Bhagy Dile tu Mala - 101 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १०१

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १०१

तुमसे बिछडकर जानी है
मैने सांसो की किंमत
लगता है तुम बिन ये
कही मुझसे रुठ ना जाये...

रात्रीची वेळ होती. अन्वय आणि आई दोघेही रूममध्ये बसले होते. स्वरा आता ह्या घरी कधीच येणार नाही ह्याची खात्री दोघांनाही झाली होती तरीही अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी नव्हती. तो स्वराच्या फोटोकडे बघून गोड हसत होता तर स्वराच लेटर वाचून आई भावुक झाल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळा आपले अश्रू जपून ठेवले होते पण आता राहवलं नाही आणि त्या रडतच म्हणाल्या," अन्वय आयुष्यातील खूप मोठी चूक केलीय मी. ज्या मुलीने सतत ह्या घरासाठी खूप काही केलंय तीच मुलगी माझ्यामुळे ह्या घरातून निघून गेली. मी तिला स्वार्थी म्हणाले होते तिला तुझा सहवास हवा म्हणून पण मीही तिच्या सहवासासाठी स्वार्थ केलाच आणि तिची माफी मागायची राहून गेली. ती मला लक्ष्मी म्हणाली होती पण खऱ्या अर्थाने तीच ह्या घराची लक्ष्मी होती. बघ ना तिच्याविना हे घर सुद्धा शांत शांत झाल आहे."

आई रडत-रडत बोलून गेल्या होत्या तर अन्वय अजूनही तितकाच शांत वाटत होता. आईला अजूनही कळत नव्हतं की तो स्वराला शोधायला धावपळ का करत नाहीये म्हणून त्या ओरडतच उत्तरल्या," अन्वय असा दगडासारखा एकाच जागी काय बसला आहेस? शोध ना तिला. कुठे गेली असेल काय माहिती? एवढ्या रात्री आपल्या आई वडिलांना घेऊन ती कुठे फिरत असेल ह्याची कल्पना तरी आहे का तुला? मूर्ख शोध ना तिला. सर्वाना फोन लावून बघ. कुणाला काहीतरी माहीत असेल ना."

आई आज खूप बोलत होत्या तरीही अन्वय एका शब्दाने आईशी बोलला नव्हता पण त्याच्या चेहऱ्यावरच हसू अजूनही नाहीस झालं नव्हतं. अन्वय काहीच रिऍक्ट करत नाहीये हे बघून आईने त्याच्या हातातून रागानेच फोन घेतला आणि पटापट कॉल लावू लागली. मग सौरभ असो की निहू, अन्वयच्या ओळखीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कॉल लावला होता पण जवळपास सर्वांकडून त्यांना निराशाच हाती लागली होती. एवढंच नव्हे तर सौरभने तिच्या सर्व फ्रेंड्सना पण कॉल लावले होते तरीही तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. जवळपास पुन्हा तासभर झाला होता पण स्वराचा काहीच पत्ता नव्हता. आईने आता अन्वयचा मोबाइल बाजूला ठेवला आणि रडतच उत्तरल्या," अन्वय प्लिज तिला शोधुन आन ना रे!! मला तिची माफी मागायची आहे. आज जर मी तिची माफी मागितली नाही ना तर देवाला वर गेल्यावर तोंड सुद्धा दाखवू शकणार नाही. अन्वय तुला ओळखता येत ना तिच्या मनातलं मग तुला माहिती असेल ती आता कुठे असेल प्लिज चल ना मला तिथे घेऊन. तिच्या, तिच्या आई बाबांच्या पायावर डोकं टेकवून माफी मागायची आहे. अन्वय प्लिज चल ना.. एक संधी दे ना मला सर्व काही सुरळीत करायची. अन्वय प्लिज रे बाळा फक्त एक संधी."

आई रडत होत्या तरीही अन्वय शांतच होता. किती वेळ गेला होता माहिती नाही. प्रत्येकाचे स्वराबद्दल विचारायला रिटर्न कॉल येत होते म्हणून अन्वयने फोनच बंद केला. एकदा रडणाऱ्या आईकडे त्याने बघितले आणि अगदी नम्रपणे बोलून गेला," आई आज किती त्रास होतोय ना तुला? पण जेव्हा तू, तुझा समाज तिला टोचून टोचून बोलायचा तेव्हा तिला किती त्रास झाला असेल, तिच्या कित्येक रात्री रडण्यात गेल्या असतील ह्याबद्दल तुला खरच विचार आला नसेल ना? आई राग येईल तुला ऐकून पण जेव्हा स्वतःवर एखादी गोष्ट येते ना तेव्हाच त्याला त्रास समजून येतो बाकी वेळी त्याला इतरांशी काही घेणं देणं नसत. मी तिला शोधत नाहीये कारण आपण कुणीच तिला डिजर्व करत नाही. जाऊ दे तिला, राहील आपल्या छोट्याशा जगात आनंदात. अटलिस्ट रोजचा त्रास तरी सहन करावा लागणार नाही ना ह्या जगाचा. ती बनवेल नवीन आपलं जग आणि मी खुश आहे कारण मी तिला इतके दिवस बंदिस्त केलं होतं पण आता ती आपल्या मनाप्रमाणे वागणार आहे तेव्हा मी नाही शोधणार तिला. मी तिला आधीच म्हटलं होतं सांगून जा मग तुला त्रास देणार नाही. तिने आपलं कर्तव्य पूर्ण केलं मग आता मला काहीच नकोय. ती आनंदात राहील बस बाकी काही नकोय मला. तू उशीर केलास आणि त्याची शिक्षा तुला नक्की मिळेल."

अन्वय बोलून शांत झाला होता तर आईकडे आता बोलायला काहीच उरल नव्हतं. आई काही क्षण अन्वयच्या चेहऱ्याकडे बघत राहिल्या. आज त्यांना अन्वयला फेस करणे अगदीच कठीण जाऊ लागले होते म्हणून क्षणात त्यांनी रूम सोडली. आई जाताच अन्वयने रूमचे दार बंद केले. रूमच्या सर्व लाइट्स बंद केल्या आणि स्वराचा फोटो हृदयाशी कवटाळून म्हणाला," स्वरा तू येण्याआधी माणुसकी काय असते ते मला माहिती नव्हतं. एकाचा त्रास दुसर्याला पण होतो ह्या फक्त फिलॉसोफिकल गोष्टी वाटायच्या पण तू आलीस आणि आयुष्य बदललं ग. तुला त्रास होताना बघून जाणवलं की प्रेम खर असलं तर समोरच्याचा त्रास आपल्यालाही जाणवतो. स्वरा तू म्हणतेस मी तुझं अस्तित्त्व शोधायला मदत केली पण खरं सांगूं तर तू मला माझ्यातला खरा अन्वय शोधायला मदत केली आहेस. तुझी जागा आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे कारण दुसरी स्वरा मला ह्या जगात मिळणे अशक्य आहे. मी जगेन स्वरा तुझ्याविनाही फक्त तू आनंदात राहा. निहू बरोबर म्हणाली होती स्वरा की तू नाही तर हा समाज तुला डिजर्व करत नाही कारण सुंदरता शोधायला त्यांच्याकडे ती नजरच नाही. स्वरा खूप आनंदात राहा फक्त खंत एकच राहील की मी तुला ह्या समाजात स्थान मिळवून देऊ शकलो नाही. प्रेमाने जग जिंकता येत पण ज्यांची मन दगडाची आहेत किंवा ज्यांना बदलायचंच नाही त्यांना मीही बदलू शकलो नाही. आधीपासूनच कायम स्वरा हरत होत्या आणि आताही ती हरली ह्याचंच जास्त वाईट वाटत आहे. सॉरी स्वरा. लव्ह यु सो मच!! तू जा. कधीच परत येऊ नकोस. ह्या स्वार्थी जगात तर अजिबात नको."

अन्वयने तिचा फोटो छातीशी लावला होता. त्या अंधारातही त्याला तिचा फोटो स्पष्ट दिसत होता कारण त्याच्या मनात, नजरेत फक्त स्वरा होती. त्याने डोळे घट्ट मिटले. क्षणात स्वराचा चेहरा त्याच्यासमोर उभा झाला आणि आपोआप पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिच्या त्या खळखळून हसण्याचा आवाज तो फिल करू लागला आणि त्याच्या डोक्यात त्याच्या आवडत्या ओळी घर करू लागल्या..

चाँद भी देखा, फूल भी देखा
बादल, बिजली, तितली, जुगनूं
कोई नहीं है ऐसा
तेरा हुस्न है जैसा

मेरी निगाह ने, ये कैसा ख्वाब देखा है
ज़मीं पे चलता हुआ, माहताब देखा है

मेरी आँखों ने चुना है तुझको दुनिया देखकर
किसका चेहरा अब मैं देखूँ तेरा चेहरा देखकर
मेरी आँखों ने चुना है…

अन्वयच्या मनात त्याच ओळी घर करून होत्या. स्वरा कदाचित जगासाठी तिथे नव्हती पण त्याच्यासाठी मात्र अजूनही ती तिथेच होती. त्याने डोळे घट्ट मिटले आणि ती त्याच्यासमोर उभी झाली. ज्या आरशाने तीच अस्तित्त्व नाकारल होत त्यात ती त्याला कधीच सापडणार नव्हती तर ज्या मनाने तिची खरी सुंदरता त्याला दाखवली होती त्याच मनाच्या कोपऱ्यात स्वरा त्याला सापडणार होती ह्याचा त्याला अंदाज आला होता म्हणून कदाचित त्याने क्षणभरही डोळे उघडले नव्हते. तो हरवला होता तिच्या हसण्यात.

मेरी निगाहो मे
तेरा बसेरा हो
कोई ना देख पाये
ऐसा वो नजारा हो...

रात्रीचे किती वाजले होते अंदाज नव्हता. अन्वय डोळे मिटून पडला होता. आज त्याला जेवायचं भान सुद्धा राहील नव्हतं. स्वराच्या आठवणीच पुरेशा होत्या त्याला जीवन जगायला म्हणून कदाचित तो घाबरला नव्हता. त्याला तिच्याविना राहण्याची सवय करून घेणे आता गरजेचे होते. मध्यरात्र उलटून गेली होती. अन्वय शांत पडला होता तेवढ्यात दारावर थाप पडली आणि अन्वयचे डोळे उघडले. त्याला जाणवलं की तो बाबांचा आवाज होता. बाबा मोठ्याने काहीतरी ओरडत होते म्हणून अन्वयने लाईट ऑन करून पटकन दार उघडले. अन्वय दार उघडून बाबांसमोर आला. बाबांचा श्वास लागला होता, ते तशाच स्थितीत म्हणाले," अन्वय आईची तब्येत बिघडत चालली आहे. तिचा बीपी बहुतेक हाय झाला आहे. ती केव्हापासून स्वराच नाव घेते आहे. थोड्या वेळ जरी तिला हॉस्पिटलमध्ये नेल नाही ना तर काहीही होऊ शकत. प्लिज चल लवकर."

बाबांच बोलणं पूर्ण होताच अन्वय धावतच बेडरूममध्ये गेला. त्याने आईच्या कपाळावर हात लावून बघितले. तिला ताप चढला होता. पूर्ण शरीर घामाने भिजल होत. अन्वय काही क्षण घाबरला, त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला पण आईने काही डोळे उघडले नाही उलट त्यांच्या तोंडून स्वराच नाव सतत बाहेर येत होतं. आईने डोळे उघडावे म्हणून अन्वयने जोराने गालावर मारली तशाच आई उठल्या. डोळे उघडताच समोर अन्वय दिसला. आईचा घाम रुमालाने पुसत अन्वय म्हणाला," आई चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ."

अन्वय आईला बाहुत उचलून घेणार तेव्हाच आई त्याचा हात पकडत म्हणाली," अन्वय मला हॉस्पिटल नको स्वरा हवी आहे. ते पण ह्या क्षणी. तिच्या पायावर डोकं टेकवून माफी मागायची आहे मला. ती मला जी शिक्षा देईल ती मी आनंदाने स्वीकारेल पण प्लिज मला भेटव. मला नाही माहीत तू हे कसं करशील पण मला हवी आहे ती. अन्वय आजपर्यंत मी तुला खूप काही मागितल नाही आणि मागणारही नाही फक्त ही शेवटची मागणी पूर्ण कर. खूप उपकार होतील अन्वय तुझे. आज जर तिच्याशी बोलू शकले नाही तर कदाचित मला हे मरण जास्त आवडेल. मी नाही येणार हॉस्पिटलमध्ये. मला फक्त स्वराशी भेटायच आहे. करशील ना बाळा पूर्ण? शेवटची मागणी, तुला जन्म दिला त्याच ऋण समज हवं तर पण एकदा भेटव तिला. अन्वय प्लिज!! "

आईचा हात अन्वयच्या हातात होता. अन्वयने आईला पहिल्यांदा अस हताश बघितलं होत. आईच्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं आणि हात थरथर कापत होते. अन्वयचे बाबा तर गुपचूप बघत होते कारण त्यांना काय करावं तेच समजत नव्हतं. अन्वय आईकडे बघत होता. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता त्यामुळे आज आई खरच हॉस्पिटलमध्ये येणार नाही ह्याची त्याला क्षणात जाणीव झाली. तो आईच्या डोळ्यात बघत होता तर आई त्याच्याकडे आशेच्या नजरेने बघत होत्या. अन्वयला आईच्या डोळ्यातील अश्रू बघने नाहीसे झाले आणि तो आईच्या हातावर किस करत उत्तरला," मी वचन देतो तुला की स्वराला भेटवेन तेदेखील आजच पण आई प्लिज मी बीपीची गोळी आणतो ती खाऊन घे आधी. खाशील ना?"

त्याच्या शब्दाने आईला धीर मिळाला. अश्रू अजूनही वाहतच होते पण त्या अश्रुत समाधान होत. अन्वयच्या आई अडखळत बोलून गेल्या," मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तू घेऊन ये औषध. तिला भेटायला जायचं आहे तर थोडं चांगलं होऊन जावं लागेल. आन लवकर."

अन्वयने धावतच औषध आणले. तोपर्यंत बाबांनी पाणी आणून दिले होते. आईने औषध घेतले. काही क्षण गेले. आई आता थोड्या बर्या वाटत होत्या. अन्वयने त्यांना शांत केले आणि हळूच हसत म्हणाला," तू थाम्ब मी आलोच. बाबा लक्ष द्या आईकडे."

आईच्या काही बोलण्या आधीच अन्वय बाहेर निघाला तर आईची नजर आताही अन्वयकडे लागली होती.

जवळपास सकाळचे ३ ते३.३० वाजले होते. आई अन्वयची कितीतरी वेळेपासून वाट बघत होत्या. त्यांची नजर फक्त आज दारावर होती. तेवढ्यात अन्वयमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडस हसू पसरल होत. तो मध्ये येताच आईने केविलवाण्या नजरेने विचारले," मिळाला स्वराचा पत्ता? कुठे आहे ती?"

अन्वय हळुवार आई जवळ आला. त्याने आईच्या अंगाभोवती शाल गुंडाळली आणि गोड हसत म्हणाला," चल भेटवतो तिच्याशी. बाबा तुम्ही पण सोबत चला, आईला नीट पकडून बसा मागे."

अन्वयने आईला आधार देत कारमध्ये बसविले आणि धावत-पळतच त्याने कार सुरू केली.

पहाटेची वेळी होती. सर्व कस शांत वाटत होतं. ना रस्त्यावर मानस होती ना गाड्यांचा कर्कश आवाज. कारमध्येही काहीशी तशीच स्थिती होती. अन्वयने आज आईला पहिल्यांदा इतकं घाबरलेल बघितलं होत म्हणून गाडी चालवतानाही त्याची एक नजर आईवरच होती. आईला थंडी वाजत होती म्हणून बाबांनी त्यांना घट्ट पकडून ठेवलं होत. आई शांत तर होत्या पण त्यांची आज कुणाशीच नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती म्हणून त्या सतत बाहेर बघत होत्या. अन्वयला खात्री होती की आईला तो ज्या जागी घेऊन जाणार होता त्या जागी स्वरा नक्की सापडेल पण समोर नक्की काय होणार आहे ह्याबद्दल अन्वयला खात्री नव्हती. आजपर्यंत स्वरावर भरपूर अन्याय झाले होते तेव्हा तिला कुणीही फोर्सफुली निर्णय घ्यायला लावू नये असे त्याला वाटत होते तर आईला ह्याक्षणी तो काहीही बोलू शकत नव्हता म्हणून शांतपणे होईल तितक्या लवकर तो गाडी चालवत होता.

साधरणता पाऊण तासाने गाडी एका जागी थांबली आणि आईबाबा दोघेही आजूबाजूला बघू लागले. आईबाबा काही रिऍक्ट करणार त्याआधीच अन्वय गाडीतून उतरला आणि त्याने गाडीचे दार उघडले. आई-बाबा बाहेर आलेच होते की त्याने इशारा करत म्हटले," आई स्वरा तुला तिथे नक्की सापडेल. जा भेटून घे फक्त तिला कुठलाही निर्णय घ्यायला फोर्स करू नका. मी माझं वचन पूर्ण केलं, इथे माझं काम संपलं पण तिच्यावर कुणीही बळजबरी केलेली मला आवडणार नाही ह्याच भान ठेवा."

अन्वय एवढं बोलून बाजूला झाला आणि आईने विचारले," तू नाही येणार आहेस आमच्यासोबत?"

अन्वय मिश्किल हसत उत्तरला," आई माझी हिम्मत नाहीये तिला फेस करायची. कुठल्या तोंडाने तिच्याशी बोलू. त्यापेक्षा जाऊन या तुम्ही. मी इथेच वाट बघतो आहे. तुमचं बोलून झालं की निघू मग घरी."

अन्वय काही शब्द बोलला आणि दुसर्या बाजूने चेहरा करून आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागला. आईने क्षणभर त्याच्याकडे नजर टाकली. आज अन्वयशी त्याही नजर मिळवू शकत नव्हत्या म्हणून एकमेकांच्या हातात हात टाकून आईबाबा समोर जाऊ लागले. अगदी काही पावलांवरच घराचं दार होत. ते दाराच्या समोर उभे झाले. अन्वयच्या आईला स्वराशी फेस करायची इतकी भीती वाटत होती की त्यांचे हातपाय थरथर कापू लागले होते. अन्वयच्या बाबांना त्यांची ती स्थिती समजली. त्यांनी त्यांचा हात घट्ट पकडला आणि दुसऱ्या हातांने बेल वाजवली. जवळपास पहाटेचे ४.१५ वाजले होते. ह्यावेळी सर्व झोपले असतील ह्याचा त्यांना अंदाज होताच म्हणून २-४ मिनिट होऊन गेले तरीही दार उघडल्या गेलं नव्हत. अन्वयच्या बाबांनी पुन्हा एकदा डोरबेल वाजवली आणि कुणीतरी बाहेर येण्याची वाट पाहू लागले. काही क्षण गेले. दार उघडून डोळे चोळतच स्वयमच्या आई बाहेर आल्या. त्यांना समोर कुणीतरी अनोळखी लोक दिसत होते. ते एवढ्या पहाटे इथे काय करत आहेत म्हणून स्वयमच्या आईने विचित्र नजरेनेच विचारले," जी कौन चाहीये और ये कोई वक्त है किसीं के घर आंने का? आपको किसके घरमे कब आना चाहीये ये भी पता नही?"

स्वयमच्या आईच्या डोळ्यात जरा राग दिसत होता. अन्वयच्या आई त्यांना बघून तर पुरत्या घाबरल्या होत्या. त्यांची ती अवस्था बघून अन्वयचे बाबाच म्हणाले," जी हम स्वरा से मिलने आये है. अभि नही मिलते तो बहोत देर हो जाती इसलीये वक्त देखा नही. माफ किजीए पर स्वरा होगी तो उसे बाहर बुलाइये?"

स्वराच नाव त्यांच्या तोंडून एकूण स्वयमच्या आईच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आणि त्यानी पटकन विचारले," जी आपण कौन और स्वरासे क्या काम है?"

अन्वयचे बाबा बोलणारच की आई घाबरलेल्या स्वरात म्हणाल्या," जी हम स्वरा के सास ससुर. इस वक्त आने के लिये माफी चाहते है पर क्या हम मिल सकते है स्वरासे. ऊससे हमारा बात करणा बेहद जरुरी है वरणा बहोत देर हो जायेगी. क्या आप उसे बाहर बुलायेगी प्लिज."

अन्वयच्या आई आशेच्या नजरेने बघत होत्या तर स्वयमच्या आईला काय बोलू सुचत नव्हतं तेवढ्यात स्वराच मधून ओरडली," इतने सुबहँ सुबहँ कौन आया है माँ? कोई प्रॉब्लेम तो नही है?"

स्वराचा आवाज ऐकताच अन्वयच्या आई कुणाचीही परवानगी न घेताच मध्ये पोहोचल्या. मागे मागे स्वयमच्या आई आणि अन्वयचे बाबा सुद्धा पोहोचले होते. स्वरा आईला समोर बघून शॉक झाली होती. तिला काय बोलू तेच समजत नव्हतं तेवढ्यात अन्वयच्या आईने तिचे पाय पकडले. आईनी पायाला हात लावताच स्वराने त्यांचे हात पकडले. हात पकडताच त्यांचं शरीर गरम असल्याचं तिला जाणवलं. तिने त्यांना सोफ्यावर बसविले आणि धावतच जाऊन पाणी घेऊन आली. आई तिच्याकडे बघत होत्या तर स्वराने आपल्या हाताने त्यांना पाणी पाजल. आई आता शांत वाटत होत्या आणि स्वराने म्हटले," आई किती ताप आलाय तुम्हाला, औषध का घेतलं नाही??"

स्वरा त्यांच्याकडे बघत होती आणि आई शांतपणे घाबरत उत्तरल्या," स्वरा ते सर्व नंतर. मला ह्या क्षणी तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायच आहे प्लिज मला बोलू दे नाही तर खूप उशीर होऊन जाईल. प्लिज बाळा मग तू म्हणशील ते करेन पण ह्याक्षणी मला बोलू दे."

आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले होते तर स्वरा त्यांच्याकडे एकटक बघत होती. घरात काही वेळ गोंधळ सुरू असल्याने स्वयम, स्वराचे आईबाबा सुद्धा हॉलमध्ये पोहोचले होते. सर्व एकटक एकमेकांना बघत होते आणि आईने स्वराचा हात पकडत म्हटले," सॉरी स्वरा!! सॉरी नक्की कशा कशासाठी म्हणू हाही प्रश्नच आहे पण निदान सॉरी म्हणून थोडस मन हलकं होईल. स्वरा मी ना जगाच्या विचारात आंधळी झाले होते. लहान पनापासून समाज आयुष्यात किती महत्त्वाचा असतो हेच ऐकत आलेले त्यामुळे समाजाशिवाय जगणे अगदी कठीण हाच विचार मनात बसत गेला. स्वरा माझी अन्वय साठी खूप स्वप्न होती. अगदी माझा जीव आहे तो म्हणूनही असेल. म्हणूनच कदाचित मी माझ्या अन्वयसाठी सुंदर मुलगी आणायची ठरवली. माझ्या मैत्रिणीच्या गप्पामध्ये जायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यात मला सतत उपहास जाणवत गेला. सोसायटीमधल्या एखाद्या मुलाने लग्न करून एखादी काळी सावळी मुलगी आणली की ती चर्चेचा विषय व्हायची. ह्या सर्व गोष्टी इतक्या मनावर बिंबविल्या गेल्या की सुंदर चेहर्या पलीकडे मी कधीच जाऊ शकले नाही आणि नकळत त्याच्यावर जबरदस्ती करत गेले. तो माझ्यावर प्रेम करतो म्हणजे त्याने माझं ऐकलंच पाहिजे अशी समजूत होत गेली. अन्वय मुलींना नकार देत गेला आणि माझा तो हट्ट पुन्हा मजबूत होत गेला. सतत एकच वाक्य मनात येत होत माझ्या अन्वयसाठी सर्वात सुंदर मुलगी मला शोधायची आहे."

आई क्षणाचाही उसंत न घेता बोलत होत्या तर बाकी सर्व एकटक त्यांच्याकडे बघत होते. आईने सर्विकडे नजर फिरवली आणि पुन्हा एकदा म्हणाल्या," स्वरा मला तेव्हा सुंदर चेहरा म्हणजे सुंदरता अस वाटत होतं पण गेल्या काही महिन्यात तुझा सहवास लाभला आणि सुंदरतेची व्याख्याही बदलली. स्वरा मी तुला आधीच सांगायला हवं होत पण तुझा सहवास मिळविण्याचा स्वार्थ मला थांबविता आला नाही आणि मी त्या सहवासासाठी तुझ्याशी मनातलं बोलायच टाळत राहिले. मी तुला अन्वयसोबत आहेस म्हणून स्वार्थी म्हणत होते पण तुझा सहवास लाभावा म्हणून मीही स्वार्थी झालेच. स्वरा स्वार्थी जगात सर्वच आहेत अगदी मीही केलाच की स्वार्थ मग तुझा अन्वय सोबत राहण्याचा स्वार्थ कसा चुकीचा असेल? चुकलो तर आम्ही. मोठे झालो ते फक्त वयाने, बाकी विचाराने तर आम्ही तुझ्या पेक्षाही कमजोर निघालो. स्वरा माहिती आहे खूप उशीर झालाय तरीही बोलते, मी माझ्या मुलांसाठी जगातली सर्वात सुंदर मुलगी शोधून आणली असती ना तरीही तिने तुझी बरोबरी केली नसती. देवाने सुंदरतेचा प्रत्येक गुण व्यक्तीला दिला आहे पण तू एकमेव आहेस जिच्यात जगातल्या सर्वात सुंदरता भरल्या आहेत. स्वरा मला खरी सुंदरता समजली आहे. प्लिज आपलं घर सोडून आम्हाला अनाथ नको करुस. माझ्या घरची लक्ष्मी मी नाही तर तू आहेस. मी फक्त त्याला वाढवल पण खऱ्या अर्थाने तू त्याला घर बनविलस. स्वरा सोडून नको जाऊस ना. प्लिज एक संधी दे मला सर्व काही नीट करायची. मी वचन देते की तुला पुन्हा कधीच तक्रार करावी लागणार नाही. स्वरा प्लिज घरी चल ना."

अन्वयची आई थांबली आणि अन्वयचे बाबा म्हणाले," स्वरा आम्ही आयुष्यात खूप चुका केल्या आहेत पण आता त्या सर्व सुधारायच्या आहेत. माहिती आहे इतकं सोपं नाही त्या लवकर विसरन पण एक संधी दे नाही तर मरेपर्यंत ही सल अशीच राहील. स्वरा आमच्यासाठी नसेल यायचं तर नको येऊस पण माझ्या अन्वय साठी ये. तो बोलत नाही, तो आम्हाला कधीही बोलणार नाही पण तो तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे सत्य आहे तेव्हा आमच्या चुकांमुळे त्याला शिक्षा देऊ नकोस. आम्ही चुकलो असेल पण तो तुझ्याबाबतीत कायम बरोबर होता तेव्हा त्याच्यासाठी चल. प्लिज ये ना बाळा."

आईबाबा दोघांचही बोलून झालं होतं. स्वरा काही क्षण शांत झाली आणि एकही शब्द न बोलता कुठेतरी निघाली. जाताना तिच्या नजरेत त्यांनी डोकावून बघण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात नेहमीप्रमाणे काहीच नव्हत. ती गेली आणि पुन्हा सर्व काही शांत झालं. तीच विना बोलता जाणं म्हणजे ???? एक आशाही होती की ती त्यांना समजून घेईल पण स्वरा मध्ये निघून गेली आणि आईबाबा दोघेही भरलेल्या डोळ्याने, जड अंःकरणाने हाती निराशा घेऊन बाहेर जाऊ लागले. तिथून निघताना त्यांचे पाय जड झाले होते तरीही एक एक पाऊल टाकत ते बाहेर जाऊ लागले. काही पावले त्यांनी टाकलीच होती की स्वराने मागून आईचा हात पकडला. आईने क्षणभर तिच्याकडे नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरल होत. तिने आईला हळुवार सोफ्यावर बसविले आणि हसतच उत्तरली," मी आहे कायमच सोबत. मला आवडेल तुमचं प्रेम अनुभवायला पण त्यासाठी आधी तुम्हाला बरे व्हावं लागेल ना. मग घ्या हे औषध. तुमचीच तब्येत बरी नसेल तर माझ्यावर प्रेम कोण करणार बर? आता तर मी तुमच्या प्रेमासाठी सुद्धा स्वार्थी होणार आहे. मला खूप प्रेम हवंय त्यांच्याकडून..द्याल ना?"

आईच्या डोळ्यात अश्रू होते तर स्वराच्या चेहऱ्यावर गोड हसू. स्वराने क्षणात त्यांना औषध दिले आणि हसतच मोठ्याने म्हणाली," माँ प्लिज आप नाश्ता बना देंगी."

स्वयमच्या आई हसतच किचनकडे जाऊ लागल्या तर स्वराची आई अन्वयच्या आईजवळ येऊन बसली. दोघांच्याही डोळ्यात क्षणभर अश्रू होते. स्वराने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि बाबांना हळुवार विचारले," अन्वय सर कुठे आहेत?"

बाबांनी बाहेरचा इशारा केला. स्वराने बारीक नजरेने अन्वयकडे बघितले आणि पुन्हा एकदा बेडरूमकडे धावत गेली. ती जशी बेडरूमला गेली तशीच पुन्हा बाहेर आली. अन्वय बाहेरच्या वातावरणात हरवला होता. स्वराने मागून जाऊन त्यांच्या अंगावर शाल टाकली आणि हळुवार हसत उत्तरली," रागावला आहात माझ्यावर?"

तिच्या पैंजनाच्या आवाजानेच ती जवळ येत असल्याच त्याला जाणवलं होत तरीही त्याने तिच्याकडे बघितले नाही. तो आताही शांत जाणवत होता आणि स्वराच बोलणं पूर्ण होताच उत्तरला," नाही ग फक्त जाताना भेटून जायचं होतंस. जिथे जायचं होतं तिथे स्वता सोडून आलो असतो. तुला त्रास दिला नसता पण तू कुठे आहेस ह्याबद्दल माहिती असती मला. इतका अधिकार तर नक्कीच आहे ना मला स्वरा? लोकांमुळे आपल्याला वेगळं राहावं लागेल ते मी मंजूर करेल पण तुझ्याबाबतीत काळजी करण्याचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही अगदी कुणीच नाही कारण तू माझी बायको आहेस आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहशील."

तो बोलून शांत झाला होता तर स्वराकडेही आज त्याच्या बोलण्याच उत्तर नव्हत. क्षणभर तिला तीच मन बोलून गेलं होतं की अन्वय सर इतकही समजदार कोण असत बर? तिला त्याचा अभिमान वाटत होता पण ती तेसुद्धा बोलू शकली नाही. दोघेही आज सोबतच होते पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते आणि बऱ्याच वेळ शांत राहिल्यावर स्वराने विचारले," तुम्हाला कस माहिती मी इथे आहे ते?"

अन्वय आताही शांत जाणवत होता. तो हळुवार आवाजात म्हणाला," माझा एक फ्रेंड आहे पोलीस मध्ये. त्याच्याकडून तुझा लास्ट कॉल चेक केला तर तो स्वयमला गेला होता सोबतच स्वयम दुपारी तुला रिसिव्ह करायला आला होता हे त्याच्या नंबर वरून समजलं. मग लावला अंदाज."

स्वरा पुन्हा एकदा शांत झाली. आज पहिल्यादा त्याच्याशी नजर मिळवायला तिला भीती वाटत होती आणि सेम स्थिती अन्वयची देखील होती. काही क्षण स्वरा शांत होती आणि हळूच तिने विचारले," एवढ्या दूर आला होतात तर मग मध्ये का आला नाहीत?"

अन्वय आता गोड हसत उत्तरला," कुठला चेहरा घेऊन तुला भेटलो असतो? नजर मिळवायची हिम्मत नव्हती माझ्यात. स्वरा ते सोड मला काहीतरी महत्त्वाचं बोलायच आहे. आईबाबा काहीही बोलू दे पण तू तेच कर जे तुझं मन तुला सांगत. तुला जर वाटत असेल की तू एकटी राहून खुश राहु शकतेस तर मी कायम सोबत आहे तुझ्या. तू हक्काने सांग मी राहील तुझ्याशिवाय. मला नाही ठेवायचं आता तुला बंदिस्त करून. तुला उडायला मदत करायची आहे, आयुष्यातले सर्व आनंद तुझ्या पदरात आणून टाकायचे आहेत. तुझ्या आयुष्यात असा एक क्षण असेल जो तुला त्रास देत असेल तर तो नाहीसा करायचा आहे. तू फक्त एकदा निर्णय सांग मी खरच लढेन जगविरुद्ध."

तो बोलून गेला आणि आई दुरूनच मोठ्याने ओरडत म्हणाल्या," मूर्ख!! किती मेहनतीने तिला मनवल आणि तू तिला जायला सांगतो आहेस. तुला ना मारच द्यायला हवा. ती येणार आहे आपल्याकडे आणि आता कुठेच जाणार नाही. समजलं? तेव्हा हे विनाकारण सल्ले देऊ नकोस..मूर्ख कुठला!!"

आईच बोलणं ऐकून स्वरा हसत होती. एवढंच काय बाहेर येऊन सर्वच हसत होते फक्त अन्वय सोडून. अन्वय तिच्या बाजूने वळाला आणि सिरीयस होत बोलून गेला," स्वरा मला तुझा निर्णय ऐकायचा आहे. बाकी मला कुणाशीही घेणं देणं नाही. तू सांग काय हवं तुला?"

अन्वय धीरगंभीर होऊन बोलत होता तर सर्व स्वराकडे बघत होते. स्वराने त्याच्या नजरेला नजर दिली. काही क्षण ती त्याच्या नजरेत हरवली. त्याच्या नजरेत तिला प्रेम दिसत होतं, अस प्रेम जे आधी कधीही कुणीही तिच्यावर केलं नव्हतं. त्याच्या नजरेत बघताच तिने त्याला घट्ट मिठी मारत म्हटले," नवरोबा इतकं प्रेम कोण करत हो तेही माझ्यासारख्या मुलीवर?"

अन्वय तिच्याकडे एकटक बघत होता आणि ती पून्हा म्हणाली," अन्वय सर माझं उत्तर हवं आहे ना तर ऐका. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आहात आणि आज हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अन्वय सर फायनली तुम्ही सर्वांशी भांडून मला माझं स्थान मिळवुन दिलच. हे प्रेम नक्की कोणत्या शब्दात व्यक्त करू शकते. अन्वय सर फायनली सर्वांशी युद्ध करून आपलं प्रेम जिंकल मग आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला सोडून कशी जाऊ? आजपर्यंत मी माझ्या स्वार्थीपनावर चिडत आले होते पण आज स्वता स्वार्थी होऊन म्हणते की मला प्रत्येक क्षण तुमच्या सोबत जगायचा आहे. तुम्ही आहात तर स्वरा आहे, तुम्ही नाहीत तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही."

स्वरा बोलता- बोलता थांबली. तिने त्याची मिठी सैल केली आणि गुडघ्यावर बसत उत्तरली," अन्वय सर आय लव्ह यु. तुम्ही देणार माझी आयुष्यभर साथ? मला जगायचा आहे प्रत्येक सेकंद तुमच्यासोबत. माझं सुख दुःख मला तुमच्या सोबत शेअर करायचं आहे, मला पुन्हा एकदा नव्याने सर्वांच प्रेम अनुभवायचं आहे. प्रेयसी बनून मला फार आयुष्य जगता आलं नाही पण आता बायको बनून प्रेयसी आणि बायकोचं प्रेम एकत्र मिळवायचं आहे. नाचायचं आहे तुमच्या प्रेमात तल्लीन होऊन तेही लोकांचा क्षणभरही विचार न करता. देणार ना तुम्ही माझी साथ? "

आतापर्यंत शांत असलेला अन्वय क्षणभर हसला आणि तिला उठवून घट्ट मिठीत घेत उत्तरला," शेवटच्या श्वासापर्यंत. आता लिहुया नव्याने आपल्या भाग्याची कहाणी. तुझ्या-माझ्या प्रेमाची कहाणी. 'स्वरान्वय' ची कहाणी. बायको लव्ह यु सो मच!!"

अन्वय स्वरा मिठीत होते. सर्वांच्या नजरा त्या दोघांवर आणि स्वयम आपल्या आईला मिठी मारत म्हणाला," ममी फायनली प्यार जित गया. प्यार हो तो ऐसा हो वरणा ना हो. सोचा नही था की स्वरा की कहाणी यहा आकर रुक जायेगी बट आय एम टु हॅपी!! उसने जिसे चाहा वो मिल गया, मुझे उसकी खुशी मिली और दिया उसने जमाने को प्यार का नया मतलब. क्या होता है प्यार!! यही है प्यार का सही मतलब!! बाटते रहो तभी बढेगा.. लव्ह यु ममा!!"

आज सर्वांच्या नजरेत आनंद होता आणि होत चेहऱ्यावर हसू कारण फायनली संघर्ष करून स्वरा- अन्वय 'स्वरान्वय' झाले होते..

संघर्ष हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, संघर्ष नसेल तर तुमच्या यशालाही किंमत नसते. प्रेम सर्वच करतात पण लोक त्यांनाच आठवणीत ठेवतात जे जगाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन प्रेम करतात मग ते सोबत असोत व नसोत ह्याने फरक पडत नाही पण स्वरांवयची कहाणी इथेच थांबणार नव्हती. ती जगाला देणार होती नव्याने प्रेमाची भाषा..कदाचित जगाला ज्याची जास्त गरज आहे..बरोबर ना? नाही तर प्रेमाच्या भाषा वापरून एका मुलीचं आयुष्य उधळून टाकण्यात कसला आला होता बर आनंद??

इतिहास दोहराये नही जाते
वो नये लिखे जाते है
बदलता रहेगा जमाना युही
पर जो ना बदले उसे मोहब्बत केहते है..

क्रमशः...