Apradhbodh - 3 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 3

Featured Books
Categories
Share

अपराधबोध - 3

श्वेता आधीही सारांशला निरागस तिने प्रेमाने आलिंगन देत होती. तीला आत्ताही त्याच्या स्पर्शात तसाच आधीसारखा गोडवा वाटत होता. मात्र सारांशच्या मन आणि मस्तिष्कात एक द्वंद सुरू होते ते म्हणजे भावनांचे. सारांशचा भावना आता त्याच्या ताब्यात राहिलेल्या नव्हत्या. असे नाही की सारांशच्या सोबत कॉलेजमध्ये त्याच्या समवयातील मुली या सुंदर आणि आकर्षक नव्हत्या. परंतु ही बाब होती प्रेमाची निखळ आणि निर्मळ प्रेमाची. श्वेतावर प्रेम जडलेले होते ते ही निखळ, निरागस आणि निर्मळ. त्याला श्वेताच्या मादक आणि आकर्षक शरीराशी प्रेम झालेले नव्हते तरतीची मनभावना आणि तिच्या आपुलकी सोबत त्याला प्रेम झालेले होते. परंतु आता सारांशच्या व्यक्तिमत्वात ही बदल घडू लागले होते. सारांशचे वाढते वय त्याला दिवसे दिवस नव नवीन अनुभूती करून देऊ लागले होते. तो आता प्रेमाच्या एका नवीन परिभाषेशी सम्मिलित होऊन राहिलेला होता. त्याचप्रमाणे त्याच्या मन आणि शरीराला वेदना, भावना, उत्तेजना, वासना आणि मुख्य म्हणजे स्पर्धाचा वेगळा अनुभव होऊ लागला होता. श्वेता त्याला आत्ताही तशीच पूर्वीसारखी निरागसतेने आलिंगन आणि स्पर्श करत होती, परंतु सारांशचे मन आणि शरीर श्वेताच्या त्या स्पर्शाला एका वेगळ्या अनुभूतीने अनुभवत होते. श्वेताच्या स्पर्शाने सारांश आता उत्तेजित होऊ लागला होता आणि ती उत्तेजना त्याच्या ताब्याच्या बाहेर होऊन जाऊ लागली होती. म्हणून सारांश आता श्वेताच्या स्पर्शाचा लांब स्वतःला सारण्याचा प्रयत्न करतो खरा परंतु दुसऱ्या क्षणात त्याला तिच्यापासून दुरावाही मान्य नसतो. त्यामुळे तो तीच्या स्पर्शाच्या आस्वाद घेण्यासाठी आतुर असतो. आता तर सारांशचा इंद्रिया सुद्धा जागृत झालेल्या होत्या. त्याला आता श्वेताच्या स्पर्शाच्या सोबत तिच्या शरीराच्या मदमस्त करणारा गंधही अधिकच उत्तेजित करत होता. त्या दरम्यान सारांश च्या मनात एक भीती सारखी लागून राहिलेली असायची ती म्हणजे शालिनीतेची आणि मर्यादेची. सारांशला सारखे वाटू लागले होते की अशा अनयास वागण्यामुळे किंवा कृत्यामुळे त्याच्या आणि श्वेताच्या मधील शालिनीता आणि मर्यादा भंग तर होणार नाही.

याच्या परिणाम आता सारांशच्या अभ्यासावर सुद्धा होऊ लागला होता. सारांशला आता प्रत्येक वेळेस श्वेता सर्वत्र दिसू लागली होती याची जाणीव त्यालाही सारखी होत राहिली होती आणि त्यामुळे तो अधिकच बेचैन होऊ लागला होता. त्याकरिता सारांश आता जास्त एकांतात राहण्याचा प्रयत्न करत होता. तो नेहमीसारखा श्वेताच्या घरी न जाता त्याच्याच घरी एकटा त्याच्या रूममध्ये जास्त वेळ घडून घालू लागला होता. परंतु त्याचा तशा वागण्याने त्याला स्वतःलाच त्रास भोगाव लागला होता. तो हळूहळू सगळ्यांच्या सानिध्यापासून लांब होत चालला होता आणि एकांताने तो ग्रासित होऊ लागला होता. त्याच्या अशा वागण्याची प्रचिती त्याच्या आई-बाबांना झाली आणि त्यांनी त्याला विचारले सारांश काय झाले तू असा स्वतःला आपल्याच घरात का बरं कोंबून ठेवतो आहे. तेव्हा सारांश काहीच उत्तर देत देऊ शकला नाही त्यांना तेव्हा त्याच्या बाबांनी त्याच्या मनाची आणि वयाची मानसिकता समजून घेतली कारण की ते सुद्धा अशाच मानसिकतेतून पार पडले होते. त्यांनी सारांशला घरातून बाहेर काढण्यासाठी त्याला आधी स्वतः सोबत बाहेर फिरवण्यास न्यायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी त्याला एका स्पोर्ट्स क्लब मध्ये दाखला मिळवून दिला.
सारांश हळूहळू पूर्वीसारखा व्यवस्थित होऊ लागला होता तो नियमित तिथे जाऊ लागल्यामुळे त्याचे मन खेळात अधिक रमू लागले होते. खेडल्यामुळे त्याचे शरीर थकू लागले शरीर थकल्यामुळे त्याला आता छान झोप येऊ लागली होती आणि त्याचे मन आणि बुद्धी अभ्यासात ही पूर्वीसारखे लागू लागले होते. आता सारांश मधील घडलेला फरक जाणवून त्याचे आई बाबा अधिकच सुखावले होते. सारांश आता कॉलेजमध्ये सुद्धा सगळ्यांचा सोबत मिळून मिसळून राहू लागला आणि आपले जीवन जगू लागला होता. अशा जीवनशैलीत तो अधिकच आनंदीत राहू लागला होता आणि त्याच्या त्याच्या कॉलेजमधील अभ्यासावर दिसू लागला होता. तो पुन्हा चांगल्या गुणांनी बारावीत उत्तीर्ण होऊन गेला होता. तेवढ्यात त्याचा आयुष्याने आणि एक नवीन कलाटणी घेतली होती. त्याच्या कॉलेजच्या त्या छान परिणामामुळे त्याला एका छानशा कॉलेजमध्ये त्याच्या उच्च शिक्षणाची संधी चालून आली होती. आता सारांश २१ व्या वर्षात पदार्पण करून गेलेला होता आणि आणखी परिपक्व होऊन चालला होता. त्याने त्या कॉलेजमध्ये दाखला घेतला आणि तो तेथे नियमीतपणे जाऊन शिक्षण ग्रहण घेऊ लागला होता. त्याने त्याच्याबरोबर स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नव्हे तर थोडे पैसे कमवण्यासाठी आपल्या शिक्षणाच्या संबंधित एक पार्ट टाइम जॉब सुद्धा बघून घेतला होता. आता तो कॉलेज आणि त्याच्या जॉब यात अधिक रमून गेलेला होता. त्यामुळे त्याला कुणाला भेटण्याची सवळ भेटत नव्हती. त्याची ही व्यस्तता त्याच्या घराच्या मंडळी सवेत श्वेताच्या घरच्या सदस्यांना दिसू लागली होती.
त्यात श्वेता ही तर त्याच्या आधीच व्यस्ततेत अडकून बसलेली होती म्हणून तिला सारांशचे अचानक आपल्या घरी न येणे आणि त्याला समोरासमोर बघितल्याशिवाय दोन वर्षाच्या काळ उलटून गेला म्हणून हे तीला कळलेच नाही. अधून मधून तिने अचानक सारांशची चौकशी तिच्या आई पासून नक्की केलेली होती. परंतु नीयतीच्या खेळ कुणाला कधी कळणार नाही आणि कडू शकत नाही. एके दिवशी सारांश त्याच्या जॉब वरून घरी परत येत असतांना त्याला काहीतरी अनुभवले. तो ज्या बस मध्ये येत होता त्या बस मध्ये एक चेहरा त्याच्या नजरेत पडला. तेव्हा काय जाणे बस मध्ये सगळे चेहरे विसरून त्याची नजर फक्त आणि फक्त त्या एका चेहऱ्यावर अडकून बसली होती. त्या बस मध्ये गर्दी होती तरी तो त्या चेहऱ्याला एका एक क्षणी त्याच्या नजरेच्या दूर जाऊ देऊ शकत नव्हता. म्हणून तो त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. बस मध्ये हवेलाही इकडून तिकडे जाण्यास जागा शिल्लक नव्हती तेथे तो जाऊन उभा राहिला होता. त्याचा नाकात तो ओळखीच्या मदमस्त करणारा शरीराच्या गंध येत होता. मग बसचा चालकाने ब्रेक मारल्यामुळे अनयास ती त्याच्या अंगावर येऊन आदळली होती. त्यावेळेस तिच्या शरीराच्या तो स्पर्श सारांशला अधिकच उत्तेजित करून गेला होता. त्या बसमधील तो चेहरा दुसरा कुणाचा नसून ती श्वेता होती जी तिच्या कामावरून घरी परतत होती. श्वेताच्या शरीराच्या मदमस्त गंध आणि उत्तेजित करणाऱ्या शरीराच्या अनुभूतीत गुंग होऊन कधी तो त्याच्या स्टॉप वर पोहोचला त्याला कळलेच नाही.

बसच्या वाहकाने जेव्हा त्याला उतरण्यास सांगितले तेव्हा तो त्या गुंगीतून बाहेर आला लगबगीने खाली उतरला आणि त्याच्या घरच्या दिशेने बघत राहिला. त्याने पाहिले की श्वेता लगबगीने घराकडे निघून गेली होती. मग तो हि त्याचा घराकडे निघाला होता आता मात्र सारांशला श्वेताची आठवण येऊन सारखा तिचा विचार करून अधिक बेचैन होऊ राहिला होता. त्याच्या मनात श्वेताला भेटण्याची इच्छा जागृत होऊन गेली होती. त्याला आता काहीही करून तिला एकदा भेटायचे होते तर याचा विचार करत करत तो घरी गेला. त्या दिवशी त्याचे आई-बाबा कुणाच्यातरी लग्नाला गेलेले होते म्हणून तो घरी एकटाच होता आणि राहुन राहुन त्याला श्वेताची आठवण येत होती. आज जवळ जवळ दोन वर्षांच्या कालावधी कालावधीनंतर त्याने श्वेताला बघितले आणि तिच्या स्पर्श अनुभवलेला होता. रात्र झालेली होती आणि जवळजवळ रात्रीचे अकरा वाजले होते. आज काय जाणे सारांशला झोप येतच नव्हती कारण श्वेता त्याच्या मन मस्तिषकावर पुन्हा एकदा स्वार झालेली होती. अनयास तेव्हा घराची आणि संपूर्ण परिसरातील लाईट गेलेली होती. गर्मी होत होती म्हणून सारांश गच्चीवर जाऊन फिरू लागला होता. तेवढ्यात त्याला शेजारच्या गच्चीवर पैंजण वाजण्याच्या आवाज आला होता. त्याने त्या आवाजाच्या दिशेने नजर फिरवली तर त्याला श्वेता ही वरती त्याच्या दिशेने पाठ फिरून बसली असताना दिसली. आता मात्र सारांशला राहून गेले नाही आणि त्याने मुद्दाम शेखर म्हणून आवाज दिला. श्वेताने वळून बघितले तर ती आनंदी झाली आणि म्हणाली,"अरे सारांश किती दिवसांनी दिसतो आहेस रे इतक्यात तू घरी सुद्धा येत नाहीस" मग श्वेताने अनयासपणे पूर्वीसारखे सारांशला येण्यास सांगितले. दोघांचे घर लागून असल्यामुळे एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर सहज येता जाता येत होते म्हणून सारांश ही तीचा गच्चीवर जाऊन पोहोचला. झुरु झुर वारा सुरु झालेला होता आणि रात राणीचा फुलांचा सुगंध दरवळत होता. सारांशला समोर बघून श्वेताने त्याला अनयासपणे आणि निरागसतेने आलिंगन. दिले मात्र त्यावेळेस काही वेगळेच घडणार होते.

शेष पुढील भागात.........