Sita Geet - 3 in Marathi Mythological Stories by गिरीश books and stories PDF | सीता गीत (कथामालीका) भाग ३

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

सीता गीत (कथामालीका) भाग ३

समुद्र पार करण्यासाठी मारुतीने मोठी उडी मारली व तो त्याच्या पुण्याईमुळे सागरात न बुडता लंकेमध्ये पोहोचला व त्याने लंकापुरीत सर्वत्र शोध घेतला व अशोक वनात पोहोचला. रात्री तो रावण मी वश व्हावे म्हणून आर्जव करीत बडबड करत होता पण मी त्याच्याकडे लक्षच देत नव्हते. शेवटी तो ' मेला ' राक्षसींना  म्हणाला ही जर दोन मासात तयार नाही झाली तर तीला मारून मांस खायला द्या. असे म्हणून रावण तीथून गेला. हनुमंताला हे पाहून दु:ख झाले. 
मारूतीने हळूच गुणांचा सागर अशा श्रीरामाचे वर्णन सुरू केले व माझ्या समोर येऊन रामनाम असलेली अंगठी ( मुद्रा ) दाखवली. ती मुद्रा बघताचं माझ्या हृदयाला शांतता लाभली व ते प्रेमाने भरून आले.  हनुमंत म्हणाला मी तुमचा दास आहे तुम्ही दुर्गादेवी आहात. माझ्या खांद्यावर बसा मी तुम्हाला घेऊन जातो. तेव्हा  मी म्हणाले तू नेशील हे खरे  पण हे बरोबर नाही असे जाण. त्या रावणाला स्वामी युद्धात मारतील तेव्हांच मी अयोध्येत मुख दाखवीन.
मग हनुमंताने अशोकवनाचा विध्वंस केला. राक्षसांच्या सैन्याला झोडपून काढले. युद्धामधे रावणाचा दक्ष असा राक्षस अक्ष त्याचाही वध केला. इंद्रजिता बरोबर युद्ध केलें पण इंद्रजिताने हनुमंताला ब्रह्मपाशात बांधले. व त्याला रावणासमोर नेले. रावणानी त्याच्या शेपटीला आग लावली. शेपूट पेटवल्यानंतर हनुमंताने उडी मारली व तो निरनिराळ्या बुरूजांवर, वाड्यांवर उड्या मारू लागला व त्याना पेटवून देऊ लागला. लंके मध्ये हाहाकार माजला.  नंतर मला विचारून हनुमंत स्वामींकडे गेला व त्यांच्या पाया पडला.
जर श्रीराम . जय श्रीराम
माझी वार्ता ऐकून स्वामींना अत्यानंद झाला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. एखाद्या भुक लागलेल्या माणसाला अन्न मिळाल्यावर प्रसन्न वाटते तसे स्वामींना माझ्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते प्रसन्न झाले. श्रीरामानी हनुमंताचे उपकार मानले.: स्वामी वानरांचे सैन्य घेऊन निघाले. इकडे बिभीषणाने समजावूनही रावणाने धर्माचा मार्ग अवलंबला नाही. श्रीरामांचे सैन्य सागरावर पोहोचले. सागराने श्रीरामांची हात जोडून नमस्कार करून भेट घेतली व त्याने सागर पार करणेसाठी ' सेतू ' बांधण्यास सांगितले. शत गांवे इतका मोठा सेतू रचला, मोठाले दगड टाकून सेतू रचला. ही वार्ता ऐकताच मला खूप आनंद झाला.
श्रीरामाचे गीत गाइले असता संतंती, संपत्ती, वाढते. हित होते. पर्जन्य, वायु, उष्णता, थंडी श्रीरामाचे गीत गाइले असता बाधत नाही. संसारी जीवन धन्य होते. प्रेमाने श्रीराम गीत गाइले असता काळाचीही भीती वाटत नाही.
श्रीरामाचे नाम घ्यावे, गीत गावे, व भक्तिने श्रीरामाचे पुजन , स्मरण करावे. श्रीराम हे दयेचा सागर आहेत.
        -     जय श्रीराम    -
जय श्रीराम
श्री रामचरितमानस
मी आदरपूर्वक श्री शिवजीना (महादेव) शिरसा नमन करून श्री रामचंद्रजींची निर्मल कथा सांगतो. चैत्र महिन्यातील नवमीला श्री रामचंद्रांचा जन्म होतो त्या दिवशी वेदात (श्रुति) सांगितले आहे की सर्व तिर्थे अयोध्येला जातात.

नाग, पक्षी, प्राणि, मनुष्य, मुनि, देवता अयोध्येमध्ये जाऊन श्रीरामांची सेवा करतात. भक्त श्रीरामजन्मोत्सव साजरा करतात व स्तुतिपर गायन करतात. श्री शरयू नदिच्या पवित्र पाण्यात स्नान करून श्रीरामांचा जप करतात. ही अयोध्या नगरी सर्वात पवित्र व कल्याणकारी आहे. मी कथेची सुरुवात करतोय जी ऐकल्यावर काम, मद, दंभ नष्ट होतात. या कथेचे नाव

  ' रामचरितमानस 'आहे जी ऐकून मनाला शांती लाभते. मनरुपी हत्ती विषयरुपी अग्नीत जळत आहे तो या रामचरितमानसरुपी सरोवरात डुबेल तर सुखी होईल.

रामचरितमानस मुनिंना प्रिय आहे. हे त्रिदोष, दुःख, दरिद्रता व कलीयुगातील पापांचा नाश करणारे आहे. श्री महादेवांनी याची रचना करून आपल्या मनात ठेवले व योग्य समयी पार्वतीदेवीना सांगितले. हे महादेवांच्या हृदयात असलेने त्यांनी याचे सुंदर असे नाव रामचरितमानस ठेवले. मी सुखदायक अशी रामकथा 95. आपल्याला ऐकवत आहे ती आदरपूर्वक ऐकावी.

हे रामचरितमानस जसे आहे, ज्याप्रकारे याची रचना झाली व ज्या हेतूने याचा जगात प्रचार झाला आहे ती सर्व कथा मी श्री उमा-महेश्वराचे स्मरण करून सांगतो.