Murder of Murari - 1 in Marathi Crime Stories by Neel Mukadam books and stories PDF | मुरारीचा खून - भाग 1

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मुरारीचा खून - भाग 1

गुप्तहेर गोगटे हा एक खाजगी गुप्तहेर होता. विक्रांत रामानंद गोगटे हा दिल्ली शहरातील प्रसिद्ध गुप्तहेर होता. त्याची फी होती फक्त 125 रुपये.  तो केसेस अशा पद्धतीने सोडवायचा की सगळे लोक चकित व्हायचे. विक्रांत गोगटेने एखादी केस हातात घेतली म्हणजे तो खुनी किंवा चोर पकडला जाणारच असा दिल्लीतल्या सर्वच लोकांचा समज होता.

एकदा शहरातला एक धनवान माणूस, मुरारी आनंदकुमार दत्ता, गोगटेकडे आला व म्हणाला, “विक्रांत, तू प्रसिद्ध गुप्तहेर आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलोय. मला ठार मारायची कोणीतरी धमकी देत आहे”. हे बघ, असे म्हणून मुरारी दत्ताने कागद काढला, ज्याच्यावर लिहिले होते मी तुला मारून टाकेन लवकरच------ तुझीच मीना.  हे वाचून विक्रांत गोगटेने प्रश्न केला, तुम्हाला हे पत्र किंवा कागद कोणी दिला? मुरारीने उत्तर दिले, एक अहमद नावाच्या माणसाने मला हे दिले. तो म्हणाला, त्याचा मालक कादीरनें हे मला पाठवले आहे. विक्रांतने विचारले,  “तो अहमद दिसायला कसा होता ?” मुरारी उत्तरला,  त्याने चेहरा कापडाने झाकला होता, म्हणून मी त्याचा चेहरा काही मला पाहता आला नाही  पण तो उंचीने मध्यम होता व काठी टेकत-टेकत चालत होता.  विक्रांतचा पुढचा प्रश्न,  तुमच्या जवळपास कोणी कादीर किंवा मीना आहे का? मुरारी ने नकारार्थी मान हलवली व म्हणाला माझ्या ओळखीत कोणी कादीर किंवा मीना नाहीये. विक्रांत म्हणाला, ठीक आहे.  तुम्ही जाण्यापूर्वी तुमच्या घराचा पत्ता मला द्या, मी उद्या एक चक्कर टाकेन त्या परिसरात.  स्वतःची काळजी घ्या. मुरारी दत्ता विक्रांतला पत्ता देऊन आपल्या घरी गेला. विक्रांतने पत्ता वाचला, घर नंबर 4, काशी गल्ली, जैन रोड. नंतर विक्रांत रात्रीचे जेवण जेवून  झोपला.

 दुसऱ्या दिवशी सकाळी भ्रमणध्वनी खणखणला  व विक्रांत गोगटे दचकूनच उठला. भ्रमणध्वनीवर आवाज आला, मी सांगितलं होते त्यांना कुठे जाऊ नका म्हणून, तरी गेले?  नरसिंह म्हणाला, तसे नाही हो,  मी सांगतोय की साहेबांचा खून झालाय, इन्स्पेक्टर कदम आले आहेत. त्यांनी मला तुम्हाला बोलवायला सांगितले. कदमांना वाटते आहे की हा खून आहे व घरातल्या सगळ्यांना देखील तसेच वाटतेय.  विक्रांत गोगटे पटकन काशी गल्लीत आपल्या मोपेड ने पोहोचला.  तो आत गेल्यावर त्याला तिथे काही हवालदार दिसले. इन्स्पेक्टर शंकर कदमांनी त्याचे स्वागत केले व म्हणाले,  ते पहा मुरारी दत्ताचे शव.  विक्रांतने तिकडे पाहिले व म्हणाला,  माणूस येतो रिकाम्या हाताने व जातो पण रिकाम्या हाताने. कदम, हा खून का झाला असे तुला वाटते?  कदम त्याला म्हणाला, हा शत्रुत्वाच्या भावनेने केलेला खून आहे, असे माझे मत आहे. कारण खुन्याने किती निर्दयपणे मारले आहे. विक्रांतने खिडकी पाहिली तर ती तुटली होती. विक्रांत म्हणाला खूनी खिडकी तोडून आत आला असावा. मला घरातल्या सर्वांची मुलाखत घ्यायचीय.  सर्वात प्रथम मुरारी दत्ताच्या बायकोला बोलवा.

 इन्स्पेक्टर कदमांनी मुरारी दत्तांच्या बायकोला पाठवले, ती रडतच होती. ती म्हणजे पार्वती म्हणाली माझे नाव पार्वती. मीच मुरारीला तुमच्याकडे पाठवले होते, त्यांना धमकी आली म्हणून. पण त्यानंतर एक चिठ्ठी आली, असे म्हणून तिने कागद बाहेर काढला. त्यावर लिहिले होते मुरारी दत्ता तू सर्व  गोगटेला सांगितलेस पण तरीही तू मरणारच. तो हरामजादा गोगटेकाही तुला वाचवू शकणार नाही.---- कादीर. गोगटे म्हणाला, ठीक आहे. तुम्ही आता जा आणि नरसिंहला पाठवा. मुरारीची बायको गेली व नरसिंह आत आला.  तो चालताना लंगडत होता.  विक्रांतने ते टिपले व त्याला विचारले, “नरसिंह तुझ्या पायाला काय झाले?” हे ऐकताच नरसिंह घाबरला व म्हणाला, “काल काम करताना पडलो व पायाला दुखापत झाली”. विक्रांतने त्याची गचांडी धरली व म्हणाला, “तुझ्या चेहऱ्यावरून समजते की हे खरे नाही.  मी दुसऱ्या नोकराला विचारतो की हे खरे आहे का? असे म्हणून विक्रांतने दुसऱ्या नोकराला बोलावले आणि विचारले,  हा नरसिंह काल पडला का?  दुसरा नको ठामपणे म्हणाला, “नाही. हा काल कामाला आला नव्हता, तब्येत बरी नाही म्हणून. आतच घरात बसला होता.” विक्रांतने लगेच विचारले, “हा घरात एकटाच होता का? दुसरा नोकर हरिदास म्हणाला,  “नाही हो भाऊ, घरात मुरारी मालक पण होते.  मालकीण बाहेर गेली होती.  विक्रांत बाकी नोकरांना म्हणाला, तुम्ही आता बाहेर जा. बाकी सगळे बाहेर गेले. नरसिंहला गोगटेने विचारले, मग हा मौका चांगला होता तर खून करायला. मालक मुरारी दत्ता एकटेच तुझ्यासोबत, तू खिडकी बाहेर जाऊन फोडलीस, का?  तर,  असे दिसावे की खुनी बाहेरून आला. मलाही तसेच वाटले होते. पण आता मला कोणीतरी आतूनच खिडकी फोडली असे वाटते.  तू आता जा आणि आराम कर. तुझा  या प्रकरणाची काहीतरी संबंध आहे हे नक्की, पण तो आपण नंतर बघू. नरसिंह लंगडतच बाहेर गेला. विक्रम गोगटे इन्स्पेक्टर शंकर कदमांकडे गेला व म्हणाला, “हा नरसिंह काही नीट माणूस नाहीये.  काल कामाला गेला नाही तब्येत बरी नाही म्हणून. हा कोठे जातो?  कोणाशी बोलतोय? लक्ष ठेवा तुम्ही. कदम मान डोलावत म्हणाले हो. पण तुम्ही आता काय करणार? विक्रांत गोगटे म्हणाला,  मी  ह्या मीना व कादीरचा मुरारी दत्ताशी काय संबंध आहे ते शोधतो. पण मला वाटते ही दोन्ही नावे खोटी आहेत, असे म्हणून विक्रांत बाहेर पडला व आपल्या मोपेडवर बसला. त्याने आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी केल्यावर त्याला कळले की, मुरारी दत्ता चंद्रावती नावाच्या मुलीवर प्रेम करत होता पण नंतर तो पार्वतीच्या प्रेमात पडला.  खरंतर चंद्रावतीला मुरारीशी लग्न करायचे होते कारण तिला तो आवडत होता. पण मुरारीला पार्वती जास्त आवडायला लागली म्हणून त्याने चंद्रावतीला नकार दिला व पार्वतीशी लग्न केले. चंद्रावती रागाने शहर सोडून गेली आपल्या दोन मित्रांसोबत--- सलीम आणि वसीम सोबत.