नाही कारण मला तशी काही गरज वाटत नाही".
येत्या अमावस्याला आपण काय करायचं ते बघू, बाबाजीने ही विद्या तुझ्या जवळ घेऊन टाकली आणि तो तिच्या तावडीत न सुटला तशी या विद्येच दान आता तुला कोणाला तरी करावं लागेल त्याशिवाय तू याच्यातुन वाचू शकणार नाहीस आणि स्वामी महाराज सरळ तुझ्या प्रारब्धात बदल करतील असं मला तरी वाटत नाही तरीपण अजून दोन दिवसांनी अमावस्या आहे तेव्हा आपण भेटूयात ओमकारेश्वर येथे भेटू त्यावेळेला काही विधी करून त्या विद्या च दान तुला तिथे ओमकारेश्वर मंदिरामध्ये कोणालातरी करावं लागेल. इतर कोणालाही तसं बळी करू शकत नाही त्यामुळे अशीच मोठी एक अघोरी साधना करणारे पुण्यातील व्यक्ती माझ्या परिचयाची आहे त्यांना भेटून त्याने जर त्यात दानाचा स्वीकार केला तरच तुझी सुटका होऊ शकेल अन्यथा नाही अशी कल्पना देऊन मी निलेश ला वाटेला लावले दोन दिवसांनी अमावस्य आली एकूण हे प्रकरण जरा कठीणच होतं मी माझ्या त्या परीचित व्यक्तींशी बोलून ठेवलेलं होतं तेव्हा ते म्हणाले
"अविनाश तू म्हणतोस तस आपण करू शकतो , पण निलेश इथं पर्यंत पोहोचला तर...".
मी अबू ना फोन लावला तेव्हा ते म्हणाले " हे बघ त्याने स्वतः हुन हा उद्योग केला आहे, पिशचिनी काही त्याच्या कडे आपण हुन आली नव्हती ह्याने च सर्व विधी करून तिला आमंत्रित केले तेव्हा स्वामीच काय ते ठरवतील".
अमावस्येच्या दिवशी निलेश रात्री ओंकारेश्वर मंदिरात येणार होता पण नाही आला.
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये पेपर मध्ये संशयास्पद मृत्यू म्हणून छापून आलेला फोटो निलेश चा च होता.
कर्माची गती समजत नाही हेच खरं
@स्वामी@